अलिबाग संपूर्ण माहिती मराठी | Alibaug Information In Marathi

Alibaug Information In Marathi | अलिबाग संपूर्ण माहिती मराठी – महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग हे ठिकाण सुंदर आणि समृद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. अलिबागमधील समुद्रकिनाऱ्यामुळे हे महाराष्ट्रातील पिकनिक स्पॉट बनलेले आहे. या शहराचे नाव एका एज्रालील व्यक्तीच्या नावावरून ठेवण्यात आले होते. कारण अलिबाग मधील कित्येक उद्याने त्या व्यक्तीने विकसित केली होती. त्या एज्रालील व्यक्तीचे नाव अली होते. त्यामुळेच या शहराला अलिबाग म्हणून ओळखले जाते. अलिबाग हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. जे महाराष्ट्राचा रायगड या जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणाला मिनी गोवा म्हणूनही ओळखले जाते.

Table of Contents

अलिबाग संपूर्ण माहिती मराठी – Alibaug Information In Marathi

अलिबाग हे एक सुंदर व पिकनिक स्पॉट म्हणून लोकप्रिय असलेले शहर आहे. सुट्टीच्या नियोजनासाठी पर्यटनप्रेमी अलिबाग समुद्रकिनारा हे लोकप्रिय स्थळ निवडतात. या ठिकाणी समुद्रकिनारी हे अतिशय स्वच्छ नीटनेटके व फिरण्यासाठी उत्तम असे ठिकाण आहे. समुद्रकिनाऱ्याच्या आजूबाजूला असणारी नारळाची झाडे व पांढरीशुभ्र वाळू समुद्राचे सौंदर्य अजून खुलवते. फेसाळ लाटा, थंड वारे, स्वच्छ निळे आकाश व निळेशार पाणी या सगळ्यांचे एकत्रीकरण म्हणजे रायगड जिल्ह्यातील अलिबाग. आमच्या मराठी झटका डॉट कॉम या वेब पेजद्वारे अलिबागचा इतिहास, पर्यटन स्थळे, तेथील हवामान याबाबतची सगळी माहिती आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत. चल तर मग, पाहुयात अलिबागची माहिती.

अलिबाग अल्पपरिचय – Alibag Information In Marathi

नावअलिबाग
जिल्हारायगड
हवामान२८°C, वारा E १० किमी/ताशी, ७७% आर्द्रता
लोकसंख्या२०,७४३ (२०११)
क्षेत्र कोड०२१४१
प्रसिद्ध ठिकाणेकुलाबा किल्ला, कणकेश्वर मंदिर, खांदेरी किल्ला
प्रसिद्ध समुद्रकिनारे  अलिबाग बीच, नौगाव बीच, काशीद बीच,  रेवस बीच,  वरसोली बीच इ.

अलिबागचा इतिहास

अलिबाग हे शहर सतराव्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वसवले. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा होते. आताचा रामनाथ परिसर हे तेव्हाचे मुख्य गाव होते. त्यावेळी रेवदंडा, चौल, नागाव, अक्षी, वरसोली, थळ, किहीम आणि आवास ही गावे अष्टागरे म्हणून ओळखली जात होती. त्या काळात याठिकाणी बऱ्याच लढाया झाल्या होत्या. १७२२ मध्ये इंग्रज व पोर्तुगीज यांनी कुलाब्यावर एकत्रित हल्ला केला होता, पण ते ती लढाई हरले होते.

अलिबाग बीच
अलिबाग बीच

१८५२ मध्ये अलिबागला तालुक्याचे ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले.  १७व्या शतकात बांधलेले, हे ठिकाण शिवाजी महाराजांनी सुधारीत केले होते, १८५२ मध्ये हे अलिबाग तालुका घोषित करण्यात आले होते, हे बेनी इस्रायली ज्यूंचे निवासस्थान देखील आहे.

अलिबाग हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातील एक तालुका असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे. तालुक्यातील डोंगराळ भाग हा मुख्यत्वेकरून सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येतो. अलिबाग तालुका पर्यटन ठिकाण म्हणूनही पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.

अलिबाग तालुक्यामध्ये पुरातन ऐतिहासिक स्थळे, आकर्षक समुद्रकिनारे, निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली पश्चिम घाटातील अप्रतिम ठिकाणे पहावयास मिळतात. कुलाबा किल्ला, कणकेश्वर मंदिर, हे या अलिबाग तालुक्याच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देतात.

अलिबाग हे नाव कसे पडले?

अलिबाग तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला आहे, याला सामान्यतः महाराष्ट्राचा ‘गोवा’ म्हणून ओळखले जाते. 17 व्या शतकात शिवाजी महाराजांच्या काळात नौदल प्रमुख असलेल्या कान्होजी यांनी या शहराची स्थापना केली. पूर्वी, अलिबाग कुलाबा म्हणून ओळखला जात होता, कुलाबा किल्ल्यामुळे याचे नाव कुलाबा असल्याचे मानले जाते.

हा किल्ला शिवाजी महाराजांनी १६५२ मध्ये बांधला होता. अशी आख्यायिका आहे की अली नावाच्या एका श्रीमंत मुसलमानाकडे अनेक बागा होत्या, म्हणून शहराचे नाव अलिबाग असे ठेवले गेले.

आमचा हे लेख नक्की वाचा 👇

अलिबाग मधील पर्यटन स्थळे

अलिबाग खांदेरी किल्ला

खांदेरी हा किल्ला अलिबाग या शहरापासून ४ ते ५ किलोमीटर एवढे अंतरावर आहे. खांदेरी हा किल्ला प्राचीन परंतु प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. अलिबाग मधील हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ मानले जाते. या किल्ल्यावर कुलाबा या किल्ल्यासारखेच गोड्या पाण्याची विहीर देखील आहे. खांदेरी या बेटापासून जवळजवळ अर्धा तास बोटीने प्रवास करावा लागेल, तेव्हा खांदेरी या किल्ल्याचे दर्शन घेता येईल.

 अलिबाग मांडवा बीच

मांडवा बीच अलिबाग मधील कौटुंबिक पर्यटन स्थळ आहे. हा बीच अलिबाग मधील सर्वात सुंदर आणि उत्कृष्ट बीच आहे. हा बीच प्रदूषणापासून मुक्त आणि शहराच्या जीवनापासून दूर आहे. मांडवा हा बीच बॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या बीचवर बऱ्याच चित्रपटांचे चित्रीकरण देखील केले आहे. मांडवा बीचवर आपल्याला सूर्योदय आणि सूर्यास्ताचा अनुभव घेता येईल. स्वच्छ आणि सुंदर हवामान असलेल्या बीचवर उंच उंच नारळाची झाडे आहेत. या बीचवर कायकिंग बनाना राईड, वॉटर स्कूटर, जेट्स स्की या सर्व गोष्टींचा आनंद घेता येतो. अलिबाग पासून १२ किलोमीटर एवढे अंतरावर हा बीच आहे. मोहक आणि प्रसन्न वातावरणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या बीचवर बस आणि खाजगी गाडी द्वारे पोहोचू शकतो.

अलिबाग बीच

अलिबाग ब्रह्मकुंड

ब्रह्मकुंड हे अलिबाग मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. याची स्थापना १६१२  मध्ये केली गेली. अलिबाग पासून २० किलोमीटर एवढे अंतरावर असणारे हे ठिकाण सगळ्यात जास्त बघितले जाणारे धार्मिक स्थळ आहे. कलेचा हा सुंदर तुकडा आयताकृती आकाराची टाकी असून, त्याच्या चारही बाजूस पायऱ्या आहेत.

अलिबाग बीच

अलिबाग मुरुड बीच

बीचप्रेमी साठी मुरुड बीच ही किनारपट्टी एक वेगळीच आनंद देणारी ठरते. या बीच वरील काळ्या  वाळूमध्ये फिरण्याची वेगळीच मजा आहे. मुरुड बीच येथे येणारे बरेच पर्यटक विविध खेळांमध्ये आणि बोटीच्या प्रवासात भाग घेत असतात. जवळच मुरुड जंजिरा हा किल्ला आहे. तसेच मुरुड बीचला जाण्यासाठी Alibag येथून बसची सोय आहे.

अलिबाग कणकेश्वर वन

कणकेश्वर वन हे अलिबाग मधील पर्यटन स्थळांपैकी प्रसिद्ध ठिकाण आहे. कारण या ठिकाणी दाट जंगल आहेत. ज्यामध्ये दुर्मिळ वनस्पती आणि जीव जंतूंचा संग्रह आहे. त्या व्यतिरिक येतील हवामान हे नेहमीच थंड असते. पर्यटकांसाठी येथे येण्याची आणखी एक आकर्षण म्हणजे मापगाव या गावाजवळ छोट्या टेकडीवर एक जुने शिवमंदिर आहे. ज्याला पाहण्यासाठी पर्यटक येथे येत असतात. मुंबई विमानतळावरून एखाद्या गाडीने प्रवास केला तर कणकेश्वरला जायला ३ तास एवढा वेळ लागतो.

अलिबाग किहिम बीच

किहिमी बीच स्वच्छ समुद्रकिनारा आणि नारायणच्या झाडासाठी देखील ओळखला जातो. अलिबाग शहरापासून हा बीच१२  किलोमीटर एवढे अंतरावर आहे.

अलिबाग नागवा बीच

नागवा बीच अलिबाग मधील सर्वात प्रसिद्ध बीच आहे. हा बीच कौटुंबिक किनाऱ्यापैकी एक आहे. स्वच्छ समुद्रकिनारा आणि अखंड किनारपट्टी. या बीचवर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेस एक आकर्षक देखावा पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण विविध आणि मजेदार पाण्याच्या खेळामध्ये भाग घेऊ शकतो. तसेच समुद्रकिनाऱ्याजवळ सुपारी आणि नारळाची लागवड मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. नागवा बीच जाण्यासाठी अलिबाग मार्गे पनवेल ते पेन ३०  किलोमीटर पर्यंत अंतर पार करावे लागते.

अलिबाग कुलाबा किल्ला

 कुलाबा किल्ला महाराष्ट्रातील एक प्राचीन किल्ला आहे. तुम्हाला जायला आवडेल अस अलिबाग मधील एक ठिकाण म्हणजे कुलाबा किल्ला. हा किल्ला अलिबागच्या किनाऱ्यापासून १ ते २ किलोमीटर एवढे अंतरावर आहे. या किल्ल्यावर आपल्याला गणपती मंदिर, हनुमान मंदिर, शिव मंदिर, गोड्या पाण्याचे विहीर, दारुगोळा ठेवण्याचे ठिकाण इत्यादी ठिकाणी पाहायला मिळतील.

अलिबाग बीच

 अलिबाग बीच

 हा बीच अलिबाग मधील सर्वात प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. जर तुम्हाला बीच एक्सप्लोर करायला आवडत असेल, तर अलिबाग बीच उत्तम पर्यटन स्थळ आहे. या बीचची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, आपण या ठिकाणी येऊन कुलाबा किल्लाचा आनंदही घेऊ शकतो. तसेच सूर्यास्ताच्या वेळेस भव्य असा नजारा तुम्हाला येथे पाहायला मिळेल.

अलिबाग मध्ये करण्यासारख्या गोष्टी

उंट स्वारी /घोडा स्वारी

अलिबाग बीच, अक्षीय बीच, वर्सोली बीच, नायगाव बीच, मुरुड बीच व अलिबाग जवळील विविध बीच वर तुम्ही उंट स्वारी किंवा घोडा स्वारी करू शकता. या स्वारी मध्ये समुद्राच्या आजूबाजूचा परिसर, पर्वतांचे तसेच किल्ल्यांचे अविस्मयकारक दृश्य तुम्ही एक्सप्लोर करू शकता.

कीहिम बीचवर पक्षी निरीक्षण

किहीम बीचवर विविध प्रकारच्या विदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजातींचे तुम्ही निरीक्षण करू शकता. हा समुद्रकिनारा स्थलांतरित पक्ष्यांना हंगामाच्या काळात स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी ओळखला जातो. अलिबाग हे पक्षीप्रेमींसाठी एक उत्कृष्ट स्थळ आहे.

अलिबाग जवळील वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज

अलिबाग जवळ विविध समुद्रकिनारी लाभलेले आहेत. ज्यामध्ये मांडवा बीच, नागाव बीच, अलिबाग बीच इत्यादी यामुळे या ठिकाणी वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीजसाठी पर्यटकांचे आकर्षण हे जास्त असते. बरेच पर्यटक या ठिकाणी मनसोक्तपणे वॉटरस्पोर्ट ऍक्टिव्हिटीज करून त्यांच्या सुट्टीचा दिवस आनंदाने घालवतात.पेरासिलिंग, जेट्स स्किंग आणि बनाना राईड यांसारखे ऍक्टिव्हिटीज तज्ञांद्वारे नवशिक्षित लोकांना शिकवले जातात.

जेट्स स्किइंग

जेट्स स्किइंग साठी वयोमर्यादा नाही. हा सर्व वयोगटातील लोकांसाठी योग्य पर्याय आहे. ही एक मजेदार वॉटरस्पोर्ट ऍक्टिव्हिटीज असून, लहान लाटांवर ही वॉटरस्पोर्ट ऍक्टिव्हिटीज केली जाते.

स्थान – अलिबाग बीच

पॅरासीलिंग

पॅरासीलिंग अर्थात समुद्राच्या निळ्याभोर लाटा ओलांडून पॅराशुट वर प्रवास करणे, यामध्ये हवेत उंच लटकवले जाते व रायडरला संपूर्ण समुद्रकिनाऱ्याचा परिसर व सभोवतालच्या विहंगम दृश्याचा नजारा दाखविला जातो.

स्थान – मांडवा बीच

बनाना बोट राईड

मित्र परिवारांसोबत किंवा फॅमिलीसोबत बनाना बोट राईड एक अत्यंत मजेदार वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज आहे. ही बोट बनानाच्या आकाराची असून समुद्राच्या लाटा ओलांडत या राईडचा तुम्ही आनंद घेऊ शकता.

स्थान – मांडवा बीच

कॅम्पिंग

अलिबाग जवळील समुद्रकिनाऱ्यांवरील कॅम्पिंग, पर्यटन प्रेमींसाठी एक उत्तम पर्याय आहे. या ठिकाणी कॅम्पिंग करून रात्रीचा समुद्राचा नजारा व आकाश निरीक्षण त्यामध्ये असणाऱ्या चमचम करणाऱ्या चांदण्यांचा अविस्मरणीय अनुभव मनाला एक वेगळेच समाधान देऊन जाते. त्यामुळे तुम्ही अलिबागला भेट दिला तर समुद्रकिनाऱ्यावरील कॅम्पिंग वॉटरस्पोर्ट ऍक्टिव्हिटीज यांचा अनुभव नक्कीच घ्या.

अलिबाग जवळील प्रसिद्ध बीच

रेवदंडा बीच

रेवदंडा बीच समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ व वेगळा आहे. रेवदंडा किल्ल्याजवळ हा समुद्रकिनारा आहे. रेवदंडा बीच हे ऐतिहासिक बंदर आहे.हा एक अत्यंत व्यवस्थित आणि सुंदर समुद्रकिनारा आहे. या ठिकाणी असणारी घरे आणि खाजगी निवासस्थानामुळे येथे फार कमी गर्दी असते. रेवदंडा बीच भेट देण्यासाठी एक उत्तम स्थळ आहे. त्याचबरोबर अलिबागच्या किनारपट्टीवरील इतर कोणत्याही गावापेक्षा या ठिकाणी कोळी मच्छीमारांची संख्या जास्त आहे. हे एक मासेमारी केंद्र आहे. अलिबागच्या उत्तरेला साधारणतः किलोमीटर इतके अंतरावर हा रेवदंडा समुद्रकिनारा आहे.

 रेवस बीच

अलिबाग मधील सर्वात सुंदर आणि आकर्षक समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. जो शांत वातावरणासाठी ओळखला जातो. हा एक लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. अलिबाग पासून रेवस बीच साधारणता २२ किलोमीटर इतके अंतरावर आहे.

कोरलाही बीच

 कोरलाई बीच हा एक ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि नैसर्गिक रित्या संपन्न असलेल्या समुद्रकिनारा आहे. हा बीच कोरला या गावाच्या जवळ आहे. पांढरे आणि गडद वाळूचा अनोखा मिलाप असलेला हा किनारा खूपच सुंदर आहे. या बीच पासून जवळच कोरलाही हा किल्ला आहे. जो समुद्राच्या आत आहे. या किल्ल्याला एक पुल जोडलेला आहे. ज्याचा वापर करून पर्यटक या किल्ल्यावर पोहोचू शकतात. त्याचबरोबर या बीचवर आपल्याला विलक्षण नैसर्गिक सौंदर्य आणि सूर्याच्या वेळेस चित्र पाहायला मिळतील. अलिबाग पासून हा बीच २३ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

अक्षीय बीच

अक्षीय बीच अलिबाग मधील अक्षीय गावात आहे. जो एक शांत बीच म्हणून प्रसिद्ध आहे. पसरलेली सुरुची झाडे आणि पांढरी शुभ्र वाळूचे मिश्रण हे या समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यात आकर्षण वाढवते. एकांत आणि शांततेत रमून जायचे असेल तर एक आदर्श ठिकाण आहे. त्याचबरोबर या समुद्रकिनाऱ्यावर विविध प्रकारचे पक्षी देखील पाहायला मिळतात. अलिबाग पासून अक्षय बीच हा समुद्रकिनारा ६ किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. त्यामुळे या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

 मांडवा बीच

 मांडवा बीच अलिबाग मधील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय बीच म्हणून ओळखला जातो. हा समुद्रकिनारा मुंबई शहरातील एक लोकप्रिय क्रिकेट बीच डेस्टिनेशन म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर मांडवा हे ठिकाण चर्च, बौद्ध लेणी, मंदिरे आणि पोर्तुगीजांच्या अनेक अवशेषांसाठी ओळखले जाते. मांडवा समुद्रकिनाऱ्यापर्यंत जाण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी पर्यंत नियमित फेरी असते.

वर्सोली बीच

 वर्सोली बीच अलिबाग जवळील वर्सोली गावात वसलेला एक सुंदर समुद्रकिनारा आहे. हा बीच महाराष्ट्रातील लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. साधारणतः २ किलोमीटर अंतराचा असणाऱ्या या बीच वर पांढरी वाळू आणि स्वच्छ पाण्याचा आनंद घेण्यासाठी, बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात.

मुख्य शहर ते अलिबाग अंतर व लागणारा कालावधी

मुंबई ते अलिबाग अंतर

मुंबई ते अलिबाग हे अंतर साधारणतः ९८ किलोमीटर इतके असून, प्रवासासाठी लागणारा कालावधी हा २ तास ३४ मिनिटे आहे.

पुणे ते अलिबाग अंतर

पुणे ते अलिबाग हे अंतर अंदाजे १४४ किलोमीटर इतके असून, प्रवासासाठी साधारणतः ३ तास ३४ मिनिटे लागू शकतात.

फिरण्यासाठी कालावधी

अलिबाग व त्या ठिकाणील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी तुम्हाला एक ते दोन दिवस लागू शकतात.

अलिबागला कसे जाल ?

अलिबागला जाण्यासाठी तुम्ही रेल्वेने, बोटने बसने, कारने जाऊ शकता.

बोटीने  – गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणहून फेरी  उपलब्ध आहे. गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग हा बोटीने प्रवास साधारणतः २ तासाचा आहे. पावसाळ्यामध्ये म्हणजेच जून ते ऑक्टोंबरच्या दरम्यान ही सेवा बंद असते. फेरी तुम्हाला रेवसला या बीचला घेऊन जाते. व इथून तुम्ही बसने अलिबागला जाऊ शकता.

बस सेवा – मुंबई पुणे या मुख्य शहरांपासून अलिबागला जाण्यासाठी बस सेवा सुद्धा उपलब्ध आहेत. मुंबई सेंट्रल बस स्थानकांपासून दर ३० मिनिटांनी म्हणजेच अर्ध्या तासाने एक बस ही अलिबागसाठी असते. या बसच्या माध्यमातून किंवा खाजगी बसच्या माध्यमातून तुम्ही अलिबागला भेट देऊ शकता.

वैयक्तिक गाडी किंवा कार – मित्रहो तुम्ही तुमच्या कारने किंवा वैयक्तिक गाडीने मुंबई ते अलिबाग हा प्रवास करू शकता.

रेल्वे सेवा – अलिबाग ठिकाणी रेल्वे स्थानक उपलब्ध नाही. परंतु पेण हे अलिबाग पासून साधारणतः ३० किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. पेण हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. पेण या रेल्वे स्टेशनवर उतरून तिथून बसने किंवा ऑटो, कॅब बुक करून तुम्ही अलिबाग एक्सप्लोर करू शकता.

अलिबागचे हवामान

  • उन्हाळा – उन्हाळ्यामध्ये हवामान उष्ण व दमट असते.
  • हिवाळा – हिवाळ्यामध्ये हवामान हे थंड आल्हादायक व शांत असते.
  • पावसाळा – पावसाळ्याच्या काळात हवामान हे विलोभनीय, थंड व हिरवेगार असते.

अलिबाग मधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ

  • अलिबाग मध्ये भरपूर प्रमाणात नारळाची झाड असल्यामुळे, नारळाचे दूध, मसाले, सी फूड यामध्ये मच्छी, खेकडे, कोलमी, शिंपल्या इत्यादींचा समावेश होतो.
  • अलिबाग मधील वडापाव, मिसळपाव, पावभाजी, यांसारखे स्ट्रीट फूड देखील तितकेच लोकप्रिय आहे.

अलिबाग या प्रेक्षणीय स्थळाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम कालावधी

अलिबाग बीच ला भेट देण्यासाठी तुम्ही सर्व ऋतूंमध्ये जाऊ शकता. परंतु अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यांचा अलिबागच्या प्रेक्षणीय स्थळांचा, हिरव्यागार नजारांचा, धबधब्यांचा आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर, पावसाळ्यानंतरचा कालावधी हा सर्वोत्तम आहे. म्हणजेच साधारणतः तुम्ही सप्टेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान अलिबागला भेट देऊ शकता.

अलिबाग मध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषा

  • मराठी
  • आगरी
  • हिंदी
  • इंग्रजी

अलिबाग मध्ये राहण्याची व खाण्याची सुविधा

अलिबाग मध्ये तुम्हाला उत्तम प्रकारचे सी-फूड उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे तुमच्या बजेटनुसार तुम्हाला रूम्स देखील उपलब्ध होतात. अलिबाग या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बजेटनुसार योग्य ते रूम्स,कॉटेजेस, बीच रिसॉर्ट इत्यादी. उत्तम प्रकारे राहण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यापैकी खालील काही रिसॉर्ट हॉटेल्स आहेत.

वेव्हज रेस्टॉरंट

अलिबाग मध्ये असणारे वेव्हज रेस्टॉरंट हे एक प्रसिद्ध रेस्टॉरंट असून, या ठिकाणी तुम्हाला सी फूडचा आनंद घेता येईल. त्याचप्रमाणे तुम्हाला वातानुकूलित रूम, विनामूल्य वायफाय, विनामूल्य पार्किंग एरिया इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध आहेत.

शालिमार सी-फूड रेस्टॉरंट

अलिबाग मधील हे रेस्टॉरंट अतिशय प्रसिद्ध असून सी-फूड साठी त्याची खास ओळख आहे. या ठिकाणी तुम्हाला कोलंबी फ्राय, बांगडा फ्राय, सुरमई फ्राय, शिंपल्या, खेकडे इत्यादी. सी-फुड चा आनंद घेता येईल. त्याचबरोबर तुमच्या बजेटनुसार तुम्हाला सुंदर रूम देखील उपलब्ध आहेत. ज्यामध्ये तुम्हाला विनामूल्य वायफाय, विनामूल्य पार्किंग एरिया, नाश्ता इत्यादींची सोयी सुविधा आहे.

सुरुची रेस्टॉरंट

अलिबाग जवळील सुरुची रेस्टॉरंट हे देखील एक बजेट फ्रेंडली रेस्टॉरंट आहे. यामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे तुम्ही खाद्यपदार्थांचा आनंद देखील इथे घेऊ शकता.

अलिबाग बीच वॉक

हे हॉटेल अलिबाग मध्ये असून सी-फूड साठी प्रसिद्ध हॉटेल आहे. या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारच्या सी-फूड थाळी चाखता येईल.

हॉटेल गणेश भोजनालय

या भोजनालयामध्ये तुम्हाला सी-फूड पासून ते शाहाकारी जेवणापर्यंत जेवणाची सुविधा उपलब्ध आहे.

FAQ

अलिबाग हे शहर पुण्यापासून किती किलोमीटर अंतरावर आहे? व त्यासाठी किती कालावधी लागतो?

पुणे ते अलिबाग हे अंतर अंदाजे १४४ किलोमीटर इतके असून, प्रवासासाठी साधारणतः ३ तास ३४ मिनिटे लागू शकतात.

अलिबाग मध्ये कोणते समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत?

अलिबाग मध्ये रेवदंडा, रेवस, कोरलाई, अक्षी, मांडवा बीच,वर्सोली बीच बीच यासारखे समुद्रकिनारे प्रसिद्ध आहेत.

मुंबई ते अलिबाग हे अंतर किती आहे ? व त्यासाठी किती कालावधी लागतो?

मुंबई ते अलिबाग हे अंतर साधारणतः ९८ किलोमीटर इतके असून, प्रवासासाठी लागणारा कालावधी हा २ तास ३४ मिनिटे आहे.

अलिबाग हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे?

अलिबाग हे शहर रायगड जिल्ह्यात आहे.

अलिबाग एक्सप्लोर करण्यासाठी किती दिवस/कालावधी लागतो ?
कालावधी / दिवस –

अलिबाग व त्या ठिकाणील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी तुम्हाला एक ते दोन दिवस लागू शकतात,

अलिबाग या शहराला अलिबाग हे नाव कसे पडले ?

अलिबाग मधील कित्येक उद्याने एज्रालील व्यक्तीने विकसित केली होती.त्या एज्रालील व्यक्तीचे नाव अली होते. त्यामुळेच या शहराला अलिबाग म्हणून ओळखले जाते.

अलिबाग का प्रसिद्ध आहे?

अलिबाग हे एक सुंदर व पिकनिक स्पॉट म्हणून लोकप्रिय असलेले शहर आहे. सुट्टीच्या नियोजनासाठी पर्यटनप्रेमी अलिबाग समुद्रकिनारा हे लोकप्रिय स्थळ निवडतात. या ठिकाणी समुद्रकिनारी हे अतिशय स्वच्छ नीटनेटके व फिरण्यासाठी उत्तम असे ठिकाण आहे. समुद्रकिनाऱ्याच्या आजूबाजूला असणारी नारळाची झाडे व पांढरीशुभ्र वाळू समुद्राचे सौंदर्य अजून खुलवते. फेसाळ लाटा, थंड वारे, स्वच्छ निळे आकाश व निळेशार पाणी या सगळ्यांचे एकत्रीकरण म्हणजे अलिबाग बीच आणि तेथील प्रेक्षणीय स्थळ.

अलिबाग या प्रेक्षणीय स्थळे तुम्ही बोटीने कसे जाल ?

गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणहून फेरी  उपलब्ध आहे. गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग हा बोटीने प्रवास साधारणतः २ तासाचा आहे. पावसाळ्यामध्ये म्हणजेच जून ते ऑक्टोंबरच्या दरम्यान ही सेवा बंद असते. फेरी तुम्हाला रेवसला या बीचला घेऊन जाते. व इथून तुम्ही बसने अलिबागला जाऊ शकता.

निष्कर्ष

आजच्या आमच्या अलिबाग या लेखातून आम्ही आपणास अलिबाग मधील प्रेक्षणीय स्थळे, तेथील समुद्रकिनारे, जलक्रीडा इत्यादींची माहिती दिली आहे.

हा लेख माहिती तुम्ही नक्की वाचा. व कसा वाटला हे कमेंट करून आम्हास नक्की कळवा.

धन्यवाद.

Leave a comment