व्यायामाचे महत्त्व Importance Of Exercise In Marathi

व्यायामाचे महत्त्व Importance Of Exercise In Marathi – जगामधील मानवा जवळील सर्वात मौल्यवान अशी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे त्याचे आरोग्य होय. म्हणून इंग्रजी मध्ये “हेल्थ इज वेल्थ” म्हणजेच आरोग्य हीच संपत्ती आहे, ही प्रसिद्ध म्हण आहे.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात जगामध्ये प्रत्येकांना कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या आरोग्याच्या समस्या असतातच, या समस्येची निराकारण करण्यासाठी, अनेकांना व्यायाम हा उपाय सांगितला जातो. भारतामध्ये व्यायामाला प्राचीन काळापासूनच खूप महत्त्व आहे.

सकाळी सर्वच ऋषीमुनी आपल्या कुटीमध्ये आणि विद्यार्थी आपल्या गुरूंच्या आश्रमात जाऊन नियमित व्यायाम करीत असे म्हणून, त्यांना कोणतेही प्रकारचे आरोग्याच्या समस्या किंवा रोग होत नसे.

दैनंदिन जीवनामध्ये व्यायाम खूप महत्त्वाच आहे. आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास व्यायामाचे महत्व दिले आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

व्यायामाचे महत्त्व

हे वाचा –

व्यायामाचे महत्त्व Importance Of Exercise In Marathi

अर्ध्या तासाच्या व्यायामाने बर्न होणारी कॅलरी

एरोबिक व्यायाम 260 कॅलरी
मैदानी खेळ 250 गॅलरी
अर्धा तास चालणे 200 कॅलरी
पोहण्याचा व्यायाम 280 कॅलरी
अर्धा तास सायकलिंग करणे 330 कॅलरी

व्यायामाचे महत्व

व्यायामाचे महत्त्व Importance Of Exercise In Marathi – मनुष्य तेव्हा सुखी राहू शकतो, जेव्हा त्याचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त असते. स्वस्थ शरीरासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.

एक निरोगी शरीर प्राप्त करण्यासाठी, व्यायामाचे महत्त्व भरपूर आहे. नियमित व्यायाम केल्याने, शारीरिक सुखासोबत मनुष्याला मानसिक संतुष्टीची प्राप्ती होते. कारण व्यायाम केल्याने त्याचे मन प्रफुल्ली, उत्साह पूर्ण आणि आनंदी राहते.

इंग्रजीत एक म्हण आहे “हेल्थ इस वेथ” या म्हणीचा अर्थ होतो की, आरोग्य ही संपत्ती आहे आणि हे व्यायाम हे आरोग्य व्यायाम केल्याने सुरळीत राहते. व्यायामाने खूप सारे लाभ होतात. व्यायाम केल्याने मांसपेशी मजबूत होतात, शरीरातील रक्तस्त्राव सुरळीत होतो, व्यायाम केल्याने शरीरात प्रफुल्लता वाढते.

नियमित व्यायाम करणारा व्यक्ती प्रसन्न राहतो. व्यायाम प्रत्येक दिवशी नियमित पद्धतीने करायला हवा. पश्चिमेकडील देशांमध्ये पुरुषांसोबत महिला देखील नियमित व्यायाम करतात. परंतु आपल्या भारतात खूप कमी ठिकाणी महिला घराबाहेर निघून व्यायाम करताना दिसतात.

पुरुषांसोबत महिलांनाही व्यायामाचे महत्त्व समजावून नियमित व्यायाम करण्यास प्रेरित केले पाहिजे. आज विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे खूप सारी नवीन नवीन साधने विकसित झाली आहे. या साधनांमुळे मनुष्याचे श्रम कार्य कमी झाले आहेत. त्यामुळे मनुष्यांमध्ये आळस वाढत आहे व तो व्यायामाकडे दुर्लक्ष करीत आहे.

आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये व्यायामाचे महत्त्व सांगितले आहे. धार्मिक ग्रंथांची मान्यता आहे की, जर धन गेले तर ते आपण पुन्हा मिळवू शकतो. मनुष्य धना शिवाय जिवंत राहू शकतो, परंतु जर स्वास्थ्य बिघडले तर, आपले संपूर्ण जीवन निरार्थक होऊन जाते. मनुष्याचे शरीर व मनाला शुद्ध करण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे.

व्यायामाचे सर्वात जास्त महत्त्व विद्यार्थी वर्गासाठी आहे. व्यायामाचे कोणतेही दुष्परिणाम नाही, म्हणून विद्यार्थीच नव्हे तर प्रत्येक वयाच्या लोकांनी नियमित व्यायाम करून आपले जीवन सुखी व निरोगी बनवा.

व्यायाम

व्यायामाची आवश्यकता

व्यायामाचे महत्त्व Importance Of Exercise In Marathi – सुरुवातीच्या काळामध्ये ऋषीमुनी आपल्या विद्यार्थ्यांकडून व्यायाम करून घेत असे, या काळामध्ये मानव हा शारीरिक श्रम मोठ्या प्रमाणात करीत असे व तो स्वतःची कामे स्वतः करीत असे.

उदाहरणार्थ शेती करणे, नांगरणे व पाणी नदीवरून आणणे आणि इतर अनेक प्रकारचे कामे करीत असे आणि मुले सुद्धा मैदाना जाऊन मैदानी खेळ खेळत असे, जसे की गिल्ली डंडा, झाडावर चढणे, कुस्ती, इत्यादी. यामुळे नकळत त्यांचा नियमित व्यायाम होत असे, यामुळे त्यांचे हे शरीर सुदृढ व बळकट होत असे.

परंतु जसजशी विज्ञान आणि प्रगती केली आणि तंत्रज्ञान अधिक विकसित होत गेले, त्यामुळे मानवाची अनेक कामे सोपी होऊ लागली. यामध्ये मानवाचे विविध अशी परिश्रमाची कामे यंत्रच करतात, यामुळे आणि आजच्या डिजिटल युगात वाढते कम्प्युटरच्या कामामुळे एका जागी बसावे लागत आहे.

या कामामुळे आता शरीरात कमी प्रमाणात हालचाल होत आहेत. त्यामुळे मानवाचे शरीर दिवसेंदिवस सुस्त होत चालले आहे आणि व्यायामाची कमतरता त्यामुळे मानवाला अनेक प्रकारच्या आजाराला तोंड द्यावे लागत आहे.

आजकालची मुलं हे सर्व कामे आपल्या संगणकावर करतात. शिक्षण घेणे, तासंतास मोबाईल वरती व्हिडिओ गेम खेळत बसणे, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत आहे.

याचाच परिणाम म्हणून लहानपणी त्यांची डोळे दुखणे चष्मा लागणे, वजन वाढणे, इत्यादी समस्या आत्ताच्या मुलांमध्ये दिसत आहे. या आजकालच्या सर्व आजारावरती या काळात फक्त एकच उपाय आहे ते म्हणजे व्यायाम. व्यायाम म्हणजे शरीराला निरोगी ठेवण्यासाठी केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली होय.

व्यायाम का करावा ?

व्यायामाचे महत्त्व Importance Of Exercise In Marathi – व्यायामाचे अनेक असे फायदे आहेत, जर आपण सकाळी उठून लवकर फिरायला बाहेर गेलो, तर आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. याव्यतिरिक्त चालल्यामुळे आपल्या शरीरात रक्ताभिसरण योग्य रीतीने होते व पायातील मांस अधिक बळकट होतात. त्यामुळे मानवाचे शरीर अधिक बळकट बनते आणि लवचिक सुद्धा बनते.

नियमित व्यायामामुळे मानवाचा मेरुदंड अधिक लवचिक होतो, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक वेगळी स्फूर्ती निर्माण होते. व्यायामाचे पुष्कळ प्रकार आहेत, यामध्ये चालणे, फिरणे, योगासने, मोठ्याने हसणे, नाचणे, जिम करणे, इत्यादी प्रकार असतात.

व्यायामाचे प्रकारांमध्ये सर्वोत्तम असं सूर्यनमस्कार आहे. या एका व्यायामामुळे आपल्या प्रत्येक अवयवाची योग्य रीतीने हालचाल होते. यावेळी मानवी शरीराला अनेक प्रकारचे फायदे होतात. यामधील सर्वात महत्त्वाचे, व्यायामामुळे मानवाचे आयुष्य वाढते. शरीरातील विषारी घटक सुद्धा व्यायामामुळे कमी केले जाऊ शकतात.

अनेकांनी व्यायामामुळे दुर्मिळ अशा आजारावरती सुद्धा विजय मिळवला आहे. याचे सर्वोत्तम उदाहरण द्यायचे झाले तर, आपल्याला सर्व परिचित असणारे योग गुरु बाबा रामदेव आहेत. रामदेव बाबांनी नियमित व्यायामाच्या भरोशावरच लहानपणीत आलेल्या असाध्य अशा आजारावर विजय मिळवला. अशा प्रकारे व्यायामाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

जगामध्ये व्यायामाची जनजागृती होण्याकरिता आणि व्यायामाचे फायदे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. जर आपल्या शरीर जर रोगट असेल तर, आपण आनंदाने जगू शकणार नाही म्हणून आपण नियमित व्यायाम केला पाहिजे.

विविध वयोगटांसाठी व्यायामाचे महत्त्व

व्यायामाचे महत्त्व Importance Of Exercise In Marathi – अमेरिकन तत्त्वज्ञानी राल्फ वाल्डो इमर्सन यांनी 1860 मध्ये सांगितल्याप्रमाणे पहिली संपत्ती आरोग्य आहे ही संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी वाढवण्यासाठी तसेच ती जोपासण्यासाठी कोणतेही वय लिंग असले तरी व्यायाम करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

आपण ज्या लिंगामध्ये जन्माला आलो आहोत ते आपण बदलू शकत नाही परंतु आपल्या जीवनशैलीमध्ये नक्कीच आपण बदल करून ते आपण नियंत्रणात आणू शकतो.

सक्रिय जीवनशैली जगण्याचा एक सोपा मार्ग म्हणजेच व्यायामाला बालपणापासूनच सुरुवात करणे व्यायामाचे शारीरिक फायदे सगळ्यांनाच माहीत असतात परंतु व्यायामामुळे सर्व वयोगटातील स्मरणशक्ती आणि मेंदूचे कार्य देखील सुधारते हे फार थोड्या लोकांना माहीत असते.

व्यायामामुळे मुले आणि किशोरवयीन मुलांमध्ये मजबूत स्नायू आणि हाडे तयार होतात वजन नियंत्रणात राहते आणि चिंता नैराशीची लक्षणे देखील कमी होतात चांगली शारीरिक तंदुरुस्ती विकसित करण्यामध्ये तसेच निरोगी हाडांचे वस्तुमान आणि घनता आणि चरबीच्या वस्तुमानापेक्षा अधिक दुबळे किंवा स्नायू वस्तुमान यांचा समावेश लहानपणापासूनच होत असतो.

यामुळे पुढच्या आयुष्यात देखील ऑस्टिओपोरोसिस आणि हृदयाच्या समस्या यांच्यासारख्या हाडांशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका कमी उद्भवतो.

जसे तुम्ही प्रौढत व गाठता तस तसे शारीरिक घटक जसे की बी एम आर कमी होणे आणि पर्यावरणीय घटक जसे की करिअर संबंधित तान तणाव आणि जबाबदाऱ्या या आपल्या आरोग्यावर परिणाम करतात मजबूत करणे किंवा वजन उचलण्याचे व्यायाम स्नायूंच्या वस्तुमान वाढवण्यासाठी मदत करतात.

व्यायामामुळे आपली झोप गुणवत्ता आणि ऊर्जा पातळी सुधारू शकते तसेच आपला मोर देखील सुधारू शकतो प्रौढावस्थेमध्ये माऊस पेशी राखणे आणि सुधारणे यावर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे नियमित व्यायामांमध्ये व्यस्त राहण्याचे वृद्ध वयोगटातील अनेक फायदे आहेत.

निरोगी वजन राखण्यास मधुमेह उच्च रक्तदाब ऑस्टिओ ओरोसिस यासारख्या जुनाट आजारांना अनुवंशिक प्रवृत्ती असलेल्या लोकांमध्ये सुद्धा नियंत्रण ठेवण्यास मदत करते. स्मृती भविष्य रोखण्यासाठी नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे ठरते यामुळे वृद्धांमध्ये पडणे फ्रॅक्चर होणे यासारखे धोके कमी होतात.

नियमित व्यायामाचे फायदे

 • व्यायामामुळे शरीर निरोगी आणि बांधे सुदृढ बनतात.
 • रोजच्या व्यायामामुळे स्नायूंची शक्ती, लवचिकता वाढते.
 • हाडे मजबूत व बळकट होतात, त्यामुळे भविष्यात हाडे पोकळ होण्याचा ऑस्ट्रिओ पोरोसिस हा आजार टाळण्यास मदत होते.
 • नियमित व्यायामाने सांध्यांची हालचाल योग्यरीत्या होते. त्यामुळे सांधिवात, गुडघेदुखी, यांसारखे आजार होण्याचा धोका कमी होतो.
 • शरीरातील चरबीचे प्रमाण नियंत्रित राहते.
 • शरीराच्या चयापचायच्या गतीमध्ये सुधारणा होते.
 • हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
 • व्यायामामुळे शरीर मजबूत होते, बलाची वाढ होते, पर्यायाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
 • रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते.
 • नियमित व्यायामाने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
 • मानसिक तणाव कमी होतो.
 • मन ताजेतवाने प्रसन्न बनते.
 • व्यायामामुळे तुमचा मूड सुधारतो आणि नैराश्य चिंता आणि ताण तणाव कमी होण्यास मदत होते.
 • व्यायामामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते, तसेच स्मरणशक्ती ही वाढते.
 • व्यायामामुळे आळस नाहीसा होतो. झोप व्यवस्थित लागते. कार्य करण्याची स्मृती मिळते, तसेच आत्मविश्वास सुद्धा उंचावतो.
 • उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार या सर्व विकारांपासून व्यायामामुळे आपल्या सुटका मिळते.

व्यायामाचे काही महत्त्वाचे नियम

 • व्यायाम करतेवेळी सकाळची वेळ निवडावी. सकाळच्या वेळात व्यायाम अतिशय उत्तम व प्रसन्नतेने तुम्ही करू शकता.
 • व्यायाम करतेवेळी रिकाम्या पोटी व्यायाम करणे, केव्हाही उत्तम आहे. यामुळे तुम्हाला अधिक प्रमाणात थकवा जाणवणार नाही व अगदी सहजरित्या तुम्ही व्यायाम करू शकता.
 • खाल्ल्यानंतर किंवा जेवणानंतर लगेच व्यायाम करू नये. यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो व व्यायाम सुद्धा योग्यरित्या होणार नाही.
 • उन्हाळ्यामध्ये व्यायामाचे प्रमाण हे कमी प्रमाणात असावे, तर थंडीमध्ये व्यायामाचे प्रमाण हे अधिकरित्या असावे. उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये अधिक प्रमाणात हिट निर्माण होत असते व त्यामुळे आपल्या शरीरातील घटक घामाच्या स्वरूपात बाहेर निघतात व त्यामुळे आपल्याला अधिक थकवा जाणू शकतो, तर थंडीमध्ये आपल्या शरीराला अधिक प्रमाणात हिटची गरज असते. त्यामुळे व्यायाम केल्याने आपल्या शरीरामधील उष्णतेचे प्रमाण वाढवून आपल्या शरीराला एक चांगल्या प्रकारचे आरोग्य प्राप्त होते.
 • व्यायाम करण्या अगोदर शरीराला उत्तम प्रकारे तेल लावून घेणे व त्यानंतरच व्यायाम करणे कधीही योग्य असते.
 • झोप पूर्ण झाली नसल्यास किंवा शरीरामध्ये अशक्तपणा वाटल्यास, आजारी असल्यास, दीर्घ आजारानंतर तसेच रक्तस्त्राव, मुत्र दोषाचा त्रास इत्यादी त्रास होत असल्यास, श्वसना दरम्यान कुठला त्रास होत असल्यास, अंग दुखत असल्यास व्यायाम करणे टाळावे.

व्यायामाचे प्रकार

व्यायामाचे महत्त्व Importance Of Exercise In Marathi – व्यायामाचे एकूण चार प्रकार आहेत. यामध्ये एरोबिक व्यायाम, अनॅरोबिक व्यायाम, स्ट्रेचिंग व्यायाम व समतोल व्यायाम, असे चार प्रकार आहेत.

या चार प्रकारांमध्ये धावणे, चालणे, पोहणे, सायकलींग, दोरी उड्या, जोर बैठका, मैदानी खेळ, स्ट्रेचिंग, पायऱ्या चढणे, उतरणे, वजन उचलणे, योगासने, डान्सिंग, इत्यादी प्रकारचा समावेश होतो.

एरोबिक व्यायाम

व्यायामाचे महत्त्व Importance Of Exercise In Marathi – स्नायूंची गती, हृदयाचे आरोग्य, फुफ्फुसांची कार्य करण्याची क्षमता व शरीरामध्ये शक्ती वाढवणाऱ्या व्यायामाला एरोबिक व्यायाम असे म्हणतात.

यामुळे हृदय व रक्तवाहिन्याने संबंधित प्रणालींची चालना योग्यरित्या होते व फुफ्फुसांचे आरोग्य व त्यांची कार्य करण्याची क्षमता उत्तम रित्या सुधारते. चालण्याचा व्यायाम, सायकल चालवणे, दोरी उड्या, जॉगिंग, ग्रुप ऍक्टिव्हिटीज, पोहणे, झुंबा एरोबिक्स, पावर योगा हे काही एरोबिक्सचे प्रकार आहेत.

एरोबिक प्रकारच्या व्यायामामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीत काही रोग असल्यास, टाईप टू मधुमेह असल्यास, किंवा अति उच्च रक्तदाब असल्यास, पॅरालिसिसचा धोका असल्यास, हे आजार कमी होण्यास मदत होते. अशा व्यायामांमुळे हृदयाचे आपले ठोके नियंत्रित राहण्यास व श्वासावरचे प्रमाण योग्य राहण्यास, २० ते ३० टक्क्यांनी सुधारते.

एरोबिक व्यायाम दररोज २० ते ३० मिनिटे आपण करायला हवा .अशा व्यायामामुळे शरीराचे कार्यक्षमता योग्यरीत्या वाढते. म्हणजेच आपण न थकता, उत्साही पूर्ण आपले दैनंदिन कार्य करू शकतो. तसेच आपला स्टॅमिना सुद्धा अधिक प्रमाणात वाढतो. हा व्यायाम हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.

अनॅरोबिक व्यायाम

आपल्या शरीरामधील स्टॅमिना, ताकद अर्थात कोणतीही गोष्ट किंवा क्रिया करण्याची आपल्या मध्ये असलेली शक्ती. आपल्यातील ही शक्ती वाढवण्यासाठी जो व्यायाम केला जातो, त्याला व्यायाम म्हटले जाते.

या प्रकारच्या व्यायामांमध्ये जलदरीत्या हालचाली, या प्रकारच्या व्यायामामध्ये जलदरीत्या हालचाली कमी वेळेत कराव्या लागतात. यामध्ये जोरात बैठका मारणे, पुश अप, वेगाने धावणे, वजन उचलणे, इत्यादी प्रकारचा समावेश होतो.

अशा प्रकारच्या व्यायामामुळे आपल्या शरीरामधील जी ऊर्जा आहे, ती कमी वेळामध्ये अधिक प्रमाणात वापरली जाते. या प्रकारच्या व्यायामामुळे मांस पेशी तसेच, आपल्या शरीरामधील हाडे मजबूत व अगदी बळकट होण्यास मदत होतात.

या प्रकारच्या व्यायामांमध्ये कॅलरीज ही अधिक प्रमाणात आपल्या शरीरामधून बाहेर पडत असते. जळत असते. त्यामुळे कमी वजन होण्यासाठी, वेट लॉस साठी, अनॅरोबिक व्यायाम हे अतिशय उपयुक्त आहेत.

हा व्यायाम प्रकार करतेवेळी जर हृदयविकाराचा व्यक्ती असल्यास आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हव्या करावा किंवा अशा प्रकारचे व्यायाम करणे टाळलेलेच बरे.

स्ट्रेचिंग व्यायाम

स्ट्रेचिंग मुळे आपल्या शरीरामधील लवचिकता, फ्लॅग्जिबिलिटी राखण्यास मदत होते. त्यामुळे स्नायूंना विशिष्ट प्रकारामध्ये ताण दिला जातो व या कारणांमुळेच आपली मांस पेशीही लवचिक व अधिक प्रमाणात मजबूत होत मजबूत होते.

त्यामुळे आपण आपल्या शरीराला हवे तसे मोडू शकतो. स्ट्रेचिंग हा वर्कआउट चा एक महत्त्वाचा अत्यावश्यक भाग आहे, परंतु अनेक जण स्ट्रेचिंग करणे टाळून, इतर प्रकारच्या व्यायामावर अधिक भर देतात.

मात्र कोणत्याही प्रकारच्या व्यायामानंतर स्नायूंना ताण देऊन, स्ट्रेचिंगचा व्यायाम करणे हा अत्यावश्यक आहे. अधिक प्रमाणामध्ये तरुण हे त्यांचे स्नायू निरोगी असल्यामुळे, स्ट्रेचिंग करण्यास दुर्लक्ष करतात. परंतु वय वाढल्यानंतर स्नायूंमधील लवचिकता या कारणांमुळे कमी होत जाते.

त्यामुळेच तरुणपणा मध्येच व्यायामादरम्यान स्ट्रेचिंग करणे खूप गरजेचे आहे. जर स्ट्रेचिंग केली नाही तर, उतरत्या वयामध्ये स्नायूत पेटके येणे व त्या ठिकाणी दुखणे, स्नायूंच्या दुखापती वाढणे, सांधेदुखी होणे, इत्यादी प्रकारचे धोके वाढू शकतात. त्यामुळे स्ट्रेचिंग करणे अत्यंत गरजेचे आहे.

समतोल व्यायाम

या व्यायाम प्रकारामध्ये एक स्थितीत काही वेळ योग्यरित्या राहून, शरीराचा बॅलन्स अर्थात समतोल साधला जातो. योगासने ही या प्रकारच्या व्यायामांमध्ये असतात.

योगासरांच्या नियमित सराव केल्याने, शारीरिक हालचाली, अतिशय योग्यरित्या व कार्यक्षमरित्या कार्य करतात. आपले मसल्स अर्थात स्नायू सक्षम होतात. तसेच प्राणायाम ध्यान धारणा, योगासने, सर्व प्रकारचे मानसिक ताण तणाव दूर करण्यास उपयुक्त ठरतात.

आणखी महत्त्वाचे व्यायाम प्रकार

व्यायामाचे महत्त्व Importance Of Exercise In Marathi –

सायकलिंग करणे

व्यायामाचे महत्त्व Importance Of Exercise In Marathi – सायकलिंग केल्यामुळे हृदय, फुफ्फुस, हाडे, मांस पेशी, सांध्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच शरीरामध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

समजा काही कारणास्तव सायकल बाहेर चालवणे शक्य नसल्यास घरच्या घरी किंवा जिम मध्ये आपण व्यायामाची सायकल वापरून वर्कआउट करू शकतो. यामुळे स्नायू बळकट होतात. आपले वजन नियंत्रित राहते.

एक तासाच्या सायकलच्या व्यायामातून जवळपास 500 ते 800 कॅलरीज बर्न करता येतात. तसेच आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी देखील सायकलचा व्यायाम फायदेशीर ठरतो. त्यामुळे हार्ट अटॅक, हायब्लड प्रेशर, पक्षाघात, डायबेटीस यासारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.

मधुमेहाचा धोका देखील कमी राहतो. सायकलींगमुळे मानसिक ताण तणावापासून आराम मिळतो. त्यामुळे शांत झोप लागून सकाळी ताजेतवाने वाटते.

 Importance Of Exercise In Marathi

चालण्याचा व्यायाम

व्यायामाचे महत्त्व Importance Of Exercise In Marathi – निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे असते. चालणे, दोरी उड्या मारणे, मैदानी खेळ खेळणे, सायकलिंग करणे, पोहणे, वजन उचलणे, चालणे, जिना चढणे अशा अनेक प्रकारांनी व्यायाम करता येतो.

यापैकीच सर्वात स्वस्त आणि सोपा व्यायाम प्रकार म्हणजे चालण्याचा व्यायाम होय. हा व्यायाम दिवसाच्या कोणत्याही वेळी करता येतो. तसेच यासाठी कोणत्याही विशेष साहित्याची खरेदी करावी लागत नाही. लहान मुलांपासून ते अगदी वृद्ध व्यक्तींपर्यंत तसेच गरोदर स्त्रिया हा चालण्याचा व्यायाम करू शकतात.

सर्वांसाठी चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे. चालताना पावलांवर कमी दाब पडत असतो. सकाळी 20 ते 30 मिनिटे न थांबता चालणे आरोग्यासाठी सगळ्यात उत्तम समजले जाते. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारते.

तसेच अतिरिक्त चरबी कमी होते. हृदयविकार, डायबेटीस, कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. हाडे बळकट होतात. दररोज कमीत कमी अर्धा तास चालण्याचा व्यायाम केल्यामुळे शरीर मजबूत होते. शारीरिक स्टॅमिना वाढतो. शरीरामध्ये रक्तप्रवाह सुरळीत राहतो. रक्तदाब नियंत्रित राहतो.

चालण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होऊन मधुमेह आटोक्यात राहण्यास मदत होते. तसेच शरीरातील चरबी कमी होऊन लठ्ठपणाची समस्या असल्यास ती सुद्धा कमी होऊन शरीर मजबूत होते. नियमित चालणे झाल्यामुळे रात्री झोप देखील चांगली लागते. तसेच मानसिक ताण तणाव दूर होण्याला देखील मदत होते.

 Importance Of Exercise

व्यायाम करताना घ्यावयाची काळजी

 • आपण कोणत्या प्रकारचा व्यायाम हा अगदी योग्यरित्या व सहजरित्या करू शकतो. यानुसार व्यायामाचा वेळ किती असावा, किती जोरात व्यायाम करावा, कसा करावा, या सर्व गोष्टी आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने समजून घेऊनच व्यायाम करण्यास सुरुवात करावी.
 • व्यायाम सुरू करतेवेळी सुरुवातीस कमी प्रमाणामध्ये व्यायाम सुरू करण्यास, सुरुवात करावी. यानंतर दररोज थोडा थोडा व्यायामाचा कालावधी वाढवत जावा.
 • नियमित व्यायाम योगासने करावेत. यामुळे आपले शरीर सुदृढ व मन प्रसन्न राहते. त्यामुळे दररोज किमान ३० ते ४५ मिनिटे व्यायाम करणे गरजेचे असते.
 • एकाच दिवसांमध्ये अधिक प्रमाणात व्यायाम करू नये. यामुळे आपल्या शरीरावरती अधिकरित्या ताण येऊ शकतो.
 • जेवणानंतर दहा मिनिटे व्यायाम करू नका. खाल्ल्या खाल्ल्या लगेच व्यायाम करण्यास जाऊ नये. यामुळेच हृदयविकार किंवा पचनसंस्थेवर अधिक प्रमाणात ताण पडू शकतो.
 • उन्हाळ्यामध्ये अधिक प्रमाणात व्यायाम करू नये. यामुळे उन्हाळ्यात कायम सकाळी दहा ते दुपारी दोन या कालावधीमध्ये व्यायाम करणे टाळावे.
 • व्यायामाआधी साधारण वीस मिनिटे ग्लासभर थंड पाणी प्यावे. व्यायाम चालू असताना देखील तर दहा ते वीस मिनिटांनी थोडे थोडे पाणी पीत राहावे. यामुळे तुमच्या शरीराचा समतोल राखून राहण्यास व तुमच्या शरीरामध्ये एनर्जी येण्यास मदत होईल.
 • व्यायाम करते वेळेस सैल, सुती व अगदी सहजरीत्या परिधान करू शकू असे कपडे घालावेत. जास्त टाईट, घट्ट व व्यायाम करताना अवघड होईल असे कपडे घालू नये. सलग ४५ मिनिट व्यायाम केल्यास दहा मिनिटांची सक्तीची विश्रांती घेणे, सुद्धा तितकेच गरजेचे असते.
 • सिमेंट किंवा डांबरी रस्त्यावर चालणार असाल किंवा धावणार असाल, तर योग्य पद्धतीचे बूट वापरणे व नंतरच व्यायाम करायला सुरुवात करणे कधीही गरजेचे असते.

FAQ

१. व्यायामाचे महत्व काय ?

नियमित व्यायाम करणारा व्यक्ती प्रसन्न राहतो. व्यायाम प्रत्येक दिवशी नियमित पद्धतीने करायला हवा. पश्चिमेकडील देशांमध्ये पुरुषांसोबत महिला देखील नियमित व्यायाम करतात. परंतु आपल्या भारतात खूप कमी ठिकाणी महिला घराबाहेर निघून व्यायाम करताना दिसतात. पुरुषांसोबत महिलांनाही व्यायामाचे महत्त्व समजावून नियमित व्यायाम करण्यास प्रेरित केले पाहिजे.
आज विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे खूप सारी नवीन नवीन साधने विकसित झाली आहे. या साधनांमुळे मनुष्याचे श्रम कार्य कमी झाले आहेत. त्यामुळे मनुष्यांमध्ये आळस वाढत आहे व तो व्यायामाकडे दुर्लक्ष करीत आहे.
आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये व्यायामाचे महत्त्व सांगितले आहे. धार्मिक ग्रंथांची मान्यता आहे की, जर धन गेले तर ते आपण पुन्हा मिळवू शकतो. मनुष्य धना शिवाय जिवंत राहू शकतो, परंतु जर स्वास्थ्य बिघडले तर, आपले संपूर्ण जीवन निरार्थक होऊन जाते. मनुष्याचे शरीर व मनाला शुद्ध करण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे.

२. व्यायामाचे फायदे काय?

व्यायामामुळे शरीर निरोगी आणि बांधे सुदृढ बनतात.
रोजच्या व्यायामामुळे स्नायूंची शक्ती, लवचिकता वाढते.
हाडे मजबूत व बळकट होतात, त्यामुळे भविष्यात हाडे पोकळ होण्याचा ऑस्ट्रिओ पोरोसिस हा आजार टाळण्यास मदत होते.
नियमित व्यायामाने सांध्यांची हालचाल योग्यरीत्या होते. त्यामुळे सांधिवात, गुडघेदुखी, यांसारखे आजार होण्याचा धोका कमी होतो.
शरीरातील चरबीचे प्रमाण नियंत्रित राहते.
शरीराच्या चयापचायच्या गतीमध्ये सुधारणा होते.
हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते.
व्यायामामुळे शरीर मजबूत होते, बलाची वाढ होते, पर्यायाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते.
नियमित व्यायामाने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
मानसिक तणाव कमी होतो.

घरच्या घरी करता येणारे काही सोपे व्यायाम कोणते आहेत?

सायकल क्रंच, सिट-अप, स्क्वॅट्स, लंज आणि प्लँक्स ही सोप्या व्यायामाची उदाहरणे आहेत जी महागड्या उपकरणांच्या मदतीशिवाय घरी करता येतात.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास व्यायामाचे महत्व दिले आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवानंसोबत व नातेवाईकांसोबत शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment