बीट खाण्याचे फायदे Beetroot Benefits 

बीट खाण्याचे फायदे Beetroot Benefits – बीट खाण्याचे अनेक फायदे आहेत, पण ते अनेक जणांना माहीतच नाहीये. बीट हे अनेक पोषक घटकांनी युक्त असून, रोजच्या आहारात बीटचा वापर आपण जरूर केला पाहिजे.

त्याने अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. पण बरेच जणांना त्याची चव आवडत नाही, म्हणून बीट खाणे टाळतात. पण खरं तर, ही एक मोठी चूक ठरू शकते. जे विविध फळे खाल्ल्याने मिळत नाही त्या गोष्टी केवळ एका बीटाच्या सेवनाने मिळत.

आज आपण बीट खाण्याचे फायदे काय आहेत ? आणि नुकसान काय आहेत ? ते जाणून घेऊयात.

म्हणून आज या लेखाच्या माध्यमाने आम्ही आपल्याला बीट खाण्याचे फायदे आणि नुकसान याबद्दल सविस्तरपणे माहिती सांगणार आहोत. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यत नक्की वाचा.

Table of Contents

बीट खाण्याचे फायदे Beetroot Benefits 

बीट या कंदमूळाविषयी माहिती

बीट खाण्याचे फायदे Beetroot Benefits – बीट हे एक प्रकारचे कंदमूळ आहे. हिंदीमध्ये चुकंदर, इंग्लिश मध्ये बीटरूट या नावाने ओळखले जाते. दिसायला गडद लाल, गुलाबी रंगाचे हे एक सुपर फूड आहे. त्याचा विविध व्यंजनांमध्ये वापर केला जातो. बहुतांश लोक त्याच्या लाल रंगामुळे रक्त वाढवण्यासाठी आणि सजावटीसाठी त्याचा आहारात समावेश करतात.

बीट हे बहुतेकदा लोक कोशिंबीर आणि रस म्हणून वापर करताना दिसून येतो. बीट हा लोह चा चांगला स्त्रोत मानला जातो. कारण त्यात फॉलिक ऍसिड असते. ते रक्ताच्या वाढीसाठी आवश्यक असते. यासह बीटमध्ये बीटानीन नावाचे रंगद्रव्य आढळते.

जे त्याला गुलाबी रंग प्रदान करते. या सर्व घटकांसह बीट अँटि ऑक्सिडंटचा चांगला स्त्रोत मानला जातो. बीट चा उपयोग रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि बऱ्याच रोगांपासून बरे करण्यासाठी होतो.

बीट खाण्याचे फायदे

हे वाचा-

बीटमध्ये कोणते पोषक घटक आढळतात ?

विटामिन सीकॅल्शियमकार्बोहायड्रेटअँटि ऑक्सिडंट
फायबरसोडियमपोटॅशियमफॉलेट
आयर्नझिंकमॅग्नीजमॅग्नेशियम
फॉस्फरसकॉपर/आयोडीनमिनरलनाइट्रेट

यांसारखे औषधी गुणधर्म बीट या कंदमुळ मध्ये आढळून येतात.

बीट का खावे ?

बीट खाण्याचे फायदे Beetroot Benefits – बीट मध्ये अनेक उपयुक्त घटक म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, विटामिन सी, विटामिन बी 1, विटामिन बी 2, आयर्न आणि फॉलिक ऍसिड आहे.

आपल्या शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जर कोणता पदार्थ असेल तर, तो म्हणजे बीट. बीट रूट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि रक्त शुद्ध करतात. त्यात सापडलेल्या अँटि ऑक्सिडंट शरीराला रोगापासून प्रतिकार करण्याची क्षमता देतात.

याचे असे अनेक फायदे जर, तुम्ही जाणून घेतलात तर तुम्ही स्वतःला बीट खाण्यापासून कधीही थांबू शकणार नाही. बीट एक नॅचरल फूड कलर चेही काम करते.

बीट खाण्याचे फायदे काय आहेत?

बीट खाण्याचे फायदे Beetroot Benefits

मेंदूचा विकास होतो

हृदया बरोबरच बीट मेंदूची ही काळजी घेतो. बीटमध्ये असलेले नाइट्रेट आणि लोह लाल रक्तपेशी आणि रक्तातील रक्त प्रवाह वाढवते. ज्यामुळे मेंदूत रक्ताचा प्रवाह खूप चांगला होतो.

अशा परिस्थितीत जेव्हा मेंदूकडे रक्ताचा प्रवाह चांगला असतो, तेव्हा आपली स्मरणशक्ती ही चांगली असते. मग आपण कशाची वाट पाहत आहात, तुम्ही कोशिंबीर किंवा रस म्हणून बीट घेणे सुरू करा आणि तुमची स्मरणशक्ती सुधारित करा.

अशक्तपणापासून मुक्तता मिळते

आज खूप सारी लोक अशक्तपणापासून ग्रस्त आहे. जेव्हा शरीरात पुरेसे लोह मिळत नाही, तेव्हा ही समस्या व्यक्तीच्या शरीरात उद्भवते. त्यामुळे लाल रक्त पेशींचे उत्पादन कमी होते. त्यामुळे अशक्तपणा आणि थकवा देखील सुरू होतो.

या स्थितीचा सामना करण्यासाठी आपण बीटचा आहारात समाविष्ट करू शकता. बीटमध्ये लोह भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे लाल रक्तपेशी तयार होऊ लागतात आणि अशक्तपणाच्या समस्येपासून देखील सुटका होते.

मधुमेहासाठी उपयुक्त ठरते

जेव्हा रक्तातील साखरेच्या प्रमाणात वाढ होते, तेव्हा मधुमेहांसारखे आजार होतात. तज्ञांच्या मते, बीट मध्ये अल्फालिपोईक ऍसिड नावाचा एक्सीडेंट असतो.

हे कंपाउंड ग्लुकोची पातळी कमी करण्यास मदत करू शकते. म्हणून मधुमेहाच्या रुग्णांनी बीटचे चे सेवन अवश्य केले पाहिजे.

रक्तदाब कमी करते

बीटचा रस पिल्याने, रक्तभिसरण सुरळीत होते. यामुळे हृदयविकाराचा त्रास होत नाही. याशिवाय हे हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा होण्याचा धोका सुद्धा टाळते.

पाचन तंत्र सुरळीत करते

हल्ली अनेक आजारांचे मूळ कारण म्हणजे खराब पाचन तंत्र. पाचन तंत्र जर सुरळीत नसेल तर, अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधी जडतात, म्हणूनच कमजोर पाचन तंत्राच्या समस्या असलेल्या लोकांसाठी बीट हा एक चांगला पर्याय आहे.

बीट हे फायबर आणि पोटॅशियम समृद्ध असते. जे पाचन तंत्र सुरळीत करण्यास मदत करते. पाचक प्रणाली बळकट करण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी बीटचा रस पिणे फायदेशीर ठरते.

हाडे मजबूत करते

प्रत्येक निरोगी शरीर आणि मजबूत बनवण्यासाठी, हाडेही महत्त्वाची भूमिका बजावत असतात. परंतु आजच्या अनियमित जीवनशैलीमुळे, हाडांना पुरेसे पोषण तंत्र मिळत नाही.

ज्यामुळे वेळेआधीच हाडे कमकुवत होतात. म्हणूनच बीटचे नेहमीच सेवन केल्यास, या समस्येपासून मुक्त होऊ शकतात. बीटमध्ये कॅल्शियम, लोह, विटामिन टी, असते. ज्यामुळे हाडे मजबूत बनतात.

त्वचा निस्तेज होते

बीटचे सेवन केल्याने, त्वचा तेजस्वी होण्यास मदत होते. बीटमध्ये उपस्थित अँटि ऑक्सिडंट आणि अँटि एजिंग म्हणून काम करतात.

त्यामुळे आपली त्वचा अधिक निस्तेज आणि सुंदर होते. जर तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या असतील तर, तुम्हीही बीटचे नेहमीच सेवन करू शकता.

केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

केसांच्या वृद्धीसाठी बीटचे बरेच फायदे देखील आहेत. बीटमध्ये अँटि ऑक्सिडन्स, विटामिन ए, विटामिन सी, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक आढळतात.

ही पोषक तत्वे केसांचे गळण्यापासून रक्षण करण्यासाठी कार्य करतात. निरोगी आणि घनदाट केसांसाठी बीटचे तुम्ही नेहमीच सेवन केले पाहिजे.

बीट खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

बीट खाण्याचे फायदे Beetroot Benefits – आज आपण जाणून घेणार आहोत की, बीट खाण्याचे आकर्षक फायदे. चला तर मग जाणून घेवूयात.

लाल रक्तपेशी वाढवायला मदत

जर तुम्हाला अशक्तपणाचा त्रास असेल, तर तो बीट खाण्यामुळे दूर होतो. बीटमध्ये आयर्न हे लाल रक्तपेशी वाढवायला मदत करतात. ज्यामुळे जर तुम्हाला ॲनिमियाचा त्रास असेल, तर तो सुद्धा बीटचे सेवन केल्याने दूर होतो.

यकृताचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी

बीट हे यकृत्यासाठी देखील खूप जास्त फायदेशीर आहे. जर तुम्हाला यकृताची निगडित कोणती पण समस्या असेल तर तुम्ही नक्की बीटचा समावेश आपल्या आहारात करा. त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल.

चमकणारी त्वचा

जर तुम्हाला तुम्ही स्किन नैसर्गिकरित्या चमकदार बनवायची असेल तर तुम्हाला बीट खायला हव. बीटाचे रस किंवा बीटाच ज्यूस तुम्ही पिऊ शकता. म्हणजे तुम्हाला दीर्घकाळ निरोगी आणि चमकदार त्वचा मिळेल.

लांबसडक केसांसाठी बीटाचा वापर

बीट हे केसांसाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. जसं तुम्हाला प्रत्येकालाच वाटतं की, केस लांब असावे आणि मजबूत असावे.

मग तुम्हाला यासाठी सुद्धा बीट फायदेशीर ठरणार आहे. बीटाच ज्यूस तुम्ही केसांसाठी पिऊ शकता. म्हणजे तुमचे केस जे आहे ते खूप छान वाढतील आणि चांगले दिसतील.

मासिक पाळीमध्ये फायदेशीर

महिलांसाठी सुद्धा बीट खूप फायदेशीर आहे. जेव्हा आपल्याला मासिक पाळी येते, तेव्हा आपल्याला खूप जास्त अशक्तपणा जाणवतो. कारण आपल्या शरीरातून सतत रक्त जात असत.

मग अशावेळी तुम्ही बीटाच ज्यूस पिऊ शकता, म्हणजे तुम्हाला आराम मिळेल. बीटाचा रस प्यायला ने शरीरातील जो अशक्तपणा असतो किंवा आपल्याला थकवा आलेला असतो, तो दूर व्हायला मदत होते आणि त्वरितच ऊर्जा मिळते.

म्हणून जर तुम्हाला जेव्हा इन्स्टंट एनर्जी हवी असेल, तेव्हा तुम्ही बीटाचा रस नक्की पिया. म्हणजे तुम्हाला फायदा होईल.

बद्धकोष्ठतेपासून आराम

जर तुम्हाला मलविसर्जनच्या वेळी त्रास जाणवत असेल, तेव्हा सुद्धा तुम्ही बीटाचा रस घेणं खूप जास्त फायदेशीर ठरू शकत.

त्याचं कारण म्हणजे, बीटामध्ये असलेले फायबर जे आहेत ते तुम्हाला आराम द्यायला मदत करतात. त्याच्यामुळे तुम्ही बिटाचा रस प्या. त्यांनी तुम्हाला त्रास होतो तो होणार नाही.

बीट डोळ्यांसाठी फायदेशीर

सर्वात जास्त बीट हे डोळे निरोगी ठेवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे जर तुम्हाला जेवणाआधी किंवा जेवणानंतर, कधीही जेव्हा जमेल तेव्हा बीट नक्की खा.

बीट खाण्याचे लाभदायी फायदे

बीट खाण्याचे फायदे Beetroot Benefits

हाय ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही

बीट खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. बीट मध्ये मुबलक प्रमाणात नायट्रेट नावाच रसायन असत. बीट खाल्याने नायट्रेट हा घटक पचनसंस्थेत पोहोचल्यानंतर, नायट्रेट ऑक्साईड बनते आणि रक्त प्रवाह वाढवते.

त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. यासाठी हाय ब्लड प्रेशरचा त्रास होणार नाही. तर रोज एक कप बीट ज्यू प्यायला पाहिजे.

कॅल्शियम चा स्त्रोत आहे

कॅल्शियम शरीरासाठी महत्त्वाचे तत्व आहे. कॅल्शियम मुळे हाडे आणि दात मजबूत होतात. बीट शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करतो. बीट दाताने चावून खाल्ल्याने, दात आणि हिरड्या मजबूत होतात.

रक्ताची कमतरता होत नाही

रोज सकाळी एक कप बीटचा ज्यूस आपण प्यायला पाहिजे. बीट मध्ये मुबलक प्रमाणात लोह आणि फॉलिक ऍसिड असते. त्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते.

पोटा संबंधित विकारापासून दूर ठेवतो

बीटामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. बीटाचा उपयोग पोटा संबंधित रोगापासून म्हणजेच अपचन आणि मूळव्याधी पासून आपला बचाव होऊ शकतो.

यासाठी रोज रात्री झोपण्या अगोदर एक ग्लास बीटचा रस प्यायला पाहिजे. याने खाल्लेले अन्नपचन होण्यास मदत होते.

कफाचा त्रास होत नाही

पाऊस आणि थंडीमध्ये अनेकांना सर्दी, कफ यांसारखे त्रास होतात. बीट हे श्वसनलिका स्वच्छ ठेवते. त्यामुळे कफ होण्याची समस्या दूर होते. बीट आणि साखर खाल्ल्याने, कफ पातळ होण्यास मदत होते.

गर्भवती महिलांना लाभदायक आहे

बीटमध्ये फॉलिक ऍसिड असते. जे गर्भवती महिलांना आणि गर्भात असलेल्या बाळासाठी फायदेशीर असते. बीट मुळे रक्त तर वाढतेच, त्याचबरोबर प्रसूती नंतर दूधही वाढते. गर्भवती महिलांसाठी बीट खाणे फार फायदेशीर आहे.

मासिक पाळी नियमित येते

मासिक पाळी अनियमित असेल किंवा मासिक पाळी आल्यानंतर त्रास होत असेल तर, बीट नियमित खाल्ल्याने, त्रासापासून आपली सुटका होईल.

केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे

बीटामध्ये असणारे फॉस्फरस, हे केसांच्या वाढीसाठी उत्कृष्ट समजण्यात येतो. खरं तर केसांच्या वाढीसाठी बीट नैसर्गिक सोर्स आहे.

नियमित बीट आपल्या जेवणामध्ये खाल्ल्याने किंवा त्याचा ज्यूस करून प्यायलाने आपल्या केसांमध्ये रोम छिद्र उघडतात आणि त्यामुळे केस मजबूत होण्यास व वाढण्यास मदत होते.

त्वचा अधिक उजळ होते

त्वचेवर रंगत आणण्यासाठी याचा फायदा होतो. बीट खाल्ल्याने त्वचेवरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. त्यात आढळणारे अँटि ऑक्सिडेंट हे त्वचा उजळण्यासाठी आणि अधिक सुंदर दिसण्यासाठी मदत करतात.

शिवाय हिमोग्लोबिन शरीरात वाढलं की, चेहरा सहाजिकच उजळतो. यामध्ये लोह, सोडियम, पोटॅशियम, या सगळ्या गोष्टी जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे शरीर निरोगी राहण्यासाठी ही याची खूप मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत

बीटामध्ये नैसर्गिक साखर असते, त्यामुळे शरीराला अधिक ऊर्जा ही नैसर्गिक प्रमाणात प्राप्त होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बीट चा उपयोग होतो. कारण यामध्ये असणारे फायबर हे पोट साफ ठेवण्यासाठी मदत करतात.

वजन आटोक्यात राहते

बीट किंवा बीटाच्या रसात कमी कॅलरीज तसेच झिरो फॅट असते. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांनी आपल्या डायट प्लॅनमध्ये बीटचा समावेश जरूर करावा.

बीटच्या रसा बरोबर गाजराचा रस समप्रमाणात मिक्स करून, प्यायल्याने शारीरिक ताकद वाढते. त्याचबरोबर वजन वाढत नाही आणि चरबी कमी करण्यास ही मदत होते.

Beetroot Benefits

कोलेस्ट्रॉल कमी करतो

बीट किंवा बीटाचा ज्यूस प्यायलाने वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून, चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होतो. शिवाय बीट मुळे हृदयांच्या मांस पेशीही मजबूत होतात.

ओठांच्या सौंदर्यासाठी बीटाचा वापर कसा करावा ?

बीट

बीट खाण्याचे फायदे Beetroot Benefits – बीटरूट मध्ये हायड्रेटिक आणि पौष्टिक गुणधर्म आहे. जे त्वचेच्या थरांमध्ये खोलवर जातात आणि ओठांना मोईश्चराईज करतात. तुमचे ओठ डार्क रंगाचे असतील तर, तुम्ही बीट रूटचा वापर करू शकता.

यासाठी तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी बीट रूट चा रस ओठांवर लावा. बीट रूट मध्ये ओठ गुलाबी होण्यास मदत होतील. बीट रूट मृतत्वचा काढून टाकण्यास मदत करते.

त्यामुळे नियमितपणे बीट रूट चा रस त्वचेवर, तसेच ओठांवर लावा. बीट रूट मधील पौष्टिक गुणधर्म ओठांना आतून मोईशराईज करतात. ताज्या बीट रूटचा तुकडा कापून, तो ओठावर चोळा यामुळे फायदा होईल.

बीटाचा आहारात समावेश केल्याने होणारे फायदे

बीट खाण्याचे फायदे Beetroot Benefits – आजकालचा धावपळीच्या जीवनामध्ये, स्वतःवरती विशेष लक्ष देण्याची खास गरज आहे. अनेक जण फक्त पोट भरण्यासाठी जेवणाला महत्त्व देतात. पण जर तुम्ही योग्य वेळी, योग्य आहार घेतला तर तुम्हाला याचा मोठा फायदा होईल.

रोजच्या आहारामध्ये बीटाचा वापर केला तर, त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. त्यामुळे या बीटाचे नक्की कुठले गुणकारी फायदे आहेत, हे आज आपण पाहणार आहोत.

Beetroot Benefits

बीट खाल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते

गाजर आणि बीटाचा एक, एक कप रस प्याल्याने ह्याचा मोठा फायदा होतो. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना बीट नेहमी खायला द्यावं.

किडनी स्टोनची समस्या देखील दूर होते

रोज सकाळी एक कप बीटाचा रस प्यायल्याने, किडनी स्टोनची समस्या देखील दूर होते. तसेच यकृतावरील सूज देखील कमी होते.

दात आणि हिरड्या मजबूत होतात

बीट शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करतो. मुलांनी आणि युवकांनी बीट चावून खाल्लं पाहिजे यामुळे दात आणि हिरड्याही मजबूत होतात.

त्वचाविकार होत नाही

बीटामुळे कफ होण्याची समस्या दूर होते. शरीरावरती खाज येणाऱ्या ठिकाणी बीटाच्या रसामध्ये जर मध टाकून लावल्यास ही समस्या ही दूर होते.

सांधेदुखीचा त्रासही कमी होतो

बीटामध्ये सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, सल्फर, क्लोरीन, आयोडीन, आयन, असे अनेक जीवनसत्व आहेत. त्यामुळे बीटामुळे सांधेदुखीचा त्रासही कमी होतो.

अनियमित मासिक पाळीपासून सुटका

दोन चमचे बीटाचा रस आणि मध एकत्र करून खाल्ल्याने कॅल्शियमची समस्या दूर होते. मासिक पाळीचे नियमित येत नसेल आणि त्याचा जर त्रास होत असेल तर बीट खाल्ल्याने या अनियमित मासिक पाळीपासून आपली सुटका होईल.

त्यामुळे आपल्या उत्तम आरोग्यासाठी आपल्या रोजच्या आहारामध्ये बीटाचा समावेश नक्की करा.

बीटचे सेवन कसे करावे ?

बीट खाण्याचे फायदे Beetroot Benefits – तुम्ही बीटचे सेवन ज्यूस, सूप, कोशिंबीर, लोणचे अथवा भाजी अशा प्रकारे करू शकता.

बीट खाण्याचे दुष्परिणाम

बीट खाण्याचे फायदे Beetroot Benefits – बीट व्यक्तिरिक्त त्याची पाने देखील तुम्ही खाऊ शकता. जरी बीट चे कोणतेही दुष्परिणाम नसले, तरी ज्या व्यक्तींना किडनी स्टोन किंवा अन्य समस्या आहेत, त्यांनी बीटचे सेवन टाळले पाहिजे किंवा ते घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ल्यानेच सेवन केले पाहिजे.

बीट खाण्याचे तोटे

बीट खाण्याचे जसे फायदे आपण ऐकले, तसे बीट खाण्याचे नुकसान देखील आहेत. आता कोणते नुकसान आहेत, ते आपण पाहूया.

रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे चालू असल्यास बीट टाळावे

जर तुम्ही रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे घेत असाल, तर बीटचे सेवन करू नका. कारण हे शरीरातील रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते

जर तुम्ही दररोज बीटचे सेवन करत असाल तर, आपल्या आरोग्यासाठी ते हानिकारक ठरू शकते. कारण त्यामुळे आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते.

यकृताची समस्या उद्भवू शकते

बीट हा आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फर असता चांगला स्त्रोत आहे. परंतु याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास, यकृताची समस्या उद्भवू शकते.

किडनी स्टोन होण्याची शक्यता

बीट मध्ये डाएट्री ऑक्सलेट हे मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे किडनी स्टोन होण्याची देखील शक्यता असते.

एलर्जी देखील होऊ शकते

काही लोकांना बीट पासून एलर्जी देखील असते. कारण त्याचे सेवन केल्यावर, त्वचा लाल होण्यास सुरुवात होते. याशिवाय त्वचेवर खाज सुटणे आणि जळजळ होण्यास सुरुवात होते.

Note :

( लक्षात ठेवा, जसे बीट खाण्याचे फायदे आहेत तसे, बीट खाण्याचे नुकसान देखील आहे. तसेच आपल्याला कोणत्याही आजाराचे निदान करण्यापूर्वी किंवा कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास, कृपया प्रथम आपल्या डॉक्टरांचा किंवा विशेष तज्ञांचा सल्ला घेऊनच, त्याचे सेवन करावे.)

FAQ

१. बीट का खावे ?

बीट मध्ये अनेक उपयुक्त घटक म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, विटामिन सी, विटामिन बी 1, विटामिन बी 2, आयर्न आणि फॉलिक ऍसिड आहे. आपल्या शरीरात हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जर कोणता पदार्थ असेल तर, तो म्हणजे बीट. बीट रूट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि रक्त शुद्ध करतात. त्यात सापडलेल्या अँटि ऑक्सिडंट शरीराला रोगापासून प्रतिकार करण्याची क्षमता देतात. याचे असे अनेक फायदे जर, तुम्ही जाणून घेतलात तर तुम्ही स्वतःला बीट खाण्यापासून कधीही थांबू शकणार नाही. बीट एक नॅचरल फूड कलर चेही काम करते.

२. बीट खाण्याचे काय फायदे आहेत ?

गाजर आणि बीटाचा एक, एक कप रस प्याल्याने ह्याचा मोठा फायदा होतो. त्यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना बीट नेहमी खायला द्यावं.
रोज सकाळी एक कप बीटाचा रस प्यायल्याने, किडनी स्टोनची समस्या देखील दूर होते. तसेच यकृतावरील सूज देखील कमी होते.
बीट शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर करतो. मुलांनी आणि युवकांनी बीट चावून खाल्लं पाहिजे यामुळे दात आणि हिरड्याही मजबूत होतात.
बीटामध्ये सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, सल्फर, क्लोरीन, आयोडीन, आयन, असे अनेक जीवनसत्व आहेत. त्यामुळे बीटामुळे सांधेदुखीचा त्रासही कमी होतो.
बीटामुळे कफ होण्याची समस्या दूर होते. शरीरावरती खाज येणाऱ्या ठिकाणी बीटाच्या रसामध्ये जर मध टाकून लावल्यास ही समस्या ही दूर होते.

३. मासिक पाळीत बीट फायदेशीर आहे का ?

महिलांसाठी सुद्धा बीट खूप फायदेशीर आहे. जेव्हा आपल्याला मासिक पाळी येते, तेव्हा आपल्याला खूप जास्त अशक्तपणा जाणवतो. कारण आपल्या शरीरातून सतत रक्त जात असत. मग अशावेळी तुम्ही बीटाच ज्यूस पिऊ शकता, म्हणजे तुम्हाला आराम मिळेल. बीटाचा रस प्यायला ने शरीरातील जो अशक्तपणा असतो किंवा आपल्याला थकवा आलेला असतो, तो दूर व्हायला मदत होते आणि त्वरितच ऊर्जा मिळते. म्हणून जर तुम्हाला जेव्हा इन्स्टंट एनर्जी हवी असेल, तेव्हा तुम्ही बीटाचा रस नक्की पिया. म्हणजे तुम्हाला फायदा होईल.

४. बीट विषयी थोडक्यात माहिती लिहा.

बीट हे एक प्रकारचे कंदमूळ आहे. हिंदीमध्ये चुकंदर, इंग्लिश मध्ये बीटरूट या नावाने ओळखले जाते. दिसायला गडद लाल, गुलाबी रंगाचे हे एक सुपर फूड आहे. त्याचा विविध व्यंजनांमध्ये वापर केला जातो. बहुतांश लोक त्याच्या लाल रंगामुळे रक्त वाढवण्यासाठी आणि सजावटीसाठी त्याचा आहारात समावेश करतात.
बीट हे बहुतेकदा लोक कोशिंबीर आणि रस म्हणून वापर करताना दिसून येतो. बीट हा लोह चा चांगला स्त्रोत मानला जातो. कारण त्यात फॉलिक ऍसिड असते. ते रक्ताच्या वाढीसाठी आवश्यक असते. यासह बीटमध्ये बीटानीन नावाचे रंगद्रव्य आढळते. जे त्याला गुलाबी रंग प्रदान करते. या सर्व घटकांसह बीट अँटि ऑक्सिडंटचा चांगला स्त्रोत मानला जातो. बीट चा उपयोग रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि बऱ्याच रोगांपासून बरे करण्यासाठी होतो.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास बीट खाण्याचे फायदे काय आहेत ? बीट का खावे ? बीट खाण्याचे तोटे, बीट कसे खावे ? याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तुम्ही देखील तुमच्या आहारात बीटाचा समावेश करा आणि तुमचे आरोग्य उत्तम ठेवा.

लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment