Vishwakarma Shram Samman Yojana 2023-2024 | विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2023-2024 – 15 ऑगस्ट रोजी, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात 07 सप्टेंबर पासून विश्वकर्मा जयंतीनिमित्त देशात विश्वकर्मा कौशल सम्मान योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील लहान कामगार आणि कारागिरांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाणार असून, त्याअंतर्गत त्यांना अनुदानित कर्ज, व्यवसाय प्रशिक्षण, प्रगत तंत्रज्ञान आणि कौशल्यांची माहितीही देण्यात येणार आहे. या योजनेच्या मदतीने लहान असंघटीत कामगार, कुशल कारागीर, पारंपरिक व्यव्यावसायिक, शेती करणाऱ्यांना एमएसएमईशी जोडण्याची आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची संधी मिळेल.
विश्वकर्मा श्रम सन्मान योजना 2023-2024 संपूर्ण माहिती मराठी | Vishwakarma Shram Samman Yojana 2024 Information In Marathi
विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून देशातील छोट्या व्यावसायिकांना आणि कारागिरांना त्याचा लाभ मिळणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असून पुढील महिन्यापासून या योजनेवर काम सुरू होणार आहे. यासाठी सरकार तिजोरीतून 13,000 ते 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या 15,000 कोटी रुपयांच्या विश्वकर्मा योजनेद्वारे, सोनार, लोहार, केशभूषाकार, धुलाई आणि गवंडी यांसारख्या 18 पारंपरिक व्यवसायातील लोकांना 15,000 कोटी रुपयांची व्यावसायिक मदत शासनतर्फे दिली जाईल.
पंतप्रधान मोदी असेही म्हणाले की, विश्वकर्मा योजनेद्वारे प्रत्येक विश्वकर्माला पारंपारिक व्यवसायासाठी संस्थात्मक आधार दिला जाईल, ज्याच्या मदतीने असंघटीत लहान कारागीर त्यांचे जीवनमान सुधारू शकतील. ही योजना प्रामुख्याने ओबीसी वर्गासाठी सुरू करण्यात येणार असून याद्वारे ओबीसी वर्गातील कामगारांना चांगली मदत मिळणार आहे.
सध्या ही विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2024 कुठे सुरू आहे ?
सद्यस्थितीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील मजुरांचा विकास आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी उत्तर प्रदेश राज्यात विश्वकर्मा श्रम सम्मान योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत, उत्तर प्रदेशातील मजुरांना आणि पारंपरिक कारागीर आणि लहान उत्पन्न श्रेणीतील कारागिरांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी 6 दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. यामुळे या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल.
आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे संपूर्ण भारतात सुरू होणारी विश्वकर्मा श्रम सम्मान योजना ही कशी असेल आणि सद्यस्थितीत उत्तरप्रदेश मध्ये ती कश्या प्रकारे चालू आहे याबद्दल माहिती देत आहोत.
ही योजना संपूर्ण भारत देशात लागू करताना त्यातील काही अटी, शर्ती, मुद्दे वगैरे केंद्र सरकार , राज्य सरकार यांच्यातर्फे बदलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही दिलेला योजना आराखडा पूर्णपणे योग्य आहे असा आम्ही कोणताही दावा करत नाही. तरी ही योजना सरकारतर्फे लागू केल्यावर त्याबद्दल पूर्ण माहिती नव्याने देण्याचा प्रयत्न करू.
पीएम विश्वकर्मा श्रम सम्मान योजना – कॅबिनेट मध्ये मंजूरी
विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2024 स्वरूप
या योजनेंतर्गत देशातील 18 प्रकारच्या पारंपारिक कारागीर आणि अल्प उत्पन्न श्रेणीतील असंघटीत कारागीर जसे सुतार, शिंपी, धोबी, मूर्तिकार, चांभार, न्हावी, सोनार, लोहार, कुंभार, हलवाई, कोळी, विणकर, रेशीम कारागीर इत्यादींना लघुउद्योग सुरू करण्यासाठी केंद्र शासनतर्फे 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देण्यात येईल. या योजनेचा खर्च केंद्र शासनाच्या निर्णयानुसार केंद्र किंवा राज्य शासन करणार आहे. या योजने अंतर्गत देशातील 30 लाखांहून अधिक कारागिरांना लाभ मिळणार आहे. विश्वकर्मा श्रम सन्मान योजनेंतर्गत मजुरांना दिलेला निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल. त्यामुळे अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
हे देखील वाचा 👉नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 20244
विश्वकर्मा श्रम सम्मान योजनेसाठी अर्ज मागवले जातील.
प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा उद्योग उद्योजकता केंद्रातर्फे विश्वकर्मा श्रम सम्मान योजना साठी जिल्ह्यातील सुतार, शिंपी, धोबी, मूर्तिकार, चांभार, न्हावी, सोनार, लोहार, कुंभार, हलवाई, कोळी, विणकर, रेशीम कारागीर यांच्याकडून अर्ज मागवले जातील. या योजनेअंतर्गत पारंपरिक कारागिरांना काही दिवसाचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचबरोबर प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि व्यवसायासाठी लागणारे टूलकिट देण्यात येईल. त्यानंतर कामगार त्यांचे काम करू शकतात. यासोबतच कोणत्याही कामगाराला आपल्या व्यवसायाला चालना द्यायची असेल, तर त्यालाही केंद्र सरकारतर्फे अनुदान दिले जाईल.
विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2024 अधिकृत वेबसाईट
केंद्र सरकारतर्फे या योजनेचा संपूर्ण आराखडा कोणत्याही वेबसाइटवर जाहीर केलेल्या नसून सध्या ही योजना राज्य शासनतर्फे उत्तर प्रदेश राज्यात सुरू असून आपण संदर्भासाठी या योजनेशी वेबसाइट पाहू शकता.
विश्वकर्मा योजना माहिती मराठी
योजनेचे नाव | विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2024 |
द्वारे सुरू केली | मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी |
लाभार्थी | देशातील विविध अल्प उत्पन्न कारागीर |
ध्येय्य | कारागिरांची आर्थिक उन्नती |
अर्जप्रक्रिया | ऑनलाइन किंवा ऑफलाइन |
अधिकृत संकेत स्थळ | सध्यातरी नाही |
सध्या योजना सुरू असलेले राज्य | उत्तर प्रदेश |
विश्वकर्मा श्रम सम्मान योजनेअंतर्गत कौशल्य विकास अभ्यासक्रम
- पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत, अधिक कौशल्ये कशी विकसित करता येतील याकडे लक्ष दिले जाईल.
- पारंपारिक कामगारांना नवीन प्रकारची उपकरणे आणि डिझाइनची माहिती मिळावी यासाठी कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू केला जाईल.
- या योजनेंतर्गत पारंपारिक कामगारांना आधुनिक उपकरणे खरेदीसाठीही शासनतर्फे मदत केली जाणार आहे.
- योजनेंतर्गत, मूलभूत आणि प्रगत असे दोन प्रकारचे कौशल्य विकास अभ्यासक्रम आयोजित केले जातील.
- प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कामगारांना सरकारकडून स्टायपेंड दिला जाईल. 500 रुपये प्रतिदिन या दराने स्टायपेंड मिळेल.
- जिल्हा उद्योग आणि उपक्रम प्रोत्साहन केंद्राच्या निवड समितीद्वारे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाईल.
हे देखील वाचा 👉 महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना 2023
विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2023 चे उद्दिष्ट
- देशातील पारंपारिक कारागीर आणि अल्प उत्पन्न श्रेणीतील असंघटीत कारागीर जसे सुतार, शिंपी, धोबी, मूर्तिकार, चांभार, न्हावी, सोनार, लोहार, कुंभार, हलवाई, कोळी, विणकर, रेशीम कारागीर इत्यादींना लघुउद्योग सुरू करण्यासाठी केंद्र शासनतर्फे 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देण्यात येईल.
- पारंपारिक व्यावसायिक आणि हस्तकलेला प्रोत्साहन देणे आणि प्रगती करणे.
- पारंपरिक कारागीर आणि लहान उत्पन्न श्रेणीतील कारागिरांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी 6 दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल.
- विश्वकर्मा योजनेद्वारे प्रत्येक विश्वकर्माला पारंपारिक व्यवसायासाठी संस्थात्मक आधार दिला जाईल, ज्याच्या मदतीने असंघटीत लहान कारागीर त्यांचे जीवनमान सुधारू शकतील.
- आर्थिक दृष्ट्या कमकुवत कारागिरांना रोजगार देणे आणि दारडोई उत्पन्नात वाढ करणे.
- ओबीसी आणि मागासवर्गीय कारागिरांसाठी रोजगार निर्मिती करणे.
- या योजनेच्या मदतीने लहान असंघटीत कामगार, कुशल कारागीर, पारंपरिक व्यव्यावसायिक, शेती करणाऱ्यांना एमएसएमईशी जोडण्याची आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची संधी मिळेल.
अशा प्रकारे तुम्हाला आर्थिक मदत मिळेल
- पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल, ज्यावर जास्तीत जास्त 5 टक्के व्याजदर असेल.
- त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पात्र कामगारांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सवलतीचे कर्ज मिळणार आहे.
- पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत कारागीर आणि कारागीरांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्रही दिले जाणार आहे.
- आधुनिक उपकरणे खरेदी करण्यासाठी 15 हजार रुपये दिले जाणार आहेत.
विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 202४ चे लाभ
- या योजनेचा लाभ देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील सुतार, शिंपी, धोबी, मूर्तिकार, चांभार, न्हावी, सोनार, लोहार, कुंभार, हलवाई, कोळी, विणकर, रेशीम कारागीर आणि हस्तकला कारागीर यांसारख्या पारंपारिक व्यावसायिकांना मिळणार आहे.
- विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2024 अंतर्गत कारागिरांना एका आठवड्याचे दिवसांचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल.
- प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या कामगारांना सरकारकडून स्टायपेंड दिला जाईल. 500 रुपये प्रतिदिन या दराने स्टायपेंड मिळेल.
- शिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि व्यवसायासाठी लागणारे टूलकिट देण्यात येईल. त्यानंतर कामगार त्यांचे काम करू शकतात.
- पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल, ज्यावर जास्तीत जास्त 5 टक्के व्याजदर असेल.
- त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पात्र कामगारांना प्रत्येकी 2 लाख रुपयांचे सवलतीचे कर्ज मिळणार आहे.
- यासोबतच 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदतही दिली जाणार आहे.
- विश्वकर्मा श्रम सन्मान योजनेंतर्गत 30 लाख असंघटीत कारागिरांना लोकांना रोजगार मिळणार आहे.
- विश्वकर्मा श्रम सम्मान योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार आहे.
- या योजनेद्वारे राज्यातील सर्व पारंपरिक मजुरांचा विकास तसेच स्वयंरोजगाराला चालना मिळणार आहे.
विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2023 ची कागदपत्रे (पात्रता)
अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.
अर्जदाराचे वय १८ वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
आधार कार्ड
पॅन कार्ड
पासपोर्ट सईज फोटो
ओळखपत्र
पत्त्याचा पुरावा
मोबाईल नंबर
जात प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2024 चे लाभार्थी
- पारंपारिक कारागिर
- अल्प उत्पन्न श्रेणीतील कारागीर
- हस्तकला कामगार
- ओबीसी श्रेणीतील कारागीर
- अल्प उत्पन्न श्रेणीतील असंघटीत कारागीर जसे सुतार, शिंपी, धोबी, मूर्तिकार, चांभार, न्हावी, सोनार, लोहार, कुंभार, हलवाई, कोळी, विणकर, रेशीम कारागीर
विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2024 साठी अर्ज कसा करावा?
केंद्र सरकारतर्फे या योजनेचा संपूर्ण आराखडा कोणत्याही वेबसाइटवर जाहीर केलेल्या नसून सद्यस्थितीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील मजुरांचा विकास आणि स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी उत्तर प्रदेश राज्यात विश्वकर्मा श्रम सम्मान योजना सुरू केली आहे.
त्यामुळे तिथे सुरू असलेली अर्ज करण्याची पद्धत आम्ही इथे आपल्या संदर्भासाठी देत आहोत.
- विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2024 च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागे.
- अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2024 हा पर्याय दिसेल. तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- इथे असलेल्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्या उघडेल.
- या पेजवर तुम्हाला New User Registration या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- पर्यायावर क्लिक केल्यानंतर, नोंदणी फॉर्म तुमच्यासमोर उघडेल.
- तुम्हाला या नोंदणी फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती पूर्ण भरावी लागेल.
- सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची नोंदणी पूर्ण होईल.
विश्वकर्मा श्रम सम्मान योजना नोंदणी केल्यावर लॉग इन कसे करावे?
सर्व प्रथम अर्जदाराला शासनतर्फे दिलेल्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ आपल्या समोर दिसेल.
होम पेजवर तुम्हाला विश्वकर्मा श्रम सम्मान योजना या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
विश्वकर्मा श्रम सम्मान योजना पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत वापरकर्ता लॉगिन दिसेल.
या लॉगिन फॉर्ममध्ये तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड आणि कॅप्चा कोड इत्यादी भरावे लागतील.
यानंतर तुम्हाला लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल.
विश्वकर्मा श्रम सम्मान योजना अर्जाची स्थिती कशी पहावी ?
सर्व प्रथम अर्जदाराला शासनतर्फे दिलेल्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, मुख्यपृष्ठ आपल्या समोर दिसेल.
होम पेजवर तुम्हाला विश्वकर्मा श्रम सन्मान योजना या पर्यायावर क्लिक करावे लागेल .
विश्वकर्मा श्रम सम्मान योजना पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
या पृष्ठावर तुम्हाला अर्जाची स्थिती तपासण्यासाठी पर्याय दिसेल
त्यात तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक भरावा लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्यासमोर तुमच्या अर्जाचा स्टेटस दिसेल.
विश्वकर्मा योजना महाराष्ट्र स्थिती
केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेचे अधिकृत पोर्टल सुरू केले आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेची सर्व माहिती देखील सादर केली गेली आहे. अर्जाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी, तुम्हाला “नोंदणी प्रक्रिया” बटणावर क्लिक करावे लागेल. अर्ज केल्यानंतर, तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी या पोर्टलवर एक पर्याय देखील दिला जातो, जिथे तुम्हाला तुमचा “अर्ज क्रमांक” प्रविष्ट करावा लागेल आणि “स्थिती तपासा” वर क्लिक करा , तुमच्या अर्जाची स्थिती तुमच्या समोर प्रदर्शित होईल.
विश्वकर्मा योजना हेल्पलाइन क्रमांक महाराष्ट्र
तुम्ही जर महाराष्ट्र राज्यात राहत असाल आणि तुम्ही PM विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करत असाल, तर तुम्हाला अर्ज करताना किंवा अर्ज केल्यानंतर काही अडचण आल्यास, तुम्ही हेल्पलाइन नंबरद्वारे PM विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेशी संपर्क साधू शकता. तुमच्या समस्येचे निराकरण करू शकता. . पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेचा हेल्पलाइन क्रमांक आहे – 22027281,22025393.
PM Vishwakarma Yojana Maharashtra Contact Details
पदनाम | प्रधान सचिव |
विभाग | उद्योग आणि खाण विभाग |
पत्ता | 114 अॅनेक्स बिल्डिंग, मंत्रालय, मुंबई-32. |
संपर्क क्र. | 22027281,22025393 |
ई – मेल आयडी | psec.industry@maharashtra.gov.in |
पीएम विश्वकर्मा योजना अधिकृत वेबसाइट
पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेची अधिकृत वेबसाइट
https://pmvishwakarma.gov.in/ आहे ,
जर तुम्हाला या वेबसाइटला भेट द्यायची असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करून थेट या वेबसाइटला भेट देऊ शकता.
FAQ
पीएम विश्वकर्मा श्रम सन्मान योजना म्हणजे काय?
या योजनेंतर्गत देशातील पारंपारिक कारागीर आणि अल्प उत्पन्न श्रेणीतील असंघटीत 18 प्रकारचे कारागीर जसे सुतार, शिंपी, धोबी, मूर्तिकार, चांभार, न्हावी, सोनार, लोहार, कुंभार, हलवाई, कोळी, विणकर, रेशीम कारागीर इत्यादींना लघुउद्योग सुरू करण्यासाठी केंद्र शासनतर्फे 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देण्यात येईल. या योजनेचा खर्च केंद्र शासनाच्या निर्णयानुसार केंद्र किंवा राज्य शासन करणार आहे. या योजने अंतर्गत देशातील 30 लाखांहून अधिक कारागिरांना लाभ मिळणार असून त्यांना अनुदानित कर्ज, व्यवसाय प्रशिक्षण, प्रगत तंत्रज्ञान आणि कौशल्यांची माहितीही देण्यात येणार आहे.
विश्वकर्मा योजना 2024 काय आहे?
विश्वकर्मा योजना 2024 या योजनेंतर्गत देशातील पारंपारिक कारागीर आणि अल्प उत्पन्न श्रेणीतील असंघटीत 18 प्रकारचे कारागीर इत्यादींना लघुउद्योग सुरू करण्यासाठी केंद्र शासनतर्फे 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देण्यात येईल. या योजनेचा खर्च केंद्र शासनाच्या निर्णयानुसार केंद्र किंवा राज्य शासन करणार आहे. या योजने अंतर्गत देशातील 30 लाखांहून अधिक कारागिरांना लाभ मिळणार असून त्यांना अनुदानित कर्ज, व्यवसाय प्रशिक्षण, प्रगत तंत्रज्ञान आणि कौशल्यांची माहितीही देण्यात येणार आहे.
विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2024 कधी सुरू झाली आहे ?
विश्वकर्मा श्रम सम्मान योजना 2024 ही केंद्र शासनतर्फे विश्वकर्मा जयंतिदिवशी म्हणजेच 07 सेप्टेंबर 2023 रोजी संपूर्ण भारत देशात सुरू झाली आहे.
विश्वकर्मा योजना 2024 माहिती निष्कर्ष
आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे संपूर्ण भारतात सुरू होणारी विश्वकर्मा श्रम सन्मान योजना ही कशी असेल आणि सद्यस्थितीत उत्तरप्रदेश मध्ये ती कश्या प्रकारे चालू आहे याबद्दल माहिती दिलेली आहे.
ही योजना संपूर्ण भारत देशात लागू करताना त्यातील काही अटी, शर्ती, मुद्दे वगैरे केंद्र सरकार , राज्य सरकार यांच्यातर्फे बदलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही दिलेला योजना आराखडा पूर्णपणे योग्य आहे असा आम्ही कोणताही दावा करत नाही.
धन्यवाद