गणपतीपुळे संपूर्ण माहिती मराठी : Ganpatipule Information In Marathi

Ganpatipule Information In Marathi | गणपतीपुळे संपूर्ण माहिती मराठी – कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. माडांच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमाची झाडे आणि डोंगरउतारांवर केलेली भातशेती हे खूप मोठ्या प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त लाभलेला कोकण म्हणजे स्वर्गच आहे. आमच्या आजच्या लेखातून आम्ही तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे बद्दल आणि येथील प्रेक्षणीय स्थळे, प्रसिद्ध गणेश मंदिर, प्राचीन कोंकण संग्राहलय याबद्दल माहिती देणार आहोत. हा लेख तुम्ही नक्की वाचा.

Table of Contents

गणपतीपुळे संपूर्ण माहिती मराठी : Ganpatipule Information In Marathi

कोकण म्हटलं की नजरेसमोर येते ते निसर्गरम्य वातावरण व समुद्र. तसे पाहिले तर कोकणाला निसर्गाचा आशीर्वाद हा भरभरून मिळालेला आहे. येथील पर्यटन स्थळांना भेटी देणे म्हणजे पर्वणीच. निसर्गाच्या कुशीत वसलेलं रत्नागिरीदेखील आपल्याला कायम खुणावत असतं. गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यामधलं प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. स्वयंभू गणेशाचे हे स्थान अतिशय नयनरम्य व मनाला शांतता देणारे आहे. मंदिराचे आणखी एक खास वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येईल की हे मंदिर समुद्रकिनारी असून इथली स्वयंभू गणेश मूर्ती 400 वर्षे जुनी आहे.

गणपतीपुळे पर्यटन

ठिकाण गणपतीपुळे
पर्यटन प्रकार समुद्र पर्यटन
जिल्हा रत्नागिरी
विभाग कोकण
जवळचे शहररत्नागिरी
मुख्य आकर्षण गणेशमंदिर, समुद्रकिनारा
स्थानिक आकर्षणे मालगुंड, जयगड किल्ला, प्राचीन कोकण

गणपतीपुळे पर्यटन नकाशा

गणपतीपुळे समुद्रकिनारा माहिती – Ganpatipule Beach Information

गणपतीपुळे हा कोकण किनारपट्टीवरील अतिशय सुंदर समुद्रकिनारा आहे. समुद्रप्रेमींसोबतच, शांत वातावरण प्रेमी आणि यात्रेकरूंसाठी देखील हा एक आवडता समुद्रकिनारा आहे. येथील स्वयंभू गणेश मंदिरात नेहमीच भाविकांची वर्दळ असते. येथे वसलेल्या गणेशाला पश्चिमेचा देव म्हणूनही ओळखले जाते. गणपतीपुळ्याला पोहोचणारे सगळे आपोआपच या महान देवतेसमोर नतमस्तक होतात. सुंदर समुद्रकिनारा आणि स्वच्छ पाणी याशिवाय गणपतीपुळे गाव वानराईने समृद्ध आहे. येथे खारफुटीची व नारळ पोफळीची झाडे भरपूर आहेत. इथे आल्यावर जीवनाच्या धकाधकीतून नक्कीच आराम मिळेल.

गणपतीपुळेमध्ये पाहाण्यासारखी ठिकाणे गणपतीपुळे पर्यटन स्थळे

मित्रांनो गणपतीपुळे हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. हे ठिकाण महाराष्ट्राच्या कोकण भागातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे. गणपतीपुळे हे पर्यटन स्थळ महाराष्ट्रातील बऱ्याच पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. रोजच्या तणावपूर्ण जीवनातून बाहेर निघून निसर्गाच्या सौंदर्यात किंवा मित्रांबरोबर वेळ घालवण्यासाठी एक योग्य ठिकाण आहे. सर्वात सुंदर आणि आकर्षक असे हे ठिकाण रत्नागिरी पासून साधारण 35 किलोमीटर अंतरावर आहे. महाशिवरात्रीच्या वेळेस वेळेश्वर या ठिकाणी मोठा उत्सव देखील भरवला जातो.

1) जयगड लाईट हाऊस

Jaygad Light House

जयगड लाईट हाऊस हे एक प्राचीन अभियांत्रिकी चमत्कार आणि गणपतीपुळे येथील प्रसिद्ध पर्यटन स्थानांपैकी एक आहे. जे पाहण्यासाठी बरेच पर्यटक आकर्षित होत असतात. गणपतीपुळे आणि जवळपासची सुंदर पर्यटन स्थळे या ठिकाणी आपल्याला पाहण्याचा आनंद घेता येईल. गणपतीपुळे पासून जयगड लाईट हाऊस हे ठिकाण साधारण 23 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

2) जयगड किल्ला

Jaygad Fort

जयगड किल्ला हा गणपतीपुळे या ठिकाणच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हा किल्ला मंदिरापासून १९ किलोमीटर अंतरावर आहे. सोळाव्या शतकात बांधलेला हा जयगड किल्ला रत्नागिरीच्या किनारी भागात साधारणतः 13 एकर इतक्या परिसरामध्ये विस्तारलेला आहे. गणपतीपुळेला भेट देणारे बरेच पर्यटक या किल्ल्यालाही भेट देण्यासाठी येत असतात.

हे सुद्धा वाचा 👉सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी

 3) मालगुंड बीच

Malgund Beach

मालगुंड गाव आहे जे गणपतीपुळे येथील प्रसिद्ध गाव आहे. गणगुतीपुळे पासून सुमारे 2 कि.मी. अंतरावर मालगुंड हे प्रसिद्ध कवी केशवसुतचे यांचे जन्मस्थान असून गावामध्ये त्यांचे स्मारक आहे. इथे त्यांचे पुस्तके आणि वाचनालय सुद्धा आहे. बरेच इतिहास प्रेमी आणि पर्यटक मालगुंड बीच या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात.

4) श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर

Dashbhuja Laxmi Ganesh Mandir

पेशवेकाळी पूज्य श्री केळकर स्वामींनी पेशव्यांच्या साहाय्याने हे मंदिर बांधून ह्या मूर्तीची स्थापना केली. मंदिराचा जिर्णोद्धार सण 1956 (शके 1877) ला श्री शिवराम गोविंद उर्फ काका साहेब जोगळेकर यांचे पुढाकाराने झाला. ह्या मूर्तीला दहा हात असून डाव्या मांडीवर अष्टसिद्धी पैकी एक सिद्धलक्ष्मी बसलेली आहे . सोंडेमद्धे अमृतकलश असून ही मूर्ती नावाप्रमाणेच एकदंत दाखवलेली आहे.

श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर मधील मुर्तीच्या उजव्याबाजूला पाहिल्या हातात चक्र, दुसऱ्यात त्रिशुळ, तिसऱ्यात धनुष्य, चौथ्यात गदा, पाचव्या आशिर्वादाच्या हातात महाळुंगफळ आहे. तसेच मुर्तीच्या डाव्या बाजूच्या पहिल्या हातात चक्र, दुसऱ्यात पाश, तिसऱ्यात निळकमळ, चौथ्यात रदन व पाचव्यात धान्याची लोंबी आहे. हे ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यापासून 20 किमी अंतरावर आहे. दरवर्षी येथे माघी जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. श्रीं च्या जन्मोत्सवानिमित्त येथे जन्मोत्सवाचे कीर्तन बाप्पांच्या बालमुर्तीचा जन्मोत्सव, पाळणा विधी, नामकरण विधी (बारसं) व त्यानंतर राथाधिष्ठीत बालमुर्तीची भव्य मिरवणूक काढली जाते.

कोळी लोकांची ह्या बाप्पांवर खूप श्रद्धा आहे. माघी जन्मोत्सवाच्या ह्या पर्वणीसाठी मुंबईच्या कोळीवाड्यातील कोळी लोकांची खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. विशेष करून चिंबई कोळीवाडा, वरळी कोळीवाडा, खारदांडा कोळीवाडा, माहीम कोळीवाडा, जुहू कोळीवाडा, वसई नायगाव कोळीवाडा अश्या ठिकाणाहून खूप मोठ्या प्रमाणात भक्त येतात. आलेल्या सर्व भाविकांची श्री लक्ष्मी नारायण देवस्थान संस्थेद्वारे राहण्याची उत्तम व्यवस्था दरवर्षी करण्यात येते.

5) भंडारपुळे बीच

Bhandarpule Beach

ठिकाण गणपतीपुळे मध्ये आहे भंडारपुळे बीच हा समुद्रकिनारा दोन किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. हा बीच सुरूच्या झाडांनी भरून गेल्याने तो बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करत असतो. गणपतीपुळे बस स्थानकापासून हे ठिकाण मात्र 4 किलोमीटर इतके अंतरावर आहे. आरे वारे रस्त्यावर गणपतीपुळेकडे जाताना हा बीच आहे. समुद्रकिनारा स्वच्छ आहे

 6) आरे वारे बीच

Aare Ware Beach

 आरे वारे बीच हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील नेवारे गावाजवळ बसलेला एक सुंदर समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा गणपतीपुळे येथील प्रसिद्ध पर्यटन स्थान पैकी एक आहे. हे ठिकाण मुख्य रत्नागिरी शहरापासून फक्त 20 मिनिटांच्या अंतरावर असून या बीचवरून तुम्ही उत्तम सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. सध्या कोणतीही शॅक उपलब्ध नाही पण खाद्यपदार्थ आणि शीतपेयांसाठी छोटी दुकाने उपलब्ध आहेत. सूर्यास्तासाठी कुटुंबासह भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण.

हे सुद्धा वाचा 👉मार्लेश्वर मंदिर आणि धबधबा माहिती

7) प्राचीन कोकण संग्रहालय

गणपतीपुळ्यापासून अवघ्या एक किमी. वर प्राचीन कोकण हे संग्रहालय वसवलेले आहे. हे संग्रहालय ओपन एअर आहे आणि इथे गेल्या काही शतकांतील कोकणी जीवनशैलीची माहिती इथे देण्यात आलेली आहे. लाईफसाईझ मूर्तीमधून हा सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर उभा राहतो. खास वैशिष्ट्य म्हणजे आसपासच्या गावातील मुलांना प्रशिक्षण देऊन इथे गाईड म्हणून रोजगार दिलेला आहे. इथे असणाऱ्या खरेदी केंद्रात अत्यंत कमी किमतीत खूप आकर्षक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत

Prachin Kokan Museum Ganpatipule

प्राचीन कोकण संग्रहालय हे इतिहास प्रेमी आणि कोकणी संस्कृतीची आवड असलेल्या पर्यटकांचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. प्राचीन कोकणातली संस्कृती जाणून घेण्यासाठी आपण प्राचीन कोंकणात जाऊन नक्कीच भेट देऊ शकता. येथील औषधी वनस्पती प्रत्येक रोगांवर उपयोगी आहेत. या ठिकाणी एक गुहा आहे. या गुहेमधून आपण जवळजवळ 500 वर्षे जुन्या कोकणात प्रवेश करतोय असे वाटते. या ठिकाणी गावामधील प्रत्येक गोष्ट हि विविधतेने मांडली आहे.

प्राचीन कोंकणात प्रवेशासाठी प्रवेश शुल्क: रु. मार्गदर्शकासह प्रति व्यक्ती 40 इतका आहे. गणपतीपुळे समुद्रकिनारा आणि मंदिरापासून प्राचीन कोकण फक्त 1 किमी अंतरावर आहे.

8) गणपतीपुळे बीच

Ganpatipule Beach

गणपतीपुळे हा समुद्रकिनारा महाराष्ट्रातील एक सुंदर आणि प्रसिद्ध समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा हिरव्यागार नारळाच्या झाडांनी आणि खारफुटीच्या वनांनी भरलेला आहे. आणि मित्रांबरोबर काही वेळ घालवण्यासाठी गणपतीपुळे हा समुद्रकिनारा अगदी योग्य ठिकाण आहे. वर्षभर भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात.गणपतीपुळेला सुमारे १२ किमी लांब आणि विस्तृत किनारपट्टी आहे. समुद्रकिनारा अतिशय स्वच्छ आहे आणि पांढरी वाळू आहे जी संपूर्ण महाराष्ट्र तसेच आसपासच्या राज्यांतील पर्यटकांना आकर्षित करते.

 9) स्वयंभू गणपती मंदिर

Ganpatipule Ganesh Mandir

गणपतीपुळे मधील स्वयंभू गणपती मंदिर लोकप्रिय मंदिर आहे. हे 400 वर्षे जुने गणेश मंदिर आहे. हिरव्यागार वनराईने नटलेल्या टेकडीच्या पायथ्याशी आणि निळ्याशार समुद्र किनारी गणरायाचे अत्यंत सुंदर असे हे मंदिर वसले आहे. मंदीर आणि मंदीर परिसर अतिशय सुंदर असून या ठिकाणी आलेल्या गणेश भक्तांना बाप्पांचे दर्शन घेऊन आणि येथील निसर्ग अनुभवून खरच खूप छान वाटते. मंदीर परिसर अतिशय स्वच्छ आणि नीटनेटका असून येणाऱ्या भक्तांच्या दर्शनाची चांगली सोय करण्यात आलेली आहे.

10) गणपतीपुळ्याजवळची मंदिरे

श्री महाकाली मंदिर
श्री कनकादित्य मंदिर
गंगा- तीर्थ- राजापूर
गरम पाण्याचा झरा
धूत पापेश्वर मंदिर
गणेशगुळे (अगरगुळे)
श्री झरी विनायक मंदिर
श्री स्वामी स्वरूपानंद तीर्थ मंदिर (समाधी मंदिर)
श्रीक्षेत्र परशुराम
श्री वेळणेश्वर मंदिर
श्री उमा महेश्वर मंदिर हेदवी
श्री कर्हाटेश्वर मंदिर
श्री लक्ष्मी- केशव मंदिर

गणपतीपुळे स्वयंभू गणेश मंदिर

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ: ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

गणपती बाप्पा म्हटले की महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभर या देवाची ख्याती आहे असे दैवत. महाराष्ट्राचे अष्टविनायक तर सर्वांनाच माहित आहेत परंतु सर्व भारताचे रक्षण करण्याकरता भारताच्या अष्टदिशांच्या या अष्टविनायकांची देवस्थाने पसरलेली आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे, वक्रतुंड तामिळनाडू, एकदंत केरळ, महोदर रामेश्वर, गजानन तंजावर, लंबोदर गणपतीपुळे, विकट काश्मीर, विघ्नराज हिमालय, धुम्रवर्ण तिबेट असे हे भारताचे आठ अष्टविनायक.

या अष्टविनायकांपैकी आज आपण रत्नागिरी मधील गणपतीपुळेच्या लंबोदर देवस्थानाविषयी जाणून घेणा आहोत. सह्याद्रीच्या कडेकापारीतील हिरवीगार वनराई स्वच्छ व सुंदर समुद्र तसेच आंबा, काजू, नारळ, पोफळीच्या हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेले कोकण आपल्याला कायमच खुणावत असते. संगमेश्वर येथून गणपतीपुळेकडे जात असताना निसर्गाचे एक अनोखे रूप आपल्याला पाहायला मिळते. रस्त्याच्या आजूबाजूकडील भागात सोनवेल फुलांची चादरच घातली आहे असे भासते. निसर्गाचा आनंद घेत गणपतीपुळ्याचा तीव्र उतार उतरून तुम्ही मंदिराजवळ पोहचता, मंदिराजवळ आल्यानंतर विविध प्रकारचे स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात.

येथून गणपती बाप्पा करता नारळ फुलांचे ताट घेऊन तुम्ही मंदिराच्या आत प्रवेशद्वाराजवळ पोहचता. प्रवेशद्वाराजवळ गणपतीपुळे संस्थानामार्फत मोफत चप्पल स्टँड सुविधा उपलब्ध आहे. प्रवेशद्वारापाशी दोन द्वारपाल म्हणजेच हत्तीच्या दोन प्रतिमा आपल्या स्वागतासाठी उभ्या आहेत. प्रवेशद्वारासमोरच गणपती बाप्पाचे वाहन, उंदीर मामा सुद्धा बसवले आहेत. उंदीर मामाच्या कानात सांगितलेली इच्छा बाप्पापर्यंत पोहोचते अशी लोकांची श्रद्धा आहे. म्हणूनच येथे येणारे पर्यटक मामाच्या कानात इच्छा सांगूनच पुढे जातात.

आलेल्या भाविकांची गर्दी होऊ नये आणि प्रत्येकाला गणपती बाप्पाचे दर्शन व्यवस्थित व्हावे यासाठी संस्थानाने भाविकांसाठी रांगेने जाण्याकरता हे बॅरिकेट्स बांधलेले आहेत. तिथूनच पुढे आल्यावर आपण मंदिरापाशी पोहोचतो. मंदिरामध्ये प्रवेश करताना प्रवेशद्वारावर भगवान शंकर, देवी पार्वती आणि गणपती बाप्पा हात जोडून उभे अशी बोलकी प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते.

गाभारा संगमरवरी दगडाचा असून शेंदूर लेपन केलेली लंबोदराची 400 वर्षे जुनी अतिशय प्रसन्न मूर्ती येथे आपल्याला पाहायला मिळते.

गणपतीपुळे दर्शन व्हिडिओ – Ganpatipule Mandir Information In Marathi

गणपतीपुळेचा इतिहास

शिवाजी महाराजांच्या आठ विश्वासू मंत्र्यांपैकी एक सचिव अण्णाजी दत्ता यांनी गवताच्या माथ्याऐवजी एक अप्रतिम घुमट उभारला. पुढचे बांधकाम पेशवे दरबारातील सरदार गोविंदप बुंदेले यांनी बांधलेले सभागृह होते.

त्यानंतर कोल्हापूर संस्थानचे सचिव वासुदेवराव बर्वे यांनी सोन्याचा मुलामा असलेला घुमट-शिखर बनवला.  नानासाहेब पेशवे यांनी अखंड दीपप्रज्वलित “नंदादीप” ची व्यवस्था केली आणि रमाबाई पेशवे यांनी यात्रेकरूंसाठी कायमस्वरूपी कठोर दगडी बांधकाम केले. माधवराव पेशव्यांनी “सभामंडप” बांधला.

गणपतीपुळेची कथा

मोगलाईच्या काळात बाळबटची भिडे नावाचे ब्राह्मण येथे राहत होते आणि त्यावेळी त्यांच्यावर एक संकट कोसळले होते. आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन असा निश्चय करून, त्यांनी गणेशाची उपासना सुरू केली आणि त्यांना एके दिवशी दृष्टांत झाला की मी भक्तांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी गणेश गोळे येथून दोन गंडस्थळे आणि दंतयुक्त स्वरूप धारण करून प्रकट झालो आहे, तेव्हा माझी सेवा पूजा अर्चा कर तुझे संकट दूर होईल.

त्याचवेळी भिडेंची गाय दूध देत नव्हती. त्यांनी तिच्यावर गुराख्याला लक्ष ठेवण्यासाठी सांगितले, तेव्हा त्याच्या नजरेत आले की सध्याची मूर्तीची जागा आहे, तेथे एका शिळेवर गायीच्या स्तनातून दुधाचा अभिषेक होत होता ही गोष्ट जेव्हा त्यांनी गोरक्षकाने भिडेंना सांगितली. तेव्हा येथील परिसर साफ करून तेथे एका गणेशाची मूर्ती त्यांना आढळली.

त्यांनी त्याचे एक छोटेसे मंदिर बांधून त्याची धार्मिक पद्धतीने पूजा करण्यास सुरुवात केली, हीच ती लंबोदरची मूर्ती आजही भारताचे पश्चिम द्वार सांभाळून आहे.

गणपतीपुळे मंदिराची वास्तूकला

गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन जेव्हा तुम्ही गाभाऱ्याच्या समोरील द्वाराने बाहेर जाण्यास निघता, त्यावेळी या द्वारावर आपल्याला राम- लक्ष्मण- सीता या प्रतिमेचे दर्शन घडते, तर त्याच्याच बाजूकडील भिंतीवर आपल्याला महाराष्ट्रातील अष्टविनायकांची शिल्पे पाहायला मिळतात. मंदिरा बाहेरील प्रत्येक भिंतीवर गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या भूमिकेतील शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या दोन्ही बाजूला असलेल्या दीपामाळा मंदिराचे सौंदर्य अजून खुलुवून आणतात.

आज आपल्याला जे मंदिर पाहायला मिळते त्याचे बांधकाम सन 1998 ते 2003 या कालावधीत सुरू होते, आणि 3 फेब्रुवारी 2003 मध्ये श्री शंकराचार्य स्वामी यांच्या हस्ते कलशारोहणाचे काम पूर्ण झाले. या स्वयंभू स्थानाला आपल्याला प्रदक्षिणा मारण्यासाठी मंदिरामागील डोंगराला प्रदक्षिणा मारावी लागते. संपूर्ण प्रदक्षिणामार्ग 1 किलोमीटरचा आहे.

या प्रदर्शनेच्या मार्गावरती सोंडेच्या आकाराचे स्वयंभू स्थान आपल्याला पाहायला मिळते, या स्थानाकडून पुढे आल्यावर बघताना ध्यानासाठी एक मठ बांधलेला आहे. प्रदक्षिणा मारणारे भक्त येथे ध्यानासाठी बसतात. याच प्रदक्षिणामार्गावर आपल्याला एक तलाव सुद्धा पाहायला मिळतो.

गणपतीपुळे मंदिरातील यात्रा आणि उत्सव

वर्षभर विविध सण आणि समारंभ साजरे केले जातात

भाद्रपदाचा उत्सव

भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी. रोज रात्री आरती, मंत्रपुष्प आणि कीर्तन. वामन द्वादशीच्या पवित्र दिवशी महाप्रसाद.

माघी उत्सव

  • माघ शुद्ध १ ते माघ शुध्द ५. रोज रात्री आरती, मंत्रपुष्प आणि कीर्तन. 
  • माघ शुध्द ६ – रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम. 
  • माघ शुद्ध ७ – दुपारी महाप्रसाद आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रम.

दसरा

या दसऱ्याच्या दिवशी पहाटेच्या सुमारास भटजी भिडे यांच्या समाधीची भाविक पूजा करतात आणि बुंदीच्या लाडूंचे वाटप करण्यात येते. ‘सीमोल्लंघन’साठी पालखी मिरवणूक निघते.

दिपोत्सव

कोजागिरी पौर्णिमा-रात्रीपासून त्रिपुरी पौर्णिमा-रात्रीपर्यंत. आश्विन शुध्द 15 ते कार्तिक शुध्द 15 या दरम्यान दररोज संध्याकाळी आरती दरम्यान दिवे प्रज्वलित करतात.

वसंताची पूजा

चैत्र शुध्द १ ते वैशाख शुध्द ३ (गुढीपाडवा ते अक्षय तृतीया).

परमेश्वराची पालखी मिरवणूक

प्रत्येक संकष्टीला (म्हणजे वर्षातून 12 वेळा), गुढीपाडवा, दसरा, दिवाळी (पहिला दिवस), गणेश चतुर्थी (भाद्रपद शुद्ध 4), माघी चतुर्थी (माघ शुद्ध 4) गणेशाची पूजा केली जाते. 

गणपतीपुळे फोटो गॅलरी

गणपतीपुळे

गणपतीपुळे मंदिरा बाबत मनोरंजक तथ्ये

  • या समुद्रकिनारी जरी कितीही उधाण आले तरीहि समुद्राचे पाणी मंदिराच्या आतमध्ये जात नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे.
  • ही मूर्ती स्वयंभू आहे. स्वयंभू मूर्ती म्हणजे जी मूर्ती दृष्टान्त देऊन जमीनिखालून प्रकट होते.

गणपतीपुळे मंदिर ट्रस्ट संपर्क – Ganpatipule Devasthan

  • गणपतीपुळे मंदिर  अधिकृत वेबसाइट
  • संस्थान श्रीदेव गणपतीपुळे, गणपतीपुळे ता. जिल्हा. रत्नागिरी, महाराष्ट्र, भारत
  • संपर्क क्रमांक:  8669931142, 8669931143, 8669931144
  • ईमेल: ganpatipulemandir@gmail.com

गणपतीपुळे मंदिराच्या दर्शन वेळा

खाली गणपतीपुळे मंदिराच्या वेळा आहेत.

गणपतीपुळे मंदिराच्या वेळापासूनला
सकाळ5 AMरात्री ९
पहाटेची आरती5 AM5:30 AM
दुपारची आरतीदुपारी १२दुपारी 12:30
संध्याकाळची पूजासंध्याकाळी ७7:30 PM
खिचडी प्रसादाची वेळदुपारी १२दुपारी २

या देवस्थानात मागितलेली इच्छा, केलेली प्रार्थना भक्तांना अनुकूल असे फळ देते असा भाविकांचा विश्वास असल्यामुळे, दरवर्षी येथे हजारोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. देवस्थानातील कर्मचाऱ्यांच्या सौजन्यशीलतेमुळे अनेक भक्त पूजा, अभिषेक, अन्नदानास आपली सेवा रुजू करतात. त्यांना नंतर पोस्टाने प्रसाद देखील पाठविला जातो. मंदिरामध्ये प्रसादालय म्हणजेच भक्तांना मोफत खिचडी व बुंदी प्रसाद म्हणून दिली जाते. प्रसादाची वेळ दुपारी 12.30 ते 2 तर संध्याकाळी 7.15  ते 8.15 आहे.

गणपतीपुळे येथे करण्यासारख्या गोष्टी

गणपतीपुळे येथील समुद्र किनारे

मंदिराच्या समोरच समुद्र किनारा आहे. मंदिरामध्ये दर्शन घेऊन तुम्ही समुद्रावर फेरफटका मारण्यास जाऊ शकता. त्याचबरोबर इथे जवळच मालगुंड, भंडारवाडा, आरे वारे, काजीरभाटी हे सुद्धा अप्रतिम पांढऱ्या वाळूचे समुद्रकिनारे आहेत. आपण जर इथे 2 किंवा 3 दिवस मुक्कामी असाल तर या जवळच्या किनाऱ्यांना नक्की भेट द्या.

पावसाळ्यामध्ये येथील समुद्राचे रूप पाहण्यासारखे असते, भरतीच्या वेळी समुद्राच्या लाटा मंदिराचे चरण स्पर्श करतात असे भासते. भर पावसाळ्यात सुद्धा येणाऱ्या पर्यटकांची संख्या आता वाढली आहे. कारण या सृष्टीसौंदर्याचा आनंद घेत पावसाळ्यात भिजण्याची मजा काही निराळीच आहे

गणपतीपुळे येथील किल्ले दर्शन

गणपतीपुळे जवळच 19 किलोमीटर अंतरावर जयगड किल्ला आहे. जेथे शाल्मी ही नदी सागराला येऊन मिळते अशा पठारावरील नैसर्गिक आणि सुरक्षीत असे बंदर म्हणजेच जयगड. जयगड गावात जाणाऱ्या फाटय़ापासून आपण बालेकिल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचतो. किल्ला विजापूरकरांनी बांधला असला तरी फार काळ त्यांना किल्ला ताब्यात ठेवता आला नाही. १५७८-८० च्या दरम्यान संगमेश्वराच्या नाईकांनी किल्ल्याचा ताबा घेतला. आदिलशाहने अनेकदा किल्ला मिळविण्याचे प्रयत्न करूनही त्यास यश आले नाही. पुढे १६९५ च्या दरम्यान हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याकडे होता.

हे सुद्धा वाचा👉 हरिहरेश्वर माहिती मराठी 

शत्रू तटाला येऊन भिडू नये म्हणून प्रवेशद्वाराच्या बाहेर सात-आठ फूट खोलीचा कातळकोरीव खंदक आहे. उजवीकडील बाजुला खंदकाला एक प्रवेशद्वारही केलेले आहे. पुढे दोन बुरुजांमधे लपवलेला दरवाजा आहे. प्रवेशद्वारावर पुर्वी नगारखाना असावा अशी त्याची रचना आहे. दरवाजावर कमलपुष्पे व पहारेकऱ्यांच्या देवडय़ा आहेत. तटबंदीच्या मधल्या जागेत कान्होजी आंग्रे यांचा वाडा दिसतो. या वाडय़ाशेजारीच पाण्याची मोठी विहीर आहे. बाजुलाच गणपतीचे मंदिर, लहानशी दीपमाळ अन् जयबाचे स्मारक आहे.

गडाची बांधणी करताना बांधकाम पक्के व्हावे म्हणून नरबळी द्यावी लागेल असा त्या काळच्या समजुतीला जयबा तयार झाले. अन् त्यांना तटबंदीमध्ये जीवंत चिणून तटाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. जयबांच्या या त्यागपूर्ण बलीदानामुळे तटबंदी उभी राहीली अन् गडाचे नाव जयगड ठेवण्यात आले. गडावर जांभ्या दगडा कोरलेली गुहा जिथे मोहमाया देवीचे मंदिर असून समुद्रकाठापर्यंत उतरल्यावर एक लहान दरवाजा तसेच बुरुज ही पहायला मिळतात. कोकण किनारपट्टी व निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकण परिसरामध्ये मोठ्या दिमाखात जयगड किल्ला इतिहासाची साक्ष देत आजही उभा आहे.

प्राचीन कोकण दर्शन

प्राचीन कोकण या नावातच सगळे काही लपले आहे. जसे नावाप्रमाणेच या ठिकाणी आपणास प्राचीन कोकणची माहिती मिळते आणि महत्वाचे म्हणजे माहिती देण्यासाठी येथे गाईड पण आहेत. या ठिकाणी आपणास आयुर्वेदातील बऱ्याच औषधी वनस्पती पाहायला मिळतात तसेच महाराष्ट्रातिल मसाल्याच्या वनस्पती देखील आहेत जसे की दालचिनी, काली मिरी, तामलपत्री.

पूर्वी महाराष्ट्रात बारा बलुतेदार पद्धत होती, याचाच एक छोटासा अतिशय सुंदर नमुना आपल्याला येथे पहायला मिळेल. बारा बलुतेदारांचे प्रत्येकाचे वेगळे वेगळे काम होते याचेच छोटे छोटे नमुने दखवण्यात आले आहेत. विविध औषधी वनस्पती जोपासण्यात आल्या आहेत काही तर अशा आहेत की ज्या फक्त येतेच पहायला मिळतात. येथे शंख आणि शिंपले वस्तूसंग्रहालय आहे आणि यात अतिशय सुंदर असे विविध प्रकारची शंख शिंपले पहाल मिळतात. हे वस्तुसंग्रहालय भारतातील एकमेव असे आहे येथे जे शंख शिंपले पाहायला मिळतात.

वस्तुसंग्रहालयात फोटोग्राफी करण्यास मनाई आहे. आतमध्ये आपणस एक दुकान पहायला मिळते येथे विविध प्रकारची लाकडी खेळणी पहायला मिळतात तसेच कोकणी मसाले पण मिळतात,येथील लाकडी खेळणी ही सावंतवाडीची आहेत. आपल्या लहान मुलांना आपल्या महाराष्ट्रातील प्राचीन इतिहासाची ओळख करून द्यायची असेल, तर हे योग्य ठिकाणी आहे जर आपण कोकणात फिरायला आला असाल, तर एकदा जरूर भेट द्या.

गणपतीपुळे येथील मॅजिक गार्डन

हे ठिकाण मुलांसाठी खूप छान आहे. त्यांच्याकडे मिरर मेझ, इन्फिनिटी रूम, हॉरर हाऊस, थ्रीडी मूव्ही, व्हर्टेक्स टनेल आणि मॅजिक शो यासारखे विविध प्रकारचे खेळ आहेत. मुले आणि पालक देखील आनंद घेऊ शकतात. आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर हिरवाईने भरलेला आहे. मुलांच्या आकर्षणासाठी त्यांच्याकडे पिंजऱ्यात लहान ससा आहे. तिकिटांमध्ये सर्व 5 खेळ प्रकार समाविष्ट आहेत. वेळ सकाळी 9 ते रात्री 10 आहे. तुम्ही काही हाताने बनवलेले पदार्थ आणि शोपीस खरेदी करू शकता. त्यांना हॉरर हाऊस आणि चक्रव्यूहात फोटो काढण्याची परवानगी नाही. तिकीट काउंटरवरून तुम्ही सहज तिकिटे मिळवू शकता.

गणपतीपुळे येथील वॉटर स्पोर्ट्स

मंदिराच्या बाहेरच्या बाजूला समुद्रकिनार्यावर वॉटर स्पोर्ट्ससाठी पर्यटकांची गर्दी असते, बनाना राईड, बंपर राईड, डॉल्फिन राईड अशा प्रकारांनी ही गर्दी फुललेली दिसते. या सर्व प्रकारांचा आनंद घेणारे पर्यटक फोटो, व्हिडिओ रुपी आठवणी साठवण्यात अगदी व्यस्त दिसत असतात.

मुख्य शहर ते गणपतीपुळे अंतर

मुंबई ते गणपतीपुळे हे अंतर 375 किलोमीटर आहे तर पुण्याहून गणपतीपुळे हे अंतर 325 किलोमीटर आहे इथल्या रस्त्यावर कुठल्याही वळणावरून दिसणारे समुद्राचे दृश्य अगदी मनमोहक असतं.

गणपतीपुळेला कसे जाल ?

गणपतीपुळेला देशाच्या इतर भागांत विमान, रेल्वे किंवा रस्त्याने चांगली जाण्याची सोय आहे.

बससेवा

गणपतीपुळ्याला जाण्यासाठी सर्वात सोपा आणि पसंतीचा मार्ग म्हणजे रस्ता. मुंबई, पुणे, नागपूर, बेंगळुरू इत्यादी शहरांमधून रत्नागिरीला नियमितपणे गाड्या जातात. गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी तुम्ही स्टेशनवरून टॅक्सी किंवा बस देखील घेऊ शकता.

रेल्वेसेवा

गणपतीपुळेला सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन रत्नागिरी येथे आहे, जे गणपतीपुळे पासून 50 किमी अंतरावर आहे .तुम्ही स्टेशनवरून टॅक्सी किंवा बस देखील घेऊ शकता.

हवाईसेवा

रत्नागिरी विमानतळ अजूनही व्यवस्थित चालू नसल्याने रेल्वे किंवा रस्ता मार्गे येणे सोयीस्कर ठरते.

गणपतीपुळेला भेट देण्यासाठी योग्य वेळ व महिना

तुम्ही वर्षभर या शहराला भेट देऊ शकता, पण गणपतीपुळेला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च दरम्यान, जेव्हा हवामान खूप उष्ण आणि दमट नसते. समुद्रकिनारी असलेल्या शहराला पावसाळ्यात चांगला पाऊस आणि कमी तापमानाचा अनुभव येतो.

गणपतीपुळे येथील हॉटेल्स – गणपतीपुळे मध्ये राहण्याची सोय

गणपतीपुळे भक्त निवास

श्री क्षेत्र गणतीपुळे देवस्थान मंदिरापासून जवळच्या अगदीच १.८ किलोमीटर व रत्नागिरी – गणपतीपुळे महामार्गापासून ३ किलोमीटर अंतरावर भक्त निवास गणपतीपुळे ही अत्याधुनिक सुविधा असणारी ४ मजली आणि गाडी पार्किंगसाठी भरपूर जागेची उपलब्धता असणारी ईमारत आहे. तसेच इथे अत्याधुनिक सुविधा असणाऱ्या आणि रूम मधे बऱ्याच प्रकार असणाऱ्या म्हणजेच जसे की २,४ लोकांसाठी लहान ते मोठी रूम, तसेच AC room आणि मोठ-मोठ्या मुलांच्या ग्रुप किंवा मोठी फॅमिलीसाठी किंवा कॉलेजच्या मुलांचा मोठ्या ग्रुपसाठी इथे सिंगल बेड आणि dormetory पण उपलब्ध आहेत.

रूमच्या किंमती तर अगदी किफायतशीर आहेत म्हणजेच अगदी २०० रुपयांपासून आहेत. लांबहून येणाऱ्यांसाठी तसेच येथील आजूबाजूची बरीच प्रसिध्द ठिकाणे explore करण्यासाठी हे महत्वाचे आणि अगदी किफायतशीर ठिकाण आहे. येथील रूम्स नीटनेटक्या स्वच्छ आहेत तसेच पूर्ण परिसर अगदी स्वच्छ आहे आणि येथे सकाळी अंघोळीसाठी सकाळी ७ ते ८ गरम पाण्याची सोय आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध Aquagaurd चे शुद्ध पाणी उपलब्ध आहे. सर्व पर्यायचा विचार करता भक्त निवास हा अत्यंत किफायतशीर व सर्व सुविधायुक्त असा उपलब्ध आहे

टीप:- येथे तुम्ही फक्त २ दिवसच राहू शकता.

गणपतीपुळे मधील हॉटेल्स

  1. नक्षत्र बीच रिसॉर्ट मंदिरापासून ३.५ किमी.
  2. हॉटेल शिव सागर पॅलेस मंदिरापासून २.० किमी
  3. एमटीडीसी रिसोर्ट मंदिरापासून ५०० मीटर
  4. ब्लू ओशन रिसोर्ट आणि स्पा मंदिरापासून ४.० किमी
  5. Greenleaf The Resort & Spa मंदिरापासून २.५ किमी
  6. अतिथी लॉज, मंदिरापासून २५० मी.
  7. बीचफ्रंट व्हिला, मंदिरापासून 3.5 किमी.
  8. कौलार अतिथीस ग्रँड कोकण रिसॉर्ट, मंदिरापासून २५० मी.
  9. श्री महालक्ष्मी हॉलिडे रिसॉर्ट, मंदिरापासून ०.६ किमी.
  10. मोरेश्वर पार्क, मंदिरापासून ४५० मीटर किमी.
  11. हॉटेल ग्रँड गणेशा, मंदिरापासून 350 मीटर किमी.
  12. हॉटेल दीपक एक्झिक्युटिव्ह, मंदिरापासून ४८.९ किमी.
  13. ब्लिस हॉलिडे, मंदिरापासून १.६ किमी.
  14. एकदंत हॉलिडे होमचे रेडस्टोन हाऊस, मंदिरापासून 1.1 किमी.

FAQ

गणपतीपुळे मंदिर कुठे आहे?

गणपतीपुळे मंदीर हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून रत्नागिरी पासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू असून हे मंदिर समुद्रकिनारी आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजमान असलेली स्वयंभू गणेश मूर्ती आणि जवळच पश्चिमेला असलेला अथांग अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ पर्यटकांसाठी आवडते तीर्थक्षेत्र आहे.

गणपतीपुळे बीच सुरक्षित आहे का?

हो. नक्कीच. पावसाळ्या चे चार महीने समुद्र असुरक्षित असतो, परंतु नंतर मात्र हा समुद्र किनारा पोहण्यासाठी आणि जलक्रीडा प्रकारांसाठी सुरक्षित आहे.

गणपतीपुळ्याची खासियत काय आहे?

इथल्या स्वयंभू गणपती मंदिरामुळे हे गाव लोकप्रिय हिंदू तीर्थक्षेत्र आणि पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे . गणपतीपुळे मंदीर हे रत्‍नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून रत्नागिरी पासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू असून हे मंदिर समुद्रकिनारी आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजमान असलेली स्वयंभू गणेश मूर्ती आणि जवळच पश्चिमेला असलेला अथांग अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ पर्यटकांसाठी आवडते तीर्थक्षेत्र आहे.

गणपतीपुळे मंदिर कधी बांधले गेले?

आज आपल्याला जे मंदिर पाहायला मिळते त्याचे बांधकाम सन 1998 ते 2003 या कालावधीत सुरू होते, आणि 3 फेब्रुवारी 2003 मध्ये श्री शंकराचार्य स्वामी यांच्या हस्ते कलशारोहणाचे काम पूर्ण झाले.

गणपतीपुळ्यात काय खास आहे?

येथील गणेश मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण ते देशातील काही अलौकिक मंदिरांपैकी एक आहे, ज्यामध्ये प्रमुख देवता पश्चिमेकडे आहे. 400 वर्षे जुने मंदिर हे रत्नागिरी शहरातील प्रमुख पर्यटन आकर्षणांपैकी एक आहे. मंदिरामागील गणेशाच्या आकाराची टेकडी देखील प्रदक्षिणा करणाऱ्या भक्तांना नेहमीच आकर्षित करते.

गणपतीपुळ्याला भेट देण्यासाठी किती दिवस पुरेसे आहेत?

हा समुद्रकिनारा पांढरा वाळू आणि निळ्या पाण्याचा लांब पसरलेला सुंदर समुद्रकिनारा आहे. या ठिकाणाचा संपूर्ण अनुभव घेण्यासाठी 3 दिवसांची सहल पुरेशी आहे. येथे वॉटर स्पोर्ट्स, आजूबाजूचे किनारे आणि प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी 3 दिवस पुरतात.

निष्कर्ष

आम्ही आमच्या आजच्या गणपतीपुळे या लेखातून गणपतीपुळे बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा व कसा वाटला हे कमेंट करून आम्हास नक्की कळवा. धन्यवाद.

Leave a comment