साहित्य म्हणजे काय literature in marathi – वास्तविक साहित्य याचा अर्थ सामग्री असा आहे. स्वयंपाकाचे साहित्य, परीक्षेचे साहित्य, शेतीचे साहित्य, असे शब्दप्रयोग आपण नेहमीच करत असतो.
पण नुस ता साहित्य हा शब्द मात्र एकच, एक विशिष्ट अर्थ सांगतो. तो म्हणजे “लेखन” हा होय आणि या लेखनाच्या संदर्भातही साहित्य ही संज्ञा मोठी सर्व समावेशक आहे.
वाङमय अशी आणखी एक संज्ञा साहित्याला पर्यायी म्हणून वापरली जाते. तीही अशीच व्यापक व समावेशक आहे. जे जे वाणीमय ते वाङमय. तसेच जे जे लिखित तेथे साहित्य.
अशा अर्थाची व्यापकता दोन्ही संज्ञा बाबत दिसते. पण या दोन्ही संज्ञा सर्वच लेखनाला लावता येत नाही, तसा प्रयत्न चुकीचा ठरतो हे उघड आहे. व्यवहारात तर आपण याचा नेहमीच अनुभव घेत असतो.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास साहित्य म्हणजे काय ? या बद्दल माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
साहित्य म्हणजे काय literature in marathi
साहित्य संकल्पना
साहित्य म्हणजे काय literature in marathi – मराठी भाषेतील साहित्य ही संकल्पना, इंग्रजीतील लिटरेचर या शब्दाला पर्यायी म्हणून उपयोजित केली. इंग्रजीतील लिटरेचर शब्दाचा शब्दकोशात अर्थ, कलामूल्य असलेले लेखन होय. साहित्य विशिष्ट विषयावरचे वांग्मय माहिती देणारे, छापील वाङमय असा आहे.
तसेच साहित्य हा शब्द सहीत या धातूपासून निर्माण झालेला असूनही, सहीत चा अर्थ एकत्र ठेवलेले असा आहे. साहित्याचा व्यवहारिक अर्थ, सामान सुमान असाही आहे.
हे वाचा-
अभ्यासकाच्या दृष्टीतून साहित्य
आपण साहित्याचे अभ्यासक म्हणून आपल्याला साहित्याचा जो अर्थ अभिप्रेत आहे, तो मौखिक, लिखित, सर्जनशील साहित्या असा होत.
परंतु मराठीत, म्हणजे अशा सर्जनशील साहित्यासाठी वांग्मय सारस्वत विदत्त वाङमय, ललित वाङमय, अशा पर्यायी संकल्पना उपयोजल्या जातात. आज हि आपण साहित्य आणि वाङमय या दोन संकल्पनाच प्रामुख्याने वापरतो.
वाङमयचा अर्थ
साहित्य म्हणजे काय literature in marathi – मराठी मध्ये साहित्या शिवाय मोठ्या प्रमाणात प्रचलित असलेली, दुसरी संकल्पना म्हणजे वाङमय. आता वाङमय याचा अर्थ वाक (वाणी) मय असा आहे. परंतु जो जो वाणी युक्त आहे, तेथे सर्वच वाङमय असे म्हणता येत नाही.
त्याप्रमाणेच जे जे लिहिले जाते, त्या लिखित साहित्यालाही साहित्य म्हणता येणार नाही. या संरचनातील अति व्याप्तीचा दोष टाळून, आपण ज्या सर्जनशील साहित्याचा शोध घेतो, ते ललित साहित्य होय.
काटेकरपणा निर्माण करण्यासाठी म्हणून, साहित्याचा ललित व ललिताचा भेद असा केला जातो.
दीर्घ काळ ठीकते तेच वांग्मय असे सर्वसाधारणपणे म्हणून डॉक्टर विना ढवळे यांनी आपल्या साहित्याचे तत्वज्ञाने ग्रंथात लिहिले आहे की, मूळ लेखनाचा तो तत्कालीक संदर्भ असेल, तो त्या लेखकाचे स्फूर्ती स्थान असलेले सर्व प्रसंग, घटना, व्यक्ति, वगैरे विशेष विचारत न घेता सुद्धा जे लेखन वाचावेसे वाटते ते वांग्मय.
साहित्य संकल्पनेची संस्कृत परंपरा
literature in marathi -संस्कृत परंपरेमध्ये साहित्य असा शब्दप्रयोग इसवी सन ९०० च्या सुमारास केला गेला. साधारणपणे साहित्यशास्त्र हे काव्यमीमांसेचे मार्गदर्शक शास्त्र म्हणून रूढ झाले.
त्या पूर्वी यास अलंकार शास्त्र असे संबोधले जात असे व त्या शास्त्राच्या आचार्यांना, अलंकारिक अशी पदवी प्रदान केली गेली. प्राचीन काळात रस, गुण, रिती, इत्यादीसाठी व्यापक अर्थाने अलंकार ही संकल्पना उपयोजली गेली.
शब्दाः अर्थालंकार इत्यादी मर्यादित अर्थाने, अलंकार या संकल्पने शिवाय साहित्य या अर्थाने क्रियाकल्प अशी ही संकल्पना वापरली गेली.
क्रियाकल्प याचा अर्थ काव्य करण्याचे नियम असा आहे. इसवी सन ९०० च्या दरम्यान काव्यमीमांसेचे शास्त्र या अर्थाने साहित्य ही संकल्पना उपयोजित गेली आणि शब्द व अर्थ यांचे परस्परांना अनुरूप असे सौंदर्यशाहीत्व म्हणजे साहित्य असे स्थूलमानाने ठरले.
साहित्य संकल्पनेची पाश्चात्य परंपरा
literature in marathi – पाश्चात्त्य परंपरेत साहित्याच्या व्याख्या, लक्षणे, सत्वाची चर्चा करून त्याचे स्वरूप स्पष्ट करण्याचा व्यक्तिगत व विविध प्रकारांनी प्रयत्न केला.
पाश्चात्य लिटरेचर आणि इमेजीनेटीव्ह लिटरेचर असा स्पष्ट फरक केलेला दिसतो. अनुकृतीवादी अरिस्टोटरने, “साहित्य ही जीवनाची सर्जक अनुकृती मानून ते विश्वात्मकतेची व सत्वाची अनुकृती मानले व ते शब्द व भाषेच्या माध्यमातून, जीवनाची अनुकृती करते, असे म्हटले.
तर भावना आविष्कार, आत्मविष्कार संबोधले. भावना आविष्कार म्हणजे वर्डस्वर्थच्या मते, काव्य म्हणजे भावनांचा सहज स्फूर्त उत्कट तीव्र उद्रेक होय.
साहित्य संकल्पनेची रुपवादी परंपरा
रुपवादी परंपरेत साहित्य आणि काव्याची चर्चा भाषिक आणि रूप किंवा संरचनेच्या अंगाने केली.
आणि सेंद्रिय एकात्मता आणि कार्यता, विरोधाभासात्मक्ता, व्यक्तीनिर्पेक्षता, संदर्भता इत्यादी सिद्धांत त्या अनुषंगाने मांडले गेले.
पाश्चात्य अभ्यासकाने सांगितलेले साहित्याचे अंगविशेष
वॉरेन क्लेफे यांनी मौखिक भाषा, कथनात्मकता, कल्पितता, संघटना, रूपबंध, व्यक्तिनिष्ठ अभिव्यक्ती, व्यवहारिक प्रयोजनाचा अभाव, इत्यादी विशेषांच्या आधारे साहित्य व अन्य लेखनात भेद केलेला आहे.
आणि त्यानंतर या समीक्षकद्ययानी साहित्य कलाकृती म्हणजे, अर्थबाहुलयुक्त व विविध संबंधयुक्त, गुंफणीतून स्तरीकरण झालेली एक जटील स्वरूपाची संघटना असते, असे म्हटलेले आहे.
साहित्य जीवनानुभवाचा अविष्कार करते. जीवनाचा वेगवेगळ्या पद्धतीने अन्वयार्थ लावला जातो. साहित्य मूल्यांच्या संकल्पना असल्याने, त्यामध्ये विविधता आढळते. म्हणून डब्ल्यू वी ग्याली यांच्या मते, साहित्य ही स्वभावता वादग्रस्त संकल्पना असं म्हटलेलं आहे.
साहित्य ही एक व्यामिश्र व अनेकांगी घटना आहे. म्हणून साहित्याची एकच एक व्याख्या असंभव आहे. म्हणून त्याच्या अंगविशेषद्वारे किंवा स्वरूप स्पष्ट करता येऊ शकते.
मराठी अभ्यासकांनी सांगितलेले साहित्याचे अंगविशेष
साहित्य म्हणजे काय literature in marathi – मराठी साहित्यामध्ये प्राध्यापक गंगाधर पाटील यांनी साहित्याची सात अंगे सांगितली आहेत. भाषिक अंग, आशात्मक किंवा अर्थात्मक अंग, रूपबंधात्मक, संरचनात्मक, कल्पकतेचे अंग, प्रकारात्मक अंग, सौंदर्यात्मक अंग, अस्तित्वात्मक व सत्ता शास्त्रीय अंग, याशिवाय साहित्याची आणखी काही अंगे सांगता येतील.
जसे की, चिन्हात्मक अंग, दृष्टिकोनात्मक अंग, देशकालात्मक अंग, मानसशास्त्रीय अंग, सामाजिक सांस्कृतिक अंग, संवादात्मक संज्ञापनात्मक अंग, इत्यादी.
साहित्याचे अभ्यासक म्हणून, आपल्याला साहित्याचा जो अर्थ अभिप्रेत आहे, तो मौखिक, लिखित, सर्जनशील साहित्य असा होय.
परंतु मराठीत म्हणजे अशा सर्जनशील साहित्यासाठी, वाड्मय सारस्वत विदत्त वाङमय, ललित वाङमय, अशी पर्यायी संकल्पना उपयोजली जातात.
कथात्म साहित्य म्हणजे काय ?
कथा ऐकणे, सांगणे, ही मानवाची प्रेरणा प्रवृत्ती असल्याने, प्राचीन काळापासून कथात्म साहित्याची परंपरा निर्माण झाल्याचे दिसते.
कथात्म साहित्य हे सर्जनशील साहित्य असते. लेखकाने भाषेच्या माध्यमातून ते कथन केलेले असते. त्यामध्ये वास्तवाधारीत कल्पित असते. तसे सौंदर्यपूर्ण भाषेचा अविष्कार ही त्यामध्ये आपणास पहावयास मिळतो. त्यात भाषेचा नेहमीच्या वापरापेक्षा वेगळ्या लालित्यपूर्ण किंवा सौंदर्यपूर्ण भाषेचा वापर केलेला पहावयास मिळते.
कथात्म साहित्य मध्ये घटनांचे कथन केले जाते. आपल्या अवतीभवती घडलेल्या घटनांचा देखील यामध्ये समावेश असतो. त्याचप्रमाणे त्या मानसिक स्वरूपाच्या (काल्पनिक) असू शकतात. निवेदन करणे म्हणजेच कथन करणे, ही गोष्ट कथात्म साहित्यात फार महत्त्वाची असते.
घडलेल्या किंवा काल्पनिक घटनांचे कथन या साहित्यात असते. कथात्म साहित्य मध्ये येणाऱ्या घटना भूतकाळातील म्हणजेच घटून गेलेल्या असतात. कथन करणारा म्हणजेच लिहिणारा, कालानुरूप किंवा कार्यकारण भावाने घडून गेलेल्या घटना, अनुभवांचे कथन करतो.
कथनाच्या दोन पद्धती सांगता येतील.
अ) कथात्म साहित्य घटना, ज्याप्रमाणे कालक्रमानुसार घडलेल्या तशाच सांगणे, म्हणजे अनुलोम.
ब) योग्य परिणाम साधण्यासाठी, निवेदकाने घटनांचा नैसर्गिक वास्तव कलानुरूप बदलून, घटनात्मक मागेपुढे बदलून, सांगणे म्हणजे विलोम.
घटना बरोबर, कथात्म साहित्या मध्ये पात्रे, स्थळे, विशिष्ट काळ आणि विशिष्ट वातावरणाची रचना केली जाते. लेखकाच्या मनातील कल्पित पात्र, प्रसंग, घटना, यांच्या साह्याने वास्तव दृश्य रचना म्हणजेच कथांवरूप लेखक निर्माण करतो.
प्रत्यक्षातले अथवा कल्पित घटनांचा गद्यातला अथवा पद्यातला वृत्तांत म्हणजे कथन रूप असे आपण म्हणू शकतो. कथात्म साहित्य हे मौखिक, लिखित, अथवा गायनात्मक असू शकते. हे कथात्म साहित्य गद्दात्मक किंवा पद्यात्म असू शकते.
कथेचा कालखंड किती मोठा किंवा किती छोटा यावरून, कथनरूप ठरतात. मध्ययुगीन मराठी साहित्यात प्रदीर्घ कथा, काव्य आणि आख्यान काव्य, महाकाव्य, इत्यादी प्राचीन कथात्मक रचना प्रकार आहेत.
तर आधुनिक काळात कथा, दीर्घकथा, लघु कादंबरी, कादंबरी, यांचा अंतर्भाव कथात्मक साहित्यात होतो.
लोकसाहित्य म्हणजे काय ?
आदिम काळामध्ये ज्यावेळेला माणसाने निसर्गातील अनामी शक्तीला देव मानायला सुरुवात केली. ज्या क्षणाला या श्रद्धेचा जन्म झाला, त्या क्षणी लोकसाहित्याचाही जन्म झाला.
कारण शरण जाण्यासाठी, स्तोत्र, प्रार्थना, इत्यादीचे शाब्दिक स्वरूप म्हणजेच लोकसाहित्याची सुरुवात होय आणि या परंपरा आज पर्यंत चालू आहेत. मानवाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत लोकसाहित्य हे माणसाच्या बरोबर असतं.
म्हणजे आपल्याला माहिती आहे, आईच्या गर्भात जेव्हा बाळ असतं, तेव्हापासूनच त्याच्यावरती संस्कार केले जातात व त्या बाळाचा जन्म तो मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांचं नाव ठेवणे, त्याचं लग्न, त्याला मुलं होणं आणि नंतर मृत्यू या प्रत्येक घटनेमध्ये लोकसाहित्य हे त्याच्याबरोबर असतं.
म्हणजे लग्नाच्या वेळेला म्हटले जाणारी गाणी, नाव ठेवण्याच्या वेळेला म्हटले जाणारे मंत्र, मृत्यूनंतर किंवा मृत्यूच्या वेळेला श्राद्धामध्ये अशा प्रसंगी म्हटले जाणारे मंत्र असतील, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या लोकसाहित्याची निगडित आहेत किंवा हे सगळे जे आहेत ते लोक साहित्याचे घटक आहेत.
आणि हे जे संस्कार आहेत, जन्म होण्यापासून ते मृत्यू पर्यंत हे सर्व जाती, धर्म, देश, प्रदेश, या सगळ्यांमध्ये हे आहेत. जिथे प्रार्थना नाही, देवधर्म वगैरे नाही, असा कुठलाही देश सापडणार नाही.
त्यामुळे या लोकसाहित्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे आणि मानवाच्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राला यांनी स्पर्श केलेला आहे.
माणसाच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा सुद्धा हे लोक साहित्याचे अंग आहेत. पूर्वी असे समजले जायचे की फक्त ग्रामीण भागातले लोक हे लोकसाहित्य निर्माण करतात.
परंतु, ग्रामीण असो किंवा शहरी असो, सर्वजण लोकसाहित्याची निर्मिती करत असतात. ग्रामीण भागामध्ये लोकसाहित्याची निर्मिती अधिक दिसून येते, कारण तिथे लोक श्रद्धाळू आहेत किंवा धार्मिक आहेत.
सतराव्या शतकात फ्रेंच तत्त्वज्ञ रुसो यांच्या सोशल कॉन्ट्रॅक्ट या ग्रंथानंतर, जगात साधेपणा आणि अकृत्रिमपणा याबद्दल आवड निर्माण झाली.
औद्योगिक क्रांती, शहरांची वाढ, कृत्रिम जीवन पद्धती, सांकेतिकता, यामधून बाहेर पडून जिवंतपणा, साधेपणा, जीवनातील रसरशीतपणा, त्याबद्दल आकर्षण वाटायला लागलं आणि त्याचा शोध याची सुरुवात झाली आणि त्यातूनच ग्रामीण जीवनाची ओढ निर्माण झाली.
लोकभाषा, लोकात प्रचलित असलेली पारंपारिक गाणी, कथा, गीते, लोककथा, यांच्याकडे लक्ष वेधलं गेलं आणि त्यातूनच लोक वाङ्मयाचे संकलन करण्याला सुरुवात झाली आणि त्यामुळे वाङ्मयात नवे युग जन्माला आले आणि अशा प्रकारे लोकसाहित्याच्या अभ्यासाची सुरुवात झाली.
भारतामध्ये लोकसाहित्यासाठी वेगवेगळ्या संज्ञा वापरण्यात आल्या.
- महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी लोकविद्या अशी संज्ञा दिलेली आहे.
- इतिहासाचार्य वि.का राजवडे यांनी लोकगीत किंवा लोककथा अशी ही संज्ञा रूढ केली आहे.
- पंडित रामनरेश त्रिपाठी यांनी ग्रामसाहित्य हि संज्ञा रूढ केली आहे
- वासुदेव शरण अग्रवाल यांनी लोकवार्ता अशी संज्ञा दिलेली आहे.
- त्याचप्रमाणे कृष्णदेव उपाध्याय यांनी लोकसंस्कृती अशी संज्ञा दिलेली आहे.
- इतिहास तज्ञ रांची ढेरे यांनीही लोकसंस्कृती असा शब्द वापरलेला आहे, यासाठी लोकसंस्कृतीचे अध्ययन असा शब्द वापरलेला आहे.
- दुर्गा भागवत यांनी लोकसाहित्य हा शब्द रूढ केला.
संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये ज्या अर्थाने साहित्य ही संज्ञा वापरली जाते, त्या अर्थाने तो लोकसाहित्य असा शब्द रूढ केलेला होता. त्याच बरोबर लोक वाङ्मय किंवा हिंदीमध्ये लोकभारता, लोकयान, लोकधर्म, अश्या संज्ञा वापरल्या गेल्या.
परंतु ह्या फार प्रचलित नाहीत, लोकायन, लोकसंस्कृती, लोकवर्तन असे विविध शब्द लोकसाहित्यासाठी वापरले गेले.
शास्त्रीय वाङ्मय आणि ललित साहित्य
शास्त्रीय वाङ्मय आणि ललित साहित्य हे परस्परांपेक्षा भिन्न असते. यामध्ये नेमका काय फरक आहे? तो समजावून घेऊ. शास्त्रीय साहित्य हे बुद्धीवर अवलंबून असते. त्याचवेळी ललित साहित्य हे मनावर आधारित असते.
शास्त्रीय वाङ्मय विचार, काटेकोरपणा केंद्रस्थानी मानते. तर ललित साहित्यात भावना आणि सौंदर्य हे लेखनाचे केंद्र असते. शास्त्रीय वाङ्मयामध्ये मानवी शास्त्रे, विज्ञान हा मुख्य भाग असतो. तर ललित साहित्यात जीवनातील लालीत्य केंद्रस्थानी असते.
शास्त्रीय वाङ्मयात वास्तव, सत्य, याला विशेष महत्त्व असते. ललित साहित्यात मात्र कल्पकता आणि संवेदनशीलता अधिक महत्त्वाची ठरते.
शास्त्रीय वाङ्मय विज्ञानाशी निगडित असल्याने, इथे व्यक्तिनिर्पेक्षता येते. तर ललित साहित्यात व्यक्ती सापेक्षतेमुळे ललित साहित्यात वैविध्य येते. शास्त्रीय साहित्यात ज्ञान आणि माहिती देणे हा मुख्य हेतू असतो. तर ललित साहित्य हे आनंद आणि वेगळा अनुभव देण्याच्या, हेतूतून निर्माण होते.
शास्त्रीय साहित्य समजण्यासाठी लेखक आणि वाचक यांचा विशिष्ट अभ्यास असणे, आवश्यक असते. ललित साहित्यात मात्र तशी आवश्यकता नसते. वाचक साक्षर असला, तरीही ललित साहित्य समजून घेण्यास ते पुरेसे असते.
शास्त्रीय लेखनावर तुलनेने बंधने आणि मर्यादा अधिक असतात. शास्त्रीय साहित्याच्या तुलनेत मात्र ललित लेखनात लेखकाला अधिक स्वातंत्र्य असते.
शास्त्रीय साहित्यात विषय, निवड, मांडणी, चौकटीतच कराव्या लागत असल्याने, एक विषय मर्यादित स्वरूपात बऱ्याचदा एकच प्रकारे मांडता येतो.
मात्र ललित साहित्यात, विषय आणि मांडणीत फारशी बंधने नसल्याने, वैविध्य भरपूर मिळते. परिणामी, एक विषय विविध प्रकारे मांडता येऊ शकतो.
शास्त्रीय वाङ्मयाची भाषा ही निसंधीग्ध, स्पष्ट आणि ठोस स्वरूपात असावी लागते. तर ललित साहित्याची भाषा, मात्र संधीग्ध असली तरीही चालते. मात्र त्यात वैविध्य हवे. शास्त्रीय साहित्य काटेकोर वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असते.
त्याचवेळी ललित साहित्यात वस्तुनिष्ठतेपेक्षा, व्यक्तिनिष्ठता अधिक असते. शास्त्रीय वाङ्मयात विचार, तर्क आणि अनुमानावर आधारित लेखन असते, त्यामुळे जे घडू शकते, त्याचाच विचार शास्त्रीय वाङ्मय करते. मात्र ललित साहित्यात शास्त्रीय विचार जिथे थांबतो, तिथून पुढे ललित साहित्याचा विचार सुरू होतो.
साहित्य समीक्षा
साहित्याची निर्मिती ही मानवाकडून केली जाते आणि त्यात मानव हाच घटक केंद्रस्थानी असतो. मानवाकडूनच साहित्यातील मानवी जीवनाचे चिंतन होत असते. साहित्य आणि समीक्षा यांच्यात परस्पर संबंध आहेत.
कारण साहित्य हे मानव जीवनाचे चिंतन करते, तर समीक्षा ही साहित्यातून मानवी जीवनाचे चित्रण आणि चिंतन कशाप्रकारे आहे, याचा विचार करते.
साहित्यातून माणसाच्या जगण्याला दृष्टी मिळते, तर समीक्षेतून माणसाच्या जगण्याची दृष्टी कशी असावी, याचा विचार केला जातो. कोणतीही साहित्य कृती निर्माण झाली म्हणजे, त्या साहित्यकृतीची समीक्षा केली जाते.
त्यातून साहित्याला साहित्य पण देण्याचे काम समीक्षा करत असते, म्हणूनच साहित्य विश्वात समीक्षा व्यवहाराला अनन्य साधारण महत्त्व आहे. मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती झाली म्हणजे, त्यावर समीक्षा लेखन होत असते.
समीक्षेतून साहित्य कृतीतील सौंदर्य, स्थळे, जीवन मुल्ये, वांग्मयमूल्य, कशाप्रकारे अविस्कृत झाली आहेत याचा गुणदोषासह परस्पर संबंध समीक्षक घेत असतो.
म्हणजेच वाचक आणि लेखक यांच्यात मध्यस्थाची भूमिका समीक्षकाला पार पाडावी लागते. साहित्याची समीक्षा करताना समीक्षकाचा दृष्टिकोन व्यापक असावा लागतो.
एखाद्या कलाकृतीचे सर्वांगीण आकलन करून, त्यावरील चिंतन मूल्यमापन करणे, असा व्यापक अर्थ साहित्य समीक्षेत घ्यावा लागतो.
FAQ
१. साहित्य म्हणजे काय?
मराठी भाषेतील साहित्य ही संकल्पना, इंग्रजीतील लिटरेचर या शब्दाला पर्यायी म्हणून उपयोजित केली. इंग्रजीतील लिटरेचर शब्दाचा शब्दकोशात अर्थ, कलामूल्य असलेले लेखन होय. साहित्य विशिष्ट विषयावरचे वांग्मय माहिती देणारे, छापील वांग्मय असा आहे. तसेच साहित्य हा शब्द सहीत या धातूपासून निर्माण झालेला असूनही, सहीत चा अर्थ एकत्र ठेवलेले असा आहे. साहित्याचा व्यवहारिक अर्थ, सामान सुमान असाही आहे.
२. कथात्म साहित्य म्हणजे काय ?
कथात्म साहित्य मध्ये घटनांचे कथन केले जाते. आपल्या अवतीभवती घडलेल्या घटनांचा देखील यामध्ये समावेश असतो. त्याचप्रमाणे त्या मानसिक स्वरूपाच्या (काल्पनिक) असू शकतात. निवेदन करणे म्हणजेच कथन करणे, ही गोष्ट कथात्म साहित्यात फार महत्त्वाची असते. घडलेल्या किंवा काल्पनिक घटनांचे कथन या साहित्यात असते. कथात्म साहित्य मध्ये येणाऱ्या घटना भूतकाळातील म्हणजेच घटून गेलेल्या असतात. कथन करणारा म्हणजेच लिहिणारा, कालानुरूप किंवा कार्यकारण भावाने घडून गेलेल्या घटना, अनुभवांचे कथन करतो.
३. शास्त्रीय वाङ्मय आणि ललित साहित्य यामध्ये फरक काय आहे ?
शास्त्रीय वाङ्मयाची भाषा ही निसंधीग्ध, स्पष्ट आणि ठोस स्वरूपात असावी लागते. तर ललित साहित्याची भाषा, मात्र संधीग्ध असली तरीही चालते. मात्र त्यात वैविध्य हवे. शास्त्रीय साहित्य काटेकोर वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असते. त्याचवेळी ललित साहित्यात वस्तुनिष्ठतेपेक्षा, व्यक्तिनिष्ठता अधिक असते. शास्त्रीय वाङ्मयात विचार, तर्क आणि अनुमानावर आधारित लेखन असते, त्यामुळे जे घडू शकते, त्याचाच विचार शास्त्रीय वाङ्मय करते. मात्र ललित साहित्यात शास्त्रीय विचार जिथे थांबतो, तिथून पुढे ललित साहित्याचा विचार सुरू होतो.
४. लोकसाहित्य म्हणजे काय ?
लोकभाषा, लोकात प्रचलित असलेली पारंपारिक गाणी, कथा, गीते, लोककथा, यांच्याकडे लक्ष वेधलं गेलं आणि त्यातूनच लोक वाङ्मयाचे संकलन करण्याला सुरुवात झाली आणि त्यामुळे वाङ्मयात नवे युग जन्माला आले आणि अशा प्रकारे लोकसाहित्याच्या अभ्यासाची सुरुवात झाली.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास साहित्य म्हणजे काय ? या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.