माथेरान संपूर्ण माहिती मराठी : MATHERAN HILL STATION INFORMATION IN MARATHI

माथेरान संपूर्ण माहिती मराठी : MATHERAN HILL STATION INFORMATION IN MARATHI – सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या मधोमध वसलेलं माथेरान हिल स्टेशन आपल्याला त्याच्या नैसर्गिक सौंदर्याने मोहित करते. हिरव्यागार टेकड्या, वळणदार रस्ते आणि पावसातील नैसर्गिक धबधबे या जागेचा सौंदर्य अधिकच वाढवतात. थंडीत उंच उंच हिरव्यागार डोंगरांचे चुंबन घेणारे धुक्याचे ढग, आजूबाजूला पक्षांचे मंद आवाज, रानफुलांचा सुगंध या परिसराला स्वर्गीय सुंदरता देतात. माथेरानच्या या नैसर्गिक वैभवात मंत्रमुग्ध होण्यासाठी, चला आपण या स्वर्गीय स्थळाची सैर करूया.

Table of Contents

माथेरान संपूर्ण माहिती मराठी : MATHERAN HILL STATION INFORMATION IN MARATHI

स्थान माथेरान
वैशिष्ट्य हिल स्टेशन
क्षेत्र 07 वर्ग किमी
जिल्हा रायगड
ऊंची 803 मी – २६०० फूट 
लोकसंख्या५,१३९ (२००१)
क्षेत्र कोड०२१४८
वाहन नोंदणीMH-४६

माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असल्याने या ठिकाणाला पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. मुंबई व पुण्यापासून समान अंतराव ळ्यामध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वरनंतर हे हक्काचे ठिकाण आहे. विपुल वनसंपदा, शुद्ध व थंड हवा तसेच दऱ्या-खोऱ्यांमधून दिसणारे सह्याद्रीचे विहंगम दृश्य यामुळे या ठिकाणची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

माथेरानचा इतिहास – HISTORY OF MATHERAN HILL STATION

१९ व्या शतकात ठाण्याचे जिल्हाधिकारी ह्यू पॉईंटझ मॅलेट यांनी हे अप्रतिम ठिकाण शोधून काढले.
ब्रिटिश काळात हे ठिकाण उन्हाळ्याच्या दिवसात थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जायचे लॉर्ड एल्फिनस्टन या मुंबईच्या गव्हर्नरनी आणि इथे पर्यटन स्थळाची स्थापना केली. त्यांनी आपल्या काळात या जागेचा बऱ्यापैकी विकास केला. इथे आज दिसणारे टॉय ट्रेन सुद्धा इंग्रजांनी त्यावेळी सुरू केली होती.

माथेरान हिल स्टेशन बद्दल माहिती

MATHERAN HILL STATION INFORMATION IN MARATHI

समुद्रासपाटीपासून साधारणतः २६०० फूट उंच पठारावर हे पर्यटन स्थळ आहे. येथे आजूबाजूला घनदाट झाडी आणि छोट्या पायवाटा आहेत. या पठारावर छोट्या छोट्या उंच टेकड्या आहेत. या उंच टेकड्यावरील पॉईंट्सना इंग्रजांनी दिलेली नावे अजूनही तशीच आहेत.

ही डोंगररांग कल्याणच्या मलंग गडापासून सुरू होते. बदलापूर बाजूला टवली गुहांचे डोंगर आहेत. त्यानंतर पुढे नवरानवरीचा डोंगर लागतो. तसेच आपल्याला इथे चंदेरीचा उंच उंच सुळका आहे. या ठिकाणी म्हैसमाळ डोंगर, नाखिंड डोंगर आणि मग पेब डोंगर दिसतो. इथे पुरातन किल्ल्याचे काही अवशेषही पाहता येतात. या सर्वांच्या पुढे माथेरानचा डोंगर सुरू होतो

मुख्य शहरापासून अंतर

हे ठिकाण मुंबईपासून ११० किलोमीटर अंतरावर तसेच पुण्यापासून १२० किलोमीटर अंतरावर आहे.

माथेरानचा नकाशा

माथेरानचा भुगोल

हे हिल स्टेशन महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे. हे ठिकाण मुंबई पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गालगत आहे. सह्याद्री पर्वतरांगेच्या उत्तर रांगेतील डोंगर माथ्यावर वसलेले असून याची समुद्रसपाटीपासून उंची ८०३ मीटर म्हणजेच २६०० फूट एवढी आहे.

हे पण वाचा 👇

माथेरान मधील पर्यटन स्थळे – 15 PLACES TO VISIT NEAR MATHERAN HILL STATION

माथेरान मधील पाहाण्यासारखी ठिकाणे – इथे काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय पॉइंट व ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. ही ठिकाणे माथेरान मधील सर्वात सुंदर पर्यटन स्थळे आहेत. निसर्गाच्या कुशीत, शांततेत आणि एकांतात काही वेळ घालवण्यासाठी हि ठिकाणे आदर्श ठिकाणे आहे. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत आणि मित्रांबरोबर वेळ घालवण्यासाठी या ठिकाणांची निवड करत असतात.

०१. दोधनी धबधबा

dhodani waterfall Matheran
dhodani waterfall Matheran

दोधनी धबधबा हे या ठिकाणचे एक सुंदर आणि आकर्षक पावसाळी पर्यटन स्थळ आहे. या धबधब्याच्या जवळचे वातावरण हे अगदी विस्मयकारक असे असते. दोधणी धबधबा पाहण्यासाठी विशेषतः पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी असते. हा धबधबा साधारणता ११५ फूट उंचावरून खाली झेपावतो, त्याचबरोबर ०४ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

 ०२. माथेरान अंबरनाथ मंदिर

ambarnath MANDIR MATHERAN
ambarnath MANDIR MATHERAN

अंबरनाथ मंदिर हे वालधुनी नदीच्या काठी वसलेले एक हिंदू प्राचीन मंदिर आहे. हे प्राचीन मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. जे या भागातील सर्वात प्राचीन मंदिर म्हणून ओळखले जाते. पुरातन शिवालय आणि आंबरेश्वर शिवमंदिर म्हणूनही या मंदिराला ओळखले जाते. या मंदिरातील भिंती आणि छतावर कोरलेली अप्रतिम रचना हे या मंदिराचे मुख्य आकर्षण आहे.

०३. प्रबळगड किल्ला

PRABALGAD FORT Matheran
PRABALGAD FORT Matheran

प्रबळगड किल्ला हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख आणि आकर्षक किल्ल्यांपैकी एक आहे. हा माथेरान आणि पनवेल दरम्यान २३०० फूट इतक्या उंचीवर वसलेला आहे. जवळील एका खडकाळ पठाराच्या माथ्यावर वसलेला हा किल्ला पर्यटकांचे मुख्य आकर्षण केंद्र आहे. याला कलावंतीण दुर्ग असेही म्हटले जाते. ट्रेकिंगच्या दृष्टीने चढाई करण्यासाठी हा किल्ला कठीण आहे,  ट्रेकिंगसाठी बरेचजण याला भेट देत असतात.

०४. माथेरान इको पॉईंट

ECO POINT Matheran
ECO POINT Matheran

येथील इको पॉईंट सर्वात प्रेक्षणीय शिखरांपैकी एक आहे. आवाज दिल्यानंतर वेगवेगळे आवाज निर्माण होणाऱ्या प्रतिध्वनीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. हे ठिकाण टेकडीच्या एका माथ्यावर असल्याने या ठिकाणी रोप डायव्हिंग आणि झीप लाईन यासारख्या विविध साहसी पर्यटन प्रकारात सहभागी होण्याची संधी मिळते. पावसाळ्यामध्ये या ठिकाणच्या डोंगरावरून खाली कोसळणारे धबधब्याचे मनमोहक नजारे आपल्याला पाहायला मिळतात.

०५. माथेरान टॉय ट्रेन

TOY TRAIN Matheran
TOY TRAIN Matheran

माथेरान टॉय ट्रेन ही या ठिकाणी धावणारी एक सुंदर आणि छोटी रेल्वे आहे. सह्याद्री पर्वत रांगेतून वाट काढत ही रेल्वे नेरळ ते माथेरान या मार्गाने साधारणता एकवीस किलोमीटर अंतर कापते. हे अंतर कापण्यासाठी या रेल्वेला तब्बल ०२ तास २० मिनिटे इतका वेळ लागतो. या रेल्वेमध्ये बसून आपण निसर्ग संपन्न वातावरणाचा आनंद घेऊ शकतो. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक या टॉय ट्रेन मधून आपल्या कुटुंबासमवेत, मित्रांबरोबर आनंद घेतात.

०६. वन ट्री हिल पॉईंट

ONE TREE HILL MATHERAN
ONE TREE HILL MATHERAN

वन ट्री हिल पॉईंट एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे या ठिकाणी असलेल्या जांभळाच्या झाडासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला वन ट्री हिल पॉईंट असे नाव देण्यात आले आहे. कारण या शिखराच्या माथ्यावर फक्त एकच झाड उभे आहे आणि तिथे गवत वगळता इतर कोणतीही वनस्पती आढळत नाही. पावसाळ्यामध्ये भेट देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. हे ठिकाण २ ते ३ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. वन ट्री हिल पॉईंट दक्षिण टोकाला असून या ठिकाणावरून समोर मोरबी धरण व धरणाला लागून असलेला इरशालगड सहज लक्ष वेधून घेतो. या ठिकाणावरून खोपोली तुंग किल्ल्यापर्यंतचा सारा प्रदेश आपल्याला दिसेल.

०७. पॅनोरमा पॉईंट

PANORAMA POINT Matheran
PANORAMA POINT Matheran

पॅनोरमा पॉईंट हे या ठिकाणचे सर्वात रोमांचक पर्यटन स्थळ आहे. इथे आपल्याला अविस्मरणीय आणि आश्चर्यकारक नजारे पाहायला मिळतील. हे ठिकाण मित्रांबरोबर ट्रेक करण्यासाठी अगदी उत्तम आहे. या ठिकाणावरून आपल्याला सूर्योदय, सूर्यास्त, दऱ्या, तलाव, शिखरे यांची चित्तथरारक दृश्ये पाहता येतात. हे ठिकाण फक्त ०५ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

०८. माधवजी पॉईंट

MADHAVJI POINT MATHERAN
MADHAVJI POINT MATHERAN

 माधवजी पॉईंट हे या हिल स्टेशनवरील एक प्रेक्षणीय ठिकाण आहे हे ठिकाण वनस्पती आणि प्राण्यांनी समृद्ध आहे. त्यामुळे या ठिकाणच्या हवामान आणि निसर्गाबद्दल जाणून घेण्याची संधी आपल्याला या ठिकाणी मिळते. या ठिकाणी असणाऱ्या सौंदर्याचा आणि विलोभनीय  हवामानाचा आनंद घेण्यासाठी बरेच पर्यटक मोठ्या उत्सुकतेने येत असतात. हा पॉईंट हे ठिकाण ०१ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

०९. लुईसा पॉईंट

LOUISA POINT Matheran
LOUISA POINT Matheran

लुईसा पॉईंट हे एक सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे. पक्षी, धबधबे आणि सुंदर सरोवराच्या बागा पाहू शकतो. त्याचबरोबर या ठिकाणाहून आपल्याला प्रबळगड आणि विशाळगड या दोन किल्ल्यांची विहंगम दृश पाहायला मिळते. सुंदर दृश्य माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. हे ठिकाण २ ते ३ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

१०. शार्लोट लेक

CHARLOTTE LAKE Matheran
CHARLOTTE LAKE Matheran

शार्लोट लेक मध्यावर असलेल्या मार्केट पासून साधारण एक ते दीड किलोमीटर अंतरावर हा तलाव असून, येथील परिसर रमणीय आहे. तलावाच्या बाजूला एक महादेवाचे मंदिर असून मंदिरांमधील वातावरण थंड व अल्हाददायक आहे. तलावाच्या दुतर्फा घनदाट जंगल असून येथे तासन् तास बसून राहावे असे वाटते.

११. माथेरान लॉर्ड पॉईंट

LORD POINT Matheran
LORD POINT Matheran

लॉर्ड पॉईंट – तलावापासून जवळच पठाराच्या शेवटच्या टोकाला लॉर्ड पॉईंट आहे. या पॉईंटवरून समोर दिसणारे सह्याद्रीचे रूप डोळ्यात साठवून ठेवावे असे वाटते. कड्याच्या शेवटच्या टोकाला खोल दरी असल्याने खाली पाहताना डोळे चक्रावतात. पावसाळ्यात या ठिकाणावरून पाण्याचा मोठा धबधबा पाहायला मिळतो.

१२. माथेरान सनसेट पॉईंट

SUNSET POINT Matheran
SUNSET POINT Matheran

सनसेट पॉईंट माथेरानच्या पश्चिम टोकाला असून मार्केट पासून याचे अंतर साधारण चार किलोमीटर आहे. या ठिकाणाहून सायंकाळी मावळतीच्या सूर्याचे दर्शन करणे एक वेगळी अनुभूती आहे. येथून समोरच प्रबळगड दिसतात. माथेरान ट्रेक करण्यासाठी वाघाची वाडी, चिंचवाडी या मार्गाचा वापर करून सनसेट पॉईंट वरून प्रवेश करता येतो. हा पॉईंट उत्तरे कडे असून पठाराच्या शेवटच्या टोकाचे पूर्व पश्चिम देशाचे कडे ९०अंश कोनात आहे. या ठिकाणावरून गाडेश्वर तलाव, चंदेरी व पेब हे किल्ले दिसतात. तसेच उत्तरेस पनवेल पर्यंतचा सारा मुलुख आपल्या नजरेस पडतो.

१३. इरसालगड किल्ला

IRSALGAD FORT
IRSALGAD FORT

इरसालगड किल्ला – हिल स्टेशन पासून जवळपास ३६ किलोमीटरवर हा किल्ला स्थित आहे. या किल्ल्याचे सौन्दर्य पावसात अधिकच खुलून दिसते. हौशी फोटोग्राफर्स हे अप्रतिम नजारे टिपण्यासाठी इथे गर्दी करतात.

वाचा👉 कुणे धबधबा

१४. चंदेरी गुहा

CHANDERI CAVE FORT
CHANDERI CAVE FORT

चंदेरी गुहा – हे ठिकाण हौशी ट्रेकर्ससाठी अतिशय आवडीचे ठिकाण आहे. बदलापूर कर्जत मार्गावर असलेले हे छोट्या छोट्या टेकड्या असलेल ठिकाण अतिशय विलोभनीय आहे. ही पर्वत शृंखला ८०० मीटर उंचीवर स्थित आहे

१५. कर्नाळा पक्षी अभयारण्य

KARNALA BIRD SANCTURY
KARNALA BIRD SANCTURY

कर्नाळा पक्षी अभयारण्य – हिल स्टेशन पासून जवळपास ६५ किलोमीटरवर असलेले हे पक्षी अभयारण्य बर्डवॉचर्ससाठी हक्काचे ठिकण ठरते. इथे असलेली घनदाट झाडी, छोटी तळी ही पक्षांची निवासस्थाने आहेत. इथे बऱ्याच प्रकारचे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी आपल्याला पाहता येतात.

अलेक्झांडर पॉईंट, लिटील चौक, डेंजर चौक, लेक व्ह्यू, किंग जॉर्ज पॉईंट, रुस्तुमजी पॉईंट, मंकी पॉईंट असे विविध पॉईंट आपण या ठिकाणी जाऊन बघू शकतो.

माथेरान मध्ये काय करावे ? THINGS TO DO IN MATHERAN

धबधबा रॅपलिंग

मॉन्सून मध्ये साहसी ट्रेकिंग ग्रुप्स तर्फे इकडच्या धबधब्यांमध्ये रॅपलिंग केले जाते. यासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक असते. धो धो कोसळणाऱ्या जलप्रपातात दोरीच्या सहाय्याने खालून वर चढत जाणे अतिशय थ्रिल्लिंग असते.

रॉक क्लाइंबिंग

धबधबा रॅपलिंग प्रमाणेच रॉक क्लाइंबिंग हा साहसी पर्यटन क्रीडा प्रकार इथे केला जातो. माथेरान मधील शिखरांवर चढत जाण्याचे थ्रिल काही औरच.

नेचर ट्रेल

इथे आपण आपल्या कुटुंब किंवा मित्र मैत्रिणींसोबत, सकाळी किंवा संध्याकाळी, रमणीय निसर्गसौंदर्य पाहत, एक दोन तासाची रपेट मारू शकतो. या फेरीत आजूबाजूचा सुंदर निसर्ग, पक्षी आपल्याला पाहता येतात.

ट्रेकिंग आणि हाइकिंग

मॉन्सून मध्ये विविध ग्रुप्स तर्फे किंवा सोलो ट्रेकिंग केले जाते. धो धो कोसळणाऱ्या पावसात किंवा थंडीत इथे ट्रेकिंग आपलयाला वेगळीच अनुभूति देते

माथेरान माहिती व्हिडिओ

माथेरान मधील वन्यजीवन – WILDLIFE AT MATHERAN HILL

प्राण्यांमध्ये माकड हा प्राणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येतो. माकडाप्रमाणेच रानमांजरे, हरिण, ससे हे ही प्राणी या ठिकाणी आढळतात. जंगलातून येताना विविध प्रकारचे पक्षी व त्यांचा किलबिलाट आपल्याला सहज अनुभवता येतो. या परिसरामध्ये घनदाट जंगल असून त्यामध्ये विविध प्रकारचे वृक्ष, पशुपक्षी पाहायला मिळतात. त्यामध्ये आंबा, धावडा, जांभळ, खैर, सागवान यासारखे विविध वृक्ष विपुल प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे पक्षी, फुलपाखरे आपण पाहू शकतो.

माथेरान फिरण्यासाठी किती कालावधी लागेल ?

येथील सर्व प्रेक्षणीय ठिकाणे फिरण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी पुरेसा आहे.

माथेरान मध्ये काय खरेदी करावे ?

मित्रांनो खरेदी करण्यासाठी येथे चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे. माथेरान मधील बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी अनेक छोटी, मोठी दुकाने असून या ठिकाणी सर्व प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यातील हस्तकलेच्या वस्तू व कपड्यांना मोठी मागणी आहे. तसेच कातड्याच्या चप्पल किंवा बूट या ठिकाणी विशेष प्रसिद्ध आहेत. पर्यटक हे बूट व चपला आवडीने खरेदी करतात.

माथेरान मधील हॉटेल्स / राहण्याची सोय

मित्रांनो फिरायला जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला परवडेल अशा प्रकारचे हॉटेल्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामध्ये दोनशे रुपयांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत हॉटेल्स मध्ये राहण्याची सोय या ठिकाणी होऊ शकते. त्याचप्रमाणे या ठिकाणी माफक दरात घरगुती जेवणाची सोय किंवा राहण्याची व्यवस्था होते. त्यासाठी बाजारपेठेत किंवा घोडेवाले यांच्याशी चौकशी केली तर आपल्याला ती माहिती देतात. त्याचप्रमाणे प्रवेशद्वाराच्या बाजूला असणारे एमटीडीसीचे गेस्ट हाऊस हा सुद्धा राहण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

हॉटेल बूकिंग

माथेरानला कसे जाल? – HOW TO REACH MATHERAN

जर आपल्याला इथे ट्रिप करायची असेल तर माथेरान – मुंबई – पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने या ठिकाणी जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

लोकल ट्रेनने येताना नेरळ स्थानकावर उतरून, खाजगी वाहनाने इथपर्यंत पोहोचता येते. तसेच पुणे किंवा मुंबईवरून स्वतःच्या गाडीने येणार असणार, तर जुन्या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कर्जत नेरळ मार्गे आपण जाऊ शकतो. येथे मिनी ट्रेन असून ती नेरळ ते माथेरान या मार्गावरून धावते.

माथेरानला भेट देण्यासाठी उत्तम महिना कोणता ?- BEST TIME TO VISIT MATHERAN

येथे वर्षभर आल्हाददायक वातावरण असले तरी ऑक्टोबर ते मे दरम्यान भेट देण्याचा उत्तम काळ आहे.

FAQ

माथेरान काय आहे ?

माथेरान हे ऑटोमोबाईल-मुक्त हिल स्टेशन आहे आणि भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एक नगर परिषद आहे. माथेरान हा मुंबई महानगर प्रदेशाचा भाग आहे आणि भारतातील सर्वात लहान हिल स्टेशनपैकी एक आहे.

माथेरानमध्ये फिरण्यासाठी किती दिवस लागतात ?

2 रात्री 3 दिवसांच्या टूर पॅकेजसह आपल्याला माथेरानचे सौन्दर्य पाहता येते.

माथेरान ट्रेकिंग आहे का?

हे ठिकाण घनदाट जंगलाच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे आणि म्हणूनच चंदेरी लेणी, कलावंतीण शिखर, विकटगड आणि गारबेट पठार यांसारख्या अनेक रमणीय ठिकाणी आपण ट्रेकिंगचा अनुभव घेऊ शकतो.

माथेरानमधील खास खाद्यपदार्थ काय आहे?

वडा पाव, कबाबची एक अस्सल आणि समृद्ध श्रेणी, तसेच काही चिक्की या भागातील लोकप्रिय आहेत.

माथेरान कशासाठी लोकप्रिय आहे?

माथेरान त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे आणि आधी सांगितल्याप्रमाणे, साहसप्रेमींसाठी योग्य ठिकाण आहे. ट्रेकिंग, हायकिंग आणि रॅपलिंग व्यतिरिक्त, तुम्ही रॉक क्लाइंबिंग देखील करू शकता.

निष्कर्ष : CONCLUSION

आम्ही आमच्या ह्या वेबपेजद्वारे MATHERAN HILL STATION ची माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा आणि कमेंट करून आम्हास नक्की नक्की कळवा.

धन्यवाद.

फोटो गॅलरी

Matheran
Matheran
Matheran
Matheran
Matheran
Matheran
TOY TRAIN Matheran
TOY TRAIN Matheran

Leave a comment