पेरू खाण्याचे फायदे Guava Benefits

पेरू खाण्याचे फायदे Guava Benefits – हिवाळा म्हणजे थंडी सुरू झाल्यावर, बाजारामध्ये इतर फळांसोबतच पेरू सुद्धा दिसायला सुरुवात होते. पेरूमध्ये विटामिन सी असतं.

पेरू हे फळ आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असतात. तसंच त्वचेच्या समस्येपासून ते पोटाच्या तक्रारी पर्यंत अनेक गोष्टींवरील औषध म्हणून पेरूचा उपयोग होतो.

तसेच अनेक औषधी गुण सुद्धा पेरू या फळांमध्ये असतात आणि तसेच त्यांच्या पानांमध्ये सुद्धा असतात. आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास पेरू खाण्याचे फायदे काय आहेत या बद्दल माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

पेरू खाण्याचे फायदे Guava Benefits

पेरू खाण्याचे फायदे Guava Benefits

पेरू खाण्याचे फायदे

पेरूतील पोषक घटक

Peru Khanyache Fayde –

पेरू सामग्री प्रति 100 ग्रॅमपोषक घटक
पोटॅशियम9%
मॅग्नेशियम 6%
मँगनीजसेवनाच्या 5%
प्रथिने2.55 ग्रॅम
कर्बोदके14.32 ग्रॅम
व्हिटॅमिन बी 68%
नियासिन सेवन 7%
चरबी0.95 ग्रॅम
कॅलरीज६८
फॉस्फरससेवन 6%
फायबर5.4 ग्रॅम
व्हिटॅमिन सी275%
व्हिटॅमिन बी 5 9%
फोलेटसेवनाच्या 12%

पेरू फळाविषयी माहिती

पेरू खाण्याचे फायदे Guava Benefits – मंडळी जगामध्ये प्रत्येकालाच फळे खायला आवडतात. कारण फळांमध्ये महत्त्वाची जीवनसत्व असतात, खनिज असतात आणि वनस्पती रसायन असतात त्याचबरोबर फळ खाल्ल्याने आपल्याला ऊर्जा मिळत असते.

मंडळी फळ हा वनस्पतीचा गोड भाग आणि खाण्या योग्य भाग आहे आणि यामध्ये साधारणपणे बिया असतात आणि ही फळे सहसा कच्चीच खाल्ली जातात. पण काही फळ अशीही आहेत किती शिजवून सुद्धा खाल्ली जातात.

म्हणजे त्याची भाजी बनवून सुद्धा खाल्ली जाते. काही फळ चवीने गोड असतात, काही आंबट असतात, तर काही तुरट असतात आणि हि अशी फळ आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरत असतात.

पेरू हे फळ साधारणपणे साऱ्यांनाच आवडतं. अनेकदा शाळेच्या बाहेर उभ्या असलेल्या चिंचा, बोरांच्या गाड्यांवर, पेरू हमखास असतात.

पूर्वी एक किंवा दोन रुपयांना पेरू सहज मिळायचे, मात्र आता त्याच एका पेरूसाठी दहा किंवा पंधरा रुपये मोजावे लागतात. त्यामुळे अनेक जण पेरू किंवा अन्य फळे घेण्याचे टाळतात. मात्र पेरू खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे पेरूचा आहारात कायम समावेश करावा.

पेरू खाण्याचे फायदे

हे वाचा –

पेरूच्या विविध जाती

पेरू खाण्याचे फायदे Guava Benefits

लखनवी पेरू

Peru Khanyache Fayde – पेरूची लखनौ जातीची लागवड नुझविद, विजयवाडा आणि आंध्र प्रदेशात केली जाते आणि ती पल्पिंगसाठी वापरली जाते. 

लखनवी पेरू हा पिंक तैवान पेरू पेक्षा सर्वसाधारण गोड स्वरूपाचा आहे. बाजारात चांगल्या प्रमाणे मागणी असलेला पेरू म्हणजे लखनवी पेरू. लखनवी पेरूची भाजी सुद्धा केली जाते जे की ही भाजी चवीला सुद्धा स्वादिष्ट असते. 

मागील काही वर्षांपासून लखनवी पेरू ला चांगली मागणी असल्याचे बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. गोवा राज्यात तर लखनवी पेरू पासून आईस्क्रीम तसेच नाताळ च्या दिवशी बर्फी करून वाटली जाते.

हरिझा

हरिझा ही जात गोड असते तसेच टिकण्यास सुद्धा मदत करते. हरिझा या जातीचे फळ मोठ्या प्रमाणात उत्पादन देते. या जातीचे झाड सर्वसामान्य साडे तीन मीटर एवढ्या उंचीचे असते. या जातीची फळे हिरवट तसेच पिवळ्या रंगाची असतात.

लाल पेरू

लाल पेरू या जातीच्या आकाराची फळे मध्यम आकाराची असतात जसे की या जातीची फळे उत्तर कोकण आणि मुंबई च्या भागात आढळतात. या जातीच्या फळाचा गर कडक असतो.

बनारसी

या जातीची झाडे सुद्धा जोमाने वाढतात तसेच त्यांची उंची पाच ते साडे पाच मीटर असते. बनारसी हे पेरूची जात अत्यंत गोड असते जे की कमी प्रमाणात आंबट असते. या जातीचे फळे गोल्ड आकाराची व पिवळ्या रंगाची असतात. टिकायला सुद्धा या जातीचे फळ मध्यम असते.

 पिंक तैवाण पेरू

बाजारात सध्या ग्राहकांची आणि व्यापारी वर्गाची जास्तीत जास्त मागणी असलेला पेरू म्हणजे पिंक तैवान पेरू. या पेरुचे वैशिष्ट्य म्हणजे आत मधून हा फिकट गुलाबी रंगाचा असतो जो की चवीला एकदम गोड आणि रुचकर असतो. साधारणपणे या पेरुचे वजन ५०० ग्राम असते जे की आकाराने हा पेरू मोठा असतो.

पेरू उत्पादन 

पेरू खाण्याचे फायदे Guava Benefits – भारत हा  पेरूचा जगातील सर्वात मोठा उत्पादक आहे, जो 25M मेट्रिक टन कापणी करतो, जो जगातील पेरू उत्पादनात  45% योगदान देतो.  2019 पर्यंतच्या अहवालानुसार,  भारतातील पेरू उत्पादनात  वार्षिक 5% वाढ झाली आहे. दुसरे आणि तिसरे सर्वात मोठे उत्पादक इंडोनेशिया आणि चीन आहेत, जे उत्पादनाच्या 7% आणि 5% दान करतात.

अनुकूल हवामानामुळे पेरूची लागवड भारतभर करता येत असली तरी, उत्पादनात उत्तर प्रदेशचा मोठा वाटा आहे, त्यानंतर पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. पेरू उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय प्रदेशात घेतले जाते आणि उच्च तापमान सहन करते, ज्यामुळे भारत पेरू काढणीसाठी अनुकूल जागा बनतो.

 उत्तर प्रदेश  हा भारतातील  सर्वात मोठा पेरू उत्पादक आहे,  22.93% बाजारपेठेसह 928.44 टन उत्पादन करतो. मध्य प्रदेश आणि बिहार ही भारतातील दुसरी आणि तिसरी सर्वात मोठी पेरू उत्पादक राज्ये आहेत, ज्यात अनुक्रमे १६% आणि १०% मार्केट शेअर्स आहेत. 

पेरू खाण्याचे फायदे

पेरू खाण्याचे फायदे Guava Benefits

  • आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.
  • भूक वाढते.
  • शरीराची दाह कमी होते.
  • शौचास साफ होते.
  • हिरड्यांना सूज, दात दुखी, होत असल्यास पेरूचं पान लावावे किंवा पानाचा रस दुखणाऱ्या भागावर लावावा.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
  • शरीरावर सूज येऊन तो भाग ठणकत असल्यास, पेरूच्या पानाचं पोटीच बांधावे.

पेरू खाण्याचे चमत्कारी फायदे

पेरू खाण्याचे फायदे Guava Benefits

रोग प्रतिकारक्षमता वाढवते

Peru Khanyache Fayde – कुठल्याही सिझनमध्ये किंवा ऋतू बदलाच्या काळामध्ये, अनेक आजारांपासून आपलं रक्षण करण्यासाठी बॅक्टेरियल आणि वायरल इन्फेक्शन पासून आपलं रक्षण करण्यासाठी, आपल्याला आपल्या शरीराची रोग प्रतिकारक्षमता वाढवणे खूपच गरजेचे आहे आणि हे काम पेरू नक्कीच करतो. पेरू जर योग्य प्रमाणात खाल्ला तर, ते एका औषधासारखा काम करतो.

शरीरासाठी फारच उपयुक्त

पेरू न्यूट्रियन्स पॉवर हाऊस आहे. यात भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, अँटी ऑक्सिडेंट आणि अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी फारच उपयुक्त ठरतं.

टॉनिकचे काम करतो

पिकलेल्या पेरूच्या बिया काढलेल्या गरात जर दूध आणि मध घालून हे मिश्रण घेतलं तर, शक्ती प्राप्त होते. लहान मुलांना, गरोदर स्त्रियांना किंवा बाळंतिणींना हे जर मिश्रण आपण दिलं तर, ते एका टॉनिकचे काम करतो.

ब्रेनची कार्यक्षमता वाढते

पेरू बुद्धीवर्धक आहे. जर नियमित पेरू खाल्ले तर, आपल्या ब्रेनची कार्यक्षमता वाढते. त्याच ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि मेंदूला पोषण सुद्धा मिळतं.

मानसिक विकारांवर पेरू फायदेशीर

मानसिक विकारांवर सुद्धा पेरू खूपच उपयुक्त ठरतं. पेरू खाल्याने स्ट्रेस लेव्हल कमी होण्यास मदत होते आणि मसल्स आणि नर्स रिलॅक्स होतात.

सर्दी खोकल्यावर फायदेशीर

पेरूची पानं उकळून, त्यात थोडी साखर घालून काढा बनवून प्यायल्याने, सर्दी, खोकला, श्वासन मार्गातील आजार, इन्फेक्शन्स, बरे होण्यास मदत होते.

मोठ्या शस्त्रक्रियेच्या जखमा भरण्यासाठी फायदेशीर

कुठल्याही मोठ्या ऑपरेशन नंतर त्याच्या जखमा भरून काढण्यासाठी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी, पेरूचा समावेश आपण आपल्या आहारात नक्कीच केला पाहिजे.

दृष्टी सुधारण्यास मदत होते

पेरूत भरपूर प्रमाणात विटामिन ए असल्यामुळे ते आपल्या डोळ्यासाठी सुद्धा खूपच हितावह आहे. पेरू खाल्ल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते.

सनबर्न पासून रक्षण करतो

पिकलेल्या पेरूत लायकोपिनचा प्रमाण जास्त असल्यामुळे ते आपल्या त्वचेचं सूर्यकिरण पासून होणाऱ्या सनबर्न पासून रक्षण करतो.

त्वचेचं पोषण होतं

पेरूमध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहेत. त्यातल्या विटामिन ए, सी आणि ई मुळे आपल्या त्वचेचं पोषण होतं आणि सुरकुत्यांपासून आपलं रक्षण होतं.

फेस पॅक किंवा फेस स्क्रब सारखा वापर

पेरूला आपण एखाद्या फेस पॅक किंवा फेस स्क्रब सारखा ही वापर करू शकतो.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर

पेरूत फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे, आपलं वजन कमी करण्यासाठी सुद्धा पेरूचा वापर आपण करू शकतो. पेरू खाल्ल्याने पोट भरल्यासारखा वाटतं, त्यामुळे आपण अतिरिक्त जास्त काही खात नाही आणि आपल वजन सुद्धा कमी होतं.

डायबिटीस, हृदयविकार आणि कॅन्सरवर खूपच उपयुक्त

पेरूमध्ये फायबर, लायकोपिन आणि अँटि ऑक्सिडन्स प्रमाण जास्त असल्यामुळे, डायबिटीस, हृदयविकार आणि कॅन्सर सारख्या मोठ्या आजारांवर सुद्धा पेरू खूपच उपयुक्त ठरतो.

बीपी आणि कोलेस्ट्रोल नियंत्रणात राहण्यास मदत

पेरू खाल्ल्याने बीपी आणि कोलेस्ट्रोल हि नियंत्रणात राहण्यास मदत होते.

थायरॉईडचं कार्य सुरळीत राहतं आणि हार्मोन्स बॅलन्स राहण्यात मदत होते

आजकाल थायरॉईडचा त्रास अनेक लोकांना असतो, त्यांनी पेरूचा समावेश आपल्या आहारात नक्कीच केला पाहिजे. पेरूतल्या कॉपर मुळे थायरॉईडचं कार्य सुरळीत राहतं आणि हार्मोन्स बॅलन्स राहण्यात मदत होते आणि त्यामुळे आपली तब्येत सुद्धा चांगली राहते.

पेरूत संत्र्याच्या चारपट विटामिन सी, टोमॅटो पेक्षा दुप्पट लायकोपिन, केळ्या इतकाच पोटॅशियम आणि अननसापेक्षा चारपट फायबर असल्यामुळे ते एक सुपरफुड असं समजलं जातं. म्हणून पेरूचा समावेश आपल्या आहारात नियमित करा आणि आपली तब्येत उत्तम ठेवा.

पेरूच्या पानाचे फायदे Peru Khanyache Fayde

पेरू खाण्याचे फायदे Guava Benefits – तुम्हाला पेरू खाण्याचे फायदे माहित आहेत का ? पेरूचा फायदा तुमच्या केसांना आणि त्वचेलाही होतो हे तुम्हाला माहितीये का ? चला तर मग पेरूचे आणि पेरूच्या पानांचे फायदे पाहूया.

दातांच्या मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण पर्याय

पेरूची पान पाण्यासोबत उकळून ते पाणी प्यायला ने दातांच आरोग्य उत्तम राहतं. दातांच्या समस्यांसाठी पेरूच्या पानांची पेस्ट सुद्धा उपयुक्त आहे. दातांच्या मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण पर्याय आहे पेरूची पान.

शरीरातील गाठींवरती उपयुक्त

शरीरातील गाठींवरती पेरूच्या पानांची पेस्ट करून लावली तर, त्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे सूज कमी व्हायला मदत होते. शरीरामध्ये विविध कारणांनी झालेल्या गाठींवरती उपाय म्हणून पेरूच्या पानांचा वापर केला जातो.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी

लठ्ठपणा कमी करण्यासाठी पेरूची पानं फायदेशीर असतात. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होते. शरीरातील फॅट सुद्धा कमी होतात. या पानांचा जर आपण चूर्ण घेतलं तर, त्याने सुद्धा आपल्याला फरक दिसून येतो.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरूच्या पानांचा सेवन हे उपयुक्त ठरतं. पेरूच्या पानांचा रस नियमित घेतला तर, रक्तातील वाढलेली साखर कमी व्हायला मदत होते.

अंगावरून पांढरं पाणी जाण्याचा त्रासावर फायदेशीर

स्त्रियांना अंगावरून पांढरं पाणी जाण्याचा त्रास होत असतो. पेरूची पानं या समस्येसाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. रोज सकाळी संध्याकाळी पेरूच्या पानांचा रस घेतला तर, ही समस्या कमी व्हायला मदत होते.

पोटाच्या विकारांवरती फायदेशीर

पोटाच्या विकारांवरती सुद्धा पेरूची पान उपयुक्त ठरतात. पोटासंबंधी काही तक्रारी असतील तर, पेरूच्या पानांचा रस गुणकारी ठरतो. पचन समस्येवरती याचा परिणाम होऊन, पचनशक्ती सुधारायला मदत होते.

एक कप पाण्यामध्ये पेरूची पाने टाकून, उकळून ती पियाल्याने किंवा त्याचा रस गाळून घेतला तर आपल्याला नक्की फरक जाणवतो. तर हे होते पेरू आणि पेरूच्या पानांचे काही गुणकारी उपयोग.

गरोदरपणात पेरू खावा का ?

पेरू खाण्याचे फायदे Guava Benefits – पेरू हे स्वादिष्ट असे फळ आहे. त्यात फायबर, विटामिन सी आणि फॉलेट हे घटक मुबलक असतात. गरोदरपणात पेरू खावा का ?

हा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर, पेरूमध्ये गर्भाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असे विटामिन सी, फोलेट आणि इतर अनेक पोषक तत्वे असतात. त्यामुळे गरोदरपणा तुम्ही पेरू खाऊ शकता.

गरोदरपणात पेरू खाण्याचे फायदे

पेरू खाण्याचे फायदे Guava Benefits

विटामिन सी मिळते

पेरूमध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे विटामिन सी हे बाळाच्या चांगल्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते.

तसेच विटामिन सी हे लोहाचे शोषण वाढवण्यासाठी मदत करते. गरोदरपणा स्त्रीमध्ये लोहाचे प्रमाण योग्य असणे, गरजेचे असते. पेरू खाण्यामुळे लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

फोलेट मिळते

पेरूमध्ये फोलेटचे प्रमाण सुद्धा मुबलक असते. गरोदरपणात पुरेशा प्रमाणात फोलेटचे सेवन केल्याने बाळात होणारे जन्मदोष टाळण्यास मदत होते.

फायबर मिळते

पेरूमध्ये फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पचन संबंधित पोट साफ न होणे, छातीत जळजळ होणे, अशा समस्या दूर होतात. गरोदरपणा स्त्रियांना पोट साफ न होण्याची समस्या होत असते. अशावेळी पेरू खाणे फायदेशीर असते.

रक्तदाब नियंत्रित राहतो

पेरूमुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. गर्भवती महिलांना उच्च रक्तदाबाची समस्या अधिक होत असते.

यामुळे गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी रक्तदाब आटोक्यात ठेवणे आवश्यक असते. अशावेळी पेरू खाणे फायदेशीर ठरते.

गरोदर पणात पेरू खाताना घ्यावयाची काळजी

पेरू खाण्याचे फायदे Guava Benefits

  • पेरू खाण्यापूर्वी स्वच्छ धुऊन पेरू कापून खावा.
  • गरोदरपणात अधिक प्रमाणात पेरू खाऊ नये.
  • कधीतरीच एखादा पेरू खाऊ शकता.
  • पेरूला मीठ लावून तो खाऊ नका.
  • पेरू खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या.
  • फक्त एकाच गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे पेरू कधी रिकाम्या पोटी खाऊ नये.
  • तसेच पेरू खाल्ल्यावर पाणी सुद्धा पिऊ नये.

कोणत्या काळात पेरू खाऊ नये?

पेरू खाण्याचे फायदे Guava Benefits

  • सर्दी खोकला असल्यास पेरू खाऊ नये.
  • पहाटे किंवा रात्री पेरू खाऊ नये.
  • फ्रीजमधील गार पेरू खाऊ नये.
  • कच्चा पेरू खाल्ल्यास पोट दुखी होते. त्यामुळे पिकलेला पेरू खावा.

पेरू खाण्याचे लाभदायक फायदे  

पेरू खाण्याचे फायदे Guava Benefits – आज आपण पेरू खाण्याचे लाभदायक फायदे जाणून घेणार आहोत.

तुम्हाला जर पेरू खायला आवडत असेल तर, त्याचे आपल्या आरोग्यासाठी कोणकोणते फायदे होतात, हे सुद्धा माहिती असणं खूप आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊयात, पेरू खाण्याचे फायदे.

बद्धकोष्ठतेवर खूपच उपयुक्त

पेरू हे फळ बद्धकोष्ठतेवर खूपच उपयुक्त असतं. ज्या व्यक्तींच पोट व्यवस्थित साफ होत नाही, म्हणजे जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर, अशा व्यक्तींनी सलग चार दिवस, पेरूच सेवन करावं.

यामुळे पोटातील आतड्यांची हालचाल वाढते आणि घट्ट मल पुढे सरकला जातो. त्यामुळे पोट साफ होतं.

रक्तातील साखर नियंत्रित ठेवते

पेरू हे फळ मधुमेहासाठी सुद्धा खूप फायदेशीर मानलं जातं. कारण पेरूमध्ये असे काही गुणधर्म आहेत की, जे इन्सुलिन तयार करण्यासाठी मदत करत असतात.

त्याचबरोबर साखरेची पातळी सुद्धा कमी करत असतात आणि त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी पेरूचे पुरेशा प्रमाणात सेवन जरूर करावं.

थायरॉईडची समस्या कमी करण्यास मदत

ज्या लोकांना थायरॉईडचा त्रास असेल, त्यांच्यासाठी सुद्धा पेरू खाणं खूप फायदेशीर ठरू शकत. कारण पेरूमध्ये आयोडीनचं प्रमाण जास्त असतं.

जे थायरॉईडची समस्या कमी करण्यास मदत करत असतं.

बुद्धीवर्धक

पेरू हा सात्विक गुणधर्माचा आणि बुद्धी वाढवणारा असल्याने, बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तीने तो जरूर खाल्ला पाहिजे. पेरू खाण्यामुळे मानसिक थकवा दूर होऊन, ऊर्जा प्राप्त होत असते.

तोंडाला चव नसणं, भूक मंदावणे, आम्लपित्त, त्या सर्व विकारावर फायदेशीर

तुम्ही पिकलेल्या पेरूची भाजी सुद्धा बनवून खाऊ शकता. तसेच पेरूचा जाम, कोशिंबीर, रायतं किंवा चटणी सुद्धा बनवून खाऊ शकतात.

हे सर्व पदार्थ चविष्ट किंवा रुचकर असल्यामुळे तोंडाला चव नसणं, भूक मंदावणे, आम्लपित्त, त्या सर्व विकारावर ते फायदेशीर ठरत असतात.

पचनक्रिया सुधारते

दुपारी जेवणानंतर पेरू खाल्ला तर, अन्नाचं व्यवस्थित पचन होतं. कारण पेरूमध्ये क जीवनसत्व असतं तसेच ग्लुकोज टॅनिक एसिड या घटकामुळेच जेवण सहजरीत्या पचत असतं.

पेरूमधील वातकारक गुण फायदेशीर

पेरू खाताना त्यावर नेहमी सेंधव मीठ आणि जिरे मिरी पूड घालूनच तो खाल्ला पाहिजे, कारण यामुळे पेरूमध्ये जे अपकारक आणि वातकारक गुण असतात, ते दूर होतात आणि असा पेरू खाल्ल्याने तो बाधत नाही. त्याचा फायदाच होईल.

चेहरा तरुण आणि तेजस्वी दिसायला मदत

पेरूच्या नियमित सेवनाने चेहरा तेजस्वी दिसू लागतो. कारण पेरू या फळांमध्ये ८० % पाण्याचा समावेश असतो.

आणि हेच पाणी त्वचेतील ओलावा कायम ठेवण्यास मदत करत असते आणि याच चेहरा नितळ होतो तसेच तरुण आणि तेजस्वी दिसायला लागतो.

FAQ

१. पेरू फळाविषयी माहिती लिहा.

पेरू हे फळ साधारणपणे साऱ्यांनाच आवडतं. अनेकदा शाळेच्या बाहेर उभ्या असलेल्या चिंचा, बोरांच्या गाड्यांवर, पेरू हमखास असतात. पूर्वी एक किंवा दोन रुपयांना पेरू सहज मिळायचे, मात्र आता त्याच एका पेरूसाठी दहा किंवा पंधरा रुपये मोजावे लागतात.
त्यामुळे अनेक जण पेरू किंवा अन्य फळे घेण्याचे टाळतात. मात्र पेरू खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे पेरूचा आहारात कायम समावेश करावा.पेरूत संत्र्याच्या चारपट विटामिन सी, टोमॅटो पेक्षा दुप्पट लायकोपिन, केळ्या इतकाच पोटॅशियम आणि अननसापेक्षा चारपट फायबर असल्यामुळे ते एक सुपरफुड असं समजलं जातं. म्हणून पेरूचा समावेश आपल्या आहारात नियमित करा आणि आपली तब्येत उत्तम ठेवा.

२. गरोदरपणात पेरू खाताना कोणती काळजी घ्यावी ?

पेरू खाण्यापूर्वी स्वच्छ धुऊन पेरू कापून खावा.
गरोदरपणात अधिक प्रमाणात पेरू खाऊ नये.
कधीतरीच एखादा पेरू खाऊ शकता.
पेरूला मीठ लावून तो खाऊ नका.
पेरू खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा जरूर सल्ला घ्या.
फक्त एकाच गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे पेरू कधी रिकाम्या पोटी खाऊ नये.
तसेच पेरू खाल्ल्यावर पाणी सुद्धा पिऊ नये.

३. पेरू खाण्याचे काय फायदे आहेत ?

आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.
भूक वाढते.
शरीराची दाह कमी होते.
शौचास साफ होते.
हिरड्यांना सूज, दात दुखी, होत असल्यास पेरूचं पान लावावे किंवा पानाचा रस दुखणाऱ्या भागावर लावावा.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
शरीरावर सूज येऊन तो भाग ठणकत असल्यास, पेरूच्या पानाचं पोटीच बांधावे.

४. पेरूच्या पानाचे कोणती फायदे आहेत ?

पेरूची पान पाण्यासोबत उकळून ते पाणी प्यायला ने दातांच आरोग्य उत्तम राहतं. दातांच्या समस्यांसाठी पेरूच्या पानांची पेस्ट सुद्धा उपयुक्त आहे. दातांच्या मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण पर्याय आहे पेरूची पान.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी पेरूची पानं फायदेशीर असतात. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी व्हायला मदत होते. शरीरातील फॅट सुद्धा कमी होतात. या पानांचा जर आपण चूर्ण घेतलं तर, त्याने सुद्धा आपल्याला फरक दिसून येतो.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरूच्या पानांचा सेवन हे उपयुक्त ठरतं. पेरूच्या पानांचा रस नियमित घेतला तर, रक्तातील वाढलेली साखर कमी व्हायला मदत होते.
पोटाच्या विकारांवरती सुद्धा पेरूची पान उपयुक्त ठरतात. पोटासंबंधी काही तक्रारी असतील तर, पेरूच्या पानांचा रस गुणकारी ठरतो. पचन समस्येवरती याचा परिणाम होऊन, पचनशक्ती सुधारायला मदत होते.

५. गरोदरपणात पेरू खाण्याचे कोणते फायदे आहेत ?

पेरूमध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे विटामिन सी हे बाळाच्या चांगल्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते. तसेच विटामिन सी हे लोहाचे शोषण वाढवण्यासाठी मदत करते.
गरोदरपणा स्त्रीमध्ये लोहाचे प्रमाण योग्य असणे, गरजेचे असते. पेरू खाण्यामुळे लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
पेरूमुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. गर्भवती महिलांना उच्च रक्तदाबाची समस्या अधिक होत असते. यामुळे गंभीर आजार निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी रक्तदाब आटोक्यात ठेवणे आवश्यक असते. अशावेळी पेरू खाणे फायदेशीर ठरते.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास पेरू खाण्याचे फायदे कोणते, कोणी खावा, पेरू खाताना कोणती काळजी घ्यावी, या बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तुम्ही देखील तुमच्या आहारामध्ये पेरूचे सेवन करून त्याचे लाभदायक फायदे मिळवू शकता.

तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment