गाजर खाण्याचे फायदे Carrot Benefits

गाजर खाण्याचे फायदे Carrot Benefits – गाजर खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. गाजरामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन्स ए, बी, सी, डी, इ, जीवनसत्व असतात. त्यामुळे गाजर खाणे हे शरीरासाठी अत्यंत फायद्याचे असून, अनेक आजारांवर मात करता येते.

गाजर हे थंडीमध्ये तर बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारे कंदमूळ आहे अनेक पोषक तत्वांसह अ जीवनसत्वाने परिपूर्ण असलेल्या गाजरात बीटा कॅरोटीनचे हि प्रमाण अधिक असते. गाजरामध्ये 88% पाण्याचे प्रमाण असते, ज्यामुळे गाजर खाल्ल्याने आपले शरीर हायड्रेड राहते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये याचे सेवन आपण नक्की केले पाहिजे.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस गाजर खाण्याचे फायदे याबद्दल माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी व गाजराचे फायदे जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

गाजर खाण्याचे फायदे Carrot Benefits

गाजर खाण्याचे फायदे Carrot Benefits – लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचे लोकप्रिय म्हणजे गाजर. आजपर्यंत आपण गाजराचा हलवा किंवा कोशिंबीर म्हणून वापर करत असतो.

नियमित गाजर खाल्ल्यामुळे, शरीराचे योग्य पोषण होते. थोडक्यात सांगायचे झाले तर, गाजर हे उत्तम औषधच आहे. गाजरामध्ये अनेक फायदे असतात.

गाजर खाण्याचे फायदे

हे वाचा –

नाव गाजर
साखर4.7 ग्रॅम
फायबर्स2.8 ग्रॅम
कॅलरिज41
कार्बोहायड्रेट9.6 ग्रॅम
प्रोटिन0.9 ग्रॅम
फॅट0.2 ग्रॅम
पाणी88%

बहुगुणी गाजराविषयी माहिती  

गाजर खाण्याचे फायदे Carrot Benefits – मित्रांनो, गाजर म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर गाजराचा हलवा येतो. गाजर खाण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. मग गाजर तुम्ही कच्च खा, उकडून खा किंवा कोशिंबिरीच्या स्वरूपात खा. ही बहुगुणी फळभाजी शरीरातील विविध अवयवांसाठी पोषक आहे.

गाजरामध्ये अ जीवनसत्वाचे प्रमाण जास्त असल्याने, ते डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतं. रातांधळेपणा, दृष्टी कमजोर होणं, यासारख्या डोळ्यांच्या विकारांवर गाजर खाणं खूप फायदेशीर ठरतं.

गाजर दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी ही परिणामकारक ठरतं. जेवणानंतर गाजर खाल्ल्याने दात स्वच्छ राहतात. दातांच्या तक्रारीवर गाजर खाणं फायदेशीर ठरतं. लहान मुलांना दात येताना, गाजराचा रस दिल्यास फार त्रास होत नाही.

गाजर नियमित खाल्ल्याने हाडांचा आणि स्नायूचा आरोग्य सुधारतं. तसेच त्वचेच आणि केसांच आरोग्य ही चांगलं राहतं. गाजर हे मेंदूचे आरोग्यासाठी परिणामकारक ठरतं. गाजर खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते आणि बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते.

पोटाच्या आणि आतड्याच्या तक्रारीवर गाजर उपयुक्त ठरतं. पोटात जंत झाले असेल तर, रोज सकाळी एक कप गाजराचा रस घेतल्यास, जंत निघून जातील. जुलाब होत असल्यास गाजर वापरून त्याचा रस थोड्या थोड्या वेळाने प्यावा याने जुलाब नक्कीच थांबते.

कर्करोग, मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, लठ्ठपणा, हाड आणि स्नायूचे विकार अशा अनेक विकारांवर गाजर उपयुक्त ठरतं.

गाजर

आरोग्यासाठी गाजर खाण्याचे फायदे

गाजर खाण्याचे फायदे Carrot Benefits –

कॅन्सरच्या पेशींना प्रतिबंध

गाजरातील बीटा कॅरोटीन शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कॅन्सरच्या पेशींना प्रतिबंध करणे सोपे जाते. नियमित गाजराचा रस प्यायल्याने लुकेमिया अथवा तोंडाच्या कॅन्सरवर मात करते येऊ शकते.

रक्तदाबावर नियंत्रण

गाजरामध्ये फायबर्स, पोटॅशियम, विटामिन सी, असे अनेक पोषक घटक असल्यामुळे, रक्तदाबावर चांगला परिणाम होतो. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज गाजराचा रस जरूर प्यायला पाहिजे.

मधुमेहावर फायदेशीर

निरोगी राहण्यासाठी आहाराबाबत काळजी घेऊन आणि वजन नियंत्रित ठेवून, टाईप टू मधुमेह कमी करता येऊ शकतो. आहारात विटामिन ए चा समावेश करून, तुम्ही टाईप टू मधुमेहावर उपचार करू शकता. गाजरात विटामिन ए मुबलक प्रमाणात असल्यामुळे, मधुमेहांसाठी गाजर खाणे नेहमीच फायद्याचा ठरू शकत.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

गाजरातील विटामिन ए मुळे शरीराचे कार्य सुरळीत चालते आणि रोगांपासून आपले संरक्षण होते. कारण विटामिन ए मुळे रोगप्रतिकारक शक्ती ही वाढते. यासाठी सर्व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गाजरामधील विटामिन ए खूपच फायदेशीर ठरते. म्हणूनच आहारात गाजराचा समावेश जरूर केला पाहिजे.

वजन नियंत्रित राहण्यास मदत

कच्च्या गाजरामध्ये अंदाजे ९५ टक्के पाण्याचे प्रमाण असते. शिवाय एका मध्यम आकाराच्या गाजरात जवळजवळ २५ कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित आहारात गाजर असणे अतिशय गरजेचे आहे. गाजराती फायबर्समुळे पोट भराच काळ भरल्यासारखं वाटतं. ज्यामुळे अवेळी भूक लागत नाही.

हाडांचे आरोग्य वाढते

गाजरातील विटामिन ए मुळे हाडांमधील पेशींचे मॅटबॉलिझम सुधारते. गाजरातील बीटा कॅरोटीनमुळे शरीराला अँटि ऑक्सिडंट चा पुरवठा होतो आणि हाडांचे आरोग्य ही वाढते.

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते

नियमित गाजर खाल्ल्याने, शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि शरीराला अँटि ऑक्सिडंट चा पुरवठा होतो. म्हणूनच हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी ही गाजर फायदेशीर ठरतो.

यकृत निरोगी राहते

गाजराच्या नियमित सेवनाने, यकृत निरोगी राहते. गाजरात मुबलक प्रमाणात फ्लो नाईट्स आणि बीटा कॅरोटीन असते. या दोन्ही घटकामुळे यकृत डीटोक्स होतो आणि यकृत्याचे संपूर्ण कार्य सुधारते.

नव्याने रक्त तयार करण्यास मदत

गाजर हे रक्त वाढवण्यासाठी आणि शुद्ध करण्यासाठी मदत करते. गाजरामध्ये लोह आणि विटामिन ई यांचे प्रमाण आढळते. जे शरीरात नव्याने रक्त तयार करण्याचे ही मदत करतात.

मेंदूच्या आरोग्यासाठी परिणामकारक

गाजर हा मेंदूच्या आरोग्यासाठी देखील परिणामकारक ठरत. गाजर खाल्ल्याने स्मरणशक्ती आणि बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते.

पोटाच्या आणि आतड्याच्या तक्रारीवर गाजर उपयुक्त

पोटाच्या आणि आतड्याच्या तक्रारीवर गाजर उपयुक्त ठरत. पोटात जर जंत झाले असतील, तर रोज सकाळी एक ग्लास गाजराचा रस घेतल्यास जंत निघून जाण्यास मदत होईल. तसेच जुलाब होत असल्यास गाजर वाफवून त्याचा रस थोडा थोडा वेळाने घेतल्यास, आराम मिळेल.

दात मजबूत राहण्यास मदत

ताज्या आणि कच्च्या गाजरामुळे, दात मजबूत राहतात. तोंडाला येणारा घाणेरडा वास ही कमी होतो. गाजरातील फायबर्स मुळे, तोंडात भरपूर लाळ निर्माण होते. तोंडात निर्माण होणारी लाळ तोंडाच्या आरोग्यासाठी चांगली असते.

 Carrot Benefits

पीसीओडीवर गाजर फायदेशीर

आजकाल अनेक महिलांना पीसीओडीचा त्रास होत असतो. पीसीओडीच्या त्रासावर उपाय करण्यासाठी ताज्या भाज्या आणि कंदमुळे खाण्याचा सल्ला दिला जातो. पीसीओडीवर उपचार करण्यासाठी गाजर खाणे खूपच फायदेशीर ठरते.

गरोदर महिलांना गाजर उपयुक्त

गरोदर महिलांना तर आहारातून त्यांच्या व बाळाच्या आरोग्याची काळजी घ्यायची असते. गरोदर महिला जे अन्न खातात, त्याचा त्यांच्या बाळाच्या विकासावर परिणाम होत असतो.

मात्र गाजरातील पोषक तत्वामुळे या दोघांचेही आरोग्य चांगले राहते. यासाठी गरोदर महिलांच्या आहारात गाजराचा समावेश असायलाच हवा.

 Carrot Benefits

सौंदर्यासाठी गाजराचे फायदे

गाजर खाण्याचे फायदे Carrot Benefits –

अँटिएजिंगचे कार्य करते

आरोग्याप्रमाणे सौंदर्यावर ही गाजराचे अनेक फायदे होतात. वयोमानानुसार प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एजिंच्या खुणा दिसू लागतात. मात्र आजकाल धूळ, माती, प्रदूषण, याचा परिणाम त्वचेवर होत असतो. ज्यामुळे वयाच्या आधी चेहऱ्यावर फाईनलाईज आणि सुरकुत्या दिसायला लागतात.

मात्र जर आहारात नियमित गाजराचा समावेश असेल तर, एजिंच्या खुणा लवकर दिसत नाहीत. शिवाय वयोमानानुसार येणारा या खुणा लपवण्यासाठी ही तुम्ही गाजरा पासून तयार केलेले फेस पॅक चेहऱ्याला लावू शकता.

डार्क सर्कल्स कमी करते

याचप्रमाणे डार्क सर्कल्स अथवा डोळ्याखालील काळी वर्तुळ कमी करण्यासाठी ही दररोज गाजराचा रस प्यायलाने फायदा होईल. गाजरा मधील अँटि ऑक्सिडंट घटकामुळे, शरीरातील रक्त शुद्ध होते.

त्वचेचे योग्य पोषण न झाल्यामुळे अथवा इन्फेक्शन मुळे, त्वचेच्या समस्या आणि आजार निर्माण होत असतात. मात्र तुम्ही नियमित गाजराचे सेवन केल्यास, तुम्हाला या त्रासापासून कायमची सुटका मिळू शकते.

त्वचा मऊ आणि मुलायम होते

त्वचेला पुरेसे पोषण न मिळाल्यास, त्वचा कोरडी होते. त्वचेचा हा कोरडेपणा कमी करण्यासाठी नियमित गाजर खाणे फायदेशीर ठरते.

याचप्रमाणे गाजराचा रस पियाल्याने देखील तुमची त्वचा हायड्रेट राहील. गाजराच्या रसाने चेहऱ्यावर एक नैसर्गिक ओलावा आल्यामुळे, त्वचा मऊ आणि मुलायम होते.

सूर्याच्या हानिकारक किरणापासून त्वचेच संरक्षण

गाजरातील अँटि ऑक्सिडंट सूर्याच्या हानिकारक किरणापासून त्वचेच संरक्षण करतात. गाजरातील बीटा कॅरोटीन हे एक प्रकारच्या सन प्रोटेक्ट प्रमाणे काम करत असते. गाजरांमध्ये त्वचा नितळ करणारे गुणधर्म असतात.

ज्यामुळे त्वचेवरील डाग आणि व्रण कमी होतात. चेहऱ्यावरचे डाग कमी झाल्यामुळे त्वचा उजळ दिसू लागते. त्याचा परिणाम त्वचेच्या ग्लोवर होतो. म्हणूनच नियमित त्वचेवर गाजराचा रस लावणं फायदेशीर ठरते.

केसांच्या समस्येवर गाजर फायदेशीर

गाजरातील पोषक घटकांमुळे त्वचेप्रमाणे चेहऱ्याचेही तसेच केसांचेही योग्य पोषण होते. केसांचे पोषण न झाल्यास, केस निस्तेज होतात अथवा अकाली पांढरे दिसू लागतात. मात्र जर घनदाट, काळेभोर केस हवे असतील तर, आहारात गाजराचा समावेश जरूर करावा.

नियमित गाजर खाल्ल्याने केस गळणे देखील कमी होऊ शकतो. गाजरामधील पोषक घटकामुळे केस कमकुवत होणे, केसांना फाटे फुटणं, केस कोरडे आणि निस्तेज होणं कमी होतं. ज्यामुळे तुमचे केस कमी गळतील आणि घनदाट हि दिसू लागतील.

गाजराचे अति सेवन केल्यास होण्यारे दुष्परिणाम

गाजर खाण्याचे फायदे Carrot Benefits – गाजर खाण्याचे फायदे आहेत तसे, त्याचे काही तोटे देखील आहेत.

  • गाजरामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे गाजराचे जास्त सेवन केल्यास, पोटदुखी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
  • याशिवाय गाजरचा आतील पिवळा भाग खूप गरम असल्याकारणाने, गाजर जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटात जळजळ होणे, अशा आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
  • ज्या व्यक्तींना गाजराची ऍलर्जी आहे, अशा व्यक्तींनी गाजर कटाक्षाने टाळले पाहिजे.
  • अति प्रमाणात गाजाचे सेवन केल्याने, झोप न येण्याची समस्या देखील उद्भवू शकते.

बहुगुणी गाजराचे चमत्कारी फायदे

गाजर खाण्याचे फायदे Carrot Benefits – गाजर पाहिल्यानंतर, आपल्याला खायचा मोह आवरत नाही. परंतु अशीही लाल गाजर आपल्या घरातील लहान मुलांना शक्यतो आवडत नाहीत.

पण ह्या गाजराचा हलवा किंवा गाजराचा मोरंबा अशा प्रकारचे पदार्थ बनवून आपण आपल्या मुलांच्या आहारात याचा समावेश करू शकतो आणि गाजराचा आपल्या आहारात समावेश आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी फारच लाभदायक ठरणार आहे.

कारण या गाजरामध्ये एवढे विटामिन्स असतात किंवा एवढे उपयुक्त घटक असतात, जे आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी तसेच आपल्या आरोग्यासाठी फारच फायद्याचे ठरणार आहेत.

डोळ्यांसाठी गाजर उपयुक्त

डोळ्यांसाठी हे गाजर फारच उपयुक्त आहे. आपल्या डोळ्याची दृष्टी व्यवस्थित रहावी किंवा आपले डोळे व्यवस्थित काम करावेत, यासाठी आपल्या शरीरामध्ये विटामिन ए असणे हे फारच गरजेचे आहे आणि ह्याच विटामिन ए चा उत्तम सोर्स म्हणजे गाजर.

गाजरामध्ये विटामिन ए हे खूप भरपूर प्रमाणात आढळून येतो आणि म्हणूनच आपण जर नियमित आहारामध्ये एक गाजर ठेवलं तर, आपल्या डोळ्याला चष्मा कधीच लागणार नाही.

आज आपण पाहतो की, आपली मुलं ही मोबाईल मध्ये किंवा टीव्हीमध्ये एवढे गुंतलेली असतात की, बऱ्याच मुलांना अगदी सात ते आठ वय वर्षापासून चष्मे लागतात आणि मुलांच्या डोळ्याचा चष्मा जर काढायचा असेल तर, त्यांच्या आहारामध्ये तुम्ही नियमित गाजराचा समावेश करा.

बघा पंधरा दिवस गाजराचा नित्य नियमाने सेवन केलं तर, आपल्या मुलांचा चष्मा किंवा आपला देखील चष्मा जाण्यासाठी, आपला नंबर जाण्यासाठी हे फारच फायद्याचे ठरणार आहे.

तोंड आलेलं असेल तर गाजर फायदेशीर  

तोंड आलेलं म्हणजे, हा एक शरीरातील उष्णता बाहेर पडण्याचा प्रकार आहे. आपल्या ओठाच्या ठिकाणी आपल्याला फोड येतात आणि हे फोड आपल्याला पाणी देखील पिऊन देत नाही, तर अशा प्रकारे जर तोंड आलेलं असेल तर, त्या तोंडासाठी देखील या गाजराचा फारच फायदा होतो.

तुम्ही घरी आजमावून पहा. ज्यांचं तोंड आलेला आहे, अशा व्यक्तींनी गाजराचा ज्यूस दिवसातून एक वेळ जरी घेतला, तर दोन ते तीन दिवसात फरक पडतो. म्हणजे आपले जे फोड असतात ते पूर्णपणे या गाजराच्या ज्यूसने नाहीसे होतात.

पोटातील जंत कमी करण्यासाठी फायदेशीर

पोटातील जंत घालवण्याचे काम गाजर करतात. गाजरामध्ये फायबर हे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि गाजराच्या सेवनाने आपलं पोट साफ होण्यासाठी तसेच रक्त शुद्धीकरणासाठी देखील गाजर फारच फायद्याचे आहे.

आपण पाहतो की, लहान मुलं ही गोड पदार्थांचे सेवन जास्त करतात आणि त्याचा परिणाम म्हणजे मुलांच्या पोटामध्ये विविध विकार होतात किंवा पोटदुखीचा त्रास त्यांना सतत होतो आणि त्यामुळे जंतनाशकाच औषध हे वारंवार डॉक्टर सहा महिन्याला घ्यायला सांगतात.

पण या उलट जर, आपल्याला ते देण्यात नाही आलं किंवा आपण ते घेऊ शकलो नाही तर, फक्त गाजराच सेवन हे देखील यासाठी फारच उपयुक्त ठरतं. आपल्या मुलांच्या आहारात हे गाजर वरचेवर ठेवा, याने आपल्या मुलांच्या पोटामध्ये किटाणू होणार नाही किंवा कुठल्या ही प्रकारचे पोटाचे विकार आपल्या मुलांना होणार नाही.

फक्त जेवणाच्या अगोदर एक गाजर किसून किंवा एक गाजर चावून खाल्ल तरी पोटाला फारच आराम भेटतो आणि पचनक्रिया सुरळीत व्हायला मदत होते.

तारुण्य टिकवण्यासाठी गाजर उपयुक्त

गाजराचा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तरुण दिसण्यासाठी किंवा वाढत्या वयाला थांबवण्याचे काम गाजर करतं. गाजर हे अगदी आपल्या डोक्याच्या केसापासून ते आपल्या पायाच्या नखा पर्यंत संपूर्ण अवयवासाठी फारच फायद्याचा आहे.

आपला चेहरा हा तुकतुकीत दिसावा किंवा आपण तरुण दिसावेत असं जर आपल्याला वाटत असेल तर, गाजराचा ज्यूस किंवा गाजराचा रस हा नियमित आपल्या आहारामध्ये किंवा डायट मध्ये ठेवा. आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आहेत, त्या पूर्णतः नाहीशा व्हायला मदत होते.

तसेच आपल्या चेहऱ्याची चमक ही खूपच चांगली राहते. कारण गाजरामध्ये बीटा कॅरोटीन हे खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि तसेच विटामिन सी चे प्रमाण देखील या गाजरामध्ये खूप आहे आणि हेच दोन घटक हे आपल्या शरीरातील सौंदर्यासाठी फारच फायद्याचे आहे.

म्हणूनच या दोन घटकांचे प्रमाण हे गाजरात जास्त असल्याकारणाने, आपण जर आपल्या आहारात किंवा आपल्या खाण्यामध्ये गाजराचा रस, गाजराचा ज्यूस किंवा गाजर ठेवलं तर, आपल्या तारुण्यात भर पडायला याने मदत होत असते.

मासिकपाळी साठी गाजर फायदेशीर

रक्त शुद्धीकरणासाठी गाजर खूपच फायद्याच आहे किंवा मासिक पाळीच्या वेळी महिलांनी गाजर खाणं हे फारच त्यांच्या फायद्याचे ठरतं. अशावेळी महिलांच्या मासिक पाळी मध्ये रक्तस्राव होणं किंवा आपल्या शरीरातील घाण बाहेर जाणं, हे फारच गरजेचं असतं.

परंतु बऱ्याच स्त्रियांचं या काळात ब्लडिंग हे खूपच कमी प्रमाणात होतं आणि त्याचा परिणाम म्हणजे बायकांचा लठ्ठपणा याकडे कल जातो किंवा बायकांचा लठ्ठपणा यामुळे दिसून येतो.

तर पीरियडच्या वेळी ब्लडिंग व्यवस्थित व्हायचं असेल किंवा होण्यासाठी हे गाजर फारच फायद्याचा आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या आहारामध्ये दोन गाजरांचा समावेश जर नियमित ठेवला तर पिरियडच्या वेळी येणाऱ्या समस्या यांचे निराकरण होत.

तसच पीरियडच्या काळात जर, आपल्याला वेदना होत असतील किंवा कुठला जर त्रास जाणवत असेल तर, तो देखील या गाजराच्या सेवनाने पूर्णतः कमी होतो.

अर्धशिशीसाठी गाजर फायदेशीर

अर्धशिशीसाठी देखील गाजर फारच फायद्याचा आ.हे अर्धशिशीमध्ये बहुतांश लोकांना एवढा त्रास होतो की, अगदी काय करावं हे त्यांना सुचत नाही. तर अशा व्यक्तींनी गाजराच सेवन जर केलं तर, त्याचा त्यांना फायद्या होतो.

ज्यांना अर्धशिशीचा त्रास आहे, अशा व्यक्तींनी गाजराच्या पाल्याला धुऊन घ्यायचा आहे. अगदी थोडासा गाजराचा पाला घ्या तो चांगला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि तो तुपामध्ये गरम करा आणि त्यानंतर तो बारीक करून, त्याचा रस काढा आणि त्याचे दोन ते तीन थेंब तुम्ही नाकात आणि कानात टाका.

आणि हे टाकले असता तुम्हाला पटापट शिंका यायला लागतील आणि या शिंका आल्या कारणाने तुमचा अर्धशिशीचा जो त्रास आहे तो अगदी पाच ते सहा मिनिटात पूर्णपणे बंद होऊन तुम्हाला आराम मिळेल. करून पहा याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही.

कापलेल्या आणि भाजलेल्या भागावर गाजर फायदेशीर

कापलेल्या आणि भाजलेल्या ठिकाणी गाजराचा फारच फायदा होतो. जर आपल्याला सुरी लागलेली असेल किंवा कापलं असेल तर त्या कापलेल्या ठिकाणी गाजराचा फायदा होतो. तसेच भाजलेल्या ठिकाणी देखील आपण गाजर वापरू शकतो.

त्यासाठी एक गाजर उकडून घ्या आणि उकडलेले गाजर मॅश करा. अगदी बारीक त्याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट कापलेल्या आणि भाजलेल्या ठिकाणी लावा. याने आपल्याला जी आग होते आहे ती पूर्णतः बंद होऊन जाईल.

तसेच आपण पाहतो की, भाजलेल्या ठिकाणी काही वेळानंतर किंवा काही काळानंतर पांढरा डाग राहतो आणि हा पांढरा डाग जवळपास एक ते दीड वर्ष जात नाही, तर ह्या पांढऱ्या डागाला घालवण्यासाठी मॅश केलेलं गाजर फारच फायद्याचं ठरतं.

हि पेस्ट  तुम्ही जर कापलेल्या व भाजलेल्या ठिकाणी महिनाभर लावलात तर, अगदी महिन्याच्या आतच हा डाग पूर्णतः नाहीसा होतो आणि आपली त्वचा ही पूर्ववत व्हायला मदत होते.

कॅन्सरला रोखण्यासाठी गाजर फायदेशीर

गाजर हे कॅन्सर साठी किंवा कॅन्सरला रोखण्यासाठी देखील खूपच फायद्याच आहे. कारण गाजरामध्ये असणारे फायटो न्युट्रीनट्स हे कॅन्सरला वाढवणाऱ्या किटाणूनशी लढण्याचे काम करतं आणि परिणामी आपल्या शरीरात कॅन्सर ची वाढ होत नाही.

आणि म्हणूनच आपल्याला जर कॅन्सर पासून बचाव करायचा असेल किंवा आपल्याला आयुष्यात कॅन्सर होऊ नये असं जर वाटत असेल तर, सर्व व्यक्तींनी गाजराचा रस घेणं हे फारच फायद्याचा आहे. आपण गाजराचा रस नियमितपणे दोन आठवडे जर घेतला तर, आपल्याला कॅन्सर आयुष्यात कधीच होणार नाही.

अगदी गाजराचा रस एक ते दीड कप नियमित तुम्ही दोन आठवडे घ्या. आपल्याला कॅन्सर हा कधीच होणार नाही हे शास्त्रज्ञा नुसार किंवा संशोधनानुसार सिद्ध झालेला आहे.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

हृदय रोगाला रोखण्याचे काम देखील हे गाजर करतात. कारण गाजरात असणार बीटा कॅरोटीन हे हृदय रोगाचा किंवा हार्ट अटॅकचा खतरा अगदी ६८ % पर्यंत रोखू शकतो.

तसेच ब्लड प्रेशर सामान्य ठेवण्यासाठी देखील ही गाजर फारच फायदेशीर आहे. कारण यातील बीटा कॅरोटीन आणि अल्फा केरोटीन हे कोलेस्ट्रोला विरोध करतं आणि त्यामुळे आपण हार्ट अटॅक किंवा भयंकर आजारापासून वाचू शकतो.

त्यासाठी गाजराचा सेवन हे आपल्या आहारात नियमित असणं फारच गरजेचे आहे.

FAQ

१. अर्धशिशीसाठी गाजर कस फायदेशीर ठरत ?

अर्धशिशीसाठी देखील गाजर फारच फायद्याचा आ.हे अर्धशिशीमध्ये बहुतांश लोकांना एवढा त्रास होतो की, अगदी काय करावं हे त्यांना सुचत नाही. तर अशा व्यक्तींनी गाजराच सेवन जर केलं तर, त्याचा त्यांना फायद्या होतो. ज्यांना अर्धशिशीचा त्रास आहे, अशा व्यक्तींनी गाजराच्या पाल्याला धुऊन घ्यायचा आहे.

अगदी थोडासा गाजराचा पाला घ्या तो चांगला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि तो तुपामध्ये गरम करा आणि त्यानंतर तो बारीक करून, त्याचा रस काढा आणि त्याचे दोन ते तीन थेंब तुम्ही नाकात आणि कानात टाका आणि हे टाकले असता तुम्हाला पटापट शिंका यायला लागतील आणि या शिंका आल्या कारणाने तुमचा अर्धशिशीचा जो त्रास आहे तो अगदी पाच ते सहा मिनिटात पूर्णपणे बंद होऊन तुम्हाला आराम मिळेल. करून पहा याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही.

२. गाजराच्या अति सेवनाचे काय दुष्परिणाम आहे?

गाजरामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे गाजराचे जास्त सेवन केल्यास, पोटदुखी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
याशिवाय गाजरचा आतील पिवळा भाग खूप गरम असल्याकारणाने, गाजर जास्त प्रमाणात सेवन केल्याने पोटात जळजळ होणे, अशा आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
ज्या व्यक्तींना गाजराची ऍलर्जी आहे, अशा व्यक्तींनी गाजर कटाक्षाने टाळले पाहिजे.
अति प्रमाणात गाजाचे सेवन केल्याने, झोप न येण्याची समस्या देखील उद्भवू शकते.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास बहुगुणी गाजर खाण्याचे फायदे याबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment