पंडित जवाहरलाल नेहरू माहिती मराठी | Pandit Jawaharlal Nehru Information In Marathi

Pandit Jawaharlal Nehru Information In Marathi | पंडित जवाहरलाल नेहरू माहिती मराठी – नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जीवनपटाबद्दल माहिती देत आहोत. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता, संघर्ष करणाऱ्या महापुरुषांमध्ये जवाहरलाल नेहरू हे एक होते. नेहरुंना चाचा नेहरू म्हणून पण ओळखलं जायचं कारण नेहरूंना लहान मुलं खूप आवडायची आणि हीच मुलं त्यांना चाचा म्हणत असल्याने, त्यांना चाचा नेहरू म्हणून ओळखले जाऊ लागले. नेहरूजींचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. जर आपण नेहरूजींच्या जीवनाकडे लक्षपूर्वक बघितलं तर, आपल्याला खूप काही शिकायला मिळतं.

पंडित नेहरू आदर्शवादी व वैचारिक प्रवृत्तीचे नेते होते. त्यांचा असा विश्वास होता की, स्वतःचे ध्येय, तत्त्व व आदर्श विसरतात, त्यांना कधीच यश मिळत नाही. म्हणून नेहमी आदर्शवादी व वैचारिक प्रवृत्तीने यश मिळवावे.

Table of Contents

पंडित जवाहरलाल नेहरू माहिती मराठी | Pandit Jawaharlal Nehru Information In Marathi

मूळ नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू
जन्मतारीख १४ नोव्हेंबर १८८९ ( बालदिन )
जन्मस्थळ अलाहाबाद (उत्तर प्रदेश)
वडील मोतीलाल नेहरू
आई स्वरूपराणी नेहरू
पत्नी कमला कौर
अपत्य श्रीमती इंदिरा गांधी
शिक्षण १. 1910 मध्ये, त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या ट्रिनिटी कॉलेजमधून पदवी प्राप्त केली.
२. 1912 मध्ये ‘इनर टेंपल’ने या लंडन कॉलेजमधून बॅरिस्टर बॅरिस्टर ही पदवी संपादित केली.
पुरस्कार भारतरत्न
पंतप्रधानपद भारताचे पहिले पंतप्रधान (१५ ऑगस्ट १९४७ – २७ मे १९६४)
मृत्यू २७ मे १९६४

पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे ते पहिले पंतप्रधान होते. पंडित नेहरू यांच्या धर्मनिरपेक्ष, लोकशाही व समाजवादी विचारशैलीमुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकारही संबोधले जाते.पंडित नेहरूंना आधुनिक भारताचे शिल्पकार सुद्धा म्हटले जाते. त्यांना लहान मुले प्रचंड आवडत व लहान मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणून आवाज देत. नेहरू यांनी पहिल्यापासूनच देश भक्तीची भावना मनामध्ये रुजवून, प्रत्येकाला देशभक्तीचे धडे शिकवले. भारतीय जनतेच्या मनामध्ये नेहरूंचे स्थान हे उच्च असून, ते प्रत्येकाचे प्रेरणास्त्रोत होते.

Pandit Jawaharlal Nehru Information In Marathi

पंडित नेहरू यांचे प्रारंभिक जीवन

जवाहरलाल नेहरू हे कुशाल बुद्धिमत्ताचे असून, ते एक महान लेखक, विचारवंत व राजकारणी असल्याने, त्यांना भारताचा महान शिल्पकार म्हणून संबोधले जाते. अशा महान शिल्पकाराचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद मधील एका काश्मिरी ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. नेहरूंच्या वडिलांचे नाव पंडित मोतीलाल नेहरू असून, त्यांचे वडील हे एक प्रसिद्ध बॅरिस्टर व समाजसुधारक होते. तसेच त्यांच्या आईचे नाव स्वरूपाराणी होते. स्वरूपाराणी ह्या काश्मिरी ब्राह्मण कुटुंबामधील होत्या.

जवाहर नेहरूंना तीन भावंडे होती. ज्यामध्ये नेहरूजी हे सर्वात मोठे होते. नेहरूंच्या बहिणीचे नाव विजयालक्ष्मी होते व विजयालक्ष्मी या संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. तर नेहरूजींच्या धाकट्या बहिणीचे नाव कृष्णा हथिसिंग असे होते. त्या एक चांगल्या व प्रभावशाली लेखिका होत्या.नेहरूजींचे बंधू लेखक असून, त्यांनी जीवनावर आधारित विविध पुस्तकांचे लेखन केले. पंडित नेहरू हे लहानपणापासूनच अतिशय कुशाग्र बुद्धीचे व एक महान पुरुष होते.

त्यामुळे त्यांनी त्यांच्या कुशाग्र बुद्धीचा वापर एक उत्तम राजकारणी, आदर्शवादी, विचारवंत व उत्तम लेखक बनण्यासाठी केला. नेहरू हे काश्मिरी पंडित समाजामध्ये, असल्याकारणाने त्यांना पंडित नेहरू या नावाने संबोधले जात होते.

पंडित जवाहरलाल नेहरूंचे प्रारंभिक शिक्षण

पंडित नेहरू यांचे प्रारंभिक शिक्षण हे १९०५ मध्ये म्हणजेच वयाच्या पंधराव्या वर्षी, इंग्लंडमधील हॅरो स्कूलमध्ये झाले. त्यांनी त्यांच्या बालपणाचे शिक्षण हे घरीच घेतले. यानंतर नेहरूंनी जगामधील अतिशय प्रसिद्ध शाळा व विद्यापीठांमधून शिक्षण प्राप्त केले.

कायद्याचा अभ्यास – पंडित जवाहरलाल नेहरू यांची संपूर्ण माहिती

पंडित नेहरू यांनी १९०५ मध्ये दोन वर्ष हॅरो स्कूलमध्ये शिक्षण घेतले व लंडनच्या ट्रिनिटी कॉलेजमधून, कायद्याच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे कायद्याचे शिक्षण पूर्ण झाले, त्यावेळी त्यांनी लंडनमधील इनर टेम्पल मध्ये दोन वर्ष त्यांचे कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.

सात वर्ष नेहरू इंग्लंडमध्ये राहिले व तेथे त्यांनी फॅबियन समाजवाद व राष्ट्रवादाचाही अभ्यास केला. यानंतर नेहरूंनी १९१२ मध्ये स्वतःच्या देशात परतायचे ठरवले व भारतामध्येच राहून त्यांनी त्यांची वकिली केली. १९१६ रोजी भारतात नेहरू परतल्यानंतर, चार वर्षांनी त्यांचा विवाह कमला कौर यांच्याशी झाला. कमला कौर या दिल्ली मधल्या असून, त्या सुद्धा काश्मिरी कुटुंबामधील होत्या. १९१७ मध्ये नेहरू व कमला कौर यांना इंदिरा प्रियदर्शनी नावाची मुलगी झाली, त्यांनाच इंदिरा गांधी या नावाने सुद्धा ओळखले जाते. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.

पंडित जवाहरलाल नेहरू भाषण मराठी व्हिडीओ – pandit Jawaharlal Nehru speech

पंडित नेहरू महात्मा गांधींच्या संपर्कात आले (राजकारणात प्रवेश)

जवाहरलाल नेहरू यांनी १९१७ मध्ये सुरू असलेल्या, होमरूल लीग म्हणजेच इंडियन होमरूल या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग दर्शवला. दोन वर्षांनी म्हणजेच १९१९ मध्ये नेहरू यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला व त्याच दरम्यान त्यांची ओळख महात्मा गांधींसोबत झाली. महात्मा गांधी त्या काळामध्ये कायदा विरोधात मोहीम आखत होते.

महात्मा गांधींच्या शांततापूर्ण सविनय कायदेभंग चळवळीचा नेहरूंच्या मनावर प्रभाव पडला व त्यामुळे नेहरूंनी गांधीजींना स्वतःचा आदर्श मानू लागले. नेहरूजींनी विदेशी वस्तूंचा त्याग करून, स्वदेशी वस्तूंचा स्वीकार केला. यानंतर गांधीजींच्या १९२० ते १९२२ च्या असहकार चळवळीच्या आंदोलनामध्येही, नेहरूंनी गांधीजींना सहकार्य दर्शवले व त्यादरम्यान नेहरूंना अटक सुद्धा करण्यात आली होती.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे कार्य

pandit jawaharlal nehru AND GANDHIJI

देशाला विकासाचा मार्ग दाखवला

नेहरूंनी भारत देशाला आधुनिक सक्षम व विकसित केले . देशभरात धरणे बांधली, कृषीसमृद्धीच्या दृष्टीने नेहरूंनी पाऊलं उचलली.

वैश्विक प्रतिमा सुधारली

पंडित नेहरू यांनी भारतची वैश्विक प्रतिमा सुधारणा केली. भारत देशाला जगात एक बलशाली आणि आदराचं स्थान मिळवून दिलं.

शिक्षण, विज्ञान आणि विकासाची त्रिसुत्री

भारत देशाला अग्रेसर करण्यासाठी शिक्षण, विज्ञान आणि विकासाची त्रिसुत्री नेहरूंनी अमलात आणली. या त्रिसुत्रीमुळेच देशाची वैज्ञानिक प्रगती झाली, देशातील साक्षरतेचे प्रमाण वाढले.

धर्मनिरपेक्षतेची भावना रुजवली

देशामध्ये धर्मनिरपेक्षतेची भावना रुजवण्याचे कार्य पंडित नेहरू यांनी केले. भारत देशाची हिंदू पाकिस्तान फाळणी होणार नाही, याची दक्षता नेहरू घेत असत.

एकात्मतेची भावना रुजवली

नेहरूंनी भारतीय जनतेमध्ये एकात्मतेची भावना रुजवण्यासाठी प्रयत्न केले. जातीभेत निर्मुलनासाठी प्रयत्न केले.

स्थिर लोकशाहीची प्रणेते

पंडित नेहरू हे स्थिर भारतीय लोकशाहीचे प्रणेते आहेत. भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यावर अवघ्या दोन वर्षातच महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन झाले. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशामध्ये लोकशाही स्थिर केली .

२६ जानेवारी १९३० (राजकीय प्रवासातील संघर्ष)

जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. त्यांनी २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर या ठिकाणी स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला. याच्यादरम्यान महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुद्धा सुरू केली. या चळवळीला यश मिळाले, व शांततापूर्ण आंदोलनाने ब्रिटिश राज्यकर्त्यांना राजकारणात बदल घडवून आणण्यास भाग पाडले.

नेहरूजींना आता बऱ्याच प्रमाणात राजकारणाचे ज्ञान प्राप्त झाले होते व त्यांची राजकारणामधील विविध घटकांवर चांगलीच पकड निर्माण झाली होती. १९३६ ते १९३७ च्या दरम्याने जवाहरलाल नेहरू यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर, १९४२ मध्ये महात्मा गांधींच्या भारत छोडो आंदोलनामध्ये, नेहरू यांना अटक करण्यात आली व १९४५ मध्ये नेहरूंची तुरुंगामधून सुटका झाली.

pandit jawaharlal nehru with kids

१९४७ च्या स्वातंत्र्याच्या काळात ब्रिटिश सरकारशी झालेल्या महत्त्वाच्या चर्चेमध्ये नेहरू यांनी अतिशय प्रभावीपणे भूमिका साकारली व तेव्हापासून देशाच्या जनतेसमोर नेहरू यांची एक वेगळीच प्रतिमा तयार होत गेली. देशातील रहिवाशांसाठी नेहरू एक आदर्शाचे प्रतीक बनले.

पंडित नेहरू आणि महात्मा गांधी

पंडित नेहरू महात्मा गांधींना स्वतःचे आदर्श मानत होते व त्यांच्या मध्ये कौटुंबिक संबंध सुद्धा होते. महात्मा गांधींच्या सांगण्यावरूनच, पंडित नेहरू यांना भारताचे पहिले पंतप्रधान बनवण्यात आले, असे सुद्धा म्हटले जाते.

पंडित नेहरूंवर महात्मा गांधींच्या विचारांचा  प्रभाव होता. गांधीजी हे अहिंसात्मक शांततापूर्ण आंदोलन करत व या शांततापूर्ण आंदोलनातून पंडित नेहरूंना गांधीजींकडून नवनवीन शिकायला मिळे व एक सकारात्मक ऊर्जा मिळत असे. त्यामुळे नेहरू गांधीजींच्या संपर्कात आल्यानंतर, गांधीजींनी केलेल्या प्रत्येक आंदोलनामध्ये नेहरू सक्रियपणे सहभाग दर्शवत. नेहरूजींचा राजकारणाकडे पाहण्याचा धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन थोडा वेगळाच होता.

भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरू

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. देशवासीयांना भारतामध्ये मोकळ्या पणाने श्वास घेता येऊ लागले. गुलामगिरी संपली व देशाच्या प्रगतीसाठी लोकशाही व्यवस्था देशांमध्ये असावी असे प्रत्येकाने ठरवले, त्यामुळे देशात पहिल्यांदाच पंतप्रधानासाठी निवडणूक करण्यात आली. यामध्ये काँग्रेसकडून पंतप्रधानाच्या दावेदारीसाठी निवडणुका सुरू झाल्या, त्यात लोहपुरुष म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल व आचार्य कृपयाणी यांनी यांना जास्त मते मिळाली होती. परंतु, गांधीजींनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव सुचवल्या कारणाने नेहरूंना पहिले पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आले.

यानंतर नेहरू सलग तीन वेळा भारताचे पंतप्रधान म्हणून निवडून आले व नेहमीच भारताच्या प्रगतीसाठी पंडित नेहरू झटत राहिले व कार्य करत राहिले. नेहरू यांनी त्यांच्या राजकारणामध्ये भारतासाठी सशक्त राष्ट्राचा पाया निर्माण केला व भारताची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी महत्त्वाच्या भूमिका बजावत राहिले. त्याचबरोबर आधुनिकीकरणासाठी भारतातील विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासाला सुद्धा नेहरूंनी प्रोत्साहन दर्शवले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सर्वोच्च सन्मान

जवाहरलाल नेहरू भारतातील जनतेसाठी अतोनात कष्ट करत, नागरिकांच्या मनामधील जातीभेद निर्मूलन व गरीब कुटुंबांना मदत करण्यासाठी नेहरू जागृती निर्माण करत असत. त्याबरोबरच लोकांमध्ये लोकशाही मूल्यांबद्दल आदर निर्माण करण्याचे काम सुद्धा नेहरूंनी केले.

मालमत्तेच्या बाबतीत विधवांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून देण्यासाठी, नेहरूंनी अतोनात कष्ट केले. त्याशिवाय पश्चिम बर्लिन, ऑस्ट्रिया आणि लाओस यांसारख्या अनेक स्फोटक समस्यांच्या निराकरणासोबत अनेक करार व युद्धांमध्ये नेहरूंनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. यामुळे भारत सरकारने १९५५ मध्ये नेहरूंना “भारतरत्न” हा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित केले.

लेखक म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू

पंडित नेहरू हे फक्त उत्तम राजकारणी नसून ते उत्तम प्रभावी वक्ते सुद्धा होते. त्याचबरोबर त्यांना लेखन करण्याची सुद्धा प्रचंड आवड होती. त्यामुळे त्यांना उत्तम लेखक सुद्धा संबोधले जाते. पंडित नेहरूंच्या लेखणीने लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचा व्यक्तीवर सखोल परिणाम होत असे. सोबतच पंडित नेहरूंची अनेक पुस्तके वाचण्यासाठी लोक खूप उत्साही असत. पंडित नेहरूंचे आत्मचरित्र १९३६ मध्ये प्रकाशित झाले.

पंडित जवाहरलाल नेहरूंची पुस्तके

 • सोव्हीयत रशिया
 • भारताची एकता आणि स्वातंत्र्य
 • भारत आणि जग
 • जागतिक इतिहासाची एक झलक
 • जागतिक इतिहासाची झलक १९३९

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू

पंडित नेहरू यांची प्रकृती चीनसोबत झालेल्या युद्धानंतर जास्त प्रमाणात बिघडू लागली. २७ मे १९६४ रोजी नेहरू यांना हृदयविकाराचा झटका येऊन, त्यांनी जगाचा निरोप घेतला. पंडित नेहरू हे देशासाठी एकनिष्ठ होते. नेहमीच देशासाठी झटत असत. लहान मुलांवर प्रेमाचा वर्षाव करत असत. नेहरू राजकारणामधील एक चमकता तारा होता.

त्यांनी भारतामध्ये विकास करण्यासाठी भारताचा मजबूत पाया रचला. भारताचे पहिले पंतप्रधान बनून भारताचा गौरव त्यांनी केला. तसेच भारतामध्ये आधुनिकीकरणासाठी नेहरूंनी महत्त्वाची भूमिका बजावली व विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रोत्साहन सुद्धा दिले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे अनमोल विचार

 • मुले ही बागेतील कळ्यांसारखी असतात आणि त्यांचे प्रेमाने पालनपोषण केले पाहिजे. कारण ते देशाचे भविष्य आणि उद्याचे नागरिक आहेत.
 • एखाद्या महान कार्यात मेहनतीने आणि कार्यक्षमतेने काम केले तरी त्याला लगेच ओळख मिळाली नाही तरी शेवटी यश नक्कीच मिळते.
 • भांडवलशाही समाजाच्या शक्तींवर नियंत्रण न ठेवल्यास श्रीमंतांना अधिक श्रीमंत आणि गरीबांना अधिक गरीब बनविण्याचा कल असतो.
 • जे निर्भयपणे निर्णय घेतात आणि परिणामांना घाबरत नाहीत त्यांना यश मिळते.
 • संकटाच्या वेळी प्रत्येक छोटी गोष्ट महत्त्वाची असते.
 • लोकांची वागणूक त्यांच्या मनातील विचार प्रतिबिंबित करते.
 • नागरिकत्व देशाच्या सेवेत सामावलेले आहे.
 • सत्य हे नेहमीच सत्य असते आणि तुमच्या नापसंतीने ते असत्य ठरत नाही.
 • अत्यंत सावध राहण्याचे धोरण हे सर्व धोक्यांपेक्षा मोठे आहे.
 • लोकशाही चांगली आहे कारण इतर व्यवस्था खूप वाईट आहेत.
 • योग्य शिक्षणानेच समाजाची उत्तम व्यवस्था निर्माण होऊ शकते.
 • आपल्यातील सर्वात मोठा दोष म्हणजे आपण गोष्टींवर जास्त बोलतो आणि काम कमी करतो.
 • भिंतीवरील चित्रे बदलून आपण इतिहासातील तथ्य बदलू शकत नाही.
 • जेव्हा आपण आपले आदर्श, उद्दिष्टे आणि तत्त्वे विसरतो तेव्हा अपयश येते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल 10 वाक्ये

 • जवाहरलाल नेहरू यांचे पूर्ण नाव पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू होते.
 • नेहरूजींचा जन्म 14 नोव्हेंबर 1989 रोजी प्रयागराज (जुने नाव अलाहाबाद) उत्तर प्रदेश येथे झाला.
 • नेहरूंच्या आईचे नाव स्वरूप राणी आणि वडिलांचे नाव पंडित मोतीलाल नेहरू होते.
 • जवाहरलाल नेहरूंच्या पत्नीचे नाव कमला नेहरू होते.
 • जवाहरलाल नेहरूंनी लंडनमध्ये बॅरिस्टरचे शिक्षण पूर्ण केले.
 • पंडित नेहरू यांना चाचा नेहरू म्हणूनही ओळखले जाते.
 • जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते.
 • नेहरूंचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर हा देखील दरवर्षी बालदिन म्हणून साजरा केला जातो.
 • 27 मे 1964 रोजी नेहरूजींचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
 • नेहरूंच्या कन्या, ज्यांचे नाव श्रीमती इंदिरा गांधी होते, त्या नंतर भारताच्या पंतप्रधान झाल्या.

पंडित जवाहरलाल नेहरूंबद्दल काही मनोरंजक आणि कमी ज्ञात तथ्ये

 1. पंडित नेहरू ऑक्टोबर 1907 मध्ये ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज येथे गेले आणि 1910 मध्ये नैसर्गिक विज्ञान विषयात सन्मानित पदवी प्राप्त केली.
 2. ऑगस्ट 1912 मध्ये, भारतात परतल्यानंतर, नेहरूंनी स्वत: ला अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वकील म्हणून नावनोंदणी केली आणि बॅरिस्टर म्हणून स्थायिक होण्याचा प्रयत्न केला.
 3. त्याला आणखी दोन भावंडे होती, त्या दोन्ही मुली होत्या. तिच्या मोठ्या भावंडाचे नाव विजय लक्ष्मी पंडित आणि दुसऱ्याचे नाव कृष्णा हुथीसिंग होते.
 4. जवाहरलाल नेहरू 1950-1955 दरम्यान शांततेसाठी नोबेल पुरस्कारासाठी 11 वेळा नामांकित झाले होते परंतु त्यांना कधीही नोबेल पुरस्कार मिळू शकला नाही.
 5. 1929 मध्ये, नेहरू कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर गेले आणि तेव्हापासून कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
 6. पंडित नेहरू हे काश्मिरी पंडित कुटुंबातील होते.
 7. 1935 मध्ये त्यांनी तुरुंगात आत्मचरित्र लिहिले. नेहरूंनी लिहिलेले “Toward Freedom” हे पुस्तक 1936 साली USA मध्ये प्रकाशित झाले.
 8. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान पंडित नेहरूंना 9 वेळा तुरुंगवास भोगावा लागला. नेहरूंना ब्रिटीशांनी एकूण 3259 दिवस तुरुंगात टाकले होते जे त्यांच्या आयुष्यातील 9 वर्षे तुरुंगात घालवतात.
 9. ते अॅनी बीझंटचे मोठे प्रशंसक आणि समर्थक होते आणि 1916 मध्ये अॅनी बीझंटने स्थापन केलेल्या होम रूल लीगचे सदस्य बनले.
 10. पंडित नेहरू यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असेही म्हटले जाते.
 11. 31 डिसेंबर 1929 रोजी नेहरूंनी लाहोरमध्ये मोठ्या सार्वजनिक मेळाव्या आणि काँग्रेस स्वयंसेवकांसमोर भारतीय ध्वज फडकवला. तिथून तिरंगा ध्वज लोकप्रिय झाला आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला आणि मेळाव्यात आणि निदर्शनांमध्ये फडकवला जायचा.
 12. 1927 मध्ये, संपूर्ण राष्ट्रीय स्वातंत्र्याची कल्पना देणारे आणि आयसीएससह ब्रिटीश साम्राज्यापासून भारतीयांना जोडणाऱ्या सर्व संबंधांपासून परावृत्त करणारे ते पहिले होते.
 13. पंडित नेहरू 27 मे 1964 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मरण पावले. त्यांचे अंत्यसंस्कार पाहण्यासाठी सुमारे 15 लाख लोक जमले होते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाची ठिकाणे

बंदरे

 • जवाहरलाल नेहरू बंदर

उद्याने

 • जवाहरलाल नेहरू मेमोरियल बोटॅनिकल गार्डन
 • जवाहरलाल नेहरू ट्रॉपिकल बोटॅनिक गार्डन आणि संशोधन संस्था
 • नेहरू पार्क, बर्नपूर
 • नेहरू पार्क, दिल्ली
 • नेहरू पार्क, गुवाहाटी
 • नेहरू पार्क, कोईम्बतूर
 • नेहरू पार्क, त्रिशूर
 • नेहरू प्राणी उद्यान, हैदराबाद
 • नेहरू गार्डन, उदयपूर
 • नेहरू गार्डन, जयपूर
 • नेहरू गार्डन, कोयनानगर
 • नेहरू पार्क बोकारो

संग्रहालये

 • जवाहरलाल नेहरू संग्रहालय, इटानगर
 • नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी
 • नेहरू विज्ञान आणि तंत्रज्ञान संग्रहालय

खेळ

 • नेहरू कप (क्रिकेट)
 • नेहरू कप (फुटबॉल)
 • नेहरू ट्रॉफी बोट रेस

इतर

 • जवाहर चौक
 • जवाहर सर्कल
 • जवाहरद्वीप
 • जवाहर कला केंद्र
 • जवाहर एलपीएस कुरक्कोडू
 • जवाहर तारांगण
 • जवाहर सागर धरण
 • जवाहर सेतू
 • जवाहर बोगदा
 • जवाहरलाल नेहरू रोड, कोलकाता (चौरंगी रोड)
 • जवाहरनगर (गुजरात रिफायनरी)
 • नेहरू ब्रिगेड
 • नेहरू जॅकेट
 • नेहरू फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंट
 • नेहरू नगर
 • नेहरू ठिकाण
 • नेहरू तारांगण
 • नेहरू विज्ञान केंद्र
 • नेहरू सेतू
 • पंडित नेहरू बस स्थानक

पंडित जवाहरलाल नेहरू जयंती

१४ नोव्हेंबर रोजी देशाचे पहिले पंतप्रधान, पंडित नेहरू यांची जयंती देशभरात साजरी केली जाते. या दिवशी म्हणजेच १४ नोव्हेंबर १८८९ रोजी जवाहरलाल नेहरू यांचा जन्म झाला. त्यांच्या सन्मानार्थ नेहरू जयंतीला बालदिन साजरा केला जातो. जवाहरलाल नेहरूंना मुलांची खूप आवड होती. मुलांनाही ते खूप आवडायचे. यासाठी त्यांना प्रेमाने ‘चाचाजी’ म्हटले जायचे.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे दुर्मिळ फोटो

pandit jawaharlal nehru with mother
pandit jawaharlal nehru with che guevera
pandit jawaharlal nehru with indira
pandit jawaharlal nehru with film actors
pandit jawaharlal nehru with sarvepalli and indira
pandit jawaharlal nehru with sardar patel
pandit jawaharlal nehru with mohd rafi
pandit jawaharlal nehru with subhash chandra bose
pandit jawaharlal nehru withalbert einstein

FAQ

१.पंडित जवाहरलाल नेहरू का प्रसिद्ध आहेत?

पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे ते पहिले पंतप्रधान होते. पंडित नेहरू यांच्या धर्मनिरपेक्ष, लोकशाही व समाजवादी विचारशैलीमुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकारही संबोधले जाते.
पंडित नेहरूंना आधुनिक भारताचे शिल्पकार सुद्धा म्हटले जाते. त्यांना लहान मुले प्रचंड आवडत व लहान मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू म्हणून आवाज देत. नेहरू यांनी पहिल्यापासूनच देश भक्तीची भावना मनामध्ये रुजवून, प्रत्येकाला देशभक्तीचे धडे शिकवले. भारतीय जनतेच्या मनामध्ये नेहरूंचे स्थान हे उच्च असून, ते प्रत्येकाचे प्रेरणास्त्रोत होते.

२. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पूर्ण नाव काय?

जवाहरलाल नेहरू हे कुशाल बुद्धिमत्ताचे असून, ते एक महान लेखक, विचारवंत व राजकारणी असल्याने, त्यांना भारताचा महान शिल्पकार म्हणून संबोधले जाते. जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे त्यांचे पूर्ण नाव.नेहरूंचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद मधील एका काश्मिरी ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला.


३. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?

१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. देशवासीयांना भारतामध्ये मोकळ्या पणाने श्वास घेता येऊ लागले. गुलामगिरी संपली व देशाच्या प्रगतीसाठी लोकशाही व्यवस्था देशांमध्ये असावी असे प्रत्येकाने ठरवले, त्यामुळे देशात पहिल्यांदाच पंतप्रधानासाठी निवडणूक करण्यात आली.
यामध्ये काँग्रेसकडून पंतप्रधानाच्या दावेदारीसाठी निवडणुका सुरू झाल्या, त्यात लोहपुरुष म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल व आचार्य कृपयाणी यांनी यांना जास्त मते मिळाली होती. परंतु, गांधीजींनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव सुचवल्या कारणाने पंडित जवाहरलाल नेहरूंना पहिले पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आले.

४. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन कधी झाले?

पंडित जवाहरलाल नेहरू यांची प्रकृती चीन सोबत झालेल्या युद्धानंतर जास्त प्रमाणात बिघडू लागली. २७ मे १९६४ रोजी नेहरू यांना हृदयविकाराचा झटका येऊन, त्यांनी जगाचा निरोप घेतला.

पंडित जवाहरलाल नेहरू किती वर्ष पंतप्रधान होते?

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे तब्बल १७ वर्षे अखंडपणे देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान होते. त्यांचा पंतप्रधान पदाचा कालावधी हा ६,१३० दिवस इतका होता. पंतप्रधान असताना अखेर २७ मे १९६४ रोजी त्यांच्या निधनामुळेच त्यांच्या या प्रदीर्घ कारकिर्दीचा शेवट झाला

निष्कर्ष

मित्रहो, pandit Jawaharlal Nehru Information In Marathi ह्या आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास पंडित जवाहरलाल नेहरू यांची माहिती सांगितली आहे.

हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेयर करायला विसरू नका. धन्यवाद.

Leave a comment