दालचिनी खाण्याचे फायदे Cinnamon in Marathi

दालचिनी खाण्याचे फायदे Cinnamon in Marathi – आपल्याला माहीतच आहे की हजारो वर्षांपासून आयुर्वेदीक औषधींचा वापर हा अनेक प्रकारच्या आजारांमध्ये केला जातोय आणि त्यामुळे अनेकांना आयुर्वेदिक औषधींचे विविध आजारांमध्ये खुप लाभदायी फायदे मिळाले आहेत.

दालचिनी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. कारण आपल्या सगळ्यांच्याच किचनमध्ये ती इझीली अवेलेबल असते. तर दालचिनी हा भारतीय मसाल्यांमध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे.

आणि नुसतच पदार्थाची चव वाढवण्यासाठी दालचिनीचा उपयोग होत नाही तर तिचे अनेक औषधी गुणकारी गुणधर्म सुद्धा आहेत. बऱ्याचश्या आयुर्वेदिक मेडिसिन्स मध्ये, ही दालचिनी एक औषध म्हणून वापरली जाते.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास दालचिनी खाण्याचे फायदे काय आहेत ? नुकसान काय आहे या बद्दल माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

हे वाचा –

Table of Contents

दालचिनी खाण्याचे फायदे Cinnamon in Marathi

दालचिनी खाण्याचे फायदे

दालचिनीची उत्पत्ती

दालचिनी खाण्याचे फायदे Cinnamon in Marathi – दालचिनीची उत्पत्ती श्रीलंका, चीन, पश्चिम किनारी प्रदेश, दक्षिण भारत, हिमालय या ठिकाणी होते.

दालचिनीचे रासायनिक संघटन काय आहे ?

दालचिनी खाण्याचे फायदे Cinnamon in Marathi – दालचिनी मध्ये वुडनशील तेल असते. “ओईल ऑफ सिनॅमन” असे त्याला म्हणतात. या तेलात सिनेमालडिहाइड व युजेनॉल असते. याशिवाय यात सिनरीक ऍसिड, राळ, टॅनिन, साखर, स्टार्च, इत्यादी असते.

दालचिनीची पर्यायी नावे

दालचिनी खाण्याचे फायदे Cinnamon in Marathi – दालचिनीचे लॅटीन नाव “सिनॅमोमोम झेलॅनिकम” व हे कर्पूर कुळातील आहे. म्हणजेच लॉरीयसी फॅमिली मधील आहे. दालचिनीला मराठी व हिंदीमध्ये “दालचिनी” म्हणतात.

इंग्रजीमध्ये सिनॅमन म्हणतात व संस्कृत मध्ये त्वक्, उत्कट, तनुत्वक्, मुखशोधन, सैहल, गुडत्वक्, हृदय, मन:प्रिय, इत्यादी अनेक पर्याय नावांनी ओळखले जाते.

दालचिनीचे पौष्टिक मूल्य

कॅलरीज247 kcal
फॉस्फरस64 मिग्रॅ
पोटॅशियम431 मिग्रॅ
लोखंड8.32 मिग्रॅ
कॅल्शियम1000 मिग्रॅ
पाणी10.6 ग्रॅम
मॅग्नेशियम60 मिग्रॅ
कार्ब्स80 ग्रॅम
व्हिटॅमिन ए15 µg

दालचिनीचे गुणधर्म काय आहे ?

दालचिनी खाण्याचे फायदे Cinnamon in Marathi – दालचिनी ही चवीला अनुक्रमे तिखट, कडू व गोड लागते. म्हणजेच दालचिनी कटू, तीक्त, मधुर रसात्मक आहे. दालचिनीचे पचन झाल्यानंतर, ही तिखट बनते. म्हणजेच दालचिनी कटू विभागाची आहे.

तसेच दालचिनी उष्ण गुणाची आहे. तसेच लघु, रुक्ष व तीक्ष्ण आहे.

दालचिनी या वनस्पतीचे वर्णन  

दालचिनी खाण्याचे फायदे Cinnamon in Marathi – दालचिनीचे मोठे वृक्ष असते. नवीन वृक्षाची त्वचा, स्निग्ध व फिक्‍या रंगाची असते. तर जुन्या वृक्षांची त्वचा कोरडी, बोरकट व ठिसूळ असते. हिचे कांडसार म्हणजेच गाभा, तांबूस रंगाचा व सुगंधी असतो. पाने बारीक लव असणारी असतात.

वरचा भाग चकचकीत असून, पानांवर तीन ते पाच शिरा असतात. याची फुले धूसर वर्णाची, गुच्छ स्वरूपात, जानेवारीमध्ये येतात. फळे वांग्याच्या रंगाची दिसतात. मे ते ऑगस्ट दरम्यान फळे येतात.

दालचिनीचे प्रकार

दालचिनी खाण्याचे फायदे Cinnamon in Marathi – दालचिनी तीन प्रकारची असते. अ) चिनी ब) सिंहली आणि क) भारतीय, या प्रकारांबद्दल थोडक्यात माहिती बघूया.

चिनी दालचिनी

चिनी दालचिनी ही चीन, सिंगापूर कडून येते.

सिंहली दालचिनी

सिंहली दालचिनी ही श्रीलंकेतून येते. हिची साल सर्वात पातळ असते. गोडीलाही जास्त असते व कमी तीक्ष्ण असते.

भारतीय दालचिनी

दालचिनीचे झाडे ही हिमालयात दीड ते दोन हजार मीटर उंचीपर्यंत वाढतात. हिची साल सर्वात जाड, कमी तीक्ष्ण असते. पाण्यात वाटल्यास मऊ होते. असे दालचिनीचे देश भेदाने तीन प्रकार आहेत.

दालचिनी खाण्याचे फायदे

दालचिनी खाण्याचे फायदे Cinnamon in Marathi – दालचिनीचा उपयोग विविध व्याधींमध्ये कशाप्रकारे केला जातो, हे खालील माहितीच्या आधारे जाणून घेऊयात ;

दालचिनी

तोंडाची मुखशुद्धी करते

काही व्यक्तींच्या तोंडाचा खूप घाण वास येतो, बाजूला बसणेही अशक्य होते. त्यांच्यासाठी दालचिनीचा खूप छान फायदा होतो. कारण ही मुखशोधन करते व तोंडाची दुर्गंधी घालवते.

हिरड्या व दात यांची मजबुती वाढते

दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवून चावण्याने किंवा चघळण्याने हिरड्या व दात यांची मजबुती वाढते. दात किडून जर वेदना असतील तर, दालचिनीच्या तेलात भिजवलेला कापसाचा बोळा दातात धरावा, याने दातांची कीड कमी होऊन, वेदनाही कमी होण्यास मदत होते.

मळमळ व उलटीवर फायदेशीर

मळमळ होऊन, उलटी आल्यासारखे वाटत असेल तर, तोंडात दालचिनी चघळल्याने बरे वाटते.

त्वचा रोगांमध्ये दालचिनी फायदेशीर

वांग इत्यादी त्वचारोगांमध्ये दालचिनीचा पातळ लेप त्या ठिकाणी करावा. या मुळे लवकर फरक पडेल.

वेदनेवर दालचिनीचा लेप फायदेशीर

वेदना असतील, वेदना होऊन सूज असेल, डोके दुखत असेल, तर यावरही दालचिनीचा लेप उपयुक्त ठरतो. विंचवाचा दंश झाला असता, वेदना कमी होण्यासाठी त्या जागी दालचिनीचे तेल लावावे.

जखमा लवकर भरण्यासाठी उपयुक्त

जखमा लवकर भरून येण्यासाठी, ही दालचिनीच्या तेलाचा चांगला फायदा होतो.

पोटाच्या विकारांसाठी दालचिनी उपयुक्त

दालचिनी तिखट, कडू रसाची व उष्ण गुणाची असल्याने,पाचनाग्नी वाढवते, भूक लागत नसेल तर, हिच्या सेवनाने चांगली भूक लागते.

खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होते. तोंडाला चव आणते. वात कमी करते. यामुळे पोट गच्च होणे, वेदना असणे, जडपणा वाटणे, इत्यादी सर्व लक्षणे कमी होण्यासाठी मदत होते.

दालचिनी

अतिसारावर फायदेशीर

दालचिनी धरून ठेवण्याचे काम करते, म्हणजेच ग्राही गुणाची आहे. त्यामुळे जुलाब होत असतील तर ते कमी करते.

आवेच्या त्रासातही दालचिनी फायदेमंद

आवेच्या त्रासातही हिचा फायदा होतो. पोट फुगून गच्च होत असेल, वायु सरत नसेल तर, दालचिनी चुर्णाचे सेवन करावे.

रोगप्रतिकारक क्षमता चांगली होण्यासाठीही मदत

तसेच ही यकृताला उत्तेजन देणारी आहे. दालचिनी ही रक्त शुद्धीकरण आहे. रक्तातील श्वेतकनांची संख्या वाढवते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता चांगली होण्यासाठीही मदत होते.

हृदय सशक्त करण्यासाठी मदत

हृद्य बल्ल्यांमध्ये हृदय उत्तेजक कार्य करून, हृदय सशक्त करण्यासाठी मदत करते.

कफनाशक

दालचिनीच्या गुणधर्मामुळे ही कफनाशक आहे. तीक्ष्ण गुणाने कफ पातळ करून, तो खोकल्याबरोबर बाहेर टाकण्यासाठी मदत करते. यात सिनेमिक ऍसिड आहे, जे यक्ष्मणाक्षक म्हणजेच क्षय प्रतिबंधक मानतात.

त्यामुळे कास, श्वास, टीबी यातील जंतुनाशनासाठी दालचिनी चूर्ण किंवा तेलाचा वापर करतात. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, यात सुंठ, दालचिनी, धने, यांचा काढा बनवून तो प्यावा.

वजन नियंत्रणात फायदेशीर

अनेक लोक वजन कमी करण्यासाठी नाही, नाही ते उपाय करतात. वजन कमी करण्यासाठी दालचिनी चुर्णाचे गरम पाण्यात मिसळून सेवन करावे. याने चरबी कमी होऊन, वजन कमी होण्यासाठी मदत होते.

आतड्यांच्या आजारात फायदेशीर

आतड्यांच्या आजारात दालचिनी काढायचे सेवन केल्यास चांगला फायदा होतो. काहींना संग्रहणी नावाचा आजार असतो.

कधी जुलाब होतात, तर कधी पोट साफ होत नाही, यालाच आयबीएस असेही म्हणतात. यातही दालचिनीचा वापर केल्यास, फायदा होतो.

मूत्रपिंडाला उत्तेजित करते

ही उष्ण तीक्ष्ण गुणाची असल्याने, ही मूत्रपिंडाला उत्तेजित करते व मूत्राचे प्रमाण वाढवते. त्यामुळे सकष्ट मूत्र प्रवृत्ती असेल तर, त्यावर दालचिनीचे चांगले परिणाम दिसून येतात.

गर्भाशय शैथिल्यात वापर

दालचिनी गर्भाशय संकोचक असल्याने, गर्भाशय शैथिल्यात वापरतात. गर्भाशय शैथिल्यात दालचिनीचे अशोक चूर्ण सोबत सेवन करावे.

मासिक पाळीत फायदेशीर

दालचिनी तीक्ष्णू गुणाची असल्याने मासिक पाळीच्या वेळी रक्तस्त्राव कमी असेल किंवा मासिक पाळी येत नसेल तर, अशा वेळेस दालचिनीचा चांगला फायदा होतो.

शुक्रवर्धक आहे

ही बाजीगर आहे. शुक्रधातूची वाढ करते. त्यामुळे क्लब यातही हिचा वापर करतात.

दालचिनी खाण्याचे आरोग्यदायी फायदे

दालचिनी खाण्याचे फायदे Cinnamon in Marathi –

अँटि ऑक्सिडंटने संपन्न  

दालचिनी हि अँटि ऑक्सिडंटने समृद्ध असल्याकारणाने, याचा फायदा आपल्या शरीरासाठी होत असतो. आपल्या शरीरात जे फ्री रेडिकल्स जनरेट होतात, म्हणजे आपण घराच्या बाहेर पडतो, तर खूप ट्राफिक असते, धुर असतो, पॉल्युशन असतो.

त्याच्यामुळे आपल्या शरीरात फ्री रेडिकल्स तयार होत असतात आणि हे फ्री रॅडिकल्स आपल्या शरीराच नुकसान करत असतात. तर या फ्री रॅडिकल्सला मारण्याचं काम हे अँटिऑक्सिडंट करत असतात आणि हे पॉलीफिनल्स नावाचे अँटिऑक्सिडंट दालचिनी मध्ये असतात.

त्याच्यामुळे त्याची अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टी खूप स्ट्रॉंग आहे. एवढच नव्हे तर 26 मसाल्यांचा अभ्यास केला गेला, त्यात अँटीऑक्सिडंट ऍक्टिव्हिटी अभ्यासली गेली होती, त्यात दालचिनीचा पहिला नंबर लागतो.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

दालचिनीच्या सेवनाने हृदयविकाराची जी शक्यता आहे, ती कमी होण्यास आपल्याला मदत होते. कारण रेगुलरली जे दालचिनीच सेवन करतात, त्यात असं दिसून आला आहे की, बॅड कोलेस्ट्रॉल किंवा वाईट प्रकारचे जे फॅक्टरस असतात.

ते कुठेतरी कमी होताना दिसतात आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल जे चांगल्या प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात ते आपल्या शरीरात वाढतात. तर बऱ्याच अभ्यासातून हे सिद्ध झालेला आहे, अकालीन मृत्यूचे खूप मोठं कारण भारतातला आहे की हृदयविकाराचा झटका. तर या हृदयविकाराची शक्यता कमी करण्यासाठी दालचिनी आपण आपल्या आहारात समावेश केली पाहिजे.

इन्सुलिनचे कार्य वाढवतो

दालचिनी आपल्या शरीरातील जो हार्मोन इन्सुलिन असतो, त्याची क्षमता वाढवतात. म्हणजे काय होतं की, आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन जो हार्मोन असतो त्याचं काम काय असतं की, आपल्या रक्तपेशीच्या बारीक बारीक पेशींमध्ये साखर पोहचवणे.

परंतु आपल्या शरीरामध्ये कुठेतरी आपल्या जीवनशैलीमुळे किंवा चुकीच्या आहारपद्धतीमुळे, इन्सुलिन हार्मोनच कार्य कमी होत, म्हणूनच आपल्या शरीरात डायबिटीजचे प्रमाण खूप जास्त वाढलेलं आपल्याला आढळून येत आणि खूप ओवर वेट लोक असतात, लठ्ठ व्यक्ती असतात, त्यांच्यामध्ये देखील इन्सुलिन हार्मोनची ऍक्टिव्हिटी कुठेतरी कमी झालेली दिसते.

म्हणजे इन्सुलिनची कार्यक्षमता ज्या लोकांमध्ये व्यवस्थित काम करत नाही आणि प्रत्येक पेशी मध्ये ग्लुकोज जाऊ शकत नाही, तर दालचिनीच्या सेवनामुळे शरीरातील हार्मोन इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते आणि इन्सुलिनचे कार्य सुरळीत चालायला मदत होते.

रक्तातील साखर कमी करते

दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. जसे की, आपल्याला माहितच आहे कि, दालचिनी  हार्मोन इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवते, यामुळे आपोआपच शुगर कंट्रोल मध्ये येतो आणि त्यामुळे डायबिटीसच्या पेशंटनी नक्कीच दालचिनी ही रोजच्या आहारामध्ये घेतली पाहिजे.

तसेच बऱ्याच अभ्यासातून अस आढळून आले आहे की, जे लोक रेगुलरली दालचिनीचा आपल्या आहारात समावेश करतात त्यांची शुगर फास्टिंगची १० ते २० % ने कमी दिसलेली आहे.

बॅक्टेरिया किंवा फंगल्स (इन्फेक्शन्स) पासून बचाव करते

दालचिनी बॅक्टेरिया किंवा फंगल्स या दोन्ही सोबत लढण्यासाठी आपल्याला मदत करते. तर आपल्या पोटामध्ये किंवा रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये कुठलाही प्रकारचं इन्फेक्शन असलं, ते इन्फेक्शन त्यात असलेल्या सिनेमालडिहाइड या कंपाऊंडमुळे ते इन्फेक्शन कुठेतरी कमी करण्यास, आपल्याला मदत होते

तसेच दालचिनी मध्ये अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी देखील भरपूर असतात, त्याच्यामुळे पोटाचे पण काही इन्फेक्शन्स असतील तर ते कमी करण्यास आपल्याला मदत होते.

वजन आटोक्यात आणण्यास मदत करते

दालचिनीने वजन कमी करण्यास आपल्याला मदत होते. दालचिनीचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीरातील  हार्मोन इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते.

ज्यामुळे आपल्या रक्तात जी  साखर फिरत असते, तिच्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते त्यामुळे शरीराचा ग्लुकोज अपटेक वाढतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत होते.

त्वचेचे आरोग्य सुधारते

दालचिनीने आपल्या त्वचेचे देखील आरोग्य सुधारते. तुम्ही दालचिनीच तेल देखील चेहऱ्याला अप्लाय करू शकतात.

तसेच दालचिनीच तेल तुम्ही कापसात बुडवून तुमचा दात किडला असेल आणि दुखत असेल, तिथे तो कापसाचा बोळा ठेवल्याने देखील तिथली वेदना कमी होण्यास मदत होते.

Cinnamon in Marathi

पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेमंद

दालचिनी पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेमंद आहे. ज्यांना पचनसंस्थे संबंधित समस्या असतील त्यांनी जेवणानंतर दालचिनी चूर्ण पाण्यातून घेतले, तर पचनक्रिया सुरळीत चालण्यास मदत होते.

तोंडाची दुर्गंधी दूर करायला मदत

अनेक रुग्णांना किंवा नॉर्मल व्यक्तींना जर तोंडाची दुर्गंधी येत असेल किंवा हि समस्या डायबिटीज पेशंट मध्ये सामान्य आहे, पण इतर लोकांमध्ये पण ज्यांना असा त्रास असेल, त्यांनी दालचिनी चगळ्याने तोंडाची दुर्गंधी दूर करायला मदत होते.

दालचिनी कशी वापरावी?

दालचिनी खाण्याचे फायदे Cinnamon in Marathi – दररोज सकाळी कोमट पाण्यात मध आणि लिंबू मिसळून वापरणे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

दालचिनीपासून बनवलेले डिटॉक्स पाणी नियमितपणे पिणे हे देखील त्याचे सेवन करण्याचा एक चांगला मार्ग आहे. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.

रोजच्या जेवणात मसाला म्हणून वापरता येतो. हे वापरण्याचा हा सर्वात सोपा आणि सामान्य मार्ग आहे.

चांगल्या त्वचेसाठी तुम्ही त्यात मध मिसळून चेहऱ्यावर लावू शकता.

दालचिनी चहा म्हणजेच दालचिनीचा चहा किंवा त्यापासून बनवलेला डेकोक्शन देखील शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

दालचिनीचे पाणी पिण्याचे फायदे

दालचिनी खाण्याचे फायदे Cinnamon in Marathi – प्रत्येक स्वयंपाक घरात, दालचिनी ही असतेच. जेवण बनवताना खाद्यपदार्थांची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी दालचिनीचा वापर केला जातो. पण याचा नियमित सेवनाने आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासूनही सुटका मिळू शकते.

  • दालचिनी पोटाशी संबंधित समस्यांसाठी फायदेशीर आहे. एवढेच नाही तर, त्यामध्ये अंटी बॅक्टरियल गुणधर्म सुद्धा असतात, जे वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत आरोग्याशी निगडित बाबींमध्ये अतिशय फायदेशीर ठरतात.
  • जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर, दालचिनीचे पाणी तुम्हाला खूप मदत करू शकते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. विशेषतः सकाळी या पाण्याचे सेवन केल्यास, वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
  • दालचिनीचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. दालचिनी मध्ये पॉलीफीनॉल सोबतच अँटी व्हायरल, अँटी बॅक्टेरियल, अँटी ऑक्सीडेंट, अँटी फंगल हे गुणधर्म असतात. जर तुम्ही सांधेदुखीच्या वेदनांनी त्रस्त असाल तर,  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही दालचिनीच्या पाण्याचे सेवन करू शकता.
  • यात मुख्यत्वे अँटी इंफ्ल्मेंटरी, अँटी ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. जे शरीरातील वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतात. दालचिनीचे पाणी प्यायल्याने पोटाच्या संबंधित आजार दूर होण्यास मदत होते.
  • बद्धकोष्ठता पासून आराम मिळण्याबरोबरच हे पाणी पचन संस्था सुधारणा सुद्धा मदत करते. ज्यामुळे पोट फुगल्यासारख्या समस्यांवरही लवकर आराम मिळू शकतो.
Cinnamon in Marathi

दालचिनीचे पाणी कसे बनवावे ?

दालचिनी खाण्याचे फायदे Cinnamon in Marathi –

साहित्य
  • दालचिनी पावडर किंवा वाटलेली दालचिनी
  • पाणी
  • आवश्कतेनुसार मीठ
कृती
  • सर्वात आधी एका भांड्यात पाणी उकळून घ्या.
  • पाणी उकळल्यानंतर त्यात दालचिनी पावडर किंवा दालचिनी वाटून घाला.
  • हे पाणी थंड झाल्यानंतर, त्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी, त्यात थोडे मीठ मिसळा. यानंतर तुम्ही दालचिनीचे हे पाणी पिऊ शकता.

दालचिनीचे सेवन किती करावे ?

दिवसाला १ ग्राम दालचिनीचे सेवन तुम्ही करू शकता. म्हणजे साधारण एक चिमूटभर दालचिनी दिवसाला ओके आहे. कारण ती अतिशय उष्ण प्रकृतीची असल्यामुळे, दालचिनीचे अति सेवन शरीरासाठी हितकारी नसते.

दालचिनी आपण कधी घेऊ शकतो ?

  • तर दालचिनी घेण्याच्या तीन-चार वेळा आहे. तुमची कंडिशन कशी आहे, त्यानुसार दालचिनीचा डोस ठरवता येतो.
  • तुम्ही सकाळी उपाशीपोटी, कोमट पाण्यातून एक चिमूटभर दालचिनी घेऊ शकतात.
  • आपल्या आहारामध्ये बरेचसे कार्बोहायड्रेट असतात, त्यामुळे शुगर वाढण्याची शक्यता असते, यामुळे जेवणानंतर तुम्ही एक चिमूटभर दालचिनी घेऊ शकतात.
  • ज्यांना डायजेशनचे प्रॉब्लेम्स आहेत, फ्लोटिंगची समस्या आहे, त्यांनी जेवणाच्या आधी पाण्यातून दालचिनी चूर्ण  घेतल तरी पण कोणतीही समस्या होणार नाही.

दालचिनीचे तोटे

प्रत्येक गोष्टीप्रमाणे, दालचिनीचेही तोटे आहेत. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. येथे आपण दालचिनीचे असेच तोटे सांगत आहोत जे जास्त प्रमाणात दालचिनी खाल्ल्याने होऊ शकतात.

  • घसा आणि तोंडात जळजळ देखील होऊ शकते.
  • गर्भवती महिलांनी कोणाच्याही सल्ल्याशिवाय दालचिनीचे सेवन करू नये.
  • यकृताला हानी पोचू शकते.
  • त्वचेची ऍलर्जी देखील होऊ शकते.
  • शरीरातील रक्तातील साखरेची पातळी जास्त प्रमाणात कमी होऊ शकते.
  • मधुमेहाच्या रुग्णांनी दालचिनीचे सेवन अतिप्रमाणात करू नये त्यामुळे रक्तातील साखर जास्त कमी होऊन तुम्हाला ते त्रासदायक ठरू शकते

दालचिनीचे सेवन करताना घ्यावयाची काळजी

दालचिनी आपल्या मसाल्याच्या पदार्थांमधील एक पदार्थ आहे. हिच्या सेवनाचे असंख्य फायदे आहेत, तरी दालचिनीचे सेवन कोणी काळजीपूर्वक करावे ? किंवा कोणी करू नये ? याबद्दल माहिती बघूया.

पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींने दालचिनीचे सेवन काळजीपूर्वक करावे

दालचिनी ही उष्ण तीष्ण गुणाची असल्याने, पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी हिचे काळजीपूर्वक व वैद्यांच्या सल्ल्याने सेवन करावे. कारण प्रत्येक व्यक्तीचे वय, प्रकृती, व्याधी अवस्था, इत्यादी अनेक गोष्टी वेगवेगळ्या असतात. यानुसार औषधाची मात्रा ही बदलते.

रक्तदाब कमी असणाऱ्या व्यक्तींने दालचिनीचे सेवन काळजीपूर्वक करावे

ज्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी असेल, रक्तदाब कमी असेल, अशांनीही दालचिनीचे सेवन करायचे असल्यास काळजीपूर्वक करावे.

गर्भिणींनी दालचिनीचे सेवन करू नये

गर्भिणींनी दालचिनीचे सेवन करू नये. कारण की हि गर्भाशय संकोचक आहे. यामुळे प्रसव लवकर होऊन गर्भिणींनीला व बाळाला धोका होण्याची शक्यता असते. तसेच बाळंतिणींनी ही दालचिनीचे सेवन करू नये.

FAQ

१. दालचिनीचे पाणी पिण्याचे काय फायदे आहेत ?

दालचिनी पोटाशी संबंधित समस्यांसाठी फायदेशीर आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत आरोग्याशी निगडित बाबींमध्ये अतिशय फायदेशीर ठरतात.
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर, दालचिनीचे पाणी तुम्हाला खूप मदत करू शकते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. विशेषतः सकाळी या पाण्याचे सेवन केल्यास, वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होते.
दालचिनीचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
जर तुम्ही सांधेदुखीच्या वेदनांनी त्रस्त असाल तर,  डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही दालचिनीच्या पाण्याचे सेवन करू शकता.
यात मुख्यत्वे अँटी इंफ्ल्मेंटरी, अँटी ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. जे शरीरातील वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतात.

२. दालचिनी सेवन आपण कधी करू शकतो ?

दालचिनी घेण्याच्या तीन-चार वेळा आहे. तुमची कंडिशन कशी आहे, त्यानुसार दालचिनीचा डोस ठरवता येतो.
तुम्ही सकाळी उपाशीपोटी, कोमट पाण्यातून एक चिमूटभर दालचिनी घेऊ शकतात.
आपल्या आहारामध्ये बरेचसे कार्बोहायड्रेट असतात, त्यामुळे शुगर वाढण्याची शक्यता असते, यामुळे जेवणानंतर तुम्ही एक चिमूटभर दालचिनी घेऊ शकतात.
ज्यांना डायजेशनचे प्रॉब्लेम्स आहेत, फ्लोटिंगची समस्या आहे, त्यांनी जेवणाच्या आधी पाण्यातून दालचिनी चूर्ण  घेतल तरी पण कोणतीही समस्या होणार नाही.

३. दालचिनीचे सेवन कोणी करू नये ?

गर्भिणींनी दालचिनीचे सेवन करू नये. कारण की हि गर्भाशय संकोचक आहे. यामुळे प्रसव लवकर होऊन गर्भिणींनीला व बाळाला धोका होण्याची शक्यता असते. तसेच बाळंतिणींनी ही दालचिनीचे सेवन करू नये.
दालचिनी ही उष्ण तीष्ण गुणाची असल्याने, पित्त प्रकृती असणाऱ्या व्यक्तींनी हिचे काळजीपूर्वक व वैद्यांच्या सल्ल्याने सेवन करावे.
ज्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण कमी असेल, रक्तदाब कमी असेल, अशांनीही दालचिनीचे सेवन करायचे असल्यास काळजीपूर्वक करावे.

४. दालचिनी वनस्पतीचे थोडक्यात वर्णन करा.

दालचिनीचे मोठे वृक्ष असते. नवीन वृक्षाची त्वचा, स्निग्ध व फिक्‍या रंगाची असते. तर जुन्या वृक्षांची त्वचा कोरडी, बोरकट व ठिसूळ असते. हिचे कांडसार म्हणजेच गाभा, तांबूस रंगाचा व सुगंधी असतो. पाने बारीक लव असणारी असतात. वरचा भाग चकचकीत असून, पानांवर तीन ते पाच शिरा असतात. याची फुले धूसर वर्णाची, गुच्छ स्वरूपात, जानेवारीमध्ये येतात. फळे वांग्याच्या रंगाची दिसतात. मे ते ऑगस्ट दरम्यान फळे येतात.

५. दालचिनीची पर्यायी नावे काय आहेत ?

दालचिनीचे लॅटीन नाव “सिनॅमोमोम झेलॅनिकम” व हे कर्पूर कुळातील आहे. म्हणजेच लॉरीयसी फॅमिली मधील आहे. दालचिनीला मराठी व हिंदीमध्ये “दालचिनी” म्हणतात. इंग्रजीमध्ये सिनॅमन म्हणतात व संस्कृत मध्ये त्वक्, उत्कट, तनुत्वक्, मुखशोधन, सैहल, गुडत्वक्, हृदय, मन:प्रिय, इत्यादी अनेक पर्याय नावांनी ओळखले जाते.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास दालचिनी खाण्याचे फायदे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तुम्ही देखील तुमच्या आहारात दालचिनीचा समावेश करा आणि तुमचे आरोग्य उत्तम ठेवा.

हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा. धन्यवाद

Leave a comment