करवंद karonda fruit

करवंद karonda fruit – करवंद आपल्या सर्वांना माहीत आहेतच. डोंगरची काळी मैना म्हणजे आपली करवंद. एका टोपलीमध्ये असंख्य लाल-काळी अशी लहान लहान टपोरी करवंद छान ऐटीत बसलेली असायची. पळसाच्या पानांची एक लहानशी पर्स करुन हे करवंद विकली जायची. 

पण या फळात काय औषधी गुणधर्म आहेत ? हे फार कमी जणांना माहित आहे. त्यामुळे आज आपण विशेष करून, उन्हाळ्यात कोकणातील डोंगर दऱ्यांमध्ये येणारा हा रानमेवा म्हणजेच हे फळ, त्यात किती औषधी गुणधर्म आहेत, त्याबद्दल आजच्या लेखाद्वारे माहिती घेणार आहोत.

हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

करवंद karonda fruit

करवंद परिचय

फळाचे नाव करवंद
शास्त्रीय नावकॅरिसा करंडास Carissa carandas
कुठे आढळते भारतातील वनांमध्ये, श्रीलंका, जावा, तिमोर
उंची २ मीटरपर्यंत
उपयोग औषधासाठी तसेच खाण्यासाठी

करवंदाची इतर नावे

करवंद karonda fruit – याचे मूळ स्थान भारत असून, करवंद हिंदीमध्ये ‘खट्टा मीठा’ या नावाने प्रसिद्ध आहे. इंग्रजीत Karanda, conkerberry; हिंदीत करौंदा, करुम्चा: आसामी: कारेन्जा, मल्याळी: काराक्का, तामिळ: कलाहा , कन्नडा: करोंदा; शास्त्रीय नाव: Carissa carandas हे एक काळ्या रंगाचे छोटे फळ आहे.

करवंद

हे वाचा –

करवंदाचे वर्णन

हे काटेरी व सदापर्णी झुडूप अ‍ॅपोसायनेसी कुळातील असून, त्याचे शास्त्रीय नाव कॅरिसा करंडास असे आहे. भारतातील वनांमध्ये विशेषत: शुष्क व खडकाळ भागांत आढळते. याशिवाय श्रीलंका, जावा, तिमोर येथेही ते आढळते. याची उंची सुमारे २ मीटरपर्यंत असते.

पाने – लंबगोल, चिवट, साधी, समोरासमोर, चकचकीत आणि गुळगुळीत दिसतात. फळ किंवा फूल तोडल्यास पांढरा चीक येतो.

खोड – याचे आखूड असून फांद्या व लांब काटे द्विभक्त असतात.

फळे – याची फळे काळ्या रंगाची, छोट्या गोल आकाराची असतात. यामध्ये शरीराला आवश्यक अशी अनेक पोषण तत्त्वे आहेत. ही फळे कोकण भागात रानमेवा म्हणून अतिशय प्रसिद्ध आहेत.

फुले – पांढरी, अपछत्राकृती व लव असलेली असतात.

करवंद

करवंद खाण्याचे फायदे

  • यामध्ये अँटी-इम्प्लिमेंटरी अंती फंगल अँटीमाइक्रोबेल व अँटिऑक्सिडेंट प्रॉपर्टीज असल्यामुळे, ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतं. हे एक कार्डीये टॉनिकच काम करत. यात व्हिटामिन सी आणि पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे, ते हृदयविकारावर अत्यंत परिणामकारक ठरतं.
  • नियमित करवंद खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातून मधून ब्लॉकेजेस, फॅट डिपॉझिट निघून जातात. ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि बीपी देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • तसेच हे फळ नियमित खाल्ल्याने, डायबिटीस, किडनीचे विकार, किडनी स्टोन्स, पचनसंस्थेचे विकार, उष्णतेचे विकार आणि अशा प्रकारचे अनेक विकार बरे होण्यास मदत होते. त्यामुळे आपण नियमित हे फळ खाल्लेच पाहिजेत.
  • यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे हाडांच आरोग्य राखला जातं. त्यामुळे जॉईंट पेन, संधिवात, आमवात, यामध्ये फायदा होतो. तसंच नियमित हे फळ किंवा यापासून बनलेले पदार्थ खाल्ल्याने मसल्स देखील स्ट्रॉंग राहतात आणि दातांच आरोग्य देखील राखले जातं.
  • यात विटामिन ए, बी आणि सी च प्रमाण खूप चांगल आहे. त्यामुळे आपल्या मेंदूचं किंवा ब्रेनचा कार्य सुधारतं. आपली स्मरणशक्ती वाढते आणि दृष्टी देखील सुधारण्यास मदत होते.
  • हे फळ नियमित खाल्ल्याने, आपली बॉडी क्लेंज होते. आपली शरीराची पीएच लेवेल मेंटेन राहते आणि त्याचबरोबर हार्मोन्स देखील बॅलन्स राहण्यास मदत होते.
  • कोरड्या खोकल्यावर याच्या पानांचा चूर्ण खूपच उपयुक्त ठरतं. हे चूर्ण मधाबरोबर घेतल्याने कोरडा खोकला बरा होण्यास मदत होते. तसेच करवंद कॅन्सरवर देखील अत्यंत परिणामकारक ठरतात.
  • करवंदात अँटि ऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्यामुळे, ब्रेस्ट कॅन्सर, ब्लड कॅन्सर आणि सर्व्हीकल कॅन्सर पासून देखील आपल रक्षण होतं. त्या सर्वांबरोबर हे अनेक आजार जसे कि, लघवीच्या जागी इन्फेक्शन होणं, ताप, त्वचेचे किंवा केसांचे विकार, जसे कि, रिंकल्स किंवा एक्झामा यावर सुद्धा अत्यंत परिणामकारक ठरतं.
  • आपण या फळाची चटणी, याचा रस किंवा याचे सरबत घेऊ शकतो. हे आपल्या शरीरासाठी खूपच गुणकारी ठरतं. तर मग जर उत्तम आरोग्य हवं असेल आणि तारुण्य टिकवायचं असेल तर, नियमित याचा समावेश आपल्या आहारात करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा.
karonda fruit

करवंद फळाविषयी माहिती

वेगवेगळ्या ऋतूमध्ये, वेगवेगळे फळे येतात. या फळांची चव तर चाखण्याचा भरपूर आनंद लोक घेताना दिसतात. परंतु अनेकांना त्या फळातील औषधी गुण माहित नसतात. असंच अनेकांच्या आवडीचं फळ आहे.

ही फळे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. याची चटणी करतात आणि शिवाय यापासून सर्व लोणचे, मोरंबा, वगैरे करता येतात. यात जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्वचा विकारावर, हे फळ उपयुक्त आहे.

मधुमेह आटोक्यात आणण्यास  याचा उपयोग होतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक ऍसिड असतं. त्यामुळे या दिवसात उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक आजारांवर हे फळ फायदेशीर आहेत. आपण एक महिना दररोज याचे सेवन केल्यास किंवा ज्यूस पिल्यास, शारीरिक ताकद वाढते.

उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे शरीराची लाही लाही होते, तेव्हा याचे सरबत पियाल्याने ते अधिक आराम देते. यामध्ये फायबर खूप प्रमाणात असते, त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. यामध्ये कॅल्शियम हि भरपूर प्रमाणात असल्याने हाडांसाठी देखील हे अतिशय उत्तम फळ आहे.

करवंदाचे औषधी गुणधर्म

आज आपण या फळाचे आपल्या शरीरासाठी काय औषधी गुणधर्म आहेत, याबद्दल माहिती घेणार आहोत.

याला डोंगराची काळी मैना असेही म्हटलं जातं. विशेष करून कोकणातील घाटांमध्ये, जंगलामध्ये याची भरपूर झाडं बघायला मिळतात. याची पिकलेली फळ तर रुचकर लागतातच, पण याचे लोणचं, याची चटणी, सरबत आणि मुरंबा देखील खूपच रुचकर लागतो आणि त्याचबरोबर ते औषधी देखील आहे.

  • यात आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, विटामिन ए, बी, सी, डी आणि फायबरचं प्रमाण खूप चांगला आहे. त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूपच हितकारक ठरतं.
  • यात अँटी डायबिटीस, अँटी कॅन्सर आणि अँटी अल्सर प्रॉपर्टीज आहेत. त्याचबरोबर ते एक उत्तम कार्डीयक टॉनिक आणि ब्रेन टॉनिक देखील आहे. त्यामुळे सर्वांनी याचा समावेश आपल्या आहारात केलाच पाहिजे.
  • उन्हाळ्याच्या सिझनमध्ये ही फळे भरपूर प्रमाणात खाल्ल्यामुळे, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून आपलं रक्षण होतं. यात एस्कोरबिक एसिड चे प्रमाण खूप चांगला आहे. त्यामुळे उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक त्रासांवर ते अत्यंत उपयुक्त ठरतं.
  • जर सन स्ट्रोकचा त्रास होत असेल किंवा तहान भागत नसेल तर, थोडे थोडे वेळाने याचे सरबत घेतलं पाहिजे. त्याने आपल्या शरीराला थंडावा प्रदान होईल. यामध्ये आयर्न आणि विटामिन सी चे प्रमाण खूप चांगल आहे. त्यामुळे ते अनियम यावर अत्यंत परिणामकारक ठरतं.
  • ही फळे नियमित खाल्ल्याने, आपल्या शरीरातील रक्त किंवा हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे अशक्तपणा निघून जाऊन, एनर्जी लेवेल देखील वाढण्यास मदत होते.
  • यामध्ये फायबरचं प्रमाण खूप चांगलं असल्यामुळे, आपलं मेट्रोजन सुधारतं आणि त्यामुळे आपलं पचन चांगलं होतं. पोट साफ होतो आणि मलावरोधाचा त्रास आपल्याला होत नाही.
  • जर ऍसिडिटी, गॅसेस, मळमळ, उलटीचा त्रास होत असेल तर, आपण याचे सरबत घेतलं पाहिजे. त्याने आपल्याला लवकर आराम मिळेल. तसंच जर गरोदरपणी उलटी आणि मळमळचा त्रास होत असेल तरी, देखील आपण ही फळ खाल्ले पाहिजेत. याने आराम मिळेल.
  • या सर्वांबरोबर ही फळे जॉइंट पेन, आमवात, यूटीआय, त्वचेचे विकार, केसांचे विकार, अशा संख्या विकारांवर अत्यंत परिणामकारक ठरतात. तर मग जर तारुण्य टिकवायचं असेल तर नियमित ही फळे आणि यापासून बनलेल्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात करा आणि आपला आरोग्य उत्तम ठेवा.

घरगुती करवंद सरबत कसे बनवावे ?

साहित्य

  • करवंद
  • बर्फ
  • साखर
  • मीठ
  • भाजकी जिरे पावडर

कृती

  • सर्वप्रथम हे फळ स्वच्छ धुवून, मिक्सरमध्ये ग्राइंड करायला टाका.
  • त्यात भाजकी जिरे पावडर, चवीपुरते मीठ व साखर घालून थोडेसे पाणी व बर्फाचे तुकडे घालून मिश्रण अर्धा मिनिट मिक्सरला लावून एकजीव करा.
  • मिक्सरला ग्राइंड करून झाल्यानंतर, वाटाणामध्ये थोडंसं पाणी घालून, हे वाटण गाळणीच्या मदतीने एका पातेल्यात गाळून घ्या.
  • अगदी घरगुती पद्धतीने याचे सरबत तयार होईल.

करवंदाची चटणी कशी बनवायची ?

कोकणची मैना म्हणजे करवंद, सर्वत्र प्रसिद्ध आहेत. याची पिकलेली फळे खूप छान लागतात. आपण आवडीने खातोच, पण या कच्चा फळाची चटणी सुद्धा खूप छान लागते. हा एक नवीन पदार्थ आहे. चवीलाही खूप छान, आंबट, तिखट ही चटणी खूप छान लागते.

तुम्ही देखील घरी नक्कीच करून पहा. याचा सीजन उन्हाळ्यात चालू होतो, या दिवसात कच्ची फळे खूप छान उपलब्ध होतात. अगदी सोप्या पद्धतीने तीन ते चार मिनिटात होणारी याची चटणी तुम्ही देखील घरच्या घरी जरूर करून पहा.

हि याची चटणी एकदा कराल, तर नेहमी खात राहाल. इतकी चवीला छान लागते. चला तर मग रेसिपी बघुयात.

साहित्य

  • याच्या कच्च्या फळाच्या चटणीसाठी तुम्हाला सर्वप्रथम कच्ची फळे लागणार आहेत.
  • त्याचबरोबर जिरे लागणार आहेत.
  • हिरवी कोथिंबीर,
  • थोडीशी साखर,
  • चवीनुसार मीठ,
  • लसूण पाकळ्या चार-पाच,
  • थोडी चवीसाठी हिरवी मिरची,
  • हे सर्व साहित्याचा वापर करून, आपण मस्त या फळाची चटणी बनवायची आहे.

कृती

  • कच्ची फळे घ्या, व ती स्वच्छ पाण्याने चार ते पाच वेळा धुवून घ्या. कारण याला चीक असतो. तो निघून जाईल.
  • याला चिक असल्याकारणाने विळीला किंवा चाकुला तेल लाऊन घ्या.
  • यानंतर हे फळ बारीक बारीक कापून घ्या व पाण्यात भिजवत ठेवा.
  • सर्व फळे कापून झाल्यानंतर पुन्हा एकदा हि फळे स्वच्छ तीन ते चार वेळा पाण्याने धुवून घ्या. जेणेकरून त्याला असलेला चीक सगळा निघून जाईल.
  • ही फळे धुते वेळी चिकाचे पांढरे पाणी यायचे थांबत नाही तो पर्यंत आपल्याला ही फळे धुवून घ्यायची आहेत
  • यानंतर जर यामध्ये जर जून बिया असतील तर, त्या बिया काढून टाकायच्या आहेत. बिया कोवळ्या असतील तर चटणीत तशाच राहिल्या तरी चालतात. हि कृती ऑप्शनल आहे. बिया नाही काढल्या तरी चालतात काढल्या तरी चालतात.
  • या नंतर मिक्सरच भांड घ्यायचं आहे, त्यामध्ये ही कापलेली फळे घालायची आहे.
  • त्यानंतर त्यात हिरवी मिरची टाकायची आहे,
  • त्यानंतर त्यात लसूण, कापून घेतलेली कोथिंबीरि टाकायची आहे. कोथिंबीर चा वापर थोडा जास्त केला तरी पण चालतो.
  • त्या नंतर वाटपात जिरे टाकायचे आहेत, चवीनुसार मीठ टाकायचे आहे, थोडीशी साखर घालायची आहे किंवा गूळ घातला तरी चालतो, यानंतर मिक्सरमध्ये हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायच आहे.
  • वाटणात पाण्याची गरज लागली तर तीन ते चार चमचे पाण्याचा वापर करा.
  • अश्या प्रकारे मस्त अशी चटणी तयार होईल.

तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही चटणी नक्कीच तोंडी लावायला खाऊ शकता. चवीला खूप छान, झटपट होणारी, पाच मिनिटात होणारी करवंदाची चटणी तयार आहे. कशी वाटली आंबट, तिखट, करवंदाची चटणी सांगायला विसरू नका.

कच्च्या करवंदाचे लोणचे

आज आपण गावरान पद्धतीने याच्या कच्च्या फळायचे लोणचे कसे बनवाचे ते बघणार आहोत.

  • यासाठी सर्वप्रथम ही फळे साफ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची. म्हणजे यावरील चिक निघून जातो.
  • यानंतर आपल्याला फॅनच्या हवे खाली सुकून घ्यायची आहेत. जेणेकरून यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नये.
  • ही फळे चांगले सुकली की बारीक चिरून घ्यायची आहेत.
karvanad

साहित्य

  • कच्ची करवंदे
  • लोणच्यासाठी लागणारा मसाला
  • दोन चमचे घरचा मसाला,
  • दोन चमचा लाल मिरची पावडर,
  • एक चमचा हळद,
  • दोन चमचे जिरे,
  • दोन चमचे मीठ,
  • 100 ग्रॅम मोहरीची डाळ,
  • अर्धा वाटी लसणाच्या पाकळ्या
  • आणि एक वाटी तेल, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणत्याही प्रकारचे तेल वापरू शकता.

कृती

  • गॅसवर एक पातेले ठेवावे.
  • हे पातेले चांगले तापले की, याच्यामध्ये तेल टाकावे.
  • तेल आपल्याला चांगलं कडक गरम करून घ्यायचं आहे.
  • तेल चांगलं कडक गरम झालं की लगेच गॅस बंद करावा.
  • यानंतर एक मोठे ताट घ्यावे, जेणेकरून त्यात आपण सर्व मसाले नीट एकजीव करू शकू.
  • नंतर त्या ताटामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे.
  • मसाले ताटात टाकून झाल्यावर, सगळा मसाला एक मिनिटं चांगला हाताने एकजीव करून घ्यायचा.
  • मसाला चांगला एकजीव करून झाल्यानंतर, त्याच्यामध्ये गरम केलेलं तेल ओतावे.
  • आता हे गरम तेल, आपल्याला सगळ्या मसाल्यावर व्यवस्थित पसरून ओतायचे आहे, म्हणजे आपल्या मसाल्याला चांगली फोडणी बसेल.
  • गरम तेल सगळ्या मसाल्यावर चांगलं पसरून घ्यायचं, म्हणजे आपल्या सगळ्या मसाल्याला चांगली फोडणी बसेल.
  • या नंतर सर्व मसाला मस्त एकजीव करून घ्यायचा.
  • मसाला चांगला एकजीव करून झाल्यानंतर, आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली ही फळे घालायची आणि हि फळे चांगली मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायची.
  • पाच मिनिटं ही फळे मसाल्यामध्ये नीट एकजीव करून घ्यायची.
  • यानंतर आपल्याला लोणचं थंड करून घ्यायचा आहे आणि मग एका काचेच्या बरणीमध्ये भरून घ्यायचा आहे.
  • हे याचे लोणचं १५ ते २० दिवस चांगलं मुरु द्यायच आहे आणि मगच खायच आहे.
  • अश्या पद्धतीने आपलं गावरान पद्धतीने लोणचं बनवून तयार आहे.

NOTE :-

(ही आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत, म्हणजे मसाला चांगला याच्या आतपर्यंत मुरतो. ही फळे आधी चांगली सुकून घ्यायची, अजिबात पाणी ठेवायचं नाही आणि मगच बारीक चिरून घ्यायची आहेत. म्हणजे आपलं लोणचं खूप दिवस टिकतं आणि लवकर खराब होत नाही.)

करवंदाचा मुरंबा

याचा गोड, आंबट असा मुरब्बा, जो लहान पासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. हा मुरंबा बनवण्यासाठी लागणारे खालील गोष्टींची आवश्यकता आहे.

साहित्य

  • करवंद
  • साखर
  • विलायची

कृती

  • सुरुवातीला आपल्याला ही फळे चार-पाच पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायची आहे.
  • एक वाटी आपल्याला ही फळे घ्यायची आहेत, व एक वाटी साखर थोडीशी त्यापेक्षा जास्त घ्यायची आहे.
  • चार विलायच्या आहे, विलायची आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे, त्यामुळे जी विलायची आहे ती बारीक होईल.
  • एका भांड्यामध्ये साखर टाकून, त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून गॅसवर गरम करायची आहे.  
  • त्याचा थोडासा पाक होऊ देऊन, त्यामध्ये बारीक चिरलेली फळे शिजायला टाकयची आहे.
  • आता आपल्याला हि पाकात व्यवस्थित शिजवून घ्यायची आहेत.
  • याला उकळी आल्यावर, आपल्याला त्यामध्ये विलायची पूड टाकायची आहे.
  • यानंतर हे व्यवस्थित नरम होईपर्यंत शिजवून घ्यायची आहेत.
  • ही चांगली पाकात मुरल्यानंतर गॅस बंद करायचा आहे.
  • अश्या प्रकारे आपला मुरंबा बनून तयार होईल.

FAQ

१. करवंदाचे औषधी गुणधर्म काय आहेत ?

यात आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, विटामिन ए, बी, सी, डी आणि फायबरचं प्रमाण खूप चांगला आहे. त्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी खूपच हितकारक ठरतं.
यात अँटी डायबिटीस, अँटी कॅन्सर आणि अँटी अल्सर प्रॉपर्टीज आहेत. त्याचबरोबर ते एक उत्तम कार्डीयक टॉनिक आणि ब्रेन टॉनिक देखील आहे. त्यामुळे सर्वांनी करवंदाचा समावेश आपल्या आहारात केलाच पाहिजे.
उन्हाळ्याच्या सिझनमध्ये ही फळे भरपूर प्रमाणात खाल्ल्यामुळे, आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक आजारांपासून आपलं रक्षण होतं. यात एस्कोरबिक एसिड चे प्रमाण खूप चांगला आहे. त्यामुळे उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक त्रासांवर ते अत्यंत उपयुक्त ठरतं.
जर सन स्ट्रोकचा त्रास होत असेल किंवा तहान भागत नसेल तर, थोडे थोडे वेळाने याचा सरबत घेतलं पाहिजे. त्याने आपल्या शरीराला थंडावा प्रदान होईल. यामध्ये आयर्न आणि विटामिन सी चे प्रमाण खूप चांगल आहे. त्यामुळे ते अनियम यावर अत्यंत परिणामकारक ठरतं.

२. करवंद फळाविषयी माहिती सांगा.

ही फळे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. याची चटणी करतात आणि शिवाय यापासून सर्व लोणचे, मोरंबा, वगैरे करता येतात. यात जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्वचा विकारावर, हे उपयुक्त आहे.
मधुमेह आटोक्यात आणण्यास  याचा उपयोग होतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक ऍसिड असतं. त्यामुळे या दिवसात उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक आजारांवर ही फळे फायदेशीर आहेत. आपण एक महिना दररोज याचे सेवन केल्यास किंवा ज्यूस पिल्यास, शारीरिक ताकद वाढते.
उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेमुळे शरीराची लाही लाही होते, तेव्हा याचे सरबत पियाल्याने ते अधिक आराम देते.

३. करवंद खाण्याचे काय फायदे आहेत ?

नियमित ही फळे खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातून मधून ब्लॉकेजेस, फॅट डिपॉझिट निघून जातात. ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि बीपी देखील नियंत्रणात राहण्यास मदत होते.
तसेच ही नियमित खाल्ल्याने, डायबिटीस, किडनीचे विकार, किडनी स्टोन्स, पचन संस्थेचे विकार, उष्णतेचे विकार आणि अशा प्रकारचे अनेक विकार बरे होण्यास मदत होते. त्यामुळे आपण नियमित करवंद खाल्लेच पाहिजेत.
करवंदामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे हाडांच आरोग्य राखला जातं. त्यामुळे जॉईंट पेन, संधिवात, आमवात, यामध्ये फायदा होतो. तसंच नियमित करवंद किंवा करवंदापासून बनलेले पदार्थ खाल्ल्याने मसल्स देखील स्ट्रॉंग राहतात आणि दातांच आरोग्य देखील राखले जातं.
करवंदात विटामिन ए, बी आणि सी च प्रमाण खूप चांगल आहे. त्यामुळे आपल्या मेंदूचं किंवा ब्रेनचा कार्य सुधारतं. आपली स्मरणशक्ती वाढते.

४. करवंदाचे सरबत कसे बनवावे ?

सर्वप्रथम करवंद स्वच्छ धुवून, मिक्सरमध्ये ग्राइंड करायला टाका.
त्यात भाजकी जिरे पावडर, चवीपुरते मीठ व साखर घालून थोडेसे पाणी व बर्फाचे तुकडे घालून मिश्रण अर्धा मिनिट मिक्सरला लावून एकजीव करा.
मिक्सरला ग्राइंड करून झाल्यानंतर, वाटाणामध्ये थोडंसं पाणी घालून, हे वाटण गाळणीच्या मदतीने एका पातेल्यात गाळून घ्या.
अगदी घरगुती पद्धतीने करवंदाचे सरबत तयार होईल.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास करवंद या फळा विषयी माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment