क्षेत्रपाल श्री देव वेतोबा मंदिर सिंधुदुर्ग माहिती मराठी : KSHETRAPAL SHREE DEV VETOBA MANDIR ARAVALI TEMPLE INFORMATION MARATHI

KSHETRAPAL SHREE DEV VETOBA MANDIR ARAVALI TEMPLE INFORMATION MARATHI : क्षेत्रपाल श्री देव वेतोबा मंदिर माहिती मराठी – महाराष्ट्र राज्यातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, वेंगुर्ले तालुक्यामध्ये, आरवली गावचे क्षेत्रपाल श्री देव वेतोबा मंदिर सिंधुदुर्ग हे सर्वात प्रसिद्ध आणि भक्तांच्या इच्छांची पूर्तता करणाऱ्या देवस्थानांपैकी एक आहे, असे मानण्यात येते. अरबी समुद्राच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये क्षेत्रपाल श्री देव वेतोबा ची आराधना केली जाते.

KSHETRAPAL SHREE DEV VETOBA MANDIR ARAVALI TEMPLE INFORMATION MARATHI
वेतोबा मंदिर माहिती मराठी : KSHETRAPAL SHREE DEV VETOBA

दक्षिण कोकणात वेताळ उर्फ वेतोबाची सुमारे १४३ मंदिरे आहेत. संकट आणि अडचणीच्या वेळी धावून येणारा देव म्हणून येथील भक्त वेतोबा अशा नावाने हाक मारतात.

त्याला प्रलयवेताळ, ज्वालावेताळ, आग्यावेताळ या नावाने देखील ओळखले जाते. या क्षेत्रपाल श्री देव वेतोबाचा इतिहास नक्की काय आहे? हे मंदिर कधी बांधले गेले? या बाबतची सगळी माहिती आम्ही मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे आपणापर्यंत घेऊन आलो आहोत. चला तर मग, पाहूया क्षेत्रपाल श्री देव वेतोबा मंदिर माहिती मराठी.

Table of Contents

क्षेत्रपाल श्री देव वेतोबा मंदिर सिंधुदुर्ग माहिती मराठी : KSHETRAPAL SHREE DEV VETOBA MANDIR ARAVALI TEMPLE INFORMATION MARATHI

वेंगुर्ले शहरापासून जवळपास १२ किलोमीटरच्या अंतरावर निसर्गरम्य अशा आरवली गावचे ग्रामदैवत म्हणून क्षेत्रपाल वेतोबा देवाला ओळखले जाते. आरवली पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण दक्षिण कोकणचा संकट निवारक म्हणून जनतेमध्ये श्रद्धास्थान आहे. असे म्हटले जाते की, सतराव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मूळ मूर्ती जवळच्या डोंगरातून आणून बसवली होती.

तेव्हा ही मूर्ती फणसाच्या लाकडापासून कोरली गेली होती. आणि म्हणूनच दर शंभर वर्षांनी त्या मूर्तीची पुन्हा स्थापना करावी लागत असे. आता तेथील एका स्थानिक शिल्पकाराने पंचधातूची मूर्ती बनवली आहे आणि १९९६ मध्ये त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्याच्या एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात घडा दिसत आहे.

श्री देव वेतोबा मंदिर नकाशा

श्री देव वेतोबा मंदिर माहिती

नाव – क्षेत्रपाल श्री देव वेतोबा श्री वेतोबा
स्थान – भगवान शंकर
गाव – आरवली
तालुका – वेंगुर्ला
जिल्हा – सिंधुदुर्ग
समुद्र –अरबी समुद्र
मूर्तीची उंची – उंची ७ फूट ६ इंच, कमरेचा घेर 3 फूट ९ इंच
स्थापना – इसवी सन १६६०
पंचधातूची मूर्ती – इसवी सन १९९६

श्री क्षेत्रपाल वेतोबा मंदिर आरवली वर्णन

श्री क्षेत्रपाल वेतोबा मंदिर आरवली वर्णन
KSHETRAPAL SHREE DEV VETOBA TEMPLE INFORMATION MARATHI. क्षेत्रपाल श्री देव वेतोबा मंदिर माहिती मराठी

वेंगुर्ला तालुक्यातील आरवली गाव हे श्री वेतोबा देवस्थानामुळे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले आहे. “महानंदा ” या श्री जयवंत दळवी यांच्या कांदबरी त या देवाचा उल्लेख आढळतो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा आणि वैशाख शुद्ध पंचमीचा त्याचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. या उत्सवांच्या वेळी वेतोबाचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी हजारो भावीक येत असतात. पूर्वी फणसाच्या लाकडापासून वेतोबाची मूर्ती कोरली जायची.

त्यामुळे दर १०० वर्षांनी ती पुन्हा स्थापन करावी लागत असे. १९९६ साली येथील एका स्थानिक कलाकाराने पंचधातूची वेतोबाची मूर्ती बनवली आणि त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. या देवाला नैवेद्य म्हणून केळ्याचा घड दिला जातो. तसेच आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी कोल्हापुरी चामड्याची चप्पल जोड या देवाला अर्पण केली जाते.

अद्भुत वास्तूकलेतील, अप्रतिम मंदिर – श्री कोपेश्वर

श्री वेतोबा मूर्तीचे वर्णन : KSHETRAPAL SHREE DEV VETOBA

या मंदिरातील क्षेत्रपाल वेतोबा मूर्ती ही काळ्या दगडामध्ये कोरली गेली आहे. दगडी विटेवर उभी असलेली ही मूर्ती जवळपास ७ फूट ६ इंच उंच असून, कमरेचा घेर ३ फूट ९ इंच असा आहे. याच्या दोन्ही बाजूला मागे पितळी कलश दिसून येतात. तसेच डोक्यावर शेष स्वरूप आणि कानामध्ये रुद्राक्ष मुद्रिका दिसून येतात. भारदस्त मिश्या आणि या मूर्तीच्या दोन्ही हाताच्या दंडामध्ये सर्पकृती आहेत. उजव्या हाती उभी तलवार आहे. उजव्या हातामध्ये अंगठी आहे तर डाव्या हातामध्ये तीर्थकुंड दिसून येते.

कमरेभोवती दगडांनी विणलेला गोफ आहे. गळ्यामध्ये पवित्र वारुंड माळा व दगडी पद्महार आहे. डोळे आणि कल्ले चांदीचे असून पायामध्ये पितळी व चांदीच्या पादुका दिसून येतात. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्री देवराम पुरुष, श्री देव भुमय्या, देव भावकाई, देव बाराचा ब्राह्मण या देवतांच्या पाषाणमूर्ती दिसून येतात. वेतोबाची भव्य मूर्ती मानवाच्या आकाराप्रमाणे दिसून येते.

VETOBA MANDIR ARAVALI
VETOBA MANDIR ARAVALI

क्षेत्रपाल वेतोबा मंदिर परिसर

क्षेत्रपाल वेतोबा मंदिर हे दूमजली इमारत असून या ठिकाणी जवळपास दोन ते अडीच हजार लोक सहज बसू शकतील. हे देवस्थान १६६० मध्ये बांधण्यात आले असून, या देवस्थानचा सभा मंडप हा साधारणपणे १८९२ ते १९०० च्या दरम्यान बांधला गेला. या देवस्थानाचा नगारखाना हा तीन मजल्यांचा असून ही दुमजली इमारत आहे. वेंगुर्ला, शिरोडा, रेडी रोड दरम्यान आरवली या ठिकाणी हे वेतोबाचे देवस्थान असून रस्त्यावरूनच या देवाचे आपल्याला दर्शन घडते.

समुद्रकिनाऱ्याजवळ असलेले हे आरवलीचे vetoba temple सिंधुदुर्ग नारळी पोफळींच्या सानिध्यात उभे आहे. या मंदिरामध्ये प्रवेश करण्याआधी मंदिराच्या बाहेरील परिसरात सुंदर अशी कमान उभारलेली आहे. याप्रमाणे वरत गोलाकार घुमटी मध्ये गणपतीची मूर्ती विराजमान आहे. खाली अर्धवक्र महिरपावर “श्री देव वेतोबा संस्थान आरवली” असे लिहिलेले आहे.

या shree dev vetoba mandir मध्ये प्रवेश केल्यानंतर सभा मंडपाच्या आत शिरताना उजव्या हाताला देवी भूमिकाचे मंदिर पहावयास मिळते. या देवीला दागिन्यांनी मढवलेली आहे. या मंदिराच्या बाहेरच्या हॉलमध्ये चपलांच्या अनेक जोड्या मांडलेल्या दिसून येतात. मंदिराच्या आवारामध्ये धर्मशाळा ही बांधलेली आहे.

क्षेत्रपाल वेतोबा मंदिर व्हिडिओ

क्षेत्रपाल वेतोबा नावाचा अर्थ

वेंगुर्ले तालुक्यामधून आरवलीचा क्षेत्रपाल श्री देव वेतोबा हे देवस्थान प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र आहे. विजयनगरच्या हिंदू साम्राज्यामध्ये हरवल्ली नावाने अस्तित्वात असलेल्या गावाचे नाव बदलून आरवली झाले. हर म्हणजे “शिव” आणि वल्ली म्हणजे “वस्ती”. पूर्वी या भागामध्ये सोमेश्वर, सिद्धेश्वर, कोकणेश्वर यासारख्या अनेक शंकराची मंदिरे असावी असे जाणकार सांगतात.

आरवली या ठिकाणी क्षेत्रपाल वेतोबाचे मंदिर हे मुळामध्ये वेताळाचे मंदिर होते. “बा” हा शब्द आपण आदरार्थी वापरतो. त्याचप्रमाणे वेताळ या शब्दातील ळ हा शब्द जाऊन आदरार्थी बा शब्द आला. त्यामुळे आरवलीतील हे देवस्थान श्री वेतोबा या नावाने प्रसिद्ध झाले. पुढे या मंदिराला आरवलीचे श्री वेतोबा असे नाव पडले.

क्षेत्रपाल वेतोबा मंदिराचे वैशिष्ट्य

नवसाला पावणारा देव म्हणून या मंदिराची ख्याती आहे. या ठिकाणी दुर दुर वरून अनेक भक्तगण देवाला नवस बोलण्यासाठी या ठिकाणी येत असतात. आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाला नवस बोलला जातो. आणि नवस पूर्ण झाल्यानंतर ज्याप्रमाणे आपण साखर, पेढे, धोतर जोडी देवापुढे अर्पण करतो. त्याचप्रमाणे देवाला चामड्याच्या चपलांचा जोड या ठिकाणी अर्पण करावा लागतो. तेथील भाविकांची अशी श्रद्धा आहे की, यातील आपल्याला हवी ती पादत्राणे वेतोबा उचलतो. आणि आपल्या चतु:सीमेवरील भक्तांचे रक्षण करण्यासाठी अदृश्य रूपाने फेरफटका मारत असतो. याची प्रचिती म्हणजे देवाला वाहिलेल्या नवीन पादुका काही दिवसानंतर तळाखालच्या भागाने झिजल्याचे स्पष्ट दिसून येते. हे येथील मंदिराचे देवाचे वैशिष्ट्य आहे.

श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, नाशिक

अगदी जुनी झालेली पादत्राणे आरवलीच्या डोंगर भागात विशिष्ट ठिकाणी जाऊन मंत्रोच्चाराने जमिनीमध्ये पूरून ठेवली जातात. अलीकडच्या काळामध्ये वेतोबाच्या चांदीच्या पादुका देखील तयार करण्यात आल्या आहेत.

VETOBA MANDIR ARAVALI
VETOBA MANDIR ARAVALI

वेतोबावरील श्रद्धा

फार पूर्वी वेतोबाच्या मूर्तीसाठी फणसाचे झाड वापरले जायचे. यामुळे ज्या ठिकाणी फणसाचे झाड असायचे ते स्थान वेतोबाचे म्हणून समजले जायचे. आरवली गावातील गावकरी वेतोबा मंदिरामध्ये जाता येत नसेल आणि त्याचे दर्शन घेण्याची इच्छा होत असेल तर ती इच्छा फणसाच्या झाडासमोर बोलली तर ती वेतोबा देवाला पोहोचते अशी तेथील गावकऱ्यांची, भाविकांची श्रद्धा आहे.

या गावच्या पंचक्रोशी मध्ये फणसाचे झाड कोणीही तोडत नाहीत. ज्या ठिकाणी फणसाचे झाड आहे तेथे वेतोबा आहे असे समजून त्या झाडाची जपणूक केली जाते. त्यामुळे या ठिकाणी बरीच फणसाची झाडे आहेत. म्हणून याला फणसाचे अभयारण्य देखील म्हटले जाते. नैसर्गिक पद्धतीने फणसाचे झाड तुटले तर ते बाजूला केले जाते. तसेच कोणत्याही कारणास्तव फणसाचे झाड तोडावयाचे असेल, तर वेतोबा मंदिरामध्ये जाऊन देवाला साकडे घालतात आणि देवाकडून कौल घेऊन मगच ते झाड तोडले जाते. या ठिकाणी कोणीही फणसाच्या झाडाचे फर्निचर सुद्धा करत नाहीत.

तसेच पाट किंवा घराचा दरवाजा देखील या फणसाच्या झाडापासून केला जाऊ नये असा या भागामध्ये नियम आहे. या पंचक्रोशीतील गावकरी किंवा भाविक बाहेर कुठेही राहिले असतील तरी त्या ठिकाणी सुद्धा ते फणसाच्या झाडाची पूजा करतात. तसेच त्या झाडासमोर उभे राहून वेतोबाला साकडे देखील घालतात.

क्षेत्रपाल वेतोबाचा नवस

या पंचक्रोशीतील तसेच या ठिकाणचे बाहेर राहणारे लोक क्षेत्रपाल वेतोबा वेतोबा देवाला पादत्राणांचा नवस बोलतात. कोणत्याही कामाची सुरुवात किंवा अडीअडचण निवारण करण्यासाठी वेतोबाला कौल लावला जातो. तसेच नवस पूर्ण करण्यासाठी वेतोबाला तेथील चर्मकार आणि बनवलेल्या चामडयाच्या चपलांचा जोड अर्पण करावा लागतो.

याशिवाय केळीच्या घडाचा नवस देखील या देवाला केला जातो. त्यामुळे याला केळ्यांची जत्रा असे देखील म्हटले जाते.

वेतोबा मंदिर
वेतोबा मंदिर

वेतोबा मंदिरामध्ये राबवले जाणारे उपक्रम

वेतोबा मंदिर व्यवस्थापनाने दहा वर्षापूर्वीपासून अत्यंत अल्प दरामध्ये अन्नछत्र विभाग तसेच संगणक प्रशिक्षण केंद्र, संगीत प्रशिक्षण वर्ग यासारखे समाज उपयोगी उपक्रम चालवले आहेत. तसेच या ठिकाणी आरोग्य शिबिरे, रक्तदान उपक्रमही राबवले जातात.

वेतोबा मंदिरातील उत्सव

श्री वेतोबाचे वर्षातून दोन वेळा म्हणजेच कार्तिक शुद्ध १५ व मार्गशीर्ष पौर्णिमेस जत्रा होतात. तसेच या देवाला सालईच्या झाडाच्या पानांचे ३३ प्रसाद लावण्याची पद्धत देखील आहे. योगीराज बापू मामा केणी महाराज आरवलीच्या या श्री देव वेतोबाला विठ्ठल रूपामध्ये पाहून भजन करतात . मंदिरात पाडवा नावाचा समारंभ जेष्ठ शुद्ध प्रतिपदेस केला जातो. जेव्हा वेतोबा देवस्थानामध्ये काही अडचण निर्माण होते, तेव्हा या बापू मामांना हाक मारून त्यांचा संचार उभा राहिल्यानंतर त्यांचा सल्ला घेतला जातो.
येथे होणाऱ्या जत्रांच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी दिसून येते. या दिवशी या मंदिरामध्ये फुलांची तसेच दिव्यांची रोषणाई केली जाते आणि येथील जत्रा तसेच उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.

क्षेत्रपाल श्री देव वेतोबा कथा : vetoba temple story in marathi

तळकोकणात वेतोबाची अनेक मंदिरे असून गावोगावी श्री देव वेतोबाची कथा वेगवेगळी ऐकावयास मिळते. यापैकी सर्वात जास्त प्रचलीत असलेली क्षेत्रपाल श्री देव वेतोबा कथा खालीलप्रमाणे.

वेताळ – वेतोबा मूळचा शंकर-पार्वतीचा द्वारपाल होता. कालिकापुराणात असे म्हटले जाते की, वेताळ पूर्वीच्या जन्मी भृंगी नावाचा शिवदूत होता. त्यांना महाकाल नावाचा भाऊ होता. पार्वतीने शाप दिल्याने या दोघांनी पृथ्वीवर राजा चंद्रशेखरची राणी तारावती यांच्या पोटी अनुक्रमे वेताळ आणि भैरव म्हणून जन्म घेतला. तथापि हे दोघे चंद्रशेखराचे औरस पुत्र नव्हते. (ते शंकराच्या कृपेने तारावतीच्या पोती जन्माला आले होते.) चंद्रशेखर हे त्यांचे पालक पिता होते.

श्री मार्लेश्वर – राजापूरचे अलौकिक शिवमंदिर

चंद्रशेखरने आपली सर्व संपत्ती आपल्या मुलांमध्ये वाटून घेतली. म्हणून वेताळ आणि भैरव तपश्चर्या करायला जंगलात गेल्यानंतर ऋषी वशिष्ट यांच्या कृपेने त्यांना भगवान शंकरांचे दर्शन झाले आणि कामाख्या देवीच्या कृपेने त्यांना शिवगणात स्थान मिळाले. वेताळ हे अनेक गावांमध्ये आज ग्रामदैवत म्हणून पुजले जाते. हा वेताळ म्हणजेच वेतोबा म्हणून पुढे प्रसिद्ध आले. स्थानिक मान्यतेनुसार अशी आहे क्षेत्रपाल श्री देव वेतोबा कथा

VETOBA MANDIR ARAVALI
VETOBA MANDIR ARAVALI

क्षेत्रपाल श्री देव वेतोबा कथाजवळील हॉटेल्स

वेंगुर्ला हे शहर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झाल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची तसेच येथील मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असते. त्यामुळे त्यांच्या राहण्याच्या सोयीसाठी आजूबाजूला बरीच एसी, नॉन एसी हॉटेल्स उपलब्ध आहेत. त्यातील काही प्रसिद्ध हॉटेल्स खालील प्रमाणे-

  • नक्षत्र स्टे
  • राजगड रिसॉर्ट
  • हॉटेल कोकण किनारा
  • आनंदी निवास
  • धनश्री रिवर व्ह्यू
  • हॉटेल लवकिक
  • अंकुर पॅलेस
  • शिरोडा पॅराडाईज बीच रिसॉर्ट
  • गोळवन बीच रिसॉर्ट

हॉटेल बूकिंग संपर्क (इथे क्लिक करा)

क्षेत्रपाल श्री देव वेतोबा मंदिरात जाण्याचा वेळ आणि प्रवेश शुल्क

वेंगुर्ला या ठिकाणी वेतोबा मंदिरामध्ये जाण्यासाठी तुम्ही वर्षभरामध्ये कधीही दर्शनासाठी येऊ शकता. साधारणपणे ऑक्टोबर पासून मे पर्यंतचा काळ योग्य समजला जातो. कारण वेतोबा मंदिराबरोबरच आजूबाजूची पर्यटन स्थळे फिरण्यासाठी हा काळ उत्तम समजला जातो.या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही. येणाऱ्या भाविकांना मंदिरामध्ये विनामूल्य प्रवेश दिला जातो.

पूजा आणि दर्शन वेळ – मंदिरामध्ये नित्य नेमाने पूजा अर्चा केली जाते. मंदिर व्यवस्थापनाकडून या ठिकाणी पुजाऱ्याची व्यवस्था केलेली आहे. सणांच्या वेळी तसेच नवरात्रि मध्ये नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे वेतोबाला परिधान केले जातात. तसेच विशेष सणांच्या वेळी फुलांची आरास आणि माळ वेतोबाला घातली जाते. समई आणि निरांजने लावून मंदिरातील दीपमाळ लावली जाते.

हे मंदिर सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९ पर्यंत उघडे असते. या वेळात या मंदिरामध्ये तुम्ही कधीही दर्शनासाठी येऊ शकता.

क्षेत्रपाल श्री देव वेतोबा मंदिर कुठे आहे? आणि कसे जायचे?

महाराष्ट्र राज्यातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, वेंगुर्ला तालुक्यातील, आरवली या गावामध्ये हे वेतोबाचे मंदिर आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झाल्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही बस, ट्रेन किंवा विमान याद्वारे येऊ शकता.

विमान – वेंगुर्ला शहरापासून सर्वात जवळचे विमानतळ हे मोपा एअरपोर्ट, गोवा असून जवळपास २९ किलोमीटरच्या अंतरावर आहे. या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही कॅब किंवा टॅक्सी वगैरे करून येऊ शकता. तसेच सिंधुदुर्ग एअरपोर्ट पासून जवळपास ३० किलोमीटर च्या अंतरावर हे मंदिर असून या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही कॅब, टॅक्सीने किंवा बस ने येऊ शकता.

ट्रेन –वेंगुर्ला पासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे कुडाळ आहे, या ठिकाणाहून जवळपास २४ किलोमीटरचे अंतर असून ४० मिनिटांचा कालावधी लागतो. या ठिकाणी येण्यासाठी तुम्ही टॅक्सी कॅब किंवा बस चा वापर करू शकता.

बस – वेंगुर्ला बस स्टॅन्ड पासून १३ किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. या ठिकाणी तुम्ही ऑटो, किंवा बस ने येऊ शकता

खाजगी वाहने – वेंगुर्ला हे शहर पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झाल्यामुळे या ठिकाणी अनेक राष्ट्रीय महामार्गाने वेंगुर्ला जोडले गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या गाडीने येणे सोयीस्कर ठरते.

  • मुंबई ते वेंगुर्ला अंतर ५४० किलोमीटर
  • पुणे ते वेंगुर्ला अंतर ३९५ किलोमीटर
  • कोल्हापूर ते वेंगुर्ला अंतर १७२ किलोमीटर
  • बेळगाव ते वेंगुर्ला अंतर १२५ किलोमीटर
  • गोवा ते वेंगुर्ला अंतर ११२ किलोमीटर
  • सावंतवाडी ते वेंगुर्ला अंतर २६ किलोमीटर
  • कुडाळ ते वेंगुर्ला अंतर २० किलोमीटर

सिंधुदुर्गातील वेतोबाची मंदिरे

सिंधुदुर्गामध्ये वेतोबाच्या देवस्थानाला अतिशय महत्व आहे. आरवलीच्या वेतोबा प्रमाणे आणखी काही मंदिरे खालीलप्रमाणे –

वेतोबा मंदिर बांबार्डे

हे मंदिर कुडाळ तालुक्यात बांबार्डे येथे असून या मंदिराचा हल्लीच जीर्णोद्धार झाला आहे. हे एक भव्य आणि प्रशस्त असे मंदिर असून याच्या बाजूला एक सुंदर पाण्याची तळी सुद्धा आहे.

वेतोबा मंदिर परुळे

वेंगुर्ला तालुक्यातील परुळे पंचक्रोशीतील बत्तीस गावांचा अधिपती आणि क्षेत्रपाल श्री वेतोबा यांचे हे मंदिर आहे. आरवली वेतोबा मंदिराप्रमाणेच या मंदिरातील वेतोबाची मूर्ती भव्य दिव्य असून बाजूला वेतोबा पंचायतन मंदिरे देखील आहेत. या मंदिराचे नूतनीकरण यावर्षी (२0२३) मध्ये चालू आहे. इथे वार्षिक जत्रा आणि दसरोत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. श्री देवी वराठी आणि श्री देव आदिनारायण आणि वेतोबा या देवांच्या पालख्या, तरंग नाचवत नेण्याचा उत्सव अतिशय विलोभनीय असतो.

श्री वेतोबा मंदिर, वेतोरे

वेंगुर्ला तालुक्यात वेतोरे येथे असेच एक वेतोबाचे लहान मंदिर आहे. इतर मंदिराप्रमाणे या ठिकाणी सुद्धा दसरा, श्री देव वेतोबाचा वाढदिवस हे सण साजरे केले जातात.हे एक छोटे मंदिर असून या मंदिरात इतर मंदिराप्रमाणे चामड्याच्या चपला वेतोबासाठी दान दिल्या जातात.

श्री वेतोबा मंदिर आजगाव

आरवलीच्या वेतोबाप्रमाणेच आजगाव येथील हे वेतोबा मंदिर सुद्धा प्रसिद्ध आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेतोबा म्हणजे गावाचा राखणदार मानले जाते. या मंदिराच्या बाजूलाच श्रीदेवी भूमिका आई याचे सुद्धा मंदिर आहे. इतर मंदिराप्रमाणे या मंदिरात देवाला चामड्याच्या चपला दान दिल्या जातात

श्री वेतोबा मंदिर नाणोस

गाव नाणोस, तालुका सावंतवाडी येथे श्री वेतोबा मंदिर आहे. हे मंदिर लहान असून या गावचे ग्रामदैवत आहे.

श्री वेतोबा मंदिर आरोंदा

वेंगुर्ला आरोंदा रोडवर आरोंदा गावात जाधववाडी येथे हे छोटेखानी मंदिर आहे

वेंगुर्ले मधील प्रसिद्ध ठिकाणे

वेंगुर्ला बीच

वेंगुर्ला बीच हा अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा बीच असून या ठिकाणी तुम्ही पोहण्याचा आनंद घेऊ शकता. अनेक बोटी या ठिकाणी समुद्रामध्ये तुम्हाला दिसून येतील. संध्याकाळच्या वेळी समुद्र च्या काठी बसून मच्छीमारांची मासे पकडण्यासाठीची लगबग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या बीच वर रात्री कॅम्प फायर तसेच टेंट मध्ये राहून देखील तुम्हाला एन्जॉय करता येते. फेसाळणारा समुद्र, येथील शांतता तसेच वॉटर स्पोर्ट्सचा आनंद देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो.

वेंगुर्ला लाईट हाऊस

या ठिकाणी लाईट हाऊस ची व्यवस्था अप्रतिम आहे. या ठिकाणी चढून जाण्यासाठी लाल रंगाच्या पायऱ्या आणि आजूबाजूला डेकोरेशन तसेच या ठिकाणी रात्रीच्या वेळी गेल्यास आल्हाददायक वातावरणाचा अनुभव आपल्या येतो.

वेंगुर्ला बंदर

वेंगुर्लाचे बंदर हे लाईट हाऊसच्या जवळ आहे. पूर्वी या बंदरावर मोठमोठ्या होड्या थांबत असत. तसेच व्यापार धंदा सुद्धा बोटीने होत असे.

वेंगुर्ला म्युझियम

वेंगुर्लाच्या मुख्य बाजारपेठेमध्ये हे म्युझियम आहे. या म्युझियमला “श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह” असे नाव देण्यात आलेले आहे. या म्युझियम मध्ये वेंगुर्ला बंदर, लाईट हाऊस, स्वातंत्रवीर सावरकर कलादालन त्याचप्रमाणे आजूबाजूच्या ठिकाणांची प्रतिकृती आणि माहिती या म्युझियम मध्ये देण्यात आलेली आहे.

मानसीश्वर मंदिर

वेंगुर्ला बस स्थानकापासून जवळपास दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर असून सागरेश्वरच्या बीच जवळ आहे. हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा खूप वेगळे आहे. या ठिकाणी भाविकांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात दिसून येते. या मंदिराशेजारी खाडी असल्यामुळे समुद्राच्या भरती ओहोटीचे पाणी या ठिकाणी येत जात राहते. तसेच या मंदिराचा परिसर हा अतिशय शांत आणि रमणीय असा आहे.

सातेरी मंदिर

वेंगुर्ला शहरापासून जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हे सातेरी देवीचे मंदिर आहे. हे मंदिर अतिशय छान असे सुशोभीत करण्यात आले आहे. या मंदिरामध्ये देवीची मोठी पाषाणातील मूर्ती असून मूर्तीच्या गाभाऱ्याभोवती वेगवेगळ्या पार्श्वनाथ मूर्ती दिसून येतात.

सागरेश्वर बीच

सोनेरी वाळू, नितळ पाणी, निरव शांतता आणि स्वच्छता तसेच छोट्या छोट्या खेकड्यांचे दर्शन ज्या ठिकाणी घडते तो म्हणजे सागरेश्वर बीच. या ठिकाणी आपल्याला डॉल्फिन देखील पहावयास मिळतात

सागरेश्वर मंदिर

सागरेश्वर बीच वरून बाहेर पडल्यानंतर काही अंतरावर उभा दांडा येथे सागरेश्वराचे महादेवाचे मंदिर आहे.

वेंगुर्ला मधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, वेंगुर्ला या ठिकाणी हे वेतोबाचे मंदिर आहे. वेंगुर्ला म्हटले की, मालवणी खाद्यपदार्थ आलेच. या मालवणी खाद्यपदार्थांमध्ये खाजे, शेंगदाणे लाडू, शेवाचे लाडू, कुळीथचे पीठ, मालवणी मसाले, त्याचप्रमाणे कोलंबीचे लोणचे, काजू आणि त्याचे विविध पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे मालवणी मांसाहारी पदार्थ सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी विविध प्रकारचे मासे त्याचप्रमाणे कोंबडी वडे, मोरी मटण, भाकरी, वडे, तिसऱ्या मसाला, कर्ली फ्राय, कोलंबी मसाला, सोलकढी यासारखे बरेच पदार्थ अतिशय प्रसिद्ध आहेत.

हळदीच्या पानातील पातोळ्या, घावन रस, नारळाची चटणी, तांदळाची भाकरी, फणसाची भाजी यासारखे प्रसिद्ध पदार्थ या ठिकाणी मिळतात.

दुपारच्या वेळी उकड्या तांदळाची पेज प्रत्येक घराघरांमध्ये केली जाते.

प्रश्न

क्षेत्रपाल श्री देव वेतोबा मंदिर कुठे आहे?

क्षेत्रपाल श्री देव वेतोबा मंदिर वेंगुर्ला तालुक्यामध्ये आरवली गावात आहे.

वेतोबा मंदिराची स्थापना कधी झाली?

या मंदिराची स्थापना साधारणपणे १६६० साली झाली.

वेतोबा मंदिरामधील मूर्ती कशाची आहे?

वेतोबा मंदिरामधील मूर्ती ही पंचधातूची असून तेथील एका स्थानिक शिल्पकाराने बनवली आहे.

वेतोबा मंदिर आरवली या देवाला चपला का वाहतात ? 

देवाला चामड्याच्या चपलांचा जोड या ठिकाणी अर्पण करावा लागतो. तेथील भाविकांची अशी श्रद्धा आहे की, यातील आपल्याला हवी ती पादत्राणे वेतोबा उचलतो. आणि आपल्या चतु:सीमेवरील भक्तांचे रक्षण करण्यासाठी अदृश्य रूपाने फेरफटका मारत असतो. याची प्रचिती म्हणजे देवाला वाहिलेल्या नवीन पादुका काही दिवसानंतर तळाखालच्या भागाने झिजल्याचे स्पष्ट दिसून येते.

वेंगुर्ला हे कोणत्या जिल्ह्यामध्ये येते?

वेंगुर्ला हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते.

निष्कर्ष

मित्रांनो, हा होता आजचा आमचा लेख – वेतोबा मंदिर माहिती मराठी म्हणजेच VETOBA MANDIR ARAVALI TEMPLE INFORMATION MARATHI. हा लेख तुम्हाला कसा वाटला? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत

नमस्कार.

4 thoughts on “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा मंदिर सिंधुदुर्ग माहिती मराठी : KSHETRAPAL SHREE DEV VETOBA MANDIR ARAVALI TEMPLE INFORMATION MARATHI”

  1. मला क्षेत्रपाल श्री देव
    वेतोबा महाराजांची छोटी मूर्ती भेटेल का ??

    गोकुळ मंगला सखाहरी वालझाडे
    विद्यानगर , संगमनेर
    मो. 99753000089

    Reply

Leave a comment