आज पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. जसे की जागतिक तापमान वाढ, लोकसंख्या वाढ, कमी पर्जन्यमान, परंतु या सर्व समस्यांमध्ये प्रदूषण एक अशी समस्या आहे.
ज्या समस्येमुळे बाकीच्या सर्व समस्या उद्भवल्या आहेत. प्रदूषण हे मुख्य कारण आहे, ज्यामुळे आपल्या आसपास तापमान वाढ आणि कमी पर्जन्यमान या समस्या उद्भवल्या आहेत.
प्रदूषण म्हणजेच नैसर्गिक संतुलन यामध्ये दोष निर्माण होऊन संपूर्ण निसर्ग असंतुलित होणे म्हणजेच प्रदूषण. प्रदूषणामुळे आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, आजार उत्पन्न होत चालले आहे.
त्यामुळे प्रदूषण एक समस्या खूप गंभीर रूप धारण करत आहे. प्रदूषण हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. प्रदूषणाचे प्रकार जसे की जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व भूमी प्रदूषण.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास प्रदूषण म्हणजे काय, प्रदूषणाचे प्रकार या बद्दल माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
प्रदूषण म्हणजे काय What Is Pollution Information In Marathi
प्रदूषण म्हणजे काय ?
प्रदूषण हे आजच्या काळात खूप मोठे संकट म्हणून निर्माण झाले आहे. कारण यामुळे अनेक लोकांना आरोग्य समस्या झाल्या आहेत. अलीकडच्या वर्षात प्रदूषणाचा दर अगदी वेगाने वाढत आहे.
हे वाचा –
- बहुगुणी कोरफडीचे फायदे
- इतिहास म्हणजे काय ?
- केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय
- डोळे जड होण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय
कारण औद्योगिक कचरा थेट माती, पाणी आणि हवेत मिसळत आहे, असे असूनही लोक अजूनही प्रदूषण आणि त्याच्या परिणामांना गांभीर्याने घेत नाही आहेत. या मुद्द्याला गांभीर्याने हाताळण्याची नितांत गरज आहे. अन्यथा आपल्या भविष्यातील पिढ्यांना खूप त्रास होऊ शकतो.
प्रदूषण बऱ्याच श्रेणीमध्ये वर्गीकृत केले जाते. प्रदूषणाचे प्रकार जसे वायू प्रदूषण, माती प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण, इत्यादी. या व्यतिरिक्त ही अनेक प्रकारचे प्रदूषण आहे, ज्यामुळे पृथ्वीवरील जीवनाला हानी पोहोचत आहे.
वृक्षतोडी, वाहनांचा अतिवापर, शहरीकरण आणि औद्योगीकरण यामुळे नैसर्गिक वातावरणामध्ये खूप बदल झाला आहे. हानिकारक आणि विषारी कचऱ्यामुळे माती, वायू आणि पाण्यामध्ये अपरिवर्तनीय बदल होतो व पृथ्वीवरील जीवाना त्यांचे घातक परिणाम सोसावे लागतात.
प्रदूषण रोखण्यात आणि कमी करण्यात योगदान देण्याचे कर्तव्यात प्रत्येकाचे आहे आणि हे कर्तव्य पूर्ण केल्यानंतरच आपण पुढच्या पिढ्यांना प्रदूषण मुक्त वातावरण देऊ शकतो.
प्रदूषणाची कारणे कोणती आहेत ?
- प्रदूषणाचा या बिकट समस्येचे मूळ म्हणजे औद्योगिक क्रांती आणि वाढती लोकसंख्या, गिरणी, कारखाने आणि वाहनांमधून निघणारा धूर, वातावरणाला दूषित बनवत आहे.
- गॅस प्लांट मधून होणाऱ्या गॅस गळतीच्या दुर्घटनांमुळे, वातावरण भयंकर दूषित बनत आहे.
- रासायनिकच्रा औद्योगिक वसाहतींमधून निघणारा कचरा आणि गटारांचे पाणी नद्या, तलाव आणि समुद्रांच्या पाण्याला दूषित बनवत आहे.
- ट्रेन, विमान, मोटार, रेडिओ, दूरदर्शन आणि लाऊड स्पीकर मधून निघणारे ध्वनी, ध्वनी प्रदूषण वाढवित आहेत. फटाके आणि बॉम्ब हे ध्वनी प्रदूषण वाढविण्यास हातभार लावत आहेत.
- शहरांमधील वस्ती यांत्रिकीकरणाची वाढती प्रवृत्ती आणि जंगले, झाडे यांचा नाश हि प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत.
प्रदूषणाचे परिणाम
प्रत्येक प्रकारचे प्रदूषण हे पृथ्वीवरील जीवनाचे शत्रू आहे. वायु प्रदूषणामुळे वातावरणामध्ये कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीला वातावरणातील महत्त्वाचा घटक ओझोन वायू ही तीव्र प्रमाणात कमी होत आहे.
पृथ्वीच्या अनियमित तापमानामुळे ऋतुचे बदल देखील विचलित होत आहे. हवा आणि पाण्याच्या प्रदूषणामुळे, विविध प्रकारचे रोग पसरत आहे. शेती नष्ट होत आहे. पृथ्वीची सुपीकता कमी होत आहे. ध्वनी प्रदूषणामुळे माणूस बहिरापणा, निद्रानाश, रक्तदाब आणि मानसिक रोगांना बळी पडत आहे.
प्रदूषण कमी करण्याचे उपाय
प्रदूषण एक समस्या पासून मानव जातीला वाचवायचे असेल तर, प्रदूषण कमी करण्याचे उपाय करणे खूपच आवश्यक आहे. प्रदूषणापासून पूर्णपणे मुक्त होणे शक्य नाही, परंतु ते कमी केले जाऊ शकते. यासाठी लोकांमध्ये जनजागृती करावी लागेल, वृक्षतोड थांबवावी लागेल आणि वृक्ष लागवडीला प्रोत्साहन द्यावे लागेल.
जर आपण हुशारीने काम केले तर, आम्ही लोकसंख्येच्या वाढीचा दर कमी करू शकतो आणि उपकरणाच्या वापरांवर नियंत्रण ठेवू शकतो. त्यामुळे आपण प्रदूषणाच्या समस्येवर बऱ्याच अंशी विजय प्राप्त करू शकतो.
प्रदुषणाचे प्रकार
जलप्रदूषण, कारणे, परिणाम, उपाय योजना
मित्रांनो तुम्ही पावसाळ्यामध्ये पाणी उकळून प्यावे, पावसाळ्यामध्ये वेगवेगळे साथीचे आजार येत असतात, याविषयीची तुम्हाला माहिती आहे. परंतु, हे साथीचे आजार का येतात आणि हे पावसाळ्यातच का येतात ?
त्याचे एक महत्त्वाचं कारण म्हणजे जलप्रदूषण आहे. पाणी हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्याचे परिणाम सुद्धा तेवढेच खोल होत असतात.
नैसर्गिक व बाह्य घटकाच्या मिश्रणाने, पाणी जेव्हा अस्वच्छ, विषारी होते, तेव्हा त्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटते आणि सजीवांना अपाय होतो. त्यालाच आपण “जलप्रदूषण” म्हणतात.
म्हणजेच नैसर्गिक स्वच्छ पाण्यामध्ये जेव्हा, बाहेरचे नको असलेले घटक मिसळले जातात आणि पाणी, पाणी न राहता ते विषारी पाणी बनते आणि ते मानवी जीवनावर किंवा नैसर्गिक परिसंस्थेवर अतिशय घातक परिणाम करते, त्यालाच आपण जलप्रदूषण असे म्हणतो.
जलप्रदूषणाची प्रमुख कारणे कोणती ?
जलपर्णीची वाढ हे एक जलप्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. पावसाच्या पाण्याचा साठा झाल्या, नंतर जलपर्णी वनस्पतीची वाढ होते आणि मग जलपर्णी वनस्पती पाण्यामध्ये असलेले जे ऑक्सिजनचे प्रमाण आहे, ते प्रमाण स्वतः वापरते आणि त्यामुळे पाण्यामधील प्राणवायूचे प्रमाण किंवा ऑक्सिजनचे प्रमाण कमी होतं.
त्यानंतर या जलपर्णीमुळे पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म सुद्धा बदलतो, म्हणजे जलपर्णी हे जलप्रदूषणाचा एक महत्त्वाचा नैसर्गिक स्त्रोत आहे किंवा प्रमुख कारण आहे.
कारखान्यातील सांडपाणी, कापड, साखर, कागद, लोह, चर्मोद्योग, दुग्ध प्रक्रिया उद्योगातून रंग विरंजक रसायने, चांबड्याचे तुकडे, तंतू, पारा, शिसे, इत्यादी. सांडपाण्यामध्ये पाण्यामध्ये सोडले जातात आणि यामुळे पाण्याचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत असतं.
हे दुषित पाणी नदीच्या प्रवाहामध्ये किंवा जलसाठा मध्ये सोडलेली जातात. त्यामुळे या पाण्यापासून, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जलप्रदूषण होत असते आणि हेच पाणी पुढे जाऊन, जेव्हा पिकांना देतो किंवा सजीव वापरतात, त्या सर्वांच्या जीवाला यापासून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण होतो. म्हणजे कारखान्यातील सांडपाणी हे एक जलप्रदूषणाचे महत्त्वाचं कारण आहे.
गावातील किंवा शहरातील सांडपाणी नदीच्या वाहत्या जलप्रवाहात सोडले जाते, त्यामुळे नदीचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होते आणि गावाच्या सांडपाण्याद्वारे किंवा सांडपाण्यामधून गटार, छोटे छोटे नाले, गावातून आलेले नदीच्या प्रवाहाला मिळतात.
या छोट्या नाल्यांमध्ये या किंवा गटारामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, कॅरीबॅग्स किंवा वापरून फेकून दिलेले प्लास्टिकचे समान, या सर्वांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समावेश असतो आणि हा सगळा घनकचरा पाण्यामध्ये येऊन मिसळतो आणि त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होते.
खते व कीटकनाशक यांच्या वापरातून, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जलप्रदूषण होते. कारण खते व कीटकनाशके बऱ्याच वेळा डायरेक्ट पाण्यामध्ये विरघळतात आणि त्यापासून जलप्रदूषण होते आणि बऱ्याच वेळा खते व कीटकनाशके यांचे वापर केलेल्या ज्या वस्तू आहेत, त्या नदीच्या पात्रामध्ये धुतल्या जातात आणि त्यापासूनही मोठ्या प्रमाणामध्ये जलप्रदूषण होत असते.
जलप्रदूषणाचे जीवनावर होणारे दुष्परिणाम
पाणी प्रदूषणाचे मानवी जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होत असतात. प्रदूषित पाण्यामुळे अतिसार, कावीळ, विषमज्वर, गोवर, त्वचारोग आणि पचनसंस्थेचे विविध आजार सुद्धा होत असतात. त्यानंतर यकृत, मूत्रपिंड, मेंदू विकार, हाडांमध्ये विकृती, निर्माण होणे आणि उच्च रक्तदाब हे आजार जलप्रदूषणामुळे निर्माण होतात.
जलप्रदूषणाचा परिसंस्थेवर अपायकारक परिणाम होतो. वनस्पतीची वाढ खुंटते, वनस्पतीच्या विविध प्रजातीचा नाश होतो, अशा पद्धतीने अत्यंत घातक असा परिणाम वनस्पतीवर सुद्धा या जलप्रदूषणाचा होत असतो.
जल प्रदूषणावरील उपाय योजना
- कारखान्यातील रासायनिक पदार्थ पाण्यात सोडण्यापूर्वी त्यांच्यावर योग्य प्रक्रिया करून, आपण बाहेर टाकावे, जेणेकरून बाहेरील पर्यावरणाला त्याची हानी होणार नाही, तर नुकसान कमी होईल.
- मानवी सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करा व पाण्यात सोडण्यापूर्वी त्यावर विशेष क्रिया करून नंतरच पाण्यामध्ये सोडावं.
- खनिज तेलाच्या गळतीमुळे, पाण्याचा होणारे प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.
- पिण्याच्या पानाचे प्रशिक्षण परीक्षण करून, नंतरच ते पिण्यासाठी वापरणं अत्यंत गरजेच आहे.
- किरणोत्सारी अपशिशष्ठांना पाण्यामध्ये सोडण्याखेरीस, एका ठिकाणी बंदिस्त करून ठेवण्याच्या पद्धतीवर जर भर दिला, तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला जलप्रदूषण थांबवता येईल.
वायूप्रदूषण, कारणे, परिणाम, उपाय योजना
प्रदूषणाचे प्रकार – वायु प्रदूषण म्हणजे वातावरणाचे प्रदूषण. मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचा हिस्सा असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीव, जंतू, इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळून जातात, तेव्हा वायू प्रदूषण झाल्याचे समजण्यात येते.
मानवी आरोग्यास हानिकारक आहे ते वातावरणातील घटक वायू प्रदूषणास जबाबदार आहेत, असे पूर्वी समजले जात असे. कालांतराने वायू प्रदूषणाची व्याख्या तर इतर प्राण्यांना, पक्षांना व वनस्पतींना हानिकारक असलेला घटकांनाही लागू झाली.
सध्याच्या युगात हवामान बदलास जबाबदार असणारे घटक हे देखील वायू प्रदूषणाला कारणीभूत असल्याचे मानले जाते.
प्रदूषक घटके
- नैसर्गिक हवेतील जे पदार्थ अथवा घटक, मानवी, प्राणी, पक्षी, वनस्पती, उपयुक्त जंतू, यांच्या आरोग्यास व जीवनास हानिकारक आहेत, तसेच ते हवामानात बदलास कारणीभूत आहे, त्यांना प्रदूषक घटक असे म्हणतात.
- ज्यामध्ये सल्फरडाय ऑक्साईड व डाऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड व डाऑक्साइड, ओझोन, कार्बन मोनॉक्साईड, धुलीकन, व्होलेटाइल ऑरगॅनिक कंपाऊंड, इत्यादींचा समावेश होतो.
हवामान बदलास जबाबदार घटक
वरील प्रदूषक घटकांचे वातावरणातील वाढलेल्या प्रमाणाला बहुतांशी मानव जबाबदार आहे. या घटकांचा प्रभाव मानवी आरोग्यावर पटकन दिसून येतो, मात्र निसर्गातील काही घटक या प्रदूषण घटकांचे प्रमाण कमी करण्यास सातत्याने मदत करत असतात.
वरील सर्व घटकांचा वातावरणात टिकून राहण्याची क्षमता काही मिनिटांपासून ते सहा महिन्यांपर्यंत असते. याचा अर्थ प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना योजल्यास त्याचे परिणाम काही महिन्यातच दिसून येतात.
परंतु, काही घटक हे वातावरणात कित्येक वर्ष, दशके, किंबहुना शतके टिकून राहतात व हेच घटक मुख्यत्वे हवामान बदलास जबाबदार आहेत. हवामान बदलांमध्ये जागतिक तापमान वाढ, ही सर्वात चिंताजनक बाब आहे व इतर बदल हे सयुक्तीपणे अपेक्षित आहे.
वायु प्रदूषणाचे स्त्रोत
नैसर्गिक स्त्रोत
ज्वालामुखी यामध्ये सल्फरडाय ऑक्साईड व डाऑक्साइड, इतर अनेक वायू व मोठ्या प्रमाणावरील धुली कण तसेच दलदलीतील मिथेन वायू तसेच, नैसर्गिक रित्या लागणारे जंगलातील वणवे, कार्बन डाऑक्साइड व सूक्ष्म धूलिकण हे घटक प्रदूषणासाठी कारणीभूत असतात.
मानवनिर्मित स्त्रोत
वाहनांमधून निघणारा नायट्रोजन ऑक्साईड व डाऑक्साइड, व्हीओसी, कार्बन मोनॉक्साईड व डाऑक्साइड सूक्ष्म वती सूक्ष्म धुलिकण, तसेच कारखान्यांमधून निघणारे व्हीओसी व कार्बन डाय-ऑक्साइड असे वायू या घटकांमुळे वायू प्रदूषण होते.
तसेच कचरा व सांडपाणी यामधून, मिथेन हा वायू वायूमध्ये मिसळतो. तसेच पेट्रोल पंप यामधून व्हीओसी व शेतीजन उत्पादनातून तयार होणारे व्हीओसी, शेतामधील कामातून तयार होणारे धुली कण इत्यादींमुळे वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते.
वायु प्रदूषणावरील उपाय योजना
वायु प्रदूषणात प्रदूषके एका जागी तयार होतात. केंद्रीय उत्सर्जनात व सर्वत्र थोड्या थोड्या प्रमाणात सार्वत्रिक उत्सर्जन तयार होतात. केंद्रीय उत्सर्जन होण्याचे उदाहरण म्हणजे, औद्योगिक ठिकाणे वीज निर्मिती कारखाने तर सार्वत्रिक उत्सर्जनाचे उदाहरण, आपली वाहतूक व्यवस्था धरता येईल.
जर प्रदूषण एकाच जागी होत असेल तर, त्यावर नियंत्रण मिळवणे सोपे असते. परंतु सर्वत्र थोड्या थोड्या प्रमाणात होणाऱ्या सार्वत्रिक उत्सर्जन प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे हे खूपच अवघड आहे. विविध प्रकारचे कडक कायदे यांनी औद्योगिक क्षेत्रातून होणाऱ्या, प्रदूषणावर विकसित देशात बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवले आहे.
परंतु भारत व इतर विकसनशील देशांमध्ये, अजूनही म्हणावीत इतके यश मिळालेले नाही. कायद्याची कडक अंमलबजावणी, मधील त्रुटी तंत्रज्ञान वापरण्याबद्दल असलेली आर्थिक उदासीनता व माहितीचा अभाव ही याची मुख्य कारणे आहेत.
सार्वत्रिक उत्सर्जनाच्या प्रदूषणावर तंत्रज्ञानातील सुधारणा व ऊर्जेचा कमी वापर यातून सुधारणा करता येते. सध्याच्या विकसनशील देशाची वाढती अर्थव्यवस्था व ऊर्जेचा वाढता वापर, तसेच विकसित देशातील दरडोई असलेल्या मोठ्या प्रमाणावरील वापर, यामुळे ऊर्जेचा वापर कमी होणे सध्या तरी अशक्य दिसत आहे.
यामुळे तंत्रज्ञानातील सुधारणा व प्रदूषण रहित नवीन व स्वस्थ ऊर्जा स्त्रोताचा शोध यावर अवलंबून राहणे, आवश्यक आहे. वाहनांमध्ये तंत्रज्ञान सुधारण्यास मोठा वाव आहे. विविध प्रकारचे कॅटेलिटीक कन्वर्टर, फिल्टर यांच्या वापराने वाहनातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येते.
ध्वनीप्रदूषण, कारणे, परिणाम, उपाय योजना
प्रदूषणाचे प्रकार – हवा, जल, प्रदूषणा इतकीच ध्वनी प्रदूषण ही महत्त्वाची समस्या आहे. आवाजाची तीव्रता, ठराविक मर्यादी पलीकडे गेल्यानंतर तो आवाज ऐकायला नकोसा होतो.
यालाच आपण गोंगाट असे म्हणतो. थोडक्यात गोंगाट म्हणजे ध्वनी प्रदूषण किंवा आवाजाचे प्रदूषण होय. आधुनिक, नागरी जीवन व वाढती लोकसंख्या, उदयोगधंदे, स्वयंचलित वाहने, उत्सव, विविध कार्यक्रम, फेरीवाले, भोंगे, इत्यादींमुळे ध्वनी प्रदूषण ही समस्या शहरी भागात गंभीर समस्या बनली आहे.
कर्ण मधुर आवाज माणसाला हवासा वाटतो, परंतु कर्कश आवाज हा नकोसा वाटतो. कानाला नकोसा वाटणारा आवाज हा त्रासदायक, संतापजनक, दुःख जनक व निद्रानाशक असतो. अशा आवाजाला ध्वनी प्रदूषण असे म्हणतात.
ध्वनीच्या तीव्रतेचे मापन अलेक्झांडर ग्राहम बेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डेसिबल हे एकक आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी रूढ झाले आहे. डेसिबल हे एकक लॉगेरीथमिक एकक असून, एक दशांश बेल म्हणजे एक डेसिबल होय.
ध्वनी प्रदूषणाची कारणे
ध्वनी प्रदूषणाची खालील मुख्य दोन कारणे आहेत.
नैसर्गिक परिणाम
यामध्ये वादळ, पाऊस, भूकंप, विजांचा कडकडाट, भूमीपात, ढगांचा गडगडाट, इत्यादी. आवाज येतात.
मानवनिर्मित परिणाम
यामध्ये कारखान्यातील यंत्रांचा खडकडाट, स्वयंचलित वाहने, आवाज, घरगुती उपकरणाचा आवाज, जत्रा, उत्सवातले ध्वनी क्षेपक, ढोल ताशांचा आवाज, रेडिओ, टीव्ही, फ्रिज, बाजार मिरवणुका, घोषणा, भाषणे, फेरीवाले, तमाशा वाले, प्राण्यांचे भुंकणे, रेल्वेचा खडखडाट, विमान वाहतूक, कृत्रिम उपग्रहाचे प्रक्षेपण, फटाके व संरक्षण, साहित्याचे स्पोर्ट, इत्यादींच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण घडून येते.
ध्वनी प्रदूषणाचे परिणाम
ध्वनी प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर विपरीत स्वरूपाचे परिणाम होतात. मानवी आरोग्याप्रमाणे वनस्पतीवर देखील ध्वनी प्रदूषणाचा परिणाम होतो. सर्वसाधारणपणे ध्वनी प्रदूषणाचे परिणाम पुढीलप्रमाणे आहेत.
कायम गोंगाटात राहिल्यामुळे, माणसाच्या श्रवणशक्तीवर विपरीत परिणाम होऊन, बहिरेपणा येतो. ध्वनी प्रदूषणामुळे मन स्वास्थ बिघडते व माणसाचा स्वभाव चिडखोर होतो. तसेच मानसिक अस्वस्थामुळे अनु उत्साह निद्रानाश, अपचन व कामाची कार्यक्षमता मंदावते.
मानवी शरीरातील चयापचय क्रियांमध्ये बिघाड होऊन, शारीरिक स्वास्थ्य हळूहळू बिघडू लागते. त्यामुळे अपचन, अपश्वसन, अनियमित रक्ताभिसरण, यांसारखे गंभीर परिणाम जाणवतात.
कारखान्यातल्या यांत्रिक धडधडाटाच्या आवाजाविरुद्ध पुरेशी संरक्षक यंत्रणात तेथे नसल्यास, कामगारांवर अल्पावधीतच बहिरेपणा, रक्तदाब, हृदयविकाराचे भयानक परिणाम जाणवू लागतात. जास्त गोंगाट राहिल्यामुळे डोकेदुखी, मळमळ, अस्वस्थता, लहरीपणा, चिडकेपणा, इत्यादी लक्षणे दिसतात.
ध्वनी प्रदूषणामुळे दमानिद्रानाश विस्मरण बुद्धिभ्रंश यांसारख्या असाध्यव्याधी कायमच्या आहे जडतात.
ध्वनीप्रदूषण यावर मात करण्यासाठी, काही लोक झोपेच्या गोळ्या, नशा, पाणी, धूम्रपान, करतात. त्यातून त्यांना मादक पदार्थ सेवनाची सवय लागते. ध्वनी प्रदूषणामुळे गर्भवती स्त्रियांवर, गर्भावर, अनिष्ट परिणाम होऊन गर्भाची वाढ खुंटते. काही वैद्यकीय तज्ञांच्या मते, ध्वनी प्रदूषणाचा लैंगिक क्षमतेवरही परिणाम होतो.
गोंगाटामुळे रक्तदाब वाढतो. प्रसंगी घाम येणे, चक्कर येणे, थकवा येणे, इत्यादी लक्षणे दिसू लागतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, तर काही जणांमध्ये मानसिक विकृती देखील निर्माण होऊ शकते. अशा प्रकारे हे परिणाम सामान्यपणे ध्वनी प्रदूषणामुळे पहावयास मिळतात.
ध्वनी प्रदूषणाचे नियंत्रण उपाय
ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी सर्वप्रथम वेगवेगळ्या प्रसार माध्यमांद्वारे जनजागृती करून, ध्वनी प्रदूषणाच्या भीषण रुपाची ओळख सर्वसामान्य जनतेला करून देणे व त्यावर विविध उपाय सुचवणे व त्यातून ध्वनी प्रदूषण कमीत कमी कसे होईल, हे पाहणे त्यासाठी जनजागृती हाच ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचा भाग आहे.
स्वयंचलित वाहनांना सायलेन्सर बसवणे, वाहन वेगावर मर्यादा घालणे, सायलेन्स झोन निर्माण करणे व त्यात फोन वाजवून, शांतता भंग करणाऱ्यावर कठोर कारवाई करणे व विचित्र आवाजांचे हॉर्न वाजवणाऱ्या वाहन चालकावर कडक कारवाई करणे, विविध वाहनांची देखभाल नियमितपणे होणे आवश्यक आहे. वाहनांची योग्य वेळी देखभाल व दुरुस्ती चांगली केली तर ध्वनी प्रदूषण कमी होते.
सार्वजनिक ठिकाणी ध्वनीक्षेपकावरील विशिष्ट बंधन काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे. सुधारित गणित अवरोधक तंत्र वापरून इमारतीचे बांधकाम करणे, ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी कडक कायदे करणे, ध्वनी अवोधक यंत्रणे करणे, ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी समाज जागृती करणे, गरजेचे आहे.
घरच्या पुढच्या बाजूला डेरेदार वृक्ष लावावे, त्यामुळे ध्वनी मार्गात अडथळे आल्याने, ध्वनी तीव्रता मंदावते. आवाजाचे परिवर्तन कमी व्हावे, या उद्देशाने भिंतीवर आच्छादन केल्यास, ध्वनी नियंत्रण होऊ शकतो. तसेच घरातील टीव्ही, टेप, रेडिओ, इत्यादींचा आवाज अतिशय कमी ठेवावा.
म्हणजेच ध्वनी प्रदूषण कमी होईल. रेल्वे स्थानक, विमानतळ व बस स्थानके, आदी मोठ्या आवाजांची उगमस्थाने दाट लोकवस्ती पासून, शक्यतो दूर असवित.
मृदाप्रदूषण, कारणे, परिणाम, उपाय योजना
प्रदूषणाचे प्रकार – प्रदूषण म्हणजे प्रदूषकांमुळे पर्यावरणाला जी हानी पोहोचते, त्या क्रियेला प्रदूषण असे म्हणतात आणि प्रदूषण हे नेहमी प्रदूषकांमुळे घडतं.
प्रदूषक हे मानवनिर्मित सुद्धा असू शकतात. नैसर्गिक मातीमध्ये होत असलेल्या प्रदूषणाला “मृदा प्रदूषण” असे म्हणतात. मृदा प्रदूषण हे सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर, सुपीक जमीन नापीक जमिनीत रूपांतरित होण्याचा प्रक्रियेला, मृदा प्रदूषण म्हणतात.
मृदा प्रदूषणाची कारणे
कारखान्यांमधून सोडले जाणारे केमिकल युक्त द्रव्य, जेव्हा जमिनीत मिसळत आणि केमिकल जमिनीत गेल्यामुळे, त्या जमिनीला पूर्णपणे नापीक बनवून टाकत आणि जमीन नापीक झाल्यानंतर, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पीक आपल्याला घेता येत नाही.
शेतीत फवारलेल्या कीटकनाशकांमध्ये असलेले केमिकल, जेव्हा जमिनीत जाते, तेव्हा तेच केमिकल पिकांमध्ये जाते आणि तेथील जमीन पूर्णपणे केमिकल युक्त बनते आणि ते थेट आपल्या जेवणातून आपल्या पोटामध्ये जाऊन, वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देतात.
शहरीकरण बऱ्याच प्रमाणात वाढत आहे आणि शहरीकरण वाढत असल्यामुळे, कारखान्यांची संख्या ही भरपूर प्रमाणात वाढत आहे आणि अशाच कारखान्यांमधून सोडले जाणारे जे केमिकल युक्त द्रव्य राहत तर हे पाणी कुठे ना कुठे जमिनीमध्ये मुरते आणि त्या ठिकाणची जमीन ही प्रदूषित होत असते.
कीटकनाशक, आता तुम्ही म्हणाल कीटकनाशकांचा आणि मृदा प्रदूषणाचा संबंध काय आहे ? तर शेतीमध्ये पिकांवर बरेचदा काही कीटकनाशक फवारली जातात, त्यामुळे कीटकनाशकांमध्ये असलेले केमिकल हे जमिनीमध्ये मिसळतात आणि त्यामुळे सुद्धा मृदा प्रदूषण होते.
कचरा जाळण्याने वायू प्रदूषणही होतं, पण कचरा जाळल्यामुळे मृदा प्रदूषण सुद्धा तितक्याच प्रमाणात होत. ज्याप्रमाणे कचऱ्यामध्ये वेगवेगळे घटक राहतात, काही हानिकारक गोष्टी असतील, तो कचरा आपण जळतो त्यावेळी वायू प्रदूषण तर होतेच, पण त्या ठिकाणची मृदासुद्धा प्रदूषित होत असते.
जंगल तोडीमुळे सुद्धा मृदा प्रदूषण होते. कारण झाडा तोडल्यानंतर, जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होताना आपल्याला दिसते आणि जमिनीची धूप झाल्यानंतर, तिथल्या मातीचे प्रमाण कमी कमी होत जाते आणि खाली राहिलेले जे विषारी घटक आहेत, हे विषारी घटक वर येऊ लागतात. त्यामुळे सुद्धा मृदा प्रदूषण वाढण्यास मदत होते आहे.
शेतीतील पिकांना गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्याने सुद्धा मृदा प्रदूषण होते.
मृदा प्रदूषणाचे परिणाम काय आहे ?
कारखान्यांमधून सोडले जाणारे केमिकल युक्त द्रव्य, शेतात फवारलेले कीटकनाशक आणि इतर आणखी जे काही केमिकल युक्त द्रव्य असतात, जे जमीन शोषून घेते, या कारणामुळे आपण ज्यावेळी विहिरी किंवा बोरिंग यामधून जेव्हा पाण्याचा उपसा करतो, तेव्हा ते पाणी सुद्धा दूषित झालेले आपल्याला दिसते.
मृदा प्रदूषणावरील उपाय
कारखान्यांमधून येणाऱ्या पाण्यावर, योग्य प्रक्रिया करून त्या पाण्याला बाहेर सोडावे.
शेतीमध्ये जितके जमेल तितके सेंद्रिय खतांचा वापर करणे.
शेतीतील पिकांना आवश्यक तितकेच पाणी देणे अथवा ठिबक सिंचनाच्या वापराला महत्व देणे.
मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करणे, जेणेकरून जमिनीची धूप होणार नाही.
कचरा जाळण्यापेक्षा त्याचे योग्य व्यवस्थापन करणे.
FAQ
१. 100 शब्दांत प्रदूषण म्हणजे काय?
आज पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. जसे की जागतिक तापमान वाढ, लोकसंख्या वाढ, कमी पर्जन्यमान, परंतु या सर्व समस्यांमध्ये प्रदूषण एक अशी समस्या आहे. ज्या समस्येमुळे बाकीच्या सर्व समस्या उद्भवल्या आहेत.
प्रदूषण हे मुख्य कारण आहे, ज्यामुळे आपल्या आसपास तापमान वाढ आणि कमी पर्जन्यमान या समस्या उद्भवल्या आहेत.
प्रदूषण म्हणजेच नैसर्गिक संतुलन यामध्ये दोष निर्माण होऊन संपूर्ण निसर्ग असंतुलित होणे म्हणजेच प्रदूषण.
प्रदूषणामुळे आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, आजार उत्पन्न होत चालले आहे. त्यामुळे प्रदूषण एक समस्या खूप गंभीर रूप धारण करत आहे. प्रदूषण हे वेगवेगळ्या प्रकारचे असते. प्रदूषणाचे प्रकार जसे की जल प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण व भूमी प्रदूषण.
२. 4 प्रकारचे प्रदूषण कोणते?
प्रदूषण बऱ्याच श्रेणीमध्ये वर्गीकृत केले जाते. प्रदूषणाचे प्रकार – जसे वायू प्रदूषण, माती प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण, इत्यादी. या व्यतिरिक्त ही अनेक प्रकारचे प्रदूषण आहे, ज्यामुळे पृथ्वीवरील जीवनाला हानी पोहोचत आहे.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास प्रदूषण म्हणजे काय ? प्रदूषणाचे प्रकार या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा.