दही खाण्याचे फायदे Benefits of Curd 

दही खाण्याचे फायदे Benefits of Curd  – तुम्ही रोज दही खाता का ? दही खाण्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत का? नसेल माहित तर, अजिबात काळजी करू नका. दही हे पोषक तत्वांचा मोठा स्त्रोत आहे. ज्याचे दररोज सेवन केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. हे किण्वन प्रक्रियेद्वारे तयार केले जाते

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास दही रोज खाण्याचे फायदे काय आहेत, या बद्दल माहिती दिली आहे. तुम्हाला दही खाण्याचे काही फायदे नक्कीच माहीत असतील, पण सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत बघा.

Table of Contents

दही खाण्याचे फायदे Benefits of Curd 

१०० ग्रॅम दह्या मध्ये असलेले पौष्टिक घटक

दही खाण्याचे फायदे Benefits of Curd  –

लोह०.२ मिली
कॅल्शियम१४९ मिली
विटामिन सी१ मिली
खनिज १%
विटामिन ए१०२ युनिट
कॅलरोफिक६० मूल्य
प्रोटीन३%
पाणी८९%
चरबी४%

दही खाण्याचे फायदे Benefits of Curd  – जेवणात रोज दही खाणं आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत होते. दही पौष्टिक असल्यामुळे, आरोग्य संबंधी आणि सौंदर्य संबंधितही दही खाणे, हा उपाय उत्तम आहे.

केसातील कोंड्यापासून, त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. रोज दह्यात गूळ किंवा खडीसाखर टाकून किंवा लस्सीच्या स्वरूपात दही खाल्ल्याने, सौंदर्याला मोठा फायदा होईल. जेवणात रोज दही खाणं आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे, शरीरातील समस्या दूर व्हायला नक्कीच मदत होते.

दही खाण्याचे फायदे

हे वाचा –

दही खाण्याचे फायदे

 • केस गळती थांबते
 • चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होतात,
 • त्वचेवरील काळे डाग सर्कल्स कमी होतात
 • केसातील कोंडा कमी होतो
 • त्वचा उजळ आणि चमकदार होत
 • केस वाढण्यासही मदत होते

दही साखर खाण्याचे वैज्ञानिक कारण

दही खाण्याचे फायदे Benefits of Curd  – आपण लहानपणीपासून पाहत आलो आहोत, जेव्हा आपण एखाद्या शुभकार्यासाठी घराबाहेर जातो, त्यावेळी आपली आई किंवा आजी किंवा घरातली मोठी माणसं, त्या व्यक्तीच्या हातावर दही साखर देतात.

दही साखरेमुळे यश मिळतं असं त्यांचं म्हणणं असतं. आपण जरी किती चिडचिड, कटकट केली, तरी देखील ते आपल्या हातावर दही साखर ठेवतच असतात.

जेव्हा मुलं कामासाठी जातात किंवा परीक्षांसाठी जातात, तेव्हा सुद्धा त्यांच्या हातावर दही साखर दिली जाते. वडील एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असतील, तेव्हा त्यांच्याही हातावर दही साखर दिली जाते.

पण मग यामागे फक्त घरातल्या मोठ्या माणसांची भोळी श्रद्धा नसून, एक शास्त्रीय कारण सुद्धा आहे. मग काय आहे ते शास्त्रीय कारण ? चला जाणून घेऊया.

दह्यामध्ये कॅल्शियम, विटामिन बी, व्हिटॅमिन बी12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात. जे शरीरासाठी आवश्यक असतात.

दही खाल्ल्याने पोट भरण्याची भावना दीर्घकाळपर्यंत टिकून राहते. दही शरीरासाठी सुपरफुड आहे. कारण दह्यामधील गुड बॅक्टेरिया, पोटाचे कार्य सुधारण्यात मदत करतात. तसेच दह्यामध्ये पाणी असल्यामुळे, बद्धकोष्ठतेची समस्याही होत नाही.

मंडळी आपल्या भारतीय संस्कृतीत आपण अशा बऱ्याच गोष्टी करतो, ज्या करण्यामागचं कारण आपल्याला माहीतच नसतं आणि मोठ्या माणसांना विचारलं तरी सुद्धा ते एवढंच म्हणतात की, आमच्या पूर्वजांनी जे केलं तेच आम्ही करतो आहोत.

पण आपली आजची पिढी मात्र सुशिक्षित आहे. स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी सक्षम आहे आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीमागे काही शास्त्रीय कारण आहे का ? हे आपण शोधण्याचा प्रयत्न करायलाच हवा.

कारण त्यामुळेच, आपल्याला आपली संस्कृती आणखी चांगल्या प्रकारे कळू शकते आणि चांगल्या प्रथा आपण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणूनच प्रत्येक गोष्टीवर अभ्यास आणि संशोधन व्हायला हवेत.

दही खाण्याचे फायदे

दही साखर खाण्याचे फायदे

दही पचायला देखील हलकं असतं. मंडळी आयुर्वेदानुसार, देखील दही साखर खाण्याचे काही फायदे सांगण्यात आले आहेत.

शरीराला थंडावा मिळतो आणि ऊर्जा मिळते

दही हे थंड असतं. त्यामुळे दही उन्हाळ्याच्या दिवसात शरीर थंड करण्याचं काम करत. तर साखरेमध्ये ग्लुकोज असतं. जेव्हा दही आपल्या पोटामध्ये जातं, तेव्हा आपल्या शरीराला थंडावा मिळतो.

तर साखरेमुळे आपल्याला ऊर्जा मिळते. त्यामुळे परीक्षा किंवा जॉब इंटरव्यू साठी जाताना आपली आई किंवा आजी आपल्याला दही साखर खाण्याचा आग्रह करते.

मेंदू आणि मन शांत राहतं

हे दही साखर खाल्ल्यामुळे, आपला मेंदू आणि मन शांत राहतं आणि शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि अर्थातच आपली मानसिकता चांगली राहते आणि त्यामुळेच आपण ज्या कामासाठी जात आहोत, ते चांगल्या प्रकारे पार पडते.

दही खाण्याचे लाभदायी फायदे

दही खाण्याचे फायदे Benefits of Curd  – जेवणात रोज दही खाणं आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे शरीराला अनेक समस्यांपासून दूर व्हायला मदत होते. केसातील कोंडा काढण्यापासून, त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा वापर केला जातो.

जर तुम्ही रोज आहारात, मीठ टाकून किंवा लस्सीच्या स्वरूपात दही खाल्ला तर तुमच्या शरीराला मोठा फायदा होईल. तर चला मग जाणून घेऊया दही खाण्याचे फायदे कोणते आहेत.

 • दही, ताक किंवा लस्सी करून, प्यायल्याने, आपल्या शरीरातील उष्णता कमी होते.
 • पोट बिघडले असेल तर, भातासोबत दही खाल्ल्याने आराम मिळतो.
 • उच्च रक्तदाब, फुफुसाच्या आजार आणि शरीरात वाढणारे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी दही चांगलं काम करते.
 • सडपातळ व्यक्तीने रोज आहारात दह्यासोबत किसलेले खोबरे आणि बदाम खाल्ल्यास, वजन वाढण्यास मदत होते. अमेरिकेतील आहार तज्ञांनी असे सांगितले आहे की, प्रत्येक दिवशी आहारात दह्याचा वापर केला तर आपल्याला आजार होत नाही.
 • दह्यामध्ये थोडे हिंग मिसळून खाल्ल्याने, सांधेदुखी, गुडघेदुखी, यांसारखे आजार बरे होण्यास मदत होते. दह्यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, हाड बळकट करण्यासाठी मदत होते.
 • दात आणि बोटांची नखं दह्यामुळे मजबूत होतात. तुम्हाला हे माहितीच असेल की, शरीरात उष्णता वाढल्यावर तोंडामध्ये फोड येतात, या फोडांवर दह्याची मलाई, लावल्यास तोंडातील फोड बरे व्हायला मदत होते.
 • उन्हाळ्यात घामाचा वास जास्त येतो. दही आणि बेसनच्या मिश्रणाने, शरीराची मालिश केल्यास घामाचा वास कमी व्हायला मदत होते. दही शरीरावर लावून आंघोळ केल्याने, त्वचा सुंदर आणि मुलायम होते.
 • दह्यात लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावल्याने, रंग उजळतो. तसेच दह्यात मध टाकून खाल्ल्याने सौंदर्यात भर पडते.
 • दह्या पासून तयार करण्यात आलेल्या ताकाने केस धुतल्यास व नियमित दह्याने मालिश केल्यास केस स्वच्छ आणि सुंदर दिसायला मदत होते.
 • लहान मुलांना दात येते वेळी खूप त्रास होतो. अशावेळी मध आणि दह्याचे मिश्रण लहान मुलांना दिल्याने, दात येताना त्रास होत नाही.
 • दही खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दमा आणि ऍलर्जी सारख्या रोगांपासून आराम मिळण्यासाठी दही आहारात घेणे आवश्यक आहे.
 • मुळव्याध झालेल्या रुग्णांनी दुपारच्या जेवणानंतर, एक ग्लास ताकामध्ये ओवा टाकून घेतल्यास, त्यांना लवकरात भेटेल.
दही

दही खाण्याचे बहुगुणी फायदे

दही खाण्याचे फायदे Benefits of Curd  – जेवणात रोज दही खाणं आवश्यक आहे. दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर खायला मोठी मदत होते. दही पौष्टिक असल्यामुळे, आरोग्य संबंधित आणि सौंदर्या संबंधित दही खाणं हा उपाय उत्तम आहे.

दही अग्नी दीपक, तुरट, जड, आंबट, जुलाबावर गुणकारी तसेच पित्त, रक्तदोष, सूज, मेद व कफकारक आहे. ददही हे वीर्यवर्धक आहे. चला तर जाणून घेऊया दही खाण्याचे अद्भुत फायदे.

सौंदर्याला मोठा फायदा होतो

रोज दह्यात मीठ टाकून किंवा लसीच्या स्वरूपात दही खाल्ल्याने, सौंदर्याला मोठा फायदा होतो.

हाय ब्लड प्रेशरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो

नियमितपणे दह्याचे सेवन केल्याने, हाय ब्लड प्रेशरचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. तसेच हृदयासंबंधी अनेक आजार दूर करण्यास दह्याची मदत होते.

तापाचा प्रतिकार करण्यात फायदेशीर

तापामध्ये मध्ये तोंड कडू पडते. काही खाल्ले तरी त्याची चव लागत नाही. अशावेळी दहि भात खाणे फायदेशीर असते.

यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. यामधील रोगप्रतिकार तत्व आणि अँटि ऑक्सिडन्स तापाचा प्रतिकार करण्यात फायदेशीर असते.

तोंड आल्यास दह्याचा वापर

तोंड आल्यास दह्याचा वापर दिवसातून दोन ते तीन वेळा करावा. त्याने नक्कीच फायदा मिळतो.

हाडांना मजबुती मिळते

दह्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या प्रोटीन, कॅल्शियम व विटामिन मुळे आरोग्य व सौंदर्य टिकवण्यात हे उपयोगी आहे. दह्यात कॅल्शियम असते ज्यामुळे हाडांना मजबुती मिळते.

पोटाचे कार्य सुधारण्यास मदत

दह्यांमधील गुड बॅक्टेरिया पोटाचे कार्य सुधारण्यास मदत करतात. तसेच दह्यामध्ये पाणी असल्यामुळे बद्धकोष्ठय समस्या होत नाही.

पचनशक्ती चांगले होते

अपचन किंवा पित्त असल्यास, जेवणात दही भात खाणे फायदेशीर असते. भात पचण्यास सोपा असतो. यामुळे वेदना आणि त्रास होत नाही.

दह्यामुळे पचनशक्ती चांगले होते, ज्यांना भूक कमी लागते, त्यांनी दह्याचे नियमित सेवन करावे.

आजार थांबवण्याची क्षमता

दह्यात हृदयरोग, उच्च रक्तदाब व फुफुसांचे आजार थांबवण्याची क्षमता आहे.

झोपेची समस्या कमी होते

रात्री झोप येत नसल्यास, दररोज देण्याचे सेवन करा झोपेची समस्या हळूहळू कमी होईल.

आतड्याचे रोग व पोटात संबंधित आजारावर फायदेशीर

अमेरिकेन आहार तज्ञ च्या मते, दह्याच्या नियमित सेवनाने आतड्याचे रोग व पोटात संबंधित आजार बरे होतात. दह्याचे नियमित सेवन शरीरासाठी अमृता समान मानले जाते.

रक्ताची कमतरता तसेच थकवा दूर होतो

दह्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता तसेच थकवा दूर होतो.

वजन कमी होण्यास मदत

ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे, त्यांनी आपल्या आहारात दहीभात खाणे आवश्यक आहे. परंतु दोन्ही वेळी दहि भात खाऊ नये. मर्यादित प्रमाणातच याचे सेवन करावे.

दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावना दीर्घकाळपर्यंत टिकून राहते. म्हणून दोन जेवणामध्ये दही खाल्ल्यास भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Benefits of Curd

वजन वाढण्यास मदत होते

वजन वाढवायचे असल्यास, दह्यात बदाम बेदाणे मिसळून खाल्ल्यास फायदा होतो. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि कॅल्शियम आहेत, जे शरीरात सहज शोषले जाते आणि शरीराची गरज भागते. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.

ताण कमी होण्यास मदत

दही खाल्ल्याने ताण कमी होण्यास मदत होते. त्यामधील प्रोबायोटिक बॅक्टटेरिया आणि अँटि ऑक्सिडन्स चांगले फॅट्स निर्माण करण्यास फायदेशीर ठरतात.

ऊर्जा त्वरित मिळते

दही खाल्ल्याने भरपूर ऊर्जा त्वरित मिळते आणि धकाधकीनंतरचा थकवा त्वरित निघून जातो. दही आणि साखर खाल्ल्याने काम शक्ती वाढते.

नपुसंकता कमी होण्यास मदत होते. पुरुष बिजांची संख्या आणि गुणवत्ता सुधारते.

शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते

दही खाल्ल्याने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पेशी कार्यरत होऊन, शरीरातील संरक्षक यंत्रणा बळकट बनते.

त्यामुळे विषाणूचा नायनाट होऊन, संसर्गजन्य आजार होत नाहीत. दातातील कीड नाहीशी होते.

मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत

दह्यामुळे रक्तातील साखरेची याची पातळी योग्य राखली जाऊन, मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते. मधुमेहामध्ये होणारे गुप्तांगाची खाज कमी होते.

पचायला हलके असते

दही पचायला हलके असते. तसेच दह्यामुळे जठरातील आणि आपल्यातील पाचक रस स्त्रवण्यास मदत होते. जेणेकरून जड अन्न देखील सहज पचते.

खूप तिखट, तेलकट, मसालेदार, चमचमीत, जेवणासोबत दही खाल्ल्यास असा आहार बाधत नाही.

रक्तदाब नियंत्रित राहतो

दह्यामध्ये रक्तातील चरबी घटवण्याची क्षमता आहे. त्यामुळे विविध हृदयविकारांची शक्यता कमी होते. रक्तदाब नियंत्रित राहतो.

हिमोग्लोबिन वाढते आणि मज्जा संस्था निरोगी राहते

व्हिटॅमिन बी 5, बी 12, यासारखे जीवनसत्व आणि परिपूर्ण असलेले रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि मज्जा संस्था निरोगी राहते.

कॅल्शियम आणि जीवनसत्वा मुळे दात आणि हाडे बळकट होतात. मणक्याचे आरोग्य सुधारते.

आतड्यांच्या कर्करोगाची शक्यता कमी होते

आतड्यांच्या आरोग्यास पोषक जिवाणू दह्यात असल्याने, आतड्याचे आरोग्य सुधारते. आतड्यांच्या कर्करोगाची शक्यता कमी होते. पोट नियमीत साफ होते.

चेहऱ्यासाठी फायदेशीर

चेहऱ्यावर, त्वचेवर, मध आणि बदाम तेलासोबत पंधरा मिनिटे दही वापरल्याने, मृत आणि रखरखीत त्वचा निघून जाते. कांती उजळ बनते. संत्राच्या रसासोबत दही लावल्याने, रंग उजळतो.

गुलाब पाणी आणि हळदी सोबत दही लावल्याने, त्वचा उजळ आणि मुलायम बनते. लिंबूरस आणि दह्याच्या वापराने त्वचेवरील चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

केसांसाठी फायदेशीर

३० मिनिटापर्यंत केसांना दही लावून ठेवल्यानंतर, थंड पाण्याने धुतल्यास केस निरोगी, रेशमी बनतात. मेहंदी सोबत लावल्यास परिणाम आणखीन वाढतो.

दह्यातून काळी मिरी पावडर आठवड्यातून दोनदा केसांना लावल्यास, केसातील कोंडा नाहीसा होतो. केसांच्या मुळांना दही आणि बेसन लावल्याने, केस गळती कमी होते.

निद्रानाशची समस्या दूर होते

दही पौष्टिक असल्यामुळे आरोग्य संबंधी आणि सौंदर्यासंबंधी समस्यावर देखील दही खाणे हा उत्तम उपाय आहे दह्याचे सेवन केल्याने, निद्रानाशची समस्या दूर होते.

शरीराला हायड्रेट करते

दही खाल्ल्याने तणाव कमी होतो. दही एनर्जी बूस्टर म्हणून कार्य करते. हे एक अँटी ऑप्शन सारखं काम करत तसेच. शरीराला हायड्रेट करते.

मानसिक स्वास्थ टिकून राहण्यास मदत

दह्याचा वापर आहारात सातत्याने केल्याने, मेंदूतील सकारात्मकता वाढणाऱ्या पेशीमधील रासायनिक प्रक्रिया वाढीस लागून, चिंता, नकारात्मक विचार कमी होऊन, मानसिक स्वास्थ टिकून राहण्यास मदत होते. हे प्रयोगक्रांती सिद्ध झाले आहे.

दहीचे सौदंर्यवर्धक फेस पॅक

दही खाण्याचे फायदे Benefits of Curd  – दही हे आपल्या आरोग्यासाठी तर चांगले असतेच, पण आपल्या सुंदरतेसाठी देखील हे फार उपयोगी असते.

दही आणि मुलतानी माती

एक चमचा दही मध्ये, एक चमचा मुलतानी माती, चार थेंब लिंबूचा रस आणि अर्धा चमचा बदामाचे तेल घ्या. मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि याचा एक फेस पॅक बनवा. हा फेस पॅक चेहऱ्याला लावा.

सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. असे आठवड्यातून किमान दोन वेळा तरी करा. यामुळे तुमची कोरडी त्वचा मुलायम आणि कोमल सुद्धा बनते.

दही आणि बेसन

दही मध्ये बेसन मिक्स करून, त्याचा फेस पॅक बनवा. हा फेस पॅक चेहऱ्याला लावा. पंधरा मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्याला एक वेगळाच ग्लो येतो.

दही आणि हळद

दही मध्ये थोडीशी हळद मिक्स करून, त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. दहा मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळे डाग जातात आणि त्वचा हळूहळू उजळ बनू लागतो.

दही आणि संत्र्याचा रस

दही खाण्याचे फायदे Benefits of Curd  – दहीमध्ये थोडंसं संत्रीचा रस घ्या आणि याचा फेस पॅक बनवा. हा फेस पॅक चेहऱ्याला लावा. वीस मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा.

हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते आणि चेहरा गोरा सुद्धा बनतो.

अशाप्रकारे सुंदरतेसाठी दहीचे खूप सारे फायदे आहेत, जे तुम्ही मिळवू शकता.

दहीचा वापर करून केसांची काळजी कशी घ्यावी ?

दही खाण्याचे फायदे Benefits of Curd  – केस गळण्याची समस्या ही महिलांसह पुरुषांना सुद्धा जाणवत असते. केमिकल युक्त महागडया क्रिम्सचा वापर केल्यामुळे, केस खराब होत असतात. अनेक उपाय करून सुद्धा हवे तसे चमकदार आणि दाट केस आपल्याला मिळतच नाहीत.

तर आज आम्ही तुम्हाला दही चा वापर करून, कशा पद्धतीने केसांची काळजी घेऊ शकता, याबाबत सांगणार आहोत.

दही चा वापर जर केला ना तर तुम्हाला इतर कोणत्याही हेअर ट्रीटमेंट ची गरज भासणार नाही. तर जाणून घेऊयात दही चा केसांसाठी कसा वापर करता येईल.

दह्याचा आपण आहारात समावेश तर करतोच, त्यामुळे आपल्याला अनेक फायदे मिळत असतात. तसंच केसांसाठी सुद्धा तुम्ही दह्याचा वापर करू शकता.

आयर्न, विटामिन ए, विटामिन बी1, विटामिन बी2, विटामिन बी5 आणि विटामिन सी यासारखे अनेक खनिज तत्व दह्यात भरपूर असतात.

विटामिन्स तुमचे शरीर निरोगी राहण्यासाठी, अतिशय फायदेशीर असतात. दही केसांना लावल्यास केस थंड राहतात आणि केसांमध्ये जो ओलावा आहे, तो राहतो. अर्थातच केसांना दही चांगलं मॉइश्चराईज करून टाकतात.

केसांसाठी दहीचा फायदेशीर हेअर मास्क

दही खाण्याचे फायदे Benefits of Curd  –

दही आणि काळीमिरीची पावडर

दही केसांसाठी सुद्धा फार उपयोगी आहे. एका वाटीमध्ये दही घ्या आणि त्यात अर्धा चमचा काळा मिरची पावडर मिक्स करा आणि याची एक पेस्ट बनवा.

ही पेस्ट केसांना लावा. वीस मिनिटानंतर केस स्वच्छ धुवा. असे आठवड्यातून एकदा तरी करा. यामुळे केसांचे गळणे बंद होते आणि केसांची वाढ सुद्धा चांगली होते.

दही आणि कडीपत्याची पाने

तुमचे केस जर गळत असतील ना, तर दह्यामध्ये काही कडीपत्त्याची पानं घाला. ही पेस्ट तुम्ही तुमच्या केसांवर लावल्यास, तुमची केस गळती थांबेलच.

पण तुमचे केस काळे देखील होतील. आठवड्यातून तुम्ही हा उपाय दोन वेळा नक्कीच करू शकता.

लिंबू आणि दही

लिंबू आणि दह्याचं मिश्रण हे केसांसाठी अतिशय लाभदायक मानलं जातं. त्यासाठी एका भांड्यात दही, दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा मध असं एकत्र करा.

त्यानंतर हे मिश्रण, वीस मिनिटांपर्यंत केसांना लावून ठेवा. मग कोमट पाण्याने केस धुऊन टाका. आठवड्यातून एकदाच हे मिश्रण केसांना लावलं तरी तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.

एलोवेरा आणि दही

एलोवेरा आणि दही यांचं मिश्रण केसांवर १५ मिनिटं लावून, केसांना मालिश करा. अर्धा तासात हे मिश्रण सुकेल आणि मग केस तुम्ही शाम्पू लावून धुवून टाकू शकता.

केसांच्या वाढीसाठी आठवड्यातून दोन वेळा तरी हा उपाय तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.

दही आणि अंडे

केस खूपच कोरडे आणि निस्तेज झाले असतील तर, दही, अंडी आणि बदामाच्या तेलाचं मिश्रण नक्की यावर उपयुक्त ठरू शकत. या तीन गोष्टी म्हणजेच काय तर दही, अंडी आणि बदामाचे तेल याचा मिश्रण करून केसांना लावल्यास, तुमचे केस मऊ आणि मजबूत होतील.

अर्धा तास हा मिश्रण लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने केस धुऊन घ्या. यामुळे कोंड्याच्या समस्येपासून देखील तुम्हाला नक्कीच सुटका मिळेल.

दही आणि बेसन

केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी आणि केसांची चमक वाढवण्यासाठी दह्यामध्ये बेसन घालून ती पेस्ट तयार करून तुम्ही केसांच्या मुळापासून लावू शकता आणि एका तासाने तुम्ही ते धुऊन टाकू शकता.

अतिप्रमाणात दहीचे सेवन करण्याचे दुष्परिणाम

दही खाण्याचे फायदे Benefits of Curd  – दही अति प्रमाणात सेवन करू नये. यामुळे कधी कधी आरोग्यास अपाय देखील होऊ शकतो. केवळ ताजे आणि जास्त आंबट नसलेले दहीच सेवन करावे.

दही मीठा सोबत खाऊ नये. मिठामुळे शरीरातील उपयुक्त बॅक्टेरिया नाश पावतात.

दही कधी आणि कसे खावे ?

दही खाण्याचे फायदे Benefits of Curd  –

 • थंडीनंतर उष्णतेचे दिवस सुरू झाले की, लगेच लोकांना दही खाण्याचे वेध लागतात. गरमीचे दिवस सुरू झाले आहेत म्हणून पोटाला थंडावा मिळण्यासाठी लोक दही खायला सुरुवात करतात.
 • शरीराला थंड असणारे दही, शरीरात गेल्यानंतर मात्र उष्णता वाढवते. “दही उष्णम” असा स्पष्ट संकेत आयुर्वेदात दिलाय. संपूर्ण वर्षभरामध्ये ज्या ऋतूमध्ये दही अगदी निश्चित समजले पाहिजे, असा ऋतू म्हणजे वसंत. वसंत म्हणजे थंडीनंतर येणारा उन्हाळा.
 • दही हे उत्तम समजले जाते. दही हे शक्तीवर्धक असून, पचन शक्ती सुद्धा सुधारते. भूक वाढते. मात्र मधुमेह झालेल्या व्यक्तीने कोणत्याच प्रकारचे दही सेवन करू नये. यासोबतच सर्दी झाली असता, दही खाऊ नये. कारण याने कफ गळून सर्दी अजून वाढते. मात्र ताज्या दह्यामध्ये मिरी आणि गूळ घालून खाल्ल्यास सर्दी बरी होते. दही हे औषधाला योग्य ठिकाणी घेऊन जाण्याचे काम करते, म्हणून सर्दी बरी होते.
 • त्याचप्रमाणे मुतखडा झाल्यास, गोखरूचे मूळ गोड दह्यासोबत सात दिवस दिल्यास, तो फुटून बारीक होतो. अथवा विरघळून जातो. वैद्याचे आणि दह्याचे काहीही वाकडे नाही. उलट कित्येक औषधांचे अनुपान म्हणून दही वापरले जाते. एखाद्या वैद्याने रुग्णास दही खाऊ नये असा सल्ला दिला असेल तर, न खाणे चांगले.
 • पूर्वीच्या काळी, आजीबाईच्या बटव्यात सुद्धा दह्याला फार महत्त्व होते. घरी ते कसे खावे ? कसे खाऊ नये ? हे सांगितले जायचे.
 • लहान मुलांना सर्दी खोकल्याचे आजार होत असल्यास, तर बिलकुल दही देऊ नये. लक्षात ठेवा आजार हे काही आकाशातून पडत नाहीत, ते आपल्या आहारातूनच निर्माण होत असतात. त्यामुळे उन्हाळा आला आणि थंड आहे म्हणून केवळ प्रत्येकाने दही खाणे योग्य नाही.

दही कोणत्या वेळी खावं ?

दही खाण्याचे फायदे Benefits of Curd  – दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, विटामिन B6 आणि विटामिन B12 इत्यादी पोषक घटक असतात. हे पोषक घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात.

दही पौष्टिक असल्यामुळे, आरोग्य संबंधित आणि सौंदर्याशी निगडित समस्यांवर देखील दही खाणं हा उत्तम उपाय आहे. पण बऱ्याचदा अनेकांना हा प्रश्न पडतो की दही खाण्याची नेमकी योग्य वेळ कोणती?

 • दही हे शक्यतो आपण दुपारच्या वेळी खाल्लं पाहिजे. दररोज दुपारी एक वाटी दही खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.
 • विशेष म्हणजे दुपारी दररोज दही खाल्ल्याने, आपलं वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी आपण दररोज दही खाल्लं पाहिजे. दह्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. या व्यतिरिक्त झोपेची समस्या दूर करण्यातही दही फायदेशीर आहे.
 • त्याचप्रमाणे रात्री देखील दही खाण शक्यतो टाळावं.

दही खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ?

दही खाण्याचे फायदे Benefits of Curd  –

 • दह्यात फॅटचे प्रमाण अधिक असतं. त्याचप्रमाणे दही दुधापासून तयार होत असल्याने, दह्यामध्ये दुधासारखेच पोषक घटक असतात. दह्या मध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असत त्यामुळे दात आणि हाड देखील बळकट होतात.
 • दही एनर्जी बूस्टर देखील आहे. त्यामुळे ताण-तणाव देखील कमी होतो.
 • दही उत्तम अँटीऑक्सिडेंट असून, शरीर हायड्रेट देखील ठेवत.
 • दररोज दही खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो. त्याच बरोबर हृदयाशी संबंधित आजारापासून दूर राहण्यासाठी उपयुक्त आहे.
 • इतकच काय तर, केसातील कोणत्या पासून, त्वचा कोमल करण्यासाठी दह्याचा उपयोग होतो. रोज दह्यात गूळ किंवा खडीसाखर टाकून खाल्ल्याने आपली त्वचा चमकदार होते. आपलं सौंदर्य अधिक उजळण्यासाठी दही नक्की खावं.
 • आजकाल सर्वांना कंपनीतल्या डब्यामधलं पॅक बंद दही लागत. पूर्वीच्या काळी बऱ्याच घरामध्ये छान काळ्या मातीच्या मडक्यात उकळून कोमट झालेल्या दुधात संध्याकाळी विरजण घालून, दही तयार केले जायचं.
 • दही बनवण्याची पद्धत आणि त्याचा स्वाद यानुसार दह्याचे पाच प्रकार पडतात. मंद, गोड, आंबट, गोड आंबट, आणि अत्यंत आंबट. हे दह्याचे पाच प्रकार. या प्रत्येक प्रकारानुसार आजारानुसार आणि ऋतूनुसार तशी सेवन केल्यास, दह्याचे फार चांगले फायदे मिळतात. मात्र चुकीच्या पद्धतीने दही सेवन केल्यास, नको ते असलेल्या आजारांना निमंत्रण मिळत.
 • शरद ग्रीष्मा आणि वसंत ऋतूंमध्ये दही खाणं हितकारक नसतं. त्यामुळे कफ पाडून सर्दी खोकला मागे लागू शकतो.
 • जे दही चांगलं लागलंय, जे मधुर रसदार आणि थोडा आंबट असतं, त्याला गोड दही समजले जातं. हे दही सर्वात उत्तम समजलं जातं. हे शक्तीवर्धक असून, त्यामुळे पचनशक्ती सुद्धा सुधारते. भूक वाढते मात्र मधुमेह झालेल्या व्यक्तीने कोणत्याच प्रकारचे दही सेवन करू नये.

FAQ

१. दही खाण्याचे काय फायदे आहेत ?

दही, ताक किंवा लस्सी करून, प्यायल्याने, आपल्या शरीरातील उष्णता कमी होते.
पोट बिघडले असेल तर, भातासोबत दही खाल्ल्याने आराम मिळतो.
उच्च रक्तदाब, फुफुसाच्या आजार आणि शरीरात वाढणारे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी दही चांगलं काम करते.
दह्यामध्ये थोडे हिंग मिसळून खाल्ल्याने, सांधेदुखी, गुडघेदुखी, यांसारखे आजार बरे होण्यास मदत होते. दह्यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे, हाड बळकट करण्यासाठी मदत होते.
दात आणि बोटांची नखं दह्यामुळे मजबूत होतात. तुम्हाला हे माहितीच असेल की, शरीरात उष्णता वाढल्यावर तोंडामध्ये फोड येतात, या फोडांवर दह्याची मलाई, लावल्यास तोंडातील फोड बरे व्हायला मदत होते.

रोज किती दही खावे?

दररोज एक कप दही खाल्ल्याने तुमच्या शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते जे कॉर्टिसॉल सोडण्यास मर्यादित करते, त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

दहीमध्ये किती कॅलरीज असतात?

एक कप घरगुती दह्यामध्ये 142 कॅलरीज असतात. जेव्हा ते गाईच्या दुधापासून बनते. चव नसलेल्या, साध्या, 100 ग्रॅम संपूर्ण दुधाच्या दह्यामध्ये सुमारे 61 कॅलरीज असतात.

दह्याचे दुष्परिणाम काय आहेत?

दही हे शरीरासाठी फायदेशीर मानले जात असले तरी त्याचे योग्य सेवन न केल्यास त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात. हे उच्च-कॅलरी अन्न असल्याने वजन वाढू शकत. जास्त दही खाल्ल्याने अपचन आणि गॅस सारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास दही खाण्याचे फायदे, दही कधी खावे? कोणी खावे ? योग्य वेळ इत्यादी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तुम्ही देखील तुमच्या आहारात दह्याचा समावेश करा, आणि तुमचे आरोग्य उत्तम ठेवा.

हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment