ALESHWAR INFORMATION IN MARATHI LANGUAGE : महाबळेश्वर पर्यटन स्थळ संपूर्ण माहिती :- महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील प्रमुख आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचे लोकप्रिय पर्यटन स्थळ असून हे समुद्रसपाटीपासून जवळपास १३७२ मीटर इतक्या उंचीवर वसलेले आहे. हे ठिकाण महाराष्ट्राचे सिमला म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक उन्हाळ्यात आणि दिवाळीच्या सुट्टीत सहलीसाठी या ठिकाणी आवर्जून येत असतात.
महाबळेश्वर संपूर्ण माहिती मराठी | MAHABALESHWAR INFORMATION IN MARATHI LANGUAGE
स्थान – | महाबळेश्वर |
जिल्हा – | सातारा जिल्हा |
राज्य – | महाराष्ट्र |
पिन कोड – | ४१२८०६ |
ऊंची – | १४३८ मीटर |
पर्यटन वैशिष्ट्य – | थंड हवेचे ठिकाण |
महाबळेश्वर स्थान आणि नकाशा
महाबळेश्वर भौगोलिक रचना
- महाबळेश्वराची सरासरी उंची १३५३ मीटर म्हणजे ४४३९ फूट आहे.
- जवळपास १५० वर्ग किलोमीटर असे या पठाराचे क्षेत्रफळ आहे.
- या पठाराच्या आजूबाजूंना खोल दऱ्या आहेत. माल्कम पेठ, श्री क्षेत्र जुने महाबळेश्वर, शिंदोळचा भाग अशा तीन गावांचे बनलेले हे शहर आहे.
- विल्सन पॉईंट किंवा सनराइज् पॉईंट म्हणून ओळखले जाणारे ठिकाण १४३९ मीटर उंच आहे.
- महाबळेश्वर मध्ये कृष्णा नदीचे उगम स्थान आहे. ही नदी आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा चार राज्यातून जाते.
- पुराण काळातील शिव मंदिराच्या गोमुखातून नदीचा उगम झाल्याची आख्यायिका आहे. याच गोमुखातून आणखी चार नद्यांचे आहे उगम स्थान आहे असे मानतात.
- त्या नद्या म्हणजे गायत्री, सावित्री, वेण्णा आणि कोयना. या पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळतात.
- महाबळेश्वरमधील थंड तापमान स्ट्रॉबेरी उत्पन्नासाठी योग्य आहे. यामुळे महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीची पंढरी असेही म्हटले जाते. भारत देशातील एकूण स्ट्रॉबेरी उत्पन्न पैकी ८५ टक्के उत्पन्न हे एकट्या महाबळेश्वरमध्ये होते.
मुख्य शहर ते महाबळेश्वर अंतर
- मुंबई ते महाबळेश्वर अंतर व आवश्यक कालावधी – मुंबई ते महाबळेश्वर हे अंतर साधारणतः २६५ किलोमीटर एवढे असून यासाठी तुम्हाला ५.५ तास लागू शकतात.
- पुणे ते महाबळेश्वर अंतर व आवश्यक कालावधी – पुणे ते महाबळेश्वर हे अंतर साधारणतः १२५ किलोमीटर इतके असून यासाठी तुम्हाला अंदाजे ३ तास लागू शकतात.
महाबळेश्वर फिरण्यासाठी लागणारा कालावधी
महाबळेश्वर जवळील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी साधारणतः तुम्हाला चार ते पाच दिवस लागू शकतात.
आमचे हे लेख नक्की वाचा 👇
- पावसाळ्यातील ३० अप्रतिम पर्यटन स्थळे – महाराष्ट्र – भाग ०१
- पावसाळ्यातील ३० अप्रतिम पर्यटन स्थळे – महाराष्ट्र – भाग ०२
महाबळेश्वरचा इतिहास
- इतिहास इसवी सन १२१५ मध्ये देवगिरीचे राजे हे महाबळेश्वरला आले होते. इथे कृष्णा नदीच्या काठी त्यांनी एक छोटे जलाशय आणि मंदिर बांधले.
- सोळाव्या शतकात महाबळेश्वर येथे चंद्रराव मोरे यांचे राज्य प्रस्थापित झाले
- १८१९ मध्ये ब्रिटिशांनी साताऱ्यांच्या छत्रपतींच्या अंमलाखाली सर्व डोंगरी भाग आणला. त्यावेळी कर्नल लॉडवीक हे सातार संस्थानात अधिकारी होते.
- १८२४ मध्ये भारतीय मदतनिसांना घेऊन ते एका उंच पॉइंट पर्यंत पोहोचले. तो पॉईंट आता लॉडवीक पॉईंट म्हणून ओळखला जातो.
- इसवी सन १८२८ नंतर ऋग्वेद, माऊंट स्टुअर्ट एल्फिंस्टन, आर्थर मॅलेट, करणक, फ्रेरे अशा अनेक जणांनी महाबळेश्वरला भेट दिली.
- इथे पूर्वी माल्कम पेठ नावाने ओळख झालेली बाजारपेठ म्हणजे आताची महाबळेश्वर बाजारपेठ.
- १८८४ मध्ये येथे एक आलिशान निवासस्थान खरेदी केले गेले. हे निवासस्थान राजभवन म्हणून ओळखले जाते. आणि इथे महाराष्ट्राचे राज्यपाल उन्हाळ्यात निवास करतात.
- येथे असलेली मंदिरे प्राचीन भारतीय वास्तुकलेचे दर्शन घडवतात.
- पूर्वीच्या काळी ब्रिटिश या थंड हवेच्या ठिकाणी आरामासाठी येत असत. त्यामुळे इथे असलेल्या पॉईंट्सना अजूनही ब्रिटिश ब्रिटिशांची नावे दिलेली आहेत.
महाबळेश्वरमध्ये करण्यासारख्या गोष्टी
१. महाबळेश्वर मधील लोकप्रिय ठिकाणांना भेट देणे
महाबळेश्वर मध्ये विविध विहंगम व आश्चर्यकारक पॉईंट्स आहे. जिथून तुम्ही निसर्गरम्य दृश्यांचा अविस्मरणीय आनंद व अनुभव घेऊ शकता. या ठिकाणी असणारे सूर्यास्त, सूर्योदय तुमच्या प्रियजनांसोबत बसून न्याहाळू शकता, त्यापैकी खालील पॉईंट तुम्ही एक्सप्लोर करू शकता –
- विल्सन पॉईंट
- मुंबई पॉईंट किंवा बॉम्बे पॉईंट
- ऑर्थर सीट पॉईंट
- एलिफंट हेड पॉईंट
- काटेस पॉईंट
- इको पॉइंट
२. मॅप्रो गार्डनला भेट देणे
मॅप्रो गार्डन हे महाबळेश्वर मधील मॅप्रो या संस्थेने स्थापन केलेले उद्यान आहे. यामध्ये विविध प्रकारच्या फळांपासून उत्पादन घेऊन, त्या उत्पादनाची बाजारात विक्री केली जाते. या उद्यानामध्ये चॉकलेट फॅक्टरी, मॅप्रो उत्पादनाचे आऊटलेट, रेस्टॉरंट, मुलांच्या खेळण्याचे क्षेत्र इत्यादी आहे. या मॅप्रो गार्डनमध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी पासून बनवलेले ज्यूस व इतर पदार्थ चाखू शकता. त्याचप्रमाणे रिटेल आउटलेट मधून जाम सिरप, ज्यूस अशा विविध प्रक्रिया केलेल्या वस्तू खरेदी करू शकता.
- स्थान -पंचगणी महाबळेश्वर रोड.
- प्रवेश शुल्क – मोफत.
- वेळ – सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंत.
३. बोटिंग
मित्र परिवारासोबत किंवा फॅमिली सोबत जर तुम्हाला वेळ घालवायचा असल्यास, वेण्णा तलाववर बोटिंग हा एक उत्तम पर्याय आहे. हा तलाव कृत्रिम असून याची बांधणी श्री राजे आप्पासाहेब यांनी १८४२ मध्ये केली.
- वेळ – ८.am ते ७.pm.
- प्रवेश शुल्क – मोफत.
- बोटिंग चार्जेस – त्यांच्या पॉलिसींवर अवलंबून आहे.
४. ऐतिहासिक प्रतापगड किल्ला पाहणे
प्रतापगड हा किल्ला महाराजांनी सतराव्या शतकामध्ये निर्माण केला असून, याला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. इतिहासामध्ये घडलेल्या अफजलखान व महाराजांच्या युद्धाची स्मृती याच प्रतापगड या किल्ल्यावर असून, या किल्ल्यावरून आजूबाजूच्या प्रदेशाचे आश्चर्यकारक दृश्य तुम्ही पाहू शकता.
- वेळ – १०. am ते ६. pm
- प्रवेश शुल्क – मोफत.
- महाबळेश्वर पासून अंतर– अंदाजे २० किलोमीटर.
५. महाबळेश्वर मधील निसर्गरम्य धबधबे एक्सप्लोर करणे
महाबळेश्वर या प्रेक्षणीय हिल स्टेशन मध्ये सर्वात जास्त आकर्षक धबधब्यांची संख्या आहे. एक चांगला पिकनिक स्पॉट असून निसर्गरम्य हिरवाईने वेढलेले आहेत.
- लिंगमळा धबधबा
- धोबी धबधबा
- चिनामान धबधबा
६. वॅक्स म्युझियमला भेट देणे
जगभरातील प्रसिद्ध आदर्श व्यक्तींच्या ३० पेक्षा जास्त आकारांच्या मेणाच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन व संग्रहालय तुम्ही पाहू शकता.
- स्थान – महाबळेश्वर जामा मशीद रोड
- वेळ – १०.pm ते ७.३०.pm
- प्रवेश शुल्क -रुपये २०० प्रति व्यक्ती.
७. सर्वोत्तम रेस्टॉरंट आणि कॅफेमध्ये खाणे
महाबळेश्वर मधील रेस्टॉरंट व कॅफेमध्ये तुम्ही उत्तम दर्जाचे शाकाहारी तसेच मांसाहारी व देशी व जागतिक स्तरावरील पाककृतींचा आनंद घेऊ शकता.
८. कॅम्पिंग
तापोळा हे निसर्गरम्य गाव असून याला पश्चिमचे छोटे काश्मीर म्हणून ओळखले जाते. हे गाव भव्य शिवसागर तलावाचे घर असून, ट्रेकर्स लोकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. जेवढे ट्रेकर्ससाठी हे ठिकाण लोकप्रिय आहे, तितकेच कॅम्पिंग साठी सुद्धा लोकप्रिय आहे. या ठिकाणी पर्यटक हे कॅम्पिंगसाठी येऊन या ठिकाणी परिसराचा आनंद घेतात.
- अंतर – अंदाजे २८ किलोमीटर.
- खर्च – अंदाजे १०००/-एक रात्र
९. राजापुरी लेणी पाहणे
ऐतिहासिक प्रेमींसाठी प्रसिद्ध असणाऱ्या प्राचीन राजापुरी लेण्यांची ट्रिप हा एक उत्तम पर्याय आहे. या ठिकाणी तुम्हाला देव कार्तिकेयाला समर्पित एक मंदिर हे येथील लेण्यांचे प्रमुख आकर्षण आहे.
वेळ – ७.am ते ६.pm
१०. लक्ष्मी स्ट्रॉबेरी फार्म येथे स्ट्रॉबेरीची खरेदी
जर तुम्हाला बेरी, मलबेरी व स्ट्रॉबेरी या फळांची खरेदी करायची असेल, तर तुम्ही लक्ष्मी स्ट्रॉबेरी फार्मला नक्कीच भेट देऊ शकता.
११.फोटोशूट
महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ अप्रतिम निसर्गसौंदर्याचे माहेर आहे. इथे आपण निसर्गरम्य वातावरणात फोटोशूट करू शकतो.
महाबळेश्वर मधील प्रेक्षणीय स्थळे
१.कॅनॉट शिखर
कॅनॉट शिखर हे महाबळेश्वर मधील दुसरे सगळ्यात उंच शिखर आहे. हे शिखर समुद्रसपाटीपासून साधारणतः १४०० मीटर एवढ्या उंचीवर आहे. महाबळेश्वर पासून कॅनॉट शिखर हे साधारणतः ५ किलोमीटर अंतरावर असून, कॅनॉट शिखर या ठिकाणापासून प्रतापगड, वेण्णा तलाव यांचे अविस्मरणीय दृश्य पहायला मिळते. हे शिखर पूर्वी ऑलिंपिया या नावाने ओळखले जात असे.
२. लॉडवीक पॉईंट
लॉडवीक पॉईंट हे महाबळेश्वर मधील प्रमुख प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे. हे ठिकाण समुद्रासपाटीपासून साधारणतः ४००० फूट इतक्या उंचीवर आहे. ब्रिटिश अधिकारी जनरल लॉडवीक यांच्या नावावरूनच या पॉईंटला लॉडवीक असे नाव पडले. कारण सर्वप्रथम या टेकडीवर चढणारे पहिले जनरल अधिकारी हे लॉडवीक हेच होते. यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मुलाने या पॉईंटवर एक स्तंभ बांधला आहे. महाबळेश्वरला भेट देणारे पर्यटक हे आवर्जून या ठिकाणी भेट द्यायला येतात.
३. मॅप्रो गार्डन
मॅप्रो गार्डन हे अतिशय मनमोहक व सुंदर असून, महाबळेश्वर पासून साधारणतः हे १२ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. इसवी सन १९८० मध्ये ही जागा मॅप्रोने बांधली असून, या जागेची संपूर्ण देखरेखही मॅप्रोच करते. या ठिकाणी असणारी सुंदर दृश्य व हिरवागार निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो. मॅप्रो गार्डन हे ठिकाण या ठिकाणी असणाऱ्या स्वादिष्ट स्ट्रॉबेरी या फळासाठी प्रसिद्ध आहे.
४. लिंगमळा धबधबा
लिंगमळा धबधबा प्रसिद्ध सुंदर धबधबा आहे. हिरव्यागार निसर्गाच्या व खडकाळ प्रदेशाच्या मध्ये वसलेला हा लिंगमळा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो. लिंगमळा धबधबा हा जवळजवळ ६०० फूट उंचीवरून खाली कोसळतो. फोटोग्राफीचा छंद असणारे बरेच पर्यटक पावसाळ्याच्या काळात या धबधब्याला भेट देऊन फोटोग्राफी करतात. महाबळेश्वर पासून लिंगमळा हा धबधबा जवळपास ८ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.
५. विल्सन पॉईंट
विल्सन पॉईंट हे प्रमुख प्रेक्षणीय स्थळांपैकी एक ठिकाण आहे. महाबळेश्वर मधील सर्वात उंच व सुंदर पॉईंट म्हणून विल्सन पॉईंटकडे पाहिले जाते. विल्सन पॉईंटवरून सूर्योदय व सूर्यास्ताचे सुंदर व मनमोहक दृश्य अनुभवता येते. विल्सन पॉईंटला सनराइज पॉइंट असे देखील म्हटले जाते. महाबळेश्वर पासून विल्सन पॉईंट हे ठिकाण जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे.
६. एलिफंट हेड पॉईंट
एलिफंट हेड पॉईंट हे महाबळेश्वर मधील सर्वात लोकप्रिय प्रेक्षणीय स्थळांपैकी एक प्रेक्षणीय स्थळ आहे. हे ठिकाण हुबेहूब हत्तीच्या तोंडा सारखे दिसते. यामुळे या पॉइंटला एलिफंट हेड पॉईंट असे म्हटले जाते. त्याचबरोबर या ठिकाणाला नीडल होल पॉईंट असे देखील म्हटले जाते. सह्याद्री पर्वतरांगांचे दृश्य आपल्याला इथे पाहता येते. पावसाळ्यामध्ये एलिफंट हेड पॉईंट संपूर्ण हिरव्यागार वातावरणाने भरलेले असते. सुट्टीच्या दिवशी बरेच पर्यटक हिरव्यागार वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येतात.
७. ऑर्थर सीट पॉईंट
ऑर्थर सीट पॉईंट हे समुद्रसपाटीपासून साधारणतः १४७० मीटर इतक्या उंचीवर वसलेले असून, एक प्रमुख प्रेक्षणीय स्थळ आहे. या ठिकाणाला बिंदूची राणी म्हणून देखील ओळखले जाते. त्याचबरोबर या पॉइंटला ऑर्थर मालेटच्या नावावरून नाव देण्यात आले आहे. ऑर्थरने आपली पत्नी व एक महिन्याची मुलगी एका नाव अपघातामध्ये गमावली. महाबळेश्वर पासून ऑर्थर सीट पॉईंट हे ठिकाण अंदाजे १२ किलोमीटर इतके अंतरावर आहे.
८. महाबळेश्वर मंदिर
श्री महाबळेश्वर मंदिर हे सातारा जिल्ह्यातील एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर शिवशंभू यांना समर्पित आहे. हे मंदिर महाबळेश्वर पासून साधारणतः ६ किलोमीटर इतक्या अंतरावर स्थित आहे. हे मंदिर १६ शतकामध्ये राजा चंद्रराव मोरे यांनी बांधले होते. आकर्षक रचना असणाऱ्या महाबळेश्वर मंदिरामध्ये शंकराची पिंडी आहे. हे मंदिर चारी बाजूंनी निसर्गरम्य वातावरणाने वेढलेले असून, सुंदर नजारा या मंदिरातून दिसतो. दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात.
९. वेण्णा तलाव
वेण्णा तलाव हे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय प्रसिद्ध असून, हे एक कृत्रिम रित्या बनवलेला तलाव आहे. हा तलाव साताराचे राजे श्री आप्पासाहेब महाराजांनी बांधला होता. हा तलाव संपूर्ण गवत व झाडांनी वेढलेला आहे. महाबळेश्वर पासून वेण्णा तलाव जवळपास तीन किलोमीटर अंतरावर आहे.
१०. प्रतापगड किल्ला
या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ही साधारणतः १००० फूट इतकी आहे. हा किल्ला ऐतिहासिक वारसा लाभलेला किल्ला असून, इसवी सन १६५६ मध्ये मराठा साम्राज्याचे जनक व शासक छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची निर्मिती केली. हा किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या एक महत्त्वाचे स्थान प्राप्त करतो. कारण याच किल्ल्यामध्ये अफजलखान व शिवाजी महाराजांच्या मध्ये ऐतिहासिक धुमश्चक्री झाली होती. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहास प्रेमी या किल्ल्याला भेट द्यायला येत असतात.
महाळेश्वरचे पर्यटन दृष्ट्या महत्व
- महाबळेश्वरातील महादेवाचे मंदिर हे तेराव्या शतकात यादव राजा सिंघनदेव याने बांधले.
- छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या तंबू वरील कापून आणलेले सोन्याचे कळस या मंदिराला अर्पण केले होते.
- महाबळेश्वर येथील मंदिर आणि जवळच असलेले प्रतापगड आणि जावळीचे खोरे या स्थळांना छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे.
- महाबळेश्वरला पावसाचे अधिक प्रमाण असून आजूबाजूचा परिसर हिरवागार आणि जलमय असतो.
- येथील अनेक पॉईंट हे पर्यटकांसाठी आकर्षक स्थळे आहेत.
- महाबळेश्वरच्या महादेव मंदिराकडून एकूण पाच नद्या उगम पावतात म्हणूनच या ठिकाणी पंचगंगा मंदिर बांधले गेले आहे.
- या नद्यांमध्ये एक नदी सावित्री ही पश्चिम वाहिनी असून इतर चार नद्या पूर्वेला वाहतात.
- तिथे असलेला वेण्णा तलाव पर्यटकांसाठी आकर्षक स्थळ आहे.
- वाघाचे पाणी नाव असलेले एक तळेही येथे आहे. पूर्वी आजूबाजूला जंगल असताना वाघ इथे पाणी पिण्यास यायचे असा समज आहे.
महाबळेश्वर कृषि उत्पादन
- महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरी साठी नंदनवन मानले जाते.
- त्यासोबतच रासबेरी, जांभूळ, लाल मोठे मुळे, गाजर यांचे उत्पन्न येथे घेतले जाते.
- महाबळेश्वर जंगलांमध्ये तेथील स्थानिक लोक मधाचे उत्पन्न घेतात.
- थंड हवामानामुळे गुलाबांचे उत्पादन, झेंडूचे उत्पादन आणि गुलकंदाचे उत्पादनही येथे घेतले जाते.
महाबळेश्वरचा बाजार
१. स्ट्रॉबेरी /मलबेरी – येथील स्ट्रॉबेरी/मलबेरी ही जगप्रसिद्ध असून, बाजारपेठेमध्ये तुम्हाला अंदाजे ३०० ते ३५० पर्यंत किलोने मिळून जाईल.
२. ताज्या भाज्या /फळे – येथील ताज्या तजेलदार भाज्या व फळे ही प्रसिद्ध आहेत. उत्तम दर्जाची फळे व भाज्या तुम्हाला या महाबळेश्वरच्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत.
३. मॅप्रो स्टोअर – मॅप्रो स्टोअर मध्ये तुम्हाला मॅप्रो गार्डन मधील स्ट्रॉबेरीजचे ज्यूस जाम व इतर खाद्यपदार्थ उपलब्ध आहे. जर तुम्हाला या वस्तूंची खरेदी करायची असल्यास, तुम्ही नक्की मॅप्रोला भेट द्या. या मेट्रो स्टोअर मध्ये तुम्हाला मार्केट किमतीच्या दहा टक्के सूट दिली जाते.
४. राजेश थाळी – राजेश थाळी तुम्हाला साधारणता ४५०/- ते ५००/- रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची चव चाखता येईल. तर तुम्ही देखील ही थाळी नक्कीच चाखा.
५. चामडी चप्पल – महाबळेश्वर बाजारपेठ मध्ये तुम्हाला स्थानिक लोकांनी बनवलेल्या चामड्यांच्या चपलांची दुकाने दिसतील. या ठिकाणी चपलांचा आकार व स्टाइल ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. या ठिकाणी तुम्हाला जास्त करून कोल्हापुरी चप्पलांचीची स्टाईल दिसेल.
६. ज्यूट बॅग –महाबळेश्वर मार्केट मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्यूट बॅग या साधारणतः १०० ते १५० च्या आसपास मिळतील.
७. हनुमान मंदिर – महाबळेश्वर बाजारपेठ च्या अगदी मध्यभागी श्री हनुमान मंदिर आहे. तुम्ही या मंदिरामध्ये जाऊन हनुमानचे दर्शन घेऊन शांततेचा अनुभव घेऊ शकता.
८. मधुसागर मध सेंटर – या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारात मध खरेदी करू शकता. जे की तुम्हाला शुद्ध, चांगल्या दर्जाचे उपलब्ध करून दिले जाते. हे सेंटर मार्केट पासून साधारणतः दहा मिनिटाच्या अंतरावर आहे.
९. श्री साई चाट – महाबळेश्वर मध्ये आल्यानंतर तुम्ही श्री साई चाट या ठिकाणी नक्कीच भेट द्यावी. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये पाणीपुरी उपलब्ध आहे. शाही पाणीपुरी, जंजिरा पाणीपुरी, गार्लिक पाणीपुरी, पुदिना पाणीपुरी, व नॉर्मल पाणीपुरी ४० रुपये चार्ज केली जाते.
१०. विल्सन चिक्की – या ठिकाणी तुम्हाला चिक्की सोबतच वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये चणे मिळतील. पिझ्झा फ्लेवर, टोमॅटो फ्लेवर, शेजवान फ्लेवर, चीज फ्लेवर, अशा वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये तुम्ही चणे एन्जॉय करू शकता.
महाबळेश्वरला कसे जावे ?
१. रस्ते मार्ग
महाबळेश्वर हे राष्ट्रीय महामार्ग ४ ने जोडलेले असल्यामुळे, या ठिकाणी खाजगी तशाच सरकारी बस सेवा पुणे, मुंबई, सांगली आणि सातारा या ठिकाणीहून धावतात. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या वैयक्तिक गाडीने, बाईकने कार करून महाबळेश्वरया प्रेक्षणीय स्थळाला भेट देऊ शकता.
२. रेल्वे मार्ग
महाबळेश्वरया प्रेक्षणीय स्थळाला जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक हे सातारा आहे. हे महाबळेश्वर पासून साधारण ६० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. सातारा या रेल्वे स्थानकावर उतरून महाबळेश्वरला जाण्यासाठी तुम्ही सरकारी बस सेवा किंवा ऑटो कॅब बुक करू शकता.
३. हवाई मार्ग
महाबळेश्वर या प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्यासाठी जर तुम्ही हवाई मार्ग निवडत असाल, तर सर्वात जवळचे विमानतळ हे पुणे विमानतळ आहे. व मुंबईवरून येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे विमानतळ आहे.
महाबळेश्वर या प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना
महाबळेश्वर ला भेट देण्यासाठी तुम्ही नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये भेट देऊ शकता या काळात तुम्हाला शांत हवामान व थंड वातावरण याचा अनुभव घेता येईल. त्याच प्रकारे तुम्ही साईटसीइंग, ट्रेकिंग व या ठिकाणी जगप्रसिद्ध असणारी ताजी स्ट्रॉबेरी खरेदी करू शकता.
महाबळेश्वर एक्सप्लोर करण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स
महाबळेश्वर एक्सप्लोर करण्यासाठी खालील महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासोबत असणे गरजेचे आहे.
- गरम व उबदार कपडे जसे स्वेटर जॅकेट जर्किन इत्यादी.
- पावसाळ्याच्या काळामध्ये रेनकोट छत्री देखील सोबत ठेवावी.
- पावसाळ्याच्या काळामध्ये घाट एक्सप्लोर करताना चप्पलचा वापर करू नये कारण चप्पल घसरण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे तुम्ही चांगल्या दर्जाचे बूट वापरणे सोयीचे ठरते.
- महाबळेश्वर एक्सप्लोर करतेवेळी स्वतःसोबत काही खाण्याच्या गोष्टी जसे बिस्कीट केक चॉकलेट व पाण्याच्या बॉटल्स ठेवाव्यात जेणेकरून गरजेच्या वेळी या गोष्टींचा वापर करू शकता.
- मेडिकल किट्स अर्थात फर्स्ट एड बॉक्स सोबत ठेवावा. जेणेकरून काही इजा झाल्यास तुम्ही प्रथमोपचार घेऊ शकता.
- योग्य ते कपडे परिधान करावे व जादा कपड्यांचे व बुटांचे जोड सोबत ठेवावे.
महाबळेश्वरमधील सोयी सुविधा
- ATM – महाबळेश्वरमध्ये बहुतेक ठिकाणी ATM सुविधा उपलब्ध आहे.
- पेमेंट सुविधा – महाबळेश्वरमध्ये गुगल पे, पेटीएम,फोनपे इत्यादी online पेमेंट सुविधा उपलब्ध आहे.
- हॉटेल्स – महाबळेश्वरमध्ये बजेट नुसार योग्य दर्जाची हॉटेल्स सुविधा उपलब्ध आहे.
- स्टॉल – पर्यटनाच्या दृष्टीकोनातून या ठिकाणी अनेक छोटे मोठे स्टॉल आहे, जे तुमची खाण्यापासून, चहा, नाश्ता, मॅगी सगळे ज्यूस आदींची व्यवस्था करतात .
- सुलभ शौचालय – या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीकोनातून सुलभ शौचालय सुविधा उपलब्ध आहे.
महाबळेश्वर मधील मजेशीर स्ट्रीट फूड
१. भाजलेला मक्का – पावसाळ्याच्या काळामध्ये महाबळेश्वर एक्सप्लोर करतेवेळी भाजलेला मक्का अर्थात भुट्टा खाण्याची मजा व त्या ठिकाणचे विहिरींगम दृश्य अनुभवण्याची मजा ही काही वेगळीच असते. त्यामुळे महाबळेश्वर एक्सप्लोर करताना भाजलेला मक्का खाण्याचा अनुभव तुम्ही देखील नक्कीच घ्या.
२. कांदाभजी – पावसाळ्याच्या रिमझिम रिमझिम धारेतून बरसणाऱ्या थेंबांनी ज्यावेळी सृष्टीमध्ये तजेलदारपणा येतो व वातावरण अगदी अल्हाददायक होऊन जाते. महाबळेश्वर एक्सप्लोर करण्यासाठी आपण बाहेर फिरतो त्यावेळी त्या ठिकाणची स्ट्रीट फूड अर्थात कांदाभजी खाण्यात एक वेगळीच मजा असते. मित्रहो तुम्ही देखील महाबळेश्वर एक्सप्लोर करतेवेळी कांदाभजीची चव नक्कीच चाखावी.
३. पकोडा – महाबळेश्वरमधील पकोडा हे देखील स्ट्रीट फूड, एकदम मस्त व प्रसिद्ध आहे. याचा देखील तुम्ही मनसोक्त आनंद घेऊन संपूर्ण महाबळेश्वर एक्सप्लोर करू शकता.
४. चहा – पावसाळ्याच्या सीझनमध्ये पावसाळा with चहा ही पसंती बहुतेक पर्यटन प्रेमी दर्शवितात. यावेळी गरमागरम चहाचा आस्वाद घेणे व महाबळेश्वरचा निसर्गरम्य परिसर एक्सप्लोर करण्याची मजा ही काही शब्दात सांगणे सोपे नाही.
बोलल्या जाणाऱ्या भाषा
- मराठी
- हिंदी
महाबळेश्वरमध्ये राहण्याची सोय
महाबळेश्वरमध्ये ८०० पासून हॉटेलचे चार्जेस चालू होतात. तुम्ही तुमच्या बजेटनुसार हॉटेल बुक करून महाबळेश्वर एक्सप्लोर करू शकता. काही हॉटेल्स खालील प्रमाणे-
कंट्रीयार्ड मॅरियट बाय महाबळेश्वर
हे हॉटेल महाबळेश्वर मध्ये असून हे ३ स्टार हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये तुम्हाला हॉटेलमध्ये विनामूल्य पार्किंग, विनामूल्य वायफाय, जिम सेंटर, बॅडमिंटन कॉफी शॉप, स्विमिंग पूल इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
ब्राईटलँड रिसॉर्ट अँड स्पा
हे रिसॉर्ट महाबळेश्वर मध्ये असून, हे ४ स्टार रिसॉर्ट आहे. या रिसॉर्ट मध्ये प्रत्येक रूम हे वातानुकूलित असून,फ्री पार्किंग, फ्री इंटरनेट, जिम सुविधा, गेम रूम स्विमिंग पूल, फ्री नाष्टा, संध्याकाळच्या वेळी मनोरंजन इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
रिजेंटा एम.पी.जी क्लब महाबळेश्वर
हे ३ स्टार हॉटेल असून, हॉटेलमध्ये प्रत्येक रूम हे वातानुकूलित आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला विनामूल्य पार्किंग, विनामूल्य इंटरनेट, विनामूल्य नाश्ता, स्विमिंग पूल, टेबल टेनिसची सुविधा तसेच जिमची सुविधा उपलब्ध आहे.
ले मेरिडियन महाबळेश्वर रिसॉर्ट आणि स्पा
हे ४ स्टार रिसॉर्ट असून, या ठिकाणी तुम्हाला विनामूल्य पार्किंग, वायफायची सुविधा, विनामूल्य नाश्ता, बोटिंगची सुविधा, बॅडमिंटन, जिम इत्यादी सुविधा उपलब्ध आहे.
ट्रिबो ट्रेन राही फॉरेस्ट व्ह्यू
हे एक ३ स्टार हॉटेल असून, या ठिकाणी तुम्हाला विनामूल्य पार्किंग एरिया, विनामूल्य वायफाय, स्विमिंग पूल, विनामूल्य नाश्ता, टेबल टेनिस, गेम लहान मुलांसाठी खेळण्याचे मैदान, त्याचप्रमाणे वातानुकूलित रूम, कॉफी व टी मेकर,फ्लॅट स्क्रीन टीव्ही इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
अद्वैत रिसॉर्ट
या रिसॉर्ट मध्ये विनामूल्य पार्किंग एरिया, विनामूल्य वायफाय, विनामूल्य नाश्ता, बॅडमिंटन, विमान ट्रान्सपोर्टेशन इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध आहेत. प्रत्येक रूम हे वातानुकूलित असून दरोरोज स्वच्छता केली जाते. योग्य रित्या तुम्हाला रूम सर्विसेस दिल्या जातात. तसेच रूममध्ये फ्लॅट स्क्रीन, टीव्ही, सॅटॅलाइट टीव्ही, प्रायव्हेट बाल्कनी इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
ऑक्सीजन रिसॉर्ट महाबळेश्वर
महाबळेश्वर मधील हे एक ५ स्टार हॉटेल असून, या हॉटेलमध्ये तुम्हाला विनामूल्य पार्किंग, विनामूल्य वायफाय, रेस्टॉरंट इत्यादी सुविधा उपलब्ध आहे.
FAQ
महाबळेश्वरला जाण्यासाठी रस्ते मार्गाने तुम्ही कसे जाल?
महाबळेश्वर हे राष्ट्रीय महामार्ग ४ ने जोडलेले असल्यामुळे, या ठिकाणी खाजगी तशाच सरकारी बस सेवा पुणे, मुंबई, सांगली आणि सातारा या ठिकाणीहून धावतात. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या वैयक्तिक गाडीने, बाईकने कार करून महाबळेश्वर या प्रेक्षणीय स्थळाला भेट देऊ शकता.
महाबळेश्वरच्या बाजारपेठेत तुम्ही काय काय खरेदी करू शकता?
महाबळेश्वर मधील स्ट्रॉबेरी/मलबेरी ही जगप्रसिद्ध असून, बाजारपेठेमध्ये तुम्हाला अंदाजे ३०० ते ३५० पर्यंत किलोने मिळून जाईल. ताज्या भाज्या /फळे –
महाबळेश्वर मधील ताज्या तजेलदार भाज्या व फळे ही प्रसिद्ध आहेत. उत्तम दर्जाची फळे व भाज्या तुम्हाला या महाबळेश्वरच्या बाजारपेठे मध्ये उपलब्ध आहेत. महाबळेश्वर बाजारपेठ मध्ये तुम्हाला स्थानिक लोकांनी बनवलेल्या चामड्यांच्या चपलांची दुकाने दिसतील . या ठिकाणी चपलांचा आकार व स्टाइल ही वेगवेगळ्या प्रकारची आहे. या ठिकाणी तुम्हाला जास्त करून कोल्हापुरी चप्पालांचीची स्टाईल दिसेल.
महाबळेश्वर मार्केट मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्यूट बॅग या साधारणतः १०० ते १५० च्या आसपास मिळतील.
पुणे ते महाबळेश्वर हे अंतर किती आहे व किती कालावधी लागतो?
पुणे ते महाबळेश्वर हे अंतर साधारणतः १२५ किलोमीटर इतके असून, यासाठी तुम्हाला अंदाजे ३ तास लागू शकतात.
महाबळेश्वर मधली लोकप्रिय पॉईंट कोणते?
विल्सन पॉईंट
मुंबई पॉईंट किंवा बॉम्बे पॉईंट
ऑर्थर सीट पॉईंट
एलिफंट हेड पॉईंट
काटेस पॉईंट
इको पॉइंट
मॅप्रो गार्डन चे थोडक्यात वर्णन करा.
मॅप्रो गार्डन हे महाबळेश्वर मधील मॅप्रो या संस्थेने स्थापन केलेले उद्यान आहे. यामध्ये विविध प्रकारच्या फळांपासून उत्पादन घेऊन, त्या उत्पादनाची बाजारात विक्री केली जाते. या उद्यानामध्ये चॉकलेट फॅक्टरी, मॅप्रो उत्पादनाचे आऊटलेट, रेस्टॉरंट, मुलांच्या खेळण्याचे क्षेत्र इत्यादी आहे. या मॅप्रो गार्डनमध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी पासून बनवलेले ज्यूस व इतर पदार्थ चाखू शकता. त्याचप्रमाणे रिटेल आउटलेट मधून जाम सिरप, ज्यूस अशा विविध प्रक्रिया केलेल्या वस्तू खरेदी करू शकता.
निष्कर्ष
महाबळेश्वर या आमच्या लेखातून आम्ही आपणास महाबळेश्वर मधील प्रेक्षणीय स्थळे, करण्यासारख्या गोष्टी, महाबळेश्वर मधील बाजारपेठ आदी मुद्यांबद्दल माहिती दिली आहे. हा लेख – महाबळेश्वर पर्यटन स्थळे माहिती मराठी – तुम्ही नक्की वाचा व कमेंट करून आम्हास नक्की कळवा.
धन्यवाद.