TARKARLI BEACH WATER SPORTS : तारकर्ली वॉटर स्पोर्ट्स

TARKARLI BEACH WATER SPORTS : सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटनामुळे जसे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, तसेच पर्यटकांसाठी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज उपलब्ध केलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा हा जिल्हा प्रसिद्धीस आलेला आहे. चला तर मग मित्रहो आज आपण मराठी झटका डॉट कॉम या आमच्या साईट वरून आज आपण पाहणार आहोत TARKARLI BEACH WATER SPORTS ACTIVITIES.

Table of Contents

TARKARLI BEACH WATER SPORTS | तारकर्ली वॉटर स्पोर्ट्स

TARKARLI BEACH WATER SPORTS

सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकूण १२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या समुद्रकिनाऱ्यावर बऱ्यापैकी वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज होतात. या वॉटर ऍक्टिव्हिटीज कोणकोणत्या असतात आणि त्या कशा प्रकारे केल्या जातात याची माहिती आज आपण पाहणार आहोत.

वॉटर स्पोर्ट्स म्हणजे काय ?

सरोवर, तलाव, समुद्र किंवा नदीसारख्या ठिकाणी, पाण्यात केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या साहसी तसेच आनंददायी खेळांना वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज असे म्हणतात.

वॉटर स्पोर्ट्स कुठे होतात ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला, मालवण, देवबाग, देवगड, तोंडवली यासारख्या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. परंतु सगळ्यात प्रसिद्ध असलेले ठिकाण म्हणजे त्सुनामी आयलँड जे भोगवे आणि देवबागच्या मधोमध आहे. इतर ठिकाणे ही खालीलप्रमाणे

  1. निवती बीच
  2. चिवला बीच
  3. कोळंब बीच
  4. दांडी बीच
  5. त्सुनामी आयलँड -DEVBAG
  6. आचरा बीच
  7. देवगड बीच
  8. तारकर्ली बीच

तारकर्ली वॉटर स्पोर्ट्स चे प्रकार (TYPES OF WATER SPORTS AT TARKARLI BEACH)

बहुतेक अंशी पर्यटकांना गुगलच्या माध्यमातून किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून वॉटर स्पोर्ट्सची नावे माहित असतात. परंतु त्या वॉटर ऍक्टिव्हिटीज आपण केव्हा कराव्या किंवा कधी कराव्या हे आपल्याला माहीत नसते. आपण जेव्हा पर्यटनासाठी म्हणून ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी नुसते किनाऱ्यावर पाय भिजवण्यापुरते जायचे नसते तर थोडासा अधिक वेळ घेऊन छोटासा का होईना परंतु समुद्र सफरीचा आनंद जरूर लुटायला पाहिजे. TARKARLI BEACH WATER SPORTS कोणकोणते आहेत ते आपण पाहू.

०१. वॉटर स्कूटर

WATER-SCOOTER-TARKARLI

ही पाण्यावर चालणारी अतिशय वेगवान आणि छोटी बोट असते. यामध्ये बोट चालवणारा समोर बसतो आणि त्याच्या मागे आपल्याला त्याला पकडून घट्ट बसावे लागते. यात भन्नाट वेगाने पाण्यावर राईड घेण्याचा थरारक आणि रोमांचकारी अनुभव आपल्याला घेता येतो

  • कुठे करावे :- देवबाग तारकर्ली, मालवण, तोंडवळी
  • अंदाजे खर्च :- रु. ३००/-प्रतीव्यक्ती
  • वय मर्यादा :- १० वर्ष पासून पुढे
  • हंगाम :- ऑक्टोबर ते मे

०२. फ्लायबोर्डिंग

FLYBOARDING-TARKARLI

या साहसी क्रीडा प्रकारात आपले पाय एका बोर्डवर बुटांमध्ये बांधले जातात. त्या बोर्डच्या खालून पाण्याच्या जोरदार प्रवाहाची एक नळी अथवा पाईप आलेला असतो. ते पाणी तिथून आपल्या पायाखालून बाहेर पडत असते, त्या पाण्याच्या वेगामुळे आपण पाण्यातून हवेत उंच उसळी घेऊ शकतो. या प्रकारात सुरुवातीला तोल सावरणे कठीण असते. अशावेळी मार्गदर्शक आपल्यासोबत असतो. एकदा का आपल्याला तोल सावरायचा सराव झाला, की हा भन्नाट प्रकार वारंवार अनुभवावा असे वाटते.

  • कुठे करावे :- देवबाग, तारकर्ली
  • अंदाजे खर्च :- रु. २०००/-प्रतीव्यक्ती
  • वय मर्यादा :- १६ वर्ष पासून पुढे
  • हंगाम :- ऑक्टोबर ते मे

०३. बनाना राईड

BANANA-RIDE-TARKARLI

ह्या प्रकारात केळ्याच्या आकाराची एक लांब रबरी हवेने भरलेली पिशवी असते. त्या रबरी पिशवीवर एका वेळी चार ते सहा जण बसू शकतात. आणि त्यांना पकडण्यासाठी समोर दोरीची सोय केलेली असते. ही हवा भरलेले बनाना बोट एका स्पीड बोटीला बांधली जाते. स्पीड बोट जेवढ्या जोराने जाईल, तेवढ्या जोरात, हवेमध्ये उसळ्या घेत ही बनाना बोट त्या मागून ओढली जाते. आणखी थ्रिल चा अनुभव देण्यासाठी स्पीड बोट चालवणारा अचानक वळण घेऊन गुडघाभर पाण्यात सर्व पर्यटकांना भिजवून काढतो.

  • कुठे करावे :- देवबाग, तारकर्ली, मालवण, तोंडवळी
  • अंदाजे खर्च :- रु. ३००/-प्रतीव्यक्ती
  • वय मर्यादा :- १२ वर्ष पासून पुढे
  • हंगाम :- ऑक्टोबर ते मे

०५. स्पीड बोटिंग

SPEED-BOAT-TARKARLI

वॉटर ऍक्टिव्हिटीज मधला स्पीड बोटिंग हा सुद्धा एक धाडसी प्रकार आहे या स्पीड बोटिंग च्या सहाय्याने समुद्राच्या लाटांवर स्वार होऊन आपण गतीने समुद्र सफर करू शकतो. पंधरा ते वीस मैल प्रति वेगाने स्पीड बोट समुद्रावर चालवू शकतो. स्पीड बोटिंगचेही प्रकार असतात काही स्पीड बोटि वर फक्त एक किंवा दोन माणसेच बसू शकतात तर काही स्पीड बोटिंग वर आपण चार ते पाच जणांचा ग्रुप घेऊनही जाऊ शकतो. लाटांवरच्या या वेगाचा अनुभव घ्या घ्यायचा असेल तर स्पीड बोटिंग एकदा तरी करून बघायलाच पाहिजे. स्पीड बोटिंग करताना त्यांचे सुरक्षारक्षक आपल्याबरोबर असतातच शिवाय आपण त्यांनी दिलेली लाईफ जॅकेट घालणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.

  • कुठे करावे :- देवबाग, तारकर्ली, मालवण, तोंडवळी
  • अंदाजे खर्च :- रु. ३००/-प्रतीव्यक्ती
  • वय मर्यादा :- १२ वर्ष पासून पुढे
  • हंगाम :- ऑक्टोबर ते मे

०६. बंपर राईड

BUMPER-RIDE-TARKARLI

बंपर राईड ही एक अशी रोमांचकारी प्रकारामध्ये रबरापासून बनवलेल्या बंपर सीटवर पर्यटक झोपू शकतात किंवा बसू शकतात. याला वेगाने चालणाऱ्या बोटीला जोडले जाते. वेगाने चालणाऱ्या बोटीला ही बंपर सीट जोडल्यामुळे याच्या वेगा मुळे पर्यटकांना मजा येते आणि एक वेगळाच अनुभव प्राप्त होतो.

  • कुठे करावे :- देवबाग, तारकर्ली, मालवण, तोंडवळी
  • अंदाजे खर्च :- रु. ३००/-प्रतीव्यक्ती
  • वय मर्यादा :- १० वर्ष पासून पुढे
  • हंगाम :- ऑक्टोबर ते मे

०७. जेट्स स्की

JET-SKIING-TARKARLI

जेट स्कीइंग ची राईड करण्यासाठी आपल्याला थोडेफार कौशल्य असावे लागते त्या आपली जर तयारी असेल तर आपण ते शिकूही शकतो ती राईड पूर्ण सिंधुदुर्गात सगळ्या बीचवर उपलब्ध आहे. ही राईड थोडी खिशाला परवडणारी नसते परंतु या राईडने एक वेगळीच मजा येते .

  • कुठे करावे :- देवबाग, तारकर्ली, मालवण, तोंडवळी
  • अंदाजे खर्च :- रु. ३००/-प्रतीव्यक्ती
  • वय मर्यादा :- १० वर्ष पासून पुढे
  • हंगाम :- ऑक्टोबर ते मे

०८. कयाकिंग

KAYAKING-TARKARLI-

या प्रकारात कयाक नावाची छोटी बोट असून ही पर्यटकांना फिरण्यासाठी दिली जाते. या कयाक मध्ये बसून, हातात वल्ही घेउन आपण फिरू शकतो.

  • कुठे करावे :- देवबाग, तारकर्ली, मालवण, तोंडवळी
  • अंदाजे खर्च :- रु. १००/-प्रतीव्यक्ती
  • वय मर्यादा :- १० वर्ष पासून पुढे
  • हंगाम :- ऑक्टोबर ते मे

०९. स्नॉर्कलिंग

SCUBA-DIVING-TARKARLI-1

हा प्रकार स्कुबा सारखाच आहे. हा प्रकार लहान मुलेसुद्धा करु शकतात. समुद्राच्या खाली रंगीत प्रवाळ, खडक, चमचमणारे मासे आणि वेगवेगळ्या प्रकारची घटकांची झालेली रचना यामुळे स्नॉर्कलिंग करण्याचा अनुभव वेगळाच असतो. यासाठी लागणाऱ्या फ्लीपर्स संच, गॉगल आणि स्मॉल्कन खरेदी किंवा भाड्याने घेऊन वापरले पाहिजे. स्नॉर्कलिंग मुळे माशांच्या विविध प्रजाती आणि इतर अनेक जीवांचे निरीक्षण करण्यास मिळते. हा एक वेगळा अनुभव असतो जो तुम्हाला तुम्ही कधीही विसरू शकत नाही

  • कुठे करावे :- दांडी बीच, तोंडवळी बीच
  • अंदाजे खर्च :- रु. ८०० ते १००० प्रतीव्यक्ती
  • वय मर्यादा :- ०८ वर्ष पासून
  • हंगाम :- ऑक्टोबर ते मे

१०. पॅरासेलींग

PARASAILING-TARKARLI-1

वॉटर स्पोर्ट्स या प्रकारांमध्ये सर्वात थरारक असणारा असा हा प्रकार म्हणजे पॅरासेलिंग होय. आपण जर धाडसी असाल आणि उंचीची भीती वाटत नसेल, तर पॅरासेलिंग आपल्यासाठी अतिशय योग्य आहे वेगाने जाणाऱ्या बोटीच्या गतीमुळे आपण दोरीला अडकून समुद्रावर उंच उडतो. या पॅरासेलिंग मध्ये एकाच वेळी एक किंवा दोन माणसे समुद्राच्या पाण्यावरून उंच उडण्याचा अनुभव घेऊ शकतात. आपल्या सुरक्षेसाठी असलेल्या सुरक्षारक्षकांनी फ्लायर बांधलेले असतात. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका होऊ शकत नाही.

बोट टेकऑफ झाल्यावर तुमच्या मागे असलेले एक विशाल पॅराशुट वारा पकडते. आणि तुम्हाला हवेत उचलू लागते. आपण जवळपास ५०० ते ८०० फूट हवेत उचलले जातो. हा हवेत उडण्याचा अनुभव अतिशय मनोरंजक असतो.

  • कुठे करावे :- देवबाग, तारकर्ली,, मालवण, तोंडवळी
  • अंदाजे खर्च :- रु. ८००/- ते ५०००/ प्रतीव्यक्ती
  • वय मर्यादा :- १२ वर्ष पासून पुढे
  • हंगाम :- ऑक्टोबर ते

११. डॉल्फिन राईड

PARASAILING-TARKARLI-1

डॉल्फिन राईड करण्यासाठी सिंधुदुर्ग मध्ये फारच थोडी ठिकाणी आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे भोगवे बीच आहे. ही राईड करण्यासाठी साधारणपणे ४५ ते ६० मिनिटांचा कालावधी लागतो. एका बोटीच्या फेरीमध्ये साधारण आठ ते नऊ जण जाऊ शकतात. ही राईड साधारणपणे सकाळच्या वेळेला भरती- ओहोटी प्रमाणे असते. आपल्याला मोठ्या प्रमाणावर डॉल्फिन उड्या मारताना दिसतात.

  • कुठे करावे :- भोगवे, देवबाग, तारकर्ली, तोंडवळी
  • अंदाजे खर्च :-
  • वय मर्यादा :- ०८ वर्ष पासून पुढे
  • हंगाम :- ऑक्टोबर ते मे

१२. बॅक वॉटर

PARASAILING-TARKARLI-1

देवबाग बीच च्या विरुद्ध दिशेला असलेली कर्ली नदी आणि तिच्या खाडीपात्रात केलेल्या कोरजाईवाडी येथील नौका विहाराचा हा स्वर्गीय अनुभव म्हणजे बॅक वॉटर टूर. कोरजाई वाडी संपूर्ण नारळ आणि सुपारीच्या झाडांनी वेढलेली एक छोटीशी कोकणी वाडी आहे. कर्ली नदीच्या खाडीपात्रात छोट्या कोकणी होडी मध्ये नौका विहार करून एक रम्य अशी संध्याकाळ आणि नदीपात्रातून अनुभवलेला, पाहिलेला सूर्यास्त म्हणजे बॅकवॉटर. कर्ली खाडीच्या मधोमध असणाऱ्या छोट्याशा बेटावर आपण एक रम्य संध्याकाळ घालवू शकतो. या ठिकाणी आपण कॅम्प फायर करू शकतो. तसेच म्युझिक वगैरे लावून एन्जॉय करू शकतो. त्यानंतर त्या बेटाच्या आजूबाजूच्या पाण्यामध्ये छोट्या छोट्या माशांचे फिशिंग करून आपण ते बार्बेक्यू करून खाऊ शकतो. असा हा एक वेगळा अनुभव आपल्यासाठी अविस्मरणीय ठरू शकतो.

  • कुठे करावे :-भोगवे, देवबाग, तारकर्ली, तोंडवळी
  • अंदाजे खर्च :-
  • वय मर्यादा :- ०६ वर्ष पासून पुढे
  • हंगाम :- सप्टेंबर ते मे

१३. फिशिंग

FISHING-AT-TARKARLI

मासेमारी हा अनेकांचा आवडता मनोरंजक असा प्रकार आहे. तुम्ही खाण्यासाठी मासेमारी करत असाल किंवा पकडण्यासाठी आणि सोडण्यासाठी करीत असाल, तर तो एक तुम्हाला मोहक आनंद देऊन जातो. प्रत्येक प्रकारच्या मासेमारीची स्वतःची अशी तंत्र आणि उपकरणे असतात. तलावातील मासेमारी, नदीतील मासेमारी, महासागरातील मासेमारी आणि जलाशयातील मासेमारी असेही मासेमारीचे प्रकार आहेत. नद्या आणि तलावांमध्ये केली जाणारी मासेमारी ही आरामदायी असते. तुमच्याकडे आवश्यक ती परवानगी असेल तर तुम्ही बिनधास्तपणे मासेमारी करू शकता. समुद्रात केली जाणारी मासेमारी ही थोडी कष्ट प्रद असते.

  • कुठे करावे :- भोगवे, देवबाग, तारकर्ली, मालवण, तोंडवळी
  • अंदाजे खर्च :-
  • वय मर्यादा :- १० वर्ष पासून पुढे
  • हंगाम :- ऑगस्ट ते मे

१४. स्कुबा डायव्हिंग (TARKARLI SCUBA DIVING)

TARKARLI SCUBA DIVING
  • कुठे करावे :- भोगवे, देवबाग, तारकर्ली, मालवण
  • अंदाजे खर्च :-
  • वय मर्यादा :- १२ वर्ष पासून पुढे
  • हंगाम :- ऑक्टोबर ते मे

स्कुबा डायविंग हा समुद्रात पाण्याखालील जीवसृष्टी पाहण्याचा एक अद्वितीय प्रकार आहे. स्कुबा डायविंग करताना पाण्याखाली जाणारा डायव्हर श्वास घेण्याच्या उपकरणांसहित पाण्याखाली जातो. ही उपकरणे वापरल्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये जास्त वेळ चांगल्या प्रकारे श्वास घेता येतो. या उपकरणांमध्ये मास्क, ऑक्सिजन सिलेंडर, नोज आणि माऊथ मास्क, स्कुबा सूट आणि पेडल असतात.

स्कुबा गिअर वापरून डाइव्ह करणारा समुद्राच्या तळापर्यंत जातो. यासाठी त्याच्यासोबत डायव्हर असिस्टंट म्हणजे मदतनीस असतो. पाण्याखाली जाऊन आपल्याला रंगीबेरंगी मासे, कोरल, समुद्राखालील जैवविविधता, अपृष्ठवंशीय प्राणी यासारख्या गोष्टी पाहता येतात. स्कुबा डायविंग करणे अतिशय रोमहर्षक असते. हे स्कुबा डायविंग करण्यासाठी सुरुवातीला मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाते. स्कुबा डायविंग साठी पोहता येणे याची गरज नसते. प्रत्येक वेळी तीन प्रशिक्षक किंवा मदतनीस आपल्या सोबत असतात.

स्कुबा डायविंग कसे केले जाते ?

स्कुबा डायविंग करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला बोटीवरून खोल समुद्रात नेले जाते. तिथे एका डायविंग पॉईंट पाशी नेऊन आपल्याला एक मार्गदर्शक स्कुबाचा सूट घालण्यासाठी मदत करतो. दुसरा मार्गदर्शक आपल्याला डायविंग बद्दल माहिती देतो. बोटीला जोडलेल्या पायऱ्यांवरून आपल्याला खाली उतरून पाण्यामध्ये नेले जाते. पृष्ठभागावर तरंगत असताना, आपल्या सोबत दोन डायव्हर्स आपल्याला मार्गदर्शन करतात. आपल्या येथे आपल्याला फेस मास्क मधून तोंडाने श्वास घ्यायला शिकवले जाते. जेव्हा आपल्याला तोंडाने श्वास घ्यायची सवय होऊन आपल्याला त्याची खात्री पटते, तेव्हाच आपल्याला पाण्याखाली नेले जाते.

आपल्याला पोहण्याची गरज नसल्यामुळे डायव्हर आपल्याला पाण्याखाली घेऊन जातो. पाण्यातील दाब हा बाहेरील वातावरणा पेक्षा थोडासा जास्त असल्यामुळे हळूहळू आपणास त्याची सवय होते. एक एक पायरी आपल्या आपण खाली जाऊ तसे श्वास घेण्यास कदाचित थोडा त्रास होऊ शकतो. आपल्या कानाला किंवा कानाच्या पडद्याला दाब सहन न झाल्यास काही ठराविक हाताच्या मुद्रा शिकवल्या जातात. त्या दाखवल्यास ड्रायवर आपल्याला तत्पर वर घेऊन येऊ शकतो.

डायव्हिंग करत असताना एक सह मार्गदर्शक आपल्यासाठी पाण्यावर रिंग बोया घेऊन तरंगत असतो. आपण वर पोहोचल्यानंतर आपल्याला तो होडीपर्यंत आणून होडीवर चढण्यास मदत करतो. आणि पुन्हा नॉर्मल वाटत असल्यास दुसऱ्या डाईव्ह साठी पाण्याखाली घेऊन जातो.

एकूण वीस ते पंचवीस मिनिटे आपल्याला डायविंग केले जाते. आपण पाण्याखालचा पाण्याचा दाब किती सहन करू शकतो, यावर ही वेळ अवलंबून असते. पाण्याखाली डायविंग करताना सोबतचा ड्रायवर आपली छायाचित्रे काढतो आणि दोन ते तीन मिनिटांचा व्हिडिओ शूट करून घेतो.

स्कुबा डायविंग कुठे केले जाते ?

सिंधुदुर्गात स्कुबा डायव्हिंगची एकूण चार ठिकाणे आहेत

०१. मालवण – येथील स्कुबा डायविंग हे समुद्र आणि किल्ला यांच्या मधल्या खडकाळ प्रदेशात केले जाते. इथे स्कुबा डायव्हिंगची खोली साधारणतः दहा ते पंधरा फूट एवढी असते. येथे काही ठराविक प्रकारचे किनारपट्टीला राहणारे मासे, तसेच कोरल आपल्याला पाहता येतात. इथे स्कुबा करण्यासाठी जवळपास सहाशे ते बाराशे रुपये घेतले जातात.

०२. देवबाग – येथील स्कुबा डायविंग समुद्राच्या आतमध्ये केले जाते. पर्यटकांना समुद्राच्या आतमध्ये जवळपास दोन ते तीन किलोमीटर नेले जाते. तिथे आपल्याला पंधरा ते वीस फूट पाण्याखाली नेऊन वीस मिनिटाची डाइव दिली जाते. येथे दिसणाऱ्या प्रवाळाच्या प्रजाती आणि माशांच्या प्रजाती मालवणला दिसणाऱ्या प्रजातींपेक्षा वेगळ्या आणि भिन्न आहेत. या डायव्हिंगचा खर्च जवळपास पंधराशे ते दोन हजार प्रति व्यक्ती आहे.

०३.TARKARLI आणि भोगवे – या डायविंगच्या प्रकाराला पॅडी डायविंग म्हणतात. हे पॅडी डायविंग तारकर्ली शासकीय स्कुबा डायविंग सेंटर येथे केले जाते. आणि दुसरा पर्याय भोगवे येथील सामंत बीच रिसॉर्ट हा आहे. येथे तुम्हाला समुद्राच्या आत जवळपास चार ते पाच किलोमीटर नेले जाते. अर्ध्या तासाचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा आणि श्वास घेण्याच्या पद्धती शिकवल्या जातात. त्यानंतर समुद्राखाली आपल्याला तीस फुटापर्यंत नेले जाते. अशा एकूण तीस – तीस मिनिटांच्या दोन डाईव्ह दिल्या जातात.

याचा एका वेळेचा खर्च हा जवळपास चार ते पाच हजार प्रति व्यक्ती आहे. यामध्ये दिसणाऱ्या प्रवाळ, मासे आणि समुद्री जीवांच्या प्रजाती या अतिशय वेगळ्या आहेत. त्याचबरोबर तारकर्ली स्कुबा डायविंग सेंटर आणि सामंत बीच रिसॉर्ट, भोगवे यांच्याकडे स्कुबा डायविंग केले असता आपल्याला पॅडी सर्टिफिकेशन पण दिले जाते.

TARKARLI BEACH – WATER SPORTS कोणी कोणी करावे ?

साधारण दहा ते बारा वर्षांच्या वरील मुलांपासून ते अगदी तंदुरुस्त असणाऱ्या म्हाताऱ्यांपर्यंत या वॉटर ऍक्टिव्हिटीज आपण कोणीही करू शकतो.

TARKARLI BEACH – WATER SPORTS करताना घ्यावयाची काळजी

मित्रहो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वॉटर स्पोर्टस साठी, तुम्ही तुमच्या सुट्टीचा आनंद येथे लुटणार आहात त्यापूर्वी आपण कोणती काळजी घ्यावी, याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत. त्या खालील प्रमाणे –

  • जर तुम्ही पोहणार असाल तर पोहण्या संदर्भातील आवश्यक ती माहिती तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे.
  • पोहता येत असेल किंवा नसेल, परंतु समुद्रात खोलवर जाणे टाळावे. कारण समुद्राच्या लाटांमुळे आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते, तसेच बुडण्याची देखील शक्यता संभवते.
  • स्पीड बोटिंग ,स्कुबा आणि पॅरासेलिंग सारखे धाडसी स्पोर्ट्स करण्याअगोदर आपली वैद्यकीय चाचणी करून घेणे अतिशय आवश्यक आहे.
  • जे धाडसी स्पोर्ट्स करणार आहात,, त्याचे प्रशिक्षक आपल्या सोबत असणे गरजेचे आहे. तसेच प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे आणि आदेशांचे पालन करणे अनिवार्य आहे.
  • त्यांनी दिलेली सुरक्षा उपकरणे तपासून घ्या.
  • सुटसुटीत कपडे घाला. जेणेकरून आपल्याला कपड्यांचा त्रास होणार नाही, आणि अशाच कपड्यांची आणखी एक जोडी आपल्याबरोबर ठेवणे गरजेचे आहे.
  • चेहऱ्याला लावण्यासाठी सन स्क्रीन आपल्या सोबत ठेवा. जेणेकरून आपल्याला एलर्जी सारख्या गोष्टी झाल्याच तर आपण त्याचा वापर करू शकतो.
  • पिण्याचे पाणी आपल्यासोबत ठेवा.

वॉटर स्पोर्ट्स साठी लागणारा वेळ

  • वॉटर ऍक्टिव्हिटीच्या प्रत्येक राईडला साधारण १० मिनिटे ते १५ मिनिटांचा कालावधी पुरेसा असतो.
  • स्कुबा डायविंग साठी साधारणतः एक ते दोन तास लागू शकतात.
  • डॉल्फिन टूर साठी एक तास लागतो.
  • बॅकवॉटर टूर साठी एक ते दोन तासांचा अवधि लागतो.

वॉटर ऍक्टिव्हिटीज करण्यासाठीचा हंगाम

वॉटर ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी साधारण ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत कधीही करू शकता. पावसामुळे जून पासून ते साधारण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंत या सगळ्या वॉटर ऍक्टिव्हिटीज आणि बोटिंग बंद असते.

वॉटर स्पोर्ट्स पॅकेज (TARKARLI BEACH WATER SPORTS PACKAGE)

अंदाजे रक्कम :-

बॅकवॉटर टूर – रु. १५००/- ते २०००/- प्रती बोट
पॅरासेलिंग – सिंगल रु. ८००/- ते १०००/-
पॅरासेलिंग – डबल रु. १०००/- ते १२००/- प्रतीव्यक्ती
वॉटर स्पोर्ट्स ५ राइड – रु. ७००/- ते ८००/- प्रतीव्यक्ती
कयाकिंग – रु. १००/- ते २००/- प्रतीव्यक्ती
स्कुबा डायविंग –रु. ८००/- ते ५०००/- प्रतीव्यक्ती
डॉल्फिन टूर –रु. २०००/- ते २५००/- प्रती बोट
लाइट हाऊस टूर – रु. ४०००/- ते ५०००/- प्रती बोट

निष्कर्ष

आम्ही आमच्या या लेखाद्वारे तारकर्ली-देवबाग येथे केल्या जाणाऱ्या सर्व वॉटर स्पोर्ट्स प्रकारंबद्दल माहिती दिली आहे . हा लेख तुम्ही नक्की वाचा व आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

धन्यवाद

Leave a comment