चिया सीड्स Chia Seeds In Marathi

मित्रांनो आजकालच्या जगात फिट राहण्याकरिता, आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाते. यासाठी वर्कआउट व व्यायाम तर केले जातात, पण त्याच बरोबर आपल्या आहाराला देखील महत्व दिले जाते.

ज्यासाठी आहारात अशा पदार्थांचा समावेश केला जातो, ज्यांनी आपल्या शरीराला जास्तीत जास्त पोषण मिळेल, तर असाच एक पौष्टिक पदार्थ आहे चिया सीड्स.

परंतु या सीड्स म्हणजे नक्की काय ? कोणत्या वनस्पती पासून हे तयार होतं ? याचे उत्पादन जगातील कोणत्या भागात केले जाते? या सीड्स खाल्याने आपल्या शरीराला काय फायदे आहेत ? व हे खाल्ल्याने आपल्या शरीराला काही तोटे आहेत का ?

या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

चिया सीड्स Chia Seeds In Marathi

चिया सीड्स म्हणजे नक्की काय ?

या सीड्स या भारतातल्या नसून, ह्या अमेरिका किंवा मेक्सिकोतील वनस्पती साल्विया हिस्पैनिका या फुलांच्या झाडापासून बनलेले एक बी आहे आणि पुदिना या प्रजातीमधून ही बी आढळून येते.

साल्विया हिस्पैनिका हे चिया सीड्सचे सायंटिफिक नाव आहे. ह्या बिया ज्या आहेत ह्या भारतात खूप आढळून येतात. या सीड्स व सब्जा सीड्स बद्दल लोकांमध्ये कन्फ्युजन आहे. कारण ह्या बिया साधारण एकसारख्या दिसतात.

त्यामुळे खूप लोकांना कन्फ्युजन आहे की, चिया सीड्स कोणते आहेत व सब्जा सीड्स कोणते आहे ? चिया सीड्स व सब्जा सीड्स एकच नसून ह्या दोन्ही बिया वेगवेगळ्या आहे.

गेले चार पाच वर्ष वेट लॉस इंडस्ट्री मध्ये किंवा वेट लॉस कॅटेगिरी मध्ये चिया सीड्सना खूप जास्त प्रसिद्धी मिळाली आहे आणि खूप लोक आता घेत आहे.

या सीड्स या भारतातल्या नसून या अमेरिकेतील किंवा मेक्सिकोतील एक उत्पादन आहे आणि हे सध्या वेट लॉस इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त वापरलं जातं, वेट लॉससाठी. या सीड्सचे अनेक न्यूट्रिशन बेनिफिट्स आहेत,

उदा.

१० ग्रॅम या सीड्स मध्ये, साधारण ५० किलो कॅलरी असतात आणि ३ ग्रॅम फॅट, तसेच प्रोटीन १.७९ आणि फायबर ३.४९. तर खूप चांगल्या प्रकारचं फॅट असतं, प्रोटीन असते. “इट्स व्हेरी गुड सोर्स ऑफ व्हेजिटेरियन प्रोटीन” म्हणजेच व्हेजिटेरियन लोकांना प्रोटीनचा खूप प्रॉब्लेम असतो, म्हणून या सीड्स तुम्ही नक्की तुमच्या आहारात समावेश केले पाहिजे.

त्याच्यामध्ये प्रोटीन चांगले असतात, या सीड्स मध्ये कॅल्शियम खूप चांगलं असतं, फॉस्फरस चांगलं असतं, झिंक, आयर्न मुबलक प्रमाणात असत. म्हणुनच या सीड्सला सुपर फूड म्हटल जात. हे नक्कीच आहारात समावेश केले पाहिजे.

चिया सीड्स

हे वाचा –

कोणत्या वनस्पती पासून हे तयार होतं ? याचे उत्पादन जगातील कोणत्या भागात केले जाते?

चिया सीड्स हे भारतातील बियाणं नसून, ते मूळच अमेरिका मधील आहे. ज्यामुळे याला कोणतेही भारतीय नाव नसून, भारतात याला चिया बियाणं या नावाने ओळखतात. या एडिबल सीड्स आहेत, ज्या वाळवंटातील वनस्पती साल्विया हिस्पैनिका यापासनं मिळतात.

या सीड्स या पांढऱ्या तपकिरी, काळसर बिया असतात. अनेकदा या सीड्स म्हणजे सब्जाच्या बिया असं समजलं जातं, पण तसं नाही आहे. सब्जा व चिया या दोन्हीही वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आहेत.

मित्रांनो या सीड्स कच्च्या खाल्ल्या जातात अथवा अनेक पदार्थ जसे की दही, भाज्या, सलाड, शेक, ज्युसेस, इत्यादींमध्ये मिक्स करून खाल्लं जातं. पाण्यात भिजवून देखील त्यांचे सेवन केलं जातं.

चिया सीड्स

चिया सीड्स मध्ये कोणती पोषक तत्वे असतात ?

चिया यांना एनर्जी बूस्टर म्हटलं जातं, कारण यात भरपूर प्रमाणात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आढळतात.

त्याचबरोबर यात फायबर, प्रोटीन्स, कॅल्शियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, विटामिन बी, आयर्न, अँटी ऑक्सिडेंट, इत्यादी सारखी पोषक तत्वे असतात. त्यामुळे हे खाल्ल्याने, आपल्या शरीराला अनेक फायदे देखील मिळतात.

Chia Seeds In Marathi

चिया सीड्स खाल्यामुळे कोणते फायदे होतात ?

चिया सीड्स डायजेशन साठी खूप चांगले आहे

या सीड्समध्ये जे फायबर आहे, त्याला पण तंतुमय पदार्थ म्हणतो, ते खूप उत्तम प्रकारचे असतात. त्याला सोल्युबल फायबर असतात आणि या सीड्स ज्या वेळी आपण पाण्यात भिजवतात.

ते १० टाईम जास्त त्यातील पाणी शोषतात कारण ते सोल्युबल फायबर असतात, तर हे खाल्ल्याने पोट भरत आणि पोट भरलेलं असल्यामुळे, आपल्याला लवकर पोट भरल्यासारखं वाटतं आणि आपल एक्स्ट्रा ओवर इटिंग होत नाही आणि फायबर जे आहे ते आपल्या पोटातले जे गुड बॅक्टेरिया आहेत त्याचा संतुलन चांगलं ठेवते

आणि जे काही कुठले पण आजार असतात जसे कि बद्धकोष्ठता तिथून कुठेतरी आजार सुरू होत असतात, तर फायबर चांगलं खाल्ल्यामुळे कॉन्स्टिपेशन देखील होत नाही.

शरीरामध्ये होत असलेल इन्फ्लेशन म्हणजे आजारांची कुठेतरी सुरुवात होत असते, तर ते सुद्धा इन्फ्लेशन कमी करण्याचं काम चिया सीड मधले फायबर करत असतात. त्याच्यामुळे हे डायजेस्टिव्ह सिस्टीम साठी अतिशय उत्तम असे सीड्स आहेत.

हार्ट हेल्थ साठी चांगले आहे

या सीड्स मध्ये क्वेरसिटीन नावाचे एक अँटि ऑक्सिडंट आहे, ज्या मुळे हृदयरोगाची शक्यता खूप कमी होते. या सीड्स मध्ये ओमेगा ३ असल्यामुळे आपल्या हार्ट साठी याचा उत्तम फायदा होतो.

या सीड्सचा याच विशेष असा आहे की, ओमेगा ३ मध्ये जवसा पेक्षाही जास्त चांगल्या प्रकारचे फॅट असल्यामुळे, ज्या हृदयाच्या रक्तवाहिनी असतात.

तिथे कुठेतरी काहीतरी खडा तयार होतो किंवा काहीतरी डिपॉझिट होतं, तर ते जे क्लीन करण्याचं काम ओमेगा थ्री करत असत, त्यामुळे ओमेगा थ्री हृदयाच्या हेल्थसाठी अतिशय उत्तम आहे.

बोन्स हेल्थ/हाडांच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगला आहे

या सीड्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, हे खूप चांगल्या प्रमाणात असल्यामुळे, हाड नस याचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत करते.

या सीड्स मध्ये डेरी प्रॉडक्ट पेक्षाही जास्त कॅल्शियम असते, त्यामुळे नक्कीच या सीड्सचा समावेश तुम्ही आहारामध्ये नक्कीच केला पाहिजे.

चिया सीड्समध्ये अँटि कॅन्सर प्रॉपर्टीज असतात  

या सीड्समध्ये अँटि कॅन्सर प्रॉपर्टीज असतात, जे फ्री रॅडिकल्स आपल्या सेल्सला घात करत असतात, त्या फ्री रॅडिकल्स मधील घातक घटकाला मारण्याच काम या सीड्स करतात.

त्याच बरोबर आपल्या सेल्सच जे आरोग्य आहे, आपल्या प्रत्येक पेशीचे जे आरोग्य आहे, ते चांगलं ठेवायचं काम या सीड्स करत असतात, म्हणून त्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंग अँटि कॅन्सर प्रॉपर्टीज असतात.

वजन नियंत्रित राहण्यास मदत होते

Chia Seeds

आपल्याला तर माहितीच आहे, या सीड्सच हे बाजारपेठेत इतर बेनिफिट्स पेक्षा जास्त वेट लॉस साठीच वापरले जातात आणि वजन कमी करण्यासाठी याचे चांगले रील्झट आहे.

या सीड्स तुमचे वजन कसे कमी करतात तर, तुमच्या शरीराला, तुमच्या रुटीनला सूट होतं, तसा जो पर्सनल डायट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला या सीड्सचा सामावेश करायचा आहे, असे ज्या वेळी तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होईल.

आधी सांगितल्याप्रमाणे चिया सीड्स जास्त पाणी शोषल्यामुळे ते फुलतात, आणि ते फुललेले या सीड्स खाल्यामुळे पोट भरल्यासारखं फिलिंग येत, म्हणून ओव्हरटिंग होत नाही. तर आपल लवकर पोट भरतं आणि म्हणून आपण कमी कॅलरीज खातो, त्याच्यामुळे वजन नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

प्रथिने युक्त

या सीड्स मध्ये प्रोटीनची मात्रा खूप चांगली असते, तर प्रोटीनच आपल्याला खूप खूप गरजेचे आहे. आणि व्हेजिटेरियन सोर्सेस मध्ये नेहमीच प्रोटीनचा प्रॉब्लेम असतो.

तर जे व्हेजिटेरियन आहेत त्यांनी नक्कीच त्यांच्या डाइट मध्ये या सीड्स हा समावेश केला पाहिजे.

रक्तातील साखर नियंत्रित ठेवते

सीड्स, रक्तातील साखर नियंत्रित ठेवते, कारण या सीड्स मध्ये खूप चांगल्या प्रकारच फायबर असतं, त्यामुळे हे डायबिटीस पेशंटसाठी देखील खूप उत्तम आहे.

चिया सीड्स मध्ये खूप चांगल्या प्रकारचे फॅट्स आहेत

या सीड्स मध्ये मध्ये ओमेगा थ्री फॅटी असिड असल्यामुळे हे ओमेगा थ्री फॅटी असिडचे आपल्या शरीरामध्ये अनेक फायदे आहेत, तसं डिप्रेशन ज्यांना असेल तर, डिप्रेशन फाईट करण्याची मदत करत असते.

नंतर ज्यांना झोपेचे प्रॉब्लेम्स आहे, ते झोपेचे प्रमाण कुठेतरी दूर होतात, त्वचा चांगली होते, हेयर चांगले होतात, हेयर लॉसची जी समस्या आहे ती या सीड्स ने कुठेतरी कमी होते.

एकंदरीत बघितल तर या सीड्सचे जे फायदे जे आहेत ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही तुमच्या डायट मध्ये या सीड्सचा समावेश केला पाहिजे.

चिया सीड्सच्या सेवनाने मिळणारे इतर फायदे कोणते ?

 • वजन कमी करायचं असल्यास, या सीड्स उत्तम उपाय आहे. म्हणूनच व्यायामा सोबत या सीड्सचे सेवन करावे.
 • या सीड्स मध्ये फायबर्स मुबलक प्रमाणात असल्याने, हे खाल्ल्याने पचन प्रणाली अर्थात डायजेस्टिव्ह सिस्टिम स्वस्थ व सक्रिय स्वरूपात कार्य करते, ज्यामुळे हाड व दात मजबूत होतात. यासाठी या सीड्स दुधात मिसळून घ्याव्या.
 • या सीड्स मध्ये उच्च प्रमाणात अँटी ऑक्सीडेंट असतात, ज्यामुळे हे खाल्ल्याने त्वचेच आरोग्य सुधार. या सीड्स खाल्ल्याने, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. यात विटामिन बी असल्याने केस निरोगी राहण्यास मदत होते. या सीड्स मध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे आपल्या शरीराला हृदयरोग, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल व इतर गंभीर आजारांपासून सुरक्षित ठेवण्याचं काम करत.
 • या सीड्स मधून चांगल्या प्रकारे एनर्जी मिळते, म्हणूनच त्यांचा समावेश सकाळच्या नाश्ता केला तर दिवसभर एनर्जी टिकवून ठेवण्याचं काम करत. या सीड्स मध्ये अँटि ऑक्सिडेंट, अंटी फंगल, गुण असल्याने इन्फेक्शन पासून बचाव होतो.
 • रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याकरिता या सीड्स उत्तम आहेत. चिया सीड्सचा समावेश खाण्यात केल्याने, झोपेचे विकार, नैराश्य, तणाव आणि चिंता यासारख्या मानसिक समस्यांपासून निवारण होण्यास मदत होऊ शकते.
 • अशा तऱ्हेने या सीड्सचे अनेक गुणकारी फायदे असल्याने, याला “सुपरफुड्स” म्हटलं जातं. म्हणूनच नियमित याचं सेवन करावं.

चिया सीड्स किती खावे आणि कसे खावे ?

तुम्ही नवीन असाल तर तुम्ही पाच ग्राम पासून या सीड्स खायला सुरुवात करा. कारण त्याच्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात. जसं जसं तुम्हाला सवय लागेल तसं तसं याचं प्रमाण वाढवू शकता.

दिवसाला तुम्ही जास्तीत जास्त दीड चमचा खाऊ शकतात. त्याच्यापेक्षा जास्त खाण्याची गरज नाही आहे. कारण इतरही आपण फळ खात असतो, सॅलेड खात असतो, त्यातून देखील आपल्याला फायबर मिळत असत.

तुम्ही जर दहा ग्राम म्हणजे, चहाचे आपले दोन चमचे या सीड्स तुम्ही रोज खाल्ले तरीही काही हरकत नाही आहे. त्याच्यापेक्षा जास्त खाण्याची गरज नाही आहे.

चिया सीड्स तुम्ही कसे घ्यावे ?

या सीड्स तुम्ही पाण्यात भिजवून घेऊ शकता किंवा सलाड वर टाकून तुम्ही घेऊ शकता. ताकात टाकून आपण या सीड्स खाऊ शकतो.

भाज्यावर वरून टाकून सुद्धा तुम्ही या सीड्स घेऊ शकता. पुडिंगमधून तुम्ही या सीड्स घेऊ शकता. तसच सरबत, डेजर्ट मध्ये देखील तुम्ही या सीड्स घेऊ शकता.

अश्या निरनिराळ्या प्रकारे तुम्ही या सीड्स तुमच्या रोजच्या आहारामध्ये समावेश करू शकता. या सीड्स न शिजवता कच्चे खायचे आहेत

चिया सीड्सचे सेवन करण्याचे कोणते साईड इफेक्ट आहे?

 • कोणतीही वस्तू मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास, हानिकारक ठरू शकते. हेच या सीड्स सोबत देखील लागू होतं. या सीड्स अति प्रमाणात खाल्ल्याने साइड इफेक्ट्स आहेत. ते म्हणजे, अति प्रमाणात या बिया खाल्ल्याने घशात अडकू शकतात आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
 • या सीड्सच्या अति सेवनाने रक्तदाब कमी होऊ शकतो. याच्या वापराने काही लोकांना एलर्जी, खाज येणं, यासारख्या समस्या होऊ शकतात. या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतात, म्हणूनच याच्या जास्त सेवनाने पचन समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला इतर कोणतेही शारीरिक विकार असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचा सेवन करावं.
 • तुम्ही आधी या सीड्स कधी खाल्लेच नसतील तर अश्या वेळी या सीड्सचे सेवन थोड्या प्रमाणा पासून सुरू करा. कारण जर अति प्रमाणात याचे सेवन केले तर तुम्हाला डायरिया होऊ शकतो. खूपच जास्त प्रमाणात पोटात दुखू शकत आणि पोटाचा तंत्र आहे ते बिघडू शकत. प्रेग्नेंसी मध्ये देखील तुम्ही या सीड्स खाण टाळल पाहिजे. जर तुम्हाला प्रेग्नेंसी मध्ये या सीड्स खायचे असतील तर एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्याचे सेवन करावे. जास्त प्रमाणात घेऊ नका.

चिया सीड्स व सब्जा यामधील फरक

या सीड्स व सब्जाच्या बियांमध्ये बरेचसे लोक फरक ओळखू शकत नाही. त्यामुळे त्यांचे वर्णन व त्यामधील असणारे विशेष गुणधर्म, समजून घेऊन आपण सब्जाच्या बिया व या सीड्स ओळखू शकतो.

चिया सीड्स व सब्जाच्या बिया मधील पहिला फरक म्हणजे, त्यांची नावे.

 • या सीड्सला चिया सीड्स या नावाने ओळखले जाते. या सीड्सना हिंदी व उर्दू मध्ये असे कोणतेही वेगळे नाव नाही, कारण याचे उत्पादन हे साऊथ अमेरिका मधून केले जाते.
 • सब्जा हा भारतासह इतर अनेक देशांमध्ये मिळतो, त्यामुळे सब्जाला विविध नाव आहेत. जसे की, सब्जा, तुकमरिया, फालुदा सिड, स्वीट बेसिल सिड्स, तूकमलंगा, इत्यादी नावाने ओळखला जातो.

सब्जा व चिया सीड्स यांच्यामधील दुसरा फरक म्हणजे, त्यांची ठेवण.

 • या सीड्स राखाडी, काळा किंवा सफेद रंगाच्या स्वरूपात आपल्यास पहावयास मिळतात. चीया सिडस  ह्या सब्जापेक्षा थोड्या छोट्या आकाराच्या असतात व अंडाकृती आकाराच्या असतात.  
 • तर सब्जाच्या बिया ह्या फक्त आणि फक्त काळ्या रंगाच्या असतात. सब्जाच्या बिया या तिळाप्रमाणे असतात, परंतु या सीड्सच्या बियांपासून थोड्याशा मोठ्या आकाराच्या असतात.

सब्जा व चिया सीड्स यांच्यामधील तिसरा फरक म्हणजे, चिया सीड व सब्जा यांमधील खाण्याच्या फरकांवर अवलंबून आहे.

 • या सीड हे आपण कच्चेच खाऊ शकतो किंवा कोणत्याही भाजीवर, सलाडव,र ताकात, दहीत, मिक्स करून आपण खाऊ शकतो.
 • परंतु सब्जा हा आपल्याला पाण्यात भिजवून नंतरच खाऊ शकतो.

सब्जा व चिया सीड्स यांच्यामधील चौथ्या फरक म्हणजे, सब्जा व चिया सीड्स यांमधील पाणी शोषून घेण्याचा टाईम.

 • सब्जा व या सीड्स यांमधील पाणी शोषून घेण्याचा टाईम, यावर त्यांच्यातील असलेला वेगळेपणा आपल्या जाणवतो.
 • या सीड्सना पाणी पूर्णतः शोषून घेण्यासाठी ३० मिनिटे ते २ तास लागतात.
 • तर सब्जाला पाणी शोषून घेण्यासाठी १५ ते ३० मिनिट लागतात.

FAQ

१. चिया सीड्सचे सेवन करण्याचे कोणते साईड इफेक्ट आहे ?

अति प्रमाणात या बिया खाल्ल्याने घशात अडकू शकतात आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
चिया सीड्सच्या अति सेवनाने रक्तदाब कमी होऊ शकतो. याच्या वापराने काही लोकांना एलर्जी, खाज येणं, यासारख्या समस्या होऊ शकतात. चिया बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतात, म्हणूनच याच्या जास्त सेवनाने पचन समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला इतर कोणतेही शारीरिक विकार असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचा सेवन करावं.
तुम्ही आधी चिया सीड्स कधी खाल्लेच नसतील तर अश्या वेळी चिया सीड्सचे सेवन थोड्या प्रमाणा पासून सुरू करा. कारण जर अति प्रमाणात याचे सेवन केले तर तुम्हाला डायरिया होऊ शकतो. खूपच जास्त प्रमाणात पोटात दुखू शकत आणि पोटाचा तंत्र आहे ते बिघडू शकत.

२. चिया सीड्सच्या सेवनाने मिळणारे फायदे कोणते ?

वजन कमी करायचं असल्यास, चिया सीड्स उत्तम उपाय आहे. म्हणूनच व्यायामा सोबत चिया सीड्सचे सेवन करावे.
चिया सीड्स मध्ये फायबर्स मुबलक प्रमाणात असल्याने, हे खाल्ल्याने पचन प्रणाली अर्थात डायजेस्टिव्ह सिस्टिम स्वस्थ व सक्रिय स्वरूपात कार्य करते, ज्यामुळे हाड व दात मजबूत होतात. यासाठी चिया सीड्स दुधात मिसळून घ्याव्या.
चिया सीड्स मध्ये उच्च प्रमाणात अँटी ऑक्सीडेंट असतात, ज्यामुळे हे खाल्ल्याने त्वचेच आरोग्य सुधार. चिया सीड्स खाल्ल्याने, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. यात विटामिन बी असल्याने केस निरोगी राहण्यास मदत होते. चिया सीड्स मध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे आपल्या शरीराला हृदयरोग, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल व इतर गंभीर आजारांपासून सुरक्षित ठेवण्याचं काम करत.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास चिया सीड्स म्हणजे काय या बद्दल माहिती दिली आहे. हि माहिती व हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या मित्र परीवारांसोबत व इतर गरजू व्यक्तींसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment