तोरणा किल्ला माहिती मराठी : TORNA FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE

TORNA FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE | तोरणा किल्ला माहिती मराठी – तोरणा हा किल्ला प्रचंडगडाच्या डोंगराळ भागात वसलेला आहे. त्यामुळे या किल्ल्यावर विजय मिळवणं, म्हणजे आजूबाजूचा अनेक मैलाचा परिसर ताब्यात घेण्यासारखे आहे. या किल्ल्यावरून संपूर्ण परिसरावर देखरेख करणे सोपे जात असे, अशी या किल्ल्याची रचना केली गेली.

Table of Contents

तोरणा किल्ला माहिती मराठी : TORNA FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE

किल्ला –तोरणा किल्ला
दुसरे नाव –प्रचंडगड
ठिकाण –वेल्हे तालुका
जिल्हा –पुणे , महाराष्ट्र
किल्ल्याचा प्रकार –गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी –मध्यम
किल्ल्याची स्थापना –ई. स. १४७० – १४८६
ऊंची –४६०४ फूट / १४०३ मीटर
डोंगररांग –सह्याद्री
सध्याची स्थिति –चांगली
किल्ला पाहण्याची वेळ –स. ९ ते सं. ५ पर्यन्त

प्रस्तावना

साधारणतः या किल्ल्याचे निर्माण इसवी सन १४ व्या शतकाच्या शेवटच्या काळात झाले. तोरणाच्या उंची आणि विस्तारलेल्या प्रदेशामुळे जेम्स डग्लस कौतुकाने या किल्ल्याला सिंहगडचा – केव ऑफ लायन म्हणतात. आम्ही आमच्या लेखातून TORNA FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE दिली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा.

तोरणा किल्ला नकाशा

तोरणा किल्ल्याचा इतिहास

TORNA FORT INFORMATION IN MARATHI LANGUAGE

१९  फेब्रुवारी १६३० साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्याकाळी जवळपास संपूर्ण भारतावर मुघलांचं राज्य होतं. अनेक परकीय आक्रमणे होत होती आणि अशातच महाराष्ट्राच्या जनतेचे खूप हाल होत होते. त्यामुळे आपले स्वतःचे सुशासित आणि जनतेची सेवा करणारे राज्य असावे, अशी मांसाहेब जिजाऊ यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी असे संस्कार शिवरायांवर केले.

आपण लढून स्वतःचा स्वराज्य निर्माण करावं असं शिवरायांनी लहानपणीच मनाशी पक्क केलं. यासाठी त्यांनी मावळ भागातील तरुणांना एकत्रित करण्यास सुरुवात केली. शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची प्रतिज्ञा घेऊन, मावळ प्रांत काबीज करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. हे सर्व करताना त्यांचे वय फक्त १६ वर्षे होते.

इसवी सन १६४७ साली शिवरायांनी तोरणा जिंकला. याच विजयापासून हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली, असे काही इतिहासकार सांगतात. तर काही अभ्यासकांच्या म्हणण्याप्रमाणे या गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडे होती त्यामुळे याला तोरणा हे नाव पडले.

TORNA FORT INFORMATION IN MARATHI

सिंधुदुर्गातील २३ किल्ले

तोरणगडाचे बांधकाम

शिवाजी महाराजांनी गडाची पाहणी करत असताना गडाचा प्रचंड विस्तार पाहून गडाचे नाव प्रचंडगड असे ठेवले.  शिवरायांनी गडाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले, यावेळी खोदकाम करताना सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या चार घागरी सापडला होत्या, त्या गुप्तधनाचा वापर करून तोरण आणि राजगडाचे बांधकाम करण्यात आले. या गुप्तधनाला देवीचा आशीर्वाद म्हणून जेथे या घागरी सापडल्या होत्या, तेथे शिवरायांनी तोरणादायी देवीचे मंदिर बांधले.

इसवी सन १४७० ते १४८६ च्या दरम्यान बहमनी राजवट होती. पुढे हा किल्ला निजामशाही कडे गेला. काही वर्षांच्या कालावधीतच यावर विजापूरच्या आदिलशहाने विजय मिळवला. नंतर तो महाराजांनी ताब्यात घेतला. गडावर काही इमारती बांधल्या, किल्ल्याची दुरुस्ती केली. राजांनी आग्र्याहून आल्यावर अनेक गडांचा जीर्णोद्धार केला. त्यात पाच हजार होन इतका खर्च त्यांनी तोरणावर केला. संभाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला मोघलांकडे गेला. तेव्हा मोघल महाराष्ट्रात ठाण मांडून बसले होते. पण शंकरजी नारायण सचिवांनी तो परत मराठ्यांच्या ताब्यात आणला.

पुढे इसवी सन १७०४ मध्ये औरंगजेबाने याला वेढा घातला व लढाई करून आपला ताब्यात आणला. व याचे नाव दैवी विजय ठेवले. पण हा किल्ला मोघलांच्या ताब्यात जास्त काळ राहिला नाही. परत चार वर्षांनी सरनोबत नागोजी कोकाटे यांनी गडावर हल्ला चढवून मोठ्या जिगरीने लढाई करून, धाडसाने गड पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आणला. यानंतर तोरणा कायम स्वराज्यातच आहे.

पुरंदरच्या तहात जे किल्ले मोघलांना दिले यामध्ये तोरणा महाराजांकडेच राहिला. विशेष म्हणजे औरंगजेब बादशहाने लढाई करून जिंकलेला असा हा मराठ्यांचा एकमेव किल्ला आहे. आणि तो देखील मराठ्यांनी काही काळातच परत मिळवला होता.

TORNA FORT INFORMATION IN MARATHI

तोरणा किल्ल्याची भौगोलिक रचना

पुण्याच्या ७० ते ७१ किलोमीटर नैऋत्येस असणारा तोरणा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून, ट्रेकिंगसाठी चढाई पातळी ही मध्यम ते कठीण असा आहे. तोरणा किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ही साधारणतः ४६०३ फुट इतकी आहे. किल्ल्याच्या प्रचंड असलेल्या रचनेमुळे याला प्रचंडगड असे देखील नावाजले जाते. हा गड अतिशय विशाल व मजबूत आहे.

  • तोरणा किल्ला पुणे जिल्ह्यातील सह्याद्री पर्वताच्या पूर्व दिशेला दोन भागात विभाजन झाला आहे.
  • एका रांगेत रायगड आणि राजगड हे किल्ले वसले असून, दुसऱ्या पर्वताच्या रंगीला भुलेश्वर असे म्हणतात.
  • २७६ उत्तर अक्षांश आणि ७३.६१३ पूर्व रेखांश दरम्यान हा किल्ला वसलेला आहे.
  • या किल्ल्याच्या दक्षिणेत वेलवंडी नदी असून उत्तरेला गायनात नदीचे खोरे आहेत.
  • गडाच्या पश्चिमेला कडवे खिंड असून गडाच्या पूर्व दिशेला वामन आणि खरीवखिंडी आहे.

आमचा हे लेख देखील नक्की वाचा.

तोरणागड किल्ला पर्यटनासाठी चालू व बंद होण्याची वेळ

पर्यटकांना तोरणागड सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बघण्यासाठी किल्ला पर्यटकांसाठी चालू असतो.

तोरणागड किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना/ वेळ

पावसाळ्यानंतर तोरणा या किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना आहे. म्हणजे अंदाजे तुम्ही ऑक्टोंबर ते मार्च यादरम्याने तोरणाला भेट देऊ शकता. यावेळी इकडचा निसर्ग हा हिरवाईने नटून गेलेला असून, या ठिकाणी वातावरणामध्ये एक वेगळे तजेलदारपणा असतो.

तोरणागड किल्ला

तोरणागड किल्ला पर्यटनासाठी अंतर व लागणारा कालावधी

मुंबई ते तोरणा किल्ला अंतर व लागणारा कालावधी

मुंबई ते तोरणा किल्ला हे अंतर २१२ किलोमीटर एवढे असुन, प्रवासासाठी ५ तास लागतात.

पुणे ते तोरणा किल्ला अंतर व लागणारा कालावधी

पुणे ते तोरणा किल्ला हे अंतर ७० किलोमीटर इतके असून प्रवासासाठी २ तास लागतात.

कालावधी / दिवस – तोरणा किल्ला त्या आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी अंदाजे २ दिवस लागू शकतात.  

तोरणागड गडावरील बांधकाम

तोरणा किल्ला जसा उंच तसाच रुंद ही आहे. गडाला २ माची आहेत. एक झुंजार माची दुसरी सुळवेची माची. झुंजार माची खरोखरच झुंजार आहे. भक्कम तट आणि खाली खोल खोल कडे आहेत. झुंजार माचीवरून गडाखाली उतरावयास एक वाट आहे. परंतु ती इतकी भयंकर अवघड आहे कि स्वर्गाची वाट ही इतकी अवघड नसेल. या वाटेवरून जाताना अर्धे बोट जरी तोल गेला, तरीही दया होणार नाही, त्या दृष्टीने स्वर्गाला ती वाट फार जवळची आहे.

महाराष्ट्रातल्या अत्यंत बळकट व अत्यंत बिकट किल्ल्यांच्या पंक्तीत येण्याचा मान पहिला आहे. काळेकुट्ट कडे, अत्यंत अरुंद वाटा, भक्कम दरवाजे, कळ्या सर्पा सारखी वळसे घेत, गडावर कडेकडेने गेलेली तटबंदी आहे .गडाला दोन दरवाजे आहेत. एक आहे पुण्याच्या दिशेला म्हणजे साधारणतः उत्तरेला बिनी दरवाजा आणि दुसरा पश्चिमेला.

सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस असलेल्या तोरणा किल्ल्यावर मेंघाई देवीचे मंदिर असून, मंदिर अतिप्राचीन आहे. रात्रीच्या वेळी मंदिरात दहा ते पंधरा लोकांच्या राहण्याची व्यवस्था आहे.

तोरणा किल्ला

तोरणा किल्ल्यावरील प्रेक्षणीय स्थळे

तोरणा किल्ल्यावर खालील प्रेक्षणीय स्थळे आहेत –

  • बुधला माची
  • झुंजार माची
  • कोठी दरवाजा
  • कोकण दरवाजा
  • मेंघाई देवीचे मंदिर
  • बिनी दरवाजा
  • तोरणाजाई देवीचे मंदिर

तोरणा किल्ल्या जवळील प्रेक्षणीय स्थळे

राजगड किल्ला

राजगड हा किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी असून, या राजगडाचे पूर्वीचे नाव मुरंब देव असे होते. दख्खनच्या पठारावरील सगळ्यात मजबूत किल्ला म्हणजे राजगड होय. हा एक गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून छत्रपती शिवाजी महाराज हे याचे शासक होते. राजगडच्या माथ्यावरून सह्याद्री पर्वतरांगेंचे अचंबित करणारे दृश्य दिसते. हा एक ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा असलेला किल्ला आहे.

मढेघाट धबधबा

तोरणा आणि राजगड गडापासूनच, वेल्हे गावापासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर मढेघाट धबधबा आहे. मढे घाटात जाण्यासाठी पुण्याहून दोन रस्ते आहेत. पहिला रस्ता सिंहगडाच्या बाजूने पाबे घाटातून जातो. आणि दुसरा रस्ता म्हणजेच पुणे बेंगलोर रस्त्यावरून नसरापूर मार्गे. सिंहगड जिंकून घेणाऱ्या तानाजी मालुसऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह याच घाटातून त्यांच्या कोकणातील गावे नेण्यात आला, तेव्हापासून याला मढेघाट नाव पडल्याचे गावकरी सांगतात. या घाटातून वाहणारा धबधबा अतिशय अप्रतिम आहे.

सिंहगड / कोंढाणा किल्ला

सिंहगड मुख्यातः प्रसिद्ध आहे, तो तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आग्र्यातून सुटून परत आले, त्यावेळी त्यांनी पुरंदरच्या तहात दिलेले किल्ले परत घ्यायला सुरुवात केली. स्वराज्याची राजधानी त्यावेळी राजगडावरती होती. आणि राजगडापासून जवळच असलेला कोंढाणा किल्ला योग्य राहील असे मांसाहेब जिजाऊंना वाटत होते.

यात सुमारास तानाजी मालुसरे स्वतःचा मुलगा रायबाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी महाराजांकडे आले. आणि आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाच अशी गर्जनाकरात तानाजी मालुसरे यांनी स्वतः कोंढाण्याची मोहीम स्वीकारली. अवघ्या ५०० मावळ्यांना सोबत घेऊन किल्ल्याचा किल्लेदार उदयभान राठोड याचा पराभव करत तानाजी आणि मावळ्यांनी कोंढाणा अर्थात सिंहगडावर भगवा फडकवला.

सुवेळा माची

राजगड किल्ल्यावरील तीन माची आहेत. सुवेळा माची, संजीवनी माची व पद्मावती माची. सुवेळा माची मध्ये चिलाखती बुरुज, हत्तीने दार ही मुख्य आकर्षणे आहेत. या माचीची रचना अतिशय सुरेख व सुंदर आहे. माचीमध्ये दुहेरी संरक्षण भिंत असून मुख्य उपबुरूज देखील आहे.

कडवे खिंड

तोरणा किल्ला जवळील कडवे खिंड देखील एक प्रेक्षणीय स्थळ असून, या ठिकाणची हिरवीगार व आल्हाददायक दृश्ये तुम्हाला अचंबित करतात.

झुंजार माची

तोरणा किल्ल्याच्या पूर्वेला झुंजार माची आहे. झुंजार माची खरोखरच झुंजार आहे. भक्कम तट आणि खाली खोल-खोल कडे आहेत. झुंजार माचीवरून गडाखाली उतरावयास एक वाट आहे. परंतु ती इतकी भयंकर अवघड आहे. कि स्वर्गाची वाट ही इतकी अवघड नसेल.

सनराइज् पॉईंट

या पॉईंटवरून तुम्ही सूर्योदयाचा आनंद घेऊ शकता व सूर्याच्या कोवळ्या किरणांचा व त्यामुळे निसर्गामध्ये दिसणाऱ्या अलौकिक दृश्यांचा आनंद घेऊ शकता.

रायगड किल्ला

रायगड किल्ला हा तोरणा किल्ल्यापासून जवळ असून हा एक गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. या किल्ल्याला रायरी असे प्राचीन नाव होते. शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याला सुस्थितीत आणून इसवी सन १६७४ मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केले.

पानशेत धरण

हे धरण पुणे जिल्ह्यातील वेल्हे या गावांमध्ये कृत्रिमरीत्या तयार करण्यात आले. पृथ्वी-भरण भरण्याच्या उपक्रमामध्ये या धरणाचे बांधकाम करण्यात आले.

नागेश्वर मंदिर

नागेश्वर हे मंदिर शिवशंकर यांना समर्पित असून, हे पुणे जिल्ह्यामध्ये तोरणा जवळील एक प्रेक्षणीय स्थळ आहे. चौदाव्या शतकामध्ये नागेश्वर मंदिराची स्थापना झाली. मंदिराच्या परिसरामध्ये एक कुंड आहे. या कुंडाला नागतीर्थ किंवा नागेंद्रतिर्थ म्हणून ओळखले जाते.

रायलिंग पठार

हे पठार प्रसिद्ध असून पावसाळ्याच्या काळात या पठाराची सौंदर्यता अजून वाढते. या ठिकाणी हिवाळ्यामध्ये व गवतांनी भरलेले लांबच लांब मळे आहे जे कॅम्पिंग साठी व रात्रभर मुक्काम करण्यासाठी हा एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे. या ठिकाणहून तुम्हाला लिंगाणा किल्ला रायगड किल्ला पाहता येतो.

TORNA FORT TREK

तोरणा किल्ला ट्रेक

तोरणा किल्ला ट्रेक हा मध्यम ते कठीण अडचण पातळीचा असून, पावसाळ्याच्या काळामध्ये या गडाची ट्रेकिंग करणे टाळावे. या ठिकाणी तुम्ही हिवाळ्याच्या महिन्यामध्ये ट्रेक करू शकता. ट्रेकिंग प्रेमींसाठी तोरणा गड हे एक लोकप्रिय कॅम्पिंग ग्राउंड आहे. किल्ल्याच्या आत बसण्यासाठी राहण्यासाठी मेंगाई देवीचे मंदिर हे एक उत्तम ठिकाण आहे.

किल्ल्याच्या ट्रेकिंग साठी तुम्ही दोन पर्यायांचा अवलंब करू शकता. एक जो वेल्हे या गावातून जातो जो एका दिवसाचा ट्रेक आहे. व दुसरा राजगड किल्ल्याच्या मार्गाने जातो. जो दोन दिवसाचा ट्रेक आहे. यावेळी तुम्ही रात्रभर कॅम्पिंग करून दुसऱ्या दिवशी ट्रेक पूर्ण करू शकता. डोंगर माथ्यावर वसलेला तोरणा हा अतिविशाल व सर्वात उंच किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. तोरणा किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना नसरापूर या रस्त्याने जावे लागते किल्ला पूर्ण न्याहाळण्यासाठी अंदाजे २ ते २.५ तास लागू शकतात.

तोरणा किल्ला ट्रेक मार्ग /चढाई पातळी

तोरणा किल्ला ट्रेक मार्ग मध्यम ते कठीण असून, चढाई मार्ग हा खडकाळ आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ट्रेकच्या मार्गावर रेलिंग बसवल्या आहेत. पावसाळ्याच्या काळात ट्रेकिंग करणे हे खूप कठीण होऊन जाते. यामुळे पावसाळ्याच्या काळात शक्यतो तोरणा गडाची ट्रेकिंग करणे टाळावे.

तोरणा किल्ला ट्रेकसाठी कालावधी

ट्रेकसाठी साधारणतः पायथ्यापासून माथ्यापर्यंत जायला २ ते ३ तास आवश्यक आहेत.

तोरणा किल्ला ट्रेकसाठी कोणत्या गोष्टी सोबत ठेवाव्यात

  • फर्स्ट एड किट.
  • ओळखीचे प्रमाणपत्र.
  • टोपी, स्कार्फ व सनग्लासेस.
  • मुबलक दोन ते तीन लिटर पाणी.
  • एनर्जी ड्रिंक.
  • जास्त कॅलरीचे खाद्यपदार्थ जसे की शेंगदाणे ड्रायफ्रूट इत्यादी.
  • सेफ्टी पिन ,शिट्टी (अत्यावश्यक वेळी)
  • ज्यादा कपड्यांचे जोड.
  • स्वेटर जर्किन जॅकेट.
  • पावसाच्या काळामध्ये जर तुम्ही ट्रेकिंग करत असाल तर त्यावेळी तुमच्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी झाकून ठेवण्यासाठी प्लास्टिक शीट.
  • सन स्क्रीन.
  • ट्रेकिंग पोल.

तोरणा किल्ला ट्रेकिंगसाठी घ्यावयाची काळजी

  • तोरणा किल्ला ट्रेकिंग कठीण असून नवशिक्षित ट्रेकिंगप्रेमींनी हा गड पावसाळ्यात ट्रेक करू नये.
  • किल्ल्याची उंची जास्त असल्याकारणाने पावसाळ्यामध्ये शक्यतो ट्रेकिंग करणे टाळावे कारण पायवाट ही निसरडी झालेली असते.
  • चप्पलांचा वापर करू नये, पकड चांगल्या असणाऱ्या बुटांचा वापर करावा.
  • टॉर्च व ज्यादा बॅटरी सोबत ठेवावी.
  • हवामानाचा अंदाज घेत ट्रेकिंग साठी जावे.
  • आपण ज्या ठिकाणी ट्रेकिंगला जात आहोत त्या ठिकाणी परिसर स्वच्छ ठेवावा.
  • प्लास्टिक बॉटल, कचरा, कागद खाद्यपदार्थ पर्यावरणात टाकू नये.

तोरणा किल्ला ट्रेकसाठी सर्वोत्तम महिना

पावसाळ्यानंतर आणि उन्हाळा पर्यंतच सह्याद्रीचे सौंदर्य हे खुलून निघते. या काळामध्ये अर्थात सप्टेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्याने तुम्ही किल्ल्याचे ट्रेकिंग करू शकता. या कालावधीमध्ये तुम्हाला किल्ल्याभोवती हिरवेगार गवत, हिरवागार निसर्ग अचंबित करून सोडतो

तोरणा किल्ला ट्रेक

तोरणा किल्ला येथील हवामान

हवामान हे मध्यम ते अतिप्रखर उष्ण असे असून सरासरी तापमान हे अंदाजे १९ -३३ डिग्री सेल्सिअस असते.

  • उन्हाळा – एप्रिल ते मे च्या दरम्याने या ठिकाणी तापमान हे उष्ण असून ४२ डिग्री सेल्सिअस पर्यंत असते.
  • हिवाळा – हिवाळ्यामध्ये रात्रीच्या वेळी तापमान हे साधारणतः १० डिग्री सेल्सिअस इतके असून, सकाळच्या वेळी तापमान २६ डिग्री सेल्सिअस असते.
  • पावसाळा – या ठिकाणी वार्षिक पर्जन्यमान हे साधारणतः ७६३ मिलिमीटर इतके असते.

तोरणा जवळील सोयीसुविधा

जेवणाची व राहण्याची सोय – गडावर जेवणाची व राहण्याची सोय नाही. स्थानिक गावांमध्ये रेस्टॉरंट उपलब्ध आहेत. या ठिकाणी तुमची जेवणाची व राहण्याची सोय उपलब्ध आहे.

  • पोस्ट ऑफिस – स्थानिक गावामध्ये पोस्ट ऑफिसची सुविधा उपलब्ध आहे.
  • दवाखाने – गावामध्ये ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध आहे.
  • पोलीस स्टेशन – गावामध्ये पोलीस स्टेशनची सुविधा देखील उपलब्ध आहे.

बोलल्या जाणाऱ्या भाषा –

  • मराठी
  • हिंदी
तोरणा किल्ला ट्रेक

तोरणा किल्ला येथे कसे जाल ?

तोरणा किल्ला माहिती मराठी– तोरणा किल्ल्याला जाण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाडीने किंवा सार्वजनिक बसने जाऊ शकता. या ठिकाणी जाण्यासाठी वेल्हे हे पायथ्याचे गाव असून, या गावापासून तोरणा किल्ल्याचा ट्रेक सुरू होतो. तोरणा किल्ल्याला भेट देण्यासाठी खालील तीन पर्यंत तुम्ही वापर करू शकता.

रस्ते मार्ग – मुंबई ते तोरणा किल्ला हे अंतर २१२ किलोमीटर आणि पुणे ते तोरणा किल्ला हे अंतर ७० किलोमीटर इतके असून रस्ते मार्गाने जाण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या गाडीने किंवा सार्वजनिक बसचा वापर करून ऑटो किंवा कॅब बुक करून तुम्ही तोरणागडाला भेट देऊ शकता.

रेल्वे मार्ग – पुणे हे जवळचे रेल्वे स्थानक असून, पुणे रेल्वे स्थानकावर उतरून तुम्ही कॅब किंवा ऑटो बुक करून तोरणा किल्ल्याला भेट देऊ शकता.

हवाई मार्ग – तुम्ही हवाई मार्ग हा पर्याय निवडत असाल तर पुणे विमानतळ हे जवळचे विमानतळ आहे. पुणे विमानतळ वर उतरून कॅब किंवा ऑटो करून तोरणा किल्ल्यापर्यंत जाऊ शकता.

तोरणा किल्ल्याजवळ राहण्याची सोय

किल्ल्याजवळ तुम्हाला तुमच्या बजेटनुसार योग्यती राहण्याची व खाण्याची सोय केली जाते. त्याचपैकी काही हॉटेल्स व रिसॉर्टची माहिती खालील प्रमाणे –

स्वराज्य तोरणा हॉटेल

हे हॉटेल तोरणा किल्ल्यापासून जवळच असून, या हॉटेलमध्ये तुम्हाला तुमच्या बजेटनुसार योग्यती रूम उपलब्ध करून दिली जाते. त्याचप्रमाणे तुम्हाला विनामूल्य वायफाय, विनामूल्य नाश्ता, पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीचे सुंदर जेवण देखील उपलब्ध आहे.

ब्ल्यू वॉटर रिसॉर्ट वेल्हे

वेल्हे गावामधले असलेले ब्ल्यू वॉटर रिसॉर्ट हे तोरणा जवळील एक प्रसिद्ध रिसॉर्ट आहे. या रिसॉर्ट मध्ये तुम्हाला उत्तम जेवणाची सोय उपलब्ध असून, विनामूल्य वायफाय, विनामूल्य नाश्ता, पार्किंगची सुविधा वातानुकूलित रूम उपलब्ध आहेत.

तोरणा हेरिटेज रिसॉर्ट

तोरणा जवळील प्रसिद्ध असणारे तोरणा हेरिटेज रिसॉर्ट यामध्ये तुम्हाला उत्तम जेवणाची सोय, तसेच विनामूल्य वायफाय, विनामूल्य पार्किंग एरिया, विनामूल्य नाष्टा व वातानुकूलित रूम उपलब्ध आहे.

बालाजी रिसॉर्ट वेल्हे

हे रिसॉर्ट वेल्हे या गावांमध्ये असून एक सुंदर व निसर्गरम्य असलेले ठिकाण आहे. या रिसॉर्ट मध्ये तुम्हाला योग्य ते बजेटनुसार रूम्स व जेवणा-खाण्याची उत्तम सोय केली जाते.

राजसा रिसॉर्ट

हे रिसॉर्ट तोरणा किल्ल्याजवळ असून या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बजेटनुसार योग्यरित्या पाहुणचार दिला जातो.

तोरणा किल्ला ट्रेक

FAQ

पुणे ते तोरणा किल्ला अंतर व आवश्यक कालावधी किती?

पुणे ते तोरणा किल्ला हे अंतर ७० किलोमीटर इतके असून प्रवासासाठी २ तास १५ मिनिटे लागतात.

तोरणा किल्लावरील प्रेक्षणीय स्थळे कोणती ?

बुधला माची
झुंजार माची
कोठी दरवाजा
कोकण दरवाजा
मेंघाई देवीचे मंदिर
बिनी दरवाजा
तोरणा जाई देवीचे मंदिर

तोरणा किल्ल्यावर राहण्याची सोय उपलब्ध आहे का?

सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस असलेल्या तोरणा किल्ल्यावर मेंघाई देवीचे मंदिर असून, मंदिर अति प्राचीन आहे. रात्रीच्या वेळी मंदिरात दहा ते पंधरा लोकांच्या राहण्याची व्यवस्था आहे.

तोरणा किल्ल्याची थोडक्यात माहिती लिहा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना इसवी सन १६४७ मध्ये जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे तोरणा. तोरणा हा किल्ला प्रचंड गडाच्या डोंगराळ भागात वसलेला आहे. त्यामुळे या किल्ल्यावर विजय मिळवणं म्हणजे आजूबाजूचा अनेक मैलाचा परिसर ताब्यात घेण्यासारखे आहे. या किल्ल्यावरून संपूर्ण परिसरावर देखरेख करणे सोपे जात असे. अशी या किल्ल्याची रचना केली गेली. साधारणतः या किल्ल्याचे  निर्माण इसवीसन १४ व्या शतकाच्या शेवटच्या काळात झाले.

तोरणा किल्ला चढणे सोपे आहे का?

ट्रेकिंग साठी प्रसिद्ध असलेला तोरणा हा किल्ला पुणे शहरापासून ५२ किमी अंतरावर असून ट्रेकिंगच्या शौकिनांसाठी हा एक मध्यम अवघड ट्रेक आहे.

तोरणा किल्ला कोणी ताब्यात घेतला?

तोरणा किल्ला, ज्याला प्रचंडगड किल्ला असे म्हटले जाते, हा पुणे जिल्ह्यातील किल्ला, छत्रपती शिवाजींनी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून घेतला.

तोरणा किल्ला कोणी बांधला ?

तोरणा किल्ला, ज्याला प्रचंडगड किल्ला असे म्हटले जाते , हा किल्ला, शिवपंथाने 13 व्या शतकात बांधला होता. त्यानंतर इ.स. 1470 ते 1486 या काळात बहमनी शासका मलिक अहमद याने या किल्ल्याचा ताबा घेतला. नंतर किल्ला निजामशाही राजवटीत होता. छत्रपती शिवाजींनी वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून घेतला.

तोरणगड निष्कर्ष

आजच्या तोरणागड या लेखातून आम्ही आपणास तोरणगड चा इतिहास, तोरणगड जवळील प्रेक्षणीय स्थळे राहण्याची सोय तसेच तोरणागड ट्रेक इत्यादी बद्दल माहिती दिली आहे. TORNA FORT INFORMATION IN MARATHI : तोरणा किल्ला माहिती मराठी – हा लेख तुम्ही नक्की वाचा आणि कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद.

Leave a comment