बद्धकोष्ठता म्हणजे काय what is constipation in marathi

बद्धकोष्ठता म्हणजे काय what is constipation in marathi – मित्रांनो बद्धकोष्ठता हा आजार आजकाल दर पाच लोकांपैकी तीन लोकांना दिसतो आणि या आजाराबद्दल जे पुरेसे ज्ञान हवे आहे ते नसल्यामुळे लोकांमध्ये बद्धकोष्ठता विकार गंभीर होऊन बसतो.

साहजिकच आहे या आजारांच्या गंभीरतेमुळे त्यापासून निर्माण होणारे हृदय विकार, डायबेटीस,पॅरालिसिस, शिवाय वंध्यत्व यासारख्या आजारांना असे रुग्णबळी पडतात. अशा बद्धकोष्ठता या विषयावर आपण आजच्या लेखाद्वारे माहिती पाहणार आहोत.

बद्धकोष्ठता म्हणजे काय what is constipation in marathi

बद्धकोष्ठता म्हणजे काय what is constipation in marathi – बद्धकोष्ठता म्हणजे पोट नीट साफ न होणे. रोज सकाळी एकदाच समाधानकारक मलप्रवृत्ती होणे हेच प्राकृत आहे. या मलप्रवृत्तीचा वेग उठल्यावर काहीही खाता पिता यापेक्षा काहीही न खाता-पिता आपोआपच आला पाहिजे.

शिवाय या मलप्रवृत्तीमुळे आपणास हलके व फ्रेश देखील वाटले पाहिजे. यापेक्षा काही वेगळे घडत असल्यास ती विकृती समजावी. रोजच्या रोज पोट नीट साफ होत नसेल तर तो असंख्य आजारांना आमंत्रण देत असतो. त्यामुळे हा विषय खूप बहुमूल्यच आहे.

बद्धकोष्ठता म्हणजे काय

बद्धकोष्ठतेचे प्रकार

बद्धकोष्ठता ही दोन प्रकारची असते.

अ)पहिल्या प्रकारामध्ये शौचाला कडक होते

ब) दुसऱ्या प्रकारात शौचाला चिकट होते.

हे वाचा –

बद्धकोष्ठतेचा पहिला प्रकार शौचाला कडक होते

बद्धकोष्ठतेचा पहिला प्रकार हा जड कोठ्यामुळे होत असतो. पक्वाशयात वात प्रकोप झाल्यामुळे तिथे वृक्षता अधिक वाढते. त्या वृक्षतेमुळे मलाती स्नेहभाग ही शोषला जातो आणि कडक तसेच ग्रथिक मलप्रवृत्ती या रुग्णांमध्ये होत असते.

ही वृक्षता जर अधिकच वाढत गेली, तर रुग्ण दोन दोन तीन दिवस सुद्धा शौचाला जात नाही. शिवाय पुढे पुढे मूळव्याध, फिशर यासारखे व्याधी देखील यामध्ये निर्माण होतात.

अधिक कालारानंतर मलप्रवृत्ती वेळी जर रक्तस्त्राव आणि शिवाय कडक मल प्रवृत्ती झाली तर जास्त रक्तस्त्राव व्हायला सुरुवात होते. शिवाय पोट साफ न झाल्यामुळे, शरीरात उष्णता हि वाढू लागते व नंतर पित्ताचे व अपचनाचे तसेच रक्ताचे विकार देखील उद्भवतात.

तसेच आतड्यामधील विकृत वाद संपूर्ण शरीरात पसरून संधिवात, त्वचा विकार, यांसारखे आजार निर्माण करतो.

बद्धकोष्ठता
उपाय
 • बद्धकोष्ठतेवर कोरड्या आतड्यांवर एरंडेल तेलासारखे दुसरे औषध नाही. सकाळी जेवणापूर्वी दोन चमचे एरंडेल तेल गरम गरम पाण्यासोबत व संध्याकाळी जेवणापूर्वी तीन ते चार चमचे एरंडेल तेल गरम पाण्यासोबत घ्यावे.
 • त्यावेळी संध्याकाळचे तेलाचे प्रमाण हे आपल्या कोठ्यावर अवलंबून असते. त्या दिवशी मोकळे शौचाला होईपर्यंत इतके एरंड तेल तुम्ही घेत जावे. तेलाचे प्रमाण प्रत्येकासाठी वेगवेगळे असू शकते. बऱ्याच लोकांना पाच ते सहा चमचे तेल घेऊन सुद्धा कोठा साफ होत नाही. अशा रुग्णांनी वैद्याकडे जाऊन बस्ती नावाचं जे पंचकर्म सांगितलेलं आहे, ते करून घ्यावं. म्हणजे अधिक फायदा होतो. एरंडेल तेलाची चव जर आवडत नसेल तर, आधी तोंडात ताकाची गुळणी पाच मिनिटे धरून ठेवावी व नंतर ताक टाकून द्यावे लगेच गरजेचे एरंडेल तेल प्यावे. त्यामुळे तोंड एकदम तुरट पडून एरंडेल तेलाची चव कळत नाही.
 • एरंडेल तेल पिल्यावर जर तुम्ही लिंबाचा रस घेतला तर एरंड तेलामुळे होत असलेली मळमळ देखील थांबते.
 • शिवाय भाकरी किंवा पोळी करताना देखील जर तुम्ही एरंडेल तेल वापरलं तरी देखील फायदा होऊ शकतो. म्हणजे चव सुद्धा जाणवत नाही. तसेच तुम्ही चहा यामध्ये टाकून सुद्धा ते पिऊ शकतात. एरंडेल तेल हे एकमेव असं पोट साफ करणार औषध आहे, ज्यामुळे शरीरातील पाण्याचे जे प्रमाण आहे ते कमी होत नाही, त्यामुळे ते लहान मुलांपासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत कोणीही वापरू शकत.
 • फक्त गरोदर पणात एरंडेल तेलाचा वापर करू नका कारण त्यामुळे गर्भपात होण्याचा संभव असतो.
 • बाळंतिणीने जर ह्या तेलाचा वापर केला तर पोटहि साफ होते आणि दूधही स्वच्छ होतं, शिवाय डिलिव्हरी सिजेरियन मुळे जो शरीरात वात वाढलेला असतो तो कमी होतो. तसेच वयोवृद्धांमध्ये एरंडेल तेलाने पोट साफ होतेच शिवाय संधिवाताही असल्यास तो बरा होतो.
 • एरंडेल तेलाने जंत हि शरीराच्या बाहेर पडतात, शिवाय एरंडेल तेलाचे दोन तीन थेंब बेंबीत टाकून व बेंबीच्या पाच सेंटीमीटर भोवती एरंडेल तेलाचा गोल मसाज करावा, अशा या तेलाच्या बाह्य आणि अंतर्गत उपयोगांनी कोठा स्नेहीत होतो, तेथील वृक्षदा कमी होते आणि असे हे बहुगुणी बहु गुणकारी एरंडेल तेल बद्धकोष्ठतेवर सर्वश्रेष्ठ औषध आहे. आपल्याला हे सहज उपलब्ध होते, म्हणून आपण त्याची चव बघून ते पिण्यास नाकारतो. पण परदेशात हेच तेल खूप प्रमाणात वापरले जाते व ते भारतातून आयात सुद्धा केले जाते.
 • बद्धकोष्ठता नसतानाही जर तुम्ही आठवड्यातून दोन-तीन वेळा सगळ्यांनीच एरंडेल तेलांनी कोठा साफ करून घेतला, तर प्रकृती आणि आरोग्य हे चांगले राहते. आपल्या सोयीसाठी मार्केटमध्ये आजकाल एरंडोल तेलाचे कॅप्सूल सुद्धा उपलब्ध आहेत. बऱ्याच वेळा लोक वरचेवर
 • बद्धकोष्ठतेसाठी हिरड्या चूर्ण, त्रिफळा चूर्ण याचा वापर करतात. पण त्यामुळे उलट अजूनच वृक्षत वाढत जाते, म्हणूनच या औषधा वापर तुपासह किंवा गरम पाण्याबरोबर करायला हवा. त्यामुळे त्याचा मल निसारणाचा जो फायदा आहे तो सोपा होतो.
 • तसेच कोटा साफ करण्यासाठी बी काढलेली काळी मनुके, मूठभर रोज खाल्ली तर कोठा हलका व्हायला मदत होते. शिवाय त्याने पित्तही कमी होते व रक्तही वाढते.
 • मलप्रवृत्ती वेळी रक्त जात असल्यास, काळे मनुके फायद्याचे ठरतात. कोरडा कुठे असणाऱ्यांनी दुधाचा जर नित्य उपयोग केला तर, तर कोठ्याची वृक्षता कमी होऊन कोठा सुधारतो. त्यात जर तुम्ही तूप टाकून पिल्यास त्याचा अधिकच फायदा होतो.

बद्धकोष्ठतेचा दुसरा प्रकार चिकट व असमाधानकारक शौचाला होणे

बऱ्याच वेळा काही रुग्णांना पोट नीट साफ होतं नाही, त्यांना शौचाला वेळीच होत नाही, त्यांना शौचाला अवेळी जावे लागते, शौचात चिकटपणा असतो व मुख्य म्हणजे शौचाला गेल्यावर समाधान वाटत नाही, दिवसभर फ्रेश व हलके सुद्धा वाटत नाही, काही खाल्ले तरी शौचात जावेसे वाटते पण गेल्यावर फार उपयोग ही होत नाही.

याकडे दुर्लक्ष केल्यास पुढे पुढे प्रत्येक शौचातून पांढरी व चिकट अशी आव बाहेर पडू लागते. सतत मैद्याचे पदार्थ खाणे, जंक फूड, फास्ट फूड, खाणे, बैठे काम करणे, आदिचे पचन झाल्याखेरीस पुन्हा खाणे, या कारणांनी अपचन होऊन आतड्यांना आतील आतड्यांच्या आत वरचेवर एक प्रकारचा चिकट लेयर तयार होतो.

नंतर हा चिकटपणा वाढत जाऊन, त्याचे रूपांतर आवेत होते. ही जी आव आहे ती इतकी चिकट स्वरूपाची असते की, त्यामुळे मलप्रवृत्ती मोकळी होत नाही मलाचा वरचा वरचा थोडासा भाग शरीराच्या बाहेर पडत राहतो व आतड्यांना तो घट्ट चिकटलेला मल दिवसेंदिवस तसाच पडून राहतो.

काही दिवसांनी त्यातून विषारी द्रव्य तयार होतात व ही विषारी द्रव्ये रक्तामध्ये शोषली जातात आणि ही शोषली गेलेली विषारी द्रव्ये संपूर्ण शरीरात पसरतात. शिवाय आतड्यांवर चिकट थर असल्यामुळे, अन्नातून तयार झालेला रस हा नीट शोषला जात नाही.

व शरीरात महत्त्वाच्या घटकांची कमतरता त्यामुळे होऊ लागते. म्हणून व्हिटॅमिन, जीवनसत्व, इत्यादी कमतरता बऱ्याच लोकांमध्ये जाणवते. याच्या जोडीला शरीरात कमजोरी देखील वाढू लागते. या प्रकरणात वेळेची दखल घेणे खूप गरजेचे आहे.

उपाय
 • चिकट मल प्रवृत्ती असल्यास तुपाचा व दुधाचा उपयोग अजिबात होत नाही. जी लोकं अशा मलप्रवृत्तीच्या वेळी तुपाचा आणि दुधाचा वापर करतात, अशा लोकांचे बद्धकोष्ठता अजून चार पटीने वाढते.
 • या प्रकारच्या बद्धकोष्ठतेमध्ये ताबडतोब मैद्याचे पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड, बंद करावेत. दिवसातून दोन वेळा भूक लागल्यावर जेवणे, रात्रीचे जेवण सातच्या आत व हलके करणे अधिक मात्र तयार झाली असेल तर रात्रीचे जेवण पूर्णतः बंद करणे किंवा त्या ऐवजी भाजके पदार्थ, माफक प्रमाणात खाणे, हे सगळ्यात चांगले.
 • सकाळच्या जेवणात आपला जो भात आहे तो पूर्णतः बंद करावा किंवा तांदूळ आधी भाजून घ्या आणि भात हा उघड्या पातेल्यात शिजवा, त्यामुळे शरीरामध्ये आव तयार होण्याची प्रवृत्ती कमी होते.
 • रोजच्या जेवणामध्ये तुम्ही फोडणीचे तेल कमीत कमी वापरून किंवा न पैकी वापरून, कच्च्या तेलाचा वापर चांगला करा. पोळी ऐवजी भाजलेल्या पिठाचा फुलका खा. पाणी उकळून काही प्रमाणात आटवलेले असेल तर खूपच चांगले. ताजे ताक वरचेवर प्यायला पाहिजे.
 • कमोडचा वापर कमी करा. कुठज वनस्पतीचा या सगळ्यात चांगला उपयोग अशा आवेच्या रुग्णांमध्ये होत असतो. कुठ्जारिष्ठ, कुठज पर्पटीवटी यासारख्या कल्पांचा उपयोग जर तुम्ही आयुर्वेद तज्ञांच्या सल्ल्या खाली केला तर बद्धकोष्ठतेत आवेचा जो प्रकार आहे, तो चांगला बरा होण्यासाठी मदत होते. अधिक जुनी आव असल्यास गरम पाण्याची बस्ती वैद्यांकडून करून घ्यावी.
 • बद्धकोष्ठतेच्या विविध प्रकारांमध्ये आयुर्वेदातील बस्ती पंचकर्म वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात, शिवाय सीजननुसार बस्ती पंचकर्म केल्याने सुद्धा कोठा हा तंदुरुस्त राहतो, त्यामुळे वेळीच आयुर्वेद तज्ञांची मदत घेऊन, पंचकर्म तुम्ही करून घ्या.

बद्धकोष्ठता का होते

पोटातील अन्नाचे पचन होऊन ते वेळीच बाहेर पडत नसल्याची अनेक कारणे असू शकतात. त्य़ासाठी सर्वप्रथम आपल्या जीवनशैलीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बद्धकोष्ठाची काही कारणे पुढीलप्रमाणे –

 • शौचाला जाण्याच्या भावनेकडे लक्ष न देणं.
 • तळलेले आणि मसालेदार अन्न खाणे.
 • पुरेशा प्रमाणात पाणी आणि पातळ द्रव्यं आहारात नसणं
 • ताणतणाव, चिंता तसेच नैराश्य
 • वेळेवर न जेवणे.
 • सतत एकाजागेवर बसून राहाणं, व्यायाम किंवा हालचालीचा अभाव, बसून राहाण्याबरोबर सतत पडून राहाणं
 • जागरण.
 • हार्मोनल असंतुलन आणि थायरॉईडमुळे देखील बद्धकोष्ठता होऊ शकते.
 • दीर्घकाळापर्यंत खूप वेदनाशामक औषधे घेतल्यानेही बद्धकोष्ठता होऊ शकते.
 • तंतूमय पदार्थ म्हणजे फायबर्स आहारात नसणं.फळं, भाज्या तसेच तृणधान्यांचा आहारात अभाव
 • चहा, कॉफी, तंबाखू किंवा सिगारेटचे जास्त सेवन केल्यास बद्धकोष्ठता होऊ शकते.

बद्धकोष्ठतेवर आहाराद्वारे उपचार

तुमच पोट बरेचदा साफ नसतं का ? बद्धकोष्ठता कायम त्रास देते का ? कोणता उपाय आहे ज्याने पोट साफ होईल ? आतडी निरोगी राहतील आणि प्रसन्न वाटेल, यावर सोपा उपाय म्हणजे फायबर असलेले अन्न खाणे. फायबर हे अन्नपदार्थांमध्ये आढळणारे आवश्यक तत्त्व आहे.

पौष्टिक आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. अन्न पचवण्यात फायबरचा मोठा वाटा असतो. शरीराला फायबर का गरजेचा आहे ? जसे बद्धकोष्ठता यांच्या तक्रारी दूर होतात, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते, हृदयाचे आरोग्य सुधारते, कोलेस्टर कमी राहते, फळे, भाज्या, डाळी इत्यादी, मधून फायबर सहज पाहवयास मिळतात.

फायबरचे फायदे लक्षात घेता, आपल्या रोजच्या आहारात फायबरचा योग्य तो समावेश करण्यावर लक्ष केंद्रित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खालील काही फायबर युक्त पदार्थ आहेत यांचा समावेश तुम्ही आहारात केल्यास तुम्हाला बद्धकोष्ठते पासून नक्कीच आराम मिळेल.

what is constipation in marathi

सर्व प्रकारच्या डाळी

मसूर, सोयाबीन, राजमा, इत्यादींमध्ये प्रोटिन्स, लोह, फोलेट, विटामिन आणि मॅग्नीज सारखे पौष्टिक घटक असतात. १०० ग्रॅम डाळिंब मध्ये ५ ग्रॅम फायबर आढळते.

धान्य

गहू, ओट्स, कॉर्न, ब्राऊन राईस, बाजरी, इत्यादी धान्यांमध्ये प्रोटिन्स, बी जीवनसत्त्वे, अँटि ऑक्सिडंट, आणि लोह, तांबे आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे असतात. १०० ग्रॅम गव्हामधून ७ ग्रॅम फायबर मिळत.

नाशपाती

नाशपती पण फायबरच्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहे. मध्यम आकाराच्या नाशपातीमध्ये ५.५ ग्रॅम फायबर असते. या व्यतिरिक्त कॅल्शियम, लोह प्रथिने, अँटि,ऑक्सिडंट आणि जीवनसत्व या फळात भरपूर प्रमाणात असतात.

अवोकॅडो

विटामिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, विटामिन ई, बी जीवनसत्वे, अवोकॅडो मध्ये भरपूर प्रमाणात असतात. १ कप अवोकॅडोमध्ये १० ग्रॅम फायबर असते.

सुकामेवा

बदाम, पिस्ता, अक्रोड, शेंगदाण्यासारख्या सुकाव्या मेव्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. समतोल प्रमाणात सेवन केल्यास, पचन सुधारते. दहा ग्रॅम सुक्यामध्ये ७ ग्रॅम फायबर असतात.

रास्पबेरी

रास्पबेरी मध्ये विटामिन ए, थायमिन, विटामिन बी, सी, कॅल्शियम, फायबर, चांगल्या प्रमाणात असतात. १ कप रास्पबेरी मध्ये ८ ग्रॅम फायबर असते.

नारळ

नारळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. मॅगनीज, ओमेगा ६, fatty असीड, फोलेट आणि सेलेनियम यांसारखे पोषक घटक यात आढळतात. १०० ग्रॅम खोबऱ्यामध्ये ९ ग्रॅम फायबर असतं.

चिया सीड्स

चिया सीड्स हे सुपरफुड आहे. फायबर, व इतर पोषक तत्वानी समृद्ध आहे. पोषक घटकांचे अधिक चांगले शोषण करण्यासाठी चिया सीड्स भिजवून खाल्ल्या जातात. १० ग्रॅम चिया सीड्स मध्ये ३४ ग्रॅम फायबर असतं.

केळी

केळीमध्ये विटामिन सी, विटामिन बी, सिक्स आणि पोटॅशियमचा चांगला स्त्रोत आहे. केळी एक आवश्यक स्टार्च फायबर म्हणून काम करते. मध्यम आकाराच्या केळ्यात ३.१ ग्राम फायबर असते.

सफरचंद

सफरचंद हे तुम्ही आवडीने खाऊ शकता आणि त्यात फायबर भरपूर प्रमाणात असते. मध्यम आकाराच्या १०० ग्रॅमच्या सफरचंदामध्ये ४.४ ग्राम फायबर असत.

गाजर

गाजरामध्ये विटामिन के, विटामिन बी, सिक्स, मॅग्नेशियम आणि बीटा कॅरोटीन, एंटी ऑक्सीडेंट आहे. जी आपल्या शरीरात विटामिन ए मध्ये बदलतात. १ कप कच्च्या १० ग्रॅम गाजरामध्ये ३.६ ग्रॅम फायबर असतं.

राजमा

राजमा प्रथिने आणि विविध पोषक घटक आणि भरलेले असतात. राजमा काडधान्यात सर्वात पौष्टिक आहे. शिजवलेल्या १० ग्रॅम राजम्यात १२.२ ग्रॅम फायबर असतं.

बद्धकोष्ठ्तेवर काही घरगुती उपाय

आजचा पूर्ण दिवस बैचेनीत गेला कारण आज सकाळी पुन्हा एकदा पोट नीट साफ झाले नाही. आपण सर्वजण अनेकदा या समस्यांनी ग्रासित असतो, तर याचा अर्थ आपल्याला बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन झालेले आहे.

आपल्या पोटाचे आरोग्य चांगले राहिले तर, आपला दिवस पण आनंदात जातो. पण जर पोटात काही विकार झाला तर दिवसभर ऍसिडिटी, ढेकर, डोकेदुखी, जीव घाबरणे, तसेच आणखी अनेक अनुभव येतात.

बद्धकोष्ठता ही समस्या फक्त वडीलधाऱ्या किंवा जास्त वयाच्या लोकांमध्येच नाही, तर हल्लीच्या तरुण पिढीत ही वाढत चालली आहे. फास्ट फूडचे सेवन, रात्रीचे जागरण आणि अनियमित जीवन शैलीमुळे ही समस्या तरुण मंडळी देखील आपल्या तावडीत घेत आहे.

पोट साफ नसल्यामुळे आणखी इतर दुसरे रोग पण शरीराला होऊ लागले आहेत. दोन हजार वर्षांपूर्वी वेस्टर्न मेडिसिनचे जनक संबोधले जाणारे चिकित्सक हिपोक्रेटीसने सांगितले होते की, जवळजवळ सर्व आजारांचा उगम पोटापासून होतो.

आजाराचे मूळ पोटापासून शरीराच्या अन्य भागापर्यंत जातात. या समस्येपासून दूर राहण्यासाठी पोट स्वच्छ राहणे, गरजेचे असते.

तर आपल्याला बद्धकोष्ठते पासून दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतात जे आपल्याला बद्धकोष्ठते पासून दूर ठेवतीलच, पण त्यासोबतच वात, पित्त आणि कफ पासून ही आपली सुटका करतील.आज आपण बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणून काही टिप्स पाहणार आहोत;

 • लिंबु विटामिन सी चा एक उत्तम स्त्रोत आहे. एक्स्पर्टच्या मताने लिंबात असलेले सायट्रिक ऍसिड बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास कारक ठरते. सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पिणे लाभकारी असते. एका ग्लासमध्ये कोमट पाणी घेऊन, त्या पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळावा आणि स्वादानुसार मीठ टाकून ढवळावे. लिंबू पाण्याचे एका जागी बसून सेवन करावे व नंतर मोकळ्या हवेत शतपावली करावी. काही वेळातच आपल्याला पोटात प्रेशर भासेल. बद्धकोष्ठतेचा त्रास जर बरेच दिवसांपासून असेल तर, अर्धा ऐवजी एक पूर्ण लिंबू पाण्यात मिसळू शकता. काही लोकांना दुधाची एलर्जी असते, तसेच दुधाचा स्वाद पण आवडत नाही. तर रात्री झोपण्या अगोदर अर्धा कप कोमट पाणी घेऊन, त्यात एक चमचा बेकिंग सोडा घालून ढवळून घ्यावे. बेकिंग सोडात असलेले फायबर बद्धकोष्ठता दूर करते आणि पोटाला निरोगी ठेवते.
 • मोशन ठीक होत नसल्यास डॉक्टर देखील पपई खाण्याचा सल्ला देतात. पपईमध्ये असलेले पेपेन एंजाइम जेवण पचवण्यास मदत करते आणि डायजेशन चांगले करून, बद्धकोष्ठते पासून सुटका करते. आपण आपल्या दिनचर्येत पपईचे सेवन नियमित रूपाने करू शकता.
 • आळशीच्या बियांमध्ये फायबरची भरपूर मात्र असते, हे तत्व पचनक्रियेस अत्यंत प्रभावी मानले जाते. याच्या सेवनाने बद्धकोष्ठता, पोटदुखी, पोटात पडणारे मुरुड, देखील दूर होतात. सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्याबरोबर भाजलेले आळशी टाकून त्याचे सेवन करावे, अळशीला मिक्सर मध्ये वाटून बारीक पावडर देखील बनवून वापरू शकता.
 • त्रिफळा चूर्ण बद्धकोष्ठतेसाठी अत्यंत प्रभावी घरगुती उपाय आहे. त्रिफळा चूर्ण म्हणजेच तीन फळ, आवळा, बहेडा व हरड यांना सारख्या मात्रेत मिसळून बनवला जातो. आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीमध्ये या तीन फळांचे बरेच महत्त्व आहे. हे बद्धकोष्ठतेच्या जुन्या, असाध्य व बरेच काळापासून ग्रासित असलेल्या रोगांना पण बरं करतो. रात्री झोपण्यापूर्वी १५ ते २० ग्राम त्रिफळा चूर्ण गरम पाण्यात किंवा दुधाबरोबर घ्यावे. त्रिफळा चूर्ण पाण्यात टाकून पण घेऊ शकता. रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण घ्यावा आणि रात्रभर भिजवून सकाळी त्यातील पाणी गाळून उपाशीपोटी त्या पाण्याचे सेवन करावे तर. निरोगी राहण्यासाठी पोट साफ असणे महत्त्वाचे आहे.

FAQ

१. बद्धकोष्ठता म्हणजे काय ?

बद्धकोष्ठता म्हणजे पोट नीट साफ न होणे. रोज सकाळी एकदाच समाधानकारक मलप्रवृत्ती होणे हेच प्राकृत आहे. या मलप्रवृत्तीचा वेग उठल्यावर काहीही खाता पिता यापेक्षा काहीही न खाता-पिता आपोआपच आला पाहिजे.
शिवाय या मलप्रवृत्तीमुळे आपणास हलके व फ्रेश देखील वाटले पाहिजे. यापेक्षा काही वेगळे घडत असल्यास ती विकृती समजावी. रोजच्या रोज पोट नीट साफ होत नसेल तर तो असंख्य आजारांना आमंत्रण देत असतो. त्यामुळे हा विषय खूप बहुमूल्यच आहे.

२. बद्धकोष्ठता झाल्यास कोणते घरगुती उपाय करावे ?

मोशन ठीक होत नसल्यास डॉक्टर देखील पपई खाण्याचा सल्ला देतात. पपईमध्ये असलेले पेपेन एंजाइम जेवण पचवण्यास मदत करते आणि डायजेशन चांगले करून, बद्धकोष्ठते पासून सुटका करते. आपण आपल्या दिनचर्येत पपईचे सेवन नियमित रूपाने करू शकता.
आळशीच्या बियांमध्ये फायबरची भरपूर मात्र असते, हे तत्व पचनक्रियेस अत्यंत प्रभावी मानले जाते. याच्या सेवनाने बद्धकोष्ठता, पोटदुखी, पोटात पडणारे मुरुड, देखील दूर होतात. सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्याबरोबर भाजलेले आळशी टाकून त्याचे सेवन करावे, अळशीला मिक्सर मध्ये वाटून बारीक पावडर देखील बनवून वापरू शकता.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास बद्धकोष्ठता म्हणजे काय ? त्यावर घरगुती उपाय काय त्याचे प्रकार कोणते या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या मित्र परिवार व इतर नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment