गुळवेल माहिती मराठी Gulvel In Marathi

२०२० या सालामध्ये एका आयुर्वेदिक वनस्पतीची प्रचंड प्रमाणामध्ये मागणी वाढली आणि त्याचा वापर सुद्धा लोक सर्रास करू लागलेले आहेत. ती वनस्पती म्हणजे “गुळवेल”.

ज्याला संस्कृत मध्ये अमृता किंवा गडूची असं नाव आहे, तर हिंदीमध्ये याला गिलोय असं नाव आहे. या वनस्पतीची मागणी एवढी प्रमाणामध्ये का वाढली ? ही वनस्पती खरच सर्वांना वापरता येते का ? तर निश्चित नाही.

असे सर्वसामान्य आजार आहे जे जास्तीत जास्त लोकांमध्ये आढळतात, अशा व्यक्तींनी ही वेल वापरायची नसते. असे कोणते तीन आजार आहेत ? त्याचबरोबर ही वेल ताजी असेल तर कशी वापरावी ? या वनस्पतीची गोळी असेल तर त्याचा वापर कसा करावा ?

या वनस्पतीचा चूर्ण असेल तर त्याचा वापर कसा करावा ? किंवा या वनस्पतीचे लिक्विड म्हणजे या वनस्पतीचा ज्यूस असेल तर त्याचा वापर कसा करावा ? असे एक ना अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहेत.

कारण हे अत्यंत महत्त्वाचा आहे, चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या वेळेला, चुकीच्या प्रमाणामध्ये Gulvel याचा वापर करणे, हे आरोग्यासाठी घातक सुद्धा असू शकतं.

म्हणून आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास या वनस्पतीची म्हणजेच गुळवेलाची संपूर्ण माहिती देणार आहे.  हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत वाचा.

Table of Contents

गुळवेल माहिती मराठी Gulvel In Marathi

गुळवेल माहिती मराठी

ही आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे. या वनस्पतीने शरीरातील पांढऱ्या पेशींची संख्या वाढते. आता तुम्हाला माहिती आहे, पांढऱ्या पेशी या शरीरामधील सैनिकी पेशी असतात.

ज्या शरीरामधील झालेलं संक्रमण किंवा व्हायरल इन्फेक्शन असेल, त्याला मारण्याचे काम करतात. म्हणून ही वेल शरीरातील  प्रतिकार शक्ती वाढते.

म्हणून, वृद्ध किंवा लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गुळवेलाचा वापर करा असं तुम्हाला सांगितलेला आहे, म्हणून या वेलाचा वापर हे सर्वजण करत आहेत.

हे वाचा –

गुळवेल म्हणजे नेमके काय ?

गुळवेल

ही वेल एक वेलवर्गी वनस्पती, परजीवी वनस्पती आहे. जी साधारणता आंबा किंवा कडुनिंबाच्या झाडावर वाढते. परंतु आंब्याच्या झाडावर वाढणाऱ्या वनस्पतीचे गुणधर्म हे वेगळे असतात आणि कडुनिंबाच्या अक्षावर वाढणाऱ्या या वेलीचे गुणधर्म हे वेगळे असतात.

आयुर्वेदामध्ये कडुनिंबावर वाढणारी जी वेल आहे तिला सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि या वनस्पतीचा वापर हा आपल्याला करायला सांगितला जातो.

गुळवेल मध्ये असणारे घटक

ग्लुकोसाइडमॅग्नेशियम
अँटी इन्फ्लेमेट्रीकॅल्शियम
झिंकअँटी ऑक्सिडेंट्स
कॉपरफॉस्फोरस

हे घटक आपल्याला आरोग्यासाठी उपयुक्त असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मध्ये वाढ होऊन इम्युनोमॉड्युलेटरी गुणधर्मामुळे रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.

गुळवेल वनस्पतीचे आयुर्वेदामधील महत्व

Gulvel In Marathi

या वनस्पतीचे आयुर्वेदामध्ये महत्व अगदी विस्तृतपणे सांगितले आहे. वेल हि वनस्पती कफ नाशक आहे, अलर्जी प्रतिबंधक आहे, वातनाशक आहे, ताण प्रतिबंधक आहे, सूजनाशक आहे, त्याचबरोबर ही वनस्पती मलेरिया प्रतिबंधक आहे आणि या वनस्पतीचा वापर करणाऱ्या व्यक्तीला कधीही मधुमेह होत नाही.

यकृत संरक्षक ही वनस्पती आहे. या वनस्पतीमध्ये अँटिऑक्सिडंट आहेत. रोग प्रतिकारशक्तीवर्धक ही वनस्पती आहे. असे अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. ज्याचा वापर हा शरीरामधील त्रिदोष संपवण्यासाठी म्हणजे वात कफ आणि पित्त हे दोष व्यवस्थित ठेवण्यासाठी केला जातो.

गुळवेलचा वापर कसा करावा ?

Gulvel

गुळवेलाची जर तुम्ही ताजी वेल आणलेली असेल तर ;

 • बऱ्याच ठिकाणी ही ताजी वेल मिळते. हि सर्वत्र मिळणारी ही वनस्पती आहे आणि ही ताजी वेल असेल तर, या वनस्पतीचा वापर कसा करावा ? हे ही खूप महत्त्वाच आहे. ताज्यावेलीचा वापर करते वेळी, एक इंच तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि डायरेक्ट चावून खायचा आहे. ताज्या वेलीचा वापर आपण चावून खाऊन जर केला तर, त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म जे असतात ते अनेक पटीने आपल्याला चांगल्या रीतीने मिळतात.
 • सकाळी उपाशीपोटी म्हणजे तोंड न धुता सकाळच्या लाळे बरोबर जर हि वेल चावून खाल्ला तर, सकाळची लाळ आणि त्या गुळवेलचे आयुर्वेदिक गुणधर्म असा दुहेरी फायदा आपल्याला होतो आणि त्याचे अनेक पटीने चांगले गुणधर्म आपल्याला मिळतात.

गुळवेलाचे चूर्ण आणलेल असेल तर, त्याचा वापर कसा करायचा आहे ;

 • जर तुमच्याकडे वाळलेली वेल असेल तर किंवा ताजी वेल वाळवून सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता. एक चमचाभर चूर्ण आपल्याला घ्यायचे आहे किंवा एक इंच वाळलेला तुकडा आपल्याला घ्यायचा आहे. एक ग्लास पाण्यामध्ये रात्री झोपताना तो भिजत घालायचा आहे.
 • रात्रभर त्या पाण्यामध्ये भिजून द्यायचा आहे आणि सकाळी उठल्याबरोबर त्याच पाण्यामध्ये ही Gulvel चूर्ण किंवा एक इंच वाळलेल्या या वेलीचा तुकडा उकळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ते थंड झाल्यानंतर. त्याचा वापर करायचा आहे.

जर तुमच्याकडे गुळवेलाची गोळी असेल तर ;

बाजारामध्ये या वेलाची गोळी उपलब्ध झालेली आहेत, तर ही वेलाची गोळी याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता.

त्याचा वापर असा करायचा आहे की, वयानुरूप एक किंवा दोन गोळ्या आपल्याला घ्यायची आहे, सकाळी उपाशीपोटी आणि त्यानंतर थोडसं कोमट पाणी प्यायचं. साधं पाणी न पिता, कोमट पाणी प्यायचे. अशा पद्धतीने या वेलाच्या गोळीचा सुद्धा वापर करता येतो.

जर तुमच्याकडे गुळवेलीचे सत्व असेल तर, त्याचा वापर आपल्याला असा करायचा;

हरभऱ्याच्या डाळी एवढा आपल्याला या वेलाचे सत्व घ्यायचे आहे. एक कप दुधामध्ये टाकून ते घ्यायचा आहे.

आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी या वेलाचा ज्यूस किंवा या वेलाचे लिक्विड फॉर्म मधील जे सत्व आहे ते मिळतं तर, तुम्ही या वेलाचे लिक्विड ज्यूस अजिबात वापर करू नका, कारण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरलेले असतात.

ज्यामुळे या वेलाचे जे आयुर्वेदिक गुणधर्म आहे, ते पूर्णपणे नष्ट झालेले असतात. कुठलाही सकारात्मक चांगला परिणाम आपल्याला मिळत नाही.

शरीरतील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कुठल्या पद्धतीचा गुळवेल तुम्हाला घेता येतो ?

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही या चार-पाच पद्धती मधल्या कुठल्याही पद्धतीचा Gulvel घेऊ शकता.

फक्त या वेलाचा ज्यूस सोडून, बाकी सर्व पद्धतीचा Gulvel हा तुम्ही वापरू शकता.

अनेक प्रकारच्या आजारासाठी गुळवेल उपयुक्त

भूक मंदावली असेल तर ;

ही वेल फक्त शरीरामधील प्रतिकार शक्तीच वाढवत नाही तर, अनेक प्रकारचे आजार यामध्ये जर तुम्हाला भूक लागत नसेल तर, ताज्या गुळवेल याचा वापर करायचा. एक इंच तुकडा सकाळी चावून खायचा.

हा तुकडा सुरवातीला कडू लागतो, नंतर चावत चावत रस गळत गेल्यानंतर, तो गोड लागायला सुरुवात होते. जर तुम्ही सहा ते सात दिवस केलं तर, शरीरामधून पित्त प्रवृत्ती पूर्णपणे नष्ट होते. भूक व्यवस्थित लागते. पचनक्रिया तुमची चांगली होते.

सर्दी किंवा एलर्जी असेल ;

जर तुम्हाला सर्दी किंवा एलर्जी असेल, सतत सर्दी होण्याची समस्या असेल तर, तुम्ही या वेलीचा काढा घेतला पाहिजे. या वेलाचा काढा सर्दी किंवा एलर्जीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

ताज्या Gulvel चा वापर न करता किंवा गोळीचा वापर न करता, गुळवेलचा काढा हा कोमट असताना जर घेतला तर, एलर्जी किंवा सर्दीची समस्या पूर्णपणे नष्ट होते.

ताप आल्यास ;

ताप आल्यास किंवा तापाचा त्रास असेल तर, सतत गरम लागत असेल, अशा व्यक्तींना सुद्धा या वेलाचा काढाच घेतला पाहिजे.

मधुमेह असलेल्या ;

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी उठल्याबरोबर ताज्या Gulvel चा एक इंच तुकडा चावून खाल्ला पाहिजे. २१ दिवसापर्यंत.

शरीरामधून तुमच्या शुगरचं प्रमाण पूर्णपणे निघून जातं, एकरूप संरक्षक असल्यामुळे इन्सुलिनची निर्मिती व्हायला लागते आणि त्यामुळे डायबिटीसचा जो त्रास आहे तो पूर्णपणे निघून जातो.

गुळवेलचा वापर कोणी करावा व कोणी करू नये ?

हि अतिशय फायदेशीर व आयुर्वेदिक वनस्पती असली तरी, या वनस्पतीचा वापर हा कोणत्या व्यक्तीने करू नये, कोणत्या व्यक्तीने करावा हे सुद्धा तितकेच महत्त्वाचा आहे.

अशा कोणत्या व्यक्ती आहे ज्यांना गुळवेलाचा वापर अजिबात करता येत नाही, हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याच जणांकडून या चुका होतात आणि गुळवेलाचा सर्रास वापर केला जातो. त्यामुळे त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होतो.

 • जे सर्वसामान्य कॉमन आजार आहे जसे कि, बऱ्याच लोकांमध्ये आढळतो की, लो बीपीचा त्रास आहे. अशा व्यक्तींनी Gulvel चे सेवन करू नये किंवा फार कमी प्रमाणामध्ये Gulvel चे सेवन करावं. कारण या वेलामुळे बीपी हा आणखी लो होतो. हाय बीपी आहे, अशा व्यक्ती याचा वापर करू शकतात. परंतु ज्यांना लो बीपीचा त्रास आहे. त्यांनी या वेलाचा वापर हा करू नये किंवा अत्यंत कमी प्रमाणामध्ये करावा.
 • ज्या व्यक्तींना रूमेटाईट अर्थरायटीचा त्रास आहे, या व्यक्तींनी या वेलाचे सेवन करू नये. यामुळे रूमेटाईट अर्थरायटीचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि त्याचा त्रास होतो.
 • त्याचबरोबर ज्या प्रेग्नेंट लेडी आहे, गरोदर माता आहेत, त्यांनी सुद्धा Gulvel चे कमी प्रमाणामध्ये सेवन केलं पाहिजे.
 • त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की, Gulvel मुळे तुमची प्रतिकार शक्ती वाढते. परंतु जास्त रोगप्रतिकारशक्ती वाढणे हे सुद्धा आरोग्यासाठी चांगलं नसतं. आजारांची भीती यामुळे अधिक प्रमाणामध्ये वाढते. जास्त रोगप्रतिकार शक्ती सुद्धा नुकसानदायक असते. त्यामुळे या वेलाचा वापर हा कमी प्रमाणामध्ये आणि सांगितलेल्या दिवसा इतकाच केला पाहिजे.
 • जास्त प्रमाणामध्ये म्हणजे रोज Gulvel चा वापर करणे, हे तसे हितकारक नसतं. जास्तीत जास्त तुम्ही २१ दिवसांपर्यंत या वेलाचा वापर करू शकता. त्यानंतर तुम्हाला दहा ते अकरा दिवसाचा गॅप देणे, हे अत्यंत महत्त्वाचा असतं. या वेलाचा वापर हा सांगितलेल्या पद्धतीने आणि सांगितलेल्या व्यक्तींनी जर टाळा तर Gulvel आयुर्वेदामधलं अमृत आहे. त्याचा वापर तुम्ही अवश्य करा. परंतु सांगितलेल्या पद्धतीने वापर करा. तुम्हाला त्याचे जबरदस्त फायदे मिळतील.

गुळवेलाचे फायदे

 • सर्व प्रकारच्या तापावर परिणामकारक ठरणारी अशी ती वनस्पती ही वेल, म्हणजेच गुडूची. संस्कृत भाषेमध्ये ह्याला अमृता असं म्हटलं जातं आणि खरोखरच ती अमृता सारखी गुणकारी ही आहे. ती ज्वरनाशक वनस्पती म्हणून ओळखली जाते. कोणत्याही प्रकारच्या तापावर ती परिणामकारक ठरते.
 • डेंग्यू, मलेरिया, निमोनिया, फ्लू, गोवर, कांजण्या, टायफाईड, कावीळ, या सर्वांवरती खूपच परिणामकारक ठरते. त्याचबरोबर ती संधिवात, आमवात, त्वचा विकार, रक्त विकार, अशक्तपणा, त्यावर सुद्धा खूपच उपयुक्त ठरते.
 • या वेलाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, असते. जर मलेरिया झाला असेल तर, ही वेल, नागरमोथा, सुंठ, धने आणि कडुलिंबाची पानं हे समप्रमाणात एकत्र करावेत आणि रात्री पाण्यात भिजत घालावी. सकाळी ते पाणी गाळून त्यात खडीसाखर घालून, सकाळ-संध्याकाळ घेतल्याने पंधरा दिवसातच मलेरिया अंगातून साफ निघून जातो.
 • जर डेंग्यू झाला असेल तर, ही वेल, तुळस, काळामिरी आणि आलं हे समप्रमाणात घेऊन, त्याचा काढा बनवावा आणि हा काढा दिवसातून तीन वेळा घ्यावा त्यांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. इन्फेक्शन पासून आपल्या बचाव होईल आणि आपल्याला आराम मिळेल.
 • जर जॉन्डीस किंवा कावीळ झाली असेल तर, या वेलीचा रस काढून त्यात खडीसाखर घालून, दिवसातून दोन वेळा घेतल्याने, कावीळ लवकर बरी होते.
 • जर टीबी झाला असेल तर, गुळवेलीच्या सत्वाने निश्चितच आराम मिळतो. गुळवेलीच सत्व, तूप, लोणी आणि खडीसाखर एकत्रित करून, दिवसातून दोन वेळा घेतल्याने फायदा जाणवतो. त्यामुळे अशक्तपणा जातो आणि भूकही चांगली लागून, वजन वाढण्यासही मदत होते.
 • संधिवात आणि आमवातावर सुद्धा या वेलीचा आणि सुंठीचा काढा खूपच उपयुक्त ठरतो. एका अंगठ्या एवढा या वेलीचा तुकडा आणि एक तुकडा सुंठीचा एकत्र करून हे ठेचून एक लिटर पाण्यामध्ये घालून ते पाणी चांगलं उकळावं आणि मग ते आटल्यावर दिवसातून दोन वेळा घेतल्याने, आराम मिळतो.
 • आपण ही वेल किंवा गुडूचीच चूर्ण सुद्धा वापरू शकतो. एक मोठा चमचा चूर्ण, दोन कप पाण्यात घालून ते पाणी चांगलं उकळावं मग ते आठून अर्ध करावं हे पाणी दिवसभरामध्ये थोड्या थोड्या प्रमाणाने घेतल्याने अनेक आजारांपासून आपलं रक्षण होऊ शकतं.
 • लघवीचे विकार लिव्हर सुद्धा खूपच उपयुक्त ठरतं आणि आपल्या लिव्हरला डिटॉक्स करतात. ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून, अनेक आजारांपासून आपलं रक्षण करतं तर मग कुठचा ताप आला असेल किंवा कुठल्याही प्रकारचा आजार झाला असेल तर, या वेलीचा काढा घ्या आणि आपली तब्येत सांभाळा.

गुळवेल आणि विषारी, नेमके खरे काय ?

करोनाच्या काळामध्ये गुगल वर सगळ्यात जास्त सर्च केली गेलेली वनस्पती म्हणजे गुळवेल. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये डिमांड वाढलेली वनस्पती म्हणजेच Gulvel.

हे नक्की काय आहे आणि तिचे उपयोग काय तर, त्यातच आता एक बातमी आली की, या वेलीचे विषारी परिणाम आढळले. तर हे खरं आहे का ? असे विषारी परिणाम का झाले किंवा होतात का ? जे जाणून घेऊयात.

ह्या या वेलीचा कुठल्या कुठल्या आजारांमध्ये उपयोग होतो. तर काही विशिष्ट प्रकारच्या त्वचारोगांमध्ये सुद्धा ही वापरली जाते. त्याचप्रमाणे संधिवात, विशेषतः आमवात ज्यात सांध्यांना सूज येते, त्याच्यामध्येही उत्कृष्ट काम करते.

जुनाट आजार म्हणजे विषमज्वर, दाह व मूत्र संबंधित विकार, त्याचप्रमाणे पांडू, मंदाकिनी, वांती, मुळव्याध, इत्यादी अनेक आजारांमध्ये ही उपयुक्त ठरते. गुळवेल हि रसायन काम कारणारी वनस्पती आहे.

आयुर्वेदानुसार, रसायन म्हणजे त्याला आपल्याला मॉडर्न लँग्वेज मध्ये म्हणता येईल की, अँटिऑक्सिडेंट प्रॉपर्टी असलेली वनस्पती, म्हणजेच कि ती पेशींच पुनर्जीवन करते किंवा त्यांना नवचैतन्य प्राप्त करून देते.

म्हणूनच पूर्ण शरीरालाच नवचैतन्य प्राप्त करून देणारी, चिरतरुण राखणारी, काही द्रव्य किंवा काही वनस्पती आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. या सगळ्यांचा रसायन या वर्गामध्ये समावेश केला जातो आणि त्याच्यामध्ये मग अमृता रसायन आहे आम्लिका रसायन आहे, यष्टीमधुर रसायन आहे, सांगितले आहे तर त्याच्यामध्ये ही अमृता म्हणजे ही वेल अतिशय सुंदर काम करणारी सांगितलेली आहे.

हि वेलीच्या स्वरुपाची असते, हि बऱ्याच ठिकाणी आढळते. बऱ्याच घरांच्या कुंपणावर, बंगल्याच्या कुंपणावर किंवा बागांच्या कुंपणावर आढळते.

हृदयाच्या आकाराची अशी या वेलाची पाने असतात. ओळखायला अतिशय सोपी आहे. त्याचप्रमाणे हिला हिरवी अशी फळ येतात. म्हणजे कच्ची असताना ती हिरवी असतात आणि पिकल्यानंतर त्याची सुंदर लाल अशी फळ तयार होतात.

औषधांमध्ये या वेलीचे खोड आणि तिचं मूळ हे उपयुक्त आहे. जेव्हा ती सुरुवातीच्या काळामध्ये ही नाजूक असते तर, वेलींप्रमाणे नंतर तिचा खोड आहे ते मोठं होत जात आणि औषधांमध्ये असं जाड झालेलं खोड आहे ते वापरायचं असतं.

या वेल ही आयुर्वेदामध्ये किंवा औषधांमध्ये वापरण्यास श्रेष्ठ सांगितलेली आहे. गुळवेल हि घरात कुंडीत किंवा बागेत लावून मुळीच मिळत नाही ती मिळते जंगलांमध्ये, अशी जंगली गुळवेल ही औषधांमध्ये श्रेष्ठ सांगितलेली आहे. कडुनिंबाच्या झाडावरील ही वेल औषधी गुणधर्माच्या दृष्टीने सगळ्यात श्रेष्ठ आहे.

कडूनिंबाच्या झाडावर जरी नसली तरी, आंबा उंबर अशा सद्गुनी झाडांवर वाढलेली ही वेल असावी. आताच एक बातमी आली की, या वेलीचे विषारी परिणाम झाले.

सगळ्यात पहिले तर हे समजून घ्या की, आयुर्वेदातील महान महर्षी चरक महर्षींनी या वेलीचा वयस्थापन या गटामध्ये समावेश केलेला आहे. वयस्थापन म्हणजे चिरतरुण राखणाऱ्या वनस्पतींचा गट, त्याच्यामध्ये झाला समावेश केलेला आहे.

आयुर्वेदात अमृततुल्य असे तिचे गुणधर्म सांगितलेले आहे आणि त्याही पुढे ५००० वर्षांपासून आपली ही प्राचीन भव्यतम परंपरा भारताची चालू आहे. वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्या, वैद्यांना आतापर्यंत ५००० वर्षांमध्ये एकदा तरी हा गुळवेलीचा विषारी परिणाम दिसून आले नाही.

बरोबर आहेत ते तसेच चालणे काढतात तसेच पाण्यामध्ये उकळायला सांगत आहेत आणि ते प्यायला सांगत आहेत पहिले तर साल काढली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे गुळवेल चिरून ठेवली आणि थोड्यावेळ ती तशीच ठेवली तर तिचे कांड हे काळे पडतात.

आणि सफरचंद नाही का काढून ठेवलं आणि तसेच ठेवलं तर ते बाहेरच्या वातावरणाचा परिणाम होऊन त्याच्यामुळे औषधी निर्माण औषधाचे गुणधर्म याचे एक शास्त्र आहे तुम्ही स्वतःच्या मनाने जर असेल प्रयोग करत राहिलात तर मात्र त्याचे दुष्परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.

FAQ

१. गुळवेल म्हणजे काय ?

गुळवेल ही एक वेलवर्गी वनस्पती, परजीवी वनस्पती आहे. जी साधारणता आंबा किंवा कडुनिंबाच्या झाडावर वाढते. परंतु आंब्याच्या झाडावर वाढणाऱ्या वनस्पतीचे गुणधर्म हे वेगळे असतात आणि कडुनिंबाच्या अक्षावर वाढणाऱ्या गुळवेलीचे गुणधर्म हे वेगळे असतात. आयुर्वेदामध्ये कडुनिंबावर वाढणारी जी गुळवेल आहे तिला सर्वश्रेष्ठ मानला जातात आणि या वनस्पतीचा वापर हा आपल्याला करायला सांगितला जातो.

२. गुळवेलीचे फायदे काय आहेत ?

डेंग्यू, मलेरिया, निमोनिया, फ्लू, गोवर, कांजण्या, टायफाईड, कावीळ, या सर्वांवरती खूपच परिणामकारक ठरते. त्याचबरोबर ती संधिवात, आमवात, त्वचा विकार, रक्त विकार, अशक्तपणा, त्यावर सुद्धा खूपच उपयुक्त ठरते.
गुळवेलाच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, असते. जर मलेरिया झाला असेल तर, गुळवेल, नागरमोथा, सुंठ, धने आणि कडुलिंबाची पानं हे समप्रमाणात एकत्र करावेत आणि रात्री पाण्यात भिजत घालावी. सकाळी ते पाणी गाळून त्यात खडीसाखर घालून, सकाळ-संध्याकाळ घेतल्याने पंधरा दिवसातच मलेरिया अंगातून साफ निघून जातो.
जर डेंग्यू झाला असेल तर, गुळवेल, तुळस, काळामिरी आणि आलं हे समप्रमाणात घेऊन, त्याचा काढा बनवावा आणि हा काढा दिवसातून तीन वेळा घ्यावा त्यांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. इन्फेक्शन पासून आपल्या बचाव होईल आणि आपल्याला आराम मिळेल.
जर जॉन्डीस किंवा कावीळ झाली असेल तर, गुळवेलीचा रस काढून त्यात खडीसाखर घालून, दिवसातून दोन वेळा घेतल्याने, कावीळ लवकर बरी होते.
जर टीबी झाला असेल तर, गुळवेलीच्या सत्वाने निश्चितच आराम मिळतो. गुळवेलीच सत्व, तूप, लोणी आणि खडीसाखर एकत्रित करून, दिवसातून दोन वेळा घेतल्याने फायदा जाणवतो.

३. गुळवेलीचे आयुर्वेदिक गुणधर्म काय आहे ?

गुळवेल वनस्पतीचे आयुर्वेदामध्ये महत्व अगदी विस्तृत पणे सांगितले आहे. गुळवेल हि वनस्पती कफ नाशक आहे, अलर्जी प्रतिबंधक आहे, वातनाशक आहे, ताण प्रतिबंधक आहे, सूजनाशक आहे, त्याचबरोबर ही वनस्पती मलेरिया प्रतिबंधक आहे आणि या वनस्पतीचा वापर करणाऱ्या व्यक्तीला कधीही मधुमेह होत नाही. यकृत संरक्षक ही वनस्पती आहे. या वनस्पतीमध्ये अँटिऑक्सिडंट आहेत. रोग प्रतिकारशक्तीवर्धक ही वनस्पती आहे. असे अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. ज्याचा वापर हा शरीरामधील त्रिदोष संपवण्यासाठी म्हणजे वात कफ आणि पित्त हे दोष व्यवस्थित ठेवण्यासाठी केला जातो.

४. गुळवेलचा वापर कोणी करू नये ?

ज्या व्यक्तींना रूमेटाईट अर्थरायटीचा त्रास आहे, याव्यक्तींनी गुळवेलाच सेवन करू नये. यामुळे रूमेटाईट अर्थरायटीचा त्रास हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि त्याचा त्रास होतो.
त्याचबरोबर ज्या प्रेग्नेंट लेडी आहे, गरोदर माता आहेत, त्यांनी सुद्धा गुळवेलाच कमी प्रमाणामध्ये सेवन केलं पाहिजे.

५. मधुमेह झाल्यास गुळवेल कशी उपयोगी पडते ?

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी उठल्याबरोबर ताज्या गुळवेलाचा एक इंच तुकडा चावून खाल्ला पाहिजे. २१ दिवसापर्यंत. शरीरामधून तुमच्या शुगरचं प्रमाण पूर्णपणे निघून जातं, एकरूप संरक्षक असल्यामुळे इन्सुलिनची निर्मिती व्हायला लागते आणि त्यामुळे डायबिटीसचा जो त्रास आहे तो पूर्णपणे निघून जातो.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास गुळवेलची संपूर्ण माहिती दिली आहे; हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment