काकडी खाण्याचे फायदे Benefits Of Eating Cucumber

काकडी खाण्याचे फायदे Benefits Of Eating Cucumber – काकडी चवीला रुचकर असून, उन्हाळ्यात शरीराला थंडावा देते. काकडी एक उत्तम पित्तशामक फळ आहे. तसेच काकडी तृष्णा भागवणार फळ मानलं जातं. काकडी शिवाय कोशिंबीर, सलाड, बनवू शकत नाही. त्याचबरोबर भारतीय आहारात काकडी पासून बनवलेल्या कोशिंबिरीला, आरोग्यवर्धक मानले.

आजच्या लेखाद्वारे आपण जाणून घेऊयात काकडीचे गुणकारी फायदे. हि फायदे जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

काकडी खाण्याचे फायदे Benefits Of Eating Cucumber

काकडीचा परिचय

नाव काकडी
कॅलरीज 45 ग्रॅम
व्हिटॅमिन सी 14 टक्के
व्हिटॅमिन के 62 %
प्रथिने 2 ग्रॅम
फायबर2 ग्रॅम
फॅट 0 %
कार्बोहायड्रेट11 ग्रॅम
मॅंगनीज12 %
पोटॅशियम13 टक्के
मॅग्नेशियम10%

काकडीला इतर नावे

 • मराठी – काकडी, तारकाकडी, तवसे, वाळूक
 • इंग्रजी – Cucumber
 • गुजराती – काकडी, काकरी, तानसली
 • बंगाली – खिरा
 • संस्कृत – एर्वारु, कर्कटी, त्रपुष्पा, मूत्रला, लोमशी, वालुंगी, शंतनू, सुधांसा, सुशीतला
 • कानडी – संत्रेकाई
 • तामीळ – मुल्लवेल्लरी
 • हिंदी – ककड़ी, खीरा
 • लॅटीन – Cucumis sativus; Cucumis melo(Cucumis utilissimus)

काकडी चे महत्व  

काकडी खाण्याचे फायदे Benefits Of Eating Cucumber – काकडीमध्ये असलेल्या कमी कॅलरीज आणि भरपूर न्युट्रीशन मुळे काकडी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. काकडीचे आपण कोशिंबीर किंवा सॅलड करून खातो. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि महत्त्वपूर्ण पोषक तत्व असतात.

जे मानवी शरीरासाठी खूप आवश्यक असतात. काकडी आपल्याला हायड्रेटेड राहायला आणि वेट लॉस मध्ये मदत करते. याशिवाय काकडीचे इतरही काही फायदे आहेत.

तुम्हाला माहिती आहे का ? कि, काकडीचे लोणचे सुद्धा बनवले जाते. पण यासाठीची काकडी असते ती वेगळी असते आणि आपण नेहमी खातो ती काकडी वेगळी असते. काकडी मध्ये खूप कमी कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज असतात. तसेच आपल्या शरीराला आवश्यक असणारे, विटामिन्स आणि मिनरल्स सुद्धा असतात.

काकडीमध्ये असलेल्या पोषण मूल्यांचा विचार करता, काकडी न सोलता खाणच हेल्दी असते. जर आपण काकडी सोलून खाली तर, यामध्ये असलेले फायबर, विटामिन्स, मिनरल्स चे प्रमाण खूप कमी होते.

काकडी खाण्याचे फायदे

हे वाचा –

काकडी खाण्याचे फायदे

आपण काकडी खाल्याने होणाऱ्या इतर काही फायद्यांविषयी माहिती करून घेऊयात.

अँटि ऑक्सिडंट चा मुख्य स्त्रोत

काकडी खाण्याचे फायदे Benefits Of Eating Cucumber – काकडी अँटि ऑक्सिडंट चा मुख्य स्त्रोत आहे. अँटिऑक्सिडंट शरीरातील ऑक्सिकरण नियंत्रित करतात. त्यामुळे तुम्ही अनेक आजारापासून सुरक्षित राहता.

चरबीयुक्त आहाराचे ऑक्सीकरण थांबवण्यासाठी, आहारामध्ये एखादा असा पदार्थ अँटि ऑक्सिडंट समाविष्ट केल्या पाहिजे, हे काम काकडी करत असते.

जर ऑक्सिकरण नाही थांबले तर ऑक्सिडेटिव्ह हृद्य फुफ्फुस आणि ऑटो इम्यून सारख्या आजारांचा धोका वाढतो. पण काकडी मध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंटमुळे हा धोका कमी होतो.

एका अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की, काकडीची पावडर अँटि ऑक्सिडंट म्हणून काम करण्यासाठी जास्त प्रभावी आहे. त्यामध्ये फ्ल्याओनाईड आणि टॅनिन ही दोन संयुगे असण्याची आपल्या शरीराला त्रासदायक रॅडिकल्सला रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात.

काकडी

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त  

काकडी खाण्याचे फायदे Benefits Of Eating Cucumber – वजन कमी करायला सुद्धा काकडी ही मदत करत असते. आपण आपल्या जेवणामध्ये काकडीचा वापर वजन कमी करण्यासाठी केला जातो. तुम्हाला माहितीये का ? वचन कमी करण्यासाठी काकडीचे अजूनही काही फायदे आहेत. काकडीमध्ये सगळ्यात कमी कॅलरीज असतात.

अंदाजे एक कप काकडी मध्ये फक्त १६ कॅलरीज असतात. तर एका अख्या काकडीमध्ये ४५ कॅलरीज असतात. म्हणजेच जरी तुम्ही काकडी जास्त प्रमाणात खाल्ली तरी त्यामुळे तुमच वचन वाढणार नाही. याशिवाय काकडीमध्ये असणारे हाय वॉटर कंटेंट वजन कमी करायला मदत करतात.

एका अभ्यासाच्या निष्कर्षातून असे स्पष्ट झाले आहे की, भरपूर पाणी असलेल्या आणि कमी कॅलरीज असलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे, वजन कमी करायला मदत करतात.

त्वचेसाठी फायदेशीर

काकडी खाण्याचे फायदे Benefits Of Eating Cucumber – आपण अनेकदा पाहिलं असेल की, महिला किंवा पुरुष आपल्या डोळ्यांवर काकडीच्या चकत्या का ठेवतात ? किंवा काकडीचा रस आपल्या त्वचेवर लावत असतात.

कारण काकडीमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सिलिकॉन असत. जे त्वचेला तुकतुकी बनवण्यासाठी खूप फायदेशीर असते.

तसेच या सगळ्यांमुळे त्वचेवर चमक देखील येते. काकडीच्या चकत्या करून डोळ्यांवर ठेवल्यामुळे डोळ्याखाली असलेली काळी वर्तुळे कमी होतात.

ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत करते

काकडी ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी मदत करत असते. काकडी खाल्ल्यामुळे ब्लड शुगर लेवल कमी करायला आणि डायबेटीसचे कॉम्प्लिकेशन्स कमी करायला मदत होते.

काकडीच्या रसामध्ये अशी तत्व असतात, जी पॅनक्रियजला सक्रिय करतात. पॅनक्रियज सक्रिय झाल्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिन तयार होते. यानंतर इन्सुलिन डायबेटीस शी लढायला मदत करते.

काकडीमध्ये असलेले फायबर्स, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये ठेवायला मदत करत असते. काकडी ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करायला आणि मधुमेहाशी संबंधित आजारापासून वाचण्यास मदत करत असते.

अन्नपचन क्रियेमध्ये मदत

काकडी अन्नपचनाच्या प्रक्रियेमध्ये मदत करते. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्यामुळे, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून दिले जातात आणि यामध्ये असलेले सोलेबल फायबर्स पोट साफ करतात.

त्यामुळे पोटाशी संबंधित आजार होण्याचा धोका देखील कमी होतो. तसेच अन्न पचन व्हायला देखील खूप मदत मिळते. यासोबतच मध्ये जठरामध्ये एन्जायम असतात जे पोटासाठी खूप चांगले असतात.

काकडी खाल्ल्यामुळे अल्सर, बद्धकोष्ठ, अपचन, यासारखी पोटाशी संबंधित आजार होत नाही. तुम्हाला तर माहीतच असेल की, पोटामुळेच आपले संपूर्ण आरोग्य नीट राहते.

बहुगुणी काकडीचे फायदे

 • काकडीच्या सेवनाने, शरीराला दररोज आवश्यक असलेले दहा टक्के विटामिन सी मिळत.
 • काकडीमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम असल्याने, हाड मजबूत व्हायला मदत होते.
 • काकडीच्या चकत्या म्हणजेच स्लाईस डोळ्यावर ठेवल्याने, डोळ्याखालची काळी वर्तुळ कमी होऊन, डोळ्यांना थंडावा मिळतो.
 • काकडीच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहतं.
 • काकडीमध्ये असणारी पाण्याची मात्रा यामुळे वजन कमी व्हायला फायदा होतो.
 • काकडीच्या सेवनाने शरीरातील तापमान नियंत्रणात राहतं.
 • काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्यास, काळपटपणा कमी होऊन चेहरा चमकदार होतो.
 • काकडीच्या रसात थोडी साखर मिसळून, प्यायल्यास लघवी साफ होते.
 • मधुमेहासाठी काकडी वरदान आहे.
 • नियमित काकडीच्या रसाचा सेवन केल्याने, शरीरातील इन्सुलिन तयार होण्याची गती नियंत्रणात राहते.
 • उन्हाळ्यात काकडीचे सेवन आवश्यक करावं, त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.
 • अशा प्रकारे काकडी ही आपल्या शरीरासाठी अत्यंत आरोग्यवर्धक आणि गुणकारी असल्याने, त्याचा आहारात नियमित वापर करणं फायदेशीर ठरतं.
Benefits Of Eating Cucumber

काकडीच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम काय आहेत ?

काकडी खाण्याचे फायदे Benefits Of Eating Cucumber – काकडी शिवाय कोशिंबीर हा पदार्थ अपूर्ण आहे आणि तसं का असू नये, कारण काकडी मध्ये आढळणारे विटामिन के आणि अँटि ऑक्सिडंट गुणधर्म आपल्या आरोग्यावर खूप सकारात्मक परिणाम दर्शवतात.

एकंदरीत काकडी हि एक अशी भाजी आहे की, ज्याचा वापर आपण चटणी, कोशिंबीर, तसेच सूप मध्ये सुद्धा करू शकतो. जर आपण काकडी जास्त प्रमाणात सेवन केली किंवा चुकीच्या वेळेस सेवन केली तर यामुळे आपणास बरीच हानी पोहोचू शकते.

काकडी हा अनेक गुणांचा खजिना असला तरीही, जर तुम्ही काकडीचे जास्त प्रमाणात सेवन केलं तर, ती पोट फुगण्यासारख्या अनेक समस्यांना जन्म देऊ शकते. कारण काकडीत ९५% पाणी. इतकच नाही तर काकडीच्या बियांमध्ये कुकुर बिटन नावाचा घटक आढळतो.

या घटकामुळे आपल्याला अधिक वेळा लघुशंका होणं सुरू होतं, ज्यामुळे आपल्या शरीरातून लिक्विड किंवा द्रव्य पदार्थ अधिक प्रमाणात बाहेर पडू लागतात. असे झाल्याने शरीरातील इलेक्ट्रॉलाईट संतुलन बिघडू लागतं.

पण या व्यतिरिक्त काकडीच सेवन योग्य प्रमाणात केलं तर, तुम्हाला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं. पण जास्त किंवा अति प्रमाणात त्याच सेवन केल्याने आपल्याला डीहायड्रेशन ची समस्या देखील होऊ शकते.

Benefits Cucumber in marathi

काकडी कधी खावी ?

काकडी खाण्याचे फायदे Benefits Of Eating Cucumber – बरेच लोक कोशिंबिरीच्या स्वरूपातच काकडीच सेवन करता. ज्यामुळे लोक कोणताही वेळी काकडीचे सेवन करतात. खरं तर रात्रीच्या वेळेस, काकडीचे सेवन करण्या टाळलं पाहिजे.

कारण काकडी पचायला बराच वेळ घेते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही रात्रीच्या वेळी काकडीचे सेवन केलं तर, त्याचा तुमच्या पचनक्रियेवर आणि झोपेवरही परिणाम होऊ शकतो.

हेच कारण आहे, ज्यामुळे बऱ्याचदा रात्रीचे जेवण लवकर करण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्हाला रात्रीच्या वेळी काकडीचे सेवन करायचं असेल तर, ते रात्री सात वाजण्या आधी किंवा झोपेच्या तीन ते चार तास आधी करावं. यामुळे काकडीला पचायला वेळ देखील मिळेल. त्यामुळे तुमचे नुकसानही होणार नाही.

काकडी खाणे कोणी टाळावे ?

काकडी खाण्याचे फायदे Benefits Of Eating Cucumber – जर आपले पोट खूपच संवेदनशील असेल आणि याच्या सेवनाने तुमची प्रकृती खूप लवकर खराब होत असेल, तर आपण काकडीच्या सेवनापासून दूर राहिलेलेच बरं.

पण, जर तुम्हाला काकडी खाण्याची आवड असेल किंवा तुम्ही कोणत्या प्रकारचा डायट फॉलो करत असाल तर, तुम्ही फक्त दुपारच्या जेवणाबरोबरच काकडीचे सेवन केलं पाहिजे. या व्यतिरिक्त काकडीचे अजिबात सेवन करू नका. अन्यथा ते ऍसिडिटीला कारणीभूत ठरू शकत.

2011 मधील एका संशोधनातील अभ्यासानुसार, काकडीमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असल्याने, अँटिरिंकल घटक म्हणून काकडीचा वापर केला जातो. या व्यतिरिक्त यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ऍसिड देखील असतं.

विटामिन सी मुळे नवीन पेशी तयार होण्यास मदत मिळते. फॉलिक ऍसिड आपल्या त्वचेचं प्रदूषणापासून संरक्षण करते.

आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये काकडीच्या सालीच्या रसाचा समावेश केल्याने, चेहऱ्यावरील मुरूम कमी होण्याचे मदत मिळते. काकडीची चव आणि त्याचे फायदे या दोन्ही गोष्टी आपल्याला परिचित आहेत.

पण काकडीचे चुकीच्या वेळेस सेवन केल्यास, बऱ्याच समस्या उद्भवू शकता. वाडवडीलांनी नेहमी असे म्हटले आहे की, कोणत्याही गोष्टीच अतिप्रमणात सेवन करणं वाईटच असतं. काकडी ही बहुगुणी आहे. त्यामुळे काकडी आपल्या आहारात, स्किन केअर, ब्युटी केअर मध्ये नक्की समाविष्ट करा, फक्त प्रमाणात.

स्किनसाठी काकडीचे फायदे

काकडी खाण्याचे फायदे Benefits Of Eating Cucumber – तुम्ही पण स्किन वर काकडी वापरता का ? स्किन वर काकडी वापरायची कशी ? योग्य पद्धत कोणती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खालील माहितीच्या मदतीने जाणून घेऊयात.

डोळ्याखालील डार्क सर्कल घालवण्यासाठी काकडी कशी वापरावी ?

काकडी खाण्याचे फायदे Benefits Of Eating Cucumber – काकडी तुमच्या डोळ्याखाली जी काळी वर्तुळ असतात ती लवकरात लवकर आणि अगदी सोप्या पद्धतीने घालवण्यासाठी मदत करतात. काकडी मध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे आणि त्याचबरोबर सिलिका यामुळे काळे डाग सुद्धा कमी होतात.

यासाठी तुम्हाला काय करायचं तर, काकडीचे दोन स्लाईस कापून, साधारण वीस मिनिटांसाठी डोळ्यांवरती ठेवून द्यायचं. तुम्हाला फरक नक्की जाणवेल किंवा तर तुम्ही काकडीच्या रसात कापूस भिजवून तुमच्या डोळ्यांवर सुद्धा ठेवू शकता. यामुळे देखील तुमची जी काळी वर्तुळ आहेत ती कमी झालेली तुम्हाला मिनिटात दिसून लागेल.

डोळ्यांवरील सूज कमी करण्यासाठी काकडी कशी वापरावी ?

झोपून उठल्यावर बऱ्याचदा तुमचे डोळे जर सुजल्यासारखे दिसत असतील तर, त्यासाठी काकडी हा उत्कृष्ट ऑप्शन ठरू शकतो. अशा सुजलेल्या डोळ्यांसाठी म्हणजेच पफी आईज साठी, काकडीचा वापर करावा.

कारण यामध्ये एस्कॉरिक ऍसिडचं प्रमाण जास्त असतं. जे डोळ्यांमधील वॉटर रिटेन्शन कमी करत आणि तुमच्या डोळ्यांवरील सूज आहे ती कमी करण्यासाठी खूप जास्त मदत होते. असं तुम्ही आठवड्यातून तीन वेळा केलं तरी, तुम्हाला आराम नक्कीच मिळू शकतो.

तुमच्या डोळ्यांवरील येणारी जी सूज आहे ती कमी होण्यासाठी, फक्त दोन काकडीचे स्लाईस डोळ्यांवरती ठेवून दहा ते पंधरा मिनिटे रिलॅक्स करा.

चेहऱ्यावरील ब्राऊन पॅचेस करण्यासाठी काकडी कशी वापरावी ?

काही जणांच्या चेहऱ्यावर हलक्या ब्राऊन रंगाचे पॅचेस असतात. जे बऱ्याचदा उन्हामुळे तुमच्या चेहऱ्यावर तयार होतात. हे डाग कमी करण्यासाठी काकडीचा उपयोग होतो. तुम्ही काकडीचा रस काढून, हा रस तुमच्या चेहऱ्यावरती आणि मानेवरती अप्लाय करा.

दहा ते पंधरा मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने तुम्ही धुवून टाका. तुम्ही हे दररोज जर केलं तर, चेहऱ्यावरील हे डार्क पॅचेस आहे ते कमी झालेले तुम्हाला दिसून येतील.

चेहऱ्यावर चमक येण्यासाठी काकडी कशी वापरावी ?

चेहऱ्यावर चमक आणणे हेच काकडीचे सर्वात मोठे वैशिष्ट आहे. काकडीच्या रसामध्ये, लिंबाचा रस मिक्स करून चेहऱ्यावरती अप्लाय करा.

चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी, पिगमेंटेशनची समस्या असेल, खड्डे असतील आणि चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी, हा उपाय नक्कीच मदत करतो. पिगमेंटेशन आणि खड्डे दूर सुद्धा लवकर होतात. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर खूप चांगली चमक टिकून सुद्धा राहते.

सनबर्नचा त्रास झाल्यास काकडी कशी वापरावी ?

सनबर्नचा त्रास होत असेल तर, नक्की काकडी वापरा. तुम्ही जास्त वेळ उन्हामध्ये राहत असाल आणि सनबर्न म्हणजेच सूर्यकिरणांमुळे तुमच्या त्वचेवर होणाऱ्या डागांमुळे, त्रस्त असाल तर काकडीचा तुम्ही नक्कीच वापर करा.

यामुळे नक्कीच या त्रासापासून सुटका मिळण्यासाठी मदत होते. काकडीचा थंडपणा तुमच्या त्वचेला जास्त थंडावा मिळवून देण्यासाठी मदत करतात. तुम्ही काकडीचे स्लाईस अशावेळी तुमच्या त्वचेवर ठेवून ते चट्टे घालून सुद्धा शकता.

ओपन पोअर्ससाठी काकडी कशी ठरते फायदेशीर ?

काकडी एक उत्तम टोनर म्हणून सुद्धा वापरल जाऊ शकत. तुम्हाला हवं असेल तर तुमच्या ओपन पोअर्ससाठी काकडीच्या रसात एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा मध, एक चमचा कोरफड जेल किंवा तर टोमॅटो पल्प मिक्स करून, एकत्र तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करा. दहा मिनिटांनी ते तुम्ही वॉश करून घ्या.

यामुळे तुमचे ओपन पोअर्स लवकरात लवकर टाइट होतील, बंद होतील, याने तुमच्या स्कीनला नक्कीच खूप जास्त फायदा होईल. जर काकडी आपण स्किन वरती युज करतोय तर, वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स वरती फायदा मिळू शकतो.

विविध आजारांसाठी बहुपयोगी काकडी

कोशिंबीर किंवा सलाड मध्ये, एक महत्त्वाचा पदार्थ असतो तो म्हणजे काकडी आणि या काकडीमुळे तुमच्या शरीराला अनेक फायदे होतात.

 • काकडीमुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. जर तुम्हाला पाणी पिण्यासाठी वेळ मिळत नसेल तर, तुम्ही काकडी खाऊ शकता. यामध्ये ९० % पाणी असतं. काकडीचे नियमित सेवन केल्यास, शरीरातील पाण्याची मात्रा पर्याप्त राहते. त्यामुळे पोटाचे आजार होत नाही. पचनक्रिया व्यवस्थित होते.
 • काकडीच्या सेवनाने एका सामान्य व्यक्तीला दररोज आवश्यक असलेले दहा टक्के विटामिन सी मिळते. जर तुम्हाला काकडी खाण्यामध्ये आवडत नसेल तर, त्याचे स्लाईस करून डोळ्यावर ठेवा. त्यामुळे डोळ्याखाली झालेले डार्क सर्कल नष्ट होतील.
 • दररोज काकडीच्या रसाचे सेवन केल्यामुळे, शरीरातील इन्सुलिन तयार करण्याची गती नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
 • काकडीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. ज्यामुळे हाडही मजबूत होतात. काकडीचे सेवन केल्यास शरीरातील तापमान नियंत्रित राहतं. उन्हामुळे त्वचा काळी पडली असेल तर, काकडी लावल्यास त्वचा तजेलदार होईल.
 • काकडीच्या सेवनाने मुतखड्याची समस्या दूर होण्यास मदत होते. काकडीमध्ये असलेलं पाणी तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन असतात. शरीराला जेवढ्या प्रमाणामध्ये विटामिन ची आवश्यकता असते, काकडी ती पूर्ण करू शकते. काकडी मधील ए, बी आणि सी विटामिन मुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.
 • काकडीमध्ये, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सिलिकॉनचा स्तर उच्च असतो. त्यामुळे जगभरातील स्पा केंद्रांमध्ये काकडीवर आधारित उपचाराला महत्व दिले जात.
 • काकडीचा रस काढून चेहरा, हात, पायांवर लेप लावल्यास त्वचा कोमल होते. सौंदर्यामध्ये वृद्धी होते. काकडीच्या रसामध्ये थोडी साखर मिसळून हा रस प्यायल्यास लघवी साफ होते.
 • जेवणासोबत काकडीचे सेवन केल्यास अजीर्ण होत नाही. काकडीचा रस उच्च आणि कमी रक्तदाबांमध्ये पिणं लाभदायक ठरतं.
 • काकडीच्या सेवनाने डायबिटीस आणि कोलेस्ट्रॉलची मात्रा सामान्य राहते. त्याच्या सेवनाने इन्सुलिनचं प्रमाणही नियंत्रित राहतं.
 • काकडीचे नियमित सेवनाने, केस लांब होण्यास मदत होते. यामध्ये उपलब्ध असलेली सिलिकॉन आणि सल्फर तत्व केस वाढवण्यास सहाय्यक ठरतात.

काकडीच्या बियांचे गुणकारी फायदे कोणते ?

कोणताही ऋतू असला तरी देखील बाजारात गेल्यावर, काकडी सहज उपलब्ध होते. साधारणपणे काकडी, कोशिंबीर सॅलड किंवा काकडीचा रस यासाठीच वापरली जाते. मात्र काकडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. काकडी मुळे शरीराला थंडावा मिळतो.

तसेच काकडीच्या बिया देखील तितक्याच फायदेशीर आहेत. अनेक ठिकाणी काकडीच्या बिया वाळवून, त्यांचा मगज म्हणून वापर केला जातो. त्यामुळे काकडीच्या बियांचे फायदे कोणते आहेत ते पाहूया.

 • मासिक पाळीत सतत पोट दुखणे किंवा जास्त होणारा रक्तस्त्राव, काकडी खाल्ल्याने कमी होतो.
 • लघवी कमी होणे किंवा अडथळा निर्माण होणे, यावर काकडीच्या बिया गुणकारी असतात.
 • काकडी खाल्ल्याने त्वचेचा रंग सुधारतो.
 • आमाशय, यकृत, पांथरी येथील पित्त कमी करतात.
 • घशात सारखी कोरड पडत असेल, तर काकडीच्या बिया वाटून, खाव्यात.
 • ताप येत असल्यास, काकडीच्या बिया, खडीसाखर, एकत्र वाटून पाण्यासोबत घ्यावे.
 • काकडी खाल्ल्याने वजन कमी होते.
 • काकडी खाल्ल्याने पित्त कमी होते.
 • त्वचेवरील डाग मुरूम कमी होतात.
 • उन्हाळ्यात होणाऱ्या शारीरिक तक्रारी कमी होतात.

FAQ

१. चेहऱ्यावर चमक येण्यासाठी काकडी कशी वापरावी ?

चेहऱ्यावर चमक आणणे हेच काकडीचे सर्वात मोठे वैशिष्ट आहे. काकडीच्या रसामध्ये, लिंबाचा रस मिक्स करून चेहऱ्यावरती अप्लाय करा. चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी, पिगमेंटेशनची समस्या असेल, खड्डे असतील आणि चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी, हा उपाय नक्कीच मदत करतो.
पिगमेंटेशन आणि खड्डे दूर सुद्धा लवकर होतात. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर खूप चांगली चमक टिकून सुद्धा राहते.

२. काकडीच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम काय आहेत ?

काकडी हा अनेक गुणांचा खजिना असला तरीही, जर तुम्ही काकडीचे जास्त प्रमाणात सेवन केलं तर, ती पोट फुगण्यासारख्या अनेक समस्यांना जन्म देऊ शकते. कारण काकडीत ९५% पाणी. इतकच नाही तर काकडीच्या बियांमध्ये कुकुर बिटन नावाचा घटक आढळतो.
या घटकामुळे आपल्याला अधिक वेळा लघुशंका होणं सुरू होतं, ज्यामुळे आपल्या शरीरातून लिक्विड किंवा द्रव्य पदार्थ अधिक प्रमाणात बाहेर पडू लागतात. असे झाल्याने शरीरातील इलेक्ट्रॉलाईट संतुलन बिघडू लागतं.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास काकडी खाण्याचे फायदे सांगितले आहे. हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment