सावंतवाडी पर्यटन संपूर्ण माहिती : Sawantwadi Information In Marathi – ऐतिहासिक गौरवशाली परंपरा लाभलेले संस्थांकलीन शहर सावंतवाडी. ३५० वर्षाच्या कलात्मक संस्कृतीचा दैदीप्यमान इतिहास लाभलेल्या या सावंतवाडी शहराला आज आपण भेट देणार आहोत. सावंतवाडी म्हणजे सुंदरवाडी. परमेश्वराला पहाटे पडलेलं एक गोड स्वप्न. हिरव्या गर्द वनराईचा शालू नेसून आकाशात झेपावणाऱ्या उत्तुंग पर्वतरांगांच्या कुशीत वसलेलं, एक शांत आणि मनमोहक शहर म्हणजे सावंतवाडी. महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवर वसलेल्या सावंतवाडीचे देखणेपण सर्वश्रूत आहे.

आज आम्ही आमच्या लेखाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सुंदरवाडी या नावाने देखील प्रसिद्ध असणारे शहर म्हणजेच सावंतवाडी या शहराबद्दल माहिती देणार आहोत. जर तुम्ही सावंतवाडी या शहराला व तिकडच्या पर्यटन स्थळांना भेट देण्याचा विचार करत असाल तर या सावंतवाडी माहिती मराठी लेखाद्वारे तुम्हाला नक्कीच मदत होईल.

Table of Contents

सावंतवाडी पर्यटन संपूर्ण माहिती मराठी | Sawantwadi Information In Marathi

शहरसावंतवाडी
जिल्हासिंधुदुर्ग
तालुकासावंतवाडी
क्षेत्रफळसुमारे सात चौरस किलोमीट
पिन कोड416510
सावंतवाडी पर्यटन संपूर्ण माहिती मराठी (Sawantwadi Information In Marathi)
सावंतवाडी पर्यटन संपूर्ण माहिती

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सावंतवाडी शहराला स्वतःचा इतिहास तर आहेच शिवाय विशेष संस्कृती ही आहे. कोकण रेल्वे मार्गावर नियोजित रेल्वे टर्मिनस शहरापासून हाकेच्या अंतरावर आहे. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेले शिरोडा, वेंगुर्ला, भोगवे हे समुद्रकिनारे सावंतवाडी शहरापासून केवळ २५ ते ३० किलोमीटरच्या अंतरावर वसलेले आहेत. वर्षा पर्यटनासाठी देशभर प्रसिद्ध असलेले आंबोली हे थंड हवेचे ठिकाण, सावंतवाडी शहरापासून अगदी जवळ आहे.

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांनी जिथे आपली क्रिकेट कारकीर्द सुरू केली ते सावंतवाडीचे जिमखाना मैदान, अनेक खेळाडूंना सतत प्रेरणा देत आलेले आहे. कविवर्य केशवसुतांना भुरळ घालणाऱ्या ऐतिहासिक मोती तलावाचा काठ प्रत्येकाला त्याची सारी दुःख विसरून निसर्ग अनुभवायला मदत करतो. फळांचा राजा हापूस यासह आंब्याच्या अनेक चवदार प्रजाती, उत्कृष्ट प्रतीचा काजू, चविष्ट फणस, रुचकर जांभूळ, गुणकारी करवंद अशा अनेक फळांची मेजवानी सावंतवाडी मध्ये अनुभवता येते.

सावंतवाडी पर्यटन संपूर्ण माहिती मराठी (Sawantwadi Information In Marathi)
Sawantwadi Information In Marathi

सावंतवाडीची माहिती

भारताच्या हस्तकलेला जागतिक दर्जा मिळवून देणाऱ्या लाकडी खेळण्याची बाजारपेठ आणि कारखाने सावंतवाडीतच आहेत, आणि गेली कित्येक वर्ष प्रत्येक पर्यटकांच्या नजरेत आदराचे स्थान मिळवित आहेत. कोकण प्रदेशाला भारताच्या हवाई नकाशावर अधोरेखित करणारा कोकणातील पहिला व्यावसायिक आणि प्रवासी विमानतळ सावंतवाडी पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर आहे. त्याचबरोबर भारतातील हवाई वाहतुकीचा आधारस्तंभ असलेल्या गोव्यातील मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, सावंतवाडी पासून अवघ्या अर्ध्या तासावर आहे.

महाराष्ट्रासह कर्नाटक तसेच गोवा या राज्यांना पाणीपुरवठा करणारे तिलारी धरण दोडामार्ग म्हणजे पूर्वीच्या सावंतवाडी तालुक्यातच वसलेला आहे. तसेच बारमाही पाणीपुरवठा करणारी पाळणे कोंड आणि माडखोल ही धरणे शहरापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर आहेत. निसर्गसंपन्न सावंतवाडी आणि शहराचे प्रेमळ रहिवासी सदैव एकच साद देतात. सावंतवाडी आपलीच असा, आता तुम्ही सुद्धा या.

सावंतवाडी इतिहास (History Of Sawantwadi)

१५१० पासून भारताच्या पश्चिम किनारपट्टीला भारतीय इतिहास आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या इतिहासात खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. सावंतवाडीने सुरुवातीपासूनच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. सावंतवाडीची किनारपट्टी युरोपीय लोकांसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाची होती.  सावंतवाडीची उत्तर सीमा घोटगे घाटाजवळ गडनदीने तयार झाली आहे उगवते आणि सर्जेकोटजवळ समुद्राला मिळते.

सावंतवाडी संस्थानावर सावंत भोंसलेंच्या राजघराण्याचे राज्य होते. खेम सावंत तिसर्‍याने १७५५ ते १८०३ या काळात बांधलेला सावंतवाडीचा राजवाडा शहराची शान आहे. 

सावंतवाडी राजवाडा खेम सावंत तिसरे नंतर ०८ शूर शासकांच्या राज्यकारभरचा साक्षीदार आहे आणि त्यांच्यानंतरच्या दोन पिढ्यांचा साक्षीदार आहे ज्यांना त्यांच्या कुटुंबाबद्दल आणि त्यांच्या गंजिफा आणि या कलेचा महान वारसा याबद्दल एक तेजस्वी अभिमान आहे.

सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात सावंत, आदिलशाहीच्या अधिपत्याखाली देशमुखांच्या अधिकाराचे सरंजामदार होते. गोव्यातील शिवाजी आणि पोर्तुगीजांच्या अधिपत्याखालील मराठे या सावंतवाडीच्या संपर्कात आलेल्या इतर दोन महत्त्वाच्या शक्ती होत्या.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे 

सावंत भोंसले यांचे मूळपुरुष मांग सावंत हे उदयपूर येथील सिसोदिया राजपूत घराण्यातील होते. सावंत भोंसले घराण्याच्या राज्याची स्थापना खेम सावंत प्रथम यानी १६२७ मध्ये केली.

त्याला विजापूर आदिलशाहीकडून जहागीर बहाल करण्यात आले आणि नंतर त्यांनी स्वतःला स्वतंत्र केले, त्यानंतर लखम सावंत पहिला. 

लखम सावंत पहिल्याच्या काळातच होडावडे मुख्यालय असलेल्या सावंत घराण्याला राजकीय महत्त्व आले आणि लखम सावंत यांच्या कारकीर्दीपासूनच सावंतवाडीचे बाह्य संबंध मोठ्या प्रमाणावर वाढले. 

त्यांनी त्यांचा पुतण्या खेम सावंत द्वितीय याच्यासोबत १२००० च्या सैन्यासह कुडाळ देशस्थांचा पराभव केला, त्यांची जमीन ताब्यात घेतली आणि नंतर नरेंद्र टेकडीवर स्वतःची स्थापना केली. 

पहिला पॅलेस (जुना कोट) त्यांनी नरेंद्र टेकडीवर बांधला होता. त्यांच्या निधनानंतर खेम ​​सावंत दुसरे गादीवर आले.

खेम सावंत द्वितीय यानी आपली राजधानी सुंदरवाडी (आताची सावंतवाडी) येथे स्थापन केली.

फोंड सावंत द्वितीय (अण्णासाहेब) राजघराण्यावर आल्यानंतर, सावंतवाडी राज्याला आणखी एक पैलू प्राप्त झाला आणि तो म्हणजे इंग्रजांशी संबंध सुरू झाला.

खेम सावंत तिसर्‍रे यांनी लक्ष्मीबाईशी लग्न केले आणि अशा प्रकारे पराक्रमी महादजी शिंदे यांच्याशी संबंध प्रस्थापित केला, ज्यांच्या सावंतवाडीला पाठिंबा मिळाल्याने अंतर्गत प्रशासन आणि बाह्य संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडून आले.

पंचम खेमराज उर्फ ​​बापूसाहेब महाराज हे सावंतवाडीचे सर्वात उल्लेखनीय राजे होते. २९ ऑक्टोबर १९२४ रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला. महात्मा गांधींनी १९२७ मध्ये सावंतवाडीला भेट दिली तेव्हा त्यांनी बापूसाहेब महाराजांना ‘रामराजा’ आणि त्यांच्या राज्याला ‘रामराज्य’ म्हटले. 

०४ जुलै १९३७ रोजी त्यांचे निधन झाले. या छोट्याशा कार्यकाळात त्यांनी स्वत:ला एक उत्तम प्रशासक आणि ‘असेन्टली किंग’ म्हणून सिद्ध केले. त्यांनी आपल्या लोकांच्या आणि ते राहत असलेल्या भूभागाच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी स्वतःला वाहून घेतले होते.

त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र शिवरामराजे भोंसले हे गादीवर आले, परंतु ते त्यावेळी अल्पवयीन असल्याने बापूसाहेबांच्या पत्नी पार्वतीदेवी यांनी राज्याचा कारभार पाहिला. तिच्या कारकीर्दीत सावंतवाडी राज्याच्या कारभारात अनेक सुधारणा आणि शिक्षणात प्रगती झाली.

सावंतवाडीच्या सार्वभौम राणी (The Queens Of Sawantwadi)

१७०० च्या दशकात पोर्तुगीजांशी झालेल्या तहानंतर लगेचच रामचंद्र सावंत यांची मुदत संपली आणि त्यामुळे सावंतवाडीच्या कारभारी-राणी जानकीबाई या जिवाजी विश्राम सबनीस यांच्या मदतीने राज्य कारभार पाहणाऱ्या पहिल्या महिला होत्या.

सावंतवाडीच्या जानकीबाईंच्या कारभारानंतर, खेम सावंत यांच्या ज्येष्ठ विधवा लक्ष्मीबाई यांनी १८०० च्या दशकात सावंतवाडीचा कारभार आपल्या हातात घेतला. 

लक्ष्मीबाईंनी सावंतवाडीचे सामर्थ्य मजबूत केले, सावंत आणि छत्रपती शिवाजी तिसरे यांच्यातील परिस्थितीचे गांभीर्य नीट समजून घेतले आणि कोल्हापूरच्या सैन्याला दूर ठेवण्याचा मार्ग शोधून काढला.

१८०० हा काळ होता जेव्हा सावंतवाडीत दोन सार्वभौम-राणी राज्याचा कारभार सांभाळत होत्या, दुर्गाबाई (१८०९ -१८१९) यांनी पोर्तुगीजांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासले होते.

अशा प्रकारे, अंतर्गत संघर्ष आणि गोंधळामुळे सावंतवाडी फाटलेली असताना युरोपीय शक्तींशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची क्षमता आणि दूरदृष्टी त्यांच्याकडे होती. 

सावंतवाडीच्या राण्यांनी राज्याचे सर्व कारभार मग ते प्रशासन असो वा कला यांना पुनरुज्जीवित केले, राजमाता सत्वशीलादेवी आणि राजसाहेब शिवरामराजे भोंसले यांना सावंतवाडीतील गंजिफा आणि लाखेची भांडी पुनरुज्जीवित करण्याचे श्रेय जाते. 

त्यांनी १९७१ मध्ये सावंतवाडी लाखवेअर्सची स्थापना केली आणि कला प्रकार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्यात यश मिळविले. राजेसाहेबांच्या निधनानंतर राजमातांनी गंजिफा कलेचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू ठेवले. 

लाखेची भांडी, हाताने विणकाम आणि हाताने भरतकाम यात ती स्वत:च्या पद्धतीने कुशल कारागीर होती आणि त्यासाठी तिला पुरस्कारही मिळाले होते. तिने खऱ्या अर्थाने स्वत:ला झोकून दिले आणि या कला प्रकाराच्या वाढीसाठी आणि भरणपोषणात तिने खूप रस घेतला.

सावंतवाडीचा भूगोल

सावंतवाडी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे. सावंतवाडी हे शहर सावंतवाडी तालुक्याचे मुख्यालय असून हे वेंगुर्ल्याच्या पश्चिमेस ३१ किलोमीटरवर व कोल्हापूरच्या नैऋत्येस सुमारे ११० किलोमीटरवर पसरलेले आहे. या शहराचे क्षेत्रफळ सुमारे ०७ चौरस किलोमीटर एवढे आहे.

देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी सावंतवाडी ही, सावंतवाडी संस्थानाची राजधानी म्हणून प्रसिद्ध होती व त्यावेळी सावंत घराण्याची सत्ता सावंतवाडी मध्ये होती. सावंतवाडी या शहराला खूप वर्षापासून गुरुत्वाकर्षणाद्वारे केसरी या गावातून पाणीपुरवठा केला जातो.

सावंतवाडीची लोकसंख्या (Population Of Sawantwadi)

सावंतवाडी शहराची २०२३ च्या नुसार अंदाजे १६३१७२ एवढी लोकसंख्या आहे सावंतवाडी शहरात मध्ये ८४ गावे आहेत.

सावंतवाडीमधील शालेय संस्था (Education System Of Sawantwadi)

  • कळसुलकर इंग्लिश स्कूल आणि ज्यु. कॉलेज
  • राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्यु. कॉलेज
  • मिलाग्रीस हायस्कूल
  • वि. स. खांडेकर हायस्कूल
  • उर्दू हायस्कूल
  • जवाहर नवोदय विद्यालय सांगेली
  • आंबोली सैनिक स्कूल
  • आयुर्वेद महाविद्यालय
  • भोसले नॉलेज सिटी
  • पंचम खेमराज महाविद्यालय आणि लॉ कॉलेज
  • गवाणकर कॉलेज ऑफ कॉमर्स

कुडाळ संपूर्ण माहिती मराठी

सावंतवाडीमधील नागरी सुविधा (Common Facilities)

सावंतवाडी शहरामध्ये नगरपालिका असून या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या बँकांच्या शाखा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे सावंतवाडी मध्ये दुधाचा व्यवसाय, शेळ्या मेंढ्या पालन व्यवसाय, त्याचप्रमाणे एटीएम, लोकांच्या सुख सोयीसाठी दवाखाने, शैक्षणिक संस्था,पतसंस्था, रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक व साधारणतः ४५ किलोमीटर अंतरावर विमान वाहतूक देखील उपलब्ध आहेत.

सावंतवाडीमधील प्रमुख व्यवसाय (Main Businesses in Sawantwadi)

सावंतवाडी या शहराला लाकडी खेळण्याचे प्रसिद्ध ठिकाण असं म्हणून देखील ओळख आहे. त्यामुळे या ठिकाणी लोक लाकडी खेळण्याचे उत्पादन करतात व जोडीला इतर आंब्यांची बाग, नारळाची बाग, कोकम, भात शेती, शेळ्या मेंढ्या पालन, आणि शहरातील इतर व्यवसाय देखील करतात.

सावंतवाडीमधील बोलल्या जाणाऱ्या भाषा (Languages in Sawantwadi)

सावंतवाडी या शहरामध्ये प्रामुख्याने मालवणी, मराठी, हिंदी या भाषांचा बोलण्यासाठी वापर केला जातो.

सावंतवाडीमधील वाहतूक सुविधा (Transportation in Sawantwadi)

सावंतवाडी या शहराला भेट देण्यासाठी तुम्ही पर्यायांचा वापर करू शकता

1. रस्ता – पुणे मुंबई कोल्हापूर गोवा व वेगवेगळ्या ठिकाणाहून येण्यासाठी तुम्ही बसेसचा किंवा प्रायव्हेट गाड्यांचा वापर करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या शहराला भेट देऊ शकता.

2.रेल्वे – कोकण रेल्वे महामार्गावरील सावंतवाडी – मळगाव रेल्वे स्थानक हे एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे सावंतवाडीला येण्यासाठी तुम्ह या रेल्वे स्टेशनवर उतरून तिथून सावंतवाडी दर्शन घेऊ शकता. रेल्वे स्टेशन वरून तुम्ही प्रायव्हेट बस किंवा महाराष्ट्र शासनाच्या बस ऑटो, टॅक्सी याद्वारे शहरापर्यंत पोहोचू शकता.

3.विमान – सावंतवाडी या शहरामध्ये पर्यटन स्थळ ऐतिहासिक ठिकाणी प्राचीन देवळे या ठिकाणी भेट देण्यासाठी तुम्ही फ्लाईटने सुद्धा येऊ शकता. चिपी विमानतळ म्हणजेच सिंधुदुर्ग विमानतळवरुन साधारणतः ४० ते ४५ किलोमीटर एवढे अंतर पार करून सावंतवाडीला पोहोचू शकता.

सावंतवाडीमधील हवामान (Weather in Sawantwadi)

  • 1. हिवाळा – सावंतवाडी मध्ये हिवाळ्याच्या वेळी वातावरण हे थंड व दाट धुके पसरलेले असते.
  • 2. उन्हाळा – उन्हाळ्याच्या वेळी वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण हे जास्त असते व अधिक ऊन आणि दमट हवामान असते.
  • 3. पावसाळा -कोकणामध्ये बऱ्याच प्रमाणात समुद्रकिनारी असल्यामुळे या ठिकाणी हवेत खारेपणा व दमटपणा जास्त असतो व त्यामुळे या ठिकाणी पर्जन्याचे प्रमाण हे जास्त असते.

सावंतवाडी पर्यटन (Sawantwadi Tourism)

सावंतवाडी हे शहर पर्यटन दृष्ट्या देखील प्रसिद्ध आहे सावंतवाडी या शहरामध्ये असणारे मोती तलाव, ऐतिहासिक राजवाडा, आंबोली घाट, लाकडांची जगप्रसिद्ध खेळणी, जागृत देवस्थान श्री देव उपरलकर, सावंतवाडी शहरातील भालेकर खानावळ इत्यादी गोष्टींचा आस्वाद सावंतवाडी या शहरामध्ये येऊन तुम्ही नक्कीच अनुभवू शकता.

सिंधुदुर्ग किल्ला माहिती मराठी

सावंतवाडी शहरातील प्रेक्षणीय स्थळे (Places To Visit in Sawantwadi)

1. सावंतवाडी लाकडी खेळणी (Sawantwadi Wooden Toys)

सावंतवाडीतील लाकडी वस्तू या भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहेत. हे मार्केट जवळ जवळ १५०वर्षांपूर्वीचे आहे. दरवर्षी भारतातील आणि परदेशातील लाखो पर्यटक ही लाकडी खेळणी खरेदी करण्यासाठी येतात. भारताच्या हस्तकलेला जागतिक दर्जा मिळवून देणाऱ्या लाकडी खेळण्याची ही बाजारपेठ आहे. या बाजारपेठेमध्ये छोट्या पासून मोठ्या पर्यंत लाकडापासून बनवलेल्या वस्तू आपल्याला मिळतात. सावंतवाडीतील खेळणी भारतीय पांगाराच्या झाडाच्या लाकडापासून बनवली जातात

सावंतवाडी मधील लाकडी खेळणी
सावंतवाडी मधील लाकडी खेळणी

2. मोती तलाव (Moti Talav Sawantwadi)

चारही बाजूने सह्याद्रीच्या पर्वत रांगानी वेढलेले एक ऐतिहासिक शहर सुंदरवाडी अर्थात सावंतवाडी ! शहराच्या मध्यभागी असलेला अन् शहराचे वैभव म्हणून ओळखला जाणारा मोती तलाव !! तलावात कधी काळी मोती सापडले म्हणून यास “मोती तलाव” असे नाव पडले…!!! मोती तलाव ..कोकण व सावंतवाडीचे एक….सुंदर वैभव

सावंतवाडी शहराच्या अगदी मधोमध सुंदर मोती तलाव आहे. संध्याकाळच्या सुंदर रोषणाईत हा तलाव आणखीच खुलुन दिसतो. संस्थानाच्या काळात १८७४ मध्ये मोती तलावाची निर्मिती झाली. राजवाड्यासमोरील ३१ एकराच्या परिसरात धरण बांधण्यात आले. चारी बाजुंनी भक्कम दगडांनी बांधकाम करण्यात आले. पाणी ठेवण्यासाठी मुशी ठेवण्यात आल्या. अशाप्रकारे मोती तलावाची निर्मिती झाली.

निसर्गरम्य सावंतवाडीत आल्या आल्या समोर दिसणारा मोती तलाव आणि नरेंद्र डोंगर प्रत्येकालाच भुरळ घालतो. संध्याकाळच्या सुरम्य अशा वातावरणातच सावंतवाडीच खरं सौंदर्य दडलय. तलावात कारंजे बसवल्याने आणि संपूर्ण तलावाच्या कडेला विद्युत रोषणाई केल्याने त्यात आणखीनच भर पडली आहे. संध्याकाळच्या वेळी मोती तलावाच्या काठावर न बसलेला सावंतवाडीकर तुम्हाला शोधूनही सापडणार नाही.

Moti Talav Sawantwadi

3. सावंतवाडी राजवाडा (Sawantwadi Palace)

सावंतवाडी राजवाडा – सावंतवाडीचा रॉयल पॅलेस- सिंधुदुर्गातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. या राजवाड्याची बांधणी ही खेम सावंत भोसले यांच्या कारकिर्दीत १७७५ ते १८०३ मध्ये झाली. हा जुना राजवाडा आता हस्तकलेच्या वस्तू, छायाचित्रे आणि जुन्या पुरातन वस्तूंच्या प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे.

एन्ट्री गेट (लेस्टर गेट) हा १८९५ मध्ये बांधण्यात आले होते. राजवाड्याच्या काटेकोरपणे तपकिरी भिंतींना अगदी वांशिक स्पर्श आहे. अद्भुतपणे कोरलेल्या खोल्या, युद्धाची शस्त्रे आणि कुजबुजणारे वातावरण आपल्याला पुन्हा एकदा आपल्या इतिहासातील पुस्तकांमध्ये डोकावण्यासाठी प्रेरित करते. राजवाड्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे विकसित केलेल्या आश्चर्यकारक कला आणि हस्तकला.

राजवाड्याच्या भिंती जुन्या छायाचित्रांनी सुबकपणे प्लास्टर केल्या आहेत. यामध्ये फर्निचर, बुद्धीबळ आणि बोर्ड गेम्स, छोट्या बाहुल्या इत्यादींच्या चित्तवेधक कौशल्यांचा समावेश आहे. कलावंत चित्रकला, लाकडी व मातीच्या कलाकृती आणि दागदागिने कुशल कलावंत असलेल्या चितकरांना सावंतवाडी रॉयल कुटुंबाने संरक्षित केले होते. या आभारी कारागिरांपैकी काही पॅलेसच्या अगदी भागावर दिसत आहेत. सहाव्या-शतकाच्या पिढीतल्या भव्य स्वरुपाची जीवनशैली आणि भयभीत निसर्गाचे चित्रण अशी कलाकृती आहेत.

Sawantwadi Palace

4. सावंतवाडी गंजिफा (Ganjifa Sawantwadi)

सावंतवाडीचा गंजिफा आज जगात प्रसिद्ध आहे! गंजिफा हा पत्त्यांचा खेळ आहे. हा खेळ पर्शियातून भारतात आला आहे असे मानले जाते. १६ व्या शतकात मुघल साम्राज्यपासून हा खेळ मोठ्या प्रमाणावर भारतात खेळला जाऊ लागला.इथे आल्यावर या खेळाने भारतीय रूप घेतले सावंतवाडीत खेळल्या जाणाऱ्या या गंजिफामध्ये १२० पत्त्यांचा समावेश असतो. तसंच यात रामायण, दशावतार सारख्या कहाण्यांचा देखील समावेश असतो. आज गेल्या ४०० वर्षांपासून आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यात गंजिफा कार्ड बनवले जातात.

याचे कार्ड्स बनविण्यासाठी पूर्वी हस्तिदंत वापरले जायचे. कार्ड्सवर अगदी आखीवरेखीव व बारीक कलाकुसर केलेली असायची. आज मात्र ही कलाकुसर लोप पावते आहे. काही मोजकेच चित्रकार असे जे हे गंजिफा कार्ड्स बनवतात. एवढा मोठा इतिहास असलेल्या या खेळाचं, काळाच्या ओघात अशा अनेक कला आणि कौशल्ये दुमिर्ळ वा नष्ट होत असताना राजमाता सत्वशीलादेवी यांच्यामुळे सावंतवाडीतील या कलांचे संवर्धन तर झालेच शिवाय त्यांचा सर्वदूर प्रसार झाला आणि बाजारपेठही मिळाली.

Ganjifa Sawantwadi

5. श्री देव उपरलकर देवस्थान (shri Upralkar Sawantwadi)

सावंतवाडी संस्थान ३६५ खेडेगावांचा मालक व रक्षणकर्ता म्हणून श्री देव उपरलकर देवस्थानची ओळख आहे. सावंतवाडी संस्थानच्या साडेतीनशे वर्षांच्या कालखंडात व त्यानंतरही आजतागायत या देवस्थानची ओळख भक्तगणात नवसाला पावणारा किंवा रक्षण करणारा देव म्हणूनचा आहे.

श्री देव उपरलकर देवस्थानची ओळख सर्वदूर असल्याने या मार्गाने जाणारे वाहनचालक वाहन थांबवून नतमस्तक होऊनच पुढे जातात. दर रविवार व बुधवारी याठिकाणी शहरातील लोक या देवस्थानाकडे आवर्जून उपस्थित राहतात. त्याशिवाय येथे सदैव वर्दळ असते.

सावंतवाडी – आंबोली मार्गावर शहराच्या पाच मिनिटांच्या अंतरावर हे देवस्थान वसले असून सावंतवाडीवासियांची या देवस्थानाविषयी अपार श्रद्धा आहे. तसेच या उपरलकर देवस्थानाकडे बुधवारी व रविवारी नवस बोलले जातात. नवस करण्यासाठी कोंबड्यांना देऊन नवसफेड करतात. शहरातून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे देवस्थान खरोखरच निसर्गमय ठिकाणी वसले आहे. या उत्सवदिनी शहर व शहरालगतच्या गावातील भाविक मोठ्या संख्येने येतात व श्री देव उपरलकर देवस्थानाचा प्रसाद स्वीकारतात.

 श्री देव उपरलकर देवस्थान
श्री देव उपरलकर देवस्थान

6. आंबोली घाट आणि धबधबा (Amboli Ghat And Waterfall)

सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीचा धबधबा पर्यटकांना फारच भुरळ घालतो. या धबधब्याच्या मनमोहक रूपाचा आनंद घेण्यासाठी व धबधब्यामध्ये मनसोक्त बागडण्यासाठी, खेळण्यासाठी लांब लांबून पर्यटक या ठिकाणी भेट देतात. तसेच आंबोली धबधब्यासोबत आंबोली मध्ये कावळेसाद, हिरण्यकेशी नदी, इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत तुम्ही इथे देखील भेट देऊ शकता.

Amboli Ghat And Waterfall
आंबोली धबधबा (source of internet)

7. सावंतवाडी शिल्पग्राम (Sawantwadi Shilpgram)

भारत सरकार प्रयोजित असलेल्या कला आणि हस्तकलेचा स्वाभिमान व अभिमान बाळगणारे गाव म्हणजे शिल्पग्राम होय. या ठिकाणी स्थानिक हे हस्तकला वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन करून त्या वस्तू विकतात यामध्ये गंजिफा कार्ड, सुशोभित बांगड्या, दागिन्यांची पेटी, मातीची आणि सांस्कृतिक शैलीतील लाखाची वाटी, हाताने विणलेल्या वस्तू, मातीच्या भांडी, यांसारख्या वस्तूंचे उत्पादन करून त्या वस्तू विकतात तर नक्कीच पर्यटक या ठिकाणी भेट देऊन या वस्तू खरेदी करू शकतात व या ठिकाणी नैसर्गिक वातावरणाचा व सुंदर हस्तकलेचा आनंद घेऊ शकतात.

Sawantwadi Shilpgram

8. आत्मेश्वर मंदिरासमोरची पाण्याची तळी

माठेवाड्यातील आत्मेश्वर मंदिरासमोरची पाण्याची तळी. आता तुम्ही म्हणाल की, तळी तर कोकणातील जवळपास प्रत्येक मंदिराजवळ असतेच… बरोबर आहे. पण आत्मेश्वराच्या या तळीचे वैशिष्ट्य म्हणजे जमिनीच्या वर असलेल्या पाण्याच्या पातळीचा भूवैज्ञानिक चमत्कार. मंदिराच्या बरोबर समोर असलेल्या या तळीचा प्राकार स्वतंत्र आहे. या प्रशस्त प्राकारामध्ये दगडी बांधणीची ही प्राचीन तळी आहे. आकार असेल साधारण दहा बाय बारा फुट…

तळीच्या दगडी भिंती जमिनीच्या वर सुमारे सहा फुट उंच आहेत आणि बारमाही वाहणारी, जिवंत झरे असणारी ही तळी वरुन भरुन वाहते आहे. वास्तविक त्या त्या परिसरात असलेली भूजलाची पातळी एकसमान असते. पण या तळीमधील पाण्याची पातळी मात्र जमिनीच्या चक्क सहा फुट वर आहे. हा एक भूवैज्ञानिक चमत्कार आहे.

9. विठ्ठल मंदिर

३०० वर्षाच्या परंपरेचे ‘श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर’ सावंतवाडी. उंच कळसाचे मंदीर अशी खासियत असलेले विठोबा मन्दिर.

संस्थानकालीन सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी शहरासह जिल्ह्याचे विशेष आकर्षण असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रखुमाई’ मंदिराला 290 वर्षाची परंपरा आहे. या मंदिरात आजही भक्तिभावाने व अखंडपणे हरि भजन, कीर्तनाची परंपरा सुरू आहे.ष्णवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सुंदरवाडीतील श्री देव विठ्ठल-रखुमाई मंदिर भाविक पर्यटकांनादेखील आकर्षून घेत आहे. सध्या सुरू असलेल्या या सप्ताहामुळे सुंदरवाडी हरिनामाच्या जयघोषात दुमदुमू लागली आहे. संस्थानकालीन या मंदिरामुळे सावंतवाडी शहराच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेत अधिकच भर पडली आहे.

10. नरेंद्र डोंगर आणि उद्यान

हा छोटा पर्वत शिखर समुद्रसपाटीपासून अंदाजे १००० फूट उंच आहे. सुमारे २०० फूट उंचीपर्यंत म्हणजे हनुमान मंदिराच्या गेटपर्यंत कार चालवता येते, नंतर पायी चढून जावे लागते, खडी चढणीचे छोटेसे पॅच येतात. वर जाऊन आणि खाली येण्यास साधारण एक तास लागतो. बागेत वर एक छोटा निरीक्षण मनोरा आहे. लहान मुलांसाठी स्लाईड वगैरे आहेत. डोंगरावर घनदाट जंगल आहे आणि खाली वाहणारे अनेक लहान लहान पाण्याचे झरे दिसततात. मन ताजेतवाने होते. प्रदुषणमुक्त शुद्ध ताजी हवा श्वास घेण्याची अनुभूती. वाटेत लंगूर प्रजातीचे माकड पाहायला मिळतात .बसण्यासाठी काही बाकांची सोय करण्यात आली आहे. हा परिसर वनविभागाच्या अखत्यारीत येतो. या चढाईमुळे ट्रेकिंगचा उत्कृष्ट अनुभव येतो .

11.जगन्नाथराव भोसले उद्यान

मुलांना छान गार्डन. उद्यानासमोर सावंतवाडीचा प्रसिद्ध मोती तलाव आहे. अनेक प्रकारची झाडे आहेत. बाग अतिशय स्पष्ट आणि सुंदर आहे. संध्याकाळी रोषणाई खूप छान असते.

सावंतवाडीमधील प्रसिद्ध हॉटेल्स आणि रिसॉर्ट

  • 1. शिल्प ग्राम हेरिटेज रिसॉर्ट –
  • 2. सावंतवाडी पॅलेस बायोटीक आर्ट हॉटेल
  • 3. कोकण क्राऊन रिसॉर्ट आणि क्लब
  • 4. हॉटेल मॅंगो
  • 5. राजगड रिसॉर्ट
  • 6. ग्रीन व्हॅली रिसॉर्ट
  • 7. बेला विला

FAQ

सावंतवाडी कशासाठी प्रसिद्ध आहे?

स्वतंत्र भारतातील शेवटचे राजे ही सावंतवाडीतील होते आणि भारताच्या हस्तकलेला जागतिक दर्जा मिळवून देणाऱ्या लाकडी खेळण्याची बाजारपेठ आणि कारखाने सावंतवाडीत आहेत तसेच सावंतवाडी हे शहर पर्यटन दृष्ट्या देखील प्रसिद्ध आहे. सावंतवाडी या शहरामध्ये असणारे मोती तलाव, ऐतिहासिक राजवाडा, आंबोली घाट, लाकडांची जगप्रसिद्ध खेळणी, जागृत देवस्थान श्री देव उपरलकर, सावंतवाडी शहरातील भालेकर खानावळ इत्यादी गोष्टींचा आस्वाद सावंतवाडी या शहरामध्ये येऊन तुम्ही नक्कीच अनुभवू शकता.

सावंतवाडीचा इतिहास काय आहे?

सावंतवाडी संस्थानावर सावंत भोंसलेंच्या राजघराण्याचे राज्य होते. खेम सावंत तिसरे यांनी १७५५ ते १८०३ या काळात त्याच्या कारकिर्दीत बांधलेला सावंतवाडीचा राजवाडा शहराची शान आहे.

सावंतवाडी खेळणी कशापासून बनतात?

सावंतवाडीतील खेळणी भारतीय प्रवाळाच्या झाडाच्या लाकडापासून बनवली जातात, ज्याला मराठीत ‘पांगारा’ असेही म्हणतात.

निष्कर्ष

आम्ही आमच्या – सावंतवाडी पर्यटन संपूर्ण माहिती मराठी – या लेखाद्वारे सावंतवाडी शहराची माहिती दिली आहे. त्याचबरोबर तुम्ही हा सावंतवाडी शहर माहिती लेख तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा.

धन्यवाद.

Leave a comment