ब्राम्ही वनस्पती मराठी माहिती Brahmi Plant Benefits In Marathi

ब्राम्ही वनस्पती मराठी माहिती Brahmi Plant Benefits In Marathi – ही औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. पारंपारिक आयुर्वेदात या औषधी वनस्पतीला खूप महत्त्व आहे. जगात अनेक लोक सध्या ताण तणावात आणि चिंताग्रस्त स्थितीत जगत आहेत.

त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. मानसिक तणाव, कमी करणारी आणि चालना देणारी, बरीच आयुर्वेदिक औषधे आहेत, त्यापैकीच एक म्हणजे ब्राम्ही वनस्पती आहे.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास या ब्राम्ही वनस्पती बद्दल Brahmi Plant Benefits In Marathi माहिती दिली आहे, हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

ब्राम्ही वनस्पती मराठी माहिती Brahmi Plant Benefits In Marathi

वनस्पतीचे नावगोटू कोला वनस्पती
मराठी नावब्राम्ही
कोठे आढळतेभारत, इंडोनेशिया, जपान, चीन, इत्यादी.
वैज्ञानिक नावहायड्रोकॉक्टिल एशियाटिका / सेंटेला एशियाटिका
ओळखऔषधी वनस्पती

ब्राम्हीचे वर्णन

ब्राह्मी वनस्पती

ब्राम्ही वनस्पती मराठी माहिती Brahmi Plant Benefits In Marathi – ब्राम्ही ही वनस्पती एपीएससी कुलातील असून, या वनस्पतीचे शास्त्रीय नाव हायड्रोकॉक्टिल एशियाटिक आहे.

सेंटेला एशियाटिका या शास्त्रीय नावाने सुद्धा ब्राम्ही हिची ओळख आहे. ब्राम्ही मुख्यत्वे आशियाच्या पाणथळ प्रदेशातील असून, विशेषतः भारत व श्रीलंकेमध्ये आढळून येते.

ब्राम्ही वनस्पती जमिनीवर पसरून वाढते. ब्राम्ही वनस्पती चे खोड हे निमुळते, धावते व लालसर हिरवे रंगाचे असते. खोडाच्या पेरापासून खालच्या बाजूस मुळे येतात, तर वरच्या बाजूला पाने असतात. ब्राम्हीची पाने ही साधी घेवड्याच्या आकाराची व लांब देठाची तसेच दातेरी असतात.

तसेच ब्राम्ही च्या झाडाला लागणारी फुले ही लहान व फिकट गुलाबी रंगाची असतात. प्रत्येक फुलांमध्ये दोन पुंकेसर आणि दोन कुक्षी असतात.

ब्राम्ही वनस्पतीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट अतिशय प्रभावशाली आहेत, त्यामुळे त्वचेच्या विकारांवर व कुष्ठरोगावर ब्राम्ही ही अतिशय फायदेशीर ठरते. चेतासंस्थेच्या विकारावर सुद्धा ब्राम्हीचे प्रभावी फायदे आहेत. आहारामध्ये सुद्धा कढी, आमटी बनवताना ब्राम्हीच्या पानाचा वापर केला जातो.

ब्राम्ही वनस्पती ज्या भागांमध्ये जास्त ऊन असते, त्या ठिकाणी वाढते. ब्राम्ही वनस्पतीचा वाफा अगदी थोड्याच दिवसाच्या कालावधीमध्ये हिरवागार होतो. या झाडाला भरपूर प्रमाणात पाणी लागते.

हे वाचा –

ब्राम्ही औषधी वनस्पतीचे गुणधर्म

Brahmi Plant  Benefits In Marathi
  • ब्राम्ही वनस्पती मध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत. या वनस्पतीचा औषधांसाठी हजारो वर्षांपासून वापर केला जात आहे. ही वनस्पती जमिनीवर पसरलेली असते. या वनस्पतीवर पांढऱ्या गुलाबी किंवा निळ्या इत्यादी अनेक रंगांची फुले उमलतात. या वनस्पतीचा प्रभाव हा थंड असतो. ही वनस्पती स्मृती सुधारण्यासाठी कार्य करते. आरोग्याच्या दृष्टीने या वनस्पतीचे बरेच फायदे आहेत. हे फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
  • ब्राम्ही वनस्पती चे सेवन केल्यामुळे, स्मरणशक्ती सुधारते, तसेच मन प्रसन्न राहून एकाग्रता वाढते. आपल्या स्मृतीशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी ब्राम्ही या वनस्पतीची खूप मदत होते. वृद्धांना बऱ्याच वेळी स्मरणशक्ती कमी होण्याचा त्रास होतो, अशावेळी या वनस्पतीचे सेवन करणे त्यांच्या स्मरणशक्तीच्या समस्येवर मोठा उपाय ठरू शकते. दुध व पाण्यात मिसळून ब्राम्हीची पावडर खाता येईल. या वनस्पतीचा प्रभाव थंड असतो. अल्झायमर यांसारख्या काही न्यूरोलॉजिकल समस्या एखाद्या व्यक्तीच्या स्मृतीभ्रंश होण्याची संबंधित असतात, अशा व्यक्तींची स्मृती वाढवण्यामध्ये आणि मेंदूच्या पेशी पुन्हा निर्माण करण्यामध्ये, ब्राम्ही मदत करते.
  • ही वनस्पती अल्झायमर यांसारख्या न्यूरोलॉजिकल समस्यांसाठी खूप उपयुक्त आहे. तुम्ही रोजच्या आहारात अँटिऑक्सिडंटचा समावेश करू शकता. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. ब्राम्ही फ्री रेडिकल्स पासून शरीराचे रक्षण करण्यासाठी कार्य करते. त्यामध्ये अनेक पौष्टिक पदार्थ असतात, जे विविध रोगांशी लढायला मदत करतात. यामुळे हृदयरोग, मधुमेह व कर्करोग यांसारख्या धोकादायक आजारांपासून बचाव होऊ शकतो.
  • संधिवाताचा त्रास असलेल्या लोकांसाठी ब्राम्ही ही अत्यंत फायदेशीर वनस्पती आहे. लांब केस हवे असल्यास आपण ब्राम्ही तेल लावू शकता, त्यामुळे केसांचे उत्तम पोषण होते. तसेच केसांची गळती रोखली जाते. ही जरी आयुर्वेदातील सुरक्षित औषधी वनस्पतींपैकी एक असली तरी, ती घेण्यापूर्वी तिचे प्रमाण किती घ्यावे ? कसे घ्यावे ? हा सल्ला आयुर्वेदिक तज्ञांकडून आधी घ्यावा. कारण प्रत्येकाच्या आजारानुसार त्याची मात्र दिली जाते.

ब्राम्हीचे फायदे Brahmi Plant Benefits In Marathi

ब्राम्ही वनस्पती

ब्राम्ही वनस्पती मराठी माहिती Brahmi Plant Benefits In Marathi – ब्राम्हीचे विविध फायदे आहेत. आपले आरोग्य निरोगी व चिरतरुण ठेवण्यासाठी तसेच आपल्याला असंख्य आरोग्यदायी फायदे प्राप्त करून घेण्यासाठी, ब्राम्ही वनस्पती चा उपयोग केला जातो.

त्यापैकीच काही महत्त्वाचे उपयोग खालील प्रमाणे ;

मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी अत्यंत गुणकारी

ब्राम्ही मध्ये काही प्रमाणात बायोकेमिकल्स आढळून येतात. जे मेंदूच्या उतींचे बांधकाम अतिशय सुरळीत व सुलभ करण्यास कारणीभूत ठरतात.

याचा परिणाम आपली स्मरणशक्ती ही वाढते ब्राम्ही वनस्पती ही मेंदूच्या बुद्धिमत्ता व एकाग्रता साठी जबाबदार असणाऱ्या, भागावर अतिशय अविश्वासनीय कार्य करते. त्यामुळे आपले मेंदूचे कार्य हे सुधारते.

ब्राम्ही वनस्पती सोबत जर तुम्ही अश्वगंधा घेतल्यास तुमची बुद्धी आणि स्मरणशक्ती सुधारण्यास अत्यंत फायदा होतो. ब्राम्ही ही मेंदूच्या पेशंटचे पुनरुज्जीवन करणारी महत्त्वाची वनस्पती आहे.

रक्तदाब कमी होतो

अति प्रमाणात जंक फूड खाल्ल्यामुळे, तेलकट, खारट, मसालेदार, इत्यादी. पदार्थांचा आहारामध्ये अति समावेश केल्यामुळे, तसेच जास्त स्ट्रेस व विचार केल्यामुळे, शरीरातील रक्तदाब वाढण्याची शक्यता अति प्रमाणात वाढते.

परंतु ब्राम्हीच्या सेवनाने शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रित न ठेवल्यास स्ट्रोक, हृदय झटका, हृदयरोग, यांसारख्या आरोग्य विषयक आजारांचा धोका प्रबळ होतो. त्यामुळे हे आजार कमी करण्यासाठी ब्राम्हीचे सेवन करणे अत्यंत फायदेशीर ठरते.

झोपण्याच्या चांगल्या सवयी पुनरसंचयित करते

शरीरातील उत्साह वाढवण्यासाठी व शरीराचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी योग्य झोप असणे आवश्यक आहे. ताण तणाव व उलटसुलट खाण्याच्या पद्धतीमुळे, झोपेवर याचा अत्यंत नकारात्मक परिणाम होतो. यामुळे निद्रानाश होते.

उत्तम झोप प्राप्त करण्यासाठी झोपण्यापूर्वी ब्राम्हीचे सेवन केल्याने, तुम्हाला रात्रीची चांगली झोप मिळेल व सकाळी पूर्ण दिवसासाठी भरपूर ऊर्जा ही मिळेल व तुम्ही उत्साही राहाल.

तणाव आणि चिंता कमी करते

अति प्रमाणात तणाव व भीती, चिंता आपल्या शारीरिक आरोग्यावर तसेच मानसिक आरोग्यावर घातक ठरते. या गोष्टीची काळजी न घेतल्यास यामुळे पेनिक डिसऑर्डर्स, वेड कंपल्सिव्ह ऑर्डर, इत्यादी प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.

यावेळी ब्राम्ही सिरप घेणे अत्यंत गुणकारी ठरते. यामुळे तुमची चिंता व त्या संबंधित असणारे विकार दूर करण्यास मदत होऊन, तणावापासून मुक्तता मिळते. ब्राम्हीचे औषध शरीराची तणाव साठी प्रतिकारशक्ती सुधारते.

शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवून कॉर्टिसॉल हार्मोन कमी करून, शरीरात कार्य करण्याची प्रतिकारक शक्ती निर्माण करते. आयुर्वेदानुसार, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व मानसिक गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्राम्ही हे अत्यंत उपयोगी टॉनिक आहे.

केसांच्या वाढीसाठी प्रोत्साहन देते

लांब, चमकदार केस प्रत्येकाचे स्वप्न असते. हे केस प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जण वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करत असतो. परंतु वाढते प्रदूषण व अनियमित पद्धतीनेमुळे केस गळण्याची समस्या प्रत्येकामध्ये उद्भवली आहे.

जर तुम्हाला तुमचे केस निरोगी आणि सुंदर बनवायचे असतील तर, केसांची योग्यरीत्या काळजी घेणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. बहुतेक केसांच्या तेलामध्ये ब्राम्ही घटकाचा उपयोग मुख्यत्वे केला जातो.

जो तुमच्या केसांची वाढ करण्यासाठी व केसांची मुळे मजबूत करण्यासाठी केसांना पोषण देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हे औषध डोक्यामध्ये साचणारा कोंडा कमी करण्यासाठी, अत्यंत प्रभावी आहे.

यासाठी तुम्ही ब्राम्हीच्या पानाची पेस्ट बनवून ती पेस्ट टाळूवर लावल्याने, डोक्याला शांतता मिळते व केस लांब होण्यासाठी मदत होते.

मजबूत अँटिऑक्सिडंट क्षमता

ब्राम्ही मध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडन्स गुणधर्म असतात. जे शरीराला मुक्त रॅडिकल्स आणि विषारी पदार्थांपासून संरक्षित करण्यास मदत करतात. अँटिऑक्सिडंट शरीराच्या अंतर्गत प्रक्रिया दरम्यान फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात.

ज्यामुळे चयापचयाची क्रिया ही अतिशय योग्यरित्या होते. अँटिऑक्सिडंट मुळे विविध आजार टाळण्यास मदत होते व संपूर्ण निरोगी राहण्यास प्रोत्साहन देण्यास ब्राम्ही फायदेशीर आहे.

या व्यतिरिक्त ब्राम्ही मूत्रपिंडात अँटिऑक्सिडंट क्रियाकला उत्तेजित करते, त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य हे अतिशय सक्षमरित्या चालण्यास व शरीरातील विषारी पदार्थ प्रभावीपणे बाहेर टाकून देण्यास अत्यंत मदत होते.

जर तुम्हाला तुमच्या शरीरातील अँटिऑक्सिडंट संरक्षण अधिक प्रमाणात वाढवायचे असेल व तुमचे आरोग्य सुधारायचे असेल तर, तुम्हाला तुमच्या दिनचर्यामध्ये ब्राम्हीचा समावेश करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

तजेलदार त्वचेसाठी ब्राम्ही वनस्पती अत्यंत गुणकारी

सौंदर्य प्राप्तीसाठी तसेच शरीरामध्ये एंटीऑक्सीडेंट व वृद्धत्वाविरुद्ध गुणधर्म निर्माण करण्यासाठी, ज्या सेल्स पुनरुत्पादन आणि कोलेजन उत्पादनास ब्राम्ही अत्यंत फायदेशीर ठरते. यामुळे तुम्ही चिरतरुण दिसण्यास तुम्हाला फायदा होतो.

ब्राम्ही वनस्पती एक अत्यंत प्रतिष्ठित औषधी वनस्पती आहे. जिचा उपयोग त्वचेसाठी केला जातो व त्याचे असंख्य फायदे आपल्याला प्राप्त होतात. आयुर्वेदिक आणि फार्मास्युलिटीकल फॉर्म्युलाशन मध्ये ब्राम्हीचा वापर त्वचेचे रंगद्रव्य, तसेच स्ट्रेच मार्क हे धूसर बनवण्यासाठी केले जातात.

विशेषतः गर्भधारणेनंतर किंवा वजन कमी करण्यासाठी, ब्राम्हीचा उपयोग केला जातो. ब्राम्हीमध्ये असणारे त्याचे दाहक विरोधी गुणधर्म मुरूम आणि त्वचेची एलर्जी याच्यावर अत्यंत गुणकारी आहे. आपण नेहमी स्किन केअर मध्ये ब्राम्हीचा वापर केल्यास त्वचेसाठी याचा उत्तम फायदा होतो.

यकृताची कार्यक्षमता वाढवते

आयुर्वेदाच्या मते, आपल्या शरीरातील यकृत हे अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. शरीरामधील विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर टाकून शरीर निरोगी करण्यासाठी व पित्त ऊर्जा व्यवस्थापित करण्यासाठी यकृत महत्त्वाचे कार्य करत असते.

ब्राम्ही नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशनला समर्थन देते. यकृताचे कार्य सुधारण्यासाठी ब्राम्ही अत्यंत महत्त्वाचे कार्य करते. आजच्या परिस्थितीमधील अन्नातील भेसळांमुळे सामान्य माणूस विविध आजारांना बळी पडतो व यामुळे यकृताची कार्यक्षमता कमी होते व शरीरात विविध प्रकारचे आजार आढळून येतात.

हे आजार कमी करण्यासाठी व शरीराचे संतुलन व्यवस्थित राखण्यासाठी, नैसर्गिकरित्या यकृत्याला कार्यकर्ताच्या कार्याला चालना देण्यासाठी ब्राम्ही वनस्पती अत्यंत उपयोगी आहे.

अपस्मार व्यवस्थित करण्यास मदत करते

एपिलेप्सी आणि फेफरे यासाठी उपचार म्हणून देखील ब्राम्हीचा वापर केला जातो.

ब्राम्हीच्या वापरामुळे फेफरेची वारंवारता आणि तीव्रता कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरते.

श्वसन आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत गुणकारी

ब्राम्हीचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये ब्रॉन्कायटीस व दमा यासारख्या श्वसनाच्या आजारावर उपचार करण्यासाठी केला जातो.

ब्राम्हीमध्ये दाहक विरोधी आणि शरीरातील कफ बाहेर पाडण्यासाठी महत्त्वाचे गुणधर्म आहेत. ज्यामुळे श्वसन कार्य सुधारण्यासाठी मदत होते.

हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीत आरोग्य सुधारते

काही संशोधकांनी असे मत मांडले आहे की, ब्राम्हीचा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीत आरोग्यावर एक उत्तम व पॉझिटिव्ह परिणाम होतो.

एका अभ्यासामध्ये असे आढळून आले आहे की, ब्राम्ही अर्क रक्तदाब कमी करण्यासाठी व उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींमध्ये रक्तप्रवाह व्यवस्थित सुरळीत चालवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे.

ब्राम्हीचा वापर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे व यामुळे हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो.

रजोनिवृत्ती लक्षणे कमी करते

स्त्रियांमध्ये वयानुसार रजोनिवृत्ती येते व यामुळे इस्ट्रोजेनच्या उत्पादनामध्ये अति प्रमाणात घट झाल्याने स्त्रियांमध्ये त्रास उद्भवतात.

त्यामुळे रात्री घाम येणे, मूड बदलण्यासारखी विविध लक्षणे आढळून येतात. परंतु ब्राम्हीचा वापर केल्याने या सर्व गोष्टींमध्ये संतुलन प्राप्त होऊन, हे लक्षणे कमी होण्यास मदत होते.

ब्राम्हीचे प्रभावी वापर

ब्राम्ही पेस्ट

आपल्या त्वचेतील तजेलदारपणा सुधारण्यासाठी व सौंदर्यप्राप्तीसाठी तुम्ही ब्राम्ही पेस्ट वापरू शकता. त्याचा तुम्हाला बऱ्याच प्रमाणात फायदा होतो. त्वचेच्या विविध परिस्थितींसाठी, ब्राम्हीची पेस्ट अत्यंत गुणकारी आहे.

ब्राम्ही मध्ये असणारे अँटिऑक्सिडंट आणि दाहक विरोधी गुणधर्म आपल्या शरीराला व आपल्या त्वचेला एक उत्तम सौंदर्य प्राप्त करून देतात. काही व्यक्ती केसांच्या वाढीसाठी तसेच आपल्या डोक्याचे व टाळूचे संपूर्ण आरोग्य सुधारण्यासाठी हेअर मास्क म्हणून ब्राम्हीच्या पेस्टचा देखील वापर करतात.

ही पेस्ट तुम्ही अत्यंत सोप्यारीत्या बनवू शकता. यासाठी तुम्ही पाण्यामध्ये किंवा योग्य वाहक तेलामध्ये ब्राम्ही पावडर मिसळून त्याची पेस्ट बनवून, ज्या ठिकाणी तुम्हाला ती पेस्ट लावायची आहे अर्थात प्रभावी भागांमध्ये पेस्ट लावून तुम्ही या पेस्टचा हेअर मास्क म्हणून वापर करू शकता किंवा चेहऱ्यावर फेस मास्क म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता.

चेहरा सुकल्यानंतर किंवा हेअर मास्क सुकल्यानंतर तुम्ही थंड पाण्याने धुऊ शकता, याने तुम्हाला अत्यंत गुणकारी फायदे दिसतील.

ब्राम्ही तेल

ब्राम्हीचे विविध फायदे आहेत. त्या फायदा व्यतिरिक्त आयुर्वेदामध्ये ब्राम्ही वनस्पती चा वापर हा अत्यंत महत्त्वाचा वापर म्हणून सांगितला आहे. संपूर्ण शरीराचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी व शरीराची कार्यक्षमता प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ब्राम्हीचा वापर केला जातो.

आयुर्वेदिक औषधांमध्ये त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी पारंपारिकपणे ब्राम्ही तेलाचा वापर केला जातो. ब्राम्ही मध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडेंट आणि दाहक विरोधी गुणधर्मामुळे ऑक्सिडेटिव्ह नुकसानापासून ब्राम्ही संरक्षण करण्यास आपली मदत करते.

जळजळ कमी करण्यासाठी सुद्धा ब्राम्ही वनस्पती चा वापर केला जातो. मुरूम, तसेच त्वचारोग यांसारखे विविध त्वचे संबंधित आजार रोखण्यासाठी व या परिस्थितीला योग्य प्रमाणे नियंत्रित करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून ब्राम्ही तेल वापरले जाते.

हे तेल प्रभावी भागात मसाज करून लावल्याने किंवा टाळूवर लावल्याने तुम्हाला अधिक फायदा मिळतो.

ब्राम्ही पावडर

संज्ञात्मक कार्य आणि स्मरणशक्तीला चालना देण्यासाठी, ब्राम्ही पावडर अत्यंत गुणकारी आहे. या पावडरचे सेवन तुम्ही केल्यास तुमच्या मेंदूची कार्यक्षमता वाढते.

मेंदूवर शांत प्रभाव पडतो. तुमची ताणतणाव चिंता इत्यादी समस्या दूर होण्यास मदत होते. निरोगी आरोग्यासाठी व निरोगी मेंदूसाठी ब्राम्ही पावडर अत्यंत उपयोगी व नैसर्गिक उपाय आहे.

ब्राम्ही पावडर वापरण्यासाठी तुम्ही ती पावडर पाण्यात किंवा दूध व इतर अन्न द्रव्य पदार्थांमध्ये मिसळून याचे सेवन केल्याने, तुम्हाला याचे उत्तम रिझल्ट मिळतात.

या गोष्टीचे सेवन करणे अगोदर डोस निश्चित करण्यासाठी, आरोग्य सेवा देणाऱ्याला किंवा आयुर्वेदिक चिकित्सकाचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.

ब्राम्ही वापरताना घ्यावयाची काळजी

स्तनपान आणि गर्भधारणेसाठी

गर्भधारणे दरम्यान किंवा स्तनपान करतेवेळी, ब्राम्ही वापरण्याची सुरक्षितता निश्चित करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु गर्भधारणे दरम्यान ब्राम्हीचा असताना पण करतेवेळी, ब्राम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतः घेणे टाळावे.

जर तुम्ही गर्भवती असाल किंवा स्तनपान करत असाल तर तुम्ही वैद्यकीय सल्ल्याच्या आधारावरतीच ब्राम्हीचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.

मुले आणि वृद्ध व्यक्ती

लहान मुले व अति वृद्ध व्यक्ती ब्राम्हीच्या प्रभावाबद्दल अधिक संवेदनशील असू शकतात, कारण ब्राम्ही मध्ये असणारे दाहक विरोधी गुणधर्म आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म हे मुले व वृद्ध व्यक्तींसाठी थोडे संवेदनशील असू शकतात.

परिणामी ज्यावेळी तुम्ही लहान बाळाला किंवा वृद्ध व्यक्तींना ब्राम्ही देत असाल तर, त्यांच्या येणाऱ्या प्रतिसादाचे बारकाईने निरीक्षण करणे हे तितकेच महत्त्वाचे असते.

या प्रतिसादांमध्ये तुम्हाला काही चिंताजनक गोष्ट आढळल्यास, त्वरितच आरोग्य सेवकांशी संपर्क साधून त्यांच्या सल्ल्याच्या शिफारसीने मुले व वृद्ध व्यक्तीस ब्राम्हीचे सेवन करू द्यावे.

शामक प्रभाव

ब्राम्हीमध्ये शामक गुणधर्म आढळतात, अर्थात ब्राम्ही मध्ये असणारे गुणधर्म नशा आणू शकतात. इतर शामक औषधांचा प्रभाव आपल्या शरीरामध्ये वाढू शकतो.

तुम्ही तर तुमची नशा वाढवणारी अजून कोणती औषधे घेत असाल तर ब्राम्ही वापरते वेळी थोडी सावधानी वापरणे गरजेचे आहे व यावेळी तुम्हाला सर्वात उत्तम उपाय म्हणजे वैद्यकीय सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे.

ब्राम्हीचे दुष्परिणाम

  • ज्याप्रमाणे एखाद्या गोष्टीचे आपल्याला फायदे असतात, त्याचप्रमाणे त्या गोष्टीच्या अतिवापरामुळे होणारे नुकसान सुद्धा आपल्याला टाळता येत नाही. त्यामुळे योग्य व मापक प्रमाणामध्ये कोणतीही गोष्ट घेणे अत्यंत गरजेचे असते. ब्राम्हीचे जसे अनेक फायदे आहेत, त्याप्रमाणे त्याच्या अतिवापराचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला आढळून येतात.
  • ब्राम्हीच्या अति वापरामुळे तोंडामध्ये कोरडेपणा येणे, थकवा येणे, मळमळ होणे, अति तंद्री येणे, अतिसार म्हणजेच जुलाब होणे, पोटात कळा येणे, इत्यादीं सारख्या विविध दुष्परिणामचा सामना व्यक्तिस करावा लागतो. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्याच्या मापक प्रमाणा शिवाय ब्राम्हीचे अति सेवन करणे व जास्त डोस खाणे खूप घातक ठरू शकते.

FAQ

१. ब्राम्हीचे औषधी गुणधर्म काय आहेत ?

ब्राम्ही वनस्पती अल्झायमर यांसारख्या न्यूरोलॉजिकल समस्यांसाठी खूप उपयुक्त आहे. तुम्ही रोजच्या आहारात अँटिऑक्सिडंटचा समावेश करू शकता. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. ब्राम्ही फ्री रेडिकल्स पासून शरीराचे रक्षण करण्यासाठी कार्य करते. त्यामध्ये अनेक पौष्टिक पदार्थ असतात, जे विविध रोगांशी लढायला मदत करतात.
यामुळे हृदयरोग, मधुमेह व कर्करोग यांसारख्या धोकादायक आजारांपासून बचाव होऊ शकतो.
संधिवाताचा त्रास असलेल्या लोकांसाठी ब्राम्ही ही अत्यंत फायदेशीर वनस्पती आहे. लांब केस हवे असल्यास आपण ब्राम्ही तेल लावू शकता, त्यामुळे केसांचे उत्तम पोषण होते.

२. ब्राम्हीच्या अति वापराचे कोणते दुष्परिणाम आहेत ?

ब्राम्ही वनस्पती च्या अति वापरामुळे तोंडामध्ये कोरडेपणा येणे, थकवा येणे, मळमळ होणे, अति तंद्री येणे, अतिसार म्हणजेच जुलाब होणे, पोटात कळा येणे, इत्यादीं सारख्या विविध दुष्परिणामचा सामना व्यक्तिस करावा लागतो. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्याच्या मापक प्रमाणा शिवाय ब्राम्हीचे अति सेवन करणे व जास्त डोस खाणे खूप घातक ठरू शकते.

ब्राह्मी चूर्णाचा उपयोग काय?

ब्राम्ही वनस्पती यांनी चिंता, अपंगत्वाची पातळी आणि मानसिक थकवा, चिंतेची पातळी आणि स्मरणशक्ती वाढण्याची लक्षणे कमी केली.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास ब्राम्ही या औषधी वनस्पती बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. तिचे फायदे, दुष्परिणाम, औषधी गुणधर्म इत्यादी बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, हा लेख आवडल्यास तुमच्या मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment