जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय Home remedies for diarrhea

जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय Home remedies for diarrhea – बहुतेक वेळा पावसामध्ये विविध रोगराईचे प्रमाण जास्त पसरतात. पावसामधील थंड वातावरणात वाफाळता चहा, गरमागरम कांदा भजी किंवा बटाटेवडे आणि त्यासारखे चमचमीत पदार्थ खाण्याचा मोह आपल्या सगळ्यांचाच होतो.

पण मग यामुळे आपल्याला अनेक पोटाचे विकार देखील होतात आणि त्यातला प्रामुख्याने होणारा विकार म्हणजे जुलाब.

या जुलाबावरती आपण घरच्या घरी कसे उपचार करू शकतो याबद्दलच आजच्या लेखाद्वारे माहिती जाणून घेणार आहोत, हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत वाचा.

जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय Home remedies for diarrhea

जुलाब होण्याची कारणे

 • पोटदुखी व जुलाब हे प्रामुख्याने का होतात ? तर याच्यासाठी कारणीभूत आहेत, बॅक्टेरियाच इन्फेक्शन, त्याचबरोबर फूड पॉइजनिंग, याबरोबरच अनेक प्रकारचे फूड ऍलर्जीस, लोकांना असतात. यामुळे पोट बिघडू शकते.
 • त्याचबरोबर वातावरण असे आहे की, त्याच्यामध्ये पोट हे शंभर टक्के बिघडते, जर तुम्ही बाहेरच खाल्लं किंवा दूषित पाणी तुम्ही पियाल असेल तर १००% तुमचे पोट जे आहे ते बिघडणार.
जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय

हे वाचा –

जुलाब होण्याची लक्षणे

 • पोटात दुखणे पोटामध्ये मुरडा येणे
 • अशक्तपणा येणे
 • उलटी होणे
 • भूक मंदावणे
 • मळमळ होणे
 • ताप येणे

जुलाब वर घरगुती उपाय १

जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय Home remedies for diarrhea – पावसाळ्यात पचनसंस्थेचे अनेक विकार होण्याची शक्यता वाढते. दूषित अन्न किंवा दूषित पाणी प्यायल्यामुळे, उघड्यावरचा अन्न खाल्ल्यामुळे, अनेकांना जुलाबाचा त्रास होतो. म्हणून आज आपण जुलाब म्हणजेच लूज मोशन यावर काय घरगुती उपाय केले पाहिजेत, याबद्दल माहिती घेणार आहोत.

 • जुलाब झाल्यास पुदिना अत्यंत परिणामकारक ठरतो. पुदिनाचा रस, लिंबाचा रस आणि मध प्रत्येकी एक एक चमचा घेऊन, हे मिश्रण दिवसातून तीन वेळा घेतल्याने, जुलाब थांबायला मदत होते.
 • तसेच जुलाबावर ताक देखील अत्यंत परिणामकारक ठरतं. एक ग्लास ताकामध्ये किंचित मीठ हळद आणि सुंठ शिंपडून घालून हे दिवसातून तीन वेळा घ्याव. याने पचनसंस्थेतील हानिकारक बॅक्टेरियाचा नाश होतो आणि त्यामुळे जुलाब थांबायला मदत होते.
 • जुलाबावर साबुदाण्याची खीर अत्यंत परिणामकारक ठरते. यांनी जुलाब तर थांबतातच पण, त्याचबरोबर जुलाबामुळे पोटाची कळ येत असते ती देखील थांबते. साबुदाण्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियमचे, प्रमाण खूपच चांगल आहे. त्यामुळे आपल्या शरीरातील इलेक्ट्रो लाईट्स बॅलन्स होतात आणि त्यामुळे जुलाबामुळे डीहायड्रेशनचा त्रास आपल्याला होत नाही.
 • जुलाब होत असतील तर शक्यतो लंघन करावे, म्हणजेच सॉलिड किंवा घनपदार्थ खाऊ नये. आपण अधून मधून साखर मिठाचे पाणी किंवा ओआरएस घेतलं पाहिजे, तसंच आपण अधून मधून लिंबू पाणी, शहाळ्याच पाणी, आरारूच पाणी, डाळिंबाचा रस, गाजराचा रस, घेतल पाहिजे.
 • तसंच बेलफळ आणि सफरचंद देखील जुलाबावर अत्यंत परिणामकारक ठरतात आणि मग हळूहळू आपण हलका आहार जसे कि, भाताची पेज, मुगाच्या डाळीची खिचडी, असा आपण खाल्लं पाहिजे.
 • तसंच जुलाब होत असतील तर पोटावर गार पाण्याच्या घड्या ठेवल्याने, देखील आराम मिळतो. तर मग या पावसाळ्यात पोट बिघडू नये किंवा जुलाब लागू नये, म्हणून स्वच्छता राखा. बाहेर अन्नपदार्थ किंवा पाणी पिऊ नका. पाणी नेहमी उकळून प्या. घरचं जेवण बनवताना देखील स्वच्छता राखा आणि आपला आरोग्य उत्तम ठेवा.
जुलाब वर घरगुती उपाय

जुलाब वर घरगुती उपाय २

जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय Home remedies for diarrhea – हल्लीची आपली लाईफ स्टाईल खूपच फास्ट झाली आहे. आपण सतत खूपच घाईत असतो. धगधग होते. बऱ्याच वेळा आपलं बाहेरचं खाणं पिणं होतं किंवा घरी सुद्धा चुकीच्या पद्धतीने खाणं होतं.

त्यामुळे अचानक बऱ्याच वेळा आपल पोट बिघडतं आणि जुलाब देखील होऊ शकतात. म्हणून आज आपण जुलाबावर काय घरगुती उपचार केले पाहिजेत, याबद्दल माहिती घेणार आहोत.

 • जुलाबा वर डाळिंबाचा रस अत्यंत परिणामकारक ठरतो. आपण दिवसभरात तीन-चार वेळा एकेक कप डाळिंबाचा रस घेत राहील पाहिजे. यांनी जुलाब थांबून आपल्याला लवकर आराम मिळेल.
 • तसंच जुलाब जर आपल्याला लागले असतील तर साखर मिठाचे पाणी दिवसभर सतत घेत राहणं अत्यंत गरजेचं ठरतं. आपण ओआरएस देखील घेऊ शकतो, यांनी जुलाब तर थांबतीलच पण त्याचबरोबर आपल्याला डीहायड्रेशनचा त्रास देखील होणार नाही.
 • जुलाबावर आलं देखील अत्यंत परिणामकारक ठरतं. दीड कप पाण्यामध्ये एक आल्याचा तुकडा ठेचून घालून, ते पाणी चांगलं उकळावं. मग हे पाणी थंड झाल्यावर त्यात एक चमचा मध घालून हे पाणी आपण दिवसातून दोन ते तीन वेळा घेतलं पाहिजे. याने पोटातील कळ थांबेल पचनसंस्थेचा कार्य सुधारेल आणि जुलाब थांबून आपल्याला लवकर आराम मिळेल.
 • जुलाब लागल्यावर शक्यतो लंगन करावं, म्हणजेच काही खाऊ नये. आपण द्रव पदार्थ किंवा लिक्विड पदार्थ घेऊ शकतो. आपण पेज, सूप, साबुदाण्याची खीर किंवा मुगाच्या डाळीची खिचडी घेऊ शकतो. याने आपल्याला लवकर आराम मिळेल.
 • तसंच अधून मधून आपण बेल फळाची कॅंडी किंवा सफरचंद देखील खाऊ शकतो. याने जुलाब लवकर थांबण्यास मदत होईल. तर मग आपलं पोट बिघडू नये जुलाब लागू नये. यासाठी बाहेरचे खाद्यपदार्थ आणि पाणी टाळा. पाणी शक्यतो गरम करूनच प्या आणि आपला आरोग्य उत्तम ठेवा.
Home remedies for diarrhea

जुलाब वर घरगुती उपाय ३

जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय Home remedies for diarrhea – पावसाळा आला म्हणजे अनेक प्रकारचे रोग आपल्याला होत असतात. कारण हे जे ढगाळ वातावरण असते, हे रोगांसाठी पोषक असते. त्यामुळे अनेक प्रकारचे विषाणू आपल्या शरीरात जातात व अनेक प्रकारचे रोग आपल्याला होत असतात.

तुम्ही जर बघितलं असेल दवाखान्यात तर त्यात प्रामुख्याने जे रुग्ण असतात, ते पोटाच्या विकाराचे असतात. उघड्यावरचे अन्न खाल्ल्याने, खराब पाणी पिल्याने, दूषित अन्न खाल्ल्याने, आपल्याला पोटाचे विकार होतात. त्यामध्ये जुलाब, पोट दुखी होणे, असे अनेक प्रकारचे पोटाचे विकार होतात.

 • पुदिना लिंबाचा रस याचबरोबर मध याचे मिश्रण करायचा आहे आणि ते दिवसातून चार वेळा कोमट पाण्यातनं घ्यायचा आहे. यांनी तुमची पोटदुखी व जुलाब दोन्हीही थांबेल आणि तुम्हाला लगेच आराम भेटेल.
 • एक ग्लास ताकामध्ये मीठ टाकायचा आहे, हळद टाकायची आहे, चिमूटभर त्याचबरोबर त्याच्यामध्ये सुंठ पावडर टाकायची आहे, याचे मिश्रण एकत्र करून घुसळून ते तुम्हाला सेवन करायचं आहे. हे तुम्ही दिवसातून तीन वेळा घ्या, याच्यामुळे काय होईल तुमची पोटदुखी थांबेल, त्याचबरोबर तुम्हाला होणारी जुलाब हि थांबतील.
 • साबुदाण्याची खीर खाल्ल्याने तुमच्या पोटास आराम मिळू शकतो. त्यामुळे जुलाब थांबण्यास मदत होते. त्याचबरोबर पोटदुखी थांबते. तर साबुदाण्याची खीर ही नक्की खावी. साबुदाणात प्रामुख्याने पोटॅशियम आढळतं, मॅग्नेशियम व कॅल्शियम आढळतात, याच्यामुळे तुमच्या शरीरातील इलेक्ट्रो लाईट्स जे आहेत ते बॅलन्स होतात. शरीरातील पाणी कमी होत नाही. त्यामुळे जुलाब होणाऱ्या, पोट दुखी होणाऱ्या व्यक्तीस अजिबात थकवा जाणवत नाही. शरीरातील पाणी ह्या साबुदाण्याच्या खिरीमुळे कमी होत नाही. म्हणूनच जर तुमचे पोट दुखत असेल, जुलाब होत असतील, तर प्रामुख्याने आहारामध्ये साबुदाण्याचे खीर जरूर असावी.
 • जर तुमचे पोट बिघडले असेल तर, प्रामुख्याने आहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला बदल करायला हवा. तुमच्या शरीरातील पाणी कमी होऊ नये, यासाठी तुम्हाला ज्यूस घ्यायचा आहे. ज्यामध्ये तुम्ही लिंबू सरबत घेऊ शकता. यामध्ये तुम्ही नारळ पाणी जास्त प्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही सफरचंद, गाजर, बीट, यांचा ज्यूस प्यायचा आहे. तुमच्या आहारात बदल केल्याने तुमचे जुलाब थांबतील. त्याचबरोबर तुम्हाला थकवा व तुमच्या शरीरातील पाणी कमी होणार नाही. म्हणूनच जास्तीत जास्त ज्यूस वर भर द्यावा
 • जर तुमचे खूप प्रमाणात पोट दुखत असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करता की गरम पाण्याची एक पिशवी घेता पोटावरती ठेवतात, तर तुम्हाला तसं करायचं नाही. कधी पण जर पोट दुखत असेल जास्त प्रमाणात किंवा कमी प्रमाणात तर मात्र तुम्हाला गरम पाण्याने किंवा गरम टॉवेलने वगैरे न शेकता, तुम्हाला थंड पाण्याने तुमचे पोट शेकायचे आहे. एक टॉवेल घ्यायचा, टॉवेल थंड पाण्यामध्ये बुडवायचा, त्याची घडी करायची व जिथे दुखत आहे तिथे ठेवायची आणि त्याच्यावरती हात ठेवायचा थोड्यावेळ करून बघा, तुम्हाला नक्की आराम मिळेल.
 • गुळाचा कोरा चहा करायचा, त्यामध्ये लिंबू पिळायचे किंवा साखरेचा किंवा गुळाचा करू शकता त्यामधील लिंबू पिळायचं आणि त्याचा सेवन दिवसातून तीन वेळा करायचं किंवा तासा तासाला केलं तरी चालतं, जर तुमची उष्णता भडकत असेल तर, तुम्ही दिवसातून तीन वेळा घ्या. सगळ्यात जालीम उपाय कोरी कॉफी करायची, त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं, त्याच्यामध्ये चवीसाठी साखर टाकायची, आणि गरम गरम मस्त पियायाची. दहा ते पंधरा मिनिटात तुमची पोट दुखी थांबेल.

जुलाब वर घरगुती उपाय ४

जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय Home remedies for diarrhea – सतत जुलाब होत असेल तर ते थांबवणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण जास्त जुलाब आणि उलट्या झाल्या तर, शरीरातील पाणी कमी होऊ शकते व हे अत्यंत धोकादायक आहे.

पाणी कमी झाल्यावर रुग्ण बेशुद्ध पडू शकतो, खूप अशक्तपणा येऊ शकतो, किंबहुना रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो. त्यामुळे जुलाब बंद होण्यासाठी ताबडतोब उपाय करणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही खालील उपाय करू शकता.

Home remedies for diarrhea

कोमट पाणी मीठ आणि साखर

कोमट पाणी केल्याने पाण्यात चुकून कोणतेही जंतू राहत नाही, ते नष्ट होतात. कोमट करून पाणी थंड करून घेऊन, त्यामध्ये सहा चमचे साखर टाकावी व 1/2 चमचा मीठ टाकावे.

याचे संपूर्ण मिश्रण तयार करून ठेवावे आणि जेव्हा जुलाब किंवा उलट्या होतील, त्यानंतर रुग्णास ते पिण्यास द्यावे. यामुळे पाणी आणि ग्लुकोज भरून निघण्यास मदत होईल.

आल्याचा रस, लिंबू रस व मिरी पावडर

आल्याचा रस आणि लिंबू रस तसेच मिरी पावडर हे जुलाब बंद करण्यासाठी आणि झालेली हानी भरून काढण्यासाठी, प्रभावीपणे काम करते.

एक ग्लास पाणी आणि त्यात दोन चमचे अद्रकाचा रस, एक चमचा लिंबू रस, दोन चिमूटभर मिरे पावडर टाकावी आणि आवडीनुसार साखर टाकून हे मिश्रण ढवळून जुलाब झालेल्या व्यक्तीस पिण्यास द्यावे.

अद्रक आणि लिंबू हे शरीरातील सर्व बॅक्टेरियल इन्फेक्शन दूर करण्यास मदत करते.

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे देखील जुलाब बंद होण्यासाठी अनुकूल काम करतात. त्यामुळे मेथी दाणेचा जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय म्हणून जास्त प्रमाणात वापर केला जातो.

त्यासाठी दोन चमचे मेथी दाणे घ्यावे आणि जवळपास एक ग्लासभर पाण्यात भिजत ठेवावे. त्यानंतर हे भिजलेले दाणे आणि ते गरम पाणी करून कोमट झाल्यावर गाळून प्यावे.

तुम्हाला वाटल्यास त्यात साखर देखील टाकू शकता. या उपायाने जुलाब पातळ होणे बंद होते.

जिरे

मेथी दाणे प्रमाणे जिरे देखील जुलाब बंद होण्यास मदत करतात. त्यासाठी जिरे पाण्यात भिजत घालावे आणि मग पाणी गरम करून कोमट किंवा थंड झाल्यावर थोडा थोडा वेळाने प्यावे.

याने पोट दुखी देखील कमी होते आणि पातळ शौचास होणे देखील थांबते.

दही

जुलाब होत असल्यास दही खावे. कारण दही मध्ये मूल्यत:च लॅक्टिक ऍसिड असते. ते जुलाबाचे बॅक्टेरिया शरीरातून संपवण्याचे काम करतात.

त्यामुळे जुलाब होत असल्यास सौम्य आहार घेतल्यानंतर, दही साखर खावे. यामुळे परत परत जुलाब होणे बंद होते.

ओआरएस इलेक्ट्रॉल पाणी देणे

जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय Home remedies for diarrhea – सतत उलट्या आणि शौच झाल्याने शरीरातील पाणी कमी होते. सोडियम, पोटॅशियम आणि क्षार यांचे प्रमाण देखील कमी होते.

या सर्व कारणांमुळे डीहायड्रेशन होऊ शकते आणि यामुळे चक्कर, बेशुद्ध पडणे, अतिशय अशक्तपणा वाटणे, अश्या समस्या निर्माण होऊ शकतात. यासाठी कोणत्याही मेडिकल स्टोर मध्ये ओआरएस चे पॅकेट मिळते, ते घ्यावे.

याने शरीराला सोडियम आणि पोटॅशियम मिळते आणि होणारी झीज भरून निघण्यास मदत होते .तसेच जुलाब होणे देखील बंद होते. अशाप्रकारे वरील सर्व घरगुती उपाय करून तुम्ही जुलाब होणे बंद करू शकता.

जुलाब होत असल्यास कोणता आहार घ्यावा ?

 • गरम गरम तूप भाताची पेज बनवायची आणि ती खायची. ज्यामुळे तुमच्या शरीरातील इलेक्ट्रिक लाईटचे जे प्रमाण आहे ते बॅलन्स होतात.
 • आहारात दह्याचं प्रमाण जास्त ठेवायचे, ज्यामुळे तुमची पोट दुखी व जुलाब थांबण्यास मदत होते. पचनास जड असणारे पदार्थ पूर्णपणे तुम्हाला वर्ज आहेत.
 • त्याचबरोबर घरात सुद्धा स्वच्छता ठेवा, संपूर्ण फरशा एका जंतुनाशकाने पुसून घ्या. पावसाळ्यात कोपरान कोपरा स्वच्छ ठेवा. ज्यामुळे तुम्हाला पॉजिनिंग होणार नाही. जर वरील उपायांनी तुमचे पोट दुखी बरी होत नाही तुमचे जुलाब थांबले नाहीत तर, जवळील डॉक्टरांना नक्की भेटा. ज्यामुळे जर काही प्रॉब्लेम असेल तर ते सोडवतील.

जुलाब होत असल्यास घ्यावयाची काळजी

जुलाब बंद होण्यासाठी घरगुती उपाय Home remedies for diarrhea –

 • पुरेसे पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा.
 • तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अन्नाची ऍलर्जी आहे का ते जाणून घ्या आणि ते टाळा.
 • तुम्हाला फळे आणि फळांचा रस टाळावा लागेल कारण डायरिया दरम्यान फ्रक्टोज पचणे कठीण आहे.
 • आरोग्यदायी अन्नाचे सेवन करा.
 • दारू टाळा.
 • फायबर युक्त आहार घ्या ज्यामध्ये ब्रोकोली, मटार, केळी इत्यादींचा समावेश आहे.

FAQ

१. जुलाब वर घरगुती उपाय कोणते ?

जुलाब झाल्यास पुदिना अत्यंत परिणामकारक ठरतो. पुदिनाचा रस, लिंबाचा रस आणि मध गरम गरम तूप भाताची पेज बनवायची आणि ती खायची. ज्यामुळे तुमच्या शरीरातील इलेक्ट्रिक लाईटचे जे प्रमाण आहे ते बॅलन्स होतात.

आहारात दह्याचं प्रमाण जास्त ठेवायचे, ज्यामुळे तुमची पोट दुखी व जुलाब थांबण्यास मदत होते. पचनास जड असणारे पदार्थ पूर्णपणे तुम्हाला वर्ज आहेत.
त्याचबरोबर घरात सुद्धा स्वच्छता ठेवा, संपूर्ण फरशा एका जंतुनाशकाने पुसून घ्या. पावसाळ्यात कोपरान कोपरा स्वच्छ ठेवा.
ज्यामुळे तुम्हाला पॉजिनिंग होणार नाही. जर वरील उपायांनी तुमचे पोट दुखी बरी होत नाही तुमचे जुलाब थांबले नाहीत तर, जवळील डॉक्टरांना नक्की भेटा. ज्यामुळे जर काही प्रॉब्लेम असेल तर ते सोडवतील.प्रत्येकी एक एक चमचा घेऊन, हे मिश्रण दिवसातून तीन वेळा घेतल्याने, जुलाब थांबायला मदत होते.

तसेच जुलाबावर ताक देखील अत्यंत परिणामकारक ठरतं. एक ग्लास ताकामध्ये किंचित मीठ हळद आणि सुंठ शिंपडून घालून हे दिवसातून तीन वेळा घ्याव. याने पचनसंस्थेतील हानिकारक बॅक्टेरियाचा नाश होतो आणि त्यामुळे जुलाब थांबायला मदत होते.
जुलाबावर साबुदाण्याची खीर अत्यंत परिणामकारक ठरते. यांनी जुलाब तर थांबतातच पण, त्याचबरोबर जुलाबामुळे पोटाची कळ येत असते ती देखील थांबते. साबुदाण्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियमचे, प्रमाण खूपच चांगल आहे.
त्यामुळे आपल्या शरीरातील इलेक्ट्रो लाईट्स बॅलन्स होतात आणि त्यामुळे जुलाबामुळे डीहायड्रेशनचा त्रास आपल्याला होत नाही.
जुलाब होत असतील तर शक्यतो लंघन करावे, म्हणजेच सॉलिड किंवा घनपदार्थ खाऊ नये.

२. जुलाब होत असल्यास कोणता आहार घ्यावा ?

गरम गरम तूप भाताची पेज बनवायची आणि ती खायची. ज्यामुळे तुमच्या शरीरातील इलेक्ट्रिक लाईटचे जे प्रमाण आहे ते बॅलन्स होतात.
आहारात दह्याचं प्रमाण जास्त ठेवायचे, ज्यामुळे तुमची पोट दुखी व जुलाब थांबण्यास मदत होते.
पचनास जड असणारे पदार्थ पूर्णपणे तुम्हाला वर्ज आहेत.
त्याचबरोबर घरात सुद्धा स्वच्छता ठेवा, संपूर्ण फरशा एका जंतुनाशकाने पुसून घ्या. पावसाळ्यात कोपरान कोपरा स्वच्छ ठेवा. ज्यामुळे तुम्हाला पॉजिनिंग होणार नाही. जर वरील उपायांनी तुमचे पोट दुखी बरी होत नाही तुमचे जुलाब थांबले नाहीत तर, जवळील डॉक्टरांना नक्की भेटा. ज्यामुळे जर काही प्रॉब्लेम असेल तर ते सोडवतील.

३. जुलाब झाल्यास ओआरएस इलेक्ट्रॉल पाणी का द्यावे ?

सतत उलट्या आणि शौच झाल्याने शरीरातील पाणी कमी होते. सोडियम, पोटॅशियम आणि क्षार यांचे प्रमाण देखील कमी होते. या सर्व कारणांमुळे डीहायड्रेशन होऊ शकते आणि यामुळे चक्कर, बेशुद्ध पडणे, अतिशय अशक्तपणा वाटणे, अश्या समस्या निर्माण होऊ शकतात.
यासाठी कोणत्याही मेडिकल स्टोर मध्ये ओआरएस चे पॅकेट मिळते, ते घ्यावे. याने शरीराला सोडियम आणि पोटॅशियम मिळते आणि होणारी झीज भरून निघण्यास मदत होते .तसेच जुलाब होणे देखील बंद होते. अशाप्रकारे वरील सर्व घरगुती उपाय करून तुम्ही जुलाब होणे बंद करू शकता.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास जुलाब वर घरगुती उपाय दिले आहे. हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमचे मित्र परिवार, नातेवाईक व इतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment