जागतिकीकरण म्हणजे काय What Is Globalization

जागतिकीकरण म्हणजे काय What Is Globalization – विविध देशांमध्ये माहिती, तंत्रज्ञान, भांडवल, लोक, बाजारपेठा, वस्तू यांचा मुक्त संचार आणि देवाणघेवाण म्हणजे जागतिकीकरण होय.

जागतिकीकरणामुळे देशोदेशींच्या अर्थव्यवस्था आणि बाजारपेठा परस्परांची जोडल्या गेल्या आहेत. इसवी सन १९९० नंतरच्या काळात या प्रक्रियेला वेग आला. देशांच्या सीमांतपलीकडे असणाऱ्या जगाच्या विविध भागात राहणाऱ्या, लोकांमधला संपर्क वाढला.

त्यांच्यातील वैचारिक देवाण-घेवाणही वाढली. भांडवल कुशल व अकुशल मनुष्यबळ इत्यादींचा ओघ जगभरात कुठेही नेता येणं शक्य झालं. वस्तूंचं उत्पादन सोयीचं आणि किफायतशीर जिथे होईल तिथे करावं, जिथून मिळेल तिथून मनुष्यबळ घ्यावं आणि जगाच्या बाजारपेठेत कुठेही आपल्या मालाची विक्री करावी, अशा स्वरूपाचा जो बदल झाला तो यामुळे झाला आहे.

याला प्रामुख्याने आर्थिक संदर्भ असला तरी, राजकीय, सांस्कृतिक शैक्षणिक असे याचे विविध पैलू आहेत. जागतिकीकरणामुळे सर्व देशांच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणात बदल झाले आहेत.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास याबद्दल माहिती दिली आहे, हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

जागतिकीकरण म्हणजे काय What Is Globalization

जागतिकीकरण म्हणजे काय

जागतिकीकरण म्हणजे काय

जागतिकीकरण म्हणजे काय What Is Globalization – आज आपण जगातील कुठल्याही देशातील बातम्या सहज पाहू शकतो. तुम्ही क्षणार्थ जगातील कानाकोपऱ्यातील माणसांची संपर्क करू शकता.

एका देशातून दुसऱ्या देशात एका दिवसात जाणे, आपणास शक्य होते. आजच्या युगात या साऱ्या गोष्टी दळणवळणाच्या साधनातील प्रगतीमुळे शक्य झाले आहेत. या सर्व गोष्टी यामुळे घडतात.

जागतिकीकरण म्हणजे देशा देशातील, प्रदेशा प्रदेशातील, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सीमावाद ओलांडून एकमेकांच्या विकासासाठी, आर्थिक सांस्कृतिक तसेच माहिती तंत्रज्ञान यांची देवाणघेवाण होय. म्हणजे एका देशातील व्यक्तीला दुसऱ्या देशात व्यापार, दळणवळण, उद्योगधंदे, करण्यासाठी मुक्त परवानगी देणे होय.

या धोरणाचा आपण स्वीकार केल्यामुळे, आपल्या देशातल्या वस्तू अगदी सहजपणे जगातल्या कोणत्याही बाजारपेठेमध्ये उपलब्ध होत असे आणि जगातल्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध होणाऱ्या वस्तू आपल्या देशामध्ये सहजपणे उपलब्ध होत असे.

म्हणजे एकमेकाला एकमेकांच्या देशांमध्ये व्यापार करण्याची खुली परवानगी या दोन देशांने दिली म्हणजे याच्या धोरणातून अनेक देशांना देण्यात आले आणि त्यामुळे आयात निर्यात मोठ्या प्रमाणात होऊन, देशाचा जो आर्थिक स्थर असेल, आर्थिक उत्पादन असेल हे उत्पादन वाढण्यास सुरुवात झाली.

पण यामुळे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक या प्रत्येक सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल व उत्क्रांती निर्माण झाली.

जागतिकीकरण

हे वाचा –

जागतिकीकरणाचा अर्थ

जागतिकीकरण म्हणजे काय What Is Globalization – संपूर्ण विश्वामध्ये एकच आर्थिक व्यवस्था प्रस्थापित करणे, म्हणजे जागतिकीकरण होय. जगातल्या कोणत्याही राज्यामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू किंवा बाजारपेठामध्ये उपलब्ध असणाऱ्या, वस्तू हे आपल्या राष्ट्राच्या सीमा ओलांडून इतर देशांमध्ये मुक्तपणे, व्यापार करण्याची परवानगी देणे. म्हणजे “जागतिकीकरण” या शब्दांचा अर्थ आहे.

दुसऱ्या महायुद्धासोबत साम्राज्यवादाचा शेवट झाला. भांडवलवादी व विकसित देशांना व्यापार आणि वाणिज्याचे नवे मार्ग शोधण्याची गरज वाटू लागली, याचा परिणाम श्रीमंत राष्ट्रांची जी-७ ही संघटना स्थापण्यात झाला. जगात कोठेही वसाहती नसतानाही, अनिर्बंध व्यापार करण्यास सुरुवात झाली. या नव्या धोरणाला जागतिकीकरण असे म्हणतात.

इतर देशांशी व्यापाराची मोकळीक मिळावी, यासाठी संपूर्ण जग ही एक बाजारपेठ आहे, कोणत्याही देशातून कच्चामाल मिळवता येतो आणि पक्का माल विकता येतो.

विश्वात एक केंद्रीय आर्थिक व्यवस्था निर्माण करणे, अधिक गुंतवणूक करून औद्योगीकरण वाढवणे आणि आयात व निर्यात सुलभतेने करता येण्याची स्थिती निर्माण करणे, याला जागतिकीकरण असे म्हणतात.

म्हणजे वेगवेगळ्या अर्थव्यवस्था व समाजांचे एकत्रीकरण होय. यात माहिती, कल्पना, भांडवल, यांचा ओक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी देशांच्या सीमा ओलांडून सतत सुरू असतो.

आर्थिक क्षेत्रात याचा अर्थ म्हणजे अर्थव्यवस्थेत राज्यांचा कमीत कमी हस्तक्षेप असलेला, मुक्त बाजार होय. यात राष्ट्रीय अर्थव्यवस्था ही जागतिक बाजार घटकांच्या प्रभावाखाली येते. ही लोकांच्या वाढत्या परस्परावलंबनाची प्रक्रिया आहे.

What Is Globalization

जागतिकीकरणाचा इतिहास

जरी अनेक लोक याला विसाव्या शतकातील घटना मानत असले तरी ही प्रक्रिया हजारो वर्षांपासून सुरू आहे. पहिल्या महायुद्धापूर्वीच्या दशकांमध्ये युरोपीय सरकारांनी परदेशात मोठी गुंतवणूक केली. १८७० ते १९१४ या कालखंडाला याचा सुवर्णकाळ म्हटले जाते.

इ.स.पू. 600 पर्यंत परत जाताना, रोमन साम्राज्याने आपल्या आर्थिक आणि प्रशासकीय संस्थांचा अनेक शतकांपासून प्राचीन जगाच्या महत्त्वपूर्ण भागात विस्तार केला.

युनायटेड स्टेट्सने मोठ्या प्रमाणावर मान्य केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकांच्या संचासह जागतिक आर्थिक प्रणाली तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. 

आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि मुक्त व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN), आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि जागतिक वाणिज्य संघटना यासारख्या बहुराष्ट्रीय संस्थांची स्थापना करण्यात आली.

130 BC ते 1453 AD पर्यंत विस्तारलेल्या या व्यापार मार्गांनी याची आणखी एक लाट चिन्हांकित केली. त्यांनी मध्य आशिया आणि मध्य पूर्व मार्गे चीनमधील व्यापारी, उत्पादने आणि पर्यटक युरोपपर्यंत पोहोचवले.

जागतिकीकरणाच्या व्याख्या

एडवर्ड हार्मन

“जागतिकीकरण ही सीमापार उत्पादने, भांडवल, सेवा आणि आर्थिक क्रिया, प्रक्रिया, यांच्या वाढत्या प्रवाहाला लक्ष करणारी प्रक्रिया आहे”.

बायलीस आणि स्मिथ

“जगाच्या विविध भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या लोकांमध्ये वाढते सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, व्यापारी, सांस्कृतिक, संबंध दर्शवणारी व्यापक प्रक्रिया म्हणजे जागतिकीकरण होय”.

जागतिकीकरणाचे महत्त्व

आपल्या परस्परसंवाद, व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांना आकार देणारे हे समकालीन युगाचे एक निश्चित वैशिष्ट्य बनले आहे.

आजच्या जगात याचे मानवी जीवन, अर्थव्यवस्था आणि समाजाच्या विविध पैलूंवर खोल परिणाम झाल्यामुळे त्याचे महत्त्व आहे. 

हे सीमेपलीकडे ज्ञान आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यास प्रोत्साहन देते.

यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळते, ज्यामुळे व्यवसायांना नवीन बाजारपेठ आणि ग्राहकांपर्यंत प्रवेश मिळतो.

यामुळे शक्य झालेल्या माहिती आणि कल्पनांच्या जलद प्रसारामुळे लोकांच्या ज्ञानाचा आणि संवादाचा मार्ग बदलला आहे.

याद्वारे मोठे आर्थिक परस्परावलंबन राष्ट्रांना शांततापूर्ण संबंध राखण्यासाठी आणि संघर्षाऐवजी संवादाद्वारे विवाद सोडवण्यासाठी प्रोत्साहन देऊ शकते.

जसे व्यवसाय विस्तारतात आणि नवीन बाजारपेठांमध्ये गुंतवणूक करतात, ते विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करतात, बेरोजगारी कमी करतात आणि अनेक लोकांसाठी आजीविका सुधारतात.

याद्वारे विविध संस्कृतींमधील परस्परसंवाद क्रॉस-सांस्कृतिक समज आणि प्रशंसा वाढवतात.

राष्ट्रे अधिक एकमेकांशी जोडली जात असताना, हवामान बदल आणि सार्वजनिक आरोग्य संकटांसारख्या जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक कृतीची गरज ते ओळखतात.

वाढलेले जागतिक व्यापार आणि औद्योगिक क्रियाकलाप पर्यावरणाच्या ऱ्हासात योगदान देऊ शकतात, जसे की कार्बन उत्सर्जन, जंगलतोड आणि प्रदूषण.

आंतरराष्ट्रीय करार आणि भागीदारी करणारी राष्ट्रे काही धोरणात्मक क्षेत्रांवर सार्वभौमत्वाची काही पातळी सोडू शकतात.

कामगारांचे शोषण हा जागतिकीकरणाशी निगडीत विषय आहे. काही घटनांमध्ये, प्रक्रियेचा परिणाम विकसनशील देशांमधील कामगारांना अन्यायकारक वागणूक आणि कमी पगारात होऊ शकतो.

सीमेपलीकडे माल आणि लोकांच्या अनिर्बंध हालचालीमुळे सुरक्षेबाबत चिंता निर्माण होते. ही परिस्थिती बेकायदेशीर वस्तूंची तस्करी, मानवी तस्करी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ यासारखी संभाव्य आव्हाने पुढे आणते.

Globalization

जागतिकीकरणाचे स्वरूप

१८७० ते १९१४ या काळात याच्या चळवळीला प्रारंभ झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर या चळवळीला चालना मिळाली. १९४४ मध्ये जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आय एम एफ या संस्थांची निर्मिती झाली.

जागतिक बँकेने विदेशी चलन उपलब्ध करून दिले. विदेशी व्यापारावरील बंधने नष्ट करून प्रत्येक देश जागतिक बाजारपेठेचा हिस्सा बनला. १९९० पासून आर्थिक उलाढालीच्या संदर्भात नियम व प्रतिबंध क्षितिजिल झाले.

उदारीकरणाचे धोरण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी, बँकिंग वाहतूक म्हणजेच परिवहन, वीज इत्यादींचे खाजगीकरण करण्यात आले. खाजगीकरणामुळे नफा वाढत जाऊन, सार्वजनिक क्षेत्र मागे पडू लागली.

आता संगणकीकरणामुळे जग अधिक जवळ आले आणि जग हे खरोखरच एक बाजारपेठ बनले आहे. आर्थिक स्थितीशी निगडित आहे. परंतु ते सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात ही बदल घडवत आहेत.

मुक्त अर्थव्यवस्था

यामुळे सीमा ओलांडून कोणत्याही देशाशी व्यापार करणे शक्य झाले आहे.

बहुराष्ट्रीय कंपन्यांना देशात मुक्त प्रवेश दिल्याने, जगाची एकच बाजारपेठ बनली आहे मुक्त अर्थव्यवस्थेमुळे जगाच्या राहणीमानात बदल घडून आला आहे.

नवा स्पर्धावाद

यामुळे स्पर्धावाद निर्माण झाला आहे. उत्पादनात वाढ करण्यासाठी, नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला.

जागतिक बाजारपेठेत मालाची विक्री करण्याने, खुल्या स्पर्धेत वाढ झाली. ज्यावेळी विकसित देशात व्यापाराची संधी वाढत आहे, त्यावेळी रोजगार कमी होत आहे आणि आर्थिक विषमता वाढत आहे.

गुंतवणुकीची संधी

राज्य आणि व्यापारी कोणत्याही देशात गुंतवणूक करू शकतात. म्हणून भांडवलाचा प्रवाह वाढतो आहे.

शहरांचा विकास

नव्या तंत्रज्ञानामुळे शहरांची वाढ होत आहे. परंतु खेड्यांचा विकास झालेला नाही. तरीही भारताने शेती क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे.

माहिती तंत्रज्ञानाचा वापर

उपग्रहामुळे दळणवळण सोपे झाले आहे. इंटरनेटने भौगोलिक अंतर नाहीसे झाले आहे आणि जग एक जागतिक खेडे झाले आहे.

थोडक्यात याचे स्वरूप हे मुक्त व्यापार स्पर्धेचे वातावरण, बाजाराभिमुख चलन दर, शेती व औद्योगिक क्षेत्रात परवानापती रद्द करणे, सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण करणे व देशांतर्गत भांडवल मुक्तपणे खेळते ठेवणे.

जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये

आर्थिक विकासाला गती मिळाली

याच्या धोरणाचा स्वीकार केल्यामुळे, प्रत्येक देशांच्या आर्थिक विकासाला खूप मोठ्या प्रमाणात गती मिळाली. प्रत्येक देशाने आपल्या देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूला, जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यास सुरुवात केली.

प्रत्येक देशाने एकमेकांच्या देशांमध्ये व्यापार, दळणवळण, उद्योगधंदे, करण्यास सुरुवात केली. आणि त्यातून प्रत्येक देशाला आर्थिक स्त्रोत निर्माण झाला आणि त्यांच्या आर्थिक विकासाला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळाली.

जीवनमान उंचावले

याच्या धोरणाचा स्वीकार केल्यामुळे, प्रत्येक देशांनी व्यापार, उद्योगधंदे, दळणवळण, कारखाने, कंपन्या, यांच्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. या प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी मनुष्यबळाची गरज भासू लागली.

कुशल आणि अकुशल कामगारांची गरज भासू लागली. त्यामुळे देशातल्या प्रत्येक तरुणाला या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध झाला. ग्रामीण भागातील अनेक तरुण रोजगारासाठी शहराकडे येऊ लागला.

काही तरुण तर स्वतःचे व्यवसाय, स्वतःचे उद्योगधंदे सुरू करण्यास सुरुवात केली आणि त्यातून त्यांच्या जीवन मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला. गरीब आणि श्रीमंत राष्ट्राची विषमता, विकसित आणि विकसनशील राष्ट्रांची विषमता हि  विषमता या धोरणामुळे हळूहळू कमी होण्यास सुरुवात झाली.

जग एक खेडे बनले

जगातला सर्व क्षेत्रांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रांती झाली आणि ही क्रांती संगणक क्रांती म्हणून ओळखली जाते. संगणकाच्या साह्याने, इंटरनेटच्या साह्याने, संपूर्ण जग खूप जवळ आले.

मोबाईल, संगणक, इंटरनेट, यांच्या माध्यमातून प्रत्येक जण अगदी घर बसल्या सुद्धा जगामध्ये काय चाललेले आहेत, जगामध्ये कोणत्या घडामोडी घडत आहेत, यांची सर्व माहिती आपल्याला अगदी घरी बसून सुद्धा मोबाईल, संगणक, इंटरनेट यांच्या माध्यमातून मिळू शकते.

अनेक जण तर या संगणकाच्या माध्यमातून व्यापार उद्योजने दळणवळण यांच्या आयात आणि निर्यात हि मोठ्या प्रमाणात करत असे.

वेगळा व्यक्तीवर विचार करण्यासाठी वेगळ्या व्यक्तीवर विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स, व्हिडिओ कॉल, यांच्या माध्यमातून आपले विचार इतरापर्यंत आणि इतरांचे विचार आपल्यापर्यंत किंवा खेड्यामधून सुद्धा आपण कोणत्याही वस्तूंची आयात आणि निर्यात करू शकतो, हे केवळ या जागतिकीकरणामुळेच हे केवळ या संगणक क्रांतीमुळेच.

माहिती तंत्रज्ञानाचा वापर

आज प्रत्येक क्षेत्रामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला, जागतिकरण धोरण स्वीकारण्यामुळे प्रत्येक देशाने आपल्या देशामध्ये विविध संशोधन देण्यात आला आणि प्रत्येक देशाने वेगळा उपग्रहाच्या माध्यमातून वेगवेगळे माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.

वेगळ विज्ञान, वेगळ्या तंत्रज्ञानाच्या साह्याने त्यामध्ये असलेल्या विचारांच्या देवाणघेवाणीच्या साह्याने देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात क्रांती झाली. संगणक, इंटरनेट, यांच्या माध्यमातून वेगवेगळे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आणि त्या देशांची प्रगती होण्यास सुरुवात झाली.

शिक्षण क्षेत्रात बदल

जागतिकीकरण धोरणाचा स्वीकार केल्यामुळे, शिक्षण क्षेत्रात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले. अनेक परदेशी विद्यापीठे आपल्या देशामध्ये येऊन शैक्षणिक संस्था स्थापन करू लागल्या व आपल्या देशामध्ये अनेक शैक्षणिक संस्था परदेशामध्ये जाऊन शिक्षणासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करू लागल्या.

या परदेशात आणलेल्या शिक्षण संस्थेने आपल्या शिक्षण संस्थेतून बाहेर पडणारा विद्यार्थी हा गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी बाहेर पडण्यासाठी त्या शैक्षणिक संस्थेची रचना, त्या संसद शैक्षणिक संस्थेचे प्रशासन, भौतिक साधन सामग्री यांच्याद्वारे जास्तीत जास्त देशांनी सुद्धा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी उच्च शिक्षणासाठी विद्यापीठ स्थापना करण्यात आली आणि या विद्यापीठाने या महाविद्यालयातून आपल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त भर देण्यात आला.

गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी बाहेर पडण्यासाठी त्यांचा अभ्यास क्रम अध्ययन, अध्यापन पद्धती, अध्यापन तंत्रे, नवीन विचारपूर्वक यांचा समावेश विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातून करण्यात आला. जेणेकरून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी विद्यार्थ्याला स्वतःच्या पायावरती मजबूतपणे उभा राहण्यासाठी, असा अभ्यासक्रम अशा अध्यापन पद्धती अशा बहुतेक सुविधा, यातून विद्यार्थीच्या गुणवत्तेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला.

जागतिकीकरणाची इतर वैशिष्टे

  • देशीय व जागतिक अर्थव्यवस्थेचे एकत्रीकरण करणे, हे जागतिक कारणाचे मूलभूत वैशिष्ट्य आहे.
  • सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रगती करून त्यांचा स्तर उंचावणे.
  • तंत्रज्ञानातील व दळणवळणाच्या साधनातील प्रगती करणे, हे जागतिकीकरणाचे वैशिष्ट्य आहे.
  • त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञानातील प्रगती करणे व अशासकीय संस्थांचे कार्य करणे, हे जागतिकीकरणाचे वैशिष्ट्य आहे.
  • बहुराष्ट्र कंपन्यांचा वाढता व्याप हाताळणे हे कार्य जागतिकीकरण करते.

जागतिकीकरणाचा परिणाम

  • या जागतिकीकरणामुळे जग हे खेडे बनलेले आहे. म्हणजे जगामधल्या कोणताही वस्तू अगदी सहजपणे माहिती तंत्रज्ञान, मोबाईल, संगणक, इंटरनेट, यांच्या साह्याने आपण घरबसल्या कोणत्याही वस्तूंचा आपण आयात करू शकतो. त्यामुळे जागतिकिकारणामुळे हे जग हे खेड बनलेला आहे. आज सगळीकडे जागतिकीकरण माहिती तंत्रज्ञांचा बोलबाला आहे.
  • दुसरा महायुद्धानंतर सर्व जगातल्या राष्ट्रांच्या असं लक्षात आलं की, आंतरराष्ट्रीय सहकार्याशिवाय आपली प्रगती, आपली विकास आणि आपल्या देशांचा आर्थिक स्थर उंचावणार नाही आणि म्हणून एकमेकांच्या देशातल्या वस्तू ह्या एकमेकांच्या देशांमध्ये पाठवण्यासाठी आपल्याला एखाद्या जागतिकीकरण धोरणाचा स्वीकार करणे गरजेचे आहेत. आपल्या वस्तू इतर देशांमध्ये आणि इतर देशाच्या वस्तू आपल्या देशामध्ये अगदी मुक्त व्यापार करण्यासाठी, या जागतिकरण धोरणाची संकल्पना उदयास आली.
  • १९४८ च्या गॅट करारामध्ये २३ देशांनी या गॅट करारामध्ये सहभागी होऊन या गॅट करारा वरती स्वाक्षरी केली. व्यापार, उद्योगधंदे, दळणवळण, यांचा समावेश या गॅट करारामध्ये करण्यात आला.
  • भारताने या गॅट करारावरती १९९४ मध्ये स्वाक्षरी केली. तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंगराव व अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या कालावधीमध्ये भारत देश या गॅट करारात सहभागी झाला. भारतासारख्या अनेक विकसनशील राष्ट्राने हा करार मान्य केल्यानंतर, या देशांमध्ये अनेक स्वरूपाच्या समस्या निर्माण झाला.
  • सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि संस्कृतिक या प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले. सामाजिक शास्त्रामध्ये त्या समाजामध्ये जे काही लहान लहान उद्योगधंदे होते, हे उद्योगधंदे या नवीन माहिती तंत्रज्ञानामुळे हळूहळू नष्ट झाले आणि त्यामुळे जे काही लहान उद्योग होते ते  लहान उद्योग चालवणाऱ्या अनेक व्यक्तीचे, उदरनिर्वाहचे जे काही साधन होते, ते साधन बंद झाले.
  • आर्थिक क्षेत्रामध्ये गरीब आणि श्रीमंत मालक आणि मजूर यांच्यामधला जो काही संघर्ष होता, म्हणजे काय आर्थिक विषमता होती ही, विषमता नष्ट न होता, ती विषमता गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये दरी हळू वाढण्यास सुरुवात झाली.
  • शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक परदेशी विद्यापीठे आणि परदेशी शैक्षणिक संस्था, अनेक परदेशी माहिती तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, या शैक्षणिक संस्था स्थापन होण्यास सुरुवात झाली. म्हणजे या प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक समस्या निर्माण झाली.
  • २००५ मध्ये या गॅट कराराची अंमलबजावणी करण्यात आली आणि या गॅट करारामध्ये दळणवळण याबरोबर शिक्षण क्षेत्राचा सुद्धा समावेश करण्यात आला आणि त्यामुळे शिक्षण हे आता व्यापार वर्गात मोडण्यास सुरुवात झाली. म्हणजे एकंदरीत सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, याच प्रत्येक गोष्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला.

जागतिकीकरणाचे फायदे

  • देशा देशातील मुक्त व्यापाराला चालना मिळाली.
  • विदेशात भांडवल गुंतवणुकीचे मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झाली.
  • प्रसारमाध्यमांनी जगाला जवळ आणले.
  • जागतिक पातळीवरील ज्ञान माहिती व संस्कृती यांचे मोठ्या प्रमाणावर आदान प्रदान होऊ लागले.
  • पर्यावरणाच्या समर्पणाची भावना वाढीस लागली आणि राहणीमान सुधारले.
  • तंत्रज्ञानाचा वापर उत्पादन व सेवेत होऊन, त्यांची क्षमता वाढली.
  • ग्राहकांना दर्जेदार मालाच्या निवडीची संधी प्राप्त झाली.
  • देशांतील सामंजस्य व सद्भावना वाढीस लागली आणि जग एक उत्तम बाजारपेठ बनले.
  • कृषी मालातील अनियमितता दूर झाली.

जागतिकीकरणाचे तोटे

  • जागतिकीकरणाचा फायदा मोजक्या उद्योगपतींना होतो, मात्र सर्वसामान्यांना महागाईला तोंड द्यावे लागते.
  • जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरणामुळे, बेरोजगारी वाढू शकते.
  • आयातीतील कर रद्द केल्याने, राष्ट्राच्या उत्पन्नात घट झाली.
  • बहुराष्ट्रीय कंपन्या अनिर्बंध रित्या गरीब राष्ट्रांची नैसर्गिक संपत्ती वापरत आहेत.
  • अनियंत्रित स्पर्धा वाढवून, स्थानिक लहान उद्योगांची हानी होत आहे.
  • जगात श्रीमंत व गरीब देश अशी विषमता निर्माण होत आहे.
  • मूलभूत मूल्यांचा ऱ्हास होत आहे.

जागतिकीकरणाचा राजकीय प्रभाव

साम्यवाद, समाजवादाचा प्रभाव कमी झाला. पहिल्या महायुद्धानंतर सोवियत रशियामध्ये यशस्वी साम्यवादी क्रांती झाली, परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने भांडवलवादाचा प्रसार केला, तर सोवियत रशियाने आंतरराष्ट्रीय साम्यवादी राज्यक्रांतीचा नारा दिला.

तथापि साम्यवाद आणि समाजवादातील मूलभूत त्रुटींमुळे आणि स्टैलींगच्या मृत्यूनंतर सोवियत रशियाच्या राजवटीला उतरती कळाली. भांडवलशाहीला होणारा साम्यवादाचा अडसर दूर झाला. त्यामुळे अमेरिका ही एकमेव सत्ता बनली. अमेरिकेने खुल्या आर्थिक धोरणांचा अवलंब केला.

लोकशाही राज्यव्यवस्थेचा प्रभाव

साम्यवाद आणि समाजवादाची जागा लोकशाहीने घेतली. लोकशाहीने व्यक्ती स्वातंत्र्य आणि विकास याला अग्रक्रम दिला.

खुली अर्थव्यवस्था जी लोकशाही अटळ असते ती, जागतिकीकरणाला सहाय्यभूत आहे.

जागतिकीकरणाचा विळखा

विकसित देशांना उत्पादनासाठी बाजारपेठ हवी असते, परंतु ती नियंत्रित अर्थव्यवस्थेत शक्य नसते. म्हणून त्यांनी जागतिकीकरणाचा आग्रह धरला होता, विकसित देशांच्या अडवणुकीच्या धोरणांच्या विळख्यात अविकसित व विकसनशील राष्ट्रीय सापडले आहेत आणि त्यातून सुटका होणे कठीण आहे.

राजकीय भ्रष्टाचार

आर्थिक फायदा मिळवण्यासाठी राजकीय सत्ता उपयोगी आहे, म्हणून व्यवसायिकांनी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी प्रवेश केला. त्यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले. लोक कल्याणाची जागा भ्रष्टाचाराने घेतली आहे.

जागतिकीकरणावर मराठी पुस्तके

या विषयावर मराठीत अनेक पुस्तके आहेत.

  • जागतिकीकरण आणि भारत (नलिनी पंडित)
  • जागतिकीकरण आणि मराठी भाषा (डॉ.सौ. सूर्यकांता अजमेरा, प्रा.विनोद उपर्वट)
  • जागतिकीकरण की नवीन गुलामगिरी (नीरज जैन)
  • जागतिकीकरणाचा मराठी भाषा व साहित्यावरील प्रभाव (डॉ. वासुदेव वळे)
  • साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण (भालचंद्र नेमाडे)
  • जागतिकीकरण आणि दलितांचे प्रश्न (उत्तम कांबळे)
  • जागतिकीकरण समाज आणि मराठी साहित्य (संपादक रवींद्र शोभणे)
  • जागतिकीकरण आणि वंचित समाज (रमेश पतंगे)
  • जागतिकीकरण आणि मराठी साहित्य : प्रा.डॉ. सौ. नलिनी महाडिक यांचा गौरव ग्रंथ (डॉ.शरद गायकवाड, डॉ.सुनील शिंदे
  • जागतिकीकरण आणि मराठी ग्रामीण साहित्य (प्रा.डॉ. राजेंद्र हावरे)
  • जागतिकीकरणानंतरचे मराठी साहित्य

FAQ

१. जागतिकीकरण म्हणजे काय ?

आज आपण जगातील कुठल्याही देशातील बातम्या सहज पाहू शकतो. तुम्ही क्षणार्थ जगातील कानाकोपऱ्यातील माणसांची संपर्क करू शकता. एका देशातून दुसऱ्या देशात एका दिवसात जाणे, आपणास शक्य होते. आजच्या युगात या साऱ्या गोष्टी दळणवळणाच्या साधनातील प्रगतीमुळे शक्य झाले आहेत. या सर्व गोष्टी जागतिकीकरणामुळे घडतात.
जागतिकरण म्हणजे देशा देशातील, प्रदेशा प्रदेशातील, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सीमावाद ओलांडून एकमेकांच्या विकासासाठी, आर्थिक सांस्कृतिक तसेच माहिती तंत्रज्ञान यांची देवाणघेवाण होय. जागतिकरण म्हणजे एका देशातील व्यक्तीला दुसऱ्या देशात व्यापार, दळणवळण, उद्योगधंदे, करण्यासाठी मुक्त परवानगी देणे होय.

निष्कर्ष

जागतिकीकरणाचा उपयोग आपल्या देशाच्या फायद्यासाठी केला पाहिजे. विदेशी माल वापरण्याऐवजी विदेशी तंत्रज्ञान शिकून, त्याचा वापर आपल्या देशासाठी केला पाहिजे. आपण स्वदेशी वस्तूंचा वापर वाढवला पाहिजे. खुल्या धोरणाचा वापर आपण आपल्या सृजनशीलतेला आणि नवीन उपक्रम करण्याच्या विचारांना वाव देण्यासाठी केला पाहिजे.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास जागतिकीकरण या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास मित्र परिवार नातेवाईक व इतर जास्तीती जास्त लोकांपर्यंत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment