साने गुरुजी माहिती मराठी : Sane Guruji Information In Marathi – पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी कवी मनाचा लेखक, ध्येयवेढा, स्वातंत्र्यसैनिक, आदर्शवादी, विचारवंत, सच्चा समाजवादी, हळवा मातृभक्त, अशी त्यांची अनेक रूप सगळ्यांना परिचित आहे. हे मराठी मुला मुलींसाठी पुस्तकाच्या विश्वातला पहिला पाऊल समजले जातात. त्यांच्यातला शिक्षक जिवंत होता. साधनासारखं मासिक असो, अथवा राष्ट्रसेवा दलासारखी संस्था असो, राष्ट्रासाठी झटणारे समाजवादीती विचारसरणीचे कार्यकर्ते घडवण्याचं काम गुरुजींनी निरंतर चालू ठेवलं.
प्रांता प्रांतातील द्वेष नष्ट होऊन, सर्वत्र बंधू भावाचं वातावरण वाढावं यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांनी परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग केला. स्वातंत्र्यानंतर मात्र हळूहळू त्यांचा अपेक्षाभंग होत गेला.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस साने गुरुजींबद्दल माहिती दिली आहे. हा लेख सविस्तर वाचा.
साने गुरुजी माहिती मराठी : Sane Guruji Information In Marathi
पूर्ण नाव | पांडुरंग सदाशिव साने |
जन्मतारीख | २४ डिसेंबर १८९९ |
जन्मस्थळ | पालगड, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
आईचे नाव | यशोदाबाई साने |
वडिलांचे नाव | सदाशिव साने |
प्रसिद्ध पुस्तक | श्यामची आई |
ओळख | साने गुरुजी |
मृत्यू | ११ जून १९५० |
चळवळ | भारतीय स्वातंत्र्यलढा |
प्रभाव | महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर |
संघटना | अखिल भारतीय काँग्रेस |
साने गुरुजींचा परिचय
“खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” असा प्रेमाचा मूल्यवान संदेश देणारे, स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी, विचारवंत, थोरलेखक, आदर्श शिक्षक, पांडुरंग सदाशिव साने यांना आपण साने गुरुजी म्हणून ओळखतो. त्यांचे मराठी भाषेवर अपार प्रेम होते. त्यांचे श्यामची आई, नवा प्रयोग, सुंदर पत्रे, आपण सारे भाऊ, असे विपुल साहित्य प्रसिद्ध आहेत.
गुरुजींनी त्यांच्या साहित्यातून समाजामध्ये मानवतावाद, देशभक्ती, सामाजिक सुधारणा हे मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केला. साने गुरुजींनी बहुतांश लिखाण, तुरुंगात असताना केले. त्यांची सुप्रसिद्ध श्यामची आई ही कादंबरी त्यांनी नाशिक तुरुंगात असताना लिहिली. समाजातील जातीभेद अस्पृश्यता यासारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना गुरुजींनी नेहमी विरोध केला.
साने गुरुजी यांचा जन्म व प्रारंभिक जीवन
कोंकणातील पालघड या ठिकाणी साने गुरुजींचे वडील सदाशिवराव राहत होते. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोत असे घराणे साधारणतः वैभव, संपन्न, आणि श्रीमंत समजले जाते. आणि त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती ही बिकट झाली. अशा रीतीने बडे घर आणि पोकळं वासा झालेल्या या घराण्यामध्ये २४ डिसेंबर १८९९ रोजी गुरुजींचा जन्म झाला.
गुरुजींच्या आईचे नाव यशोदा होते. लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले,याबद्दल माहिती दिली आहे. त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला. सर्वानभूती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींना त्यांच्या आईने दिला. गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान आणि संस्कारक्षम होते. म्हणूनच आईने पेरलेल्या सतभावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली.
साने गुरुजी यांचे शिक्षण
गुरुजींचे प्राथमिक शिक्षण पालघडला झाले. प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना पुण्यास मामांच्या कडे त्यांना ठेवण्यात आले. शाळेमध्ये हुशार विद्यार्थी म्हणून ते चमकू लागले. मराठी आणि संस्कृत या विषयात ते फार हुशार होते. त्यांना लहान कवी म्हणून ओळखू लागले. शाळेत साने गुरुजींचे पाठांतर जबरदस्त होते. घरातील दारिद्र्य दिवसेंदिवस वाढत चालले होते. गुरुजींच्या थोरल्या भावाने नोकरी धरली होती. आणि गुरुजींना सुद्धा आता आपण वडिलांच्या वर विसंबून राहू नये असे वाटू लागले.
म्हणून त्यांनी शिकण्यासाठी कुठेतरी दूर जाण्याचा निश्चय केला. एका मित्राने त्यांना सांगितले की आनंद संस्था तेथे गरीब विद्यार्थ्यास मोफत शिक्षण मिळते. त्यानुसार गुरुजी आनंद संस्थानात येऊन राहिले. शिक्षणासाठी खडतर हालअपिष्ट घेतल्या. त्यांनी भाकर तुकडे खाऊन, त्यावर दिवस काढले. कधी काकडी खाऊन, तर कधी ओळखीच्या गिरणी वाल्याकडून मिळणाऱ्या पिठावर, आपली भूक भागवली. पण ज्ञानोपासना मात्र सोडली नाही.
साने गुरुजी यांचे कार्य | information about sane guruji
गुरुजींच्या दुर्दैवाने तेथे प्लेग सुरू झाल्याने, शिक्षण अर्धवट सोडून साने गुरुजी परत घरी पालघड येथे आले. खडतर हालअपिष्ट शोषितच गुरुजी १९१८ साली मॅट्रिक झाले. शाळेत गुरुजी अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी आपले नाव पुन्हा एस.पी. कॉलेज येथे दाखल केले. एस.पी. कॉलेजमधून ते बी.ए आणि एम.ए.च्या परीक्षा उत्तीर्ण झाले. एम.ए. झाल्यानंतर पुढे काय करावे ? या विचारात असतानाच अमळनेरच्या तत्त्वज्ञान मंदिरासाठी कामाची जाहिरात त्यांनी वाचली गुरुजींनी लगेच अर्ज केला. त्यांना प्रवेश पण मिळाला.
पण लवकरच त्यांनी तत्त्वज्ञान मंदिराला राम राम ढोकला. आणि गुरुजी अमळनेर येथील शाळेतच शिक्षक झाले. थोड्याच दिवसात तेथील वस्तीगृहाचे मुख्य झाले. तेथील विद्यार्थ्यांच्या जीवनाशी ते समरस झाले. विद्यार्थ्यांना स्वावलंबन आणि सेवावृत्ती आपल्या कृतीद्वारा त्यांनी शिकवली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपले सारे श्रम आणि सारी बुद्धी त्यांनी वसली. गुरुजी या अविधानाला ते सार्थ ठरले. १९२८ या नोव्हेंबर महिन्यात त्यांनी “विद्यार्थी” या नावाचे मासिक सुरू केले.
गुरुजींचा भारतीय स्वातंत्रलढ्यात सहभाग
१९३० साली हिंदुस्थानामध्ये राजकीय आंदोलन सुरू झाली. गुरुजी शालेय जीवनातून मुक्त झाले. भारताच्या राजकीय जीवनात समरस होण्यासाठी, त्यांनी सत्याग्रहांमध्ये भाग घेतला. येथे गुरुजींच्या जीवनातील प्रथमार्थ संपून उत्तरार्ध सुरू झाला. महात्माजींच्या राजकीय आंदोलनाचा परिणाम गुरुजींच्यावर १९२१ पासून होत होता. 1921 साली त्यांनी खादी वापरण्यास सुरुवात केली. १९३० साली सत्याग्रह सुरू होतास, त्यांनी शाळा सोडली.
आणि खानदेशामध्ये प्रचारास सुरुवात केली. त्यांना अटक झाली, तुरुंगात विनोबा भावे त्यांना भेटले. तेथे चक्की पिसण्याचे काम त्यांनी आनंदाने घेतले. तुरुंगात विनोबाजींची गीतेवर प्रवचने होत असत. गुरुजी ती प्रवचने अत्यंत लक्षपूर्वक ऐकत. विनोबाजींच्यावर गुरुजींची अतिशय श्रद्धा बसली. २३ मार्च १९३१ ते पुन्हा तुरुंगात सुटले. १९३२ पासून ते १९३४ पर्यंत ते तुरुंगात होते. १९३४ ते १९३६ सालापर्यंत दोन वर्ष ते पुण्यात होते. १९३६ साली काँग्रेसने खेड्यात अधिवेशन भरविण्याचे ठरवले.
गुरुजींनीही अधिवेशन यशस्वी व्हावे, म्हणून जीवापाड मेहनत केली. त्यांच्या हस्ते स्वातंत्र्य ज्योत तेथे आणण्यात आली. या अधिवेशनामध्ये काँग्रेसने असेंबलीच्या निवडणुका लढविण्याचे ठरवले. सारा देश काँग्रेसच्या पाठीमागे आहे, हे सिद्ध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते झटू लागले. खानदेशाच्या खेड्यापाड्यांमधून काँग्रेसचा संदेश पोहोचविण्याचे काम गुरुजींनी केले. १९३८ साली त्यांनी काँग्रेसच्या नावाचे एक साप्ताहिक सुरू केले. महायुद्ध १९३९ साली सुरू झाले.
त्यानंतर देशातील घडामोडी प्रचंड वेगाने घडून येऊ लागली. सगळ्या मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. सरकारने ९३ कलमी कारभार सुरू केला. देशात असंतोषाचे वारे वाहू लागले. या सुमारास गुरुजींनी काँग्रेसचे एक लाख सभासद महाराष्ट्रात व्हावे, म्हणून उपोषण केले. १९३८ साली पिके बुडाल्यामुळे, सारा माफीसाठी शेतकऱ्यांची परीक्षा त्यांनी भरवली. काँग्रेस युवक परिषद १९४० साली चांदवड येथे भरली.
त्यात गुरुजींना अटक झाली. त्यांना धुळ्यात ठेवले होते. १९४२ चा लढा सुरू होईपर्यंत, ते तुरुंगातच होते. १० ऑगस्ट १९४२ ला त्यांना सोडण्यात आले. 1943 मध्ये त्यांना परत अटक झाली. आणि १९४५ ला मुक्तता झाली. काँग्रेस, मुस्लिम लीग पक्षांबरोबर ब्रिटिश सरकारने वाटाघाटी सुरू केल्या.
१९४६ साली देशांमध्ये सर्वत्र निवडणुका होऊन, काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे दोनच पक्ष स्वातंत्र्याचे नगारे देशात सर्वत्र वाजू लागले होते. स्वातंत्र्याचा उषःकाल आला, तरी देशातील भेदाभेद दूर झाले नव्हते. याबद्दल गुरुजींना फार वाईट वाटले पंढरपूरचे देऊळ हरिजनांना अद्यापले नव्हते .साने गुरुजींनी सहा महिने आपल्या ओजस्वी वाणीने हे मंदिर हरिजनांसाठी उघडण्यासाठी महाराष्ट्रभर प्रचार केला.
साने गुरुजी – एक प्रसिद्ध लेखक
१९४८ साली १५ ऑगस्टला त्यांनी साधना या नावाचे साप्ताहिक सुरू केले. त्यातून ते आपले समाजवादी विचार मांडत असत. कादंबऱ्या, लेख, निबंध, इत्यादी. साहित्याच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांची लेखणी अविरत चालली होती. त्यांच्या वाग्मयातून कळकळ, स्नेह, प्रेम, इत्यादी. गोष्टींचा वर्षाव झालेला आहे. त्यांच्या भाषेला एक प्रकारची धार होती.
त्यांची साधीसुधी भाषाच लोकांना फार आवडली. गुरुजींनी आपले सर्व लेखन समाजाच्या उद्धारासाठी लिहिले. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक, आणि शैक्षणिक, विषयासंबंधीचे विचारांचे, भावनांचे कलर ठरले. ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीच्या द्वारे प्रकट केली. स्वतःचे समाजाविषयीचे विचार आणि स्वतःला आलेले अनुभव त्यांनी आपल्या लेखणीतून प्रकट होऊन, कितीतरी घरगुती साधे प्रसंग यांच्या हृदय रीतीने वर्णन केलेले आहे.
गुरुजींचे लेखन सर्वांसाठी आहे. बालकांना त्यांनी गोड गोष्टी सांगितल्या. कुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शक, साहित्य, चरित्रे, आधी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध, लिहिले. माता-भगिनींसाठी श्री जीवन, आणि पदरी अर्पण केली. या विपुल वाड्मयातील तेजस्वीरतने म्हणजेच श्यामची आई हे पुस्तक होते.
साने गुरुजी आणि आंतरभारती स्थापना
साने गुरुजींचे एक मोठे कार्य म्हणजे आंतर भारतीची स्थापना करण्याचा प्रयत्न हे होते. प्रांता प्रांतातील हेवादावाही अद्याप नष्ट झालेला नव्हता. क्रांती येता ही भारताच्या एकत्वाला बाधक ठरणार असे दिसू लागले होते. म्हणून त्यांनी प्रांता प्रांतातील द्वेष नाही सांगून, सर्वत्र बंधू प्रेमाचे वारे वाहवेत यासाठी निरनिराळ्या प्रांतामधील लोकांनी परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात, यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरवले.
यासाठी त्यांनी पैसा जमवून निरनिराळ्याप्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतन प्रमाणे काही सोय करावी, ही इच्छा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये या स्तरावर ठरावावर बोलताना व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असताना, आज दिनांक ११ जून १९५० ला त्यांचे देहावसन झाले.
साने गुरुजी यांचा समाजातील जातिभेदसाठी लढा
मे १९४७ भारताचे स्वातंत्र्य अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलं होतं. अनेक वर्षांची गुलामीची वेडी तुटणार. आता आपलं राज्य येणार म्हणून, देशभर लोक उत्साहात होते. पण पंढरपूरच्या विठोबाच्या प्रांगणात मात्र खळबळून आली होती. उभ्या महाराष्ट्राचे लाडके साने गुरुजी उपोषणाला बसले होते. विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून,, हे आंदोलन सुरू होतं.
पंढरपूर म्हणजे प्राचीन तीर्थक्षेत्र. राज्यभरातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी इथे येतात. ज्ञानोबा, तुकोबाच्या, बंडखोर संत परंपरेचा वारसा या वारीला तरीही समाजाचा मोठा घटक असलेल्या दीनदलीत समाजाला, या दर्शनापासून वंचित ठेवलं जात होतं. विठोबाच्या भडव्यांनी खुद्दसंत चोकोबांना दारावरून आत येऊ दिलं नव्हतं. इतक्या वर्षाचा अन्याय मोडून काढायचं साने गुरुजींनी ठरवलं. सर्वात आधी राज्यभर या विषयावरून रान उठवलं, “राष्ट्रसेवा दलाची पथक घ्यारे घ्यारे हरिजन घरात घ्यारे” ही पद गाऊन, समाज प्रबोधनाचा प्रयत्न करत होती.
सेनापती बापट, आचार्य कर्वे, असे अनेक गांधीवादी नेते त्यांच्यासोबत आले. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे साने गुरुजी सेनापती बापट, यांच्या बरोबर घेऊन उभा महाराष्ट्र पिंजून काढत होते. हरिजन मंदिर प्रवेशासाठी जनमत जागृती करत होते. अस्पृश्यता ही कायद्याने दूर होणार नाही, तर ती पाळणाऱ्याच्या मनातून दूर झाली पाहिजे. यावर गुरुजींचा ठाम विश्वास होता. गुरुजींची भाषणे, लोकांच्या मनाचा अभंग, स्वतःच्या कविता, सुभाषित, गोष्टी, यांनी गुरुजींची भाषण होती. गावागावातून लोकमत बदलत होतं.
अशाच एका गावातील सभेत गुरुजी म्हणतात, बंधू भगिनींनो मी तुमच्या पाया पडून विनवित आहे, प्रेम धर्माने वागा. बंधू बाबाची मला भीक घाला, मला पाठिंबा द्या. मी एकटा काहीच करू शकत नाही. तुमची साथ मिळाली तरच काहीतरी साध्य करू शकेल. लाखो लोकांची सही घेण्यात आली, तरी मंदिर प्रशासनाने अस्पृश्य समाजाला प्रवेश देण्याचा नाकारलं होतं. अखेर दिनांक ०१ मे १९४७ रोजी एकादशीच्या मुहूर्तने साने गुरुजींनी पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटात प्रायोग उपोषणाला सुरुवात केली.
उपोषणाच्या विरोधात देशभरातून सनातनी मंडळी पंढरपूरला गोळा झाली. स्वातंत्र्याच्या तोंडावर गुरुजी हा कसला अपशकुन करत आहेत, असं काही जणांचं म्हणणं होतं. समाजवादी विचारांच्या साने गुरुजींना कशाला हवा मंदिर प्रवेशाचा मुद्दा, वगैरे टीका झाली. “जावो साने भीमा पार, नही खुलेगा विठ्ठल द्वार” अशा घोषणांनी साने गुरुजींना काळे झेंडे दाखवण्यात आले होते. गांधीजींना साने गुरुजींच्या आंदोलनाबद्दल गैरसमज करून देण्यात आला.
गांधीजींनी गुरुजींना ताबडतोब हे उपोषण थांबा, अशी तार पाठवली. पण गुरुजी आपल्या गुरूंचाही ऐकायला तयार नव्हते. त्यांनी गांधीजींना उलटदार पाठवून आपली भूमिका मांडली. आत्मक्लेषाने जर ब्रिटिशांचं मन मिळू शकत असेल, तर बडवे मंडळींचं का बदलणार नाही. राज्यभरातल्या ग्रामीण भागातून लाखो तरुण कार्यकर्ते साने गुरुजींना पाठिंबा देण्यासाठी पंढरपुरात दाखल झाले.
मोठे मोठे व्यक्तिमत्व गुरुजींच्या सोबत उभी होते. या सगळ्यांच्या दबावाखाली बडवे आणि मंदिर प्रशासनाने मंदिर प्रवेशाचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला. १० मे १९४७ रोजी गुरुजींनी आपल्या उपोषणाची सांगता केली. पुण्याचे दलित समाजाचे कार्यकर्ते सोनवणकर यांनी दिलेला मोसंबी रसाचा ग्लास गुरुजींनी अत्यंत खूष झालेल्या थरथर त्या हाताने तोंडात लावतात, लोकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडे केला. जयघोष याबरोबर साने गुरुजी जिंदाबाद या घोषणांनी सारा तनपुरे मठ आणि परिसर उदळून टाकला. देश स्वतंत्र होण्याच्या आधी गुरुजींनी विठोबाला बंधनातून स्वतंत्र केलं.
साने गुरुजींचे निधन | sane guruji death
गांधीजींचा खून त्यानंतर महाराष्ट्रात उमटलेली प्रतिक्रियात्मक दंगल या सगळ्यांनी ते खूप दुखावले गेले, आपली माणसं सत्ता आल्यावर बदलताना, त्यांनी पाहिली होती. बलसागर भारताचे स्वप्न डोळ्यासमोर भंग होताना दिसत होते. या सगळ्याला कंटाळून त्यांनी ११ जून १९५० रोजी आत्महत्या केली. त्यांच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला. देशपांडे आपल्या भाषणात म्हणतात, गुरुजींनी आत्महत्या केली नाही, देश इतका नासला की गुरुजींसारख्यांना जगणं आम्ही अशक्य करून ठेवलं, गुरुजी अशा एका महायात्रेला निघून गेले, की तिथून परत येणे नाही.
साने गुरुजींचे विचार | sane guruji thoughts
- सूर्याच्या किरणांनी ज्याप्रमाणे बर्फाच्या राशी वितळतात, त्याप्रमाणे अहंकाराचे राशी प्रेमाच्या ओल्यावाणी वितळतात.
- स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. झाडे फळे देऊन टाकतात, फुले सुगंध देऊन टाकतात, नद्या ओलावा देऊन टाकतात, सूर्य चंद्र प्रकाश देतात, जे जे आहे ते सर्वांनी देऊन, सर्व मिळून उपभोग घेऊ.
- सदाचार हा मनुष्याचा खरा अलंकार आहे. भूतकाळातील काही गोष्टी आता चुकीच्या वाटल्या, तर त्या दूर न करणे म्हणजे भूतकाळाचा अपमान आहे. भूतकाळातील ब्राह्मक गोष्टी जर तशाच पुढे चालवल्या, तर ते उचित नाही. तो भूतकाळाचा गौरव नाही, तो पूर्वजांचा गौरव नाही, उलट त्या थोर पूर्वजांचा अपमान करण्यासारखे आहे.
- भेदावर अभेद हेच औषध आहे. प्रेमाचे नाते सर्वात थोर आहे. मोत्यांच्या हारापेक्षा, घामाच्या धारांनीच मनुष्य घडू शकतो.
- प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात दुःख असते, दुःख घेऊन आनंदी राहणे, हीच खरी माणुसकी.
- सुधारणा करण्याचे अनेक मार्ग असतात, निसर्गावर प्रेम करा. निसर्ग आपली माता आहे. दुसऱ्यावर हसणे फार सोपे असते, पण दुसऱ्या करिता रडणे फार कठीण असते. त्याला अंतकरण असावे लागते.
- ध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्गही लांब व खडतर असतो. ध्येय सदैव वाढत असते, हृदयात अपार सेवा भरली की, सर्व मित्र दिसतात. निर्मलांना रक्षण देणे, हीच खरी सफलता होय.
- जे सत्य असते ते, काळाच्या ओघात टिकते. सत्य असते. जुन्या जिर्णरूडी आज कशा चालतील, लहानपणीचा अंगरखा मोठेपणी मुलाला कसा होईल, भारतीय संस्कृतीत अंधश्रद्धेला स्थान नाही, विचारांचा महिमा सर्वत्र गायलेला दिसून येईल, जिकडून जे घेता येईल, ज्यांच्यापासून जे शिकता येईल, ते आदराने घ्या.
- भारतीय संस्कृतीचा वेद हा पाया मानला जातो. परंतु वेद म्हणजे काय या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. ज्ञान हा भारतीय संस्कृतीचा आधार आहे. ज्ञानावर उभारलेली ही भव्य संस्कृती आहे. जगात कोणीही संपूर्ण स्वतंत्रपणे सर्व ज्ञान शोधून काढले आहे असे नाही, वेद अनंत आहेत.
- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, एवढेच वेद नाहीत, भारतीय संस्कृतीचा एकच ऋषी नाही, भारतीय संस्कृती गगनाप्रमाणे विशाल व सागराप्रमाणे अपार आहे.
- कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे. पण पैसा ही आजची भाकर आहे.
- कला म्हणजे सत्य, शिव, आणि सौंदर्य यांचे संमेलन. जीवनाला सुंदर करणाऱ्या प्रत्येक विचार म्हणजे वेद आहे.
- आपल्या आयुष्य आनंदी व उत्साही कसे राहील हे आयुर्वेद सांगेल, समाजाचे रक्षण कसे करावे ,ते धनुर्वेद सांगेल. समाजाची करमणूक कशी करावी, समाजाला दुखाचा विसर्ग कसा पाडावा, ते गांधर्ववेद सांगेल.
- ज्ञान अनंत आहे.
- आपले मन म्हणजे एक महान जादूगार व चित्रकार आहे. मन म्हणजे ब्रह्मसृष्टीचे तत्व आहे.
साने गुरुजी यांचे काव्यसंग्रह sane guruji poems
खरा तो एकची धर्म
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित
तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती
तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा
अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल
तया जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणा ना व्यर्थ शिणवावे, कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या
सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात
सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे
परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा
त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे
बलसागर भारत होवो
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
साने गुरुजींबद्दल १० ओळी
- साने गुरुजींचे संपूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते.
- साने गुरुजींचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या ठिकाणी झाला.
- साने गुरुजींच्या आईचे नाव यशोदाबाई सदाशिव साने असे होते.
- साने गुरुजींच्या आईने लहानपणीस त्यांना चांगले संस्कार दिले होते.
- साने गुरुजींनी श्यामची आई या पुस्तकात आपल्या आईच्या आठवणी सांगितल्या आहेत. ते वस्तीगृह देखील सांभाळत असत.
- साने गुरुजींनी विद्यार्थ्यांना स्वावलंबी आणि शिस्तप्रिय शिक्षणाचे धडे दिले. काही काळातच ते सर्वांचे आवडते शिक्षक झाले.
- साने गुरुजींनी १९२८ साली “विद्यार्थी” नावाचे मासिक सुरू केले. त्या काळात आपला भारत देश इंग्रजांच्या ताब्यात होता, साने गुरुजींवर महात्मा गांधींचा खूप मोठा प्रभाव पडला होता.
- आतापर्यंत असा एकही शिक्षक आपण पाहिला नाही की, त्यांनी स्वतःच्या नोकरीचा त्याग करून स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाग घेतला असेल, पण साने गुरुजी यांनी ते करून दाखविले होते. अनेकदा त्यांना तुरुंगात जावे लागले, तुरुंगात असताना त्यांनी पुढील कविता लिहिली – “बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो” ही कविता आपण मरेपर्यंत विसरणार नाही. ही कविता राष्ट्रीय एकता, राष्ट्रसेवेची प्रेरणा देते.
- साने गुरुजींनी अनेक अडचणींवर मात केली. त्यांनी अनेक अत्याचार सहन केले.
- साने गुरुजी उत्कृष्ट साहित्यिक झाले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिक येथे तुरुंगात असताना लिहिली.
साने गुरुजी यांचे प्रकाशित साहित्य
आस्तिक | अस्पृश्योद्धार | इस्लामी संस्कृति | पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर |
उमाळा | करुणादेवी | कर्तव्याची हाक | कला म्हणजे काय? |
क्रांति | अमोल गोष्टी | आपण सारे भाऊ | कला आणि इतर निबंध |
भविष्य | भारतीय नारी | कलिंगडाच्या साली | बेंजामिन फ्रॅंकलिन |
कावळे | गीताहृदय | गुरुजींच्या गोष्टी | महात्मा गांधींचे दर्शन |
त्रिवेणी | दिगंबर राय | मराठी भाषांतर | बापूजींच्या गोड गोष्टी |
गोड शेवट | दिल्ली डायरी | दारुबंदीच्या कथा | गोड गोष्टी भाग १ ते १० |
जयंता | नवा प्रयोग | त्यागातील वैभव | ‘कुरल’ अनुवाद |
दुर्दैवी | नवजीवन | धडपडणारी मुले | इतिहासाचार्य राजवाडे |
गोप्या | देशबंधु दास | मानवजातीची कथा | मेंग चियांग आणि इतर गोष्टी |
कल्की | आपले नेहरू | भारतीय संस्कृती | संस्कृतीचे भवितव्य |
मिरी | माझी दैवते | मुलांसाठी फुले | भगवान श्रीकृष्ण |
पत्री | भारताचा शोध | साक्षरतेच्या कथा | सोनसाखळी व इतर कथा |
यश | चित्रानी चारू | सोन्या मारुती | गोष्टीरूप विनोबाजी |
सती | करुणादेवी | श्यामची आई | हिमालयाची शिखरे व इतर चरित्रे |
साधना | सुंदर कथा | श्यामची पत्रे | महात्मा गौतम बुद्ध |
समाजधर्म | सुंदर पत्रे | राष्ट्रीय हिंदुधर्म | स्वप्न आणि सत्य |
संध्या | स्त्री जीवन | स्वर्गातील माळ | स्वदेशी समाज |
विश्राम | श्री शिवराय | रामाचा शेला | विनोबाजी भावे |
शबरी | चित्रकार रंगा | नामदार गोखले (चरित्र) | शिशिरकुमार घोष |
तीन मुले | जीवनप्रकाश | जीवनाचे शिल्पकार | धडपडणारा श्याम |
मनूबाबा | खरा मित्र | गोड निबंध भाग १, २, ३ | श्याम खंड १, २ |
दुःखी | मोरी गाय | ते आपले घर | फुलाचा प्रयोग |
मृगाजिन | बेबी सरोजा | घामाची फुले | सोराब आणि रुस्तुम |
साने गुरुजी यांची चरित्रे
साने गुरुजींवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. त्यांतल्या काही पुस्तकांची आणि लेखकांची नावे :-
- आपले साने गुरुजी (लेखक – डॉ. विश्वास पाटील)
- जीवनयोगी साने गुरुजी (डॉ. रामचंद्र देखणे)
- निवडक साने गुरुजी (रा.ग. जाधव)
- मराठीतील संस्कारवादी साहित्याचा विशेषतः साने गुरुजींच्या वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास (प्रा.डाॅ. ए.बी. पाटील)
- महाराष्ट्राची आई साने गुरुजी (वि.दा. पिंपळे)
- मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी (आचार्य अत्रे)
- साने गुरुजी (यदुनाथ थत्ते, रामेश्वर दयाल दुबे)
- साने गुरुजी आणि पंढरपूर मंदिरप्रवेश चळवळीचे अध्यात्म (आत्माराम वाळिंजकर)
- साने गुरुजी : एक विचार (संजय साबळे)
- साने गुरुजी गौरव ग्रंथ (संपादक – रा.तु. भगत)
- साने गुरुजी जीवन परिचय (यदुनाथ थत्ते)
- साने गुरुजी – जीवन, साहित्य आणि विचार
- साने गुरुजी पुनर्मूल्यांकन (भालचंद्र नेमाडे)
- साने गुरुजी यांची सुविचार संपदा (वि.गो. दुर्गे)
- साने गुरुजी साहित्य संकलन (प्रेम सिंह)
- सेनानी साने गुरुजी (राजा मंगळवेढेकर)
साने गुरुजींना मिळालेले पुरस्कार
साने गुरुजी, ज्यांना पांडुरंग सदाशिव साने म्हणूनही ओळखले जाते, त्यांना साहित्य, शिक्षण आणि सामाजिक सुधारणेतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल मान्यता आणि प्रशंसा मिळाली. काही उल्लेखनीय सन्मानांची यादी खालीलप्रमाणे –
मानद डी.लिट. पदवी
साने गुरुजींच्या साहित्यिक कामगिरीबद्दल आणि शैक्षणिक क्षेत्रातील समर्पणाबद्दल, साने गुरुजींना एका प्रसिद्ध विद्यापीठाने मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी. लिट.) पदवी प्रदान केली. या सन्मानाने भारताच्या साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची कबुली दिली जाते.
साहित्य अकादमी पुरस्कार
साने गुरुजींना भारतातील सर्वात प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठी भाषेतील ‘श्यामची आई’ या त्यांच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
विद्यावाचस्पती
साने गुरुजींना “विद्यावाचस्पती” ही पदवी बहाल करण्यात आली, ज्याचा अनुवाद “ज्ञानाचा स्वामी” असा होतो. या सन्मानाने त्यांचे अफाट ज्ञान, बौद्धिक पराक्रम आणि शैक्षणिक आणि साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान ओळखले जाते.
महाराष्ट्र राज्य पुरस्कार
साने गुरुजींना त्यांच्या साहित्य आणि शिक्षणातील असाधारण योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र राज्य पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्काराने त्यांच्या प्रभावी लेखनाची, विशेषत: वाचकांच्या हृदयाला भिडणारी त्यांची “श्यामची आई” ही कादंबरी स्वीकारली.
इतर मान्यता
विशिष्ट पुरस्कारांव्यतिरिक्त, साने गुरुजींना त्यांनी केलेल्या कार्यासाठी व्यापक मान्यता आणि प्रशंसा मिळाली. लेखक, शिक्षक आणि समाजसुधारक म्हणून त्यांचे योगदान शैक्षणिक संस्था, साहित्यिक मंडळे, आणि सामान्य जनतेने मान्य केले.
साने गुरुजी कथा व्हिडिओ
FAQ
१. साने गुरुजींच्या आईचे नाव काय होते?
गुरुजींच्या आईचे नाव यशोदा होते. लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले,याबद्दल माहिती दिली आहे. त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला. सर्वानभूती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींना त्यांच्या आईने दिला. साने गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान आणि संस्कारक्षम होते. म्हणूनच आईने पेरलेल्या सतभावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली.
२. स्वातंत्र्यानंतर साने गुरुजी नाराज का झाले?
गांधीजींचा खून त्यानंतर महाराष्ट्रात उमटलेली प्रतिक्रियात्मक दंगल या सगळ्यांनी ते खूप दुखावले गेले, आपली माणसं सत्ता आल्यावर बदलताना, त्यांनी पाहिली होती. बलसागर भारताचे स्वप्न डोळ्यासमोर भंग होताना दिसत होते. या सगळ्याला कंटाळून त्यांनी ११ जून १९५० रोजी आत्महत्या केली.
साने गुरुजी यांचा जन्म केव्हा झाला?
24 डिसेंबर 1899 रोजी साने गुरुजी यांचा जन्म झाला.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास साने गुरुजींबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवा रांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.