आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2023 : Inter caste Marriage Scheme maharashtra 2023

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2023 : Inter caste Marriage Scheme maharashtra 2023 – महाराष्ट्र सरकारने आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच जातीय भेदभाव मतभेद दूर करण्यासाठी, आंतर जातीय विवाह योजना महाराष्ट्र 2023 सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमाने प्रथम जातीय विवाह लाभार्थी जोडप्याना ५०,०००/- रुपयांचे प्रोहत्सान दिले जात होते.

परंतु यावर्षीपासून राज्य सरकारने ते तीन लाखापर्यंत वाढवले आहे.आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत, आंतरजातीय विवाह करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही जोडप्याला आणि नवरा किंवा बायको पैकी एक अनुसूचित जाती असणाऱ्यांना, प्रोत्साहन म्हणून ३ लाख रुपये दिले जातील.

Table of Contents

महाराष्ट्र आंतर जातीय विवाह योजना 2023 : Inter caste Marriage Scheme maharashtra 2023

समाजातील विविध दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी तसेच सामाजिक सलोख्यासाठी काही प्रोत्साहनपर योजना सरकारकडून राबवल्या जातात. महाराष्ट्र सरकार अशीच एक योजना राबवत आहे. समानतेचा अधिकार, जाती जातींमधील भेदभाव दूर करणे, आणि देशातील भेदभाव दूर करण्यासाठी ही योजना राज्य सरकार राबवत आहे. ही योजना आंतर जातीय विवाह प्रोत्साहन अनुदान योजना आहे, ज्यामध्ये विवाहित जोडप्यांना 3 लाख रुपयांपर्यंतची रक्कम अनुदान म्हणून दिली जाते.

आंतर जातीय विवाह योजना महाराष्ट्र 2023 प्रस्तावना (Inter Caste Marriage Scheme Maharashtra Marathi)

आंतर जातीय विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कडे विवाह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. आंतरजातीय विवाह करणाऱ्यांनाच आणि अनुसूचित जाती मधील लाभार्थी ना या योजनेचा लाभ घेता येईल. जर एखादी व्यक्ती सर्वसाधारण वर्गातील असेल आणि तिने इतर कोणत्याही अनुसूचित जाती समाजातील व्यक्तीशी विवाह केला असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येईल.

या लेखाद्वारे आम्ही आपणास आंतर जातीय विवाह योजनेबद्दल (Inter Caste Marriage Scheme Maharashtra Marathi) संपूर्ण माहिती सांगणार आहोत हा लेख तुम्ही सविस्तर वाचावा.

Inter Caste Marriage Scheme Maharashtra Marathi

महाराष्ट्र आंतर जातीय विवाह योजना 2023 चे ठळक मुद्दे (Antarjatiya Vivah Yojana In Marathi)

योजनेचे नावआंतर जातीय विवाह योजना, महाराष्ट्र.
सुरुवात केलीमहाराष्ट्र शासन
योजना आरंभ3 सप्टेंबर 1959
लाभार्थीराज्यातील आंतर जातीय विवाह लाभार्थी
विभागसमाज कल्याण विभाग
मंत्रालयसामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महाराष्ट्र सरकार,
उद्देश समाजातील धार्मिक भेदभाव दूर करणे
लाभ3 लाख रुपये प्रोत्साहन रक्कम शासनाकडून प्राप्त होते
अधिकृत वेबसाईट sjsa.maharashtra.gov.in .
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
श्रेणीराज्य सरकारी योजना
वर्ष2023

आंतर जातीयविवाह योजना महाराष्ट्र 2023 महत्वपूर्ण माहिती (Antarjatiya Vivah Yojana Maharashtra)

नव बौद्ध – अनुसूचित जातीतून धर्मांतरित होऊन बौद्ध धर्मातगेलेल्यांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारने संविधान आदेश 1950 मध्ये सुधारणा करून अनुसूचित जाती संविधान आदेश बौद्धांना लागू केल्याचे जाहीर केले. या सुधारणे प्रमाणे अनुसूचित जातींची यादी हिंदू किंवा शीख किंवा बौद्ध यांनाही लागू आहे. त्यानुसार बौद्ध धर्म स्वीकारलेल्या नवीन अनुसूचित जातीच्या व्यक्ती या योजनेंतर्गत सवलती मिळण्यास पात्र आहेत.

ही योजना सुद्धा पहा 👉माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र ऑनलाइन अर्ज, फॉर्म PDF, पात्रता, योजनेचे लाभ

स्वातंत्ऱ्यानंतरही आपल्या देशात अजूनही जातीबाबत खूप भेदभाव केला जातो. हा भेदभाव कमी करण्यासाठी तसेच जाती जातींमधील दरी कमी करण्यासाठी सरकार वेळोवेळी अनेक योजना करत असते. यापैकी एक योजना आंतर जातीय विवाह योजना आहे, या योजनेंतर्गत, राज्य सरकार रु. 3 लाख पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम प्रदान करेल. या महाराष्ट्र आंतर जातीय विवाह योजना 2023 च्या माध्यमातून देशातील आंतर जातीय विवाहाबाबतचा भेदभाव कमी करून या योजनेमुळे समाजात आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन तर मिळेलच शिवाय पात्र जोडप्यांना प्रोत्साहनपर रक्कमही दिली जाईल.

Antarjatiya Vivah Yojana Maharashtra

आंतरजातीय विवाह योजनेचा उद्देश (Inter Caste Marriage Benefits)

महाराष्ट्र राज्यामध्ये तसेच विविध देशांमध्ये चालणाऱ्या जातीच्या मतभेदामुळे, व भेदभावामुळे आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले जात नाही. परंतु महाराष्ट्र सरकारने याबाबत दखल घेत, भेदभाव कमी करण्यासाठी, विविध योजना राबवल्या आहेत. त्यापैकी एक योजना म्हणजे “आंतर जातीय विवाह योजना” ही आहे. या योजनेच्या अंतर्गत, महाराष्ट्र राज्य सरकार रुपये ३ लाखापर्यंत प्रोत्साहन रक्कम (Inter Caste Marriage Benefits) प्रदान करते.

ही योजना सुद्धा पहा 👉नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2023 

आंतरजातीय विवाह बद्दल भेदभाव कमी करून, ही योजना समाजामध्ये आंतरजातीय विवाह प्रोत्साहन तर देईलच, परंतु ज्या जोडप्याने आंतरजातीय विवाह केला आहे, अशा जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून सरकार रक्कम सुद्धा प्रदान करणार आहे.

  • राज्यातून जाती धर्म यांमधील भेदभाव नष्ट करणे.
  • समाजात असणारा जात, धर्म भेदभाव नष्ट करून सर्व नागरिकांना समान हक्क देण्याच्या उद्देश्याने तसेच आंरजातीय विवाहास प्रोत्साहन आणि मदत देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
  • योजनेअंतर्गत राज्यातील नावायुवकांचा , नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे.
  • समाजात जाती धर्माबद्दल असलेला गैर समज आणि तेढ नष्ट करणे.
  • नवीन जोडप्यास आर्थिक सहाय्य करणे आणि तीनची पुढील वाटचाल सुकर करणे हा आंतरजातीय विवाह योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • नवीन विवाहित जोडप्यांना सशक्त तसेच आत्मनिर्भर बनविणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • नवीन विवाहित जोडप्यांचा जीवनस्तर सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरवात करण्यात आली आहे.
  • प्रत्येक धर्माला आणि जाती जमातींना समान स्थान देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे

आंतरजातीय विवाह योजना वेबसाइट (Aantarjatiya Vivah Anudan Yojana Maharashtra Website)

महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या सामान्य प्रवर्गांमधील मुलाने किंवा मुलीने, अनुसूचित जातीच्या मुला किंवा मुलीशी लग्न केल्यास, त्यांना या योजनेच्या माध्यमातून, राज्य सरकारकडून आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ दिला जाईल. तथा केवळ महाराष्ट्र राज्यांमधील ज्या जोडप्यांनी “हिंदू विवाह कायदा १९५५” किंवा “विशेष विवाह कायदा १९५४” च्या अंतर्गत विवाह नोंदणी केली आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.

ही योजना सुद्धा पहा 👉 गाय गोठा अनुदान योजना 2023

या योजनेसाठी, अर्जदारास देण्यात येणारी रक्कम केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून दिल्ली जाणार आहे. ही रक्कम केंद्र सरकार व राज्य सरकार ५०-५० टक्के देईल. या योजनेच्या माध्यमाने तुम्हाला लाभ प्राप्त करा Aantarjatiya Vivah Anudan Yojana Maharashtra 👇

महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज pdfयेथे क्लिक करा
संपर्क कार्यालयसंबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी,
जिल्हा परिषद / मुंबई शहर व उपनगरासाठी
समाज कल्याण अधिकारी.

आंतरजातीय विवाह योजना २०२३ ची वैशिष्ट्ये : Inter Caste Marriage Scheme Features

  • आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत, राज्य शासनाकडून लाभार्थ्यास ५०,०००/- रुपये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन तर्फे, २.५ लाख रुपये अशी एकूण ३ लाख रुपये रक्कम देण्यात येईल.
  • आंतरजातीय विवाह योजना २०२३ च्या अंतर्गत, जातीय भेदभाव कमी करून, सर्व धर्मांमध्ये समानता आणणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • आंतरजातीय विवाह योजना ही विशेषतः त्यात जोडप्यास दिली जाईल, ज्या जोडप्याने अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या मुला मुलीशी विवाह केला आहे.
  • महाराष्ट्र आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमाने, लाभार्थ्यांना देण्यात येणारी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दिली जाईल. त्यामुळे लाभार्थ्याचे बँक खाते असणे, व ते बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे गरजेचे आहे.
  • या योजनेच्या अंतर्गत वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ही रद्द करण्यात आली असून, जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ मिळेल.

आंतर जातीय विवाह अनुदान योजना पात्रता व निकष

  • लाभार्थी हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे गरजेचे आहे.आंतरजातीय विवाह
  • आंतरजातीय विवाह योजनेमध्ये दिली जाणारी रक्कम प्राप्त करण्यासाठी तरुण व महिलेचे वय अनुक्रमे २१ ते १८ वर्षापेक्षा कमी नसावे.
  • विवाहित जोडप्यांपैकी कोणीही एक अनुसूचित जाती किंवा जमातीचे असणे बंधनकारक असून, त्यांनाच आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ मिळेल.
  • केंद्र व राज्य सरकारकडून दिली जाणारी प्रोत्साहन रक्कम प्राप्त करण्यासाठी विवाहित जोडप्याने कोर्ट मॅरेज करणे बंधनकारक आहे.
  • आंतरजातीय विवाह योजनेमध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीने मागासवर्गीय किंवा सामान्य वर्गातील मुला, मुलीशी विवाह केल्यास त्याच लाभार्थ्यास या योजनेचा लाभ घेता येईल.

आंतरजातीय विवाह अनुदान अर्ज pdf

आंतरजातीय विवाह योजना २०२३ अटी व शर्ती

  • फक्त महाराष्ट्रातील नोंदणीकृत नागरिकांनाच आंतर जातीय विवाह योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या आंतर जातीय विवाह योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • लाभार्थी विवाहित जोडप्यांपैकी एक जण (मुलगा किंवा मुलगी) हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांपैकी असावा.
  • आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम खुल्या वर्गातील जोडप्यांना नसून फक्त त्याच लाभार्थ्यांना आहे ज्यांनी अनुसूचित जाति प्रवर्गातील मुलगा किंवा मुली सोबत विवाह केला आहे.
  • केवळ अशा जोडप्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल ज्यांचा विवाह हिंदू विवाह अधिनियम कायदा 1955 किंवा विशेष विवाह अधिनियम कायदा 1954 अंतर्गत झाला असेल.
  • या योजनेअंतर्गत विवाह करणारे संज्ञान असावेत आणि लग्न करणाऱ्या मुलाचे वय 21 वर्ष व मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना कोर्ट मॅरेज करणे अनिवार्य आहे.
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय यामधील आंतर प्रवर्गातील विवाहास आंतरजातीय विवाह मानण्यात येईल
  • अर्जदाराने या आधी जर केंद्र सरकार किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष मागासवर्गीय यापैकी एक व्यक्ती (मुलगा किंवा मुलगी) व दुसरी व्यक्ती (मुलगा किंवा मुलगी) हिंदू लिंगायत जैन शीख बौद्ध असल्यास हा विवाह आंतरजातीय विवाह मानण्यात येईल.
  • सदर योजनेचा लाभ आंतरजातीय विवाह केलेल्या व्यक्तींनाच मिळू शकेल.(अ.जा./अ.ज./भ.ज./वि.भ.ज./ई.मा.व./वि.मा.व. व यामधिल आंतर प्रवर्ग शासन निर्णयानुसार)
  • अर्जासोबत दोघांचे अलीकडील काळात काढलेले पासपोर्ट साईज | आकाराचे फोटो लावणे आवश्यक राहील.
  • वास्तव्याचा दाखला सदर योजनेचा लाभ घेणा-या जोडप्यापैकी वधू / वराचे कुटूंब महानगरपालिका क्षेत्रात किमान 3 वर्षे वास्तव्य असलेबाबत पुरावा म्हणून मालमत्ता धारक असल्यास चालू वर्षाचा मालमत्ता कर भरल्याची पावती/ निवडणूक ओळखपत्र/ मतदार यादीतील नांव/ पाणीपट्टी/ वीज बिल/ आधार कार्ड/ 3 वर्षाचा भाडे करारनामा/ पारपत्र (Pass Port)/ रेशनकार्ड / विवाह नोंदणी दाखला / राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक पुरावा म्हणून सादर करावा लागेल.
  • अर्जदाराने जिल्हा कार्यालय, ठाणे येथून संबंधित योजनेचा लाभ घेतला असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत वर व वधु यांचा शाळा सोडल्याचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
  • वर अथवा वधु जे मागासवर्गीय असतील त्याबाबत संबंधित सक्षम | प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीचा दाखला.
  • विवाह झाल्यानंतर तीन वर्षाच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराने पॅनकार्डची छायांकित प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत महाराराष्ट्राचे रहीवासी असल्यास मा.जिल्हाधिकारी यांचा दाखला जोडणे आवश्यक आहे.
  • विवाह नोंदणी दाखला अर्जासोबत जोडणे अनिवार्य राहील.
  • अर्जासोबत जोडण्यात आलेली सर्व छायांकित कागदपत्रे सक्षम अधिकाऱ्याने/स्वक्षांकित प्रमाणित केलेली असावीत.
  • दाखल केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने अर्थसहाय्य मंजुर करणे अथवा नाकारण्याचा अंतिम अधिकार मा. आयुक्त यांना राहील.

माहिती व्हिडिओ

आंतर जातीय विवाह अनुदान कागदपत्रे

१.राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे.
२.मुलाचे /मुलीचे जात प्रमाणपत्र
३.मुलाचे /मुलीचे वय प्रमाणपत्र
४.मुलाचे /मुलीचे मोबाईल नंबर
५.मुलाचा/मुलीचा पासपोर्ट आकाराचा फोटो
६.लाभार्थी विवाहित जोडप्याचे विवाह प्रमाणपत्र.
७.मुलाचे /मुलीचे आधार कार्ड
वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
कोर्ट मॅरेज सर्टिफिकेट
१० लाभार्थी विवाहित जोडप्यांपैकी एक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील असल्याचा पुरावा.
११ प्रतिष्ठित व्यक्तींकडून शिफारसीची दोन पत्रे
१२ लाभार्थी वधू आणि वर यांचे एकत्रित रंगीत छायाचित्र
१३ बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे
१४ मुलाचे /मुलीचे ईमेल
१५ लाभार्थी वधू-वरांचे शाळा सोडल्याचा दाखला

महाराष्ट्र, आंतरजातीय विवाह योजना २०२३ साठी अर्ज कसा करावा ?

ही योजना सुद्धा पहा 👉विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2023

ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्रात ऑफ लाईन अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

  • आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी मुंबई शहर व उपनगरांसाठी संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद/समाज कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयात भेट देऊन या योजनेसाठी अर्ज करा.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरा आणि अर्जासोबत संबंधित कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडा आणि तुमची ऑफलाइन नोंदणी पूर्ण करण्यासाठी अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सादर केल्याची पावती संबंधित कार्यालयातून घ्यावी.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्रात ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

  • प्रथमतः लाभार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे गरजेचे आहे. या वेबसाईटला भेट दिल्यानंतर मुख्य पान उघडेल.
  • मुख्य पानावर तुम्हाला आंतरजातीय विवाह योजनेचा पर्याय दिसेल.
  • या पर्यावर क्लिक करावे.
  • त्यानंतर नोंदणी फॉर्म उघडेल
  • या फॉर्ममध्ये तुम्हाला नाव, लग्नाची तारीख, आधार क्रमांक, इत्यादी. सारखी सर्व माहिती भरावी लागते.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतात.
  • यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
  • अशाप्रकारे तुमची ऑनलाईन नोंदणी होईल.

आंतरजातीय विवाहासाठी 2.5 लाख योजना काय आहे?आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील आंतरजातीय विवाहास राज्य शासनाकडून 50000/- रुपये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन च्या माध्यमातून 2.5 रुपये असे दोन्ही मिळून 3 लाख रुपये लाभार्थी वधू-वरास दिले जातात. आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून जातिगत भेदभाव कमी करून प्रत्येक धर्माला समान स्थान देणे आहे.

ऑफलाइन अर्ज नमूना

Inter caste Marriage Scheme maharashtra 2023

आंतरजातीय विवाह नोंदणी योजनेअंतर्गत अर्ज रद्द करण्याची कारणे

  • अर्जामध्ये थोडी अथवा अपर्ण माहिती भरून अर्ज केल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जात खोटी माहिती आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • विवाह आंतरजातीय नसल्याचे आढळून आल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जामध्ये बँक खाते चुकीचे दिल्यास, लाभाची रक्कम जमा केली जाणार नाही.
  • अर्जामध्ये IFSC कोड चुकीचा प्रविष्ट केला असल्यास किंवा राष्ट्रीय बँकेचे खाते नसल्यास, लाभाची रक्कम जमा केली जाणार नाही.
  • एकाच वेळी 2 अर्ज सादर केल्यास, अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदाराने याआधी केंद्र किंवा राज्य सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेतला असल्यास, अशा स्थितीत सादर केलेला अर्ज रद्द केला जाईल.

Inter Caste Marriage Beneficiaryआंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद / मुंबई शहर व उपनगरासाठी समाज कल्याण अधिकारी कार्यालयात जाऊन या योजनेचा अर्ज घ्यावा.

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्र 2023

योजनासविस्तर माहिती
योजनेचे नांवआंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना
योजनेचा प्रकारराज्य
योजनेचा उद्देशअस्पृश्यता निवारण करण्याचा एक भाग म्हणून आंरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक योजना
योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांवमहाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी
योजनेच्या प्रमुख अटीलाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा लाभार्थी /विवाहीत जोडप्या पैकी एकजण हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.( जातीचा दाखला देणे आवश्यक) लाभार्थी /विवाहीत जोडप्या विवाह नोंदणी /दाखला असावा. विवाहीत जोडप्याचे लग्न समयी वय वराचे 21 वर्षे व वधूचे 18 वर्षे पूर्ण असावे.( वर/वधु यांचे शाळा सोडल्याचे दाखले) दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्रे वधु /वराचे एकत्रित फोटो. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व्यक्ती पैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवंर्ण हिदु लिंगायत, जैन, शिख यांच्यातील असतील तर आतरंजातीय विवाह संबधोण्यात येतो व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती या मधील आंतर प्रवर्गातील विवाहास आंतरजातीय विवाहास संबोधण्यात येईल.
दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुपआंतर जातीय विवाहास रु 50000/- पतीपत्नीच्या सयुक्त नांवाने धनाकर्ष.
अर्ज करण्याची पध्दतविहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडून घेऊन विवाहीत जोडप्याने अर्जात नमूद कागदपत्राच्या मुळ व प्रमाणित प्रतीसह अर्ज प्रत्यक्षात सादर करावा.
योजनेची वर्गवारीसामाजिक सुधारणा
संपर्क कार्यालयाचे नांवसंबधीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद/ मुंबई शहर व उपनगरसाठी समाज कल्याण अधिकारी बृहमुंबई चेंबूर

Inter caste Marriage Yojana Maharashtra FAQ

आंतरजातीय विवाह म्हणजे काय?

आंतरजातीय विवाह (ICM), ज्याला जातीबाहेर लग्न करणे म्हणूनही ओळखले जाते, हा बहिर्विवाह विवाहाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये समाजव्यवस्थेमधील दोन वेगवेगळ्या जातींमधील दोन व्यक्तींचा समावेश होतो. आंतरजातीय विवाह विशेषतः दक्षिण आशियातील,भारतातील बहुतेक भागांमध्ये सामाजिकदृष्ट्या अस्वीकृत आणि निषिद्ध मानले जाते आणि यामुळे समाजात भेदभाव निर्माण होतो.

आंतरजातीय विवाहाचा मला कसा फायदा होऊ शकतो?

महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या सामान्य प्रवर्गांमधील मुलाने किंवा मुलीने, अनुसूचित जातीच्या मुला किंवा मुलीशी लग्न केल्यास, त्यांना या योजनेच्या माध्यमातून, राज्य सरकारकडून आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ दिला जाईल. तथा केवळ महाराष्ट्र राज्यांमधील ज्या जोडप्यांनी “हिंदू विवाह कायदा १९५५” किंवा “विशेष विवाह कायदा १९५४” च्या अंतर्गत विवाह नोंदणी केली आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. कायदेशीर आंतरजातीय विवाहासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून 50000/- रुपये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून 250000/- रुपये असे दोन्ही मिळून 3 लाख रुपये लाभार्थी वधू-वरास मदत म्हणून दिले जातात. 

आंतरजातीय विवाह करून पैसे मिळतात का?

होय , महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या सामान्य प्रवर्गांमधील मुलाने किंवा मुलीने, अनुसूचित जातीच्या मुला किंवा मुलीशी लग्न केल्यास, त्यांना या योजनेच्या माध्यमातून, राज्य सरकारकडून आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ दिला जाईल. तथा केवळ महाराष्ट्र राज्यांमधील ज्या जोडप्यांनी “हिंदू विवाह कायदा १९५५” किंवा “विशेष विवाह कायदा १९५४” च्या अंतर्गत विवाह नोंदणी केली आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल. कायदेशीर आंतरजातीय विवाहासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून 50000/- रुपये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून 250000/- रुपये असे दोन्ही मिळून 3 लाख रुपये लाभार्थी वधू-वरास मदत म्हणून दिले जातात. 

आंतरजातीय विवाहासाठी 2.5 लाख योजना काय आहे?

आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत अनुसूचित जाती जमाती तसेच नव बौद्ध प्रवर्गातील आंतरजातीय विवाहास महाराष्ट्र राज्य शासनाकडून 50000/- रुपये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून 250000/- रुपये असे दोन्ही मिळून 3 लाख रुपये लाभार्थी वधू-वरास मदत म्हणून दिले जातात. आंतरजातीय विवाह योजनेच्या माध्यमातून जाती अंतर्गत भेदभाव कमी करून प्रत्येक जाती धर्माला समान स्थान देणे आहे.

आंतर जातीय विवाह योजना कोणत्या जातीसाठी लागू आहे?

महाराष्ट्र राज्यामध्ये एखाद्या सामान्य प्रवर्गांमधील मुलाने किंवा मुलीने, अनुसूचित जातीच्या मुला किंवा मुलीशी लग्न केल्यास, त्यांना या योजनेच्या माध्यमातून, राज्य सरकारकडून आंतर जातीय विवाह योजनेचा लाभ दिला जाईल. तथा केवळ महाराष्ट्र राज्यांमधील ज्या जोडप्यांनी “हिंदू विवाह कायदा १९५५” किंवा “विशेष विवाह कायदा १९५४” च्या अंतर्गत विवाह नोंदणी केली आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.

आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत जोडप्यांना किती प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल?

आंतर जातीय विवाहास महाराष्ट्र राज्य शासनाकडून 50000/- रुपये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनच्या माध्यमातून 250000/- रुपये असे दोन्ही मिळून 3 लाख रुपये लाभार्थी वधू-वरास मदत म्हणून दिले जातात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी जोडप्यांनी कोर्ट मॅरेज करणे आवश्यक आहे का?

होय. आंतर जातीय विवाह योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना कोर्ट मॅरेज करणे अनिवार्य आहे. परंतु जर कोर्ट मॅरेज केले नसल्यास शासनाकडे विवाह नोंदणी करणे अनिवार्य आहे तसेच या आधी जर केंद्र सरकार किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही

कोणत्या वयोगटातील जोडप्यांना योजनेचा लाभ मिळेल?

या योजनेअंतर्गत विवाह करणारे संज्ञान असावेत आणि लग्न करणाऱ्या मुलाचे वय 21 वर्ष व मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

आंतर जातीय विवाह योजना महाराष्ट्र साठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट कोणती आहे?

आंतरजातीय विवाह योजना महाराष्ट्रासाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट आहे- sjsa.maharashtra.gov.in

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या आंतरजातीय विवाह योजना २०२३ या लेखाद्वारे आम्ही आपणास आंतरजातीय विवाह योजना २०२३ ची माहिती पात्रता वैशिष्टे, आवश्यक कागदपत्रे,अर्ज कसा करावा ? या बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.

आंतर जातीय विवाह योजना महाराष्ट्र हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment