पिंपळाच्या झाडाची माहिती Peepal Tree

पिंपळाचे झाड हे जेवढे धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे आणि पवित्र समजले जाते, तितकेच ते आरोग्यासाठी गुणकारी आहे. पुराणामध्ये आणि आयुर्वेदामध्ये पिंपळाच्या झाडाला महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास या झाडाबद्दल माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती शेवट पर्यंत नक्की वाचा.

पिंपळाच्या झाडाची माहिती Peepal Tree

पिंपळाचे झाडे सर्वसाधारणपणे सर्वांनाच माहीत असते. हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि धार्मिक महत्त्व प्राप्त असलेले हे झाड खूप महत्त्वाचे समजले जाते.

भारतीय संस्कृतीमध्ये या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या झाडाच्या छायेत अतिशय थंडावा असतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या झाडाची मूळे खूप दूरवर पसरतात.

पिंपळाच्या झाडाची माहिती

हे वाचा –

पिंपळ झाडाचा परिचय –

झाडाचे नाव पिंपळ
शास्त्रीय नाव फायकस रिलिजिओजा 
झाडाची उत्पत्ति भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि चीन 
झाडाची ऊंची सुमारे ३० मी. 
पिंपळाचे खोड पांढरट गुलाबी, लाल, गुळगुळीत, तंतुमय 
पिंपळाची पाने हृदयाकार, लांब देठाची

पिंपळाचे नाव

हे झाड पानझडी वृक्ष मोसेरी कुलातील असून, त्याचे शास्त्रीय नाव “फारक कोरीलीजिओजा” आहे. या झाडास हिंदीत पिंपल व इंग्रजीमध्ये sacred fig या नावाने ओळखतात.

तथागत गौतम बुद्धांनी बोधगया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यान केले, तेव्हापासून पिंपळास “बोधीवृक्ष” या नावाने सुद्धा ओळखले जाते. हा बोधी वृक्ष बिहारमधील बोधगया येथे आपणास पहावयास मिळतो.

पिंपळ

पिंपळ कूठे आढळतात ?

हा वृक्ष मूळचा भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि चीन या देशातील आहे. भारतात हा वृक्ष अनेक गावांमध्ये मंदिरांच्या समोर पहायला मिळतो. हे वृक्ष भारतीय उपखंडातील एक महत्त्वाचा वृक्ष आहे.

हे वृक्ष साधारणतः भिंतीवर, छपरावर, खांबावर, झाडांवर, जेथे जागा मिळेल त्या ठिकाणी वाढतात. संपूर्ण भारतामध्ये आढळणारा हा वृक्ष विशेषतः हिमालयाच्या उताराचा भाग पंजाब, ओरिसा आणि कोलकत्ता या भागामध्ये पाहायला मिळतात.

पिंपळ वृक्षाचा आयु:काळ  

या वृक्षाला जास्त काळ आयुष्य असल्याने, वृक्षाला अक्षय वृक्ष असे म्हणतात.

पिंपळ वृक्षाचे वर्णन

हा वृक्ष साधारणतः ३० मीटर उंच वाढतो. पिंपळाचे खोड, पांढरट, गुलाबी, लाल, गुळगुळीत आणि तंतुमय असते. या वृक्षाची पाने साधी एका आड एक अशी, हृदयाकृती आणि समोर टोकाला निमुळती झालेली असतात.

या पानांचे देठ लांब असून, पाने झाडाला लोंबलेली असतात. या वृक्षाची पाने उन्हाळ्यात गळून पडतात. याचे पाने सुरुवातीला कोवळी तांबूस रंगाची असून, जसे मोठे मोठे होतात तसा त्यांचा रंग हा हिरवा होत जातो.

याची फुले उंबराप्रमाणे घागरी सारख्या आकाराच्या कुंभासणी फुलोऱ्यात येतात. या फुलोऱ्यांमध्ये नर फुले आणि मादी फुले असतात. या फुलांचे परागकण कीटकांमार्फत होते. याचे फळ औदुंबर प्रकारचे असून, जांभळे किंवा निळ्या रंगाचे असते.

पक्षांमार्फत पिंपळाच्या बियांचा प्रसार होतो. पक्षांच्या विष्ठेतून पिंपळाच्या बिया कुठेही नेल्या जातात, त्यामुळे याची झाडे घरावर भिंतीवर पहायला मिळतात.

Peepal Tree

पिंपळ झाडाचे फायदे

आयुर्वेदावर मध्ये पिंपळाच्या झाडाचा प्रत्येक भाग म्हणजेच याची बी, त्याची साले, फळे, फुले, पाने इत्यादी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असे आहेत.

याच्या पानामुळे दमा, कावीळ, मधुमेहासारख्या आजारांमध्ये आराम मिळतो. तसेच याची पाने हृदयासाठी उपयुक्त ठरतात. हृदयाचे आजार असलेल्यांसाठी याची पाने हे एक रामबाण औषध आहे.

याची पाने रात्रभर पाण्यात भिजवून ठेवली आणि सकाळी हे पाणी गाळून दिवसभर प्याल्याने हृदय निरोगी राहते. याची पाने मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरतात.

याच्या पानांचा रस रक्तातील साखरेची पातळी कमी करतो. याची पाने अतिसारावर अतिशय उपयुक्त ठरतात हा एक आतड्यामधील संसर्ग आहे. ज्यामुळे अतिसार होतो.

हा संसर्ग जिवाणू आणि परजीवी जंतू संसर्गामुळे होतो. यामध्ये याची पाणी आणि कोथिंबीर एकजीव करून थोडी साखर घालून हळूहळू चघळल्यास अतिसारापासून आराम मिळतो. तसेच याची पाने श्वसन रोगामध्ये आपल्याला आराम देतात.

याची पाने आणि साखर दुधात उकळून घेतली आणि हे दूध थंड झाल्यावर प्याल्याने दम्यापासून आराम मिळतो. याची पाने आणि खडीसाखर यांचा रस बनवून तो आपण दिवसातून दोन ते तीन वेळा घेतल्यास कावीळ बरी होण्यास मदत होते.

Peepal Tree

पिंपळ वृक्षाचा वापर

याच्या झाडाचे लाकूड मजबूत नसल्याने, बांधकामासाठी आणि इतर कुठल्याही उपयोगासाठी वापरले जात नाही. मात्र या झाडाच्या लाकडापासून खोके, आगपेटी आणि फळा बनवला जातो.

ग्रामीण भागामध्ये याच्या झाडाचा लाकडाचा वापर जाळण्यासाठी करतात. याची साल स्तंभक असते, तर याच्या बिया शितल असतात.

त्यांचा वापर आयुर्वेदामध्ये दमा, मधुमेह, पोटांचे विकार, चक्कर, यांसारख्या समस्यांवर गुणकारी औषध म्हणून केला जातो.

पिंपळ वृक्षाचे धार्मिक दृष्ट्या महत्व

  • याचे वृक्ष सभोवतालचे वातावरण शुद्ध करण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे या वृक्षाला पवित्र समजले जाते.
  • असे म्हणतात की, ज्यांच्या घरी याचे वृक्ष आहे त्या घरात दारिद्र्य येत नाही आणि त्या ठिकाणी सुख-शांती वास करते असे म्हणतात.
  • याच्या वृक्षाखाली शिवशंकराची प्रतिमा स्थापित करून, नित्यनेमाने त्याची पूजा केल्यास धनप्राप्ती होते. तसेच ज्यांना हनुमानाची कृपा व्हावी असे वाटते, त्याने याची पूजा करावी. त्याचप्रमाणे शनि देवाची वक्रदृष्टी कमी करण्यासाठी पिंपळाची पूजा करावी असे म्हणतात.
  • या झाडाला भारतीय समाजात मानाचे व पूजनिय स्थान आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षाला तोडू नये असा दंडक आहे, त्या वृक्षात देखील एक वृक्ष म्हणजे पिंपळ आहे. या झाडाला अश्वत्थ मारुतीचे पूजन हितकारी, पुण्यकारक म्हणून वर्णिले जाते.
  • श्रावण महिन्यातील शनिवारी याच्या वृक्षाचे पूजन केल्यास, शनिदेव प्रसन्न होतात, अशी समजूत आहे.

पौराणिक कथा –

महर्षी दधीची चा मुलगा पिपलाद ऋषी होता. पिपलादचा शाब्दिक अर्थ या झाडाची पाने खाऊन जगणारा असा होतो. यांनी जगाच्या हितासाठी आपल्या देहाचा त्याग केला होता. आणि इंद्रदेवांना अस्थिदान केल्या होत्या. मग विश्वकर्मांनी दधीची च्या हाडांपासून वज्र नावाचे शस्त्र बनवले.

जे अतिशय शक्तिशाली होते. महर्षी दधीची यांच्या पत्नीला ज्यावेळी हे कळले, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले आणि त्या सती जाण्यास निघाल्या. देवांनी तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिने कोणाचेही ऐकले नाही. महर्षी दधीची पत्नी त्यावेळी गर्भवती होती.

तिने तिच्या गर्भातून मुलाला बाहेर काढले. आणि एका पिंपळाच्या झाडाखाली ठेवले आणि ती सती गेली. हे मूल एका पिंपळाच्या झाडाखाली वाढले, ज्यावरून त्याचे नाव पिप्पलाद असे ठेवले गेले. त्यांनी या पिंपळाच्या झाडाखाली कठोर तपश्चर्या केली.

पिंपळाला पिपलाद ऋषीच्या प्रभावामुळे आशीर्वाद मिळाला. जो कोणी या देववृक्षाची सेवा आणि पूजा करेल, त्यांना चांगले परिणाम मिळतील. आणि शनीदोषापासून मुक्ती मिळेल. खरे तर पिपलाद ऋषींना ज्यावेळी कळले की, त्यांचे वडील शनी दोषामुळे मरण पावले आहे.

तेव्हा त्यांनी ब्रम्हाजींच्या आशीर्वादाने ब्रह्मदंड प्राप्त केला. आणि शनि देवाला त्याद्वारे शिक्षा केली होती. त्यामुळे नंतर शनी महाराजांनी पिपलाद ऋषींची माफी मागितली. आणि त्यांना वचन दिले की, जो कोणी पिंपळाची पूजा करेल त्या व्यक्तीला शनीचा त्रास होणार नाही.

पौराणिक महत्व –

भगवद्गीते मध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की, पिंपळ झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. तसेच पिंपळ हेच भगवान विष्णूंचे एकमेव रूप आहे. ज्या ठिकाणी भगवान विष्णू असतील, तेथे लक्ष्मीदेखील असते. भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचे ज्ञान दिले होते.

म्हणूनच पिंपळाच्या झाडाचे महत्व दिसून येते. पिंपळाची पूजा केल्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. व आपली सर्व कार्ये पूर्ण होतात.

ज्योतिष शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाची दररोज पूजा केली पाहिजे. कारण या झाडांमध्ये विविध देवतांचे वास्तव्य असते. आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. तसेच अक्षय पुण्य प्राप्त होते. पिंपळाच्या झाडाच्या पूजेनंतर प्रदक्षिणा घालून सर्व प्रकारची पापे देखील नष्ट होतात.

शनिवारच्या दिवशी पिंपळाची पूजा करणे फायदेशीर समजले जाते. पिंपळावर नेहमी शनीची छाया असते. असे मानले जाते की, पिंपळाची पूजा केल्यामुळे शनिदोष दूर होतो. पिंपळाच्या मुळांमध्ये पाणी अर्पण करून आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने शनीशी संबंधित असणारे सर्व त्रास दूर होतात.

तसेच ज्या व्यक्तीवर शनीची साडेसाती असते, त्यांनी पिंपळाची पूजा करावी. आणि प्रदक्षिणा घालावी. असे केल्यामुळे शनी महादशेपासून आपल्याला मुक्ती मिळते.

पिंपळ वृक्षाचा विविध आजारांवर उपयोग

  • आपल्यातील बऱ्याच लोकांना श्वासाचा आणि दम्याचा त्रास असतो, अशा लोकांसाठी याच्या झाडाची सुकलेली फळे खूप फायदेशीर ठरू शकतात. याच्या झाडाची सुकलेली फळे वाटून त्याचे बारीक मिश्रण करून रोज दोन ते तीन ग्रॅम या प्रमाणात सकाळी व संध्याकाळी पाण्यातून सेवन केल्यास, श्वासाचा आणि दम्याचा आजार नाहीसा होण्यास मदत होते.
  • तापावर औषध म्हणून याचा खूप मोठा फायदा होतो. याच्या झाडाची दहा ते वीस पाने घेऊन पाण्यात उकळून ते पाणी पिल्यास ताप कमी होतो.
  • याची पाने अथवा फळे घेऊन, त्यामध्ये धने व खडीसाखर समप्रमाणात घालून हे मिश्रण रोज सकाळ संध्याकाळ तीन ते चार ग्रॅम सेवन केल्यास, जुलाबाचा त्रास कमी होतो.
  • टायफाईड तापावर याची साल उपायकारक ठरते.
  • क्षयरोग हा एक गंभीर प्रकारचा आजार आहे. या रोगाला घाबरून न जाता यावर गुणकारक ठरते, ते म्हणजे याच्या झाडाचे मूळ. याच्या झाडाच्या मुळाचे सेवन केल्यास क्षय रोगावर आराम मिळतो. क्षयरोग बरा होईपर्यंत याच्या मुळाचे सेवन केल्यास फायदा होतो.
  • डोळ्याच्या विविध आजारांवर हे झाड खूप फायदेशीर ठरते. याची पाने डोळ्यांचा आजार बरा करण्यासाठी रामबाण उपाय आहे. याच्या पाण्यातून निघणारा चिक डोळ्यांना लावल्यास डोळ्यांना झालेल्या इजा लवकर बरा होतात.
  • याच्या झाडाचे पान त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतात. त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी याचे पान खूप फायदेशीर ठरतात. याची ताजी पाने पाण्यात भिजवून त्याचा लेप चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात.
  • विषारी साप चावल्यास याच्या कोवळ्या पानांचा रस दोन थेंब त्या जखमेवर टाकल्यास किंवा पाने खाल्ल्यास सापाच्या विषाचा असर कमी होतो.
  • याच्या दोन ते पाच पानाची पेस्ट बनवून त्यात ५०  ग्रॅम गूळ घालून मिश्रण तयार करून या मिश्रणाचे लहान लहान गोळे बनवून दिवसातून तीन ते चार वेळा खाल्ल्यास, पोटदुखी कमी होते.
  • याची साल पाण्यात शिजवून घेऊन, त्या पाण्याची चूळ भरल्यास दातांचे आजार बरे होतात. तसेच याच्या झाडांची ताजी फांदी घेऊन दात घासल्यास दात मजबूत होतात.

पिंपळ वृक्षाविषयी १० ओळी

  • संपूर्ण भारतात आढळणारा प्रसिद्ध वृक्ष म्हणजे पिंपळ. हा एक अरण्य वृक्ष आहे.
  • याच्या झाडाचा विशेष गुणधर्म म्हणजे याचे आयुष्य खूप असते. त्यामुळे यास अक्षय वृक्ष असेही म्हटले जाते.
  • अनेक ठिकाणी ४०० ते ५०० वर्ष जुने असे वृक्ष आजही पहावयास मिळतात. याच्या आयुष्यमानासारखीच त्याची उंची व विस्तारही प्रचंड असतो.
  • काही झाडांचा विस्तार एवढा मोठा असतो की, त्याखालील शेकडो माणसे सावलीसाठी बसू शकतात. या झाडास धार्मिक महत्त्वही आहे.
  • भारतीय संस्कृतीत हा एक पवित्र रुक्ष मांडला गेला असून, जे वृक्ष बिलकुल तोडायचे नाहीत, असा जो दंडक घालून दिला आहे, त्यामध्ये या वृक्षाचा सुद्धा समावेश आहे.
  • तथागत गौतम बुद्धांनी बोधगया येथे एका याच्या झाडाखाली ध्यान केले, तेव्हापासून या वृक्षाला बोधी वृक्ष या नावाने सुद्धा ओळखले जाते.
  • हा पुष्प नक्षत्राचा आराध्य वृक्ष मानला गेला असून, श्रावण महिन्यातील शनिवारी या झाडाची पूजा केली जाते.
  • याचे झाड हे सहसा गावाच्या मध्यभागी व प्रशस्त जागेत लावले जाते कारण या वृक्षाची वाढ विस्तीर्ण असते.
  • याच्या झाडास फळे सुद्धा येतात, मात्र ती आकाराने लहान असतात. या झाडाचे सर्वात मुख्य महत्त्व म्हणजे त्याच्यापासून मिळणारी थंड छाया व शुद्ध प्राणवायू उन्हाचा चटका अंगावर घेत एखादे मनुष्य देवा पिंपळाच्या झाडाखाली येतो. तेव्हा आपल्या थंड छायाने व आसमंतात वाहणाऱ्या वाऱ्याने मनुष्यास त्वरित आराम मिळतो.
  • झाडाच्या सालीत व पानांमध्ये सुद्धा औषधी गुणधर्म असून, त्यांचा उपयोग आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीमध्ये केला जातो.
  • या झाडास लहान फळे असण्याचे कारण असेही सांगितले जाते की, जर या वृक्षाला मोठ्या आकाराची फळे येत असतील तर त्याच्या डहाळ्या जाड होऊन, चांगली हवा निर्माण झाली नसती, कारण याचे मुख्य महत्त्व त्याच्या छाया वृक्ष असण्यातच आहे.

घरामध्ये पिंपळ लावणे शुभ कि अशुभ ?

हिंदू धर्मात या झाडाला दैवी वृक्ष म्हटलं जातं. या वृक्षामध्ये ३३ कोटी देवांचा वास असतो असं सुद्धा म्हटलं जातं. मंडळी इतकेच नाही तर, भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलेला आहे की, वृक्षांमध्ये जो पिंपळ आहे तो “मी” आहे आणि याच कारणामुळे हे झाड अतिशय पूजनीय मानले जाते.

लोक याच्या झाडाखाली दिवा लावून पिंपळावर जलार्पण करतात. त्याची पूजा करतात. पण हेच झाड आपल्या घरात किंवा घराच्या आजूबाजूला कधीही लावू नये असं म्हटलं जातं, पण मग इतकं पूजनीय हे झाड आपल्या घराच्या आजूबाजूला का लावू नये बरं ? चला जाणून घेऊया.

मंडळी वास्तविक घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला हे झाड न लावण्याचे कारण हे वैज्ञानिक आहे. याचे आयुष्य खूप मोठे असते आणि एकदा ते कुठेतरी लावले की, हळूहळू त्याची मुळ जमिनीत खोलवर पसरतात, अशा स्थितीत घराची जमीन आणि घराच्या भिंती फाडून, हे झाड बाहेर पडते.

त्यामुळे घराचे खूप नुकसान होते आणि म्हणून हे झाड घराच्या आजूबाजूला न लावण्याचा सल्ला दिला जातो. ते अशुभ मानलं जातं, पण जर तुम्हाला त्याची सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात अनुभवायची असेल तर तुम्ही एका छोट्याशा कुंडीमध्ये छोटसं रोप लावू शकता.

कुंडीत लावल्यानंतर रोज त्याला पाणी घालून त्याची पूजा करावी, त्यामुळे या झाडाची शुभ फळही तुम्हाला प्राप्त होतील आणि तुमच्या घराला कोणताही नुकसान होणार नाही.

अनेक वेळा घराच्या भिंतीवरच हे झाड उगवतं, अशा परिस्थितीत ते उपटून टाकणं आवश्यक आहे. कारण त्यामुळे संपूर्ण भिंतींचे नुकसान होऊ शकते.

पण हे झाड उपटणे शुभ मानले जात नाही, कारण त्यामुळे घरात पितृदोष निर्माण होतो असं म्हटलं जातं. अशी परिस्थिती टाळण्यासाठी हे झाड उपटल्यानंतर ते इतरत्र कुठेतरी नेऊन लावावे.

याच्या झाडावर भुतांचा वास असतो, असंही म्हटलं जातं. पण आता विचार करा की स्वतः भगवद्गीते मध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितला आहे की, वृक्षांमध्ये जो पिंपळ आहे तो मी आहे व जिथे देव असतो तिथे भूत कशी बरे असू शकतील ? तसंच प्रत्यक्षात भूत कधी कोणी पाहिलेही नाही.

वास्तविक पाहता ही झाडे २४ तास ऑक्सिजन देणार आहे. लोकांना जीवन देणारे झाड आहे. पूर्वीच्या काळी लोक इंधन जाळण्यासाठी झाड तोडत असतात. पिंपळाचे झाड तोडण्यापासून वाचवण्यासाठी भुतांची भीती पसरवण्यात आली असेल.

शास्त्रामध्ये या झाडाच्या मुळामध्ये ब्रह्मदेवाचे स्थान आहे. मध्यभागी भगवान श्रीहरी विष्णू आहेत. आणि अग्रभागी भगवान शिवशंकर आहेत. झाडाची पूजा केल्याने, सर्व देवतांची पूजा केल्याचं पुण्य मिळते.

पिंपळाच्या झाडाच्या पूजेचे महत्व काय ?

श्रावण महिन्यामध्ये अश्वत्थ मारुतीचे म्हणजे या झाडाच्या खाली असलेल्या मारुतीचे म्हणजे हनुमानाचे पूजन खूप हितकारक सांगितले आहे.

पुण्यकारक म्हणून त्याचं वर्णन आहे. जवळच्या मंदिरात असा मारुती असल्यास किंवा मारुती मंदिर या झाडाच्या जवळ असल्यास, त्याचे अश्वत्थ पूजन करावे. याच्या झाडाच्या पूजनाचे महात्म्य सांगितलेले आहेत.

ब्रम्हपुराणाच्या ११८ व्या अध्यायामध्ये श्री शनिदेव म्हणतात, माझ्या अर्थात शनिवारी जो मनुष्य नियमितपणे या वृक्षाचा स्पर्श करतील, त्यांचे सर्व कार्य सिद्ध होतील आणि त्यांना कोणतीही पीडा होणार नाही.

जो शनिवारी प्रातःकाळी उठून या झाडाची पूजा किंवा वृक्षाला स्पर्श करेल, त्यांना ग्रहजन्य पिडा होणार नाही. ब्रह्मपुराणांमध्ये पण हे लिहिलेलं आहे. शिवाय भरपूर से ज्योतिषी कोणाला शनीची साडेसाती असेल किंवा कुंडलीमध्ये शनी हा ग्रह बिघडलेला असेल तर, या झाडाची पूजा करा. याच्या झाडाजवळ दिवा लावा असे उपाय सुचवतात.

वैज्ञानिक दृष्ट्या ऑक्सिजनचा विसर्गही हा वृक्ष जास्त काळ करत असतो. जो व्यक्ती याच्या झाडाला सात प्रदक्षिणा करतो, त्याला दहा हजार गाय, दान केल्याचे पुण्य फळ प्राप्त होते व त्यापेक्षा जास्त प्रदक्षिणा करतो, त्याला कोटी गाय दान केल्याचे पुण्य फळ प्राप्त होते.

सर्व कार्य सिद्धी होण्यासाठी म्हणून झाडाखाली दीपदान म्हणजे दिवा लावावा. झाडाच्या मुळापाशी बसून जो व्यक्ती जप असतो, तर पाठ हवन किंवा वेगवेगळे अनुष्ठान करेल त्याला कोटी कोटी प्रमाणात त्याची फलप्राप्ती होते, असे पद्मपुराणांमध्ये लिहिलेले आहे.

त्याचप्रमाणे याच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने, दरिद्रता, त्याचप्रमाणे वाईट स्वप्न, वाईट प्रारब्ध तथा दुःखांचा नाश होतो.

जो बुद्धिमान व्यक्ती याच्या झाडाचे पूजन करेल, तो आपल्या सर्व पितरांनाही तृप्त करतो. एक मनुष्य एक पिंपळाचे वृक्ष झाड लावतो, त्याला एक लाख देववृक्ष म्हणजे मंदार किंवा पारिजात इत्यादी लावण्याचे पुण्य फळ प्राप्त होते.

त्याचप्रमाणे याची उपासना करताना सकाळी पाणी वहावे, दूध, फूल, हार, त्याचबरोबर धूप दीप प्रदक्षिणा खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करावा. तसेच दोन्ही हातांच्या आपल्या तळहातांनी याच्या खोडाला स्पर्श करून, ओम नमः शिवाय किंवा ओम विष्णवे नमः या मंत्राचा यथाशक्ती जप करावा, त्यांनीही लाभ होतो.

आपल्या आर्थिक समृद्धी करता शनि महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी, म्हणून साडेसातीमध्येही आपण शनीचे पूजन करावे.

त्याचप्रमाणे श्री महालक्ष्मीचा ही वास या वृक्षामध्ये असतो. त्यामुळे या वृक्षाच्या सेवेने श्री महालक्ष्मीची ही कृपा आपल्याला प्राप्त होते, ज्याही मंदिराजवळ पिंपळाचे झाड असेल, तिथले दर्शन किंवा तिथे गेलेले जप, पूजन, अनुष्ठान हे लवकरात लवकर सिद्धीस जाते.

FAQ

१. पिंपळाच्या झाडाचे काय महत्व आहे ?

श्रावण महिन्यामध्ये अश्वत्थ मारुतीचे म्हणजे याच्या झाडाखाली असलेल्या मारुतीचे म्हणजे हनुमानाचे पूजन खूप हितकारक सांगितले आहे. पुण्यकारक म्हणून त्याचं वर्णन आहे. जवळच्या मंदिरात असा मारुती असल्यास किंवा मारुती मंदिर या झाडाच्या जवळ असल्यास, त्याचे अश्वत्थ पूजन करावे.
याच्या झाडाच्या पूजनाचे महात्म्य सांगितलेले आहेत. ब्रम्हपुराणाच्या ११८ व्या अध्यायामध्ये श्री शनिदेव म्हणतात, माझ्या अर्थात शनिवारी जो मनुष्य नियमितपणे या वृक्षाचा स्पर्श करतील, त्यांचे सर्व कार्य सिद्ध होतील आणि त्यांना कोणतीही पीडा होणार नाही.
जो शनिवारी प्रातःकाळी उठून या झाडाची पूजा किंवा वृक्षाला स्पर्श करेल, त्यांना ग्रहजन्य पिडा होणार नाही. ब्रह्मपुराणांमध्ये पण हे लिहिलेलं आहे. शिवाय भरपूर असे ज्योतिषी कोणाला शनीची साडेसाती असेल किंवा कुंडलीमध्ये शनी हा ग्रह बिघडलेला असेल तर, याची पूजा करा. याच्या झाडाजवळ दिवा लावा असे उपाय सुचवतात.

२. पिंपळाच्या झाडाचे काय काय फायदे आहेत ?

डोळ्याच्या विविध आजारांवर याचे झाड खूप फायदेशीर ठरते. याची पाने डोळ्यांचा आजार बरा करण्यासाठी रामबाण उपाय आहे. याच्या पाण्यातून निघणारा चिक डोळ्यांना लावल्यास डोळ्यांना झालेल्या इजा लवकर बरा होतात.

याच्या झाडाचे पान त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतात. त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी याचे पान खूप फायदेशीर ठरतात. याची ताजी पाने पाण्यात भिजवून त्याचा लेप चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात.
विषारी साप चावल्यास याच्या कोवळ्या पानांचा रस दोन थेंब त्या जखमेवर टाकल्यास किंवा पाने खाल्ल्यास सापाच्या विषाचा असर कमी होतो.
याच्या दोन ते पाच पानाची पेस्ट बनवून त्यात ५०  ग्रॅम गूळ घालून मिश्रण तयार करून या मिश्रणाचे लहान लहान गोळे बनवून दिवसातून तीन ते चार वेळा खाल्ल्यास, पोटदुखी कमी होते.

३. पिंपळाला धार्मिक दृष्ट्या का महत्व आहे ?

हिंदू धर्मात याच्या झाडाला दैवी वृक्ष म्हटलं जातं. या वृक्षामध्ये ३३ कोटी देवांचा वास असतो असं सुद्धा म्हटलं जातं. मंडळी इतकाच नाही तर, भगवद्गीते मध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलेला आहे की, वृक्षांमध्ये जो पिंपळ आहे तो “मी” आहे आणि याच कारणामुळे याचे झाड अतिशय पूजनीय मानले जाते.

४. पिंपळ वृक्षाला वैज्ञानिक नाव काय आहे ?

पिंपळ हे झाड पानझडी वृक्ष मोसेरी कुलातील असून, त्याचे शास्त्रीय नाव “फारक कोरीलीजिओजा” आहे. याच्या झाडास हिंदीत पिंपल व इंग्रजीमध्ये sacred fig या नावाने ओळखतात.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास पिंपळ या झाडाबद्दल माहिती दिली आहे. मग मंडळी तुमच्या शेतात किंवा तुमच्या अंगणात पडसाद आजूबाजूला कुठेही पिंपळाच झाड आहे की नाही आणि त्याबाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे ? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment