रंधा धबधबा माहिती मराठी : RANDHA WATERFALL INFORMATION IN MARATHI

रंधा धबधबा माहिती मराठी : RANDHA WATERFALL INFORMATION IN MARATHI – अहमदनगर जिल्ह्यातील आकोले तालुक्यात असणाऱ्या भंडारदर्‍यापासून १० किलोमीटर उत्तर दिशेला प्रवरा नदीच्या पात्रातून पावसाळ्यात एक अवर्णनीय जलप्रपात जवळपपास १५० फूट खोल दरीमध्ये कोसळतो आणि इथे तयार होणाऱ्या धबधब्याला रंधा धबधबा – RANDHA FALL म्हणतात. हा धबधबा म्हणजे, सळसळत्या, खळखळत्या, निसर्गाचा अप्रतीम आविष्कारच आहे. या धबधब्याच्या जवळच घोरपडा देवीचे मंदिर असून रतनगडाच्या बाजूने उगम पावणाऱ्या प्रवरा नदीच्या प्रवाहापासून रंधा धबधब्याची निर्मिती झालेली आहे. आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास रंधा धबधब्याबद्दल माहिती सांगणार आहोत, हा लेख तुम्ही नक्की वाचा.

RANDHA WATERFALL INFORMATION IN MARATHI
RANDHA WATERFALL

Table of Contents

रंधा धबधबा माहिती मराठी (RANDHA WATERFALL INFORMATION IN MARATHI)

हा धबधबा, सुंदर धबधबा असून, सपाट दगडी पृष्ठभागावरून प्रवास करणारे, पाणी मोठमोठ्या दगडातून अचानकपणे खाली कोसळते. हे दृश्य अतिशय अप्रतिम आहे . मॉन्सून च्या दिवसांत येथील लहान हिरवीगार झाडेझुडुपे या धबधब्याचे सौंदर्य अजून वाढवतात. हा धबधबा भारतातील सर्वोत्तम धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा जवळून पाहण्यासाठी या ठिकाणी एक छान व्ह्यूइंग ब्रिज सिस्टीम बांधण्यात आली आहे.

रंधा धबधबा भूगोल

नाव –रंधा धबधबा
ठिकाण –भंडारदरा
तालुका – अकोले
जिल्हा –अहमदनगर
राज्य – महाराष्ट्र 422604

रंधा धबधबा नकाशा

रंधा धबधबा माहिती (RANDHA FALLS INFORMATION IN MARATHI)

रंधा धबधबा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील, अकोले तालुक्यामध्ये आहे. अकोल्यापासून जवळजवळ २४ किलोमीटर एवढे अंतरावर भंडारदरा गावातील हा धबधबा महाराष्ट्रातील एक आविष्कार म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

हा धबधबा प्रवरा नदीने तयार झालेला असून पर्यटकांचे प्रमुख आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. याच्या विशाल कोसळणाऱ्या धारांमुळे हा धबधबा महाराष्ट्र राज्यातील तिसरा सर्वात मोठा धबधबा म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यामध्ये हा धबधबा अतिशय सुंदर व तजेलदार दिसतो. कुटुंबासोबत, मित्रांसमवेत वेळ घालवण्यासाठी हे एक सुंदर व उत्तम डस्टीनेशन आहे.

या धबधब्याचे सौंदर्य पावसाळ्यात, विशेषतः ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरमध्ये सर्वोत्तम असते. धबधब्यांची ताकद, निसर्गरम्य सौंदर्य आपल्याला निःशब्द करून टाकते आणि हे दृश्य केवळ अप्रतिमच नव्हे, तर अचंबित करणारे असते.

हे सुद्धा पहा 👉 अप्रतिम देवकुंड धबधबा

RANDHA FALLS INFORMATION
फोटो Hemant Kothikar

मुख्य शहर ते रंधा धबधबा अंतर

मुंबई ते धबधबा – हे अंतर साधारणतः १४६ किलोमीटर असून, प्रवासासाठी अंदाजे चार तास लागू शकतात.

पुणे ते धबधबा – हे अंतर साधारणतः १६० किलोमीटर असून, प्रवासासाठी अंदाजे ४.५ तास लागू शकतात.

रंधा धबधबा पाहण्यासाठी कालावधी/दिवस

धबधबा व त्या जवळील प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर करण्यासाठी अंदाजे एक ते दोन दिवस लागू शकतात.

रंधा धबधब्याची उंची

धबधब्याची उंची ही साधारणतः ५२ मीटर असून, हा धबधबा खाली घाटामध्ये १७० फूट इतक्या उंचीवर आहे.

randha waterfall
RANDHA FALLS

रंधा धबधबा व त्याचा विलोभनीय परिसर

भंडारदरा मधील हा धबधबा हा निसर्गाने दिलेल एक वरदानच आहे. पावसाळ्यामध्ये या धबधब्याला भेट देण्यासाठी, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी ठिकाणच्या पर्यटकांची गर्दी असते. भंडारदरा जवळील सर्वोत्तम ठिकाणांपैकी रंधा धबधबा पावसाळ्याच्या काळात भव्य तसेच चित्तथरारक अचंबित करणारी दृश्ये दाखवतो. रंधा धबधब्याच्या जवळच असणारे, हंगामी धबधबे सुद्धा पर्यटकांना तितकेच आकर्षित करतात.

रंधा धबधब्या जवळील घोरपडा देवी मंदिर

घोरपडा देवी मंदिर

घोरपडा देवी मंदिर हे धबधब्याजवळ स्थित असून, रंधा धबधब्याजवळ घोरपडा देवीचे दर्शन घेऊन, नंतर तुम्ही रंधा धबधब्याला भेट देऊ शकता. हे मंदिर अतिशय सुंदर आहे.

जैव विविधतेचा खजिना – आंबोली घाट

रंधा धबधब्याजवळ झालेले चित्रीकरण

रंधा धबधब्याची सौंदर्याचा व निसर्गरम्य वातावरण पाहून, विविध डायरेक्टर रंधा धबधब्याच्या प्रेमात पडले व त्या जवळच त्यांनी विविध चित्रपटांचे चित्रीकरण देखील केले. त्यापैकी काही चित्रपट खालील प्रमाणे –

  • कुर्बान
  • मैने प्यार किया
  • राजू चाचा
  • प्रेम

रंधा धबधब्याला भेट देणे सुरक्षित आहे का?

हा धबधबा, पर्यटनाच्या बाबतीत सुरक्षित आहे. परंतु सावधानी न बाळगल्यास धबधबा धोकादायक देखील ठरू शकतो. सुरक्षितता बाळगण्यासाठी नेहमी धबधब्यापासून, सुरक्षित अंतर ठेवून, सौंदर्याचा व धबधब्याचा आनंद घ्यावा. लहान मुले सोबत असल्यास पालकांनी त्यावर योग्य ते लक्ष ठेवावे. लहान मुलांना एकटे सोडून नये.

रंधा धबधबा का प्रसिद्ध आहे?

निसर्गरम्य वातावरण व महाराष्ट्रातील तिसरा सर्वात मोठा धबधबा म्हणून ज्याची ख्याती आहे, असा रंधा धबधबा संपूर्ण भारतातील सर्वोत्तम धबधब्यांपैकी एक आहे. भंडारदरा मधील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेला, रंधा धबधबा महाराष्ट्रातील लपलेले दैवी वरदान आहे. हा धबधबा जवळील प्रदेशाला जलविद्युतचा प्रमुख स्त्रोत असून, याच्या बाजूलाच घोरपडा देवीचे मंदिर देखील आहे.

रंधा धबधब्या जवळील प्रेक्षणीय स्थळे (Places To Visit Near Randha Waterfall)

अगस्ती ऋषी आश्रम (Agasti Ashram)

प्रवरा नदीच्या काठावर असलेला अगस्ती ऋषी आश्रम, धबधब्याजवळील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे ठिकाण नेहमी इतिहास प्रेमी व निसर्गप्रेमी यांना भुरळ घालत असते. अगस्ती मुनि यांनी या ठिकाणी राहून ध्यान केले असे म्हटले जाते. त्यामुळे धबधब्याजवळील हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे.

घाटघर (Ghatghar)

घाटघर हे ठिकाण धबधब्याजवळ, सर्वात सुंदर ठिकाण आहे. याठिकाणी कोकणकडा अतिशय प्रसिद्ध असून, या कड्यावरून तुम्ही कोकण तथा सह्याद्रीचे विलोभनीय दृश्य पाहू शकता. पावसाळ्यामध्ये घाटघर परिसर धुक्यानमध्ये हरवलेला असतो. तुम्ही देखील नक्की घाटघर परिसराला भेट द्यावी.

हरिश्चंद्रगड (Harishchandragad)

हरिश्चंद्रगड, हा धबधबा येथील एक प्रसिद्ध किल्ला असुन, हा किल्ला महाराष्ट्रातील कठीण व सुंदर किल्ल्यांपैकी एक आहे. हा किल्ला मराठा शासकांच्या गौरवाचा किल्ला आहे. हरिश्चंद्रगड हा सर्वात कठीण ट्रेक समजला जातो.

रतनगड किल्ला(Ratangad Fort)

रतनगड किल्ला, हा महाराष्ट्रातील प्रमुख व आकर्षक किल्ल्यांपैकी एक आहे. सह्याद्री पर्वतरांगेमध्ये वसलेला हा एक डोंगरी किल्ला आहे. रतनगड हा प्राचीन व ऐतिहासिक किल्ला असून, समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची साधारणतः १२९५ मीटर इतकी आहे. हा किल्ला त्याच्या प्रचंड उंचीसाठी प्रसिद्ध आहे.

अमृतेश्वर मंदिर (Amruteshwar Temple)

धबधब्या जवळील हे एक सुंदर व आकर्षक मंदिर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यामध्ये रतनवाडी गावामध्ये अमृतेश्वर मंदिर आहे.

ऑर्थर तलाव (Arthur lake)

ऑर्थर तलाव धबधब्याजवळी प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे. भव्य अशा सह्याद्री रांगेने वेढलेले, ऑर्थर तलाव प्रवरा नदीचे पाणी घेतो. मित्रपरिवारासोबत व फॅमिलीसोबत भेट देण्यासाठी, हे एक उत्तम ठिकाण आहे. ऑर्थर तलावावर आपल्याला कॅम्पिंग, बोटिंग करता येते.

अम्ब्रेला धबधबा (Umbrella Waterfall)

भंडारदरा धरणावर वसलेला अम्ब्रेला धबधबा, हे प्रेक्षणीय स्थळांपैकी एक स्थळ आहे. ज्यावेळी पावसाळ्याच्या काळात भंडारदरा धबधबा ओवर फ्लो होते, त्यावेळी हे पाणी एका खडकामधून बाहेर निघून अर्धवर्तुळाकार वाहते. त्यावेळी हा नयनरम्य अम्ब्रेला फॉल तयार होतो. बाजूला असलेल्या ब्रिजवरून आपल्याला या संपूर्ण अम्ब्रेला धबधब्याचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळते .

कळसुबाई शिखर (Kalsubai Shikhar)

कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर समजले जाते. महाराष्ट्रातील सर्वात उंच असणारे कळसुबाई महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते. कळसुबाई हे शिखर १६४६ मीटर उंच आहे.

भंडारदरा धरण (Bhandardara Dam)

भंडारदरा धरण हे धबधब्याच्या अगदी जवळच स्थित आहे. भंडारदरा धरणावरून तुम्ही सोप्या रीतीने रंधा धबधब्याला जाऊ शकता. एकाच दिवशी तुम्ही रंधा धबधबा त्याचप्रमाणे भंडारदरा धरणाला भेट देऊ शकता. भंडारदरामधील भंडारदरा धरण व रंधा धबधबा ही मुख्य आकर्षणे आहेत.

रंधा धबधब्याजवळ करण्यासारख्या गोष्टी (Things To Do At Randha Waterfall)

भंडारदरा आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात पावसाळ्यात फिरण्यासाठी अनेक सुंदर स्पॉट्स आहेत. तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल आणि ट्रेकिंगची सवय असेल तर या सर्व जागा तुमच्यासाठी स्वर्गापेक्षा कमी नाहीत. साधारणतः २० ते २५ किलोमीटरच्या परिसरात वसुंधरा, कोलटेंबे, पांजरे, सांधण व्हॅली, रिव्हर्स वॉटर फॉल, बाहुबली, रंधा असे अप्रतिम धबधबे आणि काठोकाठ भरलेले भंडारदरा धरण यात दोन चार दिवस सहज निघून जातील.

  • ट्रेकिंग
  • भंडारदरा गावाची सैर
  • फोटोग्राफी
  • पक्षी निरीक्षण
  • प्राचीन मंदिरे पाहणे
  • धबधबे आणि धरणाची सैर
RANDHA FALLS
RANDHA FALLS

रंधा धबधब्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना

हा धबधबा हा अतिशय सुंदर व निसर्गरम्य आहे. या धबधब्याची खरी सौंदर्यता अनुभवायची असल्यास पावसाळ्याच्या दरम्यान किंवा हिवाळ्यात, रंधा धबधब्याला भेट द्यावी.

रंधा धबधब्याला कसे जाल?

धबधब्याला भेट देण्यासाठी तुम्ही तीन पर्यायांचा वापर करू शकता. रेल्वे मार्ग, हवाई मार्ग, रस्ते मार्ग.

रेल्वे मार्ग – धबधब्याला भेट देण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक इगतपुरी रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्थानक धबधब्यापासून साधारणतः ४४ किलोमीटर अंतरावर आहे. येथून तुम्ही ऑटो किंवा कॅब बुक करून धबधब्याला भेट देऊ शकता.

हवाई मार्ग – नाशिक विमानतळ हे धबधब्यापासून सर्वात जवळचे असलेले विमानतळ आहे. हे साधारणतः ९२  किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

रस्ते मार्ग – मुंबई व इतर मुख्य शहरांवरून तुम्ही रस्ते मार्गाने धबधब्याला भेट देऊ शकता.

धबधब्याला भेट देण्यासाठी महत्त्वाच्या सूचना

  • अति पावसाच्या काळात धबधब्याला भेट द्यायला जाऊ नये.
  • बुटांचा वापर करावा.
  • चप्पल घालून जाणे टाळावे.
  • धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्यास, प्रवाह जवळ जाऊ नये.
  • ज्यादा कपड्यांचे व बुटांचे जोड सोबत ठेवावे.

रंधा धबधब्या जवळ राहण्याची सोय

धबधब्या जवळ तुमच्या बजेटनुसार, राहण्याच्या सोयी उपलब्ध आहे. त्या ठिकाणी तुम्हाला उत्तम प्रकारची जेवणाची व खाण्याची सोय उपलब्ध आहे. त्यापैकी काही रिसॉर्ट खालील प्रमाणे –

  • रंधा फॉल कॅम्पिंग
  • हॉटेल चैतन्य
  • हॉटेल वसंतसुत
  • हॉटेल डेल इन
  • काजवा कॅम्पिंग कोंढाणी

FAQ

रंधा धबधबा कुठे आहे?

अहमदनगर जिल्ह्यातील, अकोला तालुक्यामधील भंडारदरा या ठिकाणी रंधा धबधबा आहे. हा धबधबा प्रवरा नदीवर वसलेला आहे.

रंधा धबधबा मुंबई पासून किती अंतरावर आहे?

रंधा हा धबधबा मुंबई पासून साधारणतः १४६  किलोमीटर अंतरावर आहे व प्रवासासाठी अंदाजे चार तास इतका कालावधी लागू शकतो.

रंधा धबधबा का प्रसिद्ध आहे?

निसर्गरम्य वातावरण व महाराष्ट्रातील तिसरा सर्वात मोठा धबधबा म्हणून ज्याची ओळख आहे, तो म्हणजे रंधा धबधबा. हा धबधबा भंडारदरा मधील एक मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू असून, धबधब्याचा निसर्गरम्य परिसर व अचंबित करणारे चित्तथरारक दृश्य पर्यटकांना स्वतःकडे आकर्षित करतात. व त्यामुळे हा धबधबा लोकप्रिय झाला आहे.

रंधा धबधबा येथे राहण्याची सोय आहे का?

तुमच्या बजेटनुसार खाण्याची व राहण्याची उत्तम सोय रंधा धबधब्याजवळ केली जाते. त्यापैकीच हॉटेल चैतन्य, हॉटेल वसंतसूत, हॉटेल डेल इन, काजवा कॅम्पिंग कोंढाणी इत्यादी. हॉटेल रंदा धबधब्या जवळ उपलब्ध आहे.

रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे?

रंधा धबधबा हा प्रवरा नदीवर असून, प्रवरा नदीच्या पात्रातून या धबधब्याची निर्मिती झालेली आहे.

रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?

रंधा धबधबा हा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि हे पर्यटन स्थळ भंडारदरा बस स्टॉपपासून १० किमी अंतरावर, मुंबईपासून १७७ किलोमीटर आणि पुण्यापासून १५६ किमी अंतरावर आहे.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखातून आम्ही आपणास भंडारदरा येथील रंधा धबधबा या प्रेक्षणीय स्थळाबद्दल माहिती RANDHA FALLS INFORMATION IN MARATHI दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व लेख आवडल्यास नक्की शेयर करा.

धन्यवाद.

Leave a comment