पोपट पक्षी माहिती मराठी Parrot In Marathi – पोपट पक्षी हे जगभरात आढळणारे रंगीबेरंगी पक्षी आहेत. दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये आढळणाऱ्या पोपटांना न्यू वर्ल्ड पोपट म्हणतात, तर आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये जुने पोपट आहेत.
पक्ष्यांमध्ये सर्वात सुंदर व बहुसंख्य लोकांच्या पसंतीचा जर कोणता पक्षी असेल तर तो आहे पोपट. पोपटाला इंग्रजीत parrot म्हटले जाते. पोपट (Parrot) हे वेगवेगळ्या रंगीबिरंगी रंगांचे असतात. हा एक बुद्धिमान पक्षी आहे ज्याला तुम्ही बोलून शिकवू देखील शकता. असे म्हटले जाऊ शकते की त्याच्याकडे 5 वर्षांच्या मुलाइतकीच बुद्धिमत्ता आहे.
पोपट जवळपास संपूर्ण जगात आढळतात. जगभरात पोपटांच्या 350 पेक्षा जास्त जाती आहेत. आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास पोपट पक्ष्याबद्दल माहिती दिली आहे हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
पोपट पक्षी माहिती मराठी Parrot In Marathi
पोपटाचा परिचय
पोपटाचे वैज्ञानिक नाव | Psittaciformes |
पोपटाचे वजन | साधारणपणे ६० ग्राम ते ४ kg पर्यंत देखील असू शकते. |
पोपटाचे आयुष्य | २५ ते ३० वर्ष ( प्रजातीमध्ये वेगळे असू शकते ) |
रंग | हिरवा आणि लाल, पिवळा, निळा, काही अन्य |
पोपटाची लांबी | ८.६ सेमी ते १०० सेमी |
पंखांची लांबी | सरासरी १५-१८ सेंमी |
मुख्य आहार | फळे, बियांचे, बीज, मिरची |
हे वाचा –
- केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय
- बहुगुणी कोरफडीचे फायदे
- हर्निया म्हणजे काय
- हळदीची माहिती
- गुळवेल माहिती मराठी
- शाळकरी मुलांचा आहार कसा असावा ? मातांनी नक्की वाचा …
- डोळे जड होण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय
पोपट पक्ष्याबद्दल सविस्तर माहिती

पोपट पक्षी माहिती मराठी Parrot In Marathi – पोपट पक्षी हा खूपच सुंदर रंगीबेरंगी पक्षी आहे. दक्षिण अमेरिकेत व ऑस्ट्रेलियात यांच्या अनेक विविध जाती आणि प्रकार आढळतात. त्याचा रंग सामान्यतः हिरवा असतो. त्याला लाल रंगाची वक्र चोच असते. तो लहान मुलांना खूप आवडतो. तो झाडांच्या ढोलीत राहतो.
मिठू मिठू असा आवाज काढत, पोपट पक्षी अगदी सुंदर रित्या आपले भाव व्यक्त करतो. पिंजऱ्यात अडकून पडणे हेच पोपटाच्या गोड बोलण्याचे फळ म्हणावे लागेल, त्याच्या माने भोवती काळा रंगाचे वलय असते. तो एक शाहाकारी पक्षी आहे. दाणे, फळे, पाने, बिया आणि शिजवलेला भात सुद्धा पोपट आवडीने खातो.
मिरची, आंबा, पेरू आणि कठीण कवचाची फळे पोपटाला प्रचंड आवडतात. पोपट संघचारी म्हणजेच गटाने एकत्र राहणे पोपटाला आवडते व सगळ्या पक्षांमध्ये अतिशय गोंगाट करणारे पक्षी म्हणून पोपट ओळखले जातात. निरनिराळ्या प्राण्यांच्या आणि पक्षांच्या आवाजाची पोपट अगदी हुबेहूब नकल करू शकतात. पोपट ३० ते ४० वर्षे जगतात.
काही पोपट पक्षी जास्त वर्ष सुद्धा जगतात. पोपट समूहाने जेव्हा एकत्र उडतात, तेव्हा ते दृश्य पाहण्यासारखे, विलोभनीय असते. पोपट खूप हुशार व बुद्धिमान प्राणी पक्षी आहे. त्यामुळे तो शिकवलेली कोणतीही भाषा अगदी सहजरीत्या अवगत करतो. त्याला पक्षांचा पंडित म्हणून सुद्धा ओळखले जाते.
भारतातील लोक पोपटाला राम राम, सीताराम, नमस्ते आणि स्वागतम, यांसारखे शब्द शिकवतात. माणसाच्या आवाजाची नक्कल सुद्धा पोपट अगदी हुबेहूब करू शकतो. बरेच लोक पोपटाला कसरती करणे शिकवतात. भविष्य सांगणाऱ्या लोकांसाठी आणि सर्कस मध्ये काम करण्यासाठी पोपट हा उपयोगी ठरतो. सर्वांचे मनोरंजन करणे हे पोपटाचे अगदी मनोभावाचे काम आहे.
पोपट पक्षी हा एक सुंदर व अति आकर्षक पक्षी आहे. त्याच्या सुरक्षेतेसाठी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना केली गेली आहे. मनुष्य आपल्या जीवनासाठी जंगलतोड करणे, वृक्षतोड करणे, इत्यादी. चुकीच्या गोष्टी करून प्राणीमात्रांवर व पशुपक्ष्यांवर हल्ला करत आहे, त्यामुळे पोपट तसेच सर्व पक्षांचे जीवन हे आता धोक्यात आलेले आहे.
आपल्याला त्यासाठी वेळीच उपाय करणे गरजेचे आहे, अन्यथा काही काळानंतर आपणास या पक्षांची जाती व प्रजाती पाहण्यास मिळणार नाही, ते लुप्त होऊन जातील. यामुळे त्यांची काळजी घेणे व पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.
पोपट पक्षी हा जगातील सर्वात प्रसिद्ध पक्षी आहे, ज्याला पाळीव पक्षी म्हणून सुद्धा ओळखले जाते. पोपट या पक्षाच्या प्रजातीतील अतिशय सुंदर पक्षी म्हणून ओळखला जातो. पोपट माणसासारखा आवाज करून, त्याचे अनुकरण करू शकतो. तो काहीही लक्षात ठेवू शकतो.
त्याच्याकडे पाच वर्षाच्या मुलासारखी बुद्धी असते. पोपटाचे वैज्ञानिक नाव सिट्टसिफोर्मस आहे. पोपट हा एक असा पक्षी आहे, जो जोरातून शब्द बोलू शकतो. पोपट फक्त फळेच नाही, तर भाज्याही मोठ्या उत्साहाने खातात.
भाज्यांमध्ये पोपटाला मिरची जास्त आवडते, तसेच पोपट इतर भाज्या देखील खातात. पोपट आपण जे काही खातो ते सर्व खातात. परंतु पोपटांना चॉकलेट देऊ नये.
पोपट पक्षी ते अन्न आपल्या पंजात धरतात आणि नंतर ते आपल्या चोचीने तोडून खातात. पोपट हा एकमेव पक्षी आहे, जो आपल्या पंजात धरून अन्न खातो. नर आणि मादी पोपट एकसारखे दिसतात. त्यांचे लिंग ओळखणे कठीण आहे. स्त्री पुरुष ओळखण्यासाठी, रक्त तपासणी आवश्यक आहे.
पोपटांच्या काही प्रजातींमध्ये नर आणि मादी वेगळे केले जाऊ शकतात. सरासरी पोपटांचे आयुष्य सुमारे ५० वर्षे असते. नर आणि मादी पोपट जोडीने राहतात. ते आयुष्यभर जोडतात. प्रजनन हंगामानंतर नर व मादी एकत्र राहतात. जोडीदाराचा मृत्यू झाल्यावर ते कंपनी सोडतात.
पोपटाचा अधिवास म्हणजे पोकळ झाडे, ज्यांना पोकळ म्हणतात. या पोकळामध्ये पोपट दोन ते आठ अंडी घालते. ज्याचा रंग पांढरा आणि आकार गोल असतो. सुमारे २० ते ३० दिवसानंतर अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. अंडी धारण करण्याचे काम नर आणि मादी दोघेही करतात.
पोपटाची मुले जन्मतःच आंधळी असतात. त्यांचे डोळे सुमारे दोन आठवडया नंतर उघडतात. पोपटांना प्रौढ आणि शहाणे व्हायला वेळ लागतो, सुमारे एक ते दोन वर्षानंतरच त्यांची समज विकसित होते.
काही पोपटांच्या मानेवर लाल वर्तुळ असते. या पोपटांना थ्रोटेड पोपट म्हणतात. आफ्रिकन ग्रे नावाचा पोपट ६० वर्षे ही जगू शकतो. मकाऊ पोपट सुमारे २५ वर्षे जगतात. पाळीव पोपटांचे आयुष्यात जंगली पोपटांपेक्षा जास्त असतं. १७२८ शब्द लक्षात ठेवणाऱ्या पक नावाच्या पोपटाचा जागतिक विक्रम आहे.
आतापर्यंत पोपटाच्या ३५० हून अधिक प्रजातींचा शोध लागला आहे. पॅराकिट, लव बर्डस, क्वेकर, कोकाटू, मॅकॉज, बजरीगर, ॲमेझॉन पोपट असे काही मुख्य पोपटांचे प्रजाती आहेत. पॅराकिट हा सामान्यतः आढळणारा पोपट आहे. जगातील सर्वात लहान पोपटाचे नाव पिग्मी आहे, जो बोटांच्या आकाराचा असतो, त्याचे वजन १० ग्रॅम आणि आकार ८ सेंटीमीटर आहे.
हा पोपट पक्षी पपई, न्यू गीनीचा जंगलातील रहिवासी आहे. “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मध्ये ८२ वर्ष जगलेल्या पोपटाचे नाव नोंदवलेल आहे, या पोपटाचे नाव कुकी होते. काकापो नावाच्या पोपटाचे वजन इतके असते की, तो नीट उडूही शकत नाही, त्यामुळे तो वन्य प्राण्यांचा सहज स्वीकार होतो.
काकापो नावाच्या पोपटाचे वजन सुमारे ४ किलो असते आणि ते दोन फूट लांब असतात. हा पोपट पक्षीदिवसा झोपतो आणि रात्री अन्न शोधतो. अति शिकारीमुळे ही प्रजाती नष्ट होण्यास मार्गावर आहे. पोपट इतर पक्षांपेक्षा वेगाने उडतो. काही लोक आपल्या घरात पोपट पिंजऱ्यात ठेवतात.
पोपट काय खातो
पोपट पक्ष्याचे आवडते खाद्य खालीलप्रमाणे आहे.
- पेरू
- शिजलेला भात
- कीटक
- मिरची
- फळ
- बियाणे
- धान्य
पोपटाच्या विविध जाती
भारतात पोपटांच्या पाच ते सहा जाती आहेत. यांपैकी तीन सर्वत्र आढळून येतात तसेच बाकीच्या काही विशिष्ट प्रदेशांपुरत्याच मर्यादित आहेत.

तोता
या जातीच्या पोपटाचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला सायानोसेफाला असे आहे. हिमालायात १,८३० मी. उंचीपर्यंत तो दिसून येतो. बी व रानफळे हे यांचे मुख्य खाद्य होय.
राघू किंवा कीर यांच्यापेक्षा हा जास्त वेगाने उडतो. याचा आवाज ‘ट्युई ट्युई’ असा काहीसा असून मंजूळ असतो. तोता साळुंकीएवढा असतो. यांचा प्रजोत्पादनाचा काळ जानेवारीपासून मेपर्यंत असतो.
राघू
या जातीच्या पोपटाचे शास्त्रीय नाव सिटॅक्युला यूपॅट्रिया असे आहे. ज्याठिकाणी मोठे मोठे वृक्ष दिसून येतात त्या ठिकाणी ते आढळून येतात. मनुष्य राहतो त्या ठिकाणी असलेली मोठी झाडे, शेते, बागा यांत तो वरचेवर येतो. हा पोपट कबुतराएवढा असतो.
रंग वरच्या बाजूला गवती हिरवा आणि खालच्या बाजूला फिकट हिरवा, डोके मोठे, चोच लाल, आखूड, मजबूत आणि वाकडी, खांद्यावर तांबडा पट्टा, मानेच्या भोवती गुलाबी कडे असून पुढच्या बाजूला ते काळ्या पट्ट्याने चोचीच्या बुडाला जोडलेले असते. शेपूट लांब व टोकदार असते. त्याच्या मादीच्या मानेभोवती गुलाबी वलय नसते.
कीर
याचे शास्त्रीय नाव असे आहे. मैदानी प्रदेशात व डोंगरांवर १,५२५ मी. उंचीपर्यंत हा आढळतो. या पोपटाच्या आवाजावरून त्याला कीर असे नाव दिले असावे असे दिसते. डोंगरांवर, मैदानी प्रदेशात १,५२५ मी. उंचीपर्यंत हा आढळतो.
विरळ जंगलांत, शेतांत, त्याचप्रमाणे गावांत व खेड्यांत हा नेहमी आढळत असल्यामुळे हा सगळ्यांच्या माहितीचा आहे. हा बोलायला शिकतो; त्याचप्रमाणे कसरतीचे बरेचसे खेळ,बंदूक उडविणे, मशाल वाटोळी फिरविणे वैगेरे खेळ त्याला शिकविले, तर तो ते करून दाखवतो. प्रजोत्पादनाचा काळ फेब्रुवारीपासून एप्रिलपर्यंत असतो.
पोपटाची मादी
मादी दर खेपेला २-५ अंडी घालते. अंडी लहान असून पांढऱ्या रंगाची असतात. तीन आठवड्यानंतर अंडी फुटून पिले बाहेर पडतात. ती केवळ मासांच्या गोळ्यांसारखी असून दुबळी असतात. आईबाप आपल्या अन्नपुटातले अर्धवट पचलेले शाकान्न बाहेर् काढून त्यांना भरवितात.नर व मादी दोघेही पिलांचे संगोपन करतात.

पोपटाविषयी कविता
पाळींव पोपटास
हे डाळिंबाचे दाणे वेड्या ! घात तुझा करिती ll ध्रुo ll
फोडिलीस एका काळीं
ती चोंच आज बोथटली
करितोस गुजारा धनी टाकितो त्या तुकड्यांवरती ll १ ll
मालक तव हौशी फार
करि माया जरि अनिवार
कुरवाळी वारंवार
तूं पाळिंव पोपट त्याचा म्हणुनी तुच्छ तुला गणिती ll २ ll
चैनींत घेत गिरक्यांसी
स्वच्छंदें वनिं फिरलासी
गगनांत स्वैर उडलासी
फळ दिसेल ते फोडावें
ते स्वातंत्र्याचे दिन सोन्याचे आठव तूं चित्तीं ll ३ ll
चाहिल तें झाड बघावें
त्यावरी स्वैर उतरावें
फळ दिसेल तें फोडावें
मग उडुनी जावें खुशाल, असली तेव्हांची रीती ll ४ ll
कितितरी फळें पाडाचीं
चोंचीनें फोडायाचीं
हि लीला तव नित्त्याची
पिंजऱ्यांत अडकुनि आयुष्याची झाली तव माती ll ५ ll
पूर्वीची हिंमत गेली
स्वत्वाची ओळख नुरली
नादान वृत्ति तव झाली
करितोस धन्याची ‘हांजी हांजी’ तूं पोटासाठीं ll ६ ll
येतांच धनी नाचावें
नाचत त्या सत्कारावें
तो वदेल तें बोलावें
तेव्हांच टाकितो मालक दाणे असले तुजपुढतीं ll ७ ll
हे दाणे दिसती छान
जरि लाल आणि रसपूर्ण
त्याज्य ते विषासम जाण
पिंजऱ्यांत मिळती म्हणुनि तयांची मुळिं नाही महती ll ८ ll
हा अध:पात तव झाला
डाळिंबची कारण याला
भुलुनियां अशा तुकड्यांला
पिंजऱ्यांत मेले किती अभागी पोपट या जगतीं ll ९ ll
— काव्यविहारी (धोंडो वासुदेव गद्रे)

वास्तूशास्त्राप्रमाणे घरात पोपट पाळणे शुभ कि अशुभ
प्रत्येकाच्या हौशी वेगवेगळ्या असतात. काही लोकांना घरात पक्षी पाळायला खूप आवडते, असाच सगळ्यांचा आवडता पक्षी म्हणजे पोपट. बरेच लोक आपल्या घरात पोपट पाळतात पोपट पक्षी दिसायला जितका सुंदर असतो, तितकाच त्याचा आवाज मनाला भुरळ घालतो.
पोपट पक्षी अगदी घरातला सदस्य होऊन जातो. प्रत्येकाला त्याचा लळाला लागतो, पण आजही बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की, घरात पोपट पाळणे शुभ असते की अशुभ, कारण प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी शास्त्रीय कारण असतात. चला तर मग जाणून घेऊयात, घरात पोपट पक्षी पाळणे शुभ आहे की अशुभ.
मित्रांनो प्राणी आणि पक्षी हे खरोखरच या जगातील सर्वात आश्चर्यकारक प्राणी आहेत आणि यात काही शंका नाही की, आपल्याला असे पाळीव प्राणी पाळले पाहिजे जे आपल्याला प्रेमाचे वातावरण देते. पाळीव प्राणी घरात आनंदी आणि सुंदर वातावरण निर्माण करण्यास मदत करतात.
बहुतेक लोक पाळीव प्राणी आणि पक्षी त्यांच्या घरात ठेवतात. ज्याप्रमाणे माणसांना प्राण्यांमध्ये कुत्र्यांबद्दल ओढ असते, त्याचप्रमाणे माणसांना पक्षांमध्ये पोपटाची ओढ असतेच. पोपट पक्षी पाळणे काहींसाठी शुभ तर, काहींसाठी अशुभ असते असे म्हटले जाते. वास्तुशास्त्रात घराच्या उत्तर दिशेला पोपट किंवा पोपटाचे चित्र ठेवणे खूप शुभ मानले जाते.
असे मानले जाते की, यामुळे मुलांना अभ्यासात रस निर्माण होतो आणि त्यांची स्मरणशक्ती वाढते. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या घरात पोपट पाळला तर रोगांचा धोका घरात कमी होतो आणि लोकांच्या मनातील निराशा देखील कमी होते.
जर तुम्ही घरात पोपट ठेवला किंवा त्याचे चित्र लावले तर, घरात राहू, केतू आणि शनीची वाईट नजर तुमच्या घरावर पडत नाही. पोपट पाळल्याने घरात कोणाचाही अकाली मृत्यू होत नाही. जर घरामध्ये पिंजऱ्यात पोपट ठेवला असेल तर त्याचे आनंदी राहणे खूप आवश्यक आहे, अन्यथा पोपट रागावला तर तो तुमच्या घराला शाप देऊ शकतो, ज्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
पोपट पक्षी पाळल्याने पती-पत्नीचे नाते सुधारते, त्यांच्यामध्ये प्रेम अजून वाढते, यासोबतच वातावरणात सकारात्मकता अजून वाढते. जर एखाद्याच्या कुंडलीत पोपट नसेल आणि त्याने पोपट पाळला तर ते उधळपट्टीचे कारण असू शकते.
असेही म्हटले जाते की जर, पोपट पक्षी आनंदी नसेल तर, तो त्याच्या मालकांना शाप देतो. कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला ओलीस ठेवणे योग्य नाही, एखाद्याच्या घरात भांडणाचे वातावरण असेल तर, पोपट पक्षी ते शब्द ऐकतो आणि पुन्हा सांगतो, अशा पोपटाचे फळ शुभ नसते.
पोपट पक्ष्याबद्दल १० ओळी
- पोपट पक्षी एक विश्वासघाती पक्षी म्हणून ओळखला जातो, कारण आपण त्याला कितीही काळापर्यंत पाळीव ठेवले, तरीही जेव्हा आपण त्याला पिंजऱ्याच्या बाहेर सोडतो, तेव्हा तो मालकाकडे पलटून बघत नाही.
- पोपट पक्षी हा असा एकमेव पक्षी आहे, जो पायाचा उपयोग करून आपल्या चोचीपर्यंत अन्न नेऊ शकतो.
- पोपट पक्षी आपल्या प्रमाणे त्यांच्या पिल्लांची नावे ठेवतो आणि ती नावे जीवन भरासाठी असतात.
- जगातील सर्वात मोठा पोपट पक्षी दक्षिण अमेरिका मध्ये आढळतो, ज्याचं नाव आहे हायसिंथ मॅकव्ह पॅरट असे आहे. ज्याची लांबी जवळजवळ एक मीटर आहे.
- जगातील सर्वात वजनदार पोपट पक्षी न्यूझीलंड मध्ये आढळतो, ज्याचे नाव काकापो आहे, ज्याचे वजन दोन ते चार किलोग्रॅम असते.
- जगातील सर्वात लहान पोपट बफ फेस पॅगमाय पॅरट आहे, जो इंडोनेशिया आणि पापुआ न्युगीनी मध्ये आढळतो, ज्याचे वजन फक्त ११.५ gram असते.
- काकापो जगातील एकमेव असा पोपट पक्षी आहे जो उडू शकत नाही, हे त्याच्या मोठ्या शरीरामुळे शक्य नाही. जगातील सर्वात जास्त शिकलेला पक नावाचा पोपट आहे. हा शब्दकोशातील १७२८ शब्द वाचू शकतो, जे एक विश्व रेकॉर्ड आहे.
- जगभरामध्ये पोपट पक्षाच्या जवळ जवळ ३९३ प्रजाती आढळतात. पोपट हा पक्षी दक्षिण आणि मध्य अमेरिका आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया सहित सर्व उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळतो. मादा पोपटाला हेन म्हणतात आणि नर पोपटाला कॉक म्हणतात आणि पोपटाच्या पिल्लाला चीक म्हणतात.
- भारतामध्ये पोपट या पक्षाच्या जवळजवळ १२ प्रजाती आढळता.त कुत्रा आणि मांजर यानंतर सर्वात जास्त पाळीव जीव पोपट आहे, कारण हा पक्षी बुद्धिमान आणि रंगीबेरंगी असतो.
- वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, सर्वात पहिले पोपट जवळजवळ ५० मिलियन वर्षांपूर्वी आढळला होता. प्रजातीनुसार पोपट या पक्षाचा जीवन काळ १० ते ९५ वर्षाच्या मध्ये असतो. इंडोनेशियामध्ये आढळणारी पोपटाची प्रजाती गणितीय उत्तरे सुद्धा सोडू शकते.
- पोपटापक्षी एक सामाजिक पक्षी आहे, जो नेहमी दहा ते तीस पक्षांच्या समूहामध्ये राहतो, म्हणजेच तो मांस आणि वनस्पती दोन्ही खाऊ शकतो. त्याच्या आहारामध्ये बिया, फळे, कळ्या आणि अन्य जीव सुद्धा सामील असतात. बिया हे पोपटाचे आवडते अन्न आहे आणि कठोर बिया उघडण्यासाठी पोपटाची चोच मजबूत असते.
- काही खाद्यपदार्थ पोपटाला आजारी पडू शकतात किंवा त्यांच्या मृत्यूचे कारण सुद्धा बनू शकतात. या खाद्यपदार्थांमध्ये सफरचंदाच्या बिया, कांदा आणि चॉकलेट इत्यादी सामील आहेत. पोपटाची चोच कॅरेटिनने बनलेली असते. जशी की मनुष्याची केस आणि नखे. त्यामुळे ती तुटल्यानंतर सुद्धा परत वाढते आणि नेहमी त्यांची चोच ही खराब होत असते.
- पोपट पक्षाची दृष्टी खूप तेज असते, त्याचे डोळे मेंदूमध्ये उंच ठिकाणी असल्यामुळे, तो डोके हलवू शकतो व आपल्या आजूबाजूला आणि आपल्या चोचीच्या बरोबर खाली सहजपणे पाहू शकतो.
- पोपटाचा हवेत उडण्याचा वेग १५ ते २५ मेल प्रति तास म्हणजेच २४ ते ४० किलोमीटर प्रति तास असतो. पोपट साधारणपणे एका वेळेस २ ते ८ पांढऱ्या रंगाची अंडी देतो. पोपटाचे अधिकांशी प्रजातीमध्ये अंडी सांभाळण्याची काम मादी करते. प्रजातीनुसार त्याचा कालावधी १७ ते ३५ दिवसांचा असतो. पाम कॉकटस या प्रजातीचा प्रजनन दर फार कमी असतो, ही प्रजाती प्रत्येक दुसऱ्या दिवशी फक्त एक अंडी देते, जेव्हा पोपटाला पिल्ले होतात. तेव्हा इतर पक्षांप्रमाणे त्यांची डोळे उघडे असतात, परंतु त्यांना पंख नसतात. दोन ते तीन आठवड्यानंतर पंख येण्यास सुरुवात होते.
- अधिकांशी नर आणि मादी पोपटाला ओळखणे सोपे नसते, हा पक्षी इतर पक्षांप्रमाणे घरटे बनवत नाही, हा झाडावरती राहतो. जगातील मोंक पाराकीट ही एकमेव पोपटाची प्रजाती घरटे बनवते. काकापो ९५ वर्षे सरासरी जीवन काळ जगणारा जगातील सर्वात जास्त काळ जिवंत राहणारा पोपट आहे जितके वेगाने वाघ धावू शकतो इतक्या वेगाने हा पोपट हवेत उडू शकतो.
FAQ
१. वास्तूशास्त्राप्रमाणे पोपट घरात पाळणे शुभ कि अशुभ आहे ?
जर तुम्ही घरात पोपट ठेवला किंवा त्याचे चित्र लावले तर, घरात राहू, केतू आणि शनीची वाईट नजर तुमच्या घरावर पडत नाही. पोपट पाळल्याने घरात कोणाचाही अकाली मृत्यू होत नाही. जर घरामध्ये पिंजऱ्यात पोपट ठेवला असेल तर त्याचे आनंदी राहणे खूप आवश्यक आहे, अन्यथा पोपट रागावला तर तो तुमच्या घराला शाप देऊ शकतो, ज्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पोपट पाळल्याने पती-पत्नीचे नाते सुधारते, त्यांच्यामध्ये प्रेम अजून वाढते, यासोबतच वातावरणात सकारात्मकता अजून वाढते. जर एखाद्याच्या कुंडलीत पोपट नसेल आणि त्याने पोपट पाळला तर ते उधळपट्टीचे कारण असू शकते. असेही म्हटले जाते की जर, पोपट आनंदी नसेल तर, तो त्याच्या मालकांना शाप देतो. कोणत्याही प्राण्याला किंवा पक्षाला पोलीस ठेवणे योग्य नाही, एखाद्याच्या घरात भांडणाचे वातावरण असेल तर, पोपट ते शब्द ऐकतो आणि पुन्हा सांगतो, अशा पोपटाचे फळ शुभ नसते.
२. पोपटाविषयी थोडक्यात माहिती द्या.
पोपट हा जगातील सर्वात प्रसिद्ध पक्षी आहे, ज्याला पाळीव पक्षी म्हणून सुद्धा ओळखले जाते. पोपट या पक्षाच्या प्रजातीतील अतिशय सुंदर पक्षी म्हणून ओळखला जातो. पोपट माणसासारखा आवाज करून, त्याचे अनुकरण करू शकतो. तो काहीही लक्षात ठेवू शकतो. त्याच्याकडे पाच वर्षाच्या मुलासारखी बुद्धी असते. पोपटाचे वैज्ञानिक नाव सिट्टसिफोर्मस आहे. पोपट हा एक असा पक्षी आहे, जो जोरातून शब्द बोलू शकतो. पोपट फक्त फळेच नाही, तर भाज्याही मोठ्या उत्साहाने खातात. भाज्यांमध्ये पोपटाला मिरची जास्त आवडते, तसेच पोपट इतर भाज्या देखील खातात.
३. पोपट किती वर्ष जगतात ?
आफ्रिकन ग्रे नावाचा पोपट ६० वर्षे ही जगू शकतो. मकाऊ पोपट सुमारे २५ वर्षे जगतात.सरासरी पोपटांचे आयुष्य सुमारे ५० वर्षे असते.
४. पोपटांचे जीवन धोक्यात का आले आहे ?
पोपट हा एक सुंदर व अति आकर्षक पक्षी आहे. त्याच्या सुरक्षेतेसाठी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना केली गेली आहे. मनुष्य आपल्या जीवनासाठी जंगलतोड करणे, वृक्षतोड करणे, इत्यादी. चुकीच्या गोष्टी करून प्राणीमात्रांवर व पशुपक्ष्यांवर हल्ला करत आहे, त्यामुळे पोपट तसेच सर्व पक्षांचे जीवन हे आता धोक्यात आलेले आहे. आपल्याला त्यासाठी वेळीच उपाय करणे गरजेचे आहे, अन्यथा काही काळानंतर आपणास या पक्षांची जाती व प्रजाती पाहण्यास मिळणार नाही, ते लुप्त होऊन जातील. यामुळे त्यांची काळजी घेणे व पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.
५. पोपटाबद्दल ५ ओळी लिहा.
पोपट हा खूपच सुंदर रंगीबेरंगी पक्षी आहे. दक्षिण अमेरिकेत व ऑस्ट्रेलियात यांच्या अनेक विविध जाती आणि प्रकार आढळतात.
त्याचा रंग सामान्यतः हिरवा असतो. त्याला लाल रंगाची वक्र चोच असते. तो लहान मुलांना खूप आवडतो.
तो झाडांच्या ढोलीत राहतो. मिठू मिठू असा आवाज काढत, पोपट अगदी सुंदर रित्या आपले भाव व्यक्त करतो.
पिंजऱ्यात अडकून पडणे हेच पोपटाच्या गोड बोलण्याचे फळ म्हणावे लागेल, त्याच्या माने भोवती काळा रंगाचे वलय असते.
पोपट एक शाहाकारी पक्षी आहे. दाणे, फळे, पाने, बिया आणि शिजवलेला भात सुद्धा पोपट आवडीने खातो.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास पोपट पक्ष्याबद्दल माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून आम्हाला कळवा. लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेयर करा. धन्यवाद.