कस्तुरबा गांधी मराठी माहिती Kasturba Gandhi Information In Marathi

आपला भारत देश हा इंग्रजांच्या गुलामी मधून स्वतंत्र होऊन ७७ वर्ष पूर्ण झाले, आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी महान नेत्यांची भूमिका ही अजरामर आहे. त्यामध्ये महात्मा गांधीजींचे नाव हे आवर्जून घेतले जाते. त्यांचे योगदान हे अतुलनीय आहे.

महात्मा गांधीजींना इंग्रज फार घाबरत असत, असे महात्मा गांधीजी स्वतः कस्तुरबा गांधी म्हणजेच त्यांची पत्नी यांच्याशी कधी मोठ्या आवाजामध्ये बोलत नव्हते.

कस्तुरबा या महात्मा गांधीजींच्या पत्नी असण्याबरोबरच, एक खंबीर स्वभावाची स्त्री, समाजसेविका, शिस्तप्रिय व स्वातंत्र्याच्या लढा मध्ये गांधीजींसोबत पावलावर पाऊल टाकणाऱ्या एक क्रांतिवीर होत्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये कस्तुरबा गांधी यांची भूमिका ही अजरामर व गांधीजींनी इतकीच महत्त्वाची आहे.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास कस्तुरबा यांच्या कार्याविषयी व त्यांच्या जीवनशैली विषयी माहिती दिलेली आहे. हा लेख व ही माहिती जाणून घेण्यासाठी, खालील माहिती शेवटपर्यंत नीट वाचा.

Table of Contents

कस्तुरबा गांधी मराठी माहिती Kasturba Gandhi Information In Marathi

पूर्ण नाव कस्तुरबाई गोकुळदास कापडिया
टोपण नाव बा
जन्म तारीख दि. ११एप्रिल १८६९
जन्म स्थळ पोरबंदर 
आईचे नाव वृजकुवरंबा कपाडिया
वडिलांचे नाव गोकुळदास कपाडिया
वैवाहिक स्थिती विवाहित
पतीचे नाव मोहनदास करमचंद गांधी (महात्मा गांधी)
अपत्य हरिलाल, मणिलाल, देवदास, रामदास
ओळख भारतीय राजकीय कार्यकर्ते
मृत्यू दि. २२ फेब्रुवारी १९४४
मृत्यू ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
जयंती ११एप्रिल (राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस)

कस्तुरबा गांधी यांचा जन्म व वैयक्तिक जीवन

कस्तुरबा यांचा जन्म दिनांक ११ एप्रिल १८६९ मध्ये काठीयावाड्याच्या पोरबंदर शहरांमध्ये झाला. कस्तुरबा या पती महात्मा गांधी यांच्या पेक्षा सहा महिन्यांनी मोठ्या होत्या. अवघ्या तेराव्या वर्षी कस्तुरबा यांचे महात्मा गांधी यांच्यासोबत लग्न झाले.

हे वाचा –

कस्तुरबा या शिस्तप्रिय व खंबीर स्वभावाच्या व्यक्तिमत्व असल्यामुळे, सर्वजण त्यांना “बा” या नावाने संबोधत. कस्तुरबांचे धैर्य व प्रोत्साहन हे अतिशय विशेष होते. कस्तुरबा नी महात्मा गांधीजींना प्रत्येक प्रसंगी खंबीरित्या प्रोत्साहन दिले.

बा या निरक्षर होत्या, त्यामुळे लग्नानंतर बा गांधींना थोडा संघर्ष करावा लागला. महात्मा गांधीजी यांना कस्तुरबा गांधी अशिक्षित असल्या कारणाने तेवढ्याशा आवडत नसत, त्यामुळे गांधींजीनी लग्नानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये बा गांधींच्या बाहेर पडण्यावर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला होता.

परंतु या सर्व गोष्टींचा कस्तुरबा गांधी यांच्यावर अधिक परिणाम झाला नाही. यानंतर बा गांधीजींना गांधीजींनी वाचायला, लिहायला, शिकवले. यानंतर कस्तुरबा नी हिंदी व गुजरातीचे न्यान संपादन केले.

कस्तुरबा गांधी

कस्तुरबा गांधीजींची अपत्ये

१८८५ मध्ये कस्तुरबा या वयाच्या १७ वर्षाच्या असताना त्यांना पहिली मुलगी झाली. परंतु दुर्दैवाने ती मुलगी काहीच दिवस जगू शकली.

यानंतर बॅरिस्टरच्या शिक्षणाच्या काळात, महात्मा गांधी हे लंडनहून भारतामध्ये परतले, यानंतर कस्तुरबा व गांधीजींना 1988 मध्ये हरिलाल नावाचा दुसरा मुलगा झाला. यानंतर १८९१ मध्ये गांधीजींना मनीलाल नावाचा अजून एक मुलगा झाला व यानंतर देवदास, रामदास अशी अजून दोन मुले महात्मा गांधीजींना झाली.

 Kasturba Gandhi Information In Marathi

कस्तुरबा गांधी महात्मा गांधीजींना आदर्श मानत

कस्तुरबा यांनी पती महात्मा गांधी यांना स्वतःचा आदर्श मानले. कस्तुरबावर महात्मा गांधीजींचा इतका प्रभाव पडला की, त्यानंतर गांधीजींप्रमाणे संपूर्ण जीवन कस्तुरबांनी अगदी सोपे व साध्या पद्धतीत व्यतीथ केले.

कस्तुरबा गांधींचा परदेश दौरा

१९९६ मध्ये गांधीजी हे आफ्रिकेमधून भारतात परतले, यानंतर कस्तुरबा गांधीजींसोबत पुन्हा आफ्रिकेला गेल्या. त्या ठिकाणी कस्तुरबांनी गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास सुरुवात केली.

त्या काळात गांधीजी हे वर्ण द्वेषाच्या धोरणाविरुद्ध लढा देत होते. त्यावेळी बा गांधींनी गांधीजींना त्या गोष्टीत सहकार्य दिले व त्यांच्या पाठीशी खंबीर उभ्या राहिल्या. यामुळे कस्तुरबा गांधीजींना आफ्रिकेमध्ये तीन महिने तुरुंगात राहावे लागले.

या तीन महिन्यात कस्तुरबा गांधींनी तुरुंगामध्ये कोणत्याही प्रकारचे अन्न व पाणी सेवन केले नाही, ते फक्त तीन महिने फळांवर उपजीविका करत होत्या.

कस्तुरबा गांधी महात्मा गांधी

कस्तुरबा गांधीजींचे स्वातंत्र्यातील योगदान

कस्तुरबा या सुशिक्षित नव्हत्या. त्यामुळे महात्मा गांधीजींनी बा गांधींना वाचन व लेखन करण्यास शिकवले. शिक्षणाबरोबरच महात्मा गांधीजींनी बा गांधीजींच्या मनामध्ये देशाबद्दल क्रांती व आपुलकीची भावना रुजवली.

कस्तुरबा या महात्मा गांधीजीं इतक्याच देशाबद्दल निष्ठावान व स्वातंत्र्यसैनिक होत्या. गांधीजींच्या पावलावर पाऊल टाकत, नेहमी बा गांधीजींनी देशासाठी प्रयत्न केला.

गांधीजी व कस्तुरबा गांधी हे १९१५ मध्ये ज्यावेळी भारतात परतले, त्यावेळी बा गांधींनी गांधीजींसारखेच अत्यंत साधे जीवन जगण्याचे स्वीकारले व गांधीजींच्या प्रत्येक चळवळी मध्ये व सत्याग्रहांमध्ये गांधीजींसोबत हुरहुरीने भाग घेऊ लागल्या.

गांधीजींच्या सत्याग्रहामुळे व चळवळीमुळे गांधीजींना तुरुंगात टाकले की, गांधीजींची जागा कस्तुरबा गांधी अर्थात बा घेत, व गावातील महिलांना व गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम त्या करत.

महात्मा गांधी हे मध्यम पक्षाचे सक्रिय स्वतंत्र सेनानी होते. महात्मा गांधीजींनी आपले मुद्दे मांडण्यासाठी प्रचंड वेळा उपोषण केले, त्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले.

अशा परिस्थितीमध्ये बा गांधींनी न डगमगता खंबीरपणे गांधीजींची जागा घेत, गांधीजींच्या असंख्य चळवळी चालवल्या. अशाप्रकारे बा गांधी हा एक महिला क्रांतिकारी व राजकीय कार्यकर्त्या होता.

Kasturba Gandhi Information In Marathi

कस्तुरबा गांधी यांचा दक्षिण आफ्रिकेच्या संघर्षामध्ये सहभाग

दक्षिण आफ्रिकेमध्ये कस्तुरबा गांधीजींनी, गांधीजींचे चांगले समर्थन केले. कस्तुरबा या इच्छा शक्ती प्रबळ असलेल्या, शिस्तबद्ध व अतिशय परिश्रमी महिला होत्या.

कस्तुरबा या दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या स्थिती विरुद्धच्या चळवळीमध्ये सामील झाल्या नाही, परंतु या काळामध्ये त्यांनी उपोषण केले व अधिकाऱ्यांना स्वतः समोर नतमस्तक होण्यास भाग पाडले.

त्यानंतर १९१३ मध्ये बा गांधींनी धाडसाने दक्षिण आफ्रिकेतील भारतीय मजुरांच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तेव्हा त्यांना दक्षिण आफ्रिकेतील अधिकाऱ्यांनी तीन महिन्याचा तुरुंगवास भोगण्यास तुरुंगात डांबले.

या कठोर कारवायासाच्या शिक्षे दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील अधिकाऱ्यांनी गांधी यांना धमकवण्याचा सुद्धा अतोनात प्रयत्न केला. परंतु, बा गांधी यांच्या निर्धारित स्वभावापुढे, अधिकाऱ्यांचे सर्व प्रयत्न हे असफल ठरले.

कस्तुरबा यांचा गांधीजींच्या चळवळीतील सक्रिय सहभाग

बा गांधी यांनी गांधीजींच्या चळवळीमध्ये सक्रिय भूमिका बजावली. १९१७ मध्ये बिहारमध्ये झालेल्या चंपारण चळवळीमध्ये बा गांधी ह्या गांधीजींच्या सोबत अगदी खंबीरपणे उभ्या होत्या. त्यांनी गांधीजींप्रमाणे महिलांच्या कल्याणासाठी काम केले.

गरीब मुलांना वाचन व लेखन शिकवले. याबरोबरच गांधीजी इंडिगो टॅक्स वरून लढत होते, तेव्हा महात्मा गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा यांनी गांधीजींच्या मागे स्वच्छता, शिस्त व स्वच्छतेचा संदेश जनतेला दिला.

यासोबतच कस्तुरबांनी गरीब लोकांवर उपचार व घरोघरी औषधांचे वाटप करण्यामध्ये सुद्धा मोठे योगदान दिले. १९२२ मध्ये ज्यावेळी गांधीजींना त्यांच्या चळवळीत मुळे तुरुंगात टाकण्यात आले, त्यावेळी कस्तुरबा यांनी एक महिला क्रांतिकारी बनवून जनकल्याणासाठी पुढे आल्या

व लोकांना परदेशी वस्तूवर बहिष्कार टाकण्याचा आणि परदेशी कपड्यांचा त्याग करण्याची विनंती त्यांनी जनतेसमोर मांडली व जनसामान्य लोकांमध्ये गांधीजींचा संदेश मना मनात रुजवण्यासाठी दूरदूरच्या खेड्यापाड्यांमध्ये जाऊन बा गांधीजींनी गांधीजींचा संदेश पोहोचवला.

यानंतर १९३० मध्ये ज्यावेळी महात्मा गांधीजी यांना तुरुंगामध्ये पुन्हा टाकण्यात आले, त्यावेळी बा गांधी यांनी लोकांना जागृत करत, क्रांतिकारी कार्यामध्ये सक्रिय सहभाग दर्शवला.

१९३२ मध्ये क्रांतिकारी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग दर्शवल्यामुळे, महात्मा गांधीजींच्या पत्नी अर्थात बा गांधी यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यानंतर त्या १९३२ ते १९३३ साधारणतः या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्या तुरुंगामध्ये होत्या.

त्यानंतर १९४२ मध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेल्या भारत छोडो आंदोलनामध्ये, बा गांधींनी एखाद्या स्वातंत्र्यसैनिका प्रमाणे सक्रिय सहभाग दर्शवून आंदोलनामध्ये खंबीरपणे गांधीजींच्या सोबत उभे राहून, लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या आंदोलनाद्वारे कस्तुरबा गांधींना पुन्हा एकदा तुरुंगवास भोगावा लागला.

कस्तुरबा गांधीजींचा मृत्यू कसा झाला ?

बा गांधी या लहानपणापासूनच क्रॉनिक ब्रॉनकायटीस या आजाराने ग्रासल्या होत्या. त्यामुळे १९०८ पासून त्यांची प्रकृती ढासळू लागली.

यानंतर बा गांधी यांनी गांधीजींसोबत केलेल्या आंदोलनामुळे, अनेक वेळा तुरुंगात जाऊन उपोषण केले. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची समस्या ही अजूनच वाढली.

१९४४ जानेवारी मध्ये, बा गांधीजी यांना हृदयविकाराचे दोन झटके आले, त्यामुळे बा गांधी या अंथरुणालाच खिळून राहिल्या, यानंतर अखेर दिनांक २२ फेब्रुवारी १९९४ मध्ये सायंकाळी बा गांधी यांची प्राणज्योत मालवली.

त्यावेळी त्यांचे वय साधारणतः ७४ वर्ष होते. यानंतर बा गांधी यांच्यावर पुण्यातील आगा खाना पॅलेस मध्ये अंतिम संस्कार करण्यात आले.

कस्तुरबा गांधी यांचा वारसा

बा गांधी यांच्या स्मरणार्थ नॅशनल मेमोरियल ट्रस्ट ची स्थापना करण्यात आली. या नॅशनल मेमोरियल ट्रस्ट फंडच्या माध्यमाने, भारतातील महिला व मुलांना मदत करण्यासाठी पावले उचलली जातात.

बा गांधी यांना लोक प्रेमाने बा म्हणून संबोधत.

अनेक संस्था, रस्ते आणि शहरांची नावे कस्तुरबा गांधी यांच्या नावावर आहेत:

 • कस्तुरबा हॉस्पिटल (वर्धा)
 • कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट
 • कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय
 • कस्तुरबा नगर , भोपाळ
 • कस्तुरबा गांधी कॉलेज फॉर वुमन
 • कस्तुरबा कॉलेज फॉर वुमन, विलियनूर, पुडुचेरी
 • कस्तुरबा नगर, चेन्नई
 • कस्तुरबा गांधी प्राथमिक शाळा , डर्बन, दक्षिण आफ्रिका
 • कस्तुरबा हॉस्पिटल (वलसाड)
 • कस्तुरबा हेल्थ सोसायटी
 • कस्तुरबा मेडिकल कॉलेज, मणिपाल
 • कस्तुरबा नगर , कोची
 • कस्तुरबा नगर रेल्वे स्टेशन
 • कस्तुरबा नगर, पुद्दुचेरी
 • कस्तुरबा नगर (दिल्ली विधानसभा मतदारसंघ)
 • कस्तुरबा गांधी मार्ग , नवी दिल्ली

कस्तुरबा गांधी यांचे प्रेरणादायी विचार

 • आपल्याला हवा असलेला बदल आपणच घडून आणला पाहिजे.
 • तुमच्या मित्राचे ऐकू नका, जेव्हा तो आतून म्हणतो हे करू नकोस.
 • जिथे प्रेम आहे, तिथे जीवन आहे.
 • माझे जीवन हा माझा संदेश आहे.
 • शक्तीचे दोन प्रकार आहेत,. पहिले शिक्षेचे भय आणि दुसरे म्हणजे प्रेमाची कला प्रेमावर आधारित उपाय हजार पट अधिक प्रभावी आणि शाश्वत आहे.
 • तुम्ही जे विचार करता, तुम्ही जे बोलता आणि जे करतात ते सुसंगत असेल, तेव्हाच आनंद मिळतो.

कस्तुरबा गांधी यांच्याबद्दल मनोरंजक माहिती

 • यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, त्याचप्रमाणे महात्मा गांधी व कस्तुरबा यांच्या जीवनामध्ये सुद्धा असेच काही घडले. कस्तुरबा यांनी गांधीजींच्या प्रत्येक वाईट व चांगल्या प्रसंगांमध्ये खांद्याला खांदा लावून गांधीजींची नेहमी मदत केली व गांधीजींच्या प्रत्येक संघर्षामध्ये ढाल बनून उभ्या राहिल्या.
 • कस्तुरबा महात्मा गांधीजीं पेक्षा सहा महिन्यांनी मोठ्या होत्या.
 • १९०६ मध्ये गांधीजींनी आजीवन ब्रह्मचार्य आणि पवित्रतेची शपथ घेतली या निर्णयाबद्द्ल कस्तुरबा यांनी आपल्या पतीकडे कोणत्याही प्रकारची कधीही तक्रार केली नाही व त्यांच्या निर्णयाला त्यांनी पूर्णपणे सहकार्य केले.
 • कस्तुरबा या महात्मा गांधीजींसोबत दक्षिण आफ्रिकेमध्ये एकत्र राहत होत्या, त्यावेळी बा गांधीजींच्या आत दडलेली सामाजिक, राजकीय क्षमता, गांधीजींच्या लक्षात आली व गांधीजींनी बा गांधी यांना देशभक्त व क्रांतीकारक बनण्यासाठी नवीन कलाटणी दिली.
 • बा गांधी या स्वातंत्र्य चळवळीमध्ये एखाद्या नायिके प्रमाणे लढायच्या, गांधीजींच्या आश्रमाची काळजी घ्यायच्या व सत्याग्रहाची पूर्ण उत्साहाने सेवा करायच्या, या कारणामुळे कस्तुरबा गांधी यांना लोक “बा” म्हणून संबोधत.
 • बा गांधीजींनी अनेक महिलांना प्रेरणा प्रदान केली व स्वातंत्र्य चळवळीला एक नवे वळण दिले.
 • लहान वयामध्ये लग्न झाल्यानंतर, सुद्धा कस्तुरबा गांधी यांनी आपल्या जबाबदाऱ्या अतिशय मनापासून निभावल्या व शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपले कर्तव्य योग्यरित्या पार पाडले व समाजाची नेहमी सेवा करत राहिल्या.
 • कस्तुरबा या आजच्या महिलांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे.
 • बा गांधींनी आपल्या पतीला अर्थात महात्मा गांधी यांना प्रत्येक प्रसंगात मदत केली. एक स्त्री असूनही न डगमगता, एखाद्या क्रांतीवीरा प्रमाणे स्वातंत्र्याच्या प्रत्येक कार्यात हुरहुरीने सहभाग घेत जन कल्याणासाठी नेहमी तत्पर राहिल्या.

कस्तुरबा गांधी यांच्या बद्दल १० ओळी

 • कस्तुरबा महात्मा गांधी यांच्या पत्नी आहेत.
 • कस्तुरबा यांचे भारतीय इतिहासातील स्थान अतिशय महत्त्वाचे आहे.
 • महात्मा गांधींना त्यांनी निष्ठेने आयुष्यभर साथ दिली.
 • कस्तुरबा यांचा गुजरात मधील वैष्णव कुटुंबात दि. ११ एप्रिल १८६९ रोजी पोरबंदर येथे जन्म झाला.
 • त्यांचे वडील गोकुळदास मकरंद कापडिया हे एक व्यापारी होते.
 • कस्तुरबा शाळेत गेल्या नाहीत. वयाच्या सातव्या वर्षी त्यांचा गांधीजींबरोबर साखरपुडा झाला आणि तेराव्या वर्षी विवाह.
 • कस्तुरबा १८९७ मध्ये महात्मा गांधी बरोबर दक्षिण आफ्रिकेत गेल्या. तर साबरमती येथे फिनिक्स वसाहत उभारण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. तिथे भारतीयांसाठी संघर्ष करताना तीन वेळा तुरुंगात उपोषण शोषल.
 • १९१५ मध्ये बा गांधीजींसोबत भारतात परतल्यावर, नीळ मजुरांसाठी केलेल्या आंदोलनात सहभागी झाल्या.
 • पुढे गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्याची नेतृत्व स्वीकारले, तेव्हा त्यांच्या खांद्याला खांदा देऊन, संघर्ष केला.
 • कस्तुरबा स्वतः शिकल्या नाहीत, पण त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते.
 • महात्मा गांधींना त्यांनी दिलेली साथ इतकी मोलाची होती की, त्यांच्यासारखे आत्मबलिदानाचे प्रतीक असलेले, व्यक्तिमत्व गांधीजींच्या आयुष्यात नसते, तर त्यांची अहिंसक चळवळ यशस्वी झाली असती का ? असा प्रश्न काही इतिहासकार विचारतात.
 • ज्या ज्या वेळी गांधीजी तुरुंगात गेले, तेव्हा त्यांच्या अनुपस्थित कस्तुरबानी आंदोलनाचे नेतृत्वही केले.
 • भारत छोडो आंदोलनाच्या वेळी, गांधीजी नंतर कस्तुरबा गांधी यांना अटक झाली.
 • तुरुंगात कस्तुरबा यांची प्रकृती बिघडली आणि दि. २२ फेब्रुवारी १९४४ रोजी तुरुंगातच त्यांचे निधन झाले.

कस्तुरबा गांधी यांची अनेक चरित्रे

 • कस्तुरबा गांधी यांची अनेक चरित्रे प्रसिद्ध झाली आहेत. त्यांतली ही काही :-
 • कस्तुरबा (हिंदी नाटक, लेखक – आर..के.पालीवाल)
 • बा (अनुवादित कादंबरी, मूळ हिंदी लेखक गिरिराज किशोर, मराठी अनुवाद – डॉ. अरुण मांडे)
 • कस्तूरबा गांधी (हिंदी चरित्र, लेखक – महेश शर्मा)
 • द सीक्रेट डायरी ऑफ कस्तूरबा (इंग्रजी; लेखिका- नीलिमा डालमिया)
 • हमारी बा – कस्तुरबा (हिंदी चित्रपट; दिग्दर्शक सचिन कौशिक + मनीष ठाकुर)
 • कस्तुरबा एक समर्पित जीवन – लेखिका : माया बदनोरे सुरेखा देवघरे यांनी या पुस्तकाचा हिंदी अनुवाद केला आहे.
 • कस्तुरबा (दा.पां. रानडे)
 • राष्ट्रमाता कस्तूरबा (विश्वंभर शर्मा)

FAQ

१. कस्तुरबा कोण होत्या तिच्याबद्दल पाच वाक्ये लिहा?

कस्तुरबा या महात्मा गांधी यांच्या पत्नी आहेत.
कस्तुरबा गांधी यांचे भारतीय इतिहासातील स्थान अतिशय महत्त्वाचे आहे.
कस्तुरबा यांचा गुजरात मधील वैष्णव कुटुंबात दि. ११ एप्रिल १८६९ रोजी पोरबंदर येथे जन्म झाला.
त्यांचे वडील गोकुळदास मकरंद कापडिया हे एक व्यापारी होते.
कस्तुरबा शाळेत गेल्या नाहीत. वयाच्या सातव्या वर्षी त्यांचा गांधीजींबरोबर साखरपुडा झाला आणि तेराव्या वर्षी विवाह.
कस्तुरबा १८९७ मध्ये महात्मा गांधी बरोबर दक्षिण आफ्रिकेत गेल्या. तर साबरमती येथे फिनिक्स वसाहत उभारण्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. तिथे भारतीयांसाठी संघर्ष करताना तीन वेळा तुरुंगात उपोषण शोषल.

२. कस्तुरबा गांधी कोणाच्या पत्नी होत्या?

कस्तुरबा या पती महात्मा गांधी यांच्या पेक्षा सहा महिन्यांनी मोठ्या होत्या. अवघ्या तेराव्या वर्षी कस्तुरबा यांचे महात्मा गांधी यांच्यासोबत लग्न झाले. कस्तुरबा गांधी या शिस्तप्रिय व खंबीर स्वभावाच्या व्यक्तिमत्व असल्यामुळे, सर्वजण त्यांना “बा” या नावाने संबोधत.

३. कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधी यांचा संबंध काय?

वयाच्या सातव्या वर्षी त्यांचा गांधीजींबरोबर साखरपुडा झाला आणि तेराव्या वर्षी विवाह.

४. महात्मा गांधींना किती मुले होती?

१८८५ मध्ये कस्तुरबा या वयाच्या १७ वर्षाच्या असताना त्यांना पहिली मुलगी झाली. परंतु दुर्दैवाने ती मुलगी काहीच दिवस जगू शकली. यानंतर बॅरिस्टरच्या शिक्षणाच्या काळात, महात्मा गांधी हे लंडनहून भारतामध्ये परतले, यानंतर कस्तुरबा व गांधीजींना 1988 मध्ये हरिलाल नावाचा दुसरा मुलगा झाला. यानंतर १८९१ मध्ये गांधीजींना मनीलाल नावाचा अजून एक मुलगा झाला व यानंतर देवदास, रामदास अशी अजून दोन मुले महात्मा गांधीजींना झाली.

५. कस्तुरबा गांधींचे लग्न कोणत्या वयात झाले?

बा गांधींचे वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी महात्मा गांधीजींसोबत लग्न झाले .

६. कस्तुरबा गांधींचा मृत्यू कसा झाला?

१९४४ जानेवारी मध्ये, कस्तुरबा जी यांना हृदयविकाराचे दोन झटके आले, त्यामुळे कस्तुरबा या अंथरुणालाच खिळून राहिल्या, यानंतर अखेर दिनांक २२ फेब्रुवारी १९९४ मध्ये सायंकाळी कस्तुरबा गांधी यांची प्राणज्योत मालवली. त्यावेळी त्यांचे वय साधारणतः ७४ वर्ष होते. यानंतर कस्तुरबा यांच्यावर पुण्यातील आगा खाना पॅलेस मध्ये अंतिम संस्कार करण्यात आले.

७. कस्तुरबाईंनी काय शिकवलं?

कस्तुरबाईंनी गांधीजींप्रमाणे महिलांच्या कल्याणासाठी काम केले. गरीब मुलांना वाचन व लेखन शिकवले. याबरोबरच गांधीजी इंडिगो टॅक्स वरून लढत होते, तेव्हा महात्मा गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा यांनी गांधीजींच्या मागे स्वच्छता, शिस्त व स्वच्छतेचा संदेश जनतेला दिला

८. कस्तुरबा गांधी यांचा जन्म कधी झाला ?

कस्तुरबा यांचा जन्म दिनांक ११ एप्रिल १८६९ मध्ये काठीयावाड्याच्या पोरबंदर शहरांमध्ये झाला.

९. कस्तुरबा गांधी कोण होत्या ?

कस्तुरबा या महात्मा गांधीजींच्या पत्नी असण्याबरोबरच, एक खंबीर स्वभावाची स्त्री, समाजसेविका, शिस्तप्रिय व स्वातंत्र्याच्या लढा मध्ये गांधीजींसोबत पावलावर पाऊल टाकणाऱ्या एक क्रांतिवीर होत्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये कस्तुरबा यांची भूमिका ही अजरामर व गांधीजींनी इतकीच महत्त्वाची आहे.

१०. कस्तुरबा गांधी यांच्या माता पित्याचे नाव काय ?

कस्तुरबा वृजकुवरंबा कपाडिया व गोकुळदास मकरंद कापडिया हे एक व्यापारी होते.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास कस्तुरबा गांधी यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment