KUNE WATERFALLS : कुणे धबधबा

Kune Waterfalls : परमेश्वराच्या निर्मितीचे एक अप्रतिम उदाहरण तसेच परमेश्वराने दिलेले एक अप्रतिम वरदान म्हणजे कुणे धबधबा. मित्रहो धबधबा म्हटलं की त्या धबधब्याचा अनुभव घेणे, हे नेहमीच आश्चर्यकारक असते. पण धबधब्याच्या बाजूला असणारी हिरवीगार झाडे, हिरवाई या सर्व गोष्टी धबधब्याचे सौंदर्य अजून खुलवतात. सानिध्यामध्ये राहून धबधब्यासोबत हिरवाईच्या सोबतीने जर तुम्हाला फोटोशूट देखील करायचे असतील तर धबधब्याच्या बाजूची पार्श्वभूमी तुम्हाला एक उत्तम पर्याय आहे.

Table of Contents

कुणे धबधबा (Kune Waterfalls)

कुणे धबधबा हा त्याच्या रंगछटांनी नेहमीच भरलेला असतो.निळ्या व हिरव्या रंगाचा फरक देणारा हा कुणे धबधबा जुन्या मुंबई पुणे महामार्गावर असून, हा धबधबा लोणावळा व खंडाळा या दरम्याने आहे. लोणावळ्याला येण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून जाऊन नंतर खंडाळ्याकडे जाता येते व तिथून तुम्ही कुणे धबधब्याकडे जाऊ शकता. हा धबधबा महाराष्ट्रातील मुख्य आकर्षणांपैकी एक आहे.

kune waterfalls

महत्वाची माहिती

पत्ता              पुणे
भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना जून ते ऑक्टोबर
प्रेक्षणीय स्थळ                           कुणे धबधबा
वेळ                                           24 तास चालू
कुणे ट्रेक चढाईची पातळी      मध्यम
जवळचे शहर                   लोणावळा

लोणावळा ते खंडाळा पासून साधारणतः दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असणारा कुणे धबधबा एक उत्तम व निसर्गरम्य ठिकाण आहे. धावपळीच्या आयुष्यातून स्वतःला विसाव्याची शांततेची व नवसंजीवनी देण्यासाठी जागा शोधत असाल व शुद्ध हवा व त्या ठिकाणील परिसराचा अनुभव घेऊ इच्छिता तर कुणे धबधबा हे तुमच्यासाठी एक योग्य ठिकाण आहे.

लोणावळा खंडाळा मध्ये प्रेक्षणीय स्थळांपैकी सर्वोत्तम ठिकाणांपैकी याकडे बघितले जाते. हा धबधबा कुणे या गावामध्ये असून महाराष्ट्रातील सर्वोत्तम धबधब्यांपैकी एक आहे. कुणे धबधबा साधारणतः ५०० ते ६०० मीटर उंचीवरून पाणी खाली कोसळते. हा धबधबा देशातील १४ वा सर्वात मोठा धबधबा आहे, याची प्रचिती आहे.

Kune Waterfalls

धबधब्याच्या आजूबाजूला असलेली आकर्षक पार्श्वभूमी डोळ्यात टिपण्यासारखी आहे. हा निसर्गरम्य सौंदर्याने खुललेला धबधबा दोन भागात विभागलेला असून, पावसाळ्याच्या काळात या धबधब्याची आभा, रचना व परिसर संपूर्ण बदलून जातो. संपूर्ण प्रदेश हिरवाईच्या शालूने सुशोभित व नटलेला असतो. निसर्ग सौंदर्याने खुलून गेलेल्या, हिरवाईने नटलेल्या, विलोभनीय दृश्यांचे भंडार असलेल्या अनोख्या कुणे धबधब्याला भेट देणे हा एक अविस्मरणीय अनुभवच आहे.

तुम्ही देखील या आकर्षणाचा आनंद घ्यायला विसरू नका व नक्कीच कुणे धबधब्याला भेट द्या.

आमचा हे लेख पण नक्की वाचा 👇

कुणे धबधबा – पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू

Kune Waterfalls

महाराष्ट्रातील लोणावळा खंडाळा जवळी कुणे धबधबा हा पर्यटकांना त्याच्या मनमोहक विलोभनीय रूपामुळे आकर्षित करतो. त्याचप्रमाणे त्याच्या चित्तथरारक दृश्यामुळे तो त्याची एक विलक्षण बाजू प्रकट करत असतो. जसा जसा पावसाळा हा वाढत जातो, तसे या ठिकाणी असणारे दृश्य हे अधिकच खुलून येते. हा धबधबा दुधासारखा एकदम पांढराशुभ्र असून, आजूबाजूला असलेला हिरवागार परिसर हा या धबधब्याची सौंदर्यता अजून वाढवतो. व या सौंदर्याचे सुख अनुभवण्यासाठी पर्यटक जास्त करून कुणे धबधब्याकडे आकर्षित होतात.

कुणे धबधब्याला भेट देण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

  • १.पावसाळ्याच्या काळात या ठिकाणी घसरण्याची शक्यता असल्यामुळे, चप्पलचा वापर न करता चांगल्या   बुटांचा वापर करावा.
  • २. धबधब्याला भेट देतेवेळी, त्या अनुसरूनच योग्य त्या कपड्यांची निवड करावी.
  • ३. धबधब्याला भेट द्यायला जातेवेळी, त्या ठिकाणचा नकाशा आपल्या सोबत ठेवावा जेणेकरून तुम्ही सुलभरीत्या तुमच्या इथपर्यंत पोहोचू शकता.
  • ४. कुणे धबधबा हे एक नैसर्गिक आकर्षण असून हा धबधबा सकाळच्या वेळी पर्यटनासाठी चालु असतो.
  • ५. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कुणे धबधबा संध्याकाळी बंद केला जातो.

कुणे धबधब्याला भेट देतेवेळी घ्यावयाची काळजी

  • १. चप्पलचा वापर टाळावा.
  • २. अंगभर झाकलेले कपडे घालावेत.
  • ३. पाण्याचे प्रमाण जास्त असल्यास पाण्यात भिजणे टाळावे.
  • ४. जास्त धबधब्याच्या कडेला जाऊ नये.

कुणे धबधब्याला भेट देतेवेळी सोबत घ्यावयाच्या वस्तू

  • १.आपण ज्या ठिकाणी जात आहोत त्या ठिकाणचा नकाशा हा नेहमी आपल्या सोबत ठेवावा.
  • २. पाऊस असल्यास रेनकोट किंवा ज्यादा कपड्यांचे जोड सोबत ठेवावे.
  • ३. ज्यादा बुटांचे जोड सोबत ठेवावे.
  • ४. पाण्याची बॉटल, खाण्याचे पदार्थ जसे की चॉकलेट, केक, बिस्किट व इतर स्नॅक्स सोबत ठेवावे.
  • ५. मेडिकल किट्स सोबत ठेवावे जेणेकरून काही इजा झाल्यास त्याचा वापर करता येईल.

कुणे धबधब्या जवळील सर्वोत्तम प्रेक्षणीय स्थळे

१) बेडसे लेण्या

bedse caves kune waterfall

लोणावळा खंडाळा मधील बेडसे लेण्या सर्वोत्तम प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे. या लेण्या बौद्ध लेण्या म्हणून देखील ओळखल्या जातात. या लेण्यांना भेट दिल्याशिवाय तुम्ही कामशेत मधील फिरणे अपूर्णच राहते. बहुतांश लेण्यांप्रमाणे या लेण्यांबद्दल देखील एक गुढ रहस्य, आकर्षण आहे. या लेण्या अति प्राचीन असून त्यांच्या भिंतीवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांची नक्षीकाम केलेली आढळून येतात. जसे की हत्ती, घोडे इत्यादी. बेडसे लेण्यांच्या मठाच्या आत एक सुंदर कोरीव शिल्प व खांबाची कमान पाहण्यासारखी आहे.

या लेण्या कामशेत पासून साधारणतः नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर आहे या लेण्यांना भेट देण्यासाठी सर्वोत्तम कालावधी हा जुलै ते ऑक्टोंबर पर्यंत आहे. आपण देखील या लेण्यांना नक्की भेट द्यावी.

२) विसापूर किल्ला

visapur fort kune waterfall

विसापूर किल्ला हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामधील प्रसिद्ध व हिरव्यागार टेकडीवर वसलेला आहे. या किल्ल्याची समुद्रपाटीपासून उंची ही साधारणतः १०८५ मीटर एवढी असून सहासी प्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी हे  प्रेक्षणीय स्थळ आहे. विसापूर हा किल्ला १८ व्या शतकातील लोहगडच्या तटबंदीचा एक भाग असून यामध्ये अवाढव्य वास्तुशिल्प, प्राचीन गुहा, विहिरी, जुनी घरे, कमाने इत्यादींचा समावेश आहे.

३) कार्ला लेणी

karla caves kune waterfall

लोणावळ्यापासून साधारणतः १० ते ११ किलोमीटर, पुण्यापासून साधारणतः ५८ ते ५९ किलोमीटर व तसेच मुंबईपासून साधारणतः १०६ ते १०७ किलोमीटर कार्ला लेण्यांचा संच आहे. ह्या लेण्या महाराष्ट्रातील लोणावळा जवळील अति प्राचीन भारतीय बौद्ध लेण्यांचा संच असून, लोणावळा मधील सर्वोत्तम प्रेक्षणीय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणी देवी एकविरेचं देखील प्रसिद्ध मंदिर असून खूप मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी भेट देतात.

४) पवना तलाव

pawana lake kune waterfall

कुणे धबधब्याच्या बाजूला असलेले पावना तलाव हे देखील एक प्रेक्षणीय स्थळांपैकी सर्वोत्तम स्थळ आहे. हा तलाव लोणावळ्यापासून साधारणतः १४ ते १५  किलोमीटर, व लोहगड किल्ल्यापासून साधारणतः ९ ते १० किलोमीटर अंतरावर आहे. या तलावाची रचना ही एक कृत्रिम पद्धतीने केलेली असून, हे तलाव कॅम्पिंग, पिकनिक स्पॉट आदींसाठी प्रसिद्ध आहे. हा तलाव त्याच्या चहुबाजूने असलेल्या हिरवाईने वेढलेला असून, रो आणि मोटर बोटिंग च्या सुविधा या तलावामध्ये उपलब्ध आहेत. तलावाच्या बाजूला टेन्ट मध्ये राहण्याची मजा ही वेगळीच असते. तुम्ही देखील या ठिकाणी भेट देऊन हा अविस्मरणीय अनुभव घेऊ शकता.

५) देवकुंड धबधबा

devkund waterfall

देवकुंड धबधबा भिरा पाटणस येथील अत्यंत कमी वेळामध्ये प्रसिद्धीस आलेला धबधबा आहे. हा धबधबा तीन धबधब्यांच्या संगमाने तयार झालेला असून, असे म्हटले जाते की या धबधब्यावरती देव स्नान करायला येत असत त्यामुळे या धबधब्यास देवकुंड असे नाव पडले.

६) इमॅजिका पार्क

imagica  kune waterfall

इमॅजिका हे एक थीम असलेली मनोरंजन स्थळ असून, यामध्ये विविध प्रकारच्या थीमचे अनुभव, अनोखी आकर्षणे, वेगवेगळी पात्रे, चित्त थरारक राईड्स,इत्यादी प्रमुख कार्यक्रम केले जातात व हे ठिकाण सर्व ऋतूंसाठी सर्व वयातील वयोगटांसाठी एक प्रसिद्ध व तितकेच मनोरंजक प्रेक्षणीय स्थळ आहे.

७) वॅक्स म्युझियम

wax museum

लोणावळा मधील वॅक्स म्युझियम हे भारतातील सर्वप्रथम वॅक्स म्युझियम असून, यामध्ये सर्व नेते व सेलिब्रिटींच्या मेणापासून बनवलेल्या प्रतिमा आहेत. या ठिकाणी देखील तुम्ही भेट देऊ शकता.

८) भाजे लेणी

bhaje caves

भाजे लेणी भाजे गावातील प्राचीन बौद्ध लेणी असून, या ठिकाणी चैत्यगृह हे महत्त्वपूर्ण आहे.या ठिकाणी एक चैत्यगृह व २१ विहिरी आढळतात. या ठिकाणी साधारणतः २२  लेण्यांचा संच असून या लेण्या महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. या ठिकाणी चैत्य सुमारे १७ मीटर लांब ८ मीटर रुंद, तितकेच मीटर उंच असून त्यात २७ अष्टकोनी खांब आणि मधोमध स्तूप आहे. खांबावरती चक्र, कमळ अशी विविध चिन्हे कोरलेली असून, एका ठिकाणी एक खुंटी व तिला अडकवायला फुलांचा हार कोरलेला आहे. चैत्यगृहाला लाकडी तुळांचे छत असून, या तुळांवर ब्राह्मी लिपीतील लेख लिहिलेला आहे.

९)लोहगड किल्ला

lohgad fort kune waterfall

लोहगड हा महाराष्ट्रातील अति प्राचीन किल्ला असून या किल्ल्याला इसवी सन १९०९ला रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले गेले. हा किल्ला अतिशय मजबूत बुलंद तसेच अजिंक्य आहे या जवळच भाजे, बेडसे ही बौद्धकालीन लेणी निर्माण झाली असून, इसवी सन पूर्व २००० वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली आहे असे समजले जाते.

१०) भुशी धरण

bhushi dam

भुशी धरण हे लोणावळ्यातील इंद्रायणी नदीवरील दगडी बांधकाम असून या धरणाला पर्यटन रिसॉर्ट म्हणून विकास करण्याची योजना २०१४ मध्ये भारतीय रेल्वे खाजगी क्षेत्राच्या सहभागाने जाहीर केले. या धरणाची बांधणी १९६० च्या दशकात ग्रेट इंडियन रेल्वेसाठी त्यांच्या वाफेच्या इंजनासाठी पाण्याचा स्त्रोत म्हणून बांधण्यात आली.

कुणे धबधबा ट्रेक (Kune Waterfall Trek)

kune waterfalls trek
Kune Waterfalls Trek

कुणे धबधबा हा त्याच्या सौंदर्यतेसाठी जितका प्रसिद्ध आहे, तितकाच साहसी प्रेमींसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बहुतांश लोक कुणे धबधबा ट्रेक करण्यासाठी येतात. या धबधब्याची उंची ही साधारणतः ५०० ते ६०० मीटर इतकी असून, पावसाळ्याच्या वेळी कुणे धबधब्याचा ट्रेक करणे थोड्याप्रमाणात कठीणच जातो. त्यावेळी या धबधब्याचे ट्रेकिंग करताना खालील गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.

धबधबा ट्रेकला जाताना स्वतःच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खालील मुद्द्यांचा काळजीपूर्वक वापर करावा

  • १.सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वैयक्तिक हँगआऊटसाठी हे सुरक्षित ठिकाण नाही.
  • २.जर तुम्ही ट्रेकिंग करत असाल तर समूहामध्ये राहून ट्रेकिंग करा, ज्यांना जास्त चालण्याचा त्रास होत असेल, व लहान मुलांना शक्यतो ट्रेकिंग करण्यासाठी टाळा.
  • ३.ट्रेकिंग करतेवेळी त्या ठिकाणी कोणतीही पोलीस सुरक्षा उपलब्ध नसते व जीवरक्षक उपलब्ध नसतात. त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घेणे व सुरक्षित रित्या ट्रेकिंग करणे याची गरज आहे.

धबधबा ट्रेकला जाण्यापूर्वी त्या ठिकाणची पूर्व माहिती

  • १.ट्रेकिंगच्यावेळी तुम्ही लोणावळा स्टेशनला उतरून कुणे गावापासून ते कुणे धबधब्याच्या ट्रेकिंग पर्यंत प्रवास करू शकता.
  • २.लोणावळ्या मधील हॉटेल्स मध्ये तुम्हाला नाश्त्याची जेवणाची सोय उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे तुम्ही संध्याकाळची चहा तसेच जेवण सुद्धा हॉटेल्सवर करू शकता.

धबधबा ट्रेक करते वेळेस सोबत घ्यावयाच्या वस्तू

  • १.मुबलक पाणी तसेच प्रकाशासाठी बॅटरी सोबत बाळगावी त्याचप्रमाणे टोपी व पावसाच्या वेळी जर तुम्ही ट्रेकिंग करत असाल तर रेनकोट सोबत ठेवावा.
  • २.त्या ठिकाणी विविध दृश्य व वन्यजीवन पशुपक्षी यांचे फोटो कॅप्चर करण्यासाठी कॅमेरा, मोबाईल फोन घ्यावा
  • ३.ट्रेकिंग करताना थकायला होते त्यावेळी आपल्या सोबत एनर्जी येण्यासाठी ग्लुकोंडी पावडर ओ.आर. एस सोबत ठेवावे. त्याचप्रमाणे खाण्यासाठी बिस्किट्स, केक्स चॉकलेट्स सोबत ठेवावे जेणेकरून भूक लागल्यास तुम्ही ते खाऊ शकता.
  • ४.ट्रेकिंग करतेवेळी धबधब्यातील पाण्यात भिजण्याचा मोह कोणालाच आवरत नाही त्यावेळी आपल्या सोबत एक्स्ट्रा टॉवेल नॅपकिन्स व कपड्यांची जोडी ठेवावी.
  • ५.कोणत्याही ठिकाणी फिरायला जातेवेळी त्या ठिकाणच्या जागेची स्वच्छता बाळगणे ही आपली जबाबदारी असते. त्यामुळे आपण ज्या गोष्टी खातो त्यामुळे त्या ठिकाणी पर्यावरणाचा कोणत्याही प्रकारे गैरवापर होणार नाही याची दक्षता आपणच घ्यायची असते. म्हणून सोबत एक कचरा टाकण्यासाठी पिशवी ,पेपर्स ठेवावे.
  • ६.ट्रेकिंग करतेवेळी काही इजा झाल्यास आपल्यासोबत फर्स्ट एड बॉक्स म्हणजेच मेडिकल किट त्यामध्ये काही (अँटीसेप्टिक्स, बँडेज, डेटॉल, कॉटन )सोबत ठेवावे.
  • ७.ट्रेकिंग करतेवेळी कमीत कमी एक ते दोन वैयक्तिक ओळखीचे काही पुरावे सोबत ठेवावे जेणेकरून ट्रेकिंगच्या वेळी काही अडचणी आल्यास याचा उपयोग करता येईल.
  • ८.हे सर्व सामान सोबत बाळगण्यासाठी एक योग्य प्रकारची बॅग सोबत घ्यावी जेणेकरून तुम्ही योग्यरीत्या व सोयीस्कर रित्या ट्रेकिंग करू शकता.

धबधबा ट्रेक करतेवेळी कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी करू नये

अ) ट्रेकिंग करतेवेळी करावयाच्या गोष्टी

  • १.तुम्ही ज्या ठिकाणी ट्रेकिंगसाठी जात आहात त्या ठिकाणचा योग्य तो नकाशा सोबत ठेवावा.
  • २.ट्रेकिंग करतेवेळी योग्य ते हवामान बघूनच ट्रेकिंग करावे.
  • ३.मित्रमंडळी किंवा परिवारासोबत ट्रेकिंग करण्यास जावे.
  • ४.मुबलक प्रमाणात पाणी व खाण्याचे पदार्थ सोबत ठेवावे.
  • ५.ट्रेकिंग करतेवेळी दोन ट्रेकिंग पोल्स सोबत ठेवावेत.
  • ५.सुरक्षिततेचा विचार करून स्वतःसोबत शिट्टी बाळगावी जेणेकरून ट्रेकिंग करतेवेळी तुम्ही चुकल्यास तुमच्या इतर साथीदारांना शिटीच्या आवाजाने तुमच्या मदतीस बोलवण्यास मदत होईल.
  • ६.स्वतः सोबत मेडिकल किट्स ठेवावे. जेणेकरून काही इजा झाल्यास याचा तुम्ही योग्य तो वापर करू शकाल.

आ) ट्रेकिंग करतेवेळी कोणत्या गोष्टी करू नयेत

  • १.ट्रेकिंगला जातेवेळी एकट्याने कधीच ट्रेकिंग करू नये.
  • २.ज्या ठिकाणी आपण ट्रेकिंगला जात आहोत त्या ठिकाणी पर्यावरणाचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी.
  • ३.खाल्लेल्या गोष्टी व पाण्याच्या बॉटल्स यांचा कचरा त्या ठिकाणी पर्यावरणामध्ये फेकू नये.
  • ४.सिगारेट किंवा इतर आगीच्या वस्तू पर्यावरणामध्ये फेकू नयेत.

कुणे धबधब्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ

पर्यटकांसाठी साधारणतः सकाळी ६ ते संध्याकाळी ७ पर्यंत परवानगी असते. कुणे धबधब्याला तुम्ही कोणत्याही ऋतू मध्ये भेट देऊ शकता. पण या धबधब्याचे सौंदर्य व चित्तथरारक दृश्य अनुभवायचे असल्यास, पावसाळ्यामध्ये तुम्ही या धबधब्याला भेट द्यावी.

कुणे धबधब्याला तुम्ही कसे जाल ?

इथे जाण्याची वेळ ही सकाळी सकाळी ६ ते संध्याकाळी ७ पर्यंत पर्यटकांसाठी असते. तुम्हाला या ठिकाणी भेट देण्यासाठी खालील तीन पर्यायांचा वापर करू शकता.

1. रस्ते सेवा –

कुणे धबधब्याला भेट देण्यासाठी तुम्ही मुंबई पुणे हायवे वरून तुमच्या वैयक्तिक गाडीने किंवा बसने जाऊ शकता.

2. रेल्वे सेवा –

कुणे धबधब्याला भेट देण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक हे पुणे ते लोणावळा स्टेशन आहे. लोणावळा स्टेशन वरून उतरून तुम्ही बसने किंवा गाडीने कुणे धबधब्याला भेट देऊ शकता.

3.विमान सेवा –

पुणे हे कुणे धबधब्याला भेट देण्यासाठी सगळ्यात जवळचे विमानतळ आहे. पुण्याला उतरून तुम्ही लोणावळा रेल्वे स्थानकावरून कुणे धबधब्यापर्यंत जाऊ शकता.

प्रवेश शुल्क –

कुणे धबधब्याला भेट देण्यासाठी प्रवेश शुल्क नाही, तुम्ही विनामूल्य कुणे धबधब्याला भेट देऊ शकता.

कुणे धबधब्याजवळ राहण्याची सोय व सुविधा

कुणे धबधबा हा लोणावळा खंडाळा दरम्यान येत असून, लोणावळा व खंडाळा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बजेटनुसार आरामदायी निवासासाठी योग्य ती खाण्याची राहण्याची सोय केली जाते. त्यापैकी काही हॉटेल्स खालील प्रमाणे –

१. हॉटेल एलिट

हे हॉटेल ओल्ड मुंबई पुणे हायवे खंडाळा लोणावळा या ठिकाणी आहे. या हॉटेलमध्ये तुम्हाला फ्री पार्किंग, फ्री नाष्टा, फ्री वाय-फाय तसेच रेस्टॉरंट सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी डेबिट कार्ड, तसेच NFC मोबाईल पेमेंट किंवा रोख स्वीकारली जाते. खालील दिलेल्या संपर्क नंबर वर हॉटेल गिरीजासंपर्क करून तुम्ही या हॉटेल बद्दल पूर्ण माहिती घेऊ शकता

07972001916

२. हॉटेल गिरीजा

हे हॉटेल ओल्ड मुंबई पुणे हायवे आयसीआयसीआय जवळ खंडाळा वडगाव या ठिकाणी आहे. या ठिकाणी तुम्हाला विनामूल्य पार्किंग, विनामूल्य नाष्टा, विनामूल्य वायफाय सुविधा तसेच वातानुकूलन रूम्स भेटतील. पेमेंट साठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, रोख रक्कम स्वीकारली जाईल. त्याचप्रमाणे लहान मुलांना खेळण्यासाठी गेम रूम सुद्धा उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या संपर्क नंबर वर संपर्क करून माहिती घेऊ शकता.

02114269311

३. हॉस्टेलर लोणावळा

हे हॉटेल कुणेनामा मावळ पुणे येथे आहे. या ठिकाणी तुम्हाला फ्री वाय-फाय फ्री पार्किंग, ब्रेकफास्ट इत्यादी सोयी सुविधा दिल्या जातील. त्याचप्रमाणे या हॉटेल बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास खालील दिलेल्या संपर्क नंबर वर संपर्क करून माहिती घेऊ शकता.

09810187717

५. रिसॉर्ट सिल्वर हिल्स

हे हॉटेल लोणावळा मध्ये असून या ठिकाणी तुम्हाला विनामूल्य पार्किंग, विनामूल्य वायफाय, वातानुकूलित रूम्स विनामूल्य नाष्टा इत्यादी सोयी सुविधा पुरविल्या जातात. अधिक माहितीसाठी तुम्ही खालील दिलेल्या संपर्क नंबर वर संपर्क करू शकता.

09833587187

FAQ

कुणे धबधब्याला भेट देण्यासाठी कोणते रेल्वे स्थानक जवळ आहे ?

कुणे धबधब्याला भेट देण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक हे पुणे ते लोणावळा स्टेशन आहे. लोणावळा स्टेशन वरून उतरून तुम्ही बसने किंवा गाडीने कुणे धबधब्याला भेट देऊ शकता.

कुणे धबधब्या जवळील ५ प्रेक्षणीय स्थळे कोणती ?

१.कार्ला लेणी
२.बेडसे लेणी
३.पावना तलाव
४.लोहगड किल्ला
५.वॅक्स म्युझियम

कुणे धबधब्याचा ट्रेक कोणत्या गावातून सुरु होतो ?

कुणे धबधब्याचा ट्रेक कुणे गावापासून सुरु होतो.

कुणे धबधब्याला भेट देण्यासाठी उत्तम कालावधी कोणता ?

कुणे धबधब्याला तुम्ही जून ते ऑक्टोबर या कालावधीत भेट देऊ शकता.

कुणे धबधब्याची समुद्रपाटीपासून किती उंची आहे ?

साधारणतः ५०० ते ६०० मीटर  

निष्कर्ष

आम्ही आमच्या लेखातून कुणे धबधब्याचे ट्रेकिंग,तिथिल प्रेक्षणीय स्थळे,भेट देण्यासाठी उत्तम महिना कोणता इत्यादीबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा व कमेंट करून आम्हास नक्की कळवा.

धन्यवाद.

Leave a comment