मधुमेह लक्षणे व उपचार Diabetes Symptoms In Marathi

मधुमेह लक्षणे व उपचार Diabetes Symptoms In Marathi – आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि व्यस्त जीवनशैलीमुळे केवळ भारतातच नाही तर जगभरात मधुमेही रुग्णांचे प्रमाण वाढत चाललंय. त्याचे टाईप वन आणि टाईप टू असे दोन प्रकार आहेत.

या आजारावर वेळीच योग्य उपचार केले नाही तर, इतर अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याची लक्षणे ओळखणे सध्या गरजेचे आहे आणि सुरुवातीच्या टप्प्यात काही सौम्य लक्षणही दिसून येतात.

कुठली आहेत ती लक्षणं हे जाणून घेणार आहोत आजच्या या लेखामधून. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

मधुमेह लक्षणे व उपचार Diabetes Symptoms In Marathi

मधुमेह कशामुळे होतो?

मधुमेह लक्षणे व उपचार Diabetes Symptoms In Marathi – आपण ज्यावेळी काही खात असतो तेव्हा आपले शरीर कार्बोहायड्रेट चे रूपांतर साखरेमध्ये म्हणजेच ग्लुकोज मध्ये करत करीत असते.

त्यानंतर आपल्या स्वादुपिंडामध्ये तयार होणारी इन्सुलिन नावाचे हार्मोन शरीरातील पेशींना ती साखर ऊर्जेसाठी शोषून घेण्याची सूचना करीत असते. पण ज्यावेळी इन्सुलिन तयार होत नाही, म्हणजेच ते व्यवस्थित काम करीत नाही. त्यावेळी मधुमेह होतो कारण त्यामुळे रक्तात साखर जमा व्हायला लागते.

मधुमेह लक्षणे व उपचार

हे वाचा –

मधुमेह होण्यापासून टाळू शकतो का?

मधुमेह लक्षणे व उपचार Diabetes Symptoms In Marathi – मधुमेह हा पर्यावरणातील घटकांवर अवलंबून असतो तसेच अनुवंशिक देखील आहे. आरोग्यदायी आहार आणि सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करून आपण रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करू शकतो.

तयार केलेली साखरेपासून बनवलेली पेय किंवा बाहेरील पदार्थ न खाता घरगुती धान्य आणि कडधान्याचा वापर आपण जर केला तर ते एक चांगले पाऊल ठरू शकते.

मैदा व्हाईट ब्रेड भात पेस्ट्रीज मिठाई पास्ता थंडपेय साखर घातलेले इतर पदार्थ यामध्ये पोषक तत्वे कमी असतात कारण त्यातील तंतुमय आणि जीवनसत्व असलेला भाग काढून टाकला जातो. त्यामुळे आपण भाजीपाला, फळे, कडधान्य यासारख्या निरोगी आहाराचा आपल्या रोजच्या जेवणामध्ये समावेश केला तर ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

तसेच तेल, सुकामेवा, मासे, मटण, अंडी यांचा देखील आपल्या आहारामध्ये समावेश केला, तर मधुमेह होण्यापासून टाळू शकतो. काही ठराविक वेळेनंतर थोडे थोडे खात राहणे, तसेच पोट भरलेले असल्यानंतर न खाणे हे देखील महत्त्वाचे आहे. नियमित व्यायामामुळे देखील रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास तसेच नियंत्रित राहण्यास मदत होते.

डायबेटीस

मधुमेहामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. आपल्या शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह योग्य प्रकारे होत नसेल तर ते गरजेप्रमाणे आपल्या शरीरातील एक अवयवांपर्यंत पोहोचत नाही.

त्यामुळे मज्जातंतूचे नुकसान होते तसेच दृष्टी देखील कमी होते आणि पायाला संसर्ग होण्याचा धोका संभवतो. त्याचप्रमाणे हार्ट अटॅक, पक्षाघात, अंधत्व, किडनी निकामी होणे खालील भागातील अवयवांच्या विच्छेदनासाठी मधुमेह हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते.

मधुमेहींचे प्रमाण

डब्ल्यू एच ओ च्या माहितीनुसार 1980 मधील 10.8 कोटी वरून 2014 मध्ये साधारणपणे 42.2 कोटींवर डायबेटीस असलेल्यांचा आकडा पोहोचला आहे 1980 मध्ये संपूर्ण जगामध्ये 18 पेक्षा कमी वयाचे असलेल्या लोकांमध्ये डायबिटीसचे प्रमाण पाच टक्के होते ते 2014 पर्यन्त 8.5% इतके वाढले.

मधुमेहाचे प्रकार

मधुमेह लक्षणे व उपचार Diabetes Symptoms In Marathi –

टाईप एक मधुमेह

स्वयं प्रतिकार प्रतिक्रियेमुळे हा डायबेटीस होतो. यामध्ये रोगप्रतिकारक प्रणाली स्वादुपिंडाच्या इन्सुलिन उत्पादक बीटा पेशींवर हल्ला करते आणि त्यामुळे मधुमेह होतो.

ज्यामुळे रक्तातील ग्लुकोज नियंत्रणावर परिणाम होतो. अनुवंशिक तसेच पर्यावरणीय घटक जसे की, विषाणूजन्य संसर्ग आहारातील घटक महत्त्वाची भूमिका बजावतात. हा मधुमेह सामान्यतः लहान मुले आणि तरुण लोकांमध्ये आढळतो.

टाईप दोन मधुमेह

इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देण्यास शरीर कमी पडते, ज्यामुळे इन्सुलिनचा प्रतिकार होतो. तसेच इन्सुलिन हा संप्रेरक कुचकामी ठरतो. त्यामुळे शरीरात अधिक इन्सुलिन तयार होते आणि रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते.

या प्रकारच्या मधुमेहाची बहुतेक प्रकरणेही प्रीडायबिटीस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टप्प्यातून जातात. ज्यामध्ये पेशी इन्सुलिनला सामान्यपणे प्रतिसाद देत नाहीत.

गर्भावस्थेतील मधुमेह

गर्भधारणेदरम्यान निदान झालेला मधुमेह म्हणजेच गर्भावस्थेतील मधुमेह. गर्भधारणेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाईमध्ये महिलांना गर्भधारणेचा मधुमेह होतो. ही स्थिती पुढे भविष्यातील गर्भधारणे दरम्यान विकसित होण्याचा धोका देखील जास्त असू शकतो.

यामुळे मुलांमध्ये पाठीच्या कण्यातील विसंगती, मेंदू तसेच लठ्ठपणा यांचा धोका वाढतो. आई आणि बाळांमध्ये होणाऱ्या मोठ्या परिणामामुळे प्रत्येक गर्भवती महिलेला जी डी एम बद्दल जागरूक असणे आवश्यक आहे.

प्री डायबेटीस

यामध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी सामान्य पेक्षा जास्त असते. परंतु मधुमेह वर्गीकृत करणे नसते. याकडे आपण जर दुर्लक्ष केले तर गुंतागुंत वाढू शकते. याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत.

तथापि जीवनशैलीत बदल करून लवकर उपचार केल्यास तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी मर्यादित ठेवण्यास मदत होते.

किशोरवयीन मधुमेह

19 वर्षे वयाच्या आतील मुलांमध्ये हा आढळून येतो. लहान मुलांना इन्सुलिनच्या लसी मोठ्यांच्या आणि परिचारिकेच्या देखरेखीखाली दिल्या जातात. त्यानंतर मधुमेह डॉक्टरच्या सल्ल्यानुसार स्वतःही लस टोचून घेऊ शकतात.

मधुमेहाची लक्षणे

मधुमेह लक्षणे व उपचार Diabetes Symptoms In Marathi –

हाताला किंवा पायाला मुंग्या येणे

साखरेची उच्च पातळी रक्ताभिसरण प्रभावित करू शकते आणि शरीराच्या मज्जातंतूंना नुकसान पोहोचवू शकते त्यामुळे टाईप २ मधुमेह असलेल्या लोकांमध्ये हात आणि पाय दुखणे किंवा त्यांना मुंग्या येणे आणि सुन्न होणे अशा समस्या उद्भवू शकतात.

त्वचेवर काळे डाग पडणे

मान काम किंवा कमरेवर काळे ठिपके देखील उच्च मधुमेहाचा धोका दर्शवू शकतात. हे चट्टे खूप मऊ आणि मखमली वाटू शकतात. त्वचेची ही स्थिती डायबेटीससाठी कारणीभूत ठरू शकते.

खाजेचे व इस्टचे संक्रमण होणे

रक्त किंवा लघवीमध्ये जास्त साखरेमुळे संसर्ग होऊ शकतो. इस्टचा संसर्ग उबदार ओलसर भागांवर होतो. जसं की, तोंड, जनंद्रीयांचे भाग आणि इत्यादी. तुम्हाला जर हे संक्रमण झालं असेल तर त्वरित डॉक्टरांचे संपर्क साधावा.

सतत तहान लागणे

रक्तातील अतिरिक्त साखर काढून टाकण्यासाठी वारंवार लघवी करणं आवश्यक असतं. परंतु यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते. कालांतराने यामुळे निर्जलीकरण होऊन, व्यक्तीला नेहमीपेक्षा जास्त तहान सुद्धा लागू शकते.

सतत भूक लागणे

डायबेटीस असलेल्या लोकांना अनेकदा त्यांच्या अन्नातून पुरेशी ऊर्जा मिळत नाहीत. पाचक प्रणाली अन्नाचे ग्लुकोज मध्ये खंडन करते आणि याचा वापर शरीर इंधन म्हणून करतं. मधुमेह असलेल्या लोकांमध्ये हे ग्लुकोज पुरेशा प्रमाणात रक्त प्रवाहतून शरीराच्या पेशींमध्ये जात नाही. परिणामी टाईप २ मधुमेह असलेल्या लोकांना अनेकदा भूक लागते आणि त्यामुळे त्यांना खूप थकवा जाणवतो. हा थकवा शरीराच्या पेशींमध्ये रक्तप्रवाहतून साखरेच्या अपरिप्ततेमुळे होतो.

वारंवार लघवी होणे

जेव्हा रक्तातील साखरेची पातळी जास्त असते, तेव्हा मूत्रपिंड रक्तातील अतिरिक्त साखर फिल्टर करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे व्यक्तीला जास्त वेळा लघवी करण्याची गरज भासू शकते. विशेषतः रात्री मोठ्या प्रमाणावर लगवी होते.

अंधुक दृष्टी

रक्तातील अतिरिक्त साखरेमुळे, डोळ्यातील लहान रक्तवाहिन्या खराब होतात. ज्यामुळे दृष्टी अंधुक होऊ शकते. ही अस्पष्ट दृष्टी एक किंवा दोन्ही डोळ्यांमध्ये येऊ शकते. जर डायबेटीसने ग्रस्त व्यक्ती उपचाराशिवाय राहिली तर या रक्तवाहिनांचे अधिक गंभीर नुकसान सुद्धा होऊ शकते.

Diabetes Symptoms In Marathi

जखमा हळूहळू बऱ्या होणे

उच्च साखरेची पातळी, शरीराच्या नसा आणि रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवू शकते. ज्यामुळे रक्त परिसंचारण बिघडू शकत. परिणामी लहान जखमा देखील बऱ्या होण्यासाठी आठवडे किंवा महिने सुद्धा लागू शकतात.

पुरुष आणि महिलांच्या मधुमेहाच्या लक्षणांमधील फरक

डायबेटीसची लक्षणे ही फक्त प्रकारानुसार बदलत नसून लिंगानुसार ती देखील बदलली जातात. जरी मधुमेहाची बहुतेक चिन्हे आणि लक्षणे पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी सामान्य आहेत, परंतु काही लक्षणे अपवाद आहेत.

कमी स्नायू वस्तुमान आणि शक्ती स्थापना, बिघडलेली कार्य, कमी कामवासना ही लक्षणे पुरुषांमध्ये दिसून येतात. तर कोरडी आणि खाज सुटणारी त्वचा, मूत्रमार्गात संक्रमण आणि यीस्ट इन्फेक्शन यासारखी लक्षणे स्त्रियांमध्ये आढळून येतात,

मधुमेहाचे निदान करण्यासाठी चाचण्या

डायबेटीसची लक्षणे दिसल्यास ताबडतोब तपासणी करणे महत्वाचे आहे. सहसा, गरोदर महिलांची गर्भधारणेच्या दुस-या किंवा तिसऱ्या तिमाहीत मधुमेहाची तपासणी केली जाते. मधुमेहाचे निदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही नेहमीच्या वैद्यकीय चाचण्या खालीलप्रमाणे आहेत.

ग्लुकोज चॅलेंज चाचणी

या चाचणी अंतर्गत, साखरयुक्त द्रव खाल्ल्यानंतर एक तासाने तुमची रक्तातील साखर तपासली जाते.

A1C चाचणी

ही चाचणी मागील दोन किंवा तीन महिन्यांतील तुमच्या रक्तातील ग्लुकोजची सरासरी पातळी मोजते.

3-तास ग्लुकोज सहिष्णुता चाचणी

या चाचणी अंतर्गत, रात्रभर उपवास केल्यानंतर तुमच्या रक्तातील साखरेची चाचणी केली जाते. त्यानंतर, तुम्हाला एक साखरयुक्त द्रव प्यायला दिला जातो आणि तुमच्या रक्तातील साखरेची तपासणी दर तासाला एकदा, तीन तासांसाठी केली जाते.

फास्टिंग प्लाझ्मा ग्लुकोज (FPG) चाचणी

ही चाचणी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी ठरवते आणि साधारणपणे आठ तासांच्या उपवासानंतर केली जाते.

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी घरगुती उपाय

आज आपण डायबेटीसवर घरगुती पद्धतीने आहारा द्वारे कसे उपचार करू शकतो, याबद्दल माहिती घेणार आहोत. चुकीची आहार पद्धती, चुकीची लाईफ स्टाईल, अनियंत्रित खाणे, लठ्ठपणा, स्ट्रेस आणि अनुवांशिकता अश्या काही कारणांमुळे डायबिटीज म्हणजेच मधुमेह होतो.

डायबेटीस हा रोग नाही, डायबेटीस एक रोग नसून हा एक लाइफस्टाइल मेटबॉलिक डीसोर्डर आहे.  आणि नैसर्गिक पद्धतीने आपण यावर नक्कीच नियंत्रण मिळवू शकतो. आज आपण अशाच काही सोप्या पद्धती बघणार आहोत.

  • डायबेटीस अर्थात मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोरफड किंवा एलोवेरा देखील अत्यंत प्रभावी ठरत. त्यामुळे रक्तातील साखर किंवा ग्लुकोज नियंत्रणात येण्यास मदत होते. त्याचबरोबर जखम देखील लवकर बरी होण्यास मदत होते. ताज्या कोरफडीचा रस किंवा जेल ताकाबरोबर घेतल्याने, नक्कीच फायदा होतो.
  • काबुली चणे सुद्धा डायबेटीसवर अत्यंत परिणामकारक ठरतात. त्यात असे काही घटक आहेत, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. यात भरपूर प्रमाणात फायबर, आयन, मॅग्नेशियम, फॉलेट आणिविटामिन बी सिक्स आहे. त्याचबरोबर याच ग्लासेमिक्स कोर्स सुद्धा कमी आहे. त्यामुळे डायबिटीज बरोबर हृदयविकारावर सुद्धा हे खूपच उपयुक्त ठरतं. आपण नियमित काबुली चण्यांचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे. तसंच रात्री काबुली चणे भिजत घालावेत आणि सकाळी त्याच पाणी नियमित पिल्याने आपल्या रक्तातील साखर आणि ग्लुकोज नियंत्रण राहण्यास मदत होईल.
  • कडुलिंबाची पाने डायबेटीस वर अत्यंत परिणामकारक ठरतात, ज्यांना अनुवंशिक डायबिटीस किंवा हेरिटेटरी डायबिटीस टाळायचा असेल, त्यांनी रोज सकाळी कडुनिंबाची दहा ताजी पानं चावून चावून खाल्ली पाहिजेत. याने त्यांच्या रक्तातील साखर तर नियंत्रणात राहीलच, पण त्याचबरोबर वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत होईल. आपण कडूलिंबाची चटणी देखील करून खाऊ शकतो. त्यात थोडसं धने, जिरं, मिरं, कांदा, लसूण, घालून आपण चटणी बनवली तर ती चटणी डायबेटीस वर अत्यंत परिणामकारक ठरते.
  • डायबिटीज वर आंब्याच्या झाडाची कोवळी पान खूपच गुणकारी ठरतात. त्याने कार्य सुधारतं आणि त्यामुळे इन्सुलिनच सेक्रेशन चांगलं होतं. आंब्याची पानं रात्रभर दीड कप पाण्यात भिजत घालावी आणि सकाळी ती पानं कुसकरून त्याचं पाणी प्यावं, याने डायबिटीस मध्ये फायदा होतो. आपण आंब्याची कोवळी पानं सावलीत सुकवून त्याच चूर्ण हि करू शकतो. मग हे चूर्ण दिवसातून दोन वेळा अर्धा अर्धा चमचा पाण्यातून किंवा ताकातून घेतल्याने, सुद्धा डायबिटीस नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • आवळ्याची पूड, जांभळाची पूड आणि कारल्याची पूड, हे तिन्ही समभाग म्हणजेच सम कॉन्टिटी मध्ये घेऊन एकत्र करून ठेवावं आणि मग दिवसातून दोन वेळा एक एक चमचा ही पूड पाण्याबरोबर किंवा ताकाबरोबर घेतल्याने, डायबिटीस नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
  • डायबेटीस वर ड्राय फ्रुट्स जसे कि, अक्रोड, बदाम, मनुके, देखील खूपच परिणामकारक ठरतात. यात फायबर मॅग्नेशियमचे प्रमाण खूपच जास्त आहे. त्यामुळे हृदयविकारावर सुद्धा ते खूपच परिणामकारक ठरतात. पण आपण ड्रायफ्रूट्स प्रमाणातच खाल्ले पाहिजेत. आपण दोन भिजवलेले बदाम, एक अक्रोड आणि तीन मनुके दिवसातून तीन वेळा पण खाल्ले पाहिजेत. आपण आपल्या आहारात फायबरचं प्रमाण वाढवलं पाहिजे.
  • आपण नियमित फळे, कच्च्या भाज्या, सॅलड, यांचा समावेश आपल्या आहारात केला पाहिजे आणि मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर केला पाहिजे. तसंच नियमित व्यायाम आणि योग देखील करणं खूपच गरजेचे आहे. तर मग फक्त काळजी करत राहण्यापेक्षा, आपल्या आहार विहाराची काळजी घ्या आणि आपला आरोग्य उत्तम ठेवा.

मधुमेह रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी ?

भारतात आणि जगभरात सुद्धा डायबेटीसच प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे. चुकीची आहार पद्धती, चुकीची लाईफ स्टाईल, अनियंत्रित खाणे, लठ्ठपणा, स्ट्रेस आणि अनुवांशिकता अश्या काही कारणांमुळे डायबिटीज म्हणजेच मधुमेह होतो.

डायबेटीस एक रोग नसून हा एक लाइफस्टाइल मेटबॉलिक डीसोर्डर आहे.  डायबेटीसमुळे शरीरातील अनेक संस्थांचे कार्य बिघडतं, डायबिटीसमुळे वजन वाढतं, तहानभूक जास्त लागते, लघवी जास्त लागते, पोट साफ होत नाही, जखम लवकर भरून येत नाही, त्वचेवर आणि जननेंद्रियंवर खाज येते आणि असे अनेक प्रकारचे त्रास होऊ लागतात.

त्याच बरोबर हृदय विकार, किडनी फेलरपणा, या सर्वांशी शक्यता देखील वाढते. जर आपण आपल्या लाईफस्टाईल मध्ये, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीन मध्ये, जर काही चेंजेस केले तर डायबिटीज आपण नक्कीच नियंत्रणात ठेवू शकतो.

  • डायबिटीज वर दालचिनी खूपच परिणामकारक ठरते. दालचिनी मध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी इंफ्लेमेंटरी तसेच यात ओमेगा ३, ६, ९ फॅटी ऍसिड प्रॉपर्टीज आहेत. त्याचबरोबर दालचिनी घेतल्याने पचन सुद्धा नीट होण्यास मदत होते आणि वजन आणि कोलेस्ट्रॉल देखील दालचिनी नियमित घेतल्याने नियंत्रणात राहण्यास मदत होते. आपण दालचिनीची पूड आपल्या अन्नपदार्थांवर घालून खाऊ शकतो किंवा अर्धा अर्धा चमचा ही पूड दिवसातून दोन वेळा कोमट पाण्याबरोबर घेतल्याने, सुद्धा फायदा होतो.
  • तसेच फ्लेक्स सीड्स किंवा अळशी सुद्धा डायबिटीज वर अत्यंत परिणामकारक ठरते. यात भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सीडेंट आणि ओमेगा ३ फॅटी ऍसिड प्रॉपर्टीज आहेत. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. अळशी खाल्याने आपल्या रक्तातील ग्लुकोज किंवा साखरेचे प्रमाण तर नियंत्रणात राहतच, पण त्याचबरोबर आपल्या हृदयाचं आणि आपल्या किडनीच कार्य देखील सुधारतं आणि आपलं वजन आणि कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे आपण रोज दिवसातून दोन वेळा, अर्धा अर्धा चमचा अळशीची पूड गरम पाण्यातून घेतली पाहिजे. आपण अळशीची पुड आपल्या अन्नपदार्थांवर टाकून सुद्धा खाऊ शकतो
  • मधुपणी वनस्पती देखील डायबिटीस वर खूपच गुणकारी ठरते.यात अँटी ऑक्सिडन्ट, अँटी बॅक्टेरियल, अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे ते शरीरातील इन्सुलीनच सिक्रीशन सुधारतात आणि त्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्याचबरोबर ते बीपी, कॉलेस्टॉल आणि ऍसिडिटी सुद्धा नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि पचन सुद्धा नीट होतं. शिवाय ही एक गोड वनस्पती आहे, म्हणून ज्यांना डायबिटीस आहे, त्यांनी गोड पदार्थांमध्ये साखरे ऐवजी याचा वापर केला पाहिजे. त्याने त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणार नाही. उलट त्याचे फायदे त्यांना होतील.
  • आपण आपल्या आहारामध्ये कच्च्या पालेभाज्या, मोड आलेले कडधान्य आणि ताक यांचा समावेश नियमित केला पाहिजे. त्याने इन्सुलिनचा कार्य सुरळीत राहतं. तसेच जास्त तेलकट गोड, बाहेरचे रेडिमेड प्रोडक्ट्स, कोल्ड्रिंक, आणि अल्कोहोल या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. त्याचबरोबर मिठाचे प्रमाण देखील कमी केले पाहिजे. आपण मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करू शकतो.
  • डायबिटीस नियंत्रणात राहण्यासाठी नियमित व्यायाम, चालणं आणि योगा खूपच गरजेचे आहे. त्याने रक्तातील साखर तर वापरली जातेच, पण त्याचबरोबर आपलं वजन देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच स्ट्रेस किंवा जास्त चिंता किंवा ताण घेतल्याने, सुद्धा डायबिटीस वाढवू शकतो. त्यामुळे स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण मेडिटेशन किंवा डीप ब्रीदिंग करू शकतो.
  • तर मग जर डायबिटीस नियंत्रणा ठेवायचा असेल तर, स्ट्रेस आणि वजन हे नियंत्रणात ठेवणं खूपच गरजेचे आहे. त्याचबरोबर योग्य आहार घेणं, नियमित व्यायाम करणे, देखील तितकच महत्त्वाचा आहे. तर मग फक्त काळजी करत राहण्यापेक्षा, आपल्या लाईफस्टाईल मध्ये काही चेंजेस करा. योग्य आहार घ्या आणि आपली तब्येत सांभाळा.

मधुमेह आणि आहार नियोजन

दर १० माणसांमध्ये चार माणसांना मधुमेहाची समस्या असते. खूप कमी कुटुंब अशी आहेत जिथे हा आजार दिसत नाही. मित्रांनो भारत देशात मधुमेहांची संख्या खूप जास्त आहे.

जगातील मधुमेहाची राजधानी म्हणून भारताला बघितल जाते. पूर्वी मधुमेह म्हटलं की, खूप तुरळ असे पेशंट असायचे, आता बदलत्या जीवनशैलीत हा आजार खूप झपाट्याने वाढत आहे.

योग्य आहारामुळे डायबिटीस तसेच प्री डायबिटीस रुग्णांमध्ये रक्तातील वाढलेले साखरेचे नियंत्रण, हे शंभर टक्के करता येते. तसेच संतुलित आहार असेल तर, वजन सुद्धा नियंत्रणात ठेवण्यात मदत होते. मित्रांनो मधुमेहामुळे होणारे इतर आजार सुद्धा आपण नियंत्रणात आणू शकतो.

यासाठी तुम्हाला गरज असते ती योग्य आहाराची. मधुमेह व्यक्तींचा आहार कसा असावा याची माहिती आपण बघणार आहोत. चला तर मग आपण जाणून घेऊयात.

Diabetes

मधुमेह रुग्णांनी काय खायला हवे ?

  • मित्रांनो ओमेगा थ्री फॅटी ऍसिड चे प्रमाण हे डायबिटीस रुग्णांच्या जेवणात जास्त प्रमाणात असायला हवे. यामुळे जे होणारे हार्ट अटॅक, पक्षाघात म्हणजेच स्ट्रोक, यासारख्या गंभीर समस्येपासून हे रुग्ण दूर असतात. तर आता ओमेगा थ्री फॅटी ऍसिड चे प्रमाण कोणत्या घटकात जास्त असते, तर सुकामेवा. सुकामेव्यात शेंगदाणे, बदाम, अक्रोड, काजू, यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड चे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते.
  • जवस यामध्ये सुद्धा ओमेगा थ्री ऍसिडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. मित्रांनो बऱ्याच वेळेस नॉनव्हेज बद्दल शंका असते तर, तुम्ही मासे खाऊ शकतात. नॉनव्हेज मध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप कमी प्रमाणात असते. जवळपास नसतेच. यामध्ये प्रोटीनचे मोठे प्रमाण असते. त्यामुळे तुम्ही नॉनव्हेज मध्ये मासेही खाऊ शकतात.
  • फायबर्स म्हणजेच तंतुमय पदार्थ हे पदार्थ अत्यंत उपयोगी असतात. यामुळे शरीरातील साखर नियंत्रणात तर राहतेच, तसेच हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी होतो. आता फायबर्स मध्ये कोणकोणते घटक येतात ? यामध्ये हिरवे पालेभाज्या, फळभाज्या, ताजी फळे, कमी पॉलिश केलेले तांदूळ, हे यामध्ये समाविष्ट असतात. तर मित्रांनो सफरचंद, स्ट्रॉबेरी, जांभूळ, आवळा, संत्री, मोसंबी, डाळिंब, कलिंगड, फणस, ही फळे तुम्ही खाऊ शकतात.
  • शेंगवर्गीय भाज्यांमध्ये तुम्ही गवार, कारले, भेंडी, दुधी भोपळा, या प्रकारची फळे फळभाज्या किंवा शेंग भाज्या तुम्ही खाऊ शकतात.
  • आता चटणी प्रकारात तुम्ही जवसाची चटणी, तिळाची चटणी, लसूण यांची चटणी तुम्ही आहारात नक्की घेऊ शकतात.
  • कडधान्यांमध्ये तुम्ही मूग, मटकी, उडीद, चवळी, यांचा समावेश तुमच्या जेवणात नक्की करावा. यामध्ये प्रोटीनचे मोठे प्रमाण असते. त्यामुळे कडधान्य तुम्ही तुमच्या जेवणात नेहमी आणि रोज असावी.
  • मित्रांनो सर्वात महत्त्वाचे आणि खूप इम्पॉर्टंट ते म्हणजे तुम्ही पुरेसे पाणी नक्की प्यायला हवे. दिवसातून चार ते पाच लिटर पाणी तुम्ही नक्की प्यायला हवे. मित्रांनो एक तुम्ही लक्षात ठेवा. मधुमेह व्यक्तींनी एकाच वेळेस भरपेट जेवणापेक्षा दिवसात चार वेळेस जेवणे हे कधीही सोयस्कर आणि चांगले मानतात.

डायबिटीस रुग्णांनी काय खाऊ नये ?

पाम तेल, तूप, साय, लोणी, अंड्यातील जो पिवळा पदार्थ असतो जो पिवळा बलक असतो, तो रुग्णांनी खाऊ नये, तर साखरेचे गोड पदार्थ, गुळ, मध, मिठाई, खव्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, केक, ब्रेड, बिस्किट पाव आणि मेदमय पदार्थ टाळावे हे बिलकुलच खाऊ नये.

मित्रांनो डायबिटीस रुग्णांनी चहा, कॉफी, अशी पेय ज्यामध्ये साखरेचा वापर जास्त आहे ही टाळावी. मिठाचे प्रमाण जेवणात खूप कमी असावे. वरतून मीठ घेऊच नये. कोल्ड्रिंक्स पियू नये.

FAQ

१. मधुमेह रुग्णांना कोणता त्रास होतो ?

भारतात आणि जगभरात सुद्धा डायबिटीसच प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे. चुकीची आहार पद्धती, चुकीची लाईफ स्टाईल, अनियंत्रित खाणे, लठ्ठपणा, स्ट्रेस आणि अनुवांशिकता अश्या काही कारणांमुळे डायबिटीज म्हणजेच मधुमेह होतो. डायबेटीस एक रोग नसून हा एक लाइफस्टाइल मेटबॉलिक डीसोर्डर आहे.  डायबिटीसमुळे शरीरातील अनेक संस्थांचे कार्य बिघडतं, डायबिटीसमुळे वजन वाढतं, तहानभूक जास्त लागते, लघवी जास्त लागते, पोट साफ होत नाही, जखम लवकर भरून येत नाही, त्वचेवर आणि जननेंद्रियंवर खाज येते आणि असे अनेक प्रकारचे त्रास होऊ लागतात. त्याच बरोबर हृदय विकार, किडनी फेलरपणा, या सर्वांशी शक्यता देखील वाढते.

२. मधुमेह रुग्णांनी काय खावे ?

मित्रांनो ओमेगा थ्री फॅटी ऍसिड चे प्रमाण हे डायबिटीस रुग्णांच्या जेवणात जास्त प्रमाणात असायला हवे. यामुळे जे होणारे हार्ट अटॅक, पक्षाघात म्हणजेच स्ट्रोक, यासारख्या गंभीर समस्येपासून हे रुग्ण दूर असतात. तर आता ओमेगा थ्री फॅटी ऍसिड चे प्रमाण कोणत्या घटकात जास्त असते, तर सुकामेवा. सुकामेव्यात शेंगदाणे, बदाम, अक्रोड, काजू, यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड चे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते.
जवस यामध्ये सुद्धा ओमेगा थ्री ऍसिडचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. मित्रांनो बऱ्याच वेळेस नॉनव्हेज बद्दल शंका असते तर, तुम्ही मासे खाऊ शकतात. नॉनव्हेज मध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप कमी प्रमाणात असते. जवळपास नसतेच. यामध्ये प्रोटीनचे मोठे प्रमाण असते. त्यामुळे तुम्ही नॉनव्हेज मध्ये मासेही खाऊ शकतात.

३. मधुमेह रुग्णांचा आजार कसा असावा ?

योग्य आहारामुळे डायबिटीस तसेच प्री डायबिटीस रुग्णांमध्ये रक्तातील वाढलेले साखरेचे नियंत्रण, हे शंभर टक्के करता येते. तसेच संतुलित आहार असेल तर, वजन सुद्धा नियंत्रणात ठेवण्यात मदत होते. मित्रांनो मधुमेहामुळे होणारे इतर आजार सुद्धा आपण नियंत्रणात आणू शकतो. यासाठी तुम्हाला गरज असते ती योग्य आहाराची.

मधुमेह बरा होऊ शकतो का?

रुग्णाला कोणत्या प्रकारचा मधुमेह आहे यावर ते अवलंबून असते. काही प्रकरणांमध्ये, मधुमेह इन्सिपिडस बरा होऊ शकत नाही परंतु औषधोपचाराने व्यवस्थापित केला जाऊ शकतो.

मधुमेही स्त्री गर्भवती होऊ शकते का?

होय, मधुमेही महिलेला गर्भधारणा होऊ शकते, कारण मधुमेहाचा गर्भधारणेसाठी जबाबदार संप्रेरकांवर परिणाम होत नाही.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास मधुमेहाची लक्षणे, मधुमेह नियंत्रणासाठी कोणते घरगुती उपचार आहेत व मधुमेह रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment