Karla Caves Information In Marathi | कार्ला लेणी संपूर्ण माहिती मराठी – कार्ला लेणी माहिती – कार्ला लेणी लोणावळ्या जवळील कार्ला या गावाजवळ आहे. या लेण्या लोणावळ्यापासुन ११ किमी अंतरावर आहेत. कार्ला गुहा हे भारतातील सर्वात मोठे हीनयान बौद्ध चैत्यमंदिर आहे. कार्ला लेणी ही भारतातील सर्वात प्रसिद्ध बौद्ध रॉक-कट लेणी ठिकाणांपैकी एक आहेत. ज्यामध्ये एकूण १६ बौद्ध लेण्याचा गट असून त्यातील एक मुख्य चैत्यगृह आणि बाकीचे विहार आहेत. हे चैत्यगृहभारतातील सर्वात मोठे आहे. स्थापत्य, शिल्प आणि शिलालेखाच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्त्वाचे आहे.
नमस्कार मंडळी मराठी झटका डॉट कॉम या वेब पेजद्वारे आम्ही कार्ला लेणी याबाबत ची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग, जाणून घेऊयात कार्ला लेणी.
कार्ला लेणी संपूर्ण माहिती मराठी – Karla Caves Information In Marathi
स्थान | कार्ला लेणी |
ठिकाण | कार्ला, बोरघाट, लोणावळा |
लेणी प्रकार | बौद्ध लेणी |
निर्मितीचा काळ | इ.स.पू. १ ले शतक ते इ.स. ५ वे शतक |
वर्णन | महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक |
एकूण लेणी | १६ |
लेखांची लिपि | ब्राह्मी लिपि |
प्रस्तावना
आपल्या महाराष्ट्रातल्या या सह्याद्रीच्या कुशीत किती आश्चर्य घडली आहेत? हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही मग अगदी आकाशाला भिडणारे सह्याद्री पर्वत असोत किंवा सह्याद्रीच्या गडमाथ्यावरती फेट्याप्रमाणे भासणारे महाराजांचे किल्ले असोत, अगदीच काय तर कुशीत सुंदर लेण्या असून या सह्याद्रीचे वेगळेपण आपल्याला यातूनच पाहायला मिळते.
अशाच एका लेणीला आज आपण भेट देणार आहोत. कार्ला येथील लेणी म्हणजे एक स्थापत्य कलेमधल्या आश्चर्य. कार्ला लेणी म्हणजे हजारो वर्षांचा इतिहास. कुठली हि कला हा समाजाचा आरसा असतो. सांस्कृतिक वारसा जतन करायला कलेचा वापर झालेला दिसतो. आधी कळस आणि मग पाया या वचनानुसार बांधलेलं एक अलौकिक शिल्प ज्या कलाकारांनी बांधले त्यांच्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीत फक्त कृतज्ञता व्यक्त करू शकतो.
इसवी सन पाचव्या शतकाच्या आसपास बांधलेल्या खोदकामात भूमिती भूगर्भशास्त्र, हवा, प्रकाश यांचा अभ्यास करून शिल्पकारांनी आम्ही किती प्रगत आहोत हे सारे जगाला सांगितले. या कलांचे नमुने अनेकदा आपल्या अंतर्मनावर प्रभाव पडतात. निखळ आनंद देतात. मनाच्या गाभाऱ्यात एक शांतता पसरते, सकारात्मकते बरोबरच प्रेरणाही मिळते.
कार्ला लेणी नकाशा
कार्ला लेणी माहिती
कार्ला नावाचा अर्थ
कार्ला या नावाचा अर्थ खरा तर “मुक्त माणूस” असा होतो. हा शब्द मुळात जर्मन या देशातून आला. कार्ला गुहा हे भारतातील सर्वात मोठे हीनयान बौद्ध चैत्य मंदिर आहे. कार्ला लेणी ही भारतातील सर्वात प्रसिद्ध बौद्ध रॉक-कट लेणी ठिकाणांपैकी एक आहे. ज्यामध्ये फक्त १६ बौद्ध लेण्याचा गट आहे. मुख्य चैत्यगृह हे भारतातील सर्वात मोठे आहे. स्थापत्य, शिल्प आणि शिलालेखाच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे आहे.
कार्ला लेणी आणि एकविरा आई मंदिराचा इतिहास
कार्ला बौद्ध लेण्याचे १८५० साली काढलेले स्केच पाहता लेण्याच्या एका कोपऱ्यात एक छोटेसे मंदिर होते. ते मंदिर शिवकाल आणि पेशवे यांच्या कालखंडात निर्माण करण्यात आले आहे. ज्या भूभागावर मराठा सरदारांचे राज्य होते, त्या ठिकाणी सर्वात जास्त लेण्यावर अतिक्रमण झालेले पाहायला मिळते. प्रामुख्याने लेण्यात शंकराची पिंडी आपणास पहायला मिळते. कारण त्यावेळीचे मराठा सरदार हे महादेव भक्त होते, त्यांनी अनेक लेण्यांचा वापर शत्रूपासून लपण्यासाठी केला होता.
एकविरा देवीचे मंदिर हे लेण्याच्या प्रवेशद्वारा जवळ बांधण्याचे कारण काय असावे? याचा शोध घेतल्यास त्यावेळी असे लक्षात येते की, जे लोक या लेणीवर वास्तव करत होते, त्यांची भक्ति ही रेणुका मातेवर होती. म्हणून या ठिकाणी छोटेसे पूजास्थान निर्माण केले होते. या ठिकाणी असलेली देवीची मूर्ती पाषाणाची आहे.
संभावना आहे की, ही मूर्ती लेण्यातील एखाद्या दगडापासून तयार केली असावी. या मंदिराचा जिर्णोद्धार १८६६ साली करण्यात आला. येथून नंतर या ठिकाणी श्री एकविरा देवस्थान पाहता मिळते, या सर्व लोकांनी पुरातत्त्व विभागाला हाताशी धरून या लेण्यासमोर जे अतिक्रमण जबरदस्तीने वाढवले आहेत, ते कोणत्याही शहाण्या माणसाला लेणी आधी की मंदिर हे लगेच कळेल.
- अजिंठा लेणी संपूर्ण माहिती मराठी
- दौलताबाद, देवगिरी किल्ला माहिती मराठी
- एलोरा/ वेरूळ लेणी संपूर्ण माहिती मराठी
कार्ला लेण्यांचे बांधकाम
कार्ला लेणी सातवाहनांचे भारतीय शासक यज्ञ श्री सातकर्णी, ज्याला गौतमीपुत्र यज्ञ श्री असेही म्हणतात, याच्या कारकिर्दीत बांधण्यात आले होते.
कार्ला लेण्यांचे सविस्तर वर्णन
कार्ला लेणी हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहे बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफा पुणे जिल्ह्यात मळवली पासून लोणावळा चार ते पाच किलोमीटर अंतरावर आहे. सहा किलोमीटर अंतरावर लोणावळ्यांची कार्ले येथील चैत्यगृहाचे स्थापत्य शिल्पे सुंदर आहे. कार्ले गुंफा ह्या बोर घाटात स्थित आहे.
बोरघाट सातवाहन कालीन प्राचीन बंदरे कल्याण आणि सोपारा या ठिकाणाहून या प्राचीन ठिकाणास जाण्याच्या मार्गावर आहे. शतक ते इस पाचवे शतक या काळात ही लेणी खोदली गेलेली आहे. भारत सरकारने या लेणीला दिनांक २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. कार्ल्या गुंफांमध्ये कदाचित सर्वात जास्त मोठ्या संख्येने चैत्य सभागृह आहे.
कार्ला लेणी या बौद्धिष्ट लेण्या असून यामध्ये एकूण १६ लेण्या आहेत. बऱ्याच लेण्या या धर्माच्या सुरुवातीच्या हिनयान पंथाच्या टप्प्यातील दिसून येतात. यातील तीन लेण्या या बौद्ध धर्माच्या महायान पंथातील टप्प्यातील आहेत. या लेण्यांमध्ये चैत्यगृह हे ही मुख्य लेणी आहेत. हे चैत्यगृह त्याकाळचे एक भव्य प्रार्थना स्थळ होते. या चैत्यगृहाची निर्मिती इसवी सन पूर्व पहिल्या शतकात झाली होती. याच्या छतांमध्ये लाकडाचे कोरीव काम आपल्यास पहावयास मिळते.
या चैत्यगृहात डाव्या आणि उजव्या बाजूला नक्षीदार कोरलेले खांब देखील बघण्यासारखे आहेत. या खांबांवर हत्ती, घोडे, स्त्री, पुरुष यांची शिल्पे आपल्याला पहावयास मिळतात. याच्या प्रवेशद्वारा जवळ असलेल्या मोठ्या खिडकीतून सूर्यप्रकाश आत येऊन तो थेट चैत्यगृहामध्ये असलेल्या स्तूपावर पडतो. या ठिकाणच्या १५ इतर लेण्या या आकाराने लहान असून त्यांना विहार म्हटले जाते. यांचा वापर प्रार्थना स्थळ आणि राहण्यासाठी म्हणून केला जात होता. या प्रवेशद्वाराजवळ सिंहस्तंभ दिसून येतो, जो उत्तर प्रदेशातील सारनाथ या ठिकाणी सम्राट अशोकाने उभारलेल्या सिंह स्तंभाची आपल्याला आठवण करून देतो.
या ठिकाणी बौद्ध भिक्षूंचे खडकात खोदलेले मठ दिसून येतात. त्या पुढे गेल्यावर एकविरा देवीचे मंदिर देखील बांधलेले आपल्याला दिसून येते. या मंदिराच्या बाजूलाच एक मोठे चैत्यगृह आहे. त्याची उंची जवळपास ११ मीटर आणि रुंदी ११ मीटर आणि असून लांबी ४० मीटर आहे. ही बौद्ध लेणी इसवी सन पहिल्या किंवा दुसऱ्या शतकातील आहेत. या भव्य चैत्यगृह द्वारापाशी डाव्या बाजूला स्तंभशीर्ष आहे. तो ४५ फुटांचा उंच वर्तुळाकार बैठकीचा स्तंभ असून तो १६ कोनांमध्ये घडवलेला आहे. त्याच्यावर आवळ्याप्रमाणे गोलाकार कोरीव काम केलेले दिसून येते. त्याला अमलग असे म्हणतात.
त्यावर हरमिकेचा चौथरा देखील आहे. ज्याच्यावर चार सिंहांचा सिंहस्थंभ कोरलेला आहे. मिथुन शिल्पातील स्त्री मूर्तींवर सुबक दागिने देखील कोरलेले आपल्याला दिसून येतात. येथील सज्जाच्या दोन्ही बाजूला अनेक मजली प्रासादांचे देखावे देखील आहेत. याच्या तळाशी तीन हत्तींची शिल्पे असून त्यावर गौतम बुद्धांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या सज्जात ज्या कलाकारांनी लेणी खोदली, त्यांचा शिलालेख देखील आपल्याला दिसून येतो. या लेणीमध्ये ब्राह्मणी लिपीतील एकूण 35 शिलालेख आढळून येतात.
मिथुन शिल्पातील कोरलेल्या स्त्री मूर्तीच्या डोक्यावर पदर असून कमरेला शेला आहे. तसेच पुरुष मूर्तीच्या अंगावर धोतर आणि डोक्यावर मुंडासे घातलेले दिसून येते. येथील स्त्री मूर्तींच्या हातात बांगड्या देखील आहेत. तसेच पायात तोडे, कमरेच्या वर मेखला, गळ्यामध्ये मण्यांचे हार, कर्णफुले आणि कपाळावर कुंकू अशी आभूषणे दिसून येतात.
या लेखातून तत्कालीन समाज, त्यांचे नातेसंबंध, रूढी परंपरा, व्यापार, व्यवसाय, चलन असे अनेक विषय समजू शकतात. रेणुका म्हणजे आजचे डहाणू, सोपारक आजचे सोपारा, करीत कार्ल्याच्या उत्तरेला असलेले करंजगाव प्रभास म्हणजे, आजच्या काठेवाड भागातील प्रभास तिर्थ वैजयंती म्हणजे आजचे कर्नाटकामधील उत्तर कन्नड जिल्ह्यातील वनवासी.
अशा अनेक गावांचे उल्लेख या लेखातून दिसून येतात. चैत्यगृहाच्या भिंतीवरील एका लेखात मामालाआहारे हा शब्द आलेला आहे. तत्कालीन समाजव्यवस्थेत एखाद्या ठराविक गावांच्या प्रदेशास प्रशासकीय भागास आहार असे म्हणतात. या लेखांमधून वडकी, सुतारकाम, गंधक, सुगंधी द्रव्याचा व्यापार अशा काही व्यवसायांची ही ओळख होते.
कार्ल्यातील लेणी कलेचा उत्तम नमुना एकविरा आई मंदिर
“एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाय तुझी कोल्यांवरी” या भक्तीगीताच्या बोलाप्रमाणेच नवसाला पावणारी कोळी यांचे आराध्य दैवत असणारी, देवी म्हणून एकविरा देवीला हिंदू समाजात मोठे महत्त्वाचे स्थान आहे. एकवीरा देवीचे मंदिर लोणावळ्याच्या कार्ला लेणीच्या बाजूला स्थापन आहे. यामुळे या देवीचे महत्व काही वेगळेच आहे.
महाराष्ट्रात देवींची साडेतीन शक्तीपीठ मानली जातात, त्यापैकी पार्वती आणि रेणुका मातेचा अवतार असणारी एकवीरा देवी, मंदिराच्या प्रवेशद्वारावर अखंड दगडात कोरलेले दोन भव्य हत्ती, तुमचे स्वागत करतात. शेजारी एकवीरा देवीची पूजा केली जाते. एक जागृत देवस्थान म्हणून आई एकविरेची ख्याती आहे. आश्विन नवरात्र किंवा शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र अनेक भावीक या मंदिरात पूजा आणि उत्सव साजरा करण्यासाठी गर्दी करतात. चैत्र नवरात्रीत म्हणजेच एप्रिल महिन्यात देवीची भव्य यात्रा भरते. देवीचे भक्तगण दर्शन घेण्यासाठी नवस करण्यासाठी इथे येत असतात. हजारो पालख्या दिंड्या परंपरेनुसार कोकणातून कार्ल्याला पायी आणल्या जातात.
कोळी समाजाच्या लोकांबरोबरच एकवीरा देवीची उपासना बऱ्याच इतर समाजातील लोकांकडून विशेषता प्रभू आणि दैवज्ञ यांच्याकडूनही केली जाते. तसेच काही कुणबी समाजातील काही लोकांची ही कुलदेवत आहे. याशिवाय सोनार, पाठवले, चौकशी, पाच कळशी अशा अनेक समाजाची ही देवी कुलस्वामिनी असल्याचे सांगितलं जातं. तसेच एकविरा देवी ही ठाकरे घराण्याची कुलदेवी दर्शनासाठी येत असतात.
पौराणिक कथेनुसार एकविरा देवीचे मंदिर पांडवांनी बांधल्याचं मानलं जातं. असं म्हणतात, की पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा त्यांना एकविरा देवीने दर्शन दिलं होतं एकविरा माता त्यांच्यासमोर घ्यायची म्हणून देवीने एक अट घातली, एका रात्रीत बांधून पूर्ण झालं पाहिजे. हे सुंदर मंदिर एका रात्रीत बांधून पूर्ण केला आणि एकविरा गुहेत मंदिराची स्थापना केली. पांडवांच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने त्यांना वरदान दिलं की त्यांच्या अज्ञात वासात ते कोणालाही सापडणार नाही.
अतिशय प्राचीन असलेले हे मंदिर पूर्वी हेमाडपंती होतं. या आधी प्राचीन मंदिराचा जिर्णोधार देवी अहिल्याबाई होळकर यांनी केल्याचे सांगितलं जातं. तर काही संदर्भ सांगतात. १८६६ मध्ये देखील या मंदिराचा जिर्णोधार करण्यात आला होता. आणि या मंदिराची बांधणी दोन कालखंडामध्ये झाली आहे. इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकाच्या दरम्यान देखील पार पडले. आणि इसवी सन पाचव्या शतकापासून ते दहाव्या शतकापर्यंत देखील या मंदिराचे बांधकाम चालत होतं. पहिला शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना म्हणजे हे मंदिर.
महाबळेश्वर पर्यटन स्थळे माहिती मराठी
कार्ल्या लेण्याला भेट द्यायला कसे जाल ?
बससेवा
आपल्याला जर या ठिकाणी जायचे असल्यास लोणावळ्यापासून ते एकविरा मंदिरापर्यंत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेसचा वापर करता येतो. तसेच ऑटो रिक्षा देखील उपलब्ध आहेत. सेंट्रल पॉईंट लोणावळा, शिवनेरी बस स्टॉप पासून पाच किलोमीटर, पुणे शहर महाराष्ट्र पासून ४९ किलोमीटर, मुंबई पासून ९७ किलोमीटर आहे.
रेल्वेसेवा
पुणे लोणावळा मार्गावर लोणावळ्याच्या अलीकडील मळवली रेल्वे स्टेशन पासून हे मंदिर पायी चालायच्या अंतरावर आहे पुणे ते लोणावळा अशी लोकल रेल्वेची सेवा आहे.
विमानसेवा
मुंबई विमानतळ हे कार्ला लेण्यांना पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तसेच पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ ६२ किमी अंतरावर आहे.
कार्ला लेणीमध्ये किती पायऱ्या आहेत?
सुंदर कार्ला लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी १५० पायऱ्या पार कराव्या लागतात. कार्ला लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी डोंगराच्या पायथ्यापासून ३५० पायर्या चालाव्या लागतात किंवा कार पार्कपासून 200 पायऱ्या चालव्या लागतात. लेण्यांच्या बाजूला एकवीरा देवीचे मंदिर देखील आहे.
पर्यटकांसाठी कार्ला लेणीची वेळ
पर्यटकांसाठी कार्ला लेणीची वेळ आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 8:30 ते संध्याकाळी 5:00 पर्यंत आहे. पावसाळ्याच्या दिवसात किंवा कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कार्ला लेणी उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ बदलू शकते.
कार्ला लेणी ते मुख्य शहर अंतर
लोणावळ्यापासून ११ किमी अंतरावर, पुण्यापासून ५९ किमी आणि मुंबईपासून ९७ किमी अंतरावर आहे.
कार्ला लेणीला भेट देण्यासाठी उत्तम महिना
तुम्ही कार्ला लेणीला ऑक्टोबर ते मार्च पर्यत भेट देऊ शकता.
कार्ला लेणीला भेट देण्यासाठी प्रवेश शुक्ल
लेण्यांच्या आत जाण्यासाठी तिकिटांची आवश्यकता असते. कार्ला लेणीला भेट देण्यासाठी तिकिट बूथ डोंगराच्या माथ्यावर प्रवेशद्वाराजवळ आहे. प्रवेश शुल्क भारतीयांसाठी 25 रुपये आणि परदेशी पर्यटकांसाठी 300 रुपये आहे.
कार्ल्या लेण्या जवळील प्रेक्षणीय स्थळे
एकविरा आई मंदिर
कार्ला लेण्याच्या बाजूलाच एकविरा आईचे मंदिर आहे. पुणे जिल्ह्यात लोणावळा परिसरातील वेहेरगाव – कार्ला नावाने प्रसिद्ध असणारा गड आहे. या गडावर एकविरा आई आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध मंदिर आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध असं हे देवीचं जागृत देवस्थान मानलं जातं. एकविरा आई आणि जोगेश्वरी अशा दोन मूर्ती या मंदिरात दिसून येतात. नणंद आणि भाऊजय असं या दोघींचं नातं असल्याचे सांगितले जाते. जोगेश्वरी ही काळ भैरवनाथांची बायको आहे. म्हणजेच काळभैरवनाथ हे एकविरा आईचे भाऊ असं देखील त्यांचं नातं आहे. या मंदिरात नियमित पूजा आणि आरती, अभिषेक करण्यात येतो. तसंच पौर्णिमा आणि आमावस्येच्या आदल्या दिवशी चतुर्दशीला देवीला पंचामृत स्नान करून अभिषेक घातला जातो. नवरात्रोत्सवाच्या काळात याठिकाणी मोठा उत्सव आणि जत्रेचे देखील आयोजन करण्यात येतं
लोहगड किल्ला
लोहगड हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला राजकीय कारणांसाठी खूप वापरात आणलेला किल्ला आहे. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक व इतिहास प्रेमी या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात. महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ सह्याद्री डोंगर रांगांमध्ये विस्तारलेला किल्ला आहे. लोहगड हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून, या किल्ल्याची उंची 3400 फूट इतकी आहे. या किल्ल्याची निर्मिती राजा सुरजमल यांनी केली असे म्हटले जाते. हा किल्ला चढाई करण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीचा किल्ला असून, महाराष्ट्रातील सर्वोत्तम डोंगरी किल्ल्यांपैकी एक आहे.
भाज्या लेणी
लोणावळा जवळील मळवली येथून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर भाज्या आहे. भाज्या लेणीला पुरातत्त्व खात्यांमार्फत बांधिव दगडी पायऱ्या बनवल्या असून, या पायऱ्यांच्या साह्याने चालत दहा मिनिटांमध्ये आपण लेणीच्या प्रांगणात पोहोचतो. संपूर्ण पायऱ्यावर चढून जात नाही तोपर्यंत लेणी दृष्टीस पडत नाही. भाज्या लेणी चा समावेश 1909 मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारकांमध्ये केलेला आहे.
बेडसा गुंफा
पावसाळ्यामध्ये या लेणीला भेट देणे म्हणजे याची मज्जा काहीतरी वेगळीच असते. कारण संपूर्ण डोंगर हिरवा शालू पांघरून आपल्या सोबत उभा आहे असं वाटतं. तसेच पावसाळ्यामध्ये तुम्ही या लेणीला भेट दिली तर तुम्हाला येथे नैसर्गिक असलेले पाहायला मिळतात.
पवना धरण
पवना हे धरण महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक आहे. हे धरण महाराष्ट्र राज्यातील जलाशयात वसलेले एक कृत्रिम तलाव आहे. पावना तलावाच्या जवळच आपल्याला थंड हवा, खुला आकाश, वाहत पाणी आणि मोहक व निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळत. व हिरव्यागार मैदानात टेंट मध्ये राहण्यासाठी महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आवर्जून या ठिकाणाला भेट देतात. पावना धरण महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मावळ या तालुक्यांमध्ये आहे. मुंबई आणि पुणे शहरा जवळील लोकप्रिय विकेंड गेटवे पैकी एक आहे. हे ठिकाण लोणावळा या लोकप्रिय पर्यटन स्थळा जवळ आहे .लोणावळा शहरापासून साधारणता वीस किलोमीटर इतके अंतरावर हे ठिकाण वसलेले आहे. लोणावळ्यातील सर्वात शांत तलावांपैकी एक आहे. कुटुंब आणि मित्रांसमवेत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी एक अद्भुत ठिकाण आहे.
कार्ल्या लेण्याजवळील बेस्ट हॉटेल्स
- 1)द कार्ला होम स्टे
- 2)कार्ला रिट्रीट
- 3)हॉटेल कार्ला हिल
- 4)रिदम लोणावळा
FAQ
कार्ला लेणी कशासाठी प्रसिद्ध आहेत?
कार्ला गुहा हे भारतातील सर्वात मोठे हीनयान बौद्ध चैत्य (मंदिर) आहे.
कार्ला लेणी ही भारतातील सर्वात प्रसिद्ध बौद्ध रॉक-कट लेणी ठिकाणांपैकी एक आहे, ज्यामध्ये फक्त १५ गुहा आहेत. मुख्य चैत्यगृह हे भारतातील सर्वात मोठे चैत्यगृह आहे. स्थापत्य, शिल्प आणि शिलालेखाच्या दृष्टिकोनातून देखील हे महत्त्वाचे आहे.
कार्ला लेणी किती वर्षे जुनी आहे?
कार्ला लेणी दुसरे शतक ई.स.पूर्व ते पाचवे शतक या कालावधीत विकसित झाली. सर्वात जुनी गुहा मंदिरे 160 BCE मधील असल्याचे मानले जाते. तसेच ते अरबी समुद्रापासून ते अगदी पूर्वेकडे, दख्खनकडे जाणाऱ्या प्रमुख प्राचीन व्यापारी मार्गाजवळ निर्माण झाले होते.
कार्ले येथे चैत्यालय कोणत्या घराण्याने बांधले?
कार्ला लेणी सातवाहन भारतीय शासक, यज्ञ श्री सातकर्णी , ज्यांना गौतमीपुत्र यज्ञ श्री म्हणूनही ओळखले जाते, यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आली होती. आणि ती बनवासी येथील व्यापारी भूतपालाने बांधली होती.
कार्ला लेणीचे तिकीट किती आहे?
लेण्यांच्या आत जाण्यासाठी तिकिटांची आवश्यकता असते. कार्ला लेणीला भेट देण्यासाठी तिकिट बूथ डोंगराच्या माथ्यावर प्रवेशद्वाराजवळ आहे. प्रवेश शुल्क भारतीयांसाठी 25 रुपये आणि परदेशी पर्यटकांसाठी 300 रुपये आहे.
कार्ला लेणीमध्ये किती पायऱ्या आहेत?
कार्ला लेण्यांपर्यंत पोहोचण्यासाठी डोंगराच्या पायथ्यापासून ३५० पायर्या चालाव्या लागतात किंवा कार पार्कपासून 200 पायऱ्या चालव्या लागतात. लेण्यांच्या बाजूला एकवीरा देवीचे मंदिर देखील आहे.
कार्ला कोणते शहर आहे
कार्ला हे भारताच्या दक्षिण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पुणे आणि मुंबई दरम्यानच्या महामार्गावरील एक शहर आहे.
कार्ला लेणी भेट देण्यासारखे आहेत का?
जर तुम्ही लोणावळ्यात गेलात तर कार्ला लेणी हे सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. कारण भारतातील सर्वात मोठे हीनयान बौद्ध चैत्य मंदिर कार्ला लेणीमध्ये दुर्गा देवीचे म्हणजेच एकवीरा आईचे मंदिर आहे. नवरात्रीच्या काळात हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक आहे. रेल्वेने किंवा रस्त्याने मंदिराला भेट देता येते.
कार्ला लेणीमध्ये किती गुहा आहेत?
कार्ला गुहा हे भारतातील सर्वात मोठे हीनयान बौद्ध चैत्य (मंदिर) आहे. कार्ला लेणी ही भारतातील सर्वात प्रसिद्ध बौद्ध रॉक-कट लेणी ठिकाणांपैकी एक आहे ज्यामध्ये फक्त १५ गुहा आहेत. मुख्य चैत्यगृह हे भारतातील सर्वात मोठे आहे. स्थापत्य, शिल्प आणि शिलालेखाच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचे आहे.
कार्ला लेणी कोणी बांधली?
महाराष्ट्रातील लोणावळ्याजवळ कार्ला लेणी आहेत. ते प्राचीन बौद्ध रॉक-कट लेण्यांचा एक समूह आहे जो ईसापूर्व 2 व्या शतकातील आहे. लेणी बौद्ध भिक्खूंनी बांधली होती आणि त्यांचा उपयोग ध्यान,राहण्यासाठी आणि पूजा स्थळ म्हणून केला जात असे.
कार्ला लेण्यांमध्ये काय लिहिले आहे?
इतर चैत्य आणि विहारमध्ये अनेक कोरीव चैत्य, तसेच विहार किंवा लेण्यांच्या भिक्षूंची राहण्याची ठिकाणे आहेत. या लेण्यांचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे कमानदार प्रवेशद्वार आणि आतील भाग. या लेण्यांमधील खांबांवर ब्राह्मी लिपीत दानशूरांची नावे कोरलेली आहेत. तसेच शिलालेख आढळून येतात.
कार्ला लेण्यांसाठी किती वेळ लागेल?
कार्ला लेण्यांचा फेरफटका मारण्यासाठी साधारणपणे २ तासांचा कालावधी लागतो.
निष्कर्ष
मित्रहो आम्ही आमच्या आजच्या लेखातून कार्ला लेण्यांबद्दल माहिती दिली आहे. हि माहिती तुम्ही नक्की वाचा. आणि कमेंट करून आम्हास नक्की कळवा .
धन्यवाद.
कार्ला गुंफा फोटो