Ahilyabai Holkar Information In Marathi | अहिल्याबाई होळकर माहिती मराठी – अहिल्याबाई होळकर यांची जर ओळख करायची झाली तर, या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. तसेच भारतात अनेक हिंदू मंदिरे व नदीकाठ यांनी बांधलेले आहे. १७०० च्या काळातील भारतीय मावळ्यांच्या तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून सुद्धा या ओळखल्या जातात. तसेच पुण्यश्लोक. राजमाता, धर्म रक्षक, लोकमाता या सर्व पदव्यांनी त्यांना सन्मानित केलेला आहे. राणी असंख्य झाल्या या जगात, पण पुण्यश्लोक कोणीही नाही, गर्व जिचा चा मराठी हृदयाला आहे, या मराठी हृदयाला एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकर झाली.
त्यागालाही लाज वाटावी,
इतका महान त्याग तुझा,
तुझ्या त्यागाने जागा झाला,
आम्हा लेकरांचा अभिमान.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही सविस्तर वाचा.
अहिल्याबाई होळकर माहिती मराठी : Ahilyabai Holkar Information In Marathi
पूर्ण नाव | अहिल्याबाई होळकर |
जन्मतारीख | ३१ मे १७२५ |
जन्मस्थळ | जामखेड चौंडी |
वडिलांचे नाव | माणकोजी शिंदे |
आईचे नाव | सुशीलाबाई शिंदे |
सासऱ्यांचे नाव | मल्हारराव होळकर |
पतीचे नाव | खंडेराव होळकर |
अपत्य | मालेराव, मुक्ताबाई |
ओळख | पुण्यश्लोक, राजमाता,लोकमाता |
कार्य | समाजसेवा |
मृत्यू | १३ ऑगस्ट सन १७९५ |
मल्हारराव होळकरांचा काळ
सन १७०७ मध्ये बादशाह औरंगजेबाच्या मृत्यूनंतर, दिल्लीचे मुगल साम्राज्य त्याच्या अधोगती कडे वाटचाल करू लागलं. आणि दक्षिणेतील मराठा साम्राज्य तीव्र गतीने विस्तार करू लागलं. छत्रपती शाहू महाराजांचे कुशल सेनापती बाजीराव पेशवाच्या नेतृत्वाखाली, अनेक मराठा सरदारांनी एकजूट होऊन भारताच्या विशाल भूभागावर भगवा फडकवायला सुरुवात केली.
याच शूरवीर मराठा सरदारांमध्ये एक नाव होते मल्हारराव होळकर पेशवा बाजीराव. यांनी आपले विश्वसनीय सरदार मल्हारराव होळकर यांना ३ ऑक्टोबर १७३० मध्ये ७४ परगण्यांचा माळवा प्रांत जहागिरीच्या रूपात सुपूर्त केला. आणि मल्हाररावांनी इंदोर या शहराला आपली राजधानी म्हणून स्थापित केला.
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म व बालपण
अहिल्याबाईचा जन्म ३१ मे १७२५ मध्ये नगरच्या जामखेड चौंडी गावाचे पाटील माणकोजी शिंदे यांच्या घरात झाला. अहिल्या ही लहानपणापासूनच एक बुद्धिमान मुलगी होती. आपल्या सुसंस्कृत स्वभावामुळे, आणि गोड वाणीमुळे ती सर्वांचीच लाडकी होती. १७०० च्या काळात स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसताना, सुद्धा त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिणे, वाचणे, शिकवले. आणि अहिल्याबाई लहानपणापासूनच धार्मिक कार्यात आणि धार्मिक गोष्टीत रुजलेल्या होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच त्या मंदिरात जाणे, पूजा करणे, या गोष्टी करत होत्या.
बाल अहिल्याबाई होळकर यांचा गृहस्थाश्रमात प्रवेश
सन १७३४ च्या एके दिवशी इंदोर वरून पुण्याला येत असताना, मल्हारराव नगरच्या जामखेड मधील चौंडी या गावात विश्राम करण्यासाठी थांबले. तेथील मंदिरामध्ये संध्याकाळच्या आरतीच्या वेळेस त्यांची नजर अचानक एका आठ नऊ वर्षाच्या तेजस्वी मुलीवर खेळून राहिली. मल्हारराव हे त्यांचा पुत्र खंडेराव यांच्या विवाह साठी एक उचित कन्या शोधत होते. त्या मुलीचे प्रसन्न रूप आणि तिची विनम्र वाणी पाहून, अतिशय प्रसन्न झालेले मल्हारराव यांनी त्या मुलीला त्वरित आपली सून म्हणून स्वीकार केलं.
हीच ती छोटी कन्या “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर”जिने पुढे जाऊन भारतीय संस्कृती आणि सुशासनाचे नवीन मापदंड प्रस्थापित केले. जिने आपल्या असामान्य कर्तुत्वाने सामान्य जनमानसांच्या हृदयामध्ये, ईश्वराचे स्थान प्राप्त केले. त्यानंतर २० मे १७३३ रोजी पुण्यातील शनिवार वाडा येथे अहिल्याबाई होळकर यांचा विवाह खंडेराव होळकरांसोबत झाला.
त्याकाळची संस्कृती पुरुषप्रधान असून सुद्धा अहिल्याबाईंना त्यांचे सासरे म्हणजे मल्हार होळकर यांनी सुनेला तत्कालीन दरबाराची मोडी, मराठी लिहिणे, वाचणे, गणित, इत्यादी. गोष्टी शिकवल्या. तसेच घोड्यावर बसणे, दांडपट्टा फिरवणे, युद्धाचे व राजकारणाचे डावपेच, चाचणी लढाया करणे, पत्रव्यवहार करणे, न्यायनिवाडा करणे, यासारख्या गोष्टींचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे अहिल्याबाईंची सामाजिक आणि राजकीय दृष्टी आणि बुद्धी दोन्ही परिपक्व झाल्या.
अवघ्या नऊ वर्षात लग्न झालेला असतानाही, तिने तिच्या सासरच्या सर्वांचं मन आपल्या मधुर स्वभावाने जिंकून घेतलं. मल्हाररावांचा पुत्र खंडेराव याला राजकीय कामकाज आणि आर्थिक व्यवहारांमध्ये मुळीच रस नव्हता. तो स्वतःहून या सर्व गोष्टीपासून अलिप्त राहत होता. त्यामुळे मल्हाराव नेहमीच चिंतेत असत, परंतु अहिल्याबाईच्या सानिध्यात आल्याने खंडेरावाच्या वागणुकीत झालेला बदल पाहून मल्हारराव निश्चिंत झाले.
सन १७४५ मध्ये अहिल्याबाईंना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. ज्याचे नाव मालेराव असे ठेवण्यात आले. आणि त्याच्या तीन वर्षानंतर सन १७४८ मध्ये त्यांना एका कन्यारत्नाची प्राप्ती झाली. जिचे नाव मुक्ताबाई असे ठेवण्यात आले. मल्हाररावांच्या कुटुंबातील वातावरण आनंदाने उजळून निघाले.
- संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती मराठी
- संत एकनाथ महाराजांची संपूर्ण माहिती मराठी
- संत मीराबाई संपूर्ण माहिती मराठी
कुंभेरी युद्ध आणि खंडेरावाचा मृत्यू
अहिल्याबाईच्या आगमनाने होळकर घराण्यामध्ये आलेल्या या भरभराटीमुळे मल्हारराव स्वतःला खूपच भाग्यवान समजू लागले. तेव्हा अचानक नशिबाचे फासे पलटू लागले. सन १७५४ मध्ये मराठा आणि जाट यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली. मल्हाररावांनी सुरजमल जाटाला कुंभेरीच्या किल्ल्यामध्ये घेरले. २४ मार्च १७५४ च्या या मोहिमेमध्ये, खंडेराव सुद्धा मल्हार रावांच्या सोबत नेतृत्व करत होते.
तेव्हा अचानक कुंभेरी किल्ल्याच्या तोफेमधून निघालेला एक गोळा खंडेरावाला आपला निशाणा बनवला आणि खंडेरावाचा जागीच मृत्यूमुखी पडले. मल्हार रावांच्या एकुलता एक पुत्राचा आणि इंदोरच्या राजघराण्याच्या वारसाचा दुःखद अंत होतो या घटनेने संपूर्ण माळवा सुन्न पडला. अहिल्या अचित निशब्द होऊन गेली.
आपल्या मुलाला मांडीवर घेऊन रडत असलेल्या मल्हारावाला पाहून, सुरज मलजाट युद्ध संपल्याची घोषणा करतो. आणि शत्रू संवेद संपूर्ण आसमंत शोक सागरात बुडून निघतो. तत्कालीन प्रथेनुसार अहिल्याबाई सती जाण्याची तयारी करू लागते. हे सर्व दृश्य पाहून मल्हाररावांच्या पायाखालची जमीनच सरकते. भावनेने ते अहिल्याला समजवतात, अहिल्या आता माळव्याला फक्त तुझाच आधार आहे.
आता तूच माझा मुलगा आहेस. आणि तूच नाही राहिलीस, तर आम्हा सर्वांचं काय होईल ? मल्हाररावांचे हे करूण शब्द ऐकल्यावर, अहिल्याबाईचे पाय स्तब्ध होतात. आणि ती सती जाण्याचा निर्णय बदलला. आपले उर्वरित आयुष्य माळव्याच्या प्रजेच्या हितासाठी समर्पित करण्याचा अहिल्या निर्णय घेते.
सुभेदार मल्हारराव होळकरांचा मृत्यू
मल्हाररावांच्या देखरेजीत अहिल्याबाई मोठ्या कुशलतेने राज्यकारभार सांभाळू लागते. सन १७६१ मध्ये मराठा आणि अफगाण सेनापती अहमदनगर यांच्यामध्ये घनघोर असे पानिपतचे युद्ध सुरू होते. या युद्धात मराठ्यांची प्रचंड हानी होते. लाखो मराठा सैनिक मृत्यू पावतात. मल्हारराव सुद्धा या पराभवाने व्यक्तित होऊन दुःखी मनाने इंदोरला परततात. पुत्रविरह आणि पानिपतच्या युद्धातील हार या दोन्ही धक्क्यामुळे २० मे सतराशे १७६४ मध्ये मल्हाररावांचे दुखद निधन होते. अहिल्याबाईचा एकमेव आधार कायमचा हरपला जातो.
अहिल्यादेवींच्या राजकीय प्रशासकीय नेतृत्वाचा विकास
आपला २१ वर्षाचा पुत्र मालेराव याला गादीवर बसून अहिल्याबाई मोठ्या धिर्याने राज्यकारभार पुढे चालू ठेवते. मालेरावास गादीवर बसून एक वर्ष ही झालेलं नसतं की, त्याचाही अचानक मृत्यू होतो. आणि अहिल्याबाई वर दुःखाचा डोंगर कोसळतो. इंदोरची राजगादी पुन्हा एकदा स्वामीही बनते. स्वामीहीन राज्य बळकवण्याची चांगली संधी पाहून चंद्रचूड सारखे काही मंत्री कटकारस्थान करायला सुरुवात करतात. ते माधवराव पेशव्यांचे काका राघोबा दादा यांना पत्र लिहून माळव्याची सत्ता ताब्यात घेण्याचे आमंत्रण देतात.
या कटकारस्थानाची माहिती मिळताच अहिल्याबाई सर्व सूत्रे आपल्या हातात घेते. आणि स्वतः माळव्याची उत्तर अधिकारी असल्याची घोषणा करते. सेनापती तुकोजीराव मल्हाररावांचे मानसपुत्र होते. ते सुद्धा अहिल्याबाईंच्या सोबत उभे राहतात. इकडे राघोबा दादा आपली सर्व सेना घेऊन उत्तरेच्या दिशेने येऊ लागतो. शिप्रा नदीच्या किनारी पोहोचतात. त्याला अहिल्याबाईचे पत्र मिळतं. त्यात अहिल्याबाई म्हणते की, तुम्ही माझ्याशी युद्ध करायला आलात.
तुम्ही मला एक अबला नारी समजण्याची चूक करू नका. मी स्वतः तलवार घेऊन, युद्धभूमी तुमच्या सैन्याचा सामना करेल. जर या युद्धात माजी हार झाली तर, जग मला बिलकुल ही हसणार नाही. पण जर का तुमची हार झाली तर मात्र संपूर्ण जगासमोर तुम्ही एका नारी सोबत युद्ध हरल्यामुळे, हास्याला पात्र ठराल. हे पत्र वाचतात राघोबा दादांचे धावेदनानतात. ते लगेचच उत्तर देतात, अहिल्या मी काही तुझ्यासोबत युद्ध करायला आलो नाही.
तर तुझ्या मुलाच्या मृत्यूचा शोक व्यक्त करण्यासाठी आलो आहे. विद्वान अहिल्याबाई म्हणते, जर तुम्ही माझ्या मुलाच्या मृत्यूचा शोक व्यक्त करण्यासाठी आला आहात, तर एवढी मोठी सेना का आणली आहे. हा माळवा आणि येथील प्रजा ही तुमचीच आहे.
तुम्ही एकट्याने कधीही आमच्या भेटीला येऊ शकता. राघोबा दादा अतिलजीत होऊन, अहिल्याबाईची भेट घेतात. आणि पुन्हा दक्षिणेत परततात. अशा प्रकारे आपल्या बुद्धीचा वापर करून अहिल्याबाई माळवा वर आलेल्या या संकटाला दूर करते. या घटनेनंतर अहिल्याबाईचं प्रजेच्या मनातील स्थान आणि राजकीय वजन पटीने वाढतं.
मुक्ताबाईचा विवाह
इंदूरच्या त्या महाला सोबत आपले पती, सासरे, आणि मुलाच्या आठवणी जोडलेल्या असल्याकारणाने अहिल्याबाई सेनापती तुकोजीराव यांच्या हातात सर्व सूत्रे सोपवून, स्वतः नर्मदा नदीच्या किनारी असलेल्या महिष्मती या पुरातन गावी जाऊन राहते. आणि तेथूनच ती आपल्या राज्यकारभाराचा गाडा हाकायला सुरुवात करते. पुढे अहिल्याबाई या गावाचे नाव बदलून महेश्वर असे ठेवते. त्या काळात माळव्याध डाकू आणि पिंडारांनी धुमाकूळ घालून ठेवला होता. ते जंगलाच्या रस्त्याने, जाणाऱ्या व्यापाऱ्यांची आणि सामान्य माणसांची लूटमार करत असत.
राज्यकारभार आपल्या हाती घेतात. राणी अहिल्याबाई दरबार बोलावते. आणि भर दरबारात घोषणा करते की, जो युवक या डाकू आणि पिणाऱ्यांचा बंदोबस्त करेल, त्याच्यासोबत मी माझी कन्या मुक्ताबाई हिचा विवाह करून देईल. त्याच वेळी यशवंतराव यांचे नावाच्या एका युवा सरदाराने विडा उचलला. आणि तो आपली प्रतिज्ञा यशस्वीपणे पूर्ण करूनच परत आला. अशा प्रकारे अहिल्याबाईने राज्यामध्ये शांती प्रस्थापित करण्याचं आणि आपल्या मुलीसाठी एका उचित वराची निवड करण्याचं कार्य कुशलता पूर्वक पूर्ण केलं.
अहिल्याबाई होळकर यांची न्यायव्यवस्था
अहिल्याबाईंच्या काळामध्ये न्यायपणाबद्दल सर्वत्र ख्याती होती. अहिल्याबाई उचित न्याय करत अहिल्याबाईंची धारणा शक्ती प्रचंड होती. त्यांना अन्यायाचा तिरस्कार होता. त्यांचे कार्य उत्तम न्यायाधीशाप्रमाणे असायचे. होळकरांच्या राजवटीमध्ये अहिल्याबाईंच्या कारकर्दीपासून नियमबद्ध न्यायालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. प्रजेला न्याय प्राप्त व्हावा व प्रजा सुखी व्हावी, यासाठी राज्यात विविध ठिकाणी न्यायालय स्थापन केली गेली.
व त्यावर योग्य न्यायमूर्तीच्या नेमणुका केल्या गेल्या. गावोगावी ग्रामपंचायत स्थापन करून न्यायदानाचे विस्तृत अधिकार ग्रामपंचायत यांना बहाल करण्यात आले. अहिल्याबाई त्यांच्या न्यायव्यवस्थेमध्ये सर्वोच्च होत्या कोणत्याही प्रकारचे प्रकरण असले तरी त्यामध्ये अहिल्याबाई योग्य न्याय देत असत.
राज्यात पूर्ण शांती प्रस्थापित झाल्यानंतर, व्यापार आणि व्यवसायामध्ये वृद्धी होऊ लागली. कला आणि कौशल्याला संधी प्राप्त झाली. भगवान शिवांची नित्य उपासना करणारी, अहिल्या संपूर्ण भारतामध्ये मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे आणि पुनर्निर्मानाचं मोठं कार्य हाती घेतली. अनेक तीर्थस्थळ आणि नद्यांच्या किनारी ती घाट बांधली. अनेक धर्मशाळा उभारले. यात्रेकरूंच्या मार्गात विहिरी बांधल्या. आपल्या राजकोषातील राजस्वाचा अधिकार ती संपूर्ण देशभरातील निर्माण कार्यांमध्ये खर्च करते.
न्यायदानाचे कार्य करत असताना, अहिल्याबाई नेहमीच आपल्या हातामध्ये एक शिवलिंग धारण करत असे. तिचा विश्वास होता की, हे जे न्यायदानाचे कार्य मी करत आहे, ते करत असताना जर माझ्या हातून कोणतीही चूक झाली, आणि एखाद्या निरापराध व्यक्तीला शिक्षा झाली तर, त्याचं पाप मला लागू शकतं. तर हे प्रभू तू स्वतः माझ्या जागी बसून न्यायदानाचे हे कार्य सत्यनिष्ठतेने करण्याची, सद्बुद्धी मला प्रदान कर.
निरंकोष, जुलमी आणि अन्यायकारी राजसत्तांच्या या काळात इतकी प्रजाहितदक्ष आणि प्रेम वत्सल राणीचा मिळणं, हे माळव्याच्या प्रजेसाठी मोठी भाग्याची गोष्ट होती. आणि म्हणूनच माळव्याची प्रजा अहिल्याबाईला देवीच्या रूपात पाहू लागली. देवी अहिल्याने शासन केलेले २८ वर्ष हे भारतीय इतिहासाचे सुवर्णपृष्ठ आहेत.
अहिल्याबाई होळकर यांची राजधानी माहेश्वरी
- अहिल्याबाई यांनी आपल्या आयुष्यात लोक कल्याणकारी कार्य करत असताना, प्रदेशाची मर्यादा न घालता संपूर्ण भारतात कार्य केले. संपूर्ण भारतात अनेक विहिरी, तलाव, कुंड, घाट, बांधले. रस्ते, पुल निर्माण केले. जे काम तेव्हा सुद्धा भारताचे शासन व्यवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जात होते, ते काम लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी केले.
- उद्योगधंद्यांना व त्यांच्या विकासाला प्राधान्य त्यांनी दिले. मल्हाररावांच्या मृत्यू नंतर, इंदोर वरून संस्थानाची राजधानी माहेश्वरी या ठिकाणी आणून, कारागीर, मजूर, विणकर, कलावंत, साहित्यिक अशा गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन, पैसा, घर, इत्यादी. सोय उपलब्ध करून दिल्या. आजही महेश्वरी येथे साड्या, पैठणी, धोतर, प्रसिद्ध आहेत.
- राज्यात पशुपक्षी यांच्या संरक्षण करण्यासाठी त्यांची पूर्ण काळजी राखली. अहिल्याबाईंनी मुंग्यांपासून तेमधमाशांपर्यंत कणकेचा गोळा, साखर, उन्हाळ्यात वाटसरूंना पिण्यासाठी पानपोळी, हिवाळ्यात गरजूंना गरम कपडे, यांची सोय केली.
- आपल्या राज्यात सूक्ष्मजीव ही उपाशी राहू नये, याची दक्षता त्यांनी घेतली. दिव्यांग, अनाथ, असह्य लोकांचे पुनर्वसन त्यांनी केले. गोरगरिबांसाठी अन्नछत्रे, व सदावर्ते चालवली, पत्राचे वाटप त्यांनी केले.
- प्रवाशांसाठी मार्गावर अरण्यमय प्रदेशातही, आमराई, बगीचे वृक्षारोपण, विश्रांतीसाठी ओटी, आणि धर्मशाळा बांधल्या. घाट बांधताना केवळ तज्ञांची मत विचारात न घेता, प्रत्यक्ष त्या भागातील स्त्रियांना बोलावून घाटाच्या पायऱ्या कशा हव्यात, कारण पूर्वीच्या काळी सर्व महिला घाटावर कपडे धुवत होते, कपडे धुताना बाळ कुठे ठेवायला सोईस्कर पडेल, अशा ठिकाणी बाळांसाठी सुद्धा व्यवस्था करणे, कपडे धुतल्या धुताना खोल्या कुठे असाव्यात, इतक्या बारीक तपशीला सहत्या घाट बांधत होते.
- अहिल्याबाई होळकर यांनी सर्व समभावाचा आदर्श मिरवीत मंदिरे, मशिदी, दर्गे, आणि बिहार बांधली. तर काही मंदिरांचा जे मुस्लिम शासकाने इंग्रज शासक यांच्या काळामध्ये त्या मंदिरांना पाडण्यात आले, अशा मंदिरांचा जिर्णोधार त्यांनी केला. तर ते महारस्ते बांधल्यामुळे त्याकाळच्या पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले. मजुरांना काम मिळाले, व सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन एकात्मता निर्माण झाली.
- राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणाऱ्या यशवंत फणसे या बहादूरला स्वतःच्या मुलीसोबत विवाह लाऊन आपल्या एकुलत्या एका मुलीचा आंतरजातीय विवाह त्याकाळी त्यांनी घडून आणला. अहिल्याबाई या समाजसुधारक होत्या. त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरांचा आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही. त्यांनी एकच धर्मा पाडला आणि तो म्हणजे मानव जातीचा धर्म.
- प्रजेवर जास्त कराचा बोजा न लादता, राज्याचा कोश समृद्ध केला. स्वतःचा खर्च कमी करून, खाजगी उत्पादनाचा उपयोग सुद्धा लोककल्याणासाठी केला. अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्यामुळे, त्या खऱ्या अर्थाने लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या.
तत्कालीन महेश्वरचे वर्णन करताना त्या काळचे प्रसिद्ध शाहीर व कवी अनंत फंदी लिहितात,
“नर्मदातटनिकट घाट बहुत अफाट,
पायऱ्या दाट, चिरेबंदी वाट, मुक्तीची शिवालये।
कैलास साम्यता, नानापरीची रचना, रचली रामकृष्ण मंदिरे।
बहुत सुंदर बांधिली घरे, रम्य रमकुल हवेल्या नयनी पाहिल्या॥
नूतन घाट, प्रताप, अहिल्या किल्ल्यावर तळवटी।
शहर गुलजार, बहुत बाजार, हजारो दुकाने।’’
लक्षापती सावकार, भारीभारी माल, खजिना स्वस्त।
स्वस्ता सुकाळ, नाही दुष्काळ, बाळ-वृद्ध-प्रतिपाळ करिती।
गरीब-गुरीब कंगाल, गांजले, अडले निडले त्या देखोनिया अन्नछत्र सर्वत्र।
सारखे नाही पाहिले पारखे नयनी।
महेश्वर क्षेत्रपूर ॥1॥
दानधर्म करी, नित्य शिवार्चन सत्त्वशील ऐकून धावती देशोदेशीचे
कर्नाटक, तैलंग, द्रविड, कऱ्हाड, वऱ्हाड, कोल्हापूर, कृष्णतीर, गंगातीर, कोकण, काशीकर। गयावळ माळवे, बीऱ्हांगडे, योती, कानडे, वेडे बागडे गुजराती मैथुली पुरी, भारती दिगांबर जटाधारी।
बैरागी, योगी, कानफाडे दर्शना येती हरिदासाचे प्रेमळ भक्त-संप्रदाय पुष्कळ पाहिले नयनी सर्व।
महेश्वर क्षेत्रपूर ॥2॥
अहिल्याबाई आणि बांधलेल्या विहिरी किंवा बारव
अहिल्याबाई आणि त्यांच्या काळामध्ये विविध समाज सुधारक कामे केले. लोकांसाठी विहिरी व बावर बांधून लोकांना पिण्यायोग्य पाण्याची व्यवस्था, अहिल्याबाई होळकर यांनी केली. त्यामधील काही विहिरी व बारव व्यांचे बांधकाम खालील प्रमाणे
चांदवड येथील नरोटी बारव
चांदवड येथील नरोटी बारव चांदवड या ठिकाणी नरोटी १२ ही विहीर प्रसिद्ध असून, या विहिरीचे बांधकाम अहिल्याबाई होळकर यांनी केले.
सकर गाव ता.निफाड जिल्हा. नाशिक येथील विहीर
निफाड या शहरापासून अंदाजे 15 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सकर गाव या गावामध्ये ऊस, कांदे, द्राक्ष पिकवले जातात. व यामुळे या गावाला प्रसिद्धी आहे. अहिल्याबाई होळकरांनी या ठिकाणी एक मोठी पाय विहीर बांधली आहे व ती विहीर आजही अहिल्याबाईंची बारव या नावाने प्रसिद्ध आहे.
भीमाशंकर येथील विहीर
भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंग क्षेत्रांपैकी एक आहे. जे की पुण्यापासून ७० मैल अंतरावरती आहे. हे एक थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. अहिल्याबाईंनी समाज सुधारण्यासाठी अनेक कल्याणकारी कामे केली असून, भीमाशंकर या ठिकाणी यात्रेकरूंची पाण्याची सोय करण्यासाठी त्यांनी भीमाशंकर या ठिकाणी विहिरीचे बांधकाम केले.
उज्जैन येथील विहीर
उज्जैन हे एक प्राचीन काळापासून, धार्मिक पवित्र शेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. उज्जैन हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असून, या ठिकाणी महाकालेश्वर नावाने ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे. यात्रेकरूंच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी, पिण्याच्या पाण्याच्या विहिरी बांधल्या आहेत.त्याचप्रमाणे चिंतामणी गणेशाचे मंदिर, जनार्दन मंदिर व घाटांची उभारणी सुद्धा केली आहे.
अहिल्याबाई होळकर यांचा मृत्यू – अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी ahilyabai holkar punyatithi
१३ ऑगस्ट सन १७९५ रोजी देवी अहिल्या आपल्या वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज देवी अहिल्या शरीरुपाने आपल्यामध्ये अस्तित्वात नाही, परंतु त्यांनी बांधलेले शेकडो मंदिर, नदीचे घाट, आणि धर्मशाळा या आज सुद्धा त्या महान विभूतीची आठवण करून देतात. महाराष्ट्र भूमीवर जन्मलेल्या या महान राष्ट्र कन्येला आमचा मानाचा मुजरा.
अहिल्याबाई होळकर शासन पुरस्कार
राज्यात महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायतमधील दोन महिलांना राज्य शासनाच्या माध्यमातून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार दिला ३१ मे २०२३ रोजी दिला गेला. या महिलांचे निवड करून अशा उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना सन्मानचित्र, सन्मानचिन्ह याचबरोबर शाल व श्रीफळ नारळ आणि रोख पाचशे रुपयांचे रक्कम प्रति महिला अशा स्वरूपामध्ये हा पुरस्कार दिला जाणार आहे. याच्या पात्रतेसाठी महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांची निवड केली गेली.
अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल १० ओळी – अहिल्याबाई होळकर निबंध – Ahilyabai Holkar essay
- जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय अत्याचार अधर्म वाढतो, तेव्हा त्याला संपवणारी शक्ती या जगात जन्म घेते आणि तेच घडले ३१ मे १७२५ रोजी माणकोजी शिंदे आणि सुशिलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये एक कन्यारत्न जन्माला आले.
- या कन्येच्या तेजाने साक्षात सूर्यही लाजला. या कन्येचे नाव अहिल्या असे ठेवण्यात आले.
- ही तीच महिला जिने सत्तेचा मंत्र वापरून, विकासाचे तंत्र हिंदुस्थानाच्या मातीत राबवले. ही तीच अहिल्या जिने चूल आणि मूल समाज व्यवस्थेला झुगारून देऊन, एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन तब्बल २९ वर्ष आदर्श राज्यकारभार केला.
- अहिल्याबाईंना लहानपणापासूनच तलवार चालवणे, भालाफेकणे, युद्ध लढणे, या गोष्टींचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जात होते. हीच होती त्यांच्या व्यक्तिमत्त्वत विकासाची सुरुवात.
- अहिल्याबाईंच्या जीवनात जर सर्वात जास्त योगदान कोणाचं असेल तर त्यांचे सासरे मल्हारराव.
- मल्हारराव म्हणजे सामर्थ्य, मल्हारराव म्हणजे पराक्रम, मल्हार म्हणजे विश्वास मल्हारराव म्हणजे अहिल्याबाई यांच्या पाठीवर आयुष्यभर पडत असलेली कौतुकाची थाप.
- मल्हाररावांनी आपल्या आठ वर्षाच्या सुनेला शिकवलं. युद्ध कसा लढायचं युद्ध रणांगणामध्ये सुरू होतं तोफांचे भयानक आवाज होता, तेव्हा त्याला निधड्या छातीने कसे सामोरे जायचं.
- मावळ्याच्या जहागीदार असलेल्या होळकर घराण्याच्या तत्त्वज्ञानी राणी म्हणून पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई ओळखल्या जातात.
- एक अतिशय दानशूर, कर्तुत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ते म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले आहे.
- उचित न्यायदानासाठी त्या प्रसिद्ध होत्या. शेती व शेतकरी उद्धारासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. राणी अहिल्याबाईंनी भारतात अनेक हिंदू धर्म मंदिरे व नदी घाट बांधले व त्यांचा जिर्णोद्धार केला. अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यात द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
अहिल्याबाई होळकर नावाचे पुरस्कार
- अहिल्याबाई होळकर यांच्यावरील पोस्टाचे तिकीट (१९९६)
- अहिल्यादेवींच्या सन्मानाप्रीत्यर्थ व स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने २५ ऑगस्ट १९९६ रोजी एक टपाल तिकिट जारी केले.
- या अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव “देवी अहिल्याबाई विमानतळ” असे ठेवण्यात आले आहे, आणि इंदूर विद्यापीठास “देवी अहिल्या विश्वविद्यालय” असे नाव देण्यात आले आहे”.
- महाराष्ट्रातील सोलापूर विद्यापीठाचे नवीन नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ ठेवण्यात आले आहे.
अहिल्याबाई होळकर यांची देशभरातील कामे
- औरंगाबाद मधील अहिल्याबाईंचा पुतळा
- अहिल्यादेवींच्या काळातील किल्ले व भुईकोट:
- किल्ले महेश्वर
- इंदोरचा राजवाडा
- चांदवडचा रंगमहाल
- वाफगाव – यशवंतराजे होळकर यांचे जन्मस्थळ
- खडकी-पिंपळगाव : होळकर वाडा
- काठापूर : होळकर वाडा किंवा वाघ वाडा
- पंढरपूर : होळकर वाडा
- लासलगाव : अहिल्यादेवींचा किल्ला
- पळशी : पळशीकर वाडा(होळकरांचे दिवाण)
- रायकोट किल्ला कोंडाईबारी घाट
अहिल्यादेवींच्या काळातील मंदिरे, बारव व धर्मशाळा
- अकोले तालुका- विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, वीरगाव, औरंगपूर.
- वीरगाव – बारव
- अंबा गाव – दिवे.
- अमरकंटक (मप्र)- श्री विघ्नेश्वर, कोटितीर्थ, गोमुखी, धर्मशाळा व वंश कुंड
- अलमपूर (मप्र) – हरीहरेश्वर, बटुक, मल्हारीमार्तंड, सूर्य, रेणुका,राम, हनुमानाची मंदिरे, लक्ष्मीनारायणाचे,मारुतीचे व नरसिंहाचे मंदिर, खंडेराव मार्तंड मंदिर व मल्हाररावांचे स्मारक
- आनंद कानन – श्री विघ्नेश्वर मंदिर.
- अयोध्या (उ.प्र.)– श्रीरामाचे मंदिर, श्री त्रेता राम, श्री भैरव, नागेश्वर/सिद्धार्थ मंदिरे, शरयू घाट, विहिरी, स्वर्गद्वारी मोहताजखाना, अनेक धर्मशाळा.
- आमलेश्वर, त्र्यंबकेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार
- उज्जैन (म.प्र.)– चिंतामणी गणपती,जनार्दन,श्री लीला पुरुषोत्तम,बालाजी तिलकेश्वर,रामजानकी रस मंडळ, गोपाल, चिटणीस, बालाजी, अंकपाल, शिव व इतर अनेक मंदिरे,१३ घाट, विहिरी व अनेक धर्मशाळा इत्यादी.
- ओझर (अहमदनगर) (महाराष्ट्र) – २ विहिरी व एक कुंड.
- इंदूर – अनेक मंदिरे व घाट
- ओंकारेश्वर (मप्र) – मामलेश्वर महादेव,
- कर्मनाशिनी नदी – पूल
- काशी (बनारस) – काशी विश्वनाथ,श्री तारकेश्वर, श्री गंगाजी, अहिल्या द्वारकेश्वर, गौतमेश्वर व अनेक महादेव मंदिरे, मंदिरांचे घाट, मनकर्णिका, दशास्वमेघ, जनाना, अहिल्या घाट, उत्तरकाशी, रामेश्वर पंचक्रोशी, कपिलधारा धर्मशाळा, शीतल घाट.
- केदारनाथ – धर्मशाळा व कुंड
- कोल्हापूर (महाराष्ट्र) – मंदिर-पूजेसाठी साहाय्य.
- कुम्हेर – विहीर व राजपुत्र खंडेरावांचे स्मारक.
- कुरुक्षेत्र (हरयाणा) – शिव शंतनु महादेव मंदिरे,पंचकुंड व लक्ष्मीकुंड घाट.
- गंगोत्री –विश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूर्णा, भैरव मंदिरे, अनेक धर्मशाळा.
- गया (बिहार) – विष्णूपद मंदिर.
- गोकर्ण – रावळेश्वर महादेव मंदिर, होळकर वाडा, बगीचा व गरीबखाना.
- घृष्णेश्वर (वेरूळ) (महाराष्ट्र) – शिवालय तीर्थ.
- चांदवड वाफेगाव (महाराष्ट्र) – विष्णूचे व रेणुकेचे मंदिर.
- चिखलदा – अन्नछत्र
- चित्रकूट (उ.प्र.) – श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
- चौंडी – चौडेश्वरीदेवी मंदिर, सिनेश्वर महादेव मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, धर्मशाळा व घाट
- जगन्नाथपुरी (ओरिसा) – श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा व बगीचा
- जळगांव (महाराष्ट्र) – राम मंदिर
- जांबगाव – रामदासस्वामी मठासाठी दान
- जामघाट – भूमिद्वार
- जेजुरी(महाराष्ट्र) – मल्हारगौतमेश्वर, विठ्ठल, मार्तंड मंदिरे, जनाई महादेव व मल्हार या नावाचे तलाव.
- टेहरी (बुंदेलखंड) – धर्मशाळा.
- तराना? – तिलभांडेश्वर शिव मंदिर, खेडपती, श्रीराम मंदिर, महाकाली मंदिर.
- त्र्यंबकेश्वर (नाशिक) (महाराष्ट्र)– कुशावर्त घाटावर पूल.
- द्वारका (गुजरात) – मोहताजखाना, पूजागृह व पुजाऱ्यांना काही गावे दान.
- श्री नागनाथ (दारुकावन) – १७८४मध्ये पूजा सुरू केली.
- नाथद्वार – अहिल्या कुंड, मंदिर, विहीर.
- निमगाव (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
- नीलकंठ महादेव – शिवालय व गोमुख.
- नैमिषारण्य (उ.प्र.) – महादेव मंडी, निमसर धर्मशाळा, गो-घाट, चक्रीतीर्थ कुंड.
- नैम्बार (मप्र) – मंदिर
- पंचवटी (नाशिक)(महाराष्ट्र)– श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा, रामघाट.
- पंढरपूर (महाराष्ट्र) – श्री राम मंदिर, तुळशीबाग, होळकर वाडा, सभा मंडप, धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली. बाजीराव विहीर
- पिटकेश्वर, ता. इंदापूर – पंढरपूर वारीच्या जुन्या मार्गावर बांधलेली बारव
- पिंपलास (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
- पुणतांबे (महाराष्ट्र) – गोदावरी नदीवर घाट.
- पुणे (महाराष्ट्र) – घाट (कोणता घाट?)
- पुष्कर – गणपती मंदिर,मंदिरे,धर्मशाळा व बगीचा.
- प्रयाग (अलाहाबाद,उ.प्र.) – विष्णू मंदिर, घाट व धर्मशाळा, बगीचा, राजवाडा.
- बद्रीनारायण (उ.प्र.) –श्री केदारेश्वर मंदिर, हरिमंदिर, अनेक धर्मशाळा (रंगदचाटी, बिदरचाटी, व्यासंग, तंगनाथ, पावली) मनु कुंड (गौरकुंड व कुंडछत्री), देवप्रयाग येथील बगीचा व गरम पाण्याचे कुंड, गायींच्या चरण्यासाठी कुरणे.
- बऱ्हाणपूर (मप्र) – घाट व कुंड.
- बिठ्ठूर – ब्रह्मघाट
- बीड (महाराष्ट्र)– घाटाचा जीर्णोद्धार.
- बेल्लूर (कर्नाटक) – गणपती, पांडुरंग, जलेश्वर, खंडोबा, तीर्थराज व अग्नि मंदिरे, कुंड
- ‘ भरतपूर’ – मंदिर, धर्म शाळा व कुंड.
- भानपुरा – नऊ मंदिरे व धर्मशाळा.
- भीमाशंकर (महाराष्ट्र) – गरीबखाना
- भुसावळ (महाराष्ट्र) – चांगदेव मंदिर
- मंडलेश्वर – शिवमंदिर घाट
- मनसा – सात मंदिरे.
- महेश्वर – शंभरावर मंदिरे, घाट, धर्मशाळा व घरे.
- मामलेश्वर महादेव – दिवे.
- मिरी (अहमदनगर) (महाराष्ट्र) – सन १७८० मध्ये भैरव मंदिर
- रामपुरा – चार मंदिरे, धर्मशाळा व घरे.
- रामेश्वर (तामिळनाडु) – हनुमान व श्री राधाकृष्ण यांची मंदिरे, धर्मशाळा, विहीर, बगीचा इत्यादी.
- रावेर (महाराष्ट्र)– केशव कुंड
- वाफगाव(महाराष्ट्र) – होळकर वाडा व विहीर.
- श्री विघ्नेश्वर – दिवे
- वृंदावन (मथुरा) – चैनबिहारी मंदिर, कालियादेह घाट, चिरघाट व इतर अनेक घाट, धर्मशाळा व अन्नछत्र.
- वेरूळ (महाराष्ट्र) – लाल दगडांचे मंदिर.
- श्री वैजनाथ (परळी,) (महाराष्ट्र)– सन १७८४ मध्ये वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार.
- श्री शंभु महादेव पर्वत, शिंगणापूर (महाराष्ट्र) – विहीर.
- श्रीशैल मल्लिकार्जुन (कुर्नुल, आंध्रप्रदेश) – शिवाचे मंदिर
- संगमनेर (महाराष्ट्र)– राम मंदिर.
- सप्तशृंगी – धर्मशाळा.
- संभल? (संबळ) – लक्ष्मीनारायण मंदिर व २ विहिरी.
- सरढाणा मीरत – चंडी देवीचे मंदिर.
- साखरगाव (महाराष्ट्र)– विहीर.
- सिंहपूर – शिव मंदिर व घाट
- सुलतानपूर (खानदेश) (महाराष्ट्र)– मंदिर
- सुलपेश्वर – महादेव मंदिर व अन्नछत्र
- सोमनाथ मंदिर, धर्मशाळा, विहिरी.
- सौराष्ट्र (गुजरात) – सन १७८५ मध्ये सोमनाथ मंदिर, जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा.
- हरिद्वार (उ.प्र.) – कुशावर्त घाट व मोठी धर्मशाळा.
- हांडिया – सिद्धनाथ मंदिरे, घाट व धर्मशाळा
- हृषीकेश – अनेक मंदिरे, श्रीनाथजी व गोवर्धन राम मंदिर
- नंदुरबार (महाराष्ट्र)- विहीर
- मुक्ताईनगर(महाराष्ट्र)-मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी
- समनापूर ता.संगमनेर(महाराष्ट्र)-पूरातन बारव(विहीर)
- अहिल्यादेवींचे नाव असलेल्या संस्था
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ,सोलापूर
अहिल्यादेवी होळकर नाव असलेल्या संस्था
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल काॅलेज,बारामती जि.पुणे
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान(गंगापुर,तोगे नाना )
- अहिल्याबाई होळकर चौक (स्टेशन रोड-उस्मानपुरा-औरंगाबाद)
- अहिल्यादेवी होळकर पूल (नाशिक)
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
- देवी अहिल्या विश्वविद्यालय (इंदूर)
- अहिल्यादेवी हायस्कूल (पुणे)
- देवी अहिल्या इंटरनॅशनल एअरपोर्ट (इंदूर)
- देवी अहिल्या होळकर शिल्प सृष्टी ,चौंडी अहेमदनगर
- अहिल्यादेवी होळकर चौक दौंड पुणे
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यामंदिर जेजुरी
- महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली
- राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वाचनालय कल्लप्पवाडी,अक्कलकोट सोलापूर
- अहिल्याबाई होळकर चौक जोगेश्वरी संभाजीनगर.
- अहिल्याबाई होळकर चौक हाटकरवाडी
अहिल्याबाई होळकर यांच्यावरील प्रकाशित पुस्तके
- ‘अहिल्याबाई’ : लेखक – श्री. हिरालाल शर्मा
- ‘अहिल्याबाई चरित्र’ : लेखक – श्री. पुरुषोत्तम
- ‘अहिल्याबाई चरित्र’ : लेखक – श्री. मुकुंद वामन बर्वे
- अहिल्याबाई होळकर – वैचारिक राणी (लेखक : म.ब. कामत व व्ही.बी. खेर)
- अहिल्याबाई होळकर : लेखक – म.श्री. दीक्षित
- अहिल्याबाई होळकर (चरित्र), लेखक : खडपेकर
- कर्मयोगिनी : लेखिका – विजया जहागीरदार
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (जनार्दन ओक)
- महाराष्ट्राचे शिल्पकार – तेजस्विनी अहिल्याबाई होळकर (लेखिका : विजया जहागीरदार; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
- शिवयोगिनी (कादंबरी, लेखिका – नीलांबरी गानू)
- ‘ज्ञात- अज्ञात अहिल्याबाई होळकर’ लेखक – विनया खडपेकर
अहिल्याबाई होळकर यांच्यावरील चित्रपट
- “देवी अहिल्याबाई” या नावाचा एक चित्रपट सन २००२ मध्ये आला होता. त्यात शबाना आझमी हिने हरकूबाईची-(मल्हारराव होळकरांची एक पत्नी) भूमिका केली होती. चित्रपटात सदाशिव अमरापूरकर यांची मल्हारराव होळकर (अहिल्याबाईचे सासरे) म्हणून भूमिका होती. “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर” या नावाचा एक चित्रपट आहे.
- अहिल्याबाईच्या जीवनावर, इंदूरच्या Educational Multimedia Research Centerने एक २० मिनिटांचा माहितीपट बनवला होता.
- पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिका सध्या Sony TV वर सुरू आहे.
पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्यावरील सिरियल
पुण्यश्लोक अहिल्याबाई ही एक हिंदी भाषेतील ऐतिहासिक दूरचित्रवाहिनी मालिका आहे जीचे ५ जानेवारी २०२१ पासून सोनी वाहिनी वर प्रसारण सुरू झाले. ही मालिका राणी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित आहे ज्यांनी १७६७ ते १७९५ पर्यंत माळवा प्रदेशावर राज्य केले. छोट्या पडद्यावरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिकंली आहेत.
यात बालकलाकार म्हणून अदिती जलतारे हिने अहिल्याबाई यांची भूमिका साकारली आहे. तर मराठी कलाकार राजेश श्रृंगारपूरे हा तिच्या सास-यांच्या भूमिकेत तर स्नेहलता वसईकर ही तिच्या सासूच्या भूमिकेत दिसली. मोठ्या अहिल्याबाई होळकर यांची भूमिका ऐताशा संझगिरी यांनी साकारली आहे. त्यांचा हा महान इतिहास प्रेक्षकांना 4 जानेवारी 2021 पासून टीव्हीवर पाहायला मिळत आहे. 4 जानेवारीपासून रोज संध्याकाळी 7.30 वाजता हा कार्यक्रम सोनी टीव्हीवर चालू आहे.
FAQ
१. अहिल्याबाई होळकर ह्या कोण होत्या?
अहिल्याबाई होळकर यांची जर ओळख करायची झाली तर, या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या. तसेच भारतात अनेक हिंदू मंदिरे व नदीकाठ यांनी बांधलेले आहे. १७०० च्या काळातील भारतीय मावळ्यांच्या तत्त्वज्ञानी महाराणी म्हणून सुद्धा या ओळखल्या जातात. तसेच पुण्यश्लोक. राजमाता, धर्म रक्षक, लोकमाता या सर्व पदव्यांनी त्यांना सन्मानित केलेला आहे. राणी असंख्य झाल्या या जगात. पण पुण्यश्लोक कोणीही नाही. गर्वजीचा मराठी हृदयाला आहे. या मराठी हृदयाला एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकर झाली.
२. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म कधी झाला?
अहिल्याबाईचा जन्म ३१ मे १७२५ मध्ये नगरच्या जामखेड चौंडी गावाचे पाटील माणकोजी शिंदे यांच्या घरात झाला. अहिल्या ही लहानपणापासूनच एक बुद्धिमान मुलगी होती. आपल्या सुसंस्कृत स्वभावामुळे, आणि गोड वाणीमुळे ती सर्वांचीच लाडकी होती.
३. अहिल्याबाई होळकर यांच्या वडिलांचे नाव काय?
जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय अत्याचार अधर्म वाढतो, तेव्हा त्याला संपवणारी शक्ती या जगात जन्म घेते आणि तेच घडले ३१ मे १७२५ रोजी माणकोजी शिंदे आणि सुशिलाबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबामध्ये एक कन्यारत्न जन्माला आले.नाव होते अहिल्या.
४. अहिल्याबाई होळकरांनी कोणते मंदिर बनवले?
अहिल्याबाई होळकर उचित न्यायदानासाठी त्या प्रसिद्ध होत्या. शेती व शेतकरी उद्धारासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. राणी अहिल्याबाईंनी भारतात अनेक हिंदू धर्म मंदिरे व नदी घाट बांधले व त्यांचा जिर्णोद्धार केला. अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यात द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.