TOP 30 PLACES TO VISIT IN MONSOON IN MAHARASHTRA : PART 01 – पावसाळा ऋतू निसर्गाला, पर्यावरणाला, सजीवांना, जीवांना एक नवीन संजीवनी, एक नवीन उत्स्फूर्तता, एक नवीन सुंदरता देतो. पावसाळा म्हटला की प्रत्येक पर्यटनप्रेमीचे मन हे ट्रेकिंग करणे, बाईक राईड करणे, एखाद्या सुंदर अशा धबधब्याला भेट देणे, याकडे वळते नाही का? त्यामुळे प्रत्येकाचे मन हे असं काही शोधण्यामध्ये गुंतलेले असते, ज्या ठिकाणी जाऊन पावसाळ्याचा खरा आनंद घेता येईल व पावसाळ्याचे सुख अनुभवता येईल.
पावसाळ्यात फिरण्याची ठिकाणे : PLACES TO VISIT IN MONSOON IN MAHARASHTRA
मित्रांनो आम्ही आमच्या लेखातून तुम्हाला आज मान्सून मध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे म्हणजे 30 पावसाळ्यात फिरण्याची ठिकाणे -कोणती आहेत याची माहिती देत आहोत. या माहितीच्या मदतीने तुम्ही देखील तुमचा पावसाळा हा सुखाने, उत्स्फूर्ततेने व दगदगीच्या आयुष्यातून थोडा आनंदाच्या दिशेने जाणारा अनुभवू शकाल. चला तर मित्रांनो लगेच महाराष्ट्रातील TOP 30 PLACES TO VISIT IN MONSOON कोणती आहेत ते जाणून घ्या.
महाराष्ट्रातील पावसळ्यातील ३० लोकप्रिय ठिकाणे
महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील पर्यटक पावसाळ्यात भेट देण्याच्या सर्वोत्तम डेस्टीनेशन्स शोधत असतात, जर तुम्हीही महाराष्ट्रातील सर्वोत्तम, सुंदर, विलोभनीय प्रेक्षणीय स्थळे शोधत असाल, तर हा लेख नक्कीच तुमची मदत करेल. चला तर मग पाहूया TOP 30 PLACES TO VISIT IN MONSOON IN MAHARASHTRA
०१. लोणावळा
महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध ठिकाण, पुणे जिल्ह्यातील लोणावळा हे ठिकाण महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत, समुद्रसपाटीपासून ६३० मीटर एवढ्या उंचीवर आहे. लोणावळा पुण्यापासून ६३ किलोमीटर तर मुंबईपासून ९६ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. मित्रांनो लोणावळा येथे चिक्की हा पदार्थ सुप्रसिद्ध आहे. पुणे शहरातून या ठिकाणी जाण्यासाठी लोकल रेल्वे गाडीची देखील सोय आहे. पुणे – मुंबई एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे हा लोणावळा शहरामधूनच जातो. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतात सुद्धा लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण म्हणून सुप्रसिद्ध आहे.
इथे तुम्हाला हिरवेगार निसर्गरम्य वातावरण डोंगर, दऱ्या व कोसळणारे धबधबे या सर्व गोष्टीचा आनंद एकाच ठिकाणी घेता येतो. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात बरेच पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात. लोणावळा या ठिकाणाच्या जवळच पाहण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. यामध्ये तुम्हाला राजमाची पॉईंट, भुशी डॅम, वरवंड डॅम, टायगर स्लीप, कार्ला लेणी, लोहगड आणि विसापूर किल्ले ही काही ठराविक पर्यटन स्थळ आहेत. मित्रांनो जर तुम्ही मुंबई – पुणे ही टूर करणार असाल तर लोणावळा या पर्यटन स्थळाला नक्की भेट द्या.
PART 02 – TOP 30 PLACES TO VISIT IN MONSOON IN MAHARASHTRA
लोणावळा या पर्यटन स्थळाच्या जवळच खंडाळा हे देखील एक थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. लोणावळा येथे जाण्यासाठी रस्ता आणि रेल्वे मार्ग या दोन्ही मार्गाने मुंबई आणि पुण्यातील पर्यटकांना जाण्याची सोय आहे.
स्थान –
लोणावळा-खंडाळा, महाराष्ट्र
मुंबई ते लोणावळा अंतर व त्यासाठी लागणारा कालावधी –
मुंबई ते लोणावळा हे अंतर साधारणतः ९६ किलोमीटर एवढे असून यासाठी साधारणतः २ लागतात.
पुणे ते लोणावळा अंतर व त्यासाठी लागणारा कालावधी –
पुणे ते लोणावळा हे अंतर साधारणतः ६३ किलोमीटर असून यासाठी तुम्हाला १ तास ३० मिनिटे एवढा कालावधी लागू शकतो.
लोणावळामध्ये करण्यासारख्या गोष्टी
- राजमाची किल्ला ट्रेक व कॅम्पिंग
- पवना तलाव कॅम्पिंग
- कोरीगड किल्ला ट्रेकिंग
- भाजे लेणी – हायकिंग
- कार्ला लेणी – कॅम्पिंग
- बलून राईड
- कुणे धबधबा – ट्रेकिंग
- शूटिंग पॉईंट
- डेला एडवेंचर गेम
- भुशी डॅम जवळ कॅम्पिंग
लोणावळा – खंडाळा जवळील प्रेक्षणीय स्थळे :-
- अमृतांजन पॉईंट
- डायनासोर पार्क
- पवना तलाव
- सुनील वॅक्स म्युझियम
- कार्ला लेणी
- भाजे लेणी
- नागफणी
- कुणे धबधबा
- राजमाची पॉइंट
- लोहगड किल्ला
- टायगर पॉईंट
- देवकुंड धबधबा
कालावधी/दिवस –
लोणावळा हिल स्टेशन त्याच्या सौंदर्याने, त्याच्या नैसर्गिक परिसराने, त्यामधील असणाऱ्या घनदाट जंगलांनी, अनेक धबधबे, धरणे, ट्रेकिंग इत्यादी गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे. यासाठी तुम्हाला कमीत कमी ५ दिवसांची सहल नियोजित करणे गरजेचे आहे. त्या ५ दिवसांमध्ये तुम्ही लोणावळ्यांमधील प्रेक्षणीय स्थळे व तसेच लोणावळ्यामध्ये करण्यासारख्या गोष्टींची मजा घेऊ शकता.
०२. माथेरान
पर्यटन स्थळ माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. खास करून मुंबई आणि पुण्यातील लोकांसाठी हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. माथेरान हे ठिकाण मुंबई पासून १०० किलोमीटर तर पुण्यापासून १२० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. साधारणतः २६०० फूट एवढ्या उंचीवर माथेरान हे पठार वसलेले आहे. या पठारावर घनदाट झाडी आणि वेगवेगळे प्रसिद्ध पॉईंट्स आहेत. कल्याणच्या मलंग गडापासून ही डोंगररांग सुरू होते. माथेरान हे ठिकाण सहलीच्या दृष्टीने खूपच योग्य आहे. या ठिकाणी हिवाळ्यात हिरवीगार वनराई, धबधबे व धुक्यांची सावट बघायला मिळते. या ठिकाणी बरेच पर्यटक येत असतात. पावसाळ्यात हे पर्यटनस्थळ तर पर्यटकांसाठी नंदनवन ठरते.
नेरळ हे माथेरानच्या अगदी जवळचे रेल्वे स्टेशन आहे. येथून तुम्हाला टॅक्सीची सोय देखील आहे. माथेरान मध्ये बऱ्याच प्रमाणात पर्यटक येत असतात. इथल्या मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे छोटे छोटे स्टॉल्स आहेत.
स्थान – माथेरान,महाराष्ट्र
माथेरान मध्ये करण्यासारख्या गोष्टी –
- हॉर्स रायडिंग
- ट्रेकिंग
- शॉपिंग
- साईट सीइंग
- टॉय ट्रेन राइड
माथेरान जवळील प्रेक्षणीय स्थळे :-
- दोधाणी धबधबा
- अंबरनाथ मंदिर
- महादेवाचे मंदिर
- लॉर्ड पॉईंट
- सनसेट पॉईंट
- वन ट्री हिल पॉईंट
- माधवजी पॉईंट
- प्रबळगड किल्ला
कालावधी/ दिवस –
संपूर्ण माथेरानचे दर्शन घेण्यासाठी व त्या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळे फिरण्यासाठी तुम्हाला साधारणतः 2 ते 3 दिवस आवश्यक आहे.
०३. आंबोली
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा जिल्हा खास करून पर्यटन क्षेत्रासाठी ओळखला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बरीच नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळेच या ठिकाणी वर्षभर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. १९९९ मध्ये महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याला घोषित केले. महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाणाऱ्या आंबोली या पर्यटन स्थळाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
हे ठिकाण समुद्र सपाटीपासून ६९० मीटर एवढ्या उंचावर आहे. महाराष्ट्रातील पावसाचे सरासरी प्रमाण बघितले तर, संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस या ठिकाणी पडतो. तसेच आंबोली या ठिकाणी आपल्याला बरेच धबधबे देखील पाहायला मिळतात .त्यामुळे आंबोली या ठिकाणचे सौंदर्य हे आपल्या मनाला भुरळ पाडते. हिवाळ्यामध्ये देखील आंबोली हा परिसर धुक्यानी भरलेला असतो. आंबोली हे महाराष्ट्रातील उत्कृष्ट आणि विकसित झालेले पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे वर्षभर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. पर्यटकांना आंबोली धबधबा हा खूप आकर्षित करतो. म्हणूनच बरेच पर्यटक या धबधब्याखाली ताससन्तास मनमुराद आनंद घेत असतात.
स्थान –
आंबोली, सावंतवाडी, जिल्हा-सिंधुदुर्ग, महाराष्ट्र.
मुंबई ते आंबोली अंतर व लागणारा कालावधी –
मुंबईपासून आंबोलीला येण्यासाठी साधारणतः ४८९ किलोमीटर एवढे अंतर पार करावे लागते यासाठी तुम्हाला ८ तास ३० मिनिटे एवढे अंतर पार करावे लागते.
पुणे ते आंबोली अंतर व लागणारा कालावधी –
पुणे ते आंबोली हे साधारणतः ३४६ किलोमीटर एवढा अंतरावर असून यासाठी तुम्हाला ६ तास ३० मिनिटे लागू शकतात.
आंबोली येथे करण्यासारख्या गोष्टी –
- आंबोली धबधबा ट्रेकिंग
- महादेव गड ट्रेकिंग
- दुर्ग धकोबा ट्रेक
- नेचर ट्रेल
आंबोली जवळील प्रेक्षणीय स्थळे :-
- आंबोली धबधबा
- महादेव गड किल्ला
- सनसेट पॉईंट
- हिरण्यकेशी मंदिर
- शिरगावकर पॉईंट
कालावधी/ दिवस –
आंबोली फिरण्यासाठी तुम्हाला दोन ते तीन दिवस लागू शकतात.
०४. महाबळेश्वर
महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील अतिशय प्रसिद्ध व लोकप्रिय हिल स्टेशन पैकी एक आहे. येथे पडत असलेल्या पावसामुळे या ठिकाणचा परिसर हा अगदी घनदाट जंगल असल्याचे आपल्याला पाहायला. मिळते. या ठिकाणची स्ट्रॉबेरी ही जगप्रसिद्ध असून महाबळेश्वराचे मंदिर हे देखील प्रसिद्ध आहे.
स्थान –
महाबळेश्वर, सातारा जिल्हा, महाराष्ट्र.
मुंबई ते महाबळेश्वर अंतर व आवश्यक कालावधी –
मुंबई ते महाबळेश्वर हे अंतर साधारणतः २६५ किलोमीटर एवढे असून, व यासाठी तुम्हाला ५.५ तास लागू शकतात.
पुणे ते महाबळेश्वर अंतर व आवश्यक कालावधी –
पुणे ते महाबळेश्वर हे अंतर साधारणतः १२५ किलोमीटर इतके असून, यासाठी तुम्हाला अंदाजे ३ तास लागू शकतात.
महाबळेश्वर जवळ करण्यासारख्या गोष्टी –
- कॅम्पिंग
- फोटोशूट
- प्रतापगड ट्रेकिंग
- स्ट्रॉबेरी फॉर्म
- पिकनिक स्पॉट
महाबळेश्वर जवळील प्रेक्षणीय स्थळे :-
- लिंगमळा वॉटर फॉल
- धोबी धबधबा
- लॉडवीक पॉईंट
- श्री पंचगंगा मंदिर
- महाबळेश्वर देऊळ
कालावधी /दिवस –
महाबळेश्वर जवळील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी साधारणतः तुम्हाला तीन ते चार दिवस लागू शकतात.
०५. माळशेज घाट
माळशेज घाट, कल्याण नगर या महामार्गावर आहे. जरी हा घाट पावसाळी पर्यटनासाठी म्हणून ओळखला जात असला तरी, लवकरच माथेरान आणि महाबळेश्वर प्रमाणेच बारमाही एक थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित होत आहे. महाराष्ट्राचे कश्मीर म्हणूनही माळशेज घाटाला ओळखले जाते. उंच उंच पर्वत व त्यावरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे ही माळशेज घाटातील प्रमुख आकर्षणे आहेत. या घाटांच्या कडाची उंची हे १४२४ मीटर एवढी आहे. मान्सून संपल्यानंतर गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी येत असतात.
माळशेज घाटापासून जवळच हरिश्चंद्रगड देखील आहे. हरिश्चंद्रगड हा माळशेज घाटातून मात्र ७ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. महाराष्ट्रातील इतर पारंपारिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांप्रमाणे आढळणारी तटबंदी या किल्ल्यावर दिसत नाही.
स्थान –
माळशेज घाट, जिल्हा-पुणे, कल्याण अहमदनगर रोडवर स्थित.
मुंबई ते माळशेज घाट अंतर व आवश्यक कालावधी –
मुंबई ते माळशेज घाट अंतर हे साधारणतः १३६ किलोमीटर इतके असून यासाठी आवश्यक कालावधी ३ तास आहे.
पुणे ते माळशेज घाट अंतर व आवश्यक कालावधी –
पुणे ते माळशेज घाट अंतर साधारणतः १३८ किलोमीटर असून यासाठी आवश्यक कालावधी हा सव्वा तीन तास आहे.
माळशेज घाट मध्ये करण्यासारख्या गोष्टी –
- हरिश्चंद्रगड किल्ला ट्रेकिंग
- अजोबा हिल किल्ला हायकिंग
- पक्षी निरीक्षण
- घाटांमध्ये ड्राईव्ह करणे
- शिखर चढणे
- धबधब्यांमध्ये मजा करणे
माळशेज घाट जवळील प्रेक्षणीय स्थळे :-
- माळशेज धबधबा
- पिंपळगाव जोगा धरण
- हरिश्चंद्रगड किल्ला
- अजोबा हिल किल्ला
- कोकण कडा
- लोणावळा
- पवना तलाव
कालावधी/दिवस –
माळशेज घाटामध्ये पर्यटन स्थळे बघण्यासाठी तुम्हाला साधारणतः २ दिवस आवश्यक आहेत.
०६. मुळशी धरण
पावसाळ्यात भेट देण्यासाठी तुम्ही सर्वोत्तम ठिकाणे शोधत असाल, तर मुळशी धरण हे त्यापैकी एक आहे. विस्तीर्ण निसर्गाच्या पायवाटेने आणि हिरवाईने नटलेले हे ठिकाण अतिशय सुंदर व विलोभनीय आहे. मुळशी धरणाचा आजूबाजूचा परिसर पावसाळ्यामध्ये निसर्गरम्य व हिरवाईने नटून जातो. त्यामुळे हे धरण एक पिकनिक स्पॉट, ट्रेकिंगसाठी, पक्षी निरीक्षणासाठी लोकप्रिय आहे.
स्थान –
मुळशी धरण, जिल्हा-पुणे, महाराष्ट्र.
मुंबई ते मुळशी धरण अंतर व आवश्यक कालावधी –
मुंबईवरून मुळशी धरण ला जाण्यासाठी साधारणतः तुम्हाला १६६ किलोमीटर अंतर पार करावे लागते व यासाठी तुम्हाला ३ तास ४० मिनिटे एवढा कालावधी लागू शकतो.
पुणे ते मुळशी धरण अंतर व कालावधी –
पुण्यावरून मुळशी धरण ला जाण्यासाठी साधारणतः ४० किलोमीटर एवढे अंतर पार करावे लागते व यासाठी तुम्हाला १ तास २५ मिनिटे एवढा कालावधी लागू शकतो.
मुळशी धरण जवळ करण्यासारख्या गोष्टी –
- पिकनिक स्पॉट
- ट्रेकिंग
- कॅम्पिंग
- पक्षी निरीक्षण
मुळशी धरण जवळील प्रेक्षणीय स्थळे :-
- दर्शन म्युझियम
- माता अमर देवी
- आगाखान प्लेस
- चतुर्श्रुंगी मंदिर
- पातालेश्वर गुंफा मंदिर
- बालाजी मंदिर
कालावधी /दिवस –
मुळशी धरण व त्या ठिकाणी आजूबाजूची पर्यटन स्थळे फिरण्यासाठी तुम्हाला साधारणतः दोन ते तीन दिवस लागू शकतात.
०७. भीमाशंकर
महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील अरण्य, अध्यात्म आणि जैवविविधतेचा समतोल राखणारे साक्षात शिवशंकराचे वास्तव्य आणि भीमा नदीच्या उगमस्थानाचे रहस्य सांगणारे भीमाशंकर. भीमाशंकर समुद्रसपाटीपासून १२०० मीटर उंचीवर आहे. हे अभयारण्य सुमारे ३००० फूट उंच सह्याद्री पर्वतरांगाच्या उत्तर दक्षिण व पश्चिम पूर्वकड्यांनी दोन विभागात विभागले गेले असून, सुमारे १३७८ हेक्टर क्षेत्रात पसरले आहे. १९८५ मध्ये भीमाशंकर अभयारण्य घोषित करण्यात आले.
भीमाशंकरच्या परिसरात दरवर्षी सुमारे ४००० मिलिमीटर पाऊस पडतो. डोंगर माथ्यावरचा परिसर असल्यामुळे भीमाशंकरला खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतो आणि तो डोळ्यांना तृप्त करून जातो. सकस जमीन असल्यामुळे घाटमाथ्याच्या आश्रयाने वाढणाऱ्या जंगलांप्रमाणे इथलं जंगलही वर्षानुवर्ष समृद्ध होत आहे. हे स्थान भीमा आणि घोड नद्यांच्या उगमाचे स्थान असून भीमाशंकर सारख्या तीर्थक्षेत्राची प्रसिद्धी ऐतिहासिक असल्यामुळे प्राचीन काळापासूनच या जंगलाचं देवराई म्हणून जतन होत आहे.
स्थान –
भीमाशंकर ,जिल्हा-पुणे, शिवाजीनगर, राज्य-महाराष्ट्र.
मुंबई ते भीमाशंकर अंतर व कालावधी –
भीमाशंकर हे मुंबईपासून साधारणतः २२० किलोमीटर एवढे अंतरावर असून, साधारणतः ५ ते ६ तास लागतात.
पुणे ते भीमाशंकर अंतर व कालावधी –
भीमाशंकर हे पुण्यापासून साधारणतः ११० किलोमीटर अंतरावर असून साधारणतः ३ ते ४ तास लागतात.
भीमाशंकर मध्ये करण्यासारख्या गोष्टी-
- पक्षी निरीक्षण
- पॅराग्लाइडिंग
- ट्रेकिंग
- व्हॅली पॉईंट्स फिरणे
भीमाशंकर जवळील प्रेक्षणीय स्थळे :-
- सह्याद्री वन्यजीव अभयारण्य
- कोकण कडा
- नाग फणी
- आहुपे धबधबा
- कोंढवळ धबधबा
- ज्योतिर्लिंग मंदिर
कालावधी/दिवस –
भीमाशंकर एक्सप्लोर करण्यासाठी साधारणतः तुम्हाला एक किंवा दोन दिवसाचा कालावधी लागू शकतो.
०८. भंडारदरा
भंडारदरा हे पर्यटन स्थळ त्याला लाभलेल्या सुंदर धबधब्यांनी, विस्तीर्ण हिरवाईंनी सजलेले पश्चिम घाटातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. भंडारदऱ्याला महाराष्ट्रातील लाखो पर्यटक मान्सूनच्या काळात भेट देण्यास पसंती देतात. जेव्हा निसर्ग हा पावसाळ्यात त्याच्या हिरवाईने विलोभनीय दृश्याने खुलून जातो, त्यावेळी या ठिकाणाच्या परिसरामध्ये सौंदर्य अजून खुलून येते. भंडारदरा एक पिकनिक स्पॉट व कॅम्पिंग करण्यासाठी सुद्धा लोकप्रिय असल्यामुळे बरेच कॅम्पिंग प्रेमी या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणच्या सुंदर व विलोभनीय दृश्याचा आनंद घेतात.
स्थान –
भंडारदरा, अहमदनगर, महाराष्ट्र.
मुंबई ते भंडारदरा अंतर व आवश्यक वेळ –
मुंबईवरून भंडारदऱ्याला जाण्यासाठी साधारणतः १६५ किलोमीटर अंतर पार करावे लागते व यासाठी तुम्हाला ४ तास लागू शकतात.
पुणे ते भंडारदरा अंतर व आवश्यक कालावधी –
पुणे ते भंडारदऱ्याला जाण्यासाठी तुम्हाला १७२ किलोमीटर एवढे अंतर पार करावे लागते त्यासाठी तुम्हाला ५ तास लागू शकतील.
भंडारदरा मध्ये करण्यासारख्या गोष्टी –
- कळसुबाई शिखर ट्रेकिंग
- रंधा धबधबा कॅम्पिंग
- रतनगड किल्ला ट्रेकिंग
- बोट राईड
- काजवा महोत्सव
भंडारदर्या जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- रतनगड किल्ला
- काजवा महोत्सव
- रंधा धबधबा
- भंडारदरा धरण
- कळसुबाई शिखर
- विलसन धरण
- अम्ब्रेला धबधबा
- अमृतेश्वर मंदिर
- माळशेज घाट
कालावधी/ दिवस –
भंडारदरा एक्सप्लोर करण्यासाठी तुम्हाला साधारणतः २ दिवस आवश्यक आहेत.
०९. ताम्हिणी घाट
पुण्याजवळील ताम्हिणी घाटचे नयनरम्य दृश्य आपल्याला नक्कीच स्तब्ध करून टाकते. छोटे जलप्रपात, ओढे, हिरवीगार वनराई, निसर्गातील जैव विविधता या सर्वांमुळे ताम्हिणी घाट महाराष्ट्रातील पावसाळी सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
स्थान –
ताम्हिणी घाट ,महाराष्ट्र.
मुंबई ते ताम्हिणी घाट अंतर व आवश्यक कालावधी-
मुंबई ते कामिनी घाट हे अंतर साधारणता १४४ किलोमीटर एवढे असून साधारणतः ४ तास एवढा कालावधी लागू शकतो.
पुणे ते ताम्हणी घाट अंतर व आवश्यक कालावधी –
पुणे पुणे ते ताम्हिणी घाट अंतर हे साधारणतः ५४ किलोमीटर असून त्यासाठी लागणारा कालावधी हा २ तास आहे.
ताम्हिणी घाट जवळ करण्यासारख्या गोष्टी-
- घनगड किल्ला ट्रेकिंग
- मुळशी तलाव कॅम्पिंग
- कोरीगड फोर्ट ट्रेकिंग
- प्लस व्हॅली एडवेंचर
- ताम्हिणी धबधबा ट्रेकिंग
ताम्हिणी घाटा जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- ताम्हिणी धबधबा
- हाडशी मंदिर
- कुंडलिका व्हॅली
- घनगड किल्ला
- मुळशी तलाव
- वरसगाव धरण
- संत दर्शन म्युझियम हडशी
- देवकुंड धबधबा
- दसवे पॉईंट किल्ले सुधागड
कालावधी /दिवस –
ताम्हिणी घाट फिरण्यासाठी साधारणतः तुम्हाला दोन ते तीन दिवस लागू शकतात.
१०. कर्नाळा
१५० हून जास्त प्रकारचे पक्षी जिथे वास्तव्य करतात, कायमच जो परिसर हिरव्यागार वनश्रीने नटलेला असतो ,ते ठिकाण आहे कर्नाळा. ज्याच्या इतिहासाचा मागवा घेतला तर आपण थेट यादवकाळात पोहोचतो. रायगड जिल्ह्यातला महत्त्वाचा किल्ला, कर्नाळा किल्ला. पनवेलहून कर्नाळ्याला सहज जाता येते.
कर्नाळा हा किल्ला समुद्रपाटी पासून साधारणतः ५०० मीटर एवढा उंच असून, सर्वात जुन्या बांधकामांपैकी एक आहे. पावसाळ्याच्या काळात किल्ल्याच्या आजूबाजूला असलेला परिसर हा अतिशय सौंदर्याने खुलून जातो व या काळात या किल्ल्याला भेट देणे व या किल्ल्याची ट्रेकिंग करणे एक सुखदायक अनुभव देऊन जातो.
स्थान –
कर्नाळा, जिल्हा-रायगड, महाराष्ट्र.
मुंबई ते कर्नाळा अंतर व आवश्यक कालावधी –
मुंबईवरून कर्नाळाला जाण्यासाठी तुम्हाला ५० किलोमीटर अंतर पार करावे लागते यासाठी तुम्हाला साधारणतः १.५ तास लागू शकतात.
पुणे ते कर्नाळा अंतर व आवश्यक कालावधी –
पुण्यावरून कर्नाळ्याला जाण्यासाठी साधारणतः १२२ किलोमीटर अंतर पार करावे लागते व यासाठी तुम्हाला अंदाजे २.५ तास लागू शकतात.
कर्नाळामध्ये करण्यासारख्या गोष्टी –
- पक्षी निरीक्षण
- कर्नाळ किल्ला ट्रेकिंग
- कलावंतीण दुर्ग ट्रेकिंग
- स्मार्ट इको पार्क
- प्रबळगड किल्ला ट्रेकिंग
कर्नाळ जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- कर्नाळ पक्षी अभयारण्य
- कर्नाळा किल्ला
- प्रबळगड किल्ला
- सेंट्रल पार्क खारघर
- श्री स्वामी समर्थ मंदिर
- मोरबे धरण
- वडाळे तलाव
- भागवत धरण
- सीवूड फ्लेमिंगो पॉईंट
- बेलापूर किल्ला
कालावधी/दिवस –
कर्नाळा मधील प्रेक्षणीय ठिकाणे फिरण्यासाठी तुम्हाला साधारणतः एक ते दोन दिवस लागू शकतात.
११. ठोसेघर धबधबा
ठोसेघर धबधबा घाटांच्या गर्दीत विस्तारलेला असुन निसर्ग प्रेमींसाठी व पर्यटन प्रेमींसाठी योग्य ठिकाण आहे. महाराष्ट्रातील पावसाळ्यामध्ये भेट देण्यासाठी सर्वोत्तम प्रेक्षणीय स्थळांपैकी एक म्हणून ठोसेघरची ओळख आहे.
स्थान –
ठोसेघर धबधबा, सातारा ,महाराष्ट्र.
मुंबई ते ठोसेघर धबधबा अंतर व आवश्यक वेळ –
मुंबईवरून ठोसेघर धबधब्याला जाण्यासाठी साधारणतः २७६ किलोमीटर एवढे अंतर पार करावे लागते यासाठी साधारणतः चार ते पाच तास लागतात.
पुणे ते ठोसेघर धबधबा अंतर व आवश्यक वेळ –
पुणे ते ठोसेघर हे अंतर साधारणतः १३४ किलोमीटर असून तुम्हाला तीन तास लागू शकतात.
ठोसेघर जवळील करण्या सारख्या गोष्टी –
- सज्जनगड ट्रेकिंग
- कासारे कॅम्पिंग
- वन्य जीवन निरीक्षण
ठोसेघर जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- कास पठार
- सज्जनगड
- कास तलाव
- कोयना वन्यजीव अभयारण्य
कालावधी /दिवस –
ठोसेघर धबधबा व त्या ठिकाणी पर्यटन स्थळे पाहण्यासाठी तुम्हाला साधारणतः एक ते दोन दिवस लागू शकतात.
१२. इगतपुरी
इगतपुरी हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय पावसाळी पर्यटन स्थळ आहे. इगतपुरी हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. इगतपुरी हे हिल स्टेशन असल्याने हे महाराष्ट्रातील बऱ्याच पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या पर्यटनाच्या परिसरात अनेक सुंदर पर्यटन स्थळे आहेत, जी पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. महाराष्ट्रातील बरेच निसर्गप्रेमी पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात.
स्थान –
इगतपुरी, जिल्हा-नाशिक, महाराष्ट्र.
मुंबई ते इगतपुरी अंतर व आवश्यक वेळ –
मुंबई वरून इगतपुरी ला जाण्यासाठी तुम्हाला साधारणतः १२० किलोमीटर अंतर पार करावे लागते यासाठी तुम्हाला २ तास २० मिनिटे लागतात.
पुणे ते इगतपुरी अंतर व आवश्यक वेळ –
पुण्यावरून इगतपुरी ला जाण्यासाठी तुम्हाला साधारणतः २३८ किलोमीटर अंतर पार करावे लागते यासाठी तुम्हाला ४ तास ४० मिनिटे लागू शकतात.
इगतपुरी जवळ करण्यासारख्या गोष्टी –
- इगतपुरी कॅम्पिंग
- कळसुबाई ट्रेकिंग
- कळसुबाई कॅम्पिंग
- हरिहर किल्ला ट्रेकिंग
- तळेगाव तलाव कॅम्पिंग
इगतपुरी जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- कसारा घाट
- कॅमल व्हॅली पॉईंट
- भावली धरण
- म्यानमार गेट
- सांधण व्हॅली
- विहिगाव धबधबा
- त्रिंगलवाडी किल्ला
- कळसुबाई शिखर
- घाटनदेवी मंदिर
- इगतपुरी
कालावधी /दिवस –
इगतपुरी व इगतपुरी जवळील परीसर पाहण्यासाठी तुम्हाला साधारणतः तीन ते चार दिवस आवश्यक आहेत.
१३. लोहगड किल्ला
खूप चांगल्या ऐतिहासिक घडामोडी अनुभवलेल्या अनेक किल्ल्यांची आज पडझड झालेली दिसते. काही किल्ले मात्र आजही खूप चांगल्या स्थितीत उभे आहेत. स्वतः अनुभवलेल्या इतिहासाचे जिवंत साक्षीदार. प्राचीन काळापासून ते इंग्रजांची सत्ता येईपर्यंतची अनेक स्थित्यंतरे या किल्ल्यांनी अनुभवली. बोर घाटावर लक्ष ठेवण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका या किल्ल्यांनी बजावली. लोहगड-विसापूर-तुंग-तिकोना-कोरेगड. मळवली स्टेशन पासून जवळच असलेला लोहगड किल्ल्याचे दिमाखदार किल्ला असे वर्णन करता येईल.
चढायला सोपा असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने इथे येतात. या भागात पाऊस जोरदार असतो. त्यामुळे या दिवसात लोहगड इतर वेळेपेक्षा आणखीनच सुंदर दिसतो. लोहगडवाडी गावातून किल्ल्यावर जायचं. सुरुवातीपासूनच किल्ला अजूनही उत्तम स्थितात आहे, याची जाणीव होते. वळणावळणाची वाट पायथ्यापासूनच सुरू होते. पायऱ्या चढत आपण बऱ्यापैकी उंचीवर आलो की तिथून दिसणारा खालचा परिसर नेत्र सुखद आहे. लोहगडाला असलेले दरवाजे हे त्याच्या इतर वैशिष्ट्यांपैकी एक.
स्थान –
लोहगड किल्ला, जिल्हा-पुणे, महाराष्ट्र.
मुंबई ते लोहगड अंतर व आवश्यक कालावधी –
मुंबई ते लोहगड हे अंतर साधारणतः १०० किलोमीटर असून, यासाठी तुम्हाला २ तास लागू शकतात.
पुणे ते लोहगड अंतर व आवश्यक कालावधी –
पुणे ते लोहगड हे अंतर साधारणतः ६५ किलोमीटर इतके असून यासाठी तुम्हाला दीड तास लागू शकतो.
लोहगड किल्ला जवळ करण्यासारख्या गोष्टी –
- लोहगड किल्ला ट्रेकिंग
- विसापूर किल्ला ट्रेकिंग
- पावना तलाव कॅम्पिंग
- डेला ऍडव्हेंचर पार्क
- लोणावळा तलाव कॅम्पिंग
- कोरीगड किल्ला ट्रेकिंग
- तिकोना किल्ला ट्रेकिंग
लोहगड किल्ल्या जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- सुनील वॅक्स म्युझियम
- तिकोना किल्ला
- कोरीगड किल्ला
- पावना तलाव
- टायगर लीप
- कार्ला लेणी
- भाजा लेणी
- एकवीरा देवी मंदिर
- कामशेत
- डायनासोर पार्क
कालावधी/दिवस –
लोहगड किल्ला फिरण्यासाठी तुम्हाला साधारणतः एक दिवस पुरेसा आहे. लोहगड जवळील पर्यटन स्थळे फिरण्यासाठी साधारण तुम्हाला एक ते दोन दिवस लागू शकतात.
१४. देवकुंड धबधबा
पावसाळ्यामध्ये भेट देणाऱ्या स्थळांपैकी देवकुंड धबधबा हे एक सर्वोत्तम प्रेक्षणीय स्थळ आहे. असे म्हटले जाते की पूर्वी या कुंडामध्ये देव स्नान करण्यासाठी येत असत म्हणून या कुंडास देवकुंड असे नाव पडले. देवकुंड हा धबधबा लोणावळा जवळ असून हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो.
स्थान –
देवकुंड धबधबा, लोणावळा, पुणे -महाराष्ट्र.
मुंबई ते देवकुंड धबधबा अंतर व आवश्यक कालावधी –
मुंबईवरून देवकुंड धबधब्याला जाण्यासाठी साधारणतः १७१ किलोमीटर एवढे अंतर पार करावे लागते व यासाठी तुम्हाला साधारणतः सात ते आठ तास लागू शकतात.
पुणे ते देवकुंड धबधबा अंतर व आवश्यक कालावधी –
पुण्यावरून देवकुंड धबधब्याला जाण्यासाठी साधारणतः १११ किलोमीटर एवढे अंतर पार करावे लागते. व या प्रवासासाठी तुम्हाला साधारणतः पाच तासाची आवश्यकता आहे.
देवकुंड धबधबा जवळ करण्यासारख्या गोष्टी –
- देवकुंड धबधबा ट्रेक
- रिव्हर राफ्टींग
- सहासी खेळ
- वन डे पिकनिक
देवकुंड धबधबा जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- कोरीगड किल्ला
- मुळशी धरण
- लोहगड किल्ला
- पवना तलाव
कालावधी /दिवस –
देवकुंड धबधबा व त्या जवळील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी साधारणतः तुम्हाला तीन ते चार दिवसांची आवश्यकता आहे.
१५. पाचगणी
पाच टेकड्यांचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगणी या पर्यटन स्थळाला एक विशेष लोकप्रियता मिळाली आहे. हे ठिकाण सातारा जिल्ह्यातील असून एक आकर्षक व पावसाळ्याच्या काळात भेट देण्यास एक उत्तम ठिकाण आहे.
स्थान –
पाचगणी, जिल्हा-सातारा, राज्य-महाराष्ट्र.
पाचगणी ते मुंबई अंतर व आवश्यक कालावधी –
पाचगणी ते मुंबई हे अंतर साधारणतः २४४ किलोमीटर एवढे असून यासाठी ५ तास एवढा कालावधी लागू शकतो.
पुणे ते पाचगणी अंतर व आवश्यक कालावधी –
पुणे ते पाचगणी हे अंतर साधारणतः १०० किलोमीटर असून यासाठी तुम्हाला २.५ तास लागू शकतात.
पाचगणी या ठिकाणी करण्यासारख्या गोष्टी-
- लिंगमाला धबधबा ट्रेक
- फोटोशूट
- बोटिंग
- कॅम्पिंग
पाचगणी जवळील प्रेक्षणीय स्थळे –
- वेण्णा तलाव
- लिंगमळा धबधबा
- पंचगंगा मंदिर
- विल्सन पॉईंट
- बॉम्बे पॉईंट
कालावधी/दिवस –
पाचगणी हे पर्यटन स्थळ एक्सप्लोर करण्यासाठी साधारणतः तुम्हाला तीन ते चार दिवस लागू शकतात.
FAQ
महाबळेश्वर मधील पावसाळी पर्यटन स्थळे कोणती ?
लिंगमाला वॉटर फॉल पॉईंट
धोबी धबधबा
लॉडविक पॉईंट
श्री पंचगंगा मंदिर
महाबळेश्वर देऊळ
रायगड मधील पर्यटन स्थळे कोणती ?
रायगड किल्ला
फणसाड अभयारण्य
पिसरनाथ महादेव मंदिर
वर्सोली बीच
श्री जगदीश्वर मंदिर
इमॅजिका
कोंढाणे लेणी
पाचगणीमधील पावसाळी पर्यटन स्थळे कोणती ?
वेण्णा तलाव
लिंगमळा धबधबा
पंचगंगा मंदिर
विल्सन पॉईंट
बॉम्बे पॉईंट
देवकुंड धबधबा जवळील प्रेक्षणीय स्थळे कोणती ?
कोरीगड किल्ला
मुळशी धरण
लोहगड किल्ला
पवना तलाव
लोहगड किल्ल्या जवळील पर्यटन स्थळे कोणती ?
सुनील वॅक्स म्युझियम
तिकोना किल्ला
कोरीगड किल्ला
पावना तलाव
टायगर लीप
कार्ला लेणी
भाजा लेणी
एकवीरा देवी मंदिर
कामशेत
डायनासोर पार्क
निष्कर्ष : Conclusion
आम्ही आमच्या लेखातून आपणास महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ३० PLACES TO VISIT IN MONSOON IN MAHARASHTRA पैकी १५ पर्यटन स्थळांची माहिती दिलेली आहे. इतर १५ ठिकाणांच्या माहितीसाठी याचा भाग ०२ -पावसात महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे – नक्की वाचा व कमेंट करून आम्हास नक्की कळवा.
धन्यवाद.