एलोरा – वेरूळ लेणी संपूर्ण माहिती मराठी | Ellora Caves Information In Marathi Language

Ellora Caves Information In Marathi Language | एलोरा – वेरूळ लेणी संपूर्ण माहिती मराठी – महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद, म्हणजे आताच्या संभाजीनगर या मुख्य शहरापासून साधारणतः ३० किलोमीटर अंतरावर वेरूळ हे एक छोटे खेडेगाव आहे. या गावातील वेरूळची लेणी संपूर्ण जगप्रसिद्ध आहेत. या लेण्यांमध्ये बारा बौद्ध, सतरा हिंदू आणि पाच जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले घराण्याचे गाव वेरूळ होते.

Table of Contents

एलोरा – वेरूळ लेणी संपूर्ण माहिती मराठी | Ellora Caves Information In Marathi Language

प्रस्तावना

वेरूळची ही लेणी साधारणतः इसवी सनाच्या पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरण्यात आली असून, वेरूळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी व जैन लेणी अशी विभागणी केली जाते. काही इतिहासकारांच्या मते हैदराबादच्या निजाम राजवटीकडे या लेण्यांची मालकी जाईपर्यंत, इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली असे सांगितले जाते.

वेरूळ लेणी माहिती

नाव –एलोरा गुफा / वेरूळ लेणी
जिल्हा – औरंगाबाद (संभाजीनगर)
राज्य – महाराष्ट्र
निर्माता –राष्ट्रकूट घराण्यातील राजवंश नरेश कृष्णा
बांधकाम – सहाव्या ते आठव्या शतकामध्ये
क्षेत्रफळ – २७६ फुट लांब १५४ फूट रुंद
लेणी –हिंदू, जैन, बौद्ध
मंदिर – कैलास मंदिर
अंतर – संभाजीनगर शहरापासून ३० किलोमीटर

वेरूळ लेणी स्थान – नकाशा

वेरूळ लेणी इतिहास (History Of Ellora Caves)

संभाजीनगर शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर वेरूळ गावात असणारी ही वेरूळची लेणी जगप्रसिद्ध आहेत. सातमाळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात पाचव्या ते दहाव्या दशकाच्या कालखंडात एकूण ३४ लेण्या कोरल्या गेल्या. यामध्ये बारा बौद्ध लेण्या, सतरा हिंदू लेण्या तर पाच जैन लेण्या आहेत. १९५१ साली भारत सरकारने या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले होते. युनेस्कोनी १९८३ मध्ये वेरूळ लेण्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला.

यानंतर भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे ही लेणी सोपविण्यात आली. येथे असणारे कैलास मंदिर हे २७६ फूट लांब तर १५४ फूट रुंद, जवळपास ९० फूट उंच असून हे संपूर्ण एका खडकामध्ये बांधले गेले आहे. साधारणपणे पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात राष्ट्रकूट राजा नरेश कृष्णा याच्या काळात कैलास मंदिराची निर्मिती झाली.

एलोरा येथील लेणी डोंगर पायथ्यातील दगड कापून निर्माण केलेल्या भारतीय शिल्पकलेचे अद्वितीय आणि बहुमूल्य असे उदाहरण आहे. विविध रंग, रूप, छटा निर्माण करणाऱ्या मूर्तींचा अविष्कार येथे घडवण्यात आला आहे. ज्याची सुरुवात बौद्ध कलेने होऊन, ब्राह्मणी कलेचे सिद्धांत दर्शवून, जैन श्रद्धेने समाप्त झालेले आहे. या चांगल्या कारणांमुळे या शिल्पकलेला प्राचीन भारतीय स्मारक कलेचा अपूर्व ठेवा असे नाव मिळाले.

एलोरा नावाचा अर्थ (Meaning Of Ellora)

वेरूळच्या लेण्यांमध्ये लेणी क्रमांक २९ म्हणजेच सीता की नहानी या लेणीच्या बाजूने एक मोठा धबधबा पावसाळ्यात पडतो. तोच एलगंगा नदीचा उगम. ही नदी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग देवालयाच्या जवळून वाहते. ते तिच्या काठचे नगर ते एलापुर – येलापूर – येल्लोर – एलोरा – येळूर – वेरूळ असे हे नाव बदलत गेले.

तेथील स्थानिक लोक अजूनही या ठिकाणाला एलोरा असेच म्हणतात. या नावाचा प्रथम उल्लेख राष्ट्रकूट राजवंशाच्या गुजरात शाखेतील राजा कर्क सुवर्ण वर्ष याच्या बडोदा ताम्रपटात येतो. तसेच महानुभव पंथीयांच्या लीळाचरित्र या ग्रंथातही या गावाचे नाव एलापूर असेच येते.

Ellora Caves Information In Marathi Language

एलोरा येथील बौद्ध लेणी

गौतम बुद्धांनी आपल्या अनुयायांना देवासारखी आपली पूजा करण्यासाठी मनाई जरी केली असली तरी बुद्धांसोबत असलेल्या जागा व वस्तूना मानाचा मुजरा करण्यास अनुयायांना ते रोखू शकले नाहीत. बुद्धांनी आपल्या पाठीमागे आपला वारसा ठेवला नाही. आणि ही पोकळी भरून काढणे कठीण होते.

बुद्धांची स्मृतिचिन्हे, नखे, केस, अस्थि जसे पवित्र मानले गेले, तसेच त्यांच्या नित्य वापरातील वस्तू जसे त्यांचा भिक्षुकी कटोरा, त्यांच्या अंगावरील झगा, आदी पवित्र मानले गेले. सुरुवातीला बुद्धांचे मानवी रूपातिल सादरीकरण, हे नंतर महानुभाव पंथाला प्रभुत्व प्राप्त झाल्यावरच केले होते.

वेरूळ लेण्यांमध्ये एकूण बारा बौद्ध लेणी आपल्यास पहावयास मिळतात.

भंडारदरा पर्यटन संपूर्ण माहिती मराठी

लेणी क्रमांक ०१

ही बुद्धकालीन कोरीव लेणी आहेत. यामध्ये आठ भाग आढळून येतात. ज्यात बुद्ध भिक्षुक राहत होते. यात कोणत्याही देवी देवतांची आकृती कोरलेली नाही.

लेणी क्रमांक ०२

ही लेणी भरपूर कलात्मक असून यात बुद्ध आणि बोधिसत्वाच्या आकृत्या दर्शविलेल्या आहेत. यामध्ये दोन द्वारपाल लेणीच्या मुख्य भिंतीजवळ आहेत. यातील प्रत्येक शिल्पे अपूर्ण अवस्थेत आहेत. यावरूनच कळते की हे दगडावरील आकृत्या खोदण्याचे काम कसे सुरु केले जात होते आणि कसे पूर्ण केले जात होते.

लेणी क्रमांक ०३ आणि ०४

या लेण्या लेणी क्रमांक दोन याच्याच प्रमाणे आढळून येतात. याच्या समोरील मुख्य भाग उध्वस्त झालेला आहे.

लेणी क्रमांक ०५

या लेणीस महानवाडा आणि फेरा वाडा लेण्या असे म्हणतात. याचे क्षेत्रफळ २७× २८ मीटर आहे. महाराष्ट्रातील ही सर्वात विशाल विहार लेणी आहे. याच्या आकारावरूनच समजते की भिक्षू यास शिक्षण कक्ष किंवा भोजन कक्ष म्हणून याचा उपयोग करीत असावेत. अगदी आत गेल्यावर एक मंदिर लागते. त्यात बुद्धाची धम्मचक्र मुद्रेत एक मूर्ती आहे व अवलोकेश्वर दोरा धरून झोका देत आहे. बौद्ध भिक्षू ना राहण्यासाठी येथे छोट्या छोट्या खोल्या कोरल्या आहेत.

लेणी क्रमांक ०६

या लेणीमध्ये एक विहार आहे. याचा समोरचा भाग पूर्णपणे पडून गेला आहे. आतील कक्षात दोन सुंदर स्त्री मूर्ती आहेत. डाव्या हाताच्या स्त्रीमुर्तीने एका देठासकट कमळ हाती घेतले आहे. तिच्या मुकुटात स्तूप आहे. ती तारादेवीची मूर्ती आहे. उजवीकडची स्त्री मूर्ती कमलावर उभी आहे. तिचा उजवा हात भग्न आहे. डाव्या हातात काही वस्तू आहे. तिच्या डाव्या हाताला मोर आहे आणि एक अभ्यासक लाकडी होडीवर पोथी ठेवून वाचतो आहे.

पानावरचे वजन म्हणून आडवी पट्टी आहे. पान उलटलेली दिसते आहे. ती विद्येची देवता महामयूरी आहे. म्हणूनच इतर विहारांपेक्षा हा वेगळा आहे. याशिवाय बोधिसत्वाच्या तारा अवलोकेश्वर आणि धनदेवता जामकला यांच्या आकृत्या या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आहेत. तसेच गंगा आणि यमुना सुद्धा आहेत.

लेणी क्रमांक ०७ व ०८

या लेण्या अपूर्ण असून यात विशेष असे काहीच आढळून येत नाही.

लेणी क्रमांक ०९

या लेणीचा समोरील भाग अतिशय सुंदर पद्धतीने सजवला आहे. समोरील भागावर ताराची आकृती आहे. जिच्या सोबत भीती निर्माण करणारे साप, तलवार, हत्ती आणि अग्नी एवढेच ओळखले जाते. या लेणीकडे जाण्यासाठी लेणी क्रमांक सहाच्या उत्तरेकडील भिंतीपासून एक रस्ता आहे.

लेणी क्रमांक १०

या लेणीला विश्वकर्मा लेणी असे म्हटले जाते. या लेणीमध्ये आपल्याला सर्वत्र लाकडी कामाचे अनुकरण दिसते. वेरूळच्या बौद्ध लेणी समूहातील हे एकमेव चैत्य लेणी आणि महाराष्ट्रातील सर्वात सुंदर चैत्य लेणी आहे. लेणीच्या अंगणात उभे राहिले की दर्शनी भाग भिंतीत समोर सुंदर खिडकी दिसते. या खिडकीतून मंद प्रकाश आतील स्तुपावर पडतो. म्हणून हे चैत्य गवाक्ष.

या गवाक्षाभोवती सुंदर नक्षी आहे. बाजूने गंधर्व आकाशातून उडत चैत्य गवाक्षाकडे येताना दाखविले आहेत. खाली तीन दरवाजे आहेत. मधला मोठा दरवाजा, सभागृहाचा दोन्ही बाजूने दोन प्रदक्षिणापथाचे. मधल्या दरवाजाने आपण सभागृहात येतो. सभागृह लंब चौकोनी आहे, पण या लंब चौकोनाची मागची बाजू अर्धवर्तुळाकार आहे. या अर्धवर्तुळाकाराच्या केंद्रस्थानी आहे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाचे प्रतीक.

खाली ओटा वर शोध अशी स्तूपाची रचना असते. स्तूपाच्या दर्शनी भागावर तथागत गौतम बुद्धांची भव्य मूर्ती सिंहासना रूढ आहे. दोन्ही बाजूंना बोधिसत्व पद्मपाणी आणि बोधिसत्व वज्रपाणी यांची शिल्पे आहेत. कमानीवर गंधर्व, विद्याधर आधी देवता आहेत. तथागत दोन्ही पाय खाली सोडून बसले आहेत. दोन्ही हातांच्या बोटांनी मोजता येतील असे एक आर्य सत्य स्पष्ट करीत आहे. याला म्हणतात धर्मचक्र परिवर्तन मुद्रा. खांबाची एक रांग लेणी भर फिरते. लेणीचे दोन भाग पडतात.

मधल्या सभागृह बाजूचा चिंचोळा प्रदक्षिणा पथ, समोरचा मधला मोठा दरवाजा बंद करावा आणि उपासकांच्या सोयीसाठी प्रदक्षिणा पथाचे छोटे दरवाजे उघडे ठेवावे. त्यांना प्रदक्षिणा घालण्यासाठी उजेडाची सोय होते. पण मुख्य सभागृहात शितल अंधार असतो. केवळ चैत्यगावाक्षातून येणाऱ्या मंद प्रकाशाने भगवान बुद्धांचे मुखमंडल प्रकाशमान झालेले असते.

लेणी क्रमांक ११

ही विहार लेणी आहेत. पूर्वी त्याला दोन ताल म्हणत. कारण वरचे दोन मजले उघडे होते. तळमजला मातीने दबला होता तो आता मोकळा झाला आहे. महानुभव साहित्यामध्ये याला धाकटा राजविहार असे म्हटले जाते. हा तीन मजली विहार आहे. समोरून हा विहार अगदी आजच्या वस्तीगृहासारखा दिसतो. समोर प्रशस्त अंगण आहे. ही लेणी बौद्ध धर्मातील वज्रयांनी पंथाची आहे.

खालच्या मजल्यावर भगवान बुद्ध आणि बोधिसत्व पद्मपाणी आणि बोधिसत्व वज्रपाणी यांच्या मूर्ती आहेत. डाव्या बाजूला वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. वरच्या मजल्यावर भगवान बुद्धांच्या भूमी, स्पर्श, मुद्रा आणि ध्यानमुद्रेतील मूर्ती आहेत. अक्षरात कुबेराची ही अतिशय सुंदर मूर्ती आहे. तो मानवावर अरुण आहे. हाती द्रव्याची थैली आहे. तिसऱ्या मजल्यावरही काही वज्रयांनी बौद्ध मूर्ती आहेत.

लेणी क्रमांक १२

हा तीन मजली विहार आहे. महानुभव साहित्यात त्याला थोरला राजविहार म्हटले आहे. याच्यासमोर मोठे अंगण आहे. तळमजला हा २४ प्रशस्त खांबांवर आधारलेला आहे. येथे भिक्षूच्या निवासासाठी बारा छोट्या खोल्या आहेत. त्यात दगडातच पलंगही कोरले आहेत. भगवान बुद्ध आणि काही वज्रियांनी देवता यांचीही शिल्पे आढळून येतात. वरचा मजला आठ स्तंभांवर आधारित आहे.

त्यात वज्रयांनी बौद्ध संप्रदायाच्या मूर्ती आहे. या मजल्याचे वैशिष्ट्य असे आहे की, येथे सात मनुशी बुद्ध आणि साध्या आणि बुद्ध यांच्या मूर्ती आहेत. याच मजल्यावर महानुभव पंथ प्रवर्तक श्री चक्रधर प्रभू राहिले होते. या मजल्यावर प्रवेश करताच समोर एक पलंगासारखा कोरलेला ओटा दिसतो. त्यावर श्री चक्रधर प्रभू यांचे स्थान महानुभव पंथीय उपासकांना परमपवित्र आहे.

एलोरा येथील हिंदू लेणी

वेरूळ येथील लेण्यांमध्ये शिवाचे अस्तित्व आपल्याला आढळून येते . नटराज ब्रम्हांडात नृत्य करणारा, तसेच शिक्षक भरीव देणगी देणारा व श्रेष्ठ योगी शिव हा साधारणपणे लिंगरूपात आकारण्यात आलेला आहे. मार्कंडेय हा शिवभक्त शिवाची पूजा करीत असताना मृत्यू देवाने त्याच्या मागणीचा प्रयत्न केला होता. गजासूर संहार मूर्ती व कालारी मूर्ती या दक्षिण भागातील देवालयात सर्व साधारणपणे आहेत. आणि याच मूर्ती वेरूळ येथील नाटकीय रीतीने कोरलेल्या आहेत.

दौलताबाद, देवगिरी किल्ला माहिती मराठी

लेणी क्रमांक १३

ही हिंदू लेणी असून यामध्ये विशेष असे काहीच नाही. म्हणजे या लेणीचा उपयोग धर्मशाळा किंवा विश्रामगृहाच्या रुपाने होत असावा असे दिसून येते. काही इतिहासकारांच्या मते येथे कारागीर आपली अवजारे ठेवत असावेत असे आढळून येते.

लेणी क्रमांक १४

ही लेणी एक मजली आहे. त्याला रावणाची खाई अथवा जाळांधराची लेणी असे म्हणतात. महानुभव साहित्यात त्याला छाया पुरुषांची लेणी असे म्हटले जाते. सभागृह बारा भव्य खांबांवर आधारलेले आहे. यात हिंदू देवी देवतांची अतिशय मनोरम शिल्पे आहेत. डाव्या बाजूने महिषासुरमर्दिनी, गजलक्ष्मी, विष्णूचा वराह अवतार, विष्णू, श्रीदेवी आणि भूदेवीसह विष्णू लक्ष्मी सह ही शिल्पे आहेत.

उजव्या बाजूने पुन्हा महिषासुरमर्दिनी, शिवपार्वती सारीपाट खेळताना, शिवतांडव आणि रावण कैलास पर्वत हलविताना आणि अंधकारसूर वध ही शिल्पे कोरलेली आहेत. लेणीच्या उजव्या बाजूला अवधू टोकाला वीरभद्र आणि सप्तमातृका आणि गणपती यांच्या प्रमाणबद्ध मुर्ती आहेत. शेजारच्या भिंतीवर काल आणि काली आहेत. श्री चक्रधर स्वामी या लेणीत राहिले होते आणि आपले अनेक छाया पुरुष दाखविला होते याचे संदर्भ आढळतात.

लेणी क्रमांक १५

ही लेणी दोन मजली आहेत. या लेणीस दशावतार किंवा धुमेश्वराचे लेणे असे म्हणतात.पहिल्या मजल्यावर एक मोठा दालन आहे. जवळजवळ ४५ पायऱ्यावर चढून जावे लागते. आणि दुसऱ्या मजल्यावर हिंदू देवी देवतांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. शिवपार्वतीच्या विवाह प्रसंगाचे दृश्य आहे. शिवाने पार्वतीचा हात हातात घेतला आहे.

ब्रह्मदेव लग्नाचा होम करीत आहेत. आकाशातून दिकपाल आपापल्या वाहनांवर आरूढ होऊन हा दिव्य विवाह सोहळा पाहण्यासाठी आले आहेत.त्यानंतर शिव यमा पासून मार्कंड याची रक्षा करताना दाखवलेली आहे. मुख्य भागात शिवलिंग, श्री गणेश, गजलक्ष्मी आणि शिवाचे दुसरे पुत्र कार्तिकेय आणि मोराची आकृती आहे.

लेणी क्रमांक १६

या लेणीतील आकृत्या शिवा आणि विष्णु पुराणानुसार रामायण आणि महाभारतातील कथा दर्शवतात. या लेणीमध्ये विष्णू वराह अवतारामध्ये आढळून येतात.

लेणी क्रमांक १७

या लेणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर ब्रह्म आणि विष्णू च्या मूर्ती आढळून येतात. आतील भागाची व लिंग व द्वारपाल दिसून येतो. दालनाच्या बाहेरील स्तंभावर श्री गणेश, दुर्गा यांच्या कोरीव आकृत्या आहेत.

लेणी क्रमांक १८ व १९

या लेण्यांमध्ये फक्त शिवलिंग आढळून येतात.

लेणी क्रमांक २०

यामध्ये फारशी शिल्पे नाहीत.

लेणी क्रमांक २१

या लेणीचे नाव रामेश्वर असे आहे. या लेणीमध्ये गंगा नदीची मानवी आकृती आहे जी मगरीवर स्वार झालेली आहे. गंगा देवीच्या आकृतीचे कोरीव कामे उत्कृष्ट आहे. तिचा आकर्षक शरीर व मुख मंडळावरील हास्य त्या काळातील शिल्पकलेचा एक अद्भुत नमुना आहे. उजव्या भागात भगवान शिवाचे मोठे मंदिर भूतकातील यमुना नदीच्या बरोबर दर्शवण्यात आले आहे. दुसऱ्या भागात ब्रम्हा आपली कन्या पार्वती आणि भगवान शिवाच्या बरोबर दर्शवले आहेत.

मध्यभागी शिवपार्वती विहाराचे दृश्य आहे. शंकराने पार्वतीचा हात आपल्या हातात घेतला आहे. ब्रह्मा पूर्वीचे कार्य करीत आहे. समोरील भिंतीच्या पायथ्याशी हत्तीची एक रांग दर्शवली आहे. आणि या शंकराचे अनुयायी नृत्य करत आहेत. दालनात देवी देवतांचे कोरीव चित्रे आहेत. जे भगवान शंकर-पार्वती आणि भगवान विष्णूच्या संबंधित आहेत.

लेणी क्रमांक २२

या लेणीला निळकंठ असे नाव आहे. येथे देवी देवतांच्या आकृत्या असून यातील मंदिरात शिवलिंग आहे. या शिवलिंगाला निळसर झळाळी येते म्हणून त्याला निळकंठ असे म्हटले जाते. श्री गणेश आणि इतर देवी-देवतांच्या आकृत्या आहेत. दुसऱ्या बाजूस गजलक्ष्मी आणि भगवान कार्तिकेयची सुद्धा आकृती आहे.

लेणी क्रमांक २३

या लेणीमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश यांची एकत्रित मूर्ती आहे, जिला आपण त्रिमूर्ती असे म्हणतो.

लेणी क्रमांक २४

या लेणीमध्ये चार शिवमंदिर आहेत. याला “तेली का घाना “असे म्हणतात.

लेणी क्रमांक २५

या लेणीला कुंभारवाडा असे म्हणतात. ही एक विशाल लेणी आहे. यामध्ये कोरीव खांब दिसतात. धनदेवता, कुबेराची मूर्ती उजव्या बाजूस आहे. द्वारपालाच्या आकृत्या सुद्धा आहेत. तसेच पूजा स्थानावर शिवलिंग नाही. तसेच दालनाच्या छतावर सूर्यदेव, सात घोडे घेऊन रथ ओढीत आहेत. असे कोरीव दृश्य आहे. दोन्ही बाजूंनी उषा आणि प्रत्युषा हातात धनुष्यबाण घेऊन आहेत. रथ आणि घोडे फार सुंदर कोरलेले आहेत.

लेणी क्रमांक २६

या लेणीमध्ये सहा स्तंभ आणि शिवलिंग नारी द्वारपाल बरोबर आहे असे दिसून येते.

लेणी क्रमांक २७

या लेणीला “गवळणीची लेणी” असे म्हणतात. ही अगदी धबधब्याजवळ आहेत. या लेणीच्या डाव्या बाजूला डुक्कर, महिषासुरमर्दिनी, देवी, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांच्या आकृत्या आहेत. तसेच दुसऱ्या बाजूला बलराम, श्रीकृष्ण आणि महेश यांच्या आकृत्या आहेत. भगवान विष्णू नागावर विश्रांती करत आहेत, असे एका मूर्ती दर्शवले आहे.

लेणी क्रमांक २८

ही लेणी एका धबधब्याच्या खालील बाजूस आहे. त्यामुळे या लेणीस “धारातीर्थ” असे म्हणतात. या लेणीच्या आतील बाजूस शिवलिंग असून दालनात अष्टभुजा देवी दुर्गेची आकृती आहे.

लेणी क्रमांक २९

या लेणीला “सीतेची नहानी” असे म्हणतात. कैलास लेणी नंतर ही सगळ्यात मोठी लेणी आहे. या लेणीमध्ये पायऱ्यांवर दोन्ही बाजूंनी दोन सिंह आहेत. आत शिरताच डाव्या बाजूला अती भव्य शिल्पक शिवतांडवांचे तर उजव्या हाताला रावण कैलास हलवतो आहे त्या प्रसंगाचे दृश्य दिसून येते. भव्य सभागृहात डाव्या हाताला आठ भिंतीवर शिवतांडवांचे समोर लकुशिलाचे रेखाटन आहे.

सभा मंडपातून उजवीकडे बाजूने धबधब्याकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. तिथून धबधब्याचे दृश्य फार सुंदर दिसते. या धबधब्यास स्वतः राष्ट्रपती दंतिदुर्ग यांनी स्नान केले होते. या धबधब्याकडे जाताना उजवीकडच्या भिंतीवर शिवपार्वती विवाहाचे शिल्प आहे. त्याच्या समोर शिव पार्वती सारीपाट खेळत असल्याचे दृश्य आहे. सभागृहाच्या दोन्ही टोकांना गंगा यमुनांचे शिल्प आहे.

एलोरा येथील जैन लेणी

जैन संप्रदाय हा बुद्ध संप्रदाय इतका जुना आहे. जैन या शब्दाचा अर्थ आहे, ज्याने मोहावर व दुर्बलतेवर विजय मिळवला. इसवी सन सहाव्या शतकात भगवान महावीरांनी आपल्या शिकवणुकीत आपल्या तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार केला.

लेणी क्रमांक ३०

ही लेणी दोन भागात दिसून येतात. पहिल्या भागात खांब फारच सुंदर बनवलेले आहेत. एक चौकोनी खांब मध्यभागी आहेत. ज्याच्या चारही बाजूस महावीरांच्या मूर्तीचे कोरीव काम केले आहे. लेणीच्या छतावर एक सुंदर कमळाचे फुल कोरलेले आहे. दुसरा भाग जवळ जवळ कैलास लेणी सारखाच आहे. परंतु यास जैन धर्माचे देवगण आहेत.

लेणी क्रमांक ३१

या लेण्यांमध्ये महावीर पार्श्वनाथ व गोमटेश्वराच्या मूर्ती आहेत.

लेणी क्रमांक ३२

ही लेणी तीन मजली आहेत. पहिल्या मजल्यावर एक मंदिर आहे. ज्याला दोन बाजूने प्रवेशद्वार आहेत. यात महावीरांची चौमुखी मूर्ती आहे. मुख्य दालनात जैन प्रसारकांच्या आकृत्या आहेत. दुसऱ्या मजल्यावर इंद्रसभा हे नाव देण्यात आलेले आहे. या कलात्मक आकृती असून हत्तीवर मातंग देवी बसलेली आढळून येते.

एका वडाचे झाड उजव्या बाजूस असून एका सिद्धीकाची आकृती राजसिंहासनावर बसलेली असून ती आंब्याच्या झाडाखाली दर्शवली आहे. आतील पूजेच्या स्थानावर महावीरांची आकृती आहे. दालनात महावीरांच्या आणखी मुर्त्या आहेत. छतावर एक सुंदर कमळाच्या फुलाचे कोरीव काम केलेले आहे. ही लेणी पूर्णपणे चित्रांनी भरलेली होती परंतु काही ठिकाणी आता डाग पडलेले दिसून येतात.

लेणी क्रमांक ३३

ही लेणी दोन मजली आहेत. वरच्या मजल्यावर एक मोठे दालन असून आतल्या बाजूस पूजेचे स्थान आहे. ज्यात महावीर मातंगा सिद्धीच्या आकृत्या आहेत. खालच्या मजल्यावर कोरीव काम केलेले सुंदर काम आहे. ज्यावर मातंग व सिद्धीकाच्या आकृत्या आहेत. दालनामध्ये आंबे लागलेले झाड आहे. त्यावर पक्षी दर्शविलेले आहे. डाव्या बाजूस एक छोटी गुंफा आहे. ज्यात महावीर आणि अन्य तीर्थंकर यांच्या आकृत्या आहेत.

लेणी क्रमांक ३४

या लेणीमध्ये महावीर पार्श्वनाथ आणि गोमटेश्वराच्या मूर्ती आहेत.

जैन धर्मातील या लेण्या पुनर्जन्मापासून मुक्ती मिळवण्यासाठी घोर तपस्या व शुद्ध चरित्रावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण करतात असे दाखविले आहे.

वेरूळ लेणी वैशिष्ट्ये

या लेण्यांच्या बांधकामांमध्ये तसेच संरक्षणामध्ये राष्ट्रकूट चालुक्य यादव या घराण्यांचा समावेश आहे. तसेच वेरूळ येथील राष्ट्रकूट राजवटीमध्ये बांधल्या गेलेल्या हिंदू, बौद्ध आणि जैन गुंफा मंदिरांसाठी प्रसिद्ध आहेत. वेरूळ या ठिकाणातील दशावतार गुहा भगवान विष्णूच्या दहा अवतारांचे चित्रण करते. या ठिकाणी असलेले कैलास मंदिर हे आधी कळस आणि मग पाया या स्वरूपाने वास्तू स्थापत्यशास्त्राची एक उत्कृष्ट कलाकृती म्हणून समजली जाते.

एलोरा लेण्यांची रचना

वेरूळ या ठिकाणी लेण्याची रचना ही बारा बौद्ध लेणी (लेणी क्रमांक १ ते १२) सतरा हिंदू लेणी ( लेणी क्रमांक १३ ते २९) आणि पाच जैन लेणी (लेणी क्रमांक ३० ते ३४) अशी आहे. जरी या लेण्यांना तीन धर्मात विभागले असले आणि याचे खोदकाम विविध काळात झालेले असले तरी या लेण्यांमध्ये एक समान सूत्र आहे असे दिसते. यातील काही शिल्पाकृती यासारख्याच आहेत. ही लेणी त्यांच्यातील स्थापत्य कला, शिल्पकला आणि चित्रकला यासाठी जगप्रसिद्ध आहे.

कैलास लेणे हे स्थापत्य आणि शिल्पकलेचा मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा अतिउच्च नमुना आहे असे म्हणता येईल. “आधी कळस मग पाया” या उक्तीप्रमाणे या ठिकाणी प्रत्यक्षात हे मंदिर आपल्याला दिसून येते. हे लेणी एका संपूर्ण खडकामध्ये कोरलेले अतिशय भव्य आणि विस्तारित असे लेणी आहे. आणि ते डोंगराच्या पठारावरून कोरलेले आहे.

कैलास मंदिर (Kailas Temple)

Ellora Caves Information In Marathi Language

जगातील काही आश्चर्यकारक स्थापत्यंपैकी एक असे समजल्या जाणाऱ्या वेरूळच्या कैलास मंदिराला स्थापत्य कलेतील एक शिल्प म्हटले जाते. कारण ते पर्वताच्या उतरणीवर एका २७५ फुट लांब १५४ फूट रुंद आणि जवळपास ९० फूट उंच अशा प्रचंड खडकातून एकसंध मंदिर आतून बाहेरून कोरून काढलेले आहे. ज्ञानेश्वरांनी वर्णन केल्याप्रमाणे चिंचेच्या पानावर देऊळ बांधिले. “आदी कळस मग पाया रे” या वर्णनानुसार हे एकाच कातळात प्रचंड मोठे असे शैल मंदिर बांधले गेले आहे. याची बांधणी द्रविड पद्धतीची असून प्रवेशद्वारी दुमजली गोपूर असून त्याच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीवर शिवाच्या विविध मूर्ती कोरल्या गेल्या आहेत.

आत मध्ये मंदिराच्या दोन्ही बाजूंना दोन प्रशस्त हत्ती झुलत आहेत. परंतु सद्यस्थितीत या हत्तींची शिल्पे तुटलेल्या अवस्थेत आढळून येतात.प्रत्येक हत्तीच्या बाजूला एक भव्य स्तंभ आहे. गोपूर, नंदी मंडप, मुख्य मंडप, सभा मंडप आणि गर्भगृह अशी मुख्य मंदिराची रचना आहे. कैलास मंदिर हे भारतातील अनामिक कलाकारांनी शिवाला वाहिलेले एक सुकुमार कमल पुष्प आहे. ही वेरूळ लेण्यांमधील सोळाव्या क्रमांकाची लेणी आहे.

हे मंदिर जगातील एकमेव मंदिर आहे जे कळसापासून पायाकडे असे खोदून तयार केले आहे. आणि जे पूर्ण झाले आहे. या मंदिराचा परिसर अतिशय मोठा आहे. कैलास मंदिर हे राष्ट्रकूट वंशातील नरेंद्र कृष्णा यांनी सण ७५७ ते ७८३ या काळात बनवले असल्याचे संदर्भ आढळतात. या मंदिरात प्रवेश केल्यानंतर उजवीकडे गेले असता थोड्या अंतरावर दशाननाची एक अति भव्य अशी मूर्ती आहे. ज्यामध्ये त्याने संपूर्ण कैलास पर्वत उचलला आहे. आणि त्या कैलास पर्वताच्याही वर भगवान शंकर विराजमान आहेत असे आपल्याला पाहावेस मिळते. त्यांच्यासोबत पार्वती सुद्धा आहे जी संपूर्ण कैलास पर्वत हलवत आहे. त्यामुळे शंकराचा हात घट्ट पकडून बसली आहे असे या शिल्पात आपल्याला पाहायला मिळते.

याच सोबत मंदिराच्या दोन्ही बाजूला रामायण पट व महाभारत पट हे पाहायला मिळतात. यामध्ये रामायण व महाभारताची कथा अंदाजे सात ते आठ पट्ट्यांमध्ये मांडलेली आहे. या मंदिराच्या प्रत्येक कोनाला एक एक हत्ती आपल्याला पाहावयास मिळतो. स्थानिक लोकांच्या मते हे मंदिर दोनदा रंगवले गेले होते. आपण स्वतः पाहिले तर, याचे पुरावे आपल्याला त्या मंदिरावर पहावयास मिळतात. पावसामुळे बराच रंग वाहून गेला असला तरी बऱ्याच ठिकाणी तो रंग अजूनही तसाच टिकून आहे. या मंदिरावर केलेले नक्षीकाम हे अतिशय सुबक आहे. अनेक इतिहासकारांच्या मते, हे नक्षीकाम करणे फार कठीण असते.

पहिल्या मजल्यावर असलेल्या गर्भगृहात एक अतिशय मोठे असे शिवलिंग दिसून येते. या मंदिरावर यक्ष, यक्षणी, सिंह, वाघ, हत्ती यांचे शिल्प सुद्धा वेळ आपल्यास पहावे असे मिळते. मंदिराच्या मागील डोंगराच्या भागात तीन बाजूंना विष्णुपुराण व स्कंदपुराण यातीलही शिल्पे आढळून येतात. काही इतिहासकारांच्या मते सन १८१० च्या सुमारास कैलास लेण्यातील या मंदिरांमध्ये पूजाअर्चा होत होती तसेच गाभार्‍यासमोरील मंडपामध्ये साधुसंत देखील राहत होते. परंतु आज या मंदिरातील शिवलिंगाची पूजा होत नाही ही कधीपासून बंद पडली हे देखील सांगता येत नाही.

पर्यटकांसाठी आकर्षण

वेरूळ या ठिकाणी असलेली वेरूळची लेणी ही बौद्ध, हिंदू आणि जैन या तीनही धर्मातील आढळून येतात, या ठिकाणी असलेले एकाच खडकामध्ये कोरले गेलेले आधी कळस मग पाया या उक्तीप्रमाणे असलेले कैलास मंदिर हे देखील पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे. या लेण्यांमध्ये कोरलेले ब्रम्हा, विष्णू, महेश तसेच महावीर आणि गौतम बुद्धांच्या आकृती सुद्धा पर्यटकांना विशेष आकर्षण ठरलेले आहे. येथील लेणी ही स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना म्हणून ओळखली जातात.

वेरूळ येथे कसे जायचे

संभाजीनगर हे शहर ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध आहे. हे एक मोठे शहर असल्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा आकर्षण ठरलेले आहे. संपूर्ण जगभरातून पर्यटक या ठिकाणी येत असल्यामुळे संभाजीनगर या शहराला विविध मार्गाने जोडण्यात आलेले आहे.

विमान

संभाजीनगर या शहराला विमानतळ आहे. या विमानतळावरून वेरूळची लेणी पाहण्यासाठी साधारण ३६ किलोमीटरचे अंतर आहे. म्हणजेच विमानतळावरून ऑटो किंवा कॅबने आल्यास एक तासाचे अंतर आहे.

ट्रेन

संभाजीनगर या ठिकाणी असलेले रेल्वे स्टेशन ते वेरूळची लेणी या ठिकाणचे अंतर साधारण २८ किलोमीटर आहे. म्हणजेच ऑटो किंवा कॅब ने तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. येथे येण्यासाठी ४० ते ४५ मिनिटांचे अंतर आहे.

बस

संभाजीनगर बस स्थानक ते वेरूळ लेणी यामध्ये अंतर साधारण २८ किलोमीटर आहे. म्हणजे या ठिकाणी येण्यासाठी ऑटो किंवा कॅब ने ४१ मिनिटांचे अंतर आहे.

खाजगी वाहने

संभाजीनगर हे ठिकाण पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही खाजगी वाहनाने देखील येऊ शकता.

मुंबई ते औरंगाबाद अंतर – ३४० किलोमीटर
पुणे ते औरंगाबाद अंतर – ४२० किलोमीटर

एलोरा लेण्यांना भेट देण्यासाठीचा सर्वोत्तम वेळ

वेरूळच्या लेण्या या मंगळवारी प्रेक्षकांसाठी पर्यटकांसाठी बंद असतात. बाकी वर्षभर चालू असतात. या ठिकाणी साधारणपणे ऑक्टोबर पासून फेब्रुवारी पर्यंत च्या कालावधीत पर्यटक भेट देत असतात. कारण साधारण मार्चपासून तेथील तापमान हे ४० ते ४५ डिग्री पेक्षाही जास्त असते. तसेच जून पासून सप्टेंबर पर्यंत पावसाळी हंगाम चालू असतो. म्हणूनच ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा वेळ पर्यटकांच्या दृष्टीने योग्य समजला जातो.

एलोरा लेण्यांना भेट देण्यासाठी प्रवेश शुल्क

वेरूळ येथील लेणी पाहण्यासाठी संपूर्ण जगभरातून पर्यटक येत असतात. भारतीय पर्यटकांसाठी १० रुपये तर परदेशी पर्यटकांसाठी २५० रुपये असे प्रवेश शुल्क आकारले जाते. पर्यटकांना आत मध्ये व्हिडिओ, कॅमेरा न्यायचे असल्यास आणखी २५ रुपये द्यावे लागतात. तसेच पंधरा वर्षाखालील मुलांचे येथे कोणतेही शुल्क घेतले जात नाही. वेरूळची लेणी पाहण्यासाठी सकाळी सहा पासून सायंकाळी सहा पर्यंतचा वेळ दिलेला असतो. वेरूळची लेणी मंगळवारी पर्यटकांसाठी बंद असतात.

एलोरा लेण्यांना भेट देताना घ्यावयाची काळजी

  • वेरूळ लेणी ही डोंगराळ भागात असल्यामुळे या ठिकाणी जाताना आपल्या सोबत थोडेसे खाणे तसेच पाणी, डोक्यावर टोपी बरोबर घेऊन जाणे गरजेचे आहे.
  • या ठिकाणी गेल्यावर तेथील कोणत्याही वस्तूला हात लावू नये.
  • ही वेरूळची लेणी डोंगराळ भागात असल्यामुळे या ठिकाणी जाताना आपापली काळजी घेणे. या ठिकाणी बांधकाम खोदकाम हे थोडेसे डळमळीत झालेले असल्यामुळे ते आपल्या अंगावर पडण्याची अथवा आपण त्यामध्ये अडकून पडण्याची शक्यता असते याची काळजी घ्यावी.

एलोरा लेण्यांच्या आजूबाजूला असणारी पर्यटन स्थळे

संभाजीनगर हे शहर जसे ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणी येणारे पर्यटक हे संपूर्ण जगभरातून येत असतात. या संभाजीनगर मधील आणखी काही प्रसिद्ध पर्यटन स्थळे खालील प्रमाणे –

दौलताबाद किल्ला

दौलताबाद हे भारतातील, महाराष्ट्र राज्यातील, संभाजीनगर जिल्ह्यातील, एक गाव असून या ठिकाणी देवगिरीचे यादव यांचा हा ऐतिहासिक दौलताबाद देवगिरी किल्ला आहे. या देवगिरी किल्ल्याला २८ नोव्हेंबर १९५१ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांपैकी देवगिरीचा किल्ला हे एक आश्चर्य ठरलेले आहे.

अजिंठा लेणी

संभाजीनगर शहरापासून जवळपास १०० ते ११० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेण्या आहेत. अजिंठा लेण्यांना जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इसवी सन १९८३ मध्ये घोषित केले आहे. जून २०१३ मध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये अजिंठा लेणी हे प्रमुख आकर्षण ठरले. लेण्यांमधील चित्रांपैकी एका लेण्याचे चित्र भारतीय चलनातील २० रुपयांच्या नोटेवर देखील आहे.

जायकवाडी धरण

संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असणारे हे प्रमुख धरण गोदावरी नदीवर आहे. ६० किलोमीटर लांब आणि १० किलोमीटर रुंद इतका मोठा पसारा या जायकवाडी धरणाचा आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्यासाठी आणि चार वर्षाच्या पिण्याच्या पाण्यासाठी ची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र देखील समजलं जातं

गवताळा अभयारण्य

जवळपास कन्नड गावापासून १५ किलोमीटर आणि चाळीस गावापासून २० किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. त्या ठिकाणी चौकीमध्ये गेल्यावर नोंद केल्यानंतर आपल्याला आत मध्ये प्रवेश मिळतो. या अभयारण्यात वाहनाने किंवा पायी फिरता येते. याच्या आत गेल्यावर अनेक प्रकारची झाडे, फुलझाडे दिसून येतात. तसेच चंदनाच्या वनातून वाहणारा एक नाला देखील दिसतो. त्याला चंदन नाला असे म्हणतात. याच्या काठाला मोर, पोपट यासारखे रंगबिरंगी पक्षी त्याचप्रमाणे सातभाई, सुब्रह्मण, बुलबुल, कोतवाल, चंडोल, दयाळ यासारखे पक्षी दिसून येतात.

पाणचक्की

पाण्याच्या दाब निर्माण करून दगडी जाते फिरवण्याची किमया साध्य करण्याची ही कल्पना जवळपास ४०० वर्षांपूर्वी अमलात आणलेली आहे. ही पाणचक्की उभी करण्यामध्ये मलिक अंबरचे मोठे योगदान दिसून येते.१७व्या शतकाच्या सुरुवातीला आणि उत्तरार्धामध्ये पाणचक्कीचे बांधकाम सुरू झाले.

बीबी का मकबरा

बीबी का मकबरा हा मुगल सम्राट औरंगजेबाचा मुलगा आझम शहा यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. ताजमहालची प्रतिकृती म्हणून या बीबी का मकबराला ओळखले जाते. हा मकबरा लाल काळ्या दगडांबरोबर संगमरवर आणि काही पांढऱ्या मातीपासून बनवलेला आहे. हा मकबरा एका भव्य ओट्यावर असा बांधलेला असून यामध्ये मधोमध बेगम राबिया दुरानीची कबर आहे. या कबरीच्या चारही बाजूंनी संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत.

घृष्णेश्वर मंदिर

घृष्णेश्वर मंदिर

भारतातील प्रमुख बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे हे बारावे ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर मंदिर होय. हे मंदिर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दौलताबाद पासून जवळपास ११ किलोमीटरच्या अंतरावर आहे. मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमी बाईंनी हे मंदिर बांधले असून, त्यानंतर अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला. या मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे. २७ सप्टेंबर १९६० रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून या मंदिराला घोषित करण्यात आले.

वॉटर पार्क

एलोरा रोड या राष्ट्रीय महामार्गावर हे वॉटर पार्क आहे. प्रौढांसाठी आणि मुलांसाठी डिझाईन केलेल्या स्लाइड तसेच स्वतंत्र स्विमिंग पूल देखील आहेत. या ठिकाणी स्वादिष्ट स्नॅक्स आणि शीतपेय देणारे आणि फूड स्टॉल आणि काउंटर देखील आहेत. सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा पर्यंत हे वॉटर पार्क चालू असते. ४५० रुपयांपासून ६५० रुपयांपर्यंत याचे प्रवेश शुल्क आकारले जाते.

वेरूळ मध्ये राहण्यासाठी हॉटेल्स

संभाजीनगर हे ऐतिहासिक, सांस्कृतिक दृष्ट्या जसे प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे ते पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. याठिकाणी येणारे पर्यटक संपूर्ण जगभरातून येत असल्यामुळे याठिकाणी त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी अनेक हॉटेल्स बांधली गेली आहेत.
वेरूळ लेणी या ठिकाणी असलेली काही प्रसिद्ध हॉटेल्स खालील प्रमाणे –

  • हॉटेल ग्रेट अन्नपूर्णा
  • एलोरा हेरिटेज रिसॉर्ट
  • हॉटेल कन्हैया अँड रेस्टॉरंट
  • हॉटेल कैलास
  • शिवम रेसिडेन्सी
  • हॉटेल निसर्ग

वेरूळ मधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ

औरंगाबाद म्हणजे आताचे संभाजीनगर या शहरावर मुघल आणि निजाम यांचे वर्चस्व होते. त्यामुळे या ठिकाणी मांसाराचे प्रमाण अधिक आढळून येते. या ठिकाणी बिर्याणी, पुलाव यासारखे पदार्थ प्रसिद्ध आहेत.

प्रश्न

एलोरा लेणी कुठे आहेत ?

संभाजीनगर या शहरांमध्ये एलोरा लेणी आहेत.

एलोरा लेणी कशासाठी प्रसिद्ध आहेत ?

एलोरा लेणी ही त्या ठिकाणी असलेल्या स्थापत्य कलेमुळे प्रसिद्ध आहेत.

एलोरा लेणी कोणत्या दिवशी बंद असतात?

एलोरा लेणी ही मंगळवारी बंद असतात.

अजिंठा आणि एलोरा लेणी एकच आहेत का?

अजिंठा आणि एलोरा लेणी एकच नसून ती वेगवेगळी आहेत.

एलोरा लेणी फिरण्यासाठी किती वेळ लागतो?

एलोरा लेणी फिरण्यासाठी चार ते पाच तासांचा वेळ लागतो.

एलोरा लेण्यांचे वैशिष्ट्य काय?

या लेण्यांमध्ये तीन वेगवेगळ्या धर्माची व्यक्ती चित्रे, दगडी बांधकाम, शिल्पे आणि मंदिरे तसेच बौद्ध, हिंदू आणि जैन लेणी एकत्रित पहावयास मिळतात.

वेरूळ येथे किती लेण्या आहेत?

वेरूळ येथे लेणी क्रमांक १ ते १२ ही बौद्ध लेणी तसेच लेणी क्रमांक १३ ते २९ हिंदू लेणी आणि लेणी क्रमांक ३० ते ३४ ही जैन लेणी म्हणजे एकूण ३४ लेणी या ठिकाणी पहावयास मिळतात.

लेणी म्हणजे काय ?

डोंगर, टेकडी, पर्वत, खडक खोदून तयार केलेल्या गुहांना लेणी असे म्हणतात. ज्याचा उपयोग संन्यासी, भिक्षु, तपस्या, साधना करणाऱ्यांना विश्रांती घेण्यासाठी केला जाईल.

वेरूळच्या लेण्यांची निर्मिती कोणी केली?

वेरूळची लेणी हे राष्ट्रकूट राजघराण्याच्या राजवंश नरेश कृष्णा यांच्या काळात बांधली आहेत.

निष्कर्ष


तुम्हाला आमचा Ellora Caves Information In Marathi Language ब्लॉग कसा वाटला? हे कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. आमच्या ब्लॉग बद्दल काही मते असल्यास किंवा काही तक्रार असेल तर ती पण आम्हाला नक्की सांगा. आम्ही आपल्या मताचे नेहमी स्वागतच करू. आणि त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार बदल घडवून आणू.
पुन्हा भेटू अशाच नवनवीन विषयांना घेऊन तोपर्यंत नमस्कार.🙏🙏

Leave a comment