मोर पक्षी माहिती मराठी Peacock In Marathi – सर्व पक्षात मोर पक्षी सुंदर व रुबाबदार पक्षी आहे. हिरे जडवल्यासारखे पंख, निळी मान, डोक्यावर नाजूक तुरा, लांब पिसारा, ऐटीत चालणे, तेजस्वी डोळे पाहिल्यावर पाहताच राहावे असे वाटते. मोराचा फुललेला पिसारा तरी फारच सुंदर. मोराचा थाटच वेगळा असतो.
मियाऑ मियाऑ असा त्याचा आवाज पुन्हा पुन्हा ऐकावा वाटतो. आकाशात ढग आल्यावर, मोर पिसारा फुलवून नाचतो व ओरडतो. अनेक कवीनी मोरावर कविता केल्या आहेत. मोराला सरस्वतीचे वाहन मानतात. मोर हिरवी दाट झाडी मध्ये राहण्यासाठी पसंत करतो.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास मोरा बद्दल माहिती दिलेली आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
मोर पक्षी माहिती मराठी Peacock In Marathi
मोराचा परिचय
पक्ष्याचे नाव | मोर |
मोराची लांबी | १००–११५ सेंमी |
मोराचे वजन | ४–६ किलो |
मोराचे अन्न | झाडाची पाने, किडे, साप, सरडे,आळी आहे. ते काही फळेही खातात. |
मोराचा आवाज | केकारव |
मोराचे वास्तव्य | मोर पानझडी जंगलांत व अरण्यात राहतात व ते रात्री आसऱ्यासाठी झाडांवर जातात. |
लांडोर म्हणजेच मोराची मादी लांबी | ९५ सेंमी |
मादीचे वजन | २.७५–४ किलो |
मोराची नावे
मोर पक्षी माहिती मराठी Peacock In Marathi – मोराचे सुंदर हिरवे निळे पंख, त्याच्या डोक्यावर असलेला सुंदर तुरा पाहून कोणीही मोराच्या मोहात पडल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच मोराला पक्षांचा राजा म्हटलं जातं.
मोर कुकुटवर्गीय पक्षी असून त्यांचे वैज्ञानिक नाव पावो क्रीस्टेटस अस आहे. इंग्रजीत मोराला पिकॉक म्हटल जात. तर संस्कृत मध्ये मयूर नावाने तो ओळखला जातो.
हे वाचा –
मोराची ओळख
देशाच्या प्रत्येक भागात सापडणारा, नागरिकांना माहिती असलेला आणि भारतीय संस्कृतीच्या हिस्सा असलेला मोर पक्षी शांती आणि सौंदर्याचे प्रतीक असल्याने २६ जानेवारी १९६३ रोजी देशाच्या राष्ट्रीय पक्षी म्हणून मोराची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे भारता प्रमाणेच म्यानमार व श्रीलंका देशाच्या राष्ट्रीय पक्षी देखील मोरच आहे.
विशेष म्हणजे मोराचे संदर्भ प्राचीन काळापासून पहावयास मिळतात. हिंदू देवता श्रीकृष्णांच्या डोक्यावर मोरपीस विराजमान आहे. तर सरस्वती देवी व कार्तिक याचे वाहन देखील मोर पक्षीच आहे.
सम्राट अशोक व मौर्य राजांच्या नाण्यावर मोर कोरलेले आढळतात. तर खुद्द शहाजहान बादशहा मयूर सिंहासनावर बसत असे. मोर हा मुळचा भारतीयच आहे. अलेक्झांडरने भारतातून मोर त्याच्या देशी नेले.
मोराचे निवासस्थान
विविध देशात मोराच्या विविध प्रजाती निर्माण झाल्याचे सांगितले जाते. मोराचे वास्तव सामान्यपणे दाट झुडपांमध्ये आणि विशेष करून नदी व ओढा यांच्या किनाऱ्याला असते.
विशेष म्हणजे एका मोराबरोबर बहुदा दोन-तीन लांडोरी राहतात. दिवसभर खाद्य शोधत फिरून रात्रीचे एखाद्या मोठ्या झाडावर विसावतात.
मोराचे शत्रू
कोल्हा वाघ व रानमांजर हे मोराचे नैसर्गिक शत्रू आहेत. हे प्राणी शिकारीसाठी बाहेर पडल्याचे दिसताच मोर पक्षी ओरडून इतर साथीदारांना सावध करतात.
मोराचा आहार
मोर पक्षी साप, उंदीर, सरडे, पाली, किडे, खातोच. त्यासोबत तो धान्यही खात असतो. मोर मुळात वन्यपक्ष असून अन्नाच्या शोधात तो मानवी वस्तीत बहुदा आढळून येत असतो.
मोराचा आयुःकाळ
साधारणतः वयाची २५ ३० वर्षापर्यंत मोर पक्षी जीवन जगत असतो.
मोराचे वर्णन
मोर पक्षी चमकदार, हिरवट निळ्या रंगाचे असतात. त्यांना लांब अशी सुंदर मान असते. त्यांच्या लांब पिसांवर चंद्रसारखे ठिपके असून, ते हिरव्या, निळ्या, पिवळ्या आणि सोनेरी रंग छटांचे असतात. त्यांना लांब पाय आणि तुरा असतो व त्यांची मान गळद निळ्या रंगाची असते.
नराला शेपटी भोवती पिसारा असतो. त्याच्या शेपटीला झाकणारी पिसे लांब असून, त्यापासून तयार झालेला पिसारा ९० ते १२० सेंटिमीटर लांबीचा असतो. त्यात सुमारे २०० पिसे असतात.
बहुतेक पिसांच्या टोकावर डोळा असून, त्याच्या मध्यभागी जांभळट काळ्या रंगाचा हृदयाकृती मोठा ठिपका असतो व त्या भोवती निळ्या रंगाने वेढलेले बिरंगी रंगाचे वलय असते.
मोराचे पाय बळकट असून, त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या बोटावर तीक्ष्ण शुंडीका असते. दोन मोरांमध्ये भांडण झाले की या शुंडीकेच्या सहाय्याने ते एकमेकांवर हल्ला करत असतात.
मोर व लांडोरचा प्रजनन कालावधी
मोराचे एक मुख्य आकर्षण म्हणजे पाऊस पडला की तो सुंदर पिसारा फुलून नृत्य करू लागतो. तसेच प्रणयाराधनाच्या वेळी मोर पिसारा ताठ करून पिसारा थरथवीत लांडोरी समोर नाचतो, त्यासोबत तो केकराव करतो आणि मादीला आकर्षित करत असतो.
मिलन काळा नंतर मोराच्या शेपटीवरचे पिसे गळून पडतात. विशेष म्हणजे मोराच्या नाचण्याचा कालावधी व पिसांची संख्या यानुसार लांडोर मोराची निवड करत असते.
विशेष म्हणजे लांडोर घरटी घालत नाही तर ती जमिनीवर अंडी देत असते. विशेष म्हणजे एका वेळी ३ ते ५ अंडी जमिनीवर घालते व २८ दिवसांनी अंड्यातून पिल्लू बाहेर येत असते.
मोराची मादी लांडोर
मोराच्या मादीला लांडोर म्हटले जातं. लांडोर आकर्षक दिसत नाही. कारण तिला मोराप्रमाणे पिसारा नसतो. ती आकाराने लहान असून तपकिरी रंगाची असते.
लांडोर कडे रंगीबेरंगी पिसे नसतात. तिचे पाय ओबडधोबड असून कुरूप असतात. लांडोर चे डोके बेरंगी रंगाचे असून, तिच्याही डोक्यावर नराप्रमाणे तुरा असतो. तर लांडोर आकारानी लहान असतात त्यांची लांबी साधारणतः ९५ सेंटीमीटर आणि वजन ४ किलो पर्यंत असते.
मोराची लांबी
मोराचा पूर्ण वाढलेला पिसारा १९५ ते २२५ सेंटिमीटर लांबीच्या असू शकतो. तर चोची पासून शेपटीपर्यंत त्यांची लांबी १०० ते ११५ सेंटीमीटर असते.
मोराचे वजन
मोराचे वजन साधारणतः ४ ते ६ किलो असते.
मोर पंखाचा वापर
मोर पक्षी पंखाचा वापर मुकुट, सिंहासन, शाईचे मजकूर लिहिण्यासाठी अश्या अनेक प्रकारे होताना दिसून येतो. तसेच मोर पक्षी शुभ व शांतीचे प्रतिक आहे म्हणून बहुतांश लोक घरात मोरपंख ठेवतात.
मोर पक्षी माहिती मराठी
मोर पक्षी भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे, मोर पक्षी हा पृथ्वीवरील सर्वात सुंदर पक्षी आहे. त्याचे पंख निळे असतात. मोराच्या मादीला लांडोर म्हणतात. ती मोरापेक्षा छोटी असते. मोर हा पक्षी सर्व पक्षात खूपच सुंदर आहे. त्यामुळे त्याला पक्षांचा राजा असे देखील म्हटले जाते.
पावसाळी ढग दाटून आले की, मोर नाचायला सुरुवात करतो. पाऊस येताच मोर पिसारा पुरवून नाचू लागतो. मोराच्या डोक्यावर एक तुरा असतो. नाचणारा मोर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो. मोर पक्षी संपूर्ण भारतात आढळतात. पावसाळ्यात मोर नाचतो.
मोराची पिसे हिरवट, निळ्या रंगाची असतात. मोराचे पाय लांब आणि कुरूप असतात. मोराची लांबी सुमारे एक मीटर असते.
लांडोरचा रंग तपकिरी आणि मोरापेक्षा आकाराने लहान असतो. मोराच्या पंखांवर निळे डाग असतात. मोराची मान खूप लांब असते आणि मोराला धान्य खायला आवडतात. मोर पक्षी हा भारत, म्यानमार, श्रीलंका, अशा फार कमी देशांमध्ये आढळतो.
काश्मीर, आसाम, मिझोराम आणि पूर्व भारतीय द्वीपकल्पातील काही भागात मोर जास्त प्रमाणात आढळतात.
२६ जानेवारी १९६३ रोजी भारत सरकारद्वारे मोर पक्षी हा भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आला आहे. पौराणिक कथेतही मोराचा उल्लेख आहे आणि त्याला कार्तिकेचे वाहन मानले जाते. भगवान श्रीकृष्णाने डोक्यावर मोराचे पिसे घातले होते.
हिंदू धर्मात मोर पक्षी हा अतिशय पवित्र मानला जातो, कारण लोक त्यांच्या घरात समृद्धी आणण्यासाठी मोराची पिसे लटकवतात. मोराच्या पंखांचा वापर काही डिझाईन आणि सजावट, कानातले यामध्ये देखील केला जातो. मोराच्या पंखांनी बनवलेले दागिने हे देखील खूप लोकप्रिय आहेत.
मोर पक्षी हे लाजाळू स्वभावाचे असतात, असे म्हणतात. ते लोकांना टाळतात आणि त्याकडे पाहणाऱ्या लोकांपासून इतर ठिकाणी लपण्याचा प्रयत्न करतात. मोराच्या काही प्रजाती आहेत, ज्यांचा रंग त्यांच्या पिसांसह पूर्णपणे पांढरा दिसतो.
मोर पक्षी हे अतिशय सतर्क असतात. कोणत्याही प्रकारच्या धोका जाणवला की, ते आपल्या मूळ कुटुंबातील इतर सदस्यांना सावध करण्यासाठी ओरडू लागतात.
मोराचे आयुष्य जवळपास २० ते २५ वर्षांच्या असते आणि त्यांचे वजन तीन ते पाच किलोच्या दरम्यान असते. मोरांच्या कळपात एक मोर आणि तीन ते चार मादी मोर असतात.
मादी मोर पक्षी वर्षातून दोनदा अंडी घालते. शिकारी टाळण्यासाठी मोर पक्षी झाडांवर बसतात, मोर पक्षीहवेत उडू शकतात पण ते जास्त काळ हवेत उडू शकत नाहीत. मोरांना जमिनीवर फिरायला आवडते. मोर हा आपल्या भारत देशाचा अभिमान आहे.
मोरावर आधारित कविता
मोरा रे मोरा
मोरा रे मोरा
काय तुझा तोरा
रंगीत पिसारा
डोक्यावर तुरा
बघ वर बघ
काळे काळे ढग
एक पाय दुमडून
पिसारा फुलवून
नाच तर खरा
मोरा रे मोरा
नाच रे मोरा
नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच !
ढगांशि वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !
झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !
थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !
पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान, सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच !
मोर पक्षाबद्दल १० ओळी
- मोर ज्याला इंग्रजी मध्ये पीकॉक म्हणतात. हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि हा संपूर्ण भारतात आढळतो. मोर हिरव्या आणि लाल रंगाचे असतात. त्याची मान आणि छाती निळ्या रंगाची असते.
- मोराच्या शेपटीमध्ये खूप सारे पिसे असू शकतात. या पिसांना मोरपीस म्हटले जाते. पिसांचा पुढचा भाग चंद्रासारखा असतो. एका मोराच्या शेपटीत १५० ते २०० पिसे असू शकतात.
- मोर हा भारतासह, म्यानमार देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. मोराच्या डोक्यावर हिरवा पिसारा असतो, त्याला मोराचा मुकुट देखील म्हटले जाते.
- मोराचे शरीर जरी सुंदर दिसत असले तरी, त्याचे पाय दिसण्यास लांब आणि कुरूप असतात. मोराचा आवाज कठोर असतो. पावसाच्या काळात मोर आपला पिसारा पसरून नृत्य करतो. मोराचें नृत्य मनमोहक असते.
- मोर हा नर असतो आणि मादीला मोरणी म्हटले जाते. मोरणी मोरा एवढी सुंदर नसते. तिच्याकडे पिसारा नसतो. मोराचे अन्न हे धान्याचे दाणे, झाडाची पाने, फळे, किडे, साप, पाल इत्यादी असते.
- मोराचा जीवनकाल २० वर्षापर्यंत असतो, त्यांचे वजन पाच किलो पर्यंत असू शकते. मोराचे वैज्ञानिक नाव पाव क्रीस्टेटस आहे. मोराच्या अति शिकारीमुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. भारत वन्यजीवनीय १९७२ नुसार मोराची शिकार करणे कायद्याने अपराध आहे.
- मोराच्या समूहात एक नर व तीन ते चार मादी मोरणी असतात. मोरणी प्रत्येक वर्षात दोन वेळा अंडी घालते. तसे पाहता मोराला हवेत उडता येते, पण इतर पक्ष्या प्रमाणे तो जास्त वेळ हवेत उडू शकत नाही, त्यामुळे तो जमिनीवरच राहतो व तेथेच आपले घरटे करतो.
- संस्कृत भाषेत मोराला मयूर म्हटले जाते. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये मोराचा उल्लेख केलेला मिळतो. मोराला भगवान शंकर जी चे पुत्र कार्तिकीयेचे वाहन म्हटले गेले आहे. याशिवाय भगवान कृष्णाच्या डोक्यावर पण मोरपीस लावलेला असतो.
- भारत देशाबरोबर मोर हा नेपाळ, भूतान, पाकिस्तान, या देशांमध्ये आढळतो. मोराला पाऊस येण्याचे संकेत आधीच लक्षात येऊन जातात. जेव्हा मोराचे प्राण संकटात असतात, तेव्हा ते मोठ्याने आवाज करतात.
- कुत्रा मांजर यांसारख्या प्राण्यापासून मोराला धोका असतो. मोर शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे भोजन करतात. मोर व सापाच्या युद्धात मोर नेहमी जिंकतो. मोराला साप खायला फार आवडतात.
मोर या पक्षाबद्दल काही मनोरंजक तथ्ये
- १९६३ पासून मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले.
- मोरांच्या पंखाची लांबी ही साधारणतः पाच फूट इतकी आहे व तो पृथ्वीवर सगळ्यात मोठ्या पक्षांमध्ये उडणाऱ्या पक्षांपैकी एक आहे.
- मोर या पक्षाची तीन प्रमुख प्रजाती आढळून येते.
- मोराच्या तिन्ही प्रमुख प्रजाती प्रामुख्याने आशियाच्या मूळ निवासी आहेत. परंतु ऑस्ट्रेलिया व आफ्रिका यांसारख्या देशाच्या काही भागांमध्ये सुद्धा मोर आढळून येतात.
- जेव्हा मोर पहिल्यांदा जन्म घेतात, त्यावेळी त्यांच्याकडे शेपूट नसते. ज्यावेळी त्यांचे वय हे तीन वर्षाचे होते, त्यावेळी त्यांच्यामध्ये सुंदरता निर्माण होऊ लागते.
- मोरे हवेत उडू शकतात. परंतु ते जास्त कालावधी पर्यंत हवेत उडू शकत नसल्यामुळे, ते जमिनीवर राहण्यास जास्त पसंती दर्शवतात. त्यामुळे ते अधिकत: उभयचर आहेत.
- शेती, उष्ण प्रदेश, ओढा, नदी या ठिकाणी मोर आपले निवास स्थान निर्माण करतात.
- प्रामुख्याने मोर भारत, श्रीलंका व ब्राम्हां मध्ये आढळून येतात.
- मोरांची पाळण्याची क्षमता ही साधारणतः १० मैल प्रति तास असते.
- इंग्लंड व जपान सारख्या देशांमध्ये मोरांना कैदेत ठेवले जाते, कारण त्यांना मोरांची प्रजाती ही टिकून ठेवायची आहे व त्यांची संख्या वाढवायची आहे, या कारणाने इंग्लंड व जपान यासारख्या सरकारने अशी सूचना काढली आहे.
- मोर सर्व भक्षी पक्षी आहेत. ते मुख्यतः फळ, फुल, मुंग्या, कीटक, अळी, धान्य, साप, इत्यादींचे सेवन करतात.
- मोरांना एकटाच राहणे आवडत नाही. त्यांना समूहामध्ये राहणे अधिक आवडते.
- साधारणतः एक मोर वर्षाला दोन अंडी देतो.
- मोर जास्त प्रमाणात दुपारच्या वेळी अंडी देणे अधिक पसंत करतात.
- वसंत ऋतु मध्ये मोरांना जास्त प्रमाणात स्वतःचे सोनेरी व मोरपंखी पंख पसरायला जास्त आवडते.
- प्रमाणात मोरांचा आकार पंख व रंग यावरून मादी मोराला निवडते.
- मोरांच्या पंखामध्ये साधारणतः १५० ते २०० पेक्षा जास्त पंख असतात.
- साधारणतः मोराचे आयुष्य पंधरा ते वीस वर्षांपर्यंत असते.
- नर मोर मादी मादी मोरा पेक्षा अधिक सुंदर असतात.
- मोर प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये आपले पंख त्याग करतो व त्यानंतर मोरांच्या शरीरामधून नवीन पंख निर्माण होतात.
- मोरांचे वर्णन प्राचीन ग्रंथांमध्ये जसे की बायबल व गीतामध्ये केले गेले आहे..
- मोर व मोरपंखांना धार्मिक दृष्ट्या अधिक महत्त्व आहे.
- मोरांचा आवाज हा कठोर असतो, परंतु मोर वेगवेगळ्या प्रकारे आवाज काढू शकता.
- मोराच्या डोक्यावर तुरा असतो, ज्याला मोराचा मुकुट संबोधले जाते व यामुळे मोराला पक्षांचा राजा म्हणून ओळख आहे.
FAQ
१. मोर पक्षाबद्दल १० ओळी लिहा.
१९६३ पासून मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले.
मोरांच्या पंखाची लांबी ही साधारणतः पाच फूट इतकी आहे व तो पृथ्वीवर सगळ्यात मोठ्या पक्षांमध्ये उडणाऱ्या पक्षांपैकी एक आहे.
मोर या पक्षाची तीन प्रमुख प्रजाती आढळून येते.
मोराच्या तिन्ही प्रमुख प्रजाती प्रामुख्याने आशियाच्या मूळ निवासी आहेत. परंतु ऑस्ट्रेलिया व आफ्रिका यांसारख्या देशाच्या काही भागांमध्ये सुद्धा मोर आढळून येतात.
जेव्हा मोर पहिल्यांदा जन्म घेतात, त्यावेळी त्यांच्याकडे शेपूट नसते. ज्यावेळी त्यांचे वय हे तीन वर्षाचे होते, त्यावेळी त्यांच्यामध्ये सुंदरता निर्माण होऊ लागते.
मोरे हवेत उडू शकतात. परंतु ते जास्त कालावधी पर्यंत हवेत उडू शकत नसल्यामुळे, ते जमिनीवर राहण्यास जास्त पसंती दर्शवतात. त्यामुळे ते अधिकत: उभयचर आहेत.
शेती, उष्ण प्रदेश, ओढा, नदी या ठिकाणी मोर आपले निवास स्थान निर्माण करतात.
प्रामुख्याने मोर भारत, श्रीलंका व ब्राम्हां मध्ये आढळून येतात.
मोरांची पाळण्याची क्षमता ही साधारणतः १० मैल प्रति तास असते.
मोर व मोरपंखांना धार्मिक दृष्ट्या अधिक महत्त्व आहे.
२. मोराचे थोडक्यात वर्णन करा.
मोर चमकदार, हिरवट निळ्या रंगाचे असतात. त्यांना लांब अशी सुंदर मान असते. त्यांच्या लांब पिसांवर चंद्रसारखे ठिपके असून, ते हिरव्या, निळ्या, पिवळ्या आणि सोनेरी रंग छटांचे असतात. त्यांना लांब पाय आणि तुरा असतो व त्यांची मान गळद निळ्या रंगाची असते. नराला शेपटी भोवती पिसारा असतो. त्याच्या शेपटीला झाकणारी पिसे लांब असून, त्यापासून तयार झालेला पिसारा ९० ते १२० सेंटिमीटर लांबीचा असतो. त्यात सुमारे २०० पिसे असतात. बहुतेक पिसांच्या टोकावर डोळा असून, त्याच्या मध्यभागी जांभळाट काळ्या रंगाचा हृदयाकृती मोठा ठिपका असतो व त्या भोवती निळ्या रंगाने वेढलेले बिरंगी रंगाचे वलय असते.
मोराचे पाय बळकट असून, त्याच्या मागच्या बाजूला असलेल्या बोटावर तीक्ष्ण शुंडीका असते. दोन मोरांमध्ये भांडण झाले की या शुंडीकेच्या सहाय्याने ते एकमेकांवर हल्ला करत असतात.
३. मोर पंखाचा वापर कश्यासाठी करतात ?
मोर पंखाचा वापर मुकुट, सिंहासन, शाईचे मजकूर लिहिण्यासाठी अश्या अनेक प्रकारे होताना दिसून येतो. तसेच मोर शुभदा व शांतीचे प्रतिक आहे म्हणून बहुतांश लोक घरात मोरपंख ठेवतात.
४. मोर काय खातो ?
मोर साप, उंदीर, सरडे, पाली, किडे, खातोच. त्यासोबत तो धान्यही खात असतो. मोर मुळात वन्य पक्षी असून अन्नाच्या शोधात तो मानवी वस्तीत बहुदा आढळून येत असतो.
५. मोराचा आयुःकाळ किती असतो ?
साधारणतः वयाची २५ ३० वर्षापर्यंत मोर जीवन जगत असतो.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास मोर या पक्ष्याबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेयर करा. धन्यवाद.