काशी विश्वनाथ मंदिर माहिती मराठी : KASHI VISHWANATH TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE – भगवान शंकराला समर्पित असणारे हे प्रसिद्ध हिंदू मंदिर भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी शहरांमध्ये गंगा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले भारतातील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग पैकी एक म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर. या मंदिराचा इतिहास तसेच या मंदिराची संपूर्ण माहिती आणि पौराणिक कथा काय आहे याची संपूर्ण माहिती आम्ही या लेखाद्वारे आपणास भेट आहोत. चला तर मग, पाहूया काशी विश्वनाथ मंदिराची माहिती. काशी विश्वनाथ मंदिर
काशी विश्वनाथ मंदिर माहिती मराठी : KASHI VISHWANATH TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE
नाव – | श्री काशी विश्वनाथ |
स्थान – | भगवान शंकर |
दुसरे नाव – | काशी विश्वेश्वर मंदिर |
ज्योतिर्लिंग – | ९ वे |
कुठे आहे – | उत्तर प्रदेश राज्यांमध्ये वाराणसी शहरात |
नदी – | गंगा |
स्थापना – | इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर |
स्थापना – | १७८० |
काशी विश्वनाथ मंदिराचे स्थान
काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास
भगवान शंकर आणि माता पार्वतीचे मूळ स्थान असलेल्या या काशी विश्वनाथ मंदिरला “विश्वेश्वर मंदिर” म्हणूनही ओळखले जाते. महाभारत आणि उपनिषदांमध्ये या मंदिराचा उल्लेख आहे. परंतु हे मंदिर कोणी बांधले याचा उल्लेख नाही. ११९४ मध्ये महमद घोरीने हे मंदिर लुटून नष्ट केले होते. इतिहासकारांच्या मते या मंदिराचा अकबराच्या नवरत्नांपैकी एक राजा तोडरमल यांनी जीर्णोद्धार केला होता. नारायण भट्ट यांच्या मदतीने अकबराच्या सांगण्यानुसार १५८५ मध्ये त्यांनी या मंदिराचे नूतनीकरण केले होते. दहाव्या शतकाच्या अखेर पासून मंदिर आणि शहराला परकीय आक्रमणाचा सामना करावा लागला.
१८ एप्रिल १६६९ रोजी औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर नष्ट करण्याचा आदेश जारी केला. त्याच्या आदेशानुसार मंदिर काढून त्या ठिकाणी ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली. २ सप्टेंबर १६६९ रोजी औरंगजेबाला मंदिर पाडून झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर औरंगजेबाने तेथील हजारो ब्राह्मणांना मुस्लिम बनवण्याचा आदेश दिला. आज उत्तर प्रदेशातील जवळपास ९०% मुस्लिम ब्राह्मण आहेत.
त्यानंतर इंदूरच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी या संकुलामध्ये KASHI VISHWANATH JYOTIRLINGA मंदिर बांधले. त्यानंतर पंजाबचे महाराजा रणजीत सिंग यांनी १००० किलो सोने दान करून मंदिराला सोन्याचे शिखर बांधले. ग्वाल्हेरच्या महाराणी बायजाबाईंनी ज्ञानवापीचा मंडप बांधला आणि महाराजा नेपाळ यांनी तिथे एक विशाल नंदीची मूर्ती बसवली.
काशी विश्वनाथ मंदिर दर्शन वेळापत्रक
काशी विश्वनाथ मंदिर उघडण्याची वेळ खालीलप्रमाणे आहे.
- पहाटे ४.०० ते सकाळी ११.००पर्यंत भाविकांसाठी खुले असते.
- दुपारी १२.०० ते संध्याकाळी ७.०० दर्शन (मोफत दर्शन वेळ)
- मंगला आरतीची वेळ – पहाटे ०३.०० ते पहाटे ०४.०० आहे.
- मंदिरातील सामान्य दर्शनाची वेळ – पहाटे ०४.०० ते सकाळी ११.०० पर्यंत असते.
- भोग आरतीची वेळ – सकाळी ११.२५ ते दुपारी १२.२०
- काशी विश्वनाथ मंदिरात मोफत दर्शनाची वेळ – दुपारी १२:०० ते संध्याकाळी ७:०० आहे.
- सप्त ऋषींच्या आरतीच्या वेळा – संध्याकाळी ०७.00 ते रात्री ०८.१५
- संध्या आरतीची वेळ – संध्याकाळी ०७.०० ते रात्री ०८.००
- शृंगार आरती – रात्री ०९.०० ते रात्री १०.१५
- शयन आरतीची वेळ – रात्री १०.३० ते ११.००
- काशी विश्वनाथ मंदिर बंद होण्याची वेळ रात्री ११.००
मंदिराचे वेळापत्रक असेच बनवले आहे जेणेकरून भाविकांना त्रास होणार नाही आणि मंदिरातील गर्दीवरही नियंत्रण ठेवता येईल.
वेळापत्रकानुसार मंदिरात येऊन दर्शन सहज करता येते. ठराविक सण उत्सवाच्या वेळेत बदल होऊ शकतो.
- 🙏चौथे ज्योतिर्लिंग : श्री ओंकारेश्वर 🙏
- 🙏पाचवे ज्योतिर्लिंग : श्री परळी वैजनाथ 🙏
- 🙏सहावे ज्योतिर्लिंग : श्री भीमाशंकर 🙏
काशी विश्वनाथ मंदिरासंबधित महत्त्वपूर्ण गोष्टी
- पवित्र गंगा नदीत स्नान करून काशी विश्वनाथ मंदिरामध्ये गेल्यावर मोक्ष प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे.
- आदी शंकराचार्य, महर्षी दयानंद, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, एकनाथ महाराज यांनी या मंदिराला भेट दिली होती असे सांगितले जाते.
- मंदिराचा घुमट सोन्याचा आहे यासाठी पंजाबच्या रणजीत सिंह यांनी १००० किलो सोने दान केले होते. म्हणूनच या मंदिराला “सुवर्ण मंदिर” म्हणूनही ओळखले जाते.
- वाराणसी शहर हे भगवान शंकरांच्या त्रिशूळावर विसवलेले आहे असे मानले जाते.
- हे मंदिर १५.५ मीटर उंच आहे.
- मंदिर परिसरामध्ये कालभैरव, विरूपाक्ष, गौरी, भगवान विष्णू यांची देखील मंदिरे आहेत.
- असे म्हटले जाते की ज्यावेळी पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा सूर्याचे पहिले किरण काशीवर पडले होते.
- या मंदिरामध्ये दिवसांमध्ये पाच वेळा आरती केली जाते.
- श्री.काशी विश्वनाथ लाईव्ह दर्शन
काशी विश्वनाथ मंदिराची वास्तूकला
या मंदिराचा आकार हा चतुर्भुज असा आहे. इतर देवतांच्या लहान लहान मंदिरांनी हे मंदिर वेढले गेले आहे. या मंदिरातील स्थापित केलेले ज्योतिर्लिंग हे गडद तपकिरी रंगाच्या दगडापासून बनवले आहे. उत्तर भारतातील मंदिरांप्रमाणेच काशी विश्वनाथ मंदिरही नगारा शैलीत बांधण्यात आले आहे.
या मंदिराच्या माथ्यावरील घुमट हे श्रीयंत्राने सजवलेली आहे.
या मंदिराला चार मुख्य द्वार आहेत. शांती द्वार, कलाद्वार, प्रतिष्ठान आणि निवृत्ती द्वार. संपूर्ण जगामध्ये असे एकही ठिकाण नाहीये जिथे शिव-शक्ती एकत्र राहतात. आणि तिथे तंत्रद्वारही आहे. या मंदिराच्या गर्भगृहाच्या ईशान्य कोपऱ्यात ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराचा मुख्य दरवाजा हा दक्षिण दिशेला असून ज्योतिर्लिंगाचे मुख हे अघोराकडे आहे. असे म्हटले जाते की, या मंदिरामध्ये प्रवेश करताच आपण केलेली सगळी पापे नष्ट होऊन जातात.
काशी विश्वनाथ कॉरिडोर
हे मंदिर गंगा नदीच्या पश्चिम तीरावर आहे. येथील प्राचीन मंदिराला नवीन तयार करण्यात येणारा कॉरिडॉर हा गंगेच्या घाटांशी जोडला गेला आहे. डिसेंबर २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मध्ये काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. या प्रकल्पांतर्गत मंदिर परिसरामध्ये फूड कोर्ट, विजिटर्स गॅलरी, सिटी म्युझियम, भोग शाळा, वैदिक केंद्र, पर्यटक सुविधा केंद्र, मुमुक्षू भवन यांची देखील बांधकाम करण्यात येणार आहे, या प्रकल्पाची एकूण किंमत जवळपास ८०० कोटी रुपये आहे.
काशी विश्वनाथ मंदिर कुठे आहे? आणि कसे जायचे?
उत्तर प्रदेश राज्यांमध्ये, वाराणसी शहरामध्ये, गंगा नदीच्या तीरावर हे मंदिर वसलेले आहे. वाराणसी हे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय विकसित असे झालेले असल्यामुळे या ठिकाणी अनेक राष्ट्रीय महामार्गाने रस्ते जोडले गेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी ट्रेन, विमान, बस याद्वारे तुम्ही सहज पोचू शकता.
विमान
काशी विश्वनाथ मंदिरापासून जवळपास २५ किलोमीटरच्या अंतरावर लालबहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे. या विमानतळावरून मंदिरापर्यंत येण्यासाठी कॅब, टॅक्सी, किंवा ऑटो उपलब्ध असतात.
ट्रेन
वाराणसी या शहरापर्यंत येण्यासाठी देशातील विविध भागातून ट्रेनची सुविधा उपलब्ध आहे. वाराणसी रेल्वे स्टेशन ते काशी विश्वनाथ मंदिर यामधील अंतर जवळपास ३ ते ४ किलोमीटर आहे. स्टेशन पासून मंदिरापर्यंत कॅब, टॅक्सी किंवा ऑटो ने येऊ शकता.
बस
वाराणसी हे शहर विविध शहरांनी रस्त्याने जोडले गेलेले असल्यामुळे या ठिकाणी बऱ्यापैकी बस सेवा उपलब्ध आहेत. वाराणसी पासून जवळपास ३ ते ४ किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर असल्यामुळे या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही ऑटो किंवा कॅब ने येऊ शकता.
मुख्य शहर ते काशी विश्वनाथ मंदिर अंतर
- दिल्ली ते वाराणसी अंतर ८६३ किलोमीटर
- अहमदाबाद ते वाराणसी अंतर १३८७ किलोमीटर
- बेंगलोर ते वाराणसी अंतर १८२४ किलोमीटर
- गोवा ते वाराणसी अंतर १८४० किलोमीटर
- मुंबई ते वाराणसी अंतर १५०२ किलोमीटर
- पुणे ते वाराणसी अंतर १४९३ किलोमीटर
- गया ते वाराणसी अंतर २४८ किलोमीटर
काशी विश्वनाथ मंदिरात राबवले जाणारे उत्सव
या मंदिरामध्ये नित्यानेमाने पूजा केली जाते. त्याचप्रमाणे संपूर्ण वर्षभरात येणारे सण उत्सव देखील धुमधडाक्यात उत्साहात साजरे केले जातात. यातील काही प्रमुख सण खालील प्रमाणे –
महाशिवरात्री
प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील चौदाव्या दिवशी म्हणजेच अमावास्येच्या एक दिवस आधी शिवरात्री या ठिकाणी साजरी केली जाते. तसेच फाल्गुन महिन्यात महाशिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी या मंदिरामध्ये संपूर्ण देशभरातून भावीक देवाचे दर्शन आणि अभिषेक करण्यासाठी मंदिरामध्ये येत असतात. या दिवशी या मंदिराचे दरवाजे रात्रभर उघडे असतात. त्यामुळे त्या दिवशी रात्री या ठिकाणी शयन आरती केली जात नाही. येणाऱ्या भाविकांना मंदिरामध्ये काशी विश्वनाथचे दर्शन घेता यावे यासाठी आरती करण्याचा दिनक्रम वेगळा असतो.
रंगीत एकादशी
फाल्गुन शुक्लपक्ष एकादशीच्या दिवशी हा रंगांचा उत्सव मंदिर आणि येथे येणाऱ्या भाविकांना विविध रंगांनी रंगवून टाकतो. भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या मूर्तींना चमकदार गुलाबी रंगाचा अबीर गुलाल अर्पण केला जातो. त्यानंतर भाविक पावसात रंग खेळतात. या दिवशी नृत्य आणि संगीत हे जल्लोषात साजरे करतात.
श्रावण सोमवार
संपूर्ण भारतामध्ये श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी भगवान शंकराचे दर्शन आणि त्यांची पूजा करणे संपूर्ण भारतभरामध्ये शुभ मानले जाते. या मंदिरामध्ये या शिवलिंगाला पाणी, दूध,दही, बिल्वपत्राचे पाणी वगैरे अर्पण करण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी हे मंदिर भरलेले असते. तसेच संपूर्ण श्रावण महिन्यात आणि महिन्यातील चारही सोमवारी या मंदिराची दिव्यांनी तसेच फुलांनी विविध प्रकाराने सजावट केली जाते.
अक्षय तृतीया
अक्षय तृतीया हा हिंदू दिनदर्शिकातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जाणारा हा दिवस सर्वात महत्त्वाचा दिवस मानले जाते. या दिवशी विश्वनाथ मंदिरामध्ये या शिवलिंगावर गंगाजल शिंपडले जाते.
अन्नकूट
कार्तिक महिन्यामध्ये दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी हा सण या मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आरतीच्या वेळी या दिवशी ५६ विविध प्रकारचे भोग तयार केले जातात आणि भगवान शंकराला अर्पण केले जातात.
कार्तिक पौर्णिमा
या दिवशी देव दीपावलीचा उत्सव गंगा घाटावर साजरा केला जातो. या ठिकाणी लाखो मातीचे दिवे प्रज्वलित केले जातात. तसेच मंदिरातही विशेष प्रकारची रोषणाई करण्यात येते.
काशी विश्वनाथ मंदिर वर्णन
हिंदू मंदिरांमध्ये सर्वात प्रसिद्ध असणारे हे काशी विश्वनाथ मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे. हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे असे मंदिर आहे.काशी विश्वनाथ मंदिर हे प्राचीन काळापासून शैव धर्माचे केंद्र आहे. या मंदिराला अनेक मुस्लिम शासकांनी नेस्तानाभूत केले होते. या मंदिराची सध्याची रचना ही महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी १७८० मध्ये केली होती. हे मंदिर सन १९८३ पासून उत्तर प्रदेश सरकारद्वारे व्यवस्थापित केले जाते.
गंगेच्या काठावर असलेले हे मंदिर प्रलयानंतरही या ठिकाणचे स्थान कायम राहील अशी काशीची श्रद्धा आहे. कारण याचे रक्षण करण्यासाठी भगवान शंकर आपल्या त्रिशूळवर काशीचे स्थान धारण करतील आणि प्रलय गेल्यानंतर ते पुन्हा काशीला पूर्ववत करतील असा येथील लोकांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे. या मंदिराचे दोन भाग केले आहेत. ज्योतिर्लिंगाच्या उजव्या भागात माता-पार्वती आणि डाव्या भागात भगवान शंकर सुंदर रूपात विराजमान आहेत. गंगा नदीच्या काठी वसलेल्या या काशीला “मोक्षाचे निवासस्थान” देखील म्हटले जाते.
काशी विश्वनाथ मंदिर परिसर
या मंदिर परिसरामध्ये नदीजवळ विश्वनाथ गली नावाची छोटी गल्ली आहे. ज्यामध्ये अनेक छोटी मंदिर आहेत. या मंदिराची मुख्य देवता लिंग आहे. ज्याची उंची जवळपास ६० सेंटिमीटर आणि याचा परीघ ९० सेंटीमीटर असा असून चांदीच्या वेदीवर उभी आहे. या मंदिराचा मुख्य सभामंडप हा चतुर्भुज असून इतर देवतांच्या छोट्या छोट्या मंदिरांनी वेढलेला आहे. या परिसरामध्ये कार्तिकेय, अभिमुक्तेश्वर, गणेश, शिव, पार्वती तसेच विष्णू यांची छोटी तीर्थे आहेत. मंदिरात ज्ञानवापी नावाची छोटीशी विहीर आहे. त्याला “ज्ञानवापी झरा” असे देखील म्हणतात. असे म्हटले जाते की, मुगल आक्रमकापासून मंदिराला वाचवण्यासाठी येथील पुजाऱ्याने या विहिरीमध्ये उडी घेतली होती.
गर्भगृहाकडे जाणारा सभा मंडप देखील आहे. या मंदिरामध्ये असणारे लिंग हे गडद तपकिरी रंगाच्या दगडापासून बनवले आहे. जो चांदीच्या चबूतऱ्याच्या गर्भगृहात बसवला आहे. या मंदिराच्या रचनेमध्ये तीन भाग आहेत. पहिला मंदिराचा बुरुज, दुसरा सोन्याचा घुमट, आणि तिसरा सर्वात पवित्र ध्वज आणि त्रिशूल असलेला सुवर्ण शिखर. या मंदिरामध्ये दर दिवशी जवळपास ३०००पर्यंत भाविक येत असतात. काही सणांच्या दिवशी ही संख्या लाखापर्यंत पोहोचलेली असते. १५.५ मीटर उंच असलेले सुवर्ण शिखर आणि सुवर्ण घुमट मंदिराची उल्लेखनीय वैशिष्ट्य आहेत. महाराजा रणजीत सिंह यांनी १८३५ मध्ये १००० किलो सोने दान केले होते.
काशी विश्वनाथ मंदिराचे धार्मिक महत्त्व
तिन्ही लोकांमध्ये सर्वात अद्वितीय असे शहर असणारे हिंदू धर्मातील काशीला मानले जाते. संपूर्ण जगाचे नाथ असणारे भगवान शंकर या नगरीमध्ये वास्तव्य करतात. या ठिकाणी भगवान शंकराची पूजा केल्यामुळे सर्व सुख संपत्ती आणि सौभाग्य प्राप्त होते. अशी श्रद्धा आहे. येथील ज्योतिर्लिंगाच्या घुमटामध्ये श्रीयंत्र स्थापित केले आहे. ज्याच्याकडे पाहून भगवान शंकराची पूजा केल्याने माणसाची सर्वात मोठी इच्छा पूर्ण होते. अशी येथील शिवभक्तांची श्रद्धा आहे. तसेच पूजा करणाऱ्या साधकाला राजसूय यज्ञा सारखे पुण्य प्राप्त होते. अशी देखील श्रद्धा आहे.
काशी मुक्ती भवन
वाराणसी काशीमध्ये माणूस मोक्ष प्राप्तीसाठी या ठिकाणी येत असतो. आणि भगवान शंकर मरणाऱ्या व्यक्तीच्या कानामध्ये तारक मंत्राचा जप करतात. ज्याने मोक्ष प्राप्त होतो असे समजले जाते. १९५८ मध्ये काशी या ठिकाणी “काशी मुक्ती भवन” नावाची संस्था सुरू केली होती. शेवटच्या घटका मोजणाऱ्या लोकांना या संस्थेमध्ये प्रवेश दिला जातो.
ज्यांची इच्छा असते की त्यांचा मृत्यू काशीमध्ये व्हावा, त्यांचे अंतिम संस्कार देखील काशीमध्ये व्हावेत, अशा लोकांना पंधरा दिवस आधी मुक्ती भवनात राहण्याची परवानगी असते. त्यांच्यासोबत कुटुंबातील एका सदस्याला मुक्ती भवनात राहण्याची परवानगी असते. अंत्यसंस्कार करण्यासाठी हे मुक्ती भवन देखील मदत करते. या मुक्ती भवनामध्ये जवळपास १५ हजाराहून अधिक लोकांना या ठिकाणी मोक्ष मिळाला आहे असे सांगितले जाते. १५ दिवसात ज्याचा मृत्यू झाला नाही त्याला मुक्ती भवन सोडावे लागते.
काशी विश्वनाथ मंदिरामध्ये जाण्याचा वेळ आणि प्रवेश शुल्क
वर्षातील कोणत्याही महिन्यात कोणत्याही दिवशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शनाला आपण या ठिकाणी जाऊ शकता. पण या मंदिराबरोबरच आजूबाजूची पर्यटन स्थळांना भेट द्यायची असेल तर या ठिकाणी साधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी चा सर्वोत्तम काळ मानला जातो. पावसाळ्यामध्ये नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे येथील पायऱ्या पाण्याखाली जातात. त्यामुळे या ठिकाणचा नजारा आपल्याला बघता येत नाही. मार्च – मे पर्यंत उष्णतेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे साधारण नोव्हेंबर पासून फेब्रुवारी पर्यंतचा हा काळ पर्यटनाच्या दृष्टीने सर्वोत्तम मानला जातो.
या मंदिरामध्ये दर्शनासाठी कोणतेही प्रवेश फी आकारली जात नाही येणाऱ्या भाविकांना विनामूल्य प्रवेश दिला जातो.
आपल्याला या मंदिरामध्ये जर लवकर दर्शन घ्यायचे असेल आणि वेळ वाचवायचा असेल तर या ठिकाणी विशेष दर्शनाचा पास घ्यावा लागतो. या पासची जवळपास ३००/-अशी किंमत आकारली जाते.
काशी विश्वनाथ मंदिराजवळील इतर मंदिरे
काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग च्या या मंदिराच्या परिसरामध्ये अनेक मंदिरे स्थापन केलेली आहे ती खालील प्रमाणे –
अन्नपूर्णा मंदिर
या मंदिराजवळ अन्नाची देवी माता अन्नपूर्णा यांचे मंदिर बांधण्यात आले आहे.
कालभैरव मंदिर
भगवान कालभैरव हे वाराणसीचे कोतवाल म्हणून ओळखले जातात. त्यांचा रविवारचा दौरा हा विशेष महत्त्वाचा मानला जातो.
मृत्युंजय महादेव मंदिर
हे भगवान शिवाचे एक मंदिर असून दारा नगरकडे जाताना कालभैरव मंदिराजवळ आहे. या ठिकाणचे पाणी अनेक रोगांचे नाश करणारे आहे असे म्हटले जाते.
संकट मंदिर
सिंधिया घाटाजवळ हे संकट देवीचे मंदिर आहे. यासोबतच नऊ ग्रहांची नऊ मंदिरे देखील आढळून येतात.
तुलसी मानस मंदिर
१९६४ मध्ये हे मंदिर बांधले गेले. हे मंदिर रामाचे मंदिर आहे. या ठिकाणी तुलसीदास राहत होते आणि या ठिकाणी त्यांनी रामायण देखील लिहिले. म्हणून या ठिकाणी हे मंदिर बांधले गेले.
दुर्गा मंदिर
माता दुर्गा कुष्मांडाच्या रूपात या ठिकाणी विराजमान आहे. हे लाल रंगाचे मंदिर आहे. या मंदिराजवळ एक प्राचीन कुंड आहे. याचे नाव “दुर्ग कुंड” असे आहे. बंगालच्या राणीने हे मंदिर बांधले गेले असल्याचे सांगितले जाते.
भारत माता मंदिर
१९३६ मध्ये महात्मा गांधींनी या मंदिराचे उद्घाटन केले. हे मंदिर भारत मातेला समर्पित आहे. या ठिकाणी भारत मातेचा नकाशा संगमरवरी बनवला गेला आहे.
संकट मोचन मंदिर
दुर्गा मातेच्या मंदिराच्या वाटेवर असी नदीच्या ओढ्याजवळ हे हनुमानाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराची स्थापना तुलसीदास यांनी केली आहे.
वाराणसी मधील पर्यटन स्थळे
वाराणसी एक प्रसिद्ध आणि मोठे असे शहर आहे. या शहरांमध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. काशी विश्वनाथ मंदिराचे दर्शन करण्यासाठी येणारे भावीक या पर्यटन स्थळांना भेट देतात. त्यातील काही प्रमुख पर्यटन स्थळे खालील प्रमाणे –
अस्सी घाट
हे एक वाराणसीचे सुंदर असे पर्यटन स्थळ आहे. या घाटाचा उगम असी नदी आणि गंगा नदीच्या संगमातून झाला आहे. संत तुलसीदासांचे वास्तव्य या ठिकाणी होते. आणि या ठिकाणी श्री “रामचरितमानस” हे महाकाव्य रचले. या ठिकाणी भावीक भगवान शंकराची पूजा करतात आणि जत्रा ही भरते. या घाटावर गंगा आरतीचा आनंद वेगळाच असतो. या ठिकाणी होणाऱ्या योग शिबिरातही तुम्ही सहभागी होऊ शकता.
मणिकर्णिका घाट
वाराणसीच्या प्रसिद्ध घाटांपैकी एक असणारा हा मणिकर्णिका घाट अतिशय महत्त्वाचा आहे. या घाटावर मेलेल्या व्यक्तींच्या चिता जाळल्या जातात. या ठिकाणी त्यांना मोक्ष प्राप्त होतो असे देखील म्हटले जाते. या घाटावर २४ तास चिता जळत असल्याचे देखील म्हटले जाते. असे म्हटले जाते की, अंतिम संस्कार हे संध्याकाळी केले जात नाही परंतु या ठिकाणी संध्याकाळी अंतिम संस्कार केले जातात. या घाटाच्या आजूबाजूला मंदिरे देखील आहेत.
दशाश्वमेध घाट
भगवान ब्रह्माने या ठिकाणी दशअश्वमेध यज्ञ केल्यामुळे या घाटाला दशाश्वमेध घाट असे नाव पडले आहे असे सांगितले जाते. ज्यामध्ये त्यांनी दहा घोड्यांची आहुती दिली होती. या घाटावर दररोज संध्याकाळी गंगेची देखील आरती केली जाते. या ठिकाणी गंगा आरतीला खूप महत्त्व असल्यामुळे येथे येणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी होते.
चूनार किल्ला
वाराणसीच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असा असणारा चुनार किल्ला अतिशय महत्त्वाचा आहे. गंगा नदीच्या काठावर बांधला गेलेला वाराणसी शहराच्या नैऋत्येस २४ किलोमीटर अंतरावर मिर्झापूर जिल्ह्यात आहे. या किल्ल्यामध्ये आजही काही सैनिकांच्या कबरी आढळून येतात.
आलमगीर मशीद
ही मशीद औरंगजेबाने बांधल्यामुळे या मशिदीला औरंगजेबाची मशीद असेही म्हटले जाते. ही मशीद पंचगंगा घाटाच्या वर आहे. या मशिदीत बिगर मुस्लिमांना प्रवेश करता येत नाही.
रामनगर किल्ला आणि संग्रहालय
रामनगर चा हा किल्ला अतिशय प्राचीन आहे. काशीचे महाराजा बलवंतसिंह यांनी १७५०मध्ये हा किल्ला बांधला. वाराणसीच्या तुळशीघाटावर हे ठिकाण बांधले गेले आहे. रामनगर किल्ल्यामध्ये एक संग्रहालय देखील आहे. या संग्रहालयात तुम्हाला प्राचीन गोष्टी पहावयास मिळतात.
सारनाथ मंदिर
वाराणसी मधील सर्वात आकर्षक अशा पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे सारनाथ मंदिर. भगवान बुद्धांच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक असणारे असे हे मंदिर आहे. या ठिकाणी भगवान बुद्धांनी पहिला उपदेश केला. या ठिकाणी अशोक स्तंभ, मूलगंधा, कुटी विहार, मंदिर, चौखंडी स्तूप पहावयास मिळतात.
भारत कला भवन
भारत कलाव भवन हे हिंदू विद्यापीठात आहे. संपूर्ण आशियातील सर्वात मोठे विद्यापीठ संग्रहालय आहे. या ठिकाणी चित्रे, मानसिक कलाकुसर, हॉस्पिटल आणि पहाडी लघुचित्रांचा दुर्मिळ संग्रह या संग्रहालयात पहावयास मिळतो.
नेपाळी मंदिर
नेपाळचा राजा राणा बहादुर शाह यांनी हे मंदिर बांधले म्हणून या मंदिराला नेपाळी मंदिर असे म्हणतात. १९ व्या शतकात बांधले गेलेले हे मंदिर नेपाळी वास्तुशैलीचे आहे. या मंदिरामध्ये नेपाळचे लाकूड वापरले गेल्याचे म्हटले जाते. या मंदिरातील प्रमुख देवता भगवान शंकर आहे.
बनारस सिल्क एम्पोरियम
बनारस सिल्क एम्पोरियम हे वाराणसी मधील भेट देण्याचे सर्वात चांगले ठिकाण समजले जाते. वाराणसी हे बनारसी कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. बनारसीच्या पारंपारिक कपड्याचा एक अग्रगण्य उत्पादक आणि घाऊक विक्रेता म्हणून या ठिकाणाला ओळखले जाते.
विश्वनाथ गली
वाराणसी मधील विश्वनाथ गल्ली हा काशी विश्वनाथ मंदिरापर्यंत जाण्याचा एक मार्ग आहे. ज्याला मंदिरामध्ये जायचे आहे तो या गल्लीतून जाऊ शकतो. या ठिकाणी लेडीज कॉर्नर, पूजेच्या वस्तू आणि मिठाईसाठी असलेली छोटी दुकाने प्रसिद्ध आहे.
काशी विश्वनाथ मंदिराची रहस्ये
गंगा नदीच्या काठी वसलेले हे विश्वनाथ ज्योतिर्लिंग आहे. येणाऱ्या भाविकांनी गंगा नदीमध्ये स्नान करून ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले असल्यास मोक्ष प्राप्ती होते असे म्हटले जाते. या ठिकाणी भगवान शंकर हे विश्वेश्वर व विश्वनाथ ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये या ठिकाणी विराजमान आहेत. येथे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कानामध्ये भगवान शंकर स्वतः तारक मंत्र उच्चारतात. ज्यामुळे त्याला मोक्ष प्राप्ती होते असे देखील समजले जाते. भगवान शंकराचे या ठिकाणी दर्शन घेतल्याने त्याच्या मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.
33 कोटी देवतांचे निवासस्थान
भगवान शंकरांनी या नगरीमध्ये संपूर्ण विश्वाची स्थापना केली आहे असे म्हटले जाते. या ठिकाणी ३३ कोटी देवता वास करतात. काशी हे असे एकमेव शहर आहे या ठिकाणी ५६ विनायक, १२ ज्योतिर्लिंगे गौरी देवी, नऊ दुर्गा स्थापित केले गेले आहेत.
काशी विश्वनाथ मंदिर पूजाविधी
पूजा तपशील | तिकीट | पंडित | दिवस |
रुद्राभिषेक | १५०/- | १ | १ |
रुद्राभिषेक | ४००/- | ५ | १ |
रुद्राभिषेक | ७००/- | ११ | १ |
लघुरुद्राभिषेक | १२००/- | ११ | १ |
महारुद्राभिषेक | १००००/- | ११ | ११ |
काशी विश्वनाथ मंदिरातील रुद्राभिषेकाची वेळ
- सकाळी ०४.०० ते सकाळी ११.१५
- दुपारी १२.२० ते संध्याकाळी ०६.००
- अभिषेक करणारा भक्त सतत शिवलिंगावर पाणी ओतत असतो आणि पुजारी मंत्र म्हणत असतात.
- लघु रुद्राभिषेकांमध्ये गंगा नदीच्या पाण्याने आणि दुधाने अभिषेक केला जातो.
- महामृत्युंजय मंत्राचा अकरा हजार एकशे अकरा वेळा जप केला जातो आणि शेवटी भक्ताला आरती करण्याची संधी मिळते.
- महारुद्राभिषेकांमध्ये अकरा पंडितांकडून सलग अकरा दिवस रुद्राभिषेक केला जातो. गंगाजल, दूध, कमळाच्या फुलांनी अभिषेक केला जातो.
ज्या भाविकांना हे अभिषेक करावयाचे असतील त्यांनी पूजेचे साहित्य सोबत ठेवावे.
काशी विश्वनाथ मंदिरातील नियम
- या मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कोणताही ड्रेस कोड नाही.
- या मंदिरामध्ये दर्शन हे विनामूल्य दिले जाते.
- या मंदिराचे विशेष दर्शन घ्यायचे असेल तर त्यासाठी विशेष दर्शन पास काढावा लागतो. त्याचे व्यक्ती ३००/- रुपये आकारले जातात.
- या मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये जाऊन शिवलिंगाला हात लावण्यास परवानगी नाही.
- या ठिकाणी अभिषेक करणाऱ्या पुरुषांना धोतर, कुर्ता आणि महिलांना साडी नेसावी लागते.
- मंदिरामध्ये चपला, शूज, पर्स यासारख्या वस्तू येण्यासाठी परवानगी नाही.
- मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी दर्शनाच्या वेळेमध्ये दर्शन घ्यावे लागते.
काशी विश्वनाथ नावाचा अर्थ
वारुणी आणि अशी नावाच्या दोन नद्या जेथे गंगेला मिळतात तेथे फार पूर्वी एक नगर बसवण्यात आले होते. या नगराचे नाव वाराणसी असे ठेवण्यात आले.
वाराणसी या शहराला पूर्वी काशी असे म्हटले जाते. या काशीमध्ये बसलेला ईश्वर म्हणजेच विश्वाचा पालनकर्ता म्हणजेच विश्व नाथ.
काशी या पवित्र स्थानामध्ये स्थित असणारा विश्वनाथ म्हणून या क्षेत्राला “काशी विश्वनाथ” असे नाव पडले.
काशी विश्वनाथ मंत्र
सानन्दमानन्दवने वसन्तं
आनन्दकन्दं हतपापवृन्दम्।
वाराणसीनाथमनाथनाथं
श्रीविश्वनाथं शरणं प्रपद्ये॥
काशी विश्वनाथ मंत्र अर्थ :- मी या अनाथांचे स्वामी असणाऱ्या काशीपती विश्वनाथ यांच्या आश्रयाला जातो. कारण ते आनंदवनात आनंदाने निवास करतात आणि पापांचा नाश करणारे आहेत.
काशी विश्वनाथ मंदिरातील आरती
या मंदिरामध्ये दर दिवशी पाच आरत्या केल्या जातात. या आरत्यांमध्ये मंगल आरती, भोग आरती, सप्तर्षीची आरती, शृंगार आरती आणि शयन आरती असे प्रकार आहेत. त्याची संपूर्ण माहिती खालील प्रमाणे –
मंगल आरती
पहाटे तीन वाजता मंदिर उघडल्यानंतर ही आरती केली जाते. ही दिवसाच्या सुरुवातीची पहिली आरती असते. ही आरती म्हणजे काशी विश्वनाथ देवाला जागवण्याचा एक विधी असतो. या आरतीनंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे उघडले जातात. त्यानंतर त्यांची षोडशोपचार पूजा, आरती, स्तुती आणि यानंतर प्रार्थना केली जाते.
तेथे वास्तव्यात असणारे भावीक यात्रेकरू या आरतीमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच ही आरती मंदिराच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पाहू शकता. या मंदिरामध्ये होणारी ही पहाटेची आरती महत्त्वाची समजली जाते. कारण पहाटेपासून मंदिरांमधील आरती तसेच या मंदिराला प्रदक्षिणा घालताना आजूबाजूच्या मंदिरातील पूजा मंत्रांचा आपल्याला आवाज येत असतो.
भोग आरती
दुपारी या मंदिरामध्ये काशी विश्वनाथांना प्रसाद अर्पण केला जातो. त्यावेळी ही आरती केली जाते. या आरती सोबत रुद्राभिषेकही केला जातो. एकादशीच्या दिवशी फळे, दूध आणि दुधाचा प्रसाद भगवान शंकराला अर्पण केला जातो. इतर दिवशी सुकामेवा, पुरी, हलवा किंवा संपूर्ण अन्न दिले जाते.त्यानंतर आरती साठी उपस्थित असलेल्या भाविकांना हा प्रसाद दिला जातो.
सप्तर्षीची आरती
कश्यप, वशिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जगदग्नी, भारद्वाज आणि अत्री या सात ऋषींच्या कर्तृत्वाचे उद्योग म्हणून ही आरती केली जाते. ही आरती या मंदिरामध्ये सूर्यास्तानंतर केली जाणारी आरती असते. या आरतीचा उगम सामवेदामध्ये गायला जातो.
शृंगार आरती
या आरतीला भगवान शंकराला काशीचा राजा म्हणून सजवले जाते. त्यांच्या या रूपाला काशीपुराधीश्वर असे म्हणतात. ही आरती रात्री नऊच्या सुमारास केली जाते. या आरतीमध्ये शृंगार रुद्राभिषेक, स्तुती आणि भोग यांचा समावेश असतो. म्हणजेच ही आरती प्राचीन वैदिक संस्कारांद्वारे केली जाते.
शयन आरती
काशीवासी म्हणजेच काशी मधील रहिवासी असणारे लोक या ठिकाणीही आरती करतात. ही आरती दिवसाची शेवटची आरती असते. यानंतर मंदिराचे दरवाजे बंद केले जातात ४० ते ५० रहिवासी मिळून ही आरती करतात. या आरतीला लोकांची काशी विश्वनाथ देवाप्रती असलेली भक्ती आणि समर्पण आपल्यास पहावयास मिळते.
काशी विश्वनाथ कथा
कथा ०१
एकदा ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्या कोण मोठा यावर वाद झाला. तेव्हा ब्रह्माजी त्यांच्या वाहन हंसावर बसलेल्याचे वरचे टोक शोधण्यासाठी बाहेर पडले आणि विष्णूजी खालचे टोक शोधण्यासाठी बाहेर पडले. तेवढ्यात खांबामधून प्रकाश आला. त्याच प्रकाशात भगवान शंकर प्रकट झाले. विष्णुजींनी मान्य केले की त्यांना शेवटचे टोक सापडले नाही. परंतु ब्रह्माजींनी खोटे सांगितले की, त्यांना ते सापडले. त्यामुळे भगवान शंकरांनी ब्रह्मदेवाला शाप दिला की, त्याची कधीही पूजा केली जाणार नाही. कारण त्यांनी स्वतःची पूजा करण्यासाठी खोटे बोलले होते. त्यानंतर त्याच ठिकाणी भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपात विराजमान झाले. या गोष्टीमुळे कुठेही ब्रह्माचे मंदिर नाही.
कथा ०२
एका आख्यायिकेनुसार भगवान शंकर आपली पत्नी पार्वती सह हिमालय पर्वतावर राहत होते. भगवान शंकराच्या प्रतिष्ठेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून माता-पार्वतीने दुसरे ठिकाण निवडण्यास सांगितले. भगवान शंकराला राजा देवदास चे वाराणसी शहर खूप आवडले. शांत जागेसाठी निकुंभ नावाच्या शिवगणाने वाराणसी शहर उजाड केले. पण राजाला वाईट वाटले. राजाने तपश्चर्य करून ब्रम्हाजींना प्रसन्न केले आणि त्यांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांना विनंती केली. ही जागा मानवांसाठी आहे असे राजा म्हणाले. ब्रह्माजींच्या सांगण्यावरून भगवान शंकर मंदारचल पर्वतावर गेले. त्यामुळे भगवान विष्णूंनी राजाला तपोवनात जाण्याची आज्ञा केली आणि यानंतर वाराणसी हे भगवान शंकराचे कायमचे निवासस्थान बनले. आणि भगवान शंकरांनी आपल्या त्रिशुळावर वाराणसी शहराची स्थापना केली असे सांगितले जाते.
काशी विश्वनाथ मंदिराजवळील प्रसिद्ध हॉटेल्स
काशी विश्वनाथ हे भारतातील प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असणारे असे ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे या मंदिरामध्ये दर्शनासाठी संपूर्ण जगभरातून भाविक येत असतात. यांच्या राहण्याच्या सोयीसाठी मंदिराजवळ विश्रांती बांधण्यात आली आहेत. राहण्याची, निवासाची सोय केली. तसेच या ठिकाणी मोठी हॉटेल्स देखील बांधण्यात आली आहेत. खालील प्रमाणे –
- अलका हॉटेल
- शांती गेस्ट हाऊस
- तीर्थ गेस्ट हाऊस
- हॉटेल बुद्ध पार्क
- राहुल गेस्ट हाऊस
- नारायण हवेली वाराणसी
- सेंट्रल रेसिडेन्सी हॉटेल
- स्टे बनारस
- राजमहल हॉटेल
- हॉटेल अभिनव इंटरनॅशनल
काशी विश्वनाथ मंदिर नजीकचे प्रसिद्ध खाद्यपदार्थ
काशीमध्ये खाद्य संस्कृतीची एक वेगळी परंपरा आहे. या ठिकाणची कचोरी, जिलेबी, चुडामन, श्रीखंड, मलई कॉफी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. दुधापासून तयार करण्यात येणारे विविध पदार्थ या ठिकाणी मिळतात. प्रत्येक दुकानांमध्ये उन्हाळ्यात लस्सी मिळते. तसेच बनारसी पान सुद्धा या ठिकाणचे संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे.
FAQ
काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग कुठे आहे?
उत्तर प्रदेशमध्ये, वाराणसी शहरामध्ये, गंगा नदीच्या पश्चिम तीरावर, काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग आहे.
भारतातील प्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगांपैकी काशी विश्वनाथ हे कितवे ज्योतिर्लिंग आहे?
काशी विश्वनाथ हे नववे ज्योतिर्लिंग आहे.
या मंदिराची स्थापना कोणी केली?
या मंदिराची स्थापना अहिल्याबाई होळकर यांनी केली.
काशी विश्वनाथ येथे कोणाचे पूजन केले जाते?
काशी विश्वनाथ येथे शंकराचे निराकार प्रतीक असलेले लिंगाचे पूजन केले जाते.
काशी विश्वनाथ मंदिर प्रसिद्ध का आहे?
काशी विश्वनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यामुळे ते प्रसिद्ध आहे.
लोक काशी यात्रेला का जातात?
काशी विश्वनाथ हे सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असे असल्यामुळे या ठिकाणी भेट दिल्यास जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मि
निष्कर्ष
मित्रांनो, आपण भारतातील प्रमुख बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असणाऱ्या काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास आणि माहिती वाचलीत. आपल्याला KASHI VISHWANATH TEMPLE INFORMATION IN MARATHI LANGUAGE ही माहिती कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयाला घेऊन,
तोपर्यंत नमस्कार.