कशी करावी कृष्ण जन्माष्टमी पूजा – कृष्ण जन्माष्टमी हा सण भगवान कृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. श्रीमद् भागवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म हा भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथी, बुधवार, रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीच्या मध्यरात्री झाला होता. जन्माष्टमीचा सण देशातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात उत्साहाने साजरा केला जातो.
कुठे कृष्णाष्टमी तर कुठे गोकुळाष्टमी या नावाने ओळखला जाणारा हा उत्सव यंदा नेमका कधी साजरा करायचा आहे, याबद्दल संभ्रम आहे. ज्योतिषींचे मत आहे की, श्रीकृष्णाचा जन्मोत्सव 6 तारखेच्या रात्रीच साजरा करावा. कारण या रात्री तिथी आणि नक्षत्राचा योग जुळून येत आहे, जो द्वापरयुगात तयार झाला होता.
आत्ताच वाचा👉 गोकुळाष्टमी संपूर्ण माहिती
कशी करावी कृष्ण जन्माष्टमी पूजा? कृष्ण जन्माष्टमी 2023
कशी करावी कृष्ण जन्माष्टमी पूजा? वैष्णव पंथानुसार द्वारका, वृंदावन आणि मथुरा यासह मोठ्या कृष्ण मंदिरांमध्ये हा उत्सव 7 तारखेला साजरा केला जाणार आहे. 7 ते 8 दरम्यान मध्यरात्री 12 वाजता श्री कृष्ण जन्मोत्सव होणार आहे. धर्मग्रंथानुसार हा भगवान श्रीकृष्णाची 5250 वा जन्मोत्सव आहे. आज मराठी झटका डॉट कॉम या आमच्या वेब पेजद्वारे आम्ही जन्माष्टमी मुहूर्त, पूजा साहित्य आणि पूजा कशी करावी? याबाबतची माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग, जाणून घेऊया जन्माष्टमी पुजा कशी करावी.
गोकुळाष्टमी मुहूर्त? – Krishna Janmashtami 2023
श्रावण कृष्ण अष्टमी म्हणजेच ६ सप्टेंबर २०२३ या दिवशी गोकुळाष्टमी आहे.
- अष्टमी तिथी सुरू – दुपारी ०३ वाजून ३७ मिनिटांनी
- अष्टमी तिथी समाप्त – ७ सप्टेंबर २०२३ संध्याकाळी ०४ वाजून १४ मिनिटांनी.
- रात्री पूजेचा मुहूर्त – १२ वाजून ०२ मिनिटे ते १२.४८ मिनिटांपर्यंत
जन्माष्टमी पूजा विधि – Gokulashtami 2023
जन्माष्टमी पुजा कशी करावी? पूजा साहित्य
श्रीकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा | गणेशपूजन | जानवे | गणेशाला अर्पण करण्याचे वस्त्र | विड्याची पाने |
केळीची पाने | फुलदाणी | पांढरे वस्त्र | लाल वस्त्र | पंचरत्न दिवा |
मोठ्या दिव्यासाठी तेल | नैवेद्य किंवा मिठाई | कापूस | तुळशी | दुर्वा |
केशर | गुलाल | अबीर | अर्घ्य पात्र | कापूर |
गंगेचे पाणी | सुका मेवा | पुष्पहार | पंचपात्र | ताम्हण |
मध | दुर्वा | सुपारी | पळी | चंदन |
साखर | लाह्या | अत्तर | पंचामृत | शुद्ध तूप |
समई | नारळ | तांदूळ | निरांजन | गुलाब आणि लाल कमळाची फुले |
तुळशीच्या माळा | अगरबत्ती | कुंकू | धूप | अक्षता |
हळद | दागिने | सुटे पैसे | दही | धागा |
दूध | हंगामी फळे | सिंहासन | झुला |
गोकुळाष्टमी पूजा विधी
- या दिवशी सर्वप्रथम संपूर्ण घर झाडून पुसून स्वच्छ करणे. त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छ कपडे घालणे.
- पूजा साहित्य एकत्र करणे. फुले काढून आणणे. त्यानंतर वस्त्र वाती तयार करणे.
- गणेश पूजन म्हणजेच एका ताटामध्ये तांदूळ आणि नारळ काढून ठेवणे.
- नैवेद्यामध्ये कृष्णाला आवडतात ते पदार्थ म्हणजे शेवग्याच्या पाल्याची भाजी, आंबोळी, गुळचून आणि कुळीथाची उसळ तयार करून ठेवणे. (आपल्या आपल्या प्रांताप्रमाणे आपापल्या आवडीप्रमाणे नैवेद्य दाखवू शकतो.)
- सर्वप्रथम घरातील देवाची पूजा करून घेणे.
- नंतर एका पाटावर कृष्णाच्या मूर्तीची स्थापना करणे. पाटाच्या बाजूला रांगोळी काढणे.
- त्यानंतर समई पेटवून घेणे.
- प्रथम गणेश पूजन करून घेणे.
- नंतर कृष्णाला जानवे घालून हळद, कुंकू, चंदन, अबिर लावून घेणे.
- त्यानंतर कृष्णाला फुले अर्पण करणे.
- अगरबत्ती आणि निरांजनाने ओवाळणे
- त्यानंतर धुपारती करणे.
- मंत्रोच्चार करून ध्यानधारणा करणे. कृष्णाची प्रार्थना करणे.
- त्यानंतर लाह्या आणि दूध तसेच पंचामृताचा नैवेद्य दाखवणे.
- त्यानंतर कृष्णाची आरती करणे.
- आरती केल्यानंतर लगेचच कृष्णाला नैवेद्य दाखवून तो नैवेद्य प्रसाद म्हणून घरातील सगळ्यांना वाटणे.
- रात्री भजन, कीर्तनाचा, नाच गाण्यांचा कार्यक्रम करून रात्र जागवणे.
उपवासाची वेळ कृष्ण जन्माष्टमी २०२३
जन्माष्टमीचा उपवास सहसा श्रीकृष्णाच्या जन्मानंतर सोडला जातो. ६ सप्टेंबर रात्री पूजेचा मुहूर्त – १२ वाजून ०२ मिनिटे ते १२.४८ मिनिटांपर्यंत आहे. भक्तांनी रात्री १२.४२ नंतर जन्माष्टमी सोहळ्यानंतर उपवास सोडता येईल. जन्माष्टमीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दहीहंडी साजरी केली जाते. यंदाचा दहीहंडी सोहळा गुरुवार,७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
जन्माष्टमी कधी शुभ असते?
भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथी, बुधवार, रोहिणी नक्षत्र आणि वृषभ राशीच्या मध्यरात्री भगवान कृष्णाचा जन्म झाला होता. या दिवशी अष्टमी तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते. पहिल्याच दिवशी मध्यरात्री अष्टमी येत असेल तर पहिल्या दिवशी जन्माष्टमीचा उपवास केला जातो. यासोबतच जन्माष्टमीच्या पूजेसाठी रात्रीची वेळ आणि रोहिणी नक्षत्रही मानले जाते. यावर्षी 6 सप्टेंबर 2023 रोजी जन्माष्टमी व्रत आणि पूजा करणे शुभ राहील.
2023 मध्ये जन्माष्टमीची सुट्टी कधी आहे?
कशी करावी कृष्ण जन्माष्टमी पूजा? यंदा जन्माष्टमीचा सण 6 आणि 7 सप्टेंबर या दोन्ही दिवशी साजरा केला जाणार आहे. यावर्षी बहुतेक ठिकाणी जन्माष्टमीची सुट्टी 7 सप्टेंबर 2023 रोजी गोपाळकाला या दिवशी आहे. काही शहरांना 6 आणि 7 सप्टेंबर या दोन्ही दिवशी सुट्टी आहे. सुट्टीची तारीख विविध शहरानुसार भिन्न असू शकते.
निष्कर्ष
कशी करावी कृष्ण जन्माष्टमी पूजा? या लेखाद्वारे आम्ही जन्माष्टमी या सणाविषयीची माहिती, मुहूर्त आणि पूजाविधी याबाबतची सगळी माहिती आपल्याला देण्याचा एक छोटासा प्रयत्न या मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन.
तोपर्यंत नमस्कार.