शतावरी चे फायदे मराठी Shatavari Powder Benefits In Marathi

शतावरी चे फायदे मराठी Shatavari Powder Benefits In Marathi – अशी वनस्पती की जीला “क्वीन ऑफ हर्ब” म्हणतात, म्हणजे वनस्पती विश्वातली राणी असं म्हणतात. जी अतिशय लोकप्रिय आहे. त्या वनस्पती बद्दल आज आपण अतिशय रंजक माहिती जाणून घेणार आहोत. तिचं नाव आहे, शतावरी.

शतावरीला अतिरसा, बहुसुता, नारायणी, विष्णू प्रिया, अशी अनेक नावं संस्कृत मध्ये आहे. शतावरी म्हणजे काय तर जिला अनेक मुळांनी आवरण घातलेले आहे, अशी वनस्पती. अगदी ऋग्वेदात अथर्व वेदांत खूप पुरातन काळापासून उल्लेख असणारी आणि आपल्या भारतीय लोकांमध्ये अनेक वर्षांपासून वापरण्यात येणारी ही वनस्पती.

शतावरीची वेल असते. ही दिसायला अगदी साधी असते आणि जमिनीखाली असणाऱ्या तिच्या मुळांचा औषध म्हणून वापर होतो.

आज आपण शतावरी चे फायदे तसेच या वनस्पती बद्दल असणारे अनेक समज आणि गैरसमज जसे कि, शतावरी फक्त स्त्रियांसाठी आहे का ? शतावरी पुरुष वापरू शकता का ? शतावरी लहान मुलांना देता येते का ? शतावरी डायबिटीसच्या पेशंट साठी चालते का?

शतावरीने वजन वाढतं का कमी होतं ? तर आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या लेखाद्वारे समजवून घेणार आहोत. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

हे वाचा –

Table of Contents

शतावरी चे फायदे मराठी Shatavari Powder Benefits In Marathi

शतावरीचे गुण

शतावरी चे फायदे मराठी Shatavari Powder Benefits In Marathi – शतावरी ही गोड आणि कडवट रसाची वनस्पती आहे. पोटात गेल्यावर ही गोड रसाने पचते आणि ही गुणाने, वीर्याने थंड गुणाची असते. शतावरी ही पचायला जड आणि स्निग्ध असते. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला खूप सुंदर ग्रुप मध्ये वापरले जात. ते म्हणजे वयस्थापण.

सध्या अनेक लोक आपल्या स्वतःच्या राहणीमानाबद्दल अतिशय जागरूक झालेले आहेत. म्हणून अनेक अँटी एयजिंग क्रीम वापरत आहे. पूर्वी देखील अँटी एयजिंग वनस्पती आहारात समाविष्ट केल्या  जायच्या, त्यामधील एक म्हणजे शतावरी आहे.  

साधारण वय वर्ष ३०  झाल्यानंतर आपल्या स्किनला सुरकुत्या पडायला लागतात. शरीर हाडे थोडी थोडी थकायला लागतात. म्हणजे म्हातारपणाची हळूहळू ३५ शी नंतर ४० ची पासून हमखास सुरुवात होते.

त्या काळात पंचकर्म करून, रसायन औषध घ्यावं असा आयुर्वेदामध्ये विशेष उल्लेख आहे. ह्या रसायनांमध्ये शतावरीला अतिशय मानाचे स्थान आहे. म्हणूनच शतावरीचा यासाठीच बल्य वयस्थापण म्हणून उल्लेख आहे.

शतावरी चे फायदे मराठी

शतावरी कोण घेऊ शकत ?

शतावरी चे फायदे मराठी Shatavari Powder Benefits In Marathi – शतावरीचे अनेक फायदे झाले पण या सगळ्या पलीकडे जाऊन सध्या ज्या गोष्टीसाठी मार्केटिंग केलं जातं आहे, ते म्हणजे स्त्रियांसाठी केवळ शतावरी चूर्ण फायदेशीर आहे.

परंतु असं नाही आहे. शतावरी चूर्ण सगळेजण घेऊ शकतात. लहान मुलांपासून, वृद्धांपर्यंत सगळेजण घेऊ शकतात.

शतावरी कल्प कसे घ्यावे?

सर्व शतावरी चे फायदे मिळवण्यासाठी शतावरी कल्प कसे घ्यावे ?असा इथे प्रश्न पडतो. तर पाहुयात, शतावरी कल्प कसे घ्यावे.

कसे घ्यावे ?

शतावरी कल्प तुम्ही कोमट पाणी सोबत, दुधा सोबत किंवा तुमच्या आवडत्या पेयाबरोबर मिक्स करून घेऊ शकता.

कोणत्या वेळी घ्यावे ?

सामान्यपणे यासाठी तुमची जेवणाची रात्रीची किंवा सकाळची वेळ निवडावी. दोन्ही वेळच्या जेवणासोबत तुम्ही शतावरी कल्प घेऊ शकता किंवा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे घ्यावे.

डोस

शतावरी चा डोस हा एक किंवा दोन चमचे प्रत्येकी एक वेळ या प्रमाणे निश्चित करावा.

यासाठी शतावरी कल्पाचा उपयोग स्वतः च्या मनाने करणे चुकीचे ठरेल. तरी वरील कोणत्या ही समस्यांसाठी डॉक्टरांना विचारूनच उपचार घ्यायचे आहेत.

शतावरी ची पौष्टिक रचना काय आहे?

100 ग्रॅम कच्च्या शतावरीमध्ये खालील पोषक घटक असतात.

पौष्टिक घटकपौष्टिक मूल्य प्रति 100 ग्रॅम
कार्बोहायड्रेट 3380 मि ग्रा 
थियामिन 0.143 मि ग्रा 
प्रोटिन2200 मि ग्रा 
डायटरी फायबर2100 मि ग्रा 
नियासिन  0.978 मि ग्रा 
0.052 मि ग्राफोलेट
 व्हिटॅमिन C5.6 मि ग्रा 
व्हिटॅमिन K0.0416 मि ग्रा
व्हिटॅमिन E 1.13 मि ग्रा 
मँगनीज0.158 मि ग्रा 
लोह1.14 मि ग्रा 
कॅल्शियम24 मि ग्रा 
सेलेनियम 0.0023 मि ग्रा  
झिंक0.54 मि.ग्रा

शतावरी चे फायदे

(बल्य) रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शतावरी चूर्णचा उपयोग

बल्य म्हणजे केवळ वजन वाढवणारी नाही तर, शरीरात सात धातू आहे. रस, रक्त, मांस, मेद अस्थी, मज्जा, शुक्र. प्रत्येक धातूचं क्रमाक्रमाने पोषण झालं तर, शेवटी शुक्राचं पोषण होतं आणि मग ओज वाढतं. त्या प्रत्येक धातूंना सकस बनवायचं काम शतावरी करते आणि ते विशेष करून शुक्रावर काम करते.

आयुर्वेदात श्लोकांमध्ये एखाद्या वनस्पतीचे गुणधर्म एकत्रित खूप छान रित्या गोपण्याची पद्धत आहे. शतावरी ही अशी वनस्पती आहे की जी, गुरु गुणाची, शीत विर्याची, कडू रसाची आणि गोड रसाची आहे परंतु ती रसायनी आहे. ती बुद्धी वाढवते. अग्नीला ताकद देते आणि डोळ्यांसाठी देखील ती हितकारी आहे.

शतावरी चूर्ण

मेद्य म्हणजे ब्रेन टॉनिक म्हणून शतावरीचा उपयोग

हल्ली आपल्याला इतका जास्त स्ट्रेस आहे. हा स्ट्रेस कमी करण्यासाठी, प्राणायाम दिनचर्येत बद्दल यासोबत असे काही घटक आहारात घेणं खूप गरजेचे आहे की, जे आहाराला म्हणजे आपल्या जेवणाला सप्लीमेंट म्हणून काम करतील आणि शिवाय त्याच्यामध्ये केमिकल नसेल.

तर केमिकल विरहित पर्यायांमध्ये गुळवेल, अश्वगंधा, सोबत शतावरीचं अतिशय हक्काचं स्थान आहे. ते ब्रेन टॉनिक म्हणून तर काम करतेच, पण ज्याला विसरायची सतत सवय लागली असेल, तेही कमी करते. ज्यांना वारंवार डिप्रेशनचा अटॅक येतो, त्यांना देखील शतावरी वनस्पती खूप चांगली काम करते.

डोळ्यांसाठी (नेत्रा) शतावरीचा उपयोग

ज्यांना डोळ्यांचा लागलेला चष्मा कमी करायचा आहे, त्यांनी त्रिफळा चूर्णासोबत शतावरी चूर्ण रोज आहारात घ्यायला काहीच हरकत नाही आहे.

कार्डिओ टॉनिक म्हणून शतावरीचा उपयोग

हृद्य म्हणजे कार्डिओ टॉनिक म्हणून देखील शतावरी चूर्णाचा वापर केला जातो. ज्यांना हायपर टेन्शनचा आजार जर खूप वर्षांपासून आहे, त्यांना बीपी कमी करण्यासाठी शतावरी चूर्णाचा वापर होतो.

परंतु तुम्ही डॉक्टरांच्या किंवा जवळील वैद्यांच्या सल्ल्याने हृदयासारख्या नाजूक अवयासाठी या वनस्पतीचा किती दिवस आणि किती प्रमाणात वापर करावा हे विचारून घेतलं पाहिजे.

शतावरी पित्त शामक आहे

शतावरी चूर्ण पित्त शामक आहे. थंड गुणाची आहे. त्यामुळे ज्यांना पित्ताचा ताप असेल किंवा ज्यांना संडासला व्यवस्थित होत नसेल किंवा ज्यांना जुलाब खूप जास्त प्रमाणात होत असतील आणि जुलाबा मधून खूप उष्ण पित्त रक्त जात असेल तर अशा वेळेस बेल, कुठज अशा सारख्या वनस्पतींसोबत शतावरीचा वापर केला पाहिजे.

पण अर्थात वैद्यकीय सल्ल्याने. तुमच्या मनाने करू नका. कधी कधी या आजारांमध्ये खूप बारकाई असतात आणि जर मनाने वापर केला फायदा झाला तर चांगला आहे, पण जर सिरीयस काही कंडिशन झाली तर, ती घरी कव्हर नाही होत म्हणून कधी पण वैद्याचा किंवा जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन, औषधींचा वापर करायला काहीच हरकत नाही.

त्वचेसाठी शतावरी चूर्णाचा फायदा

त्वचेसाठी देखील शतावरी खूप छान काम करते. अनेक संशोधन गेल्या काही दशकांमध्ये शतावरी वर केली गेली आहेत.

त्यामध्ये हे आढळून आल आहे कि शतावरी हि स्किन थिकनेस कमी करते, अँटी इन्फ्लोमेंटरी म्हणून काम करते. खास करून सायटोकायनिंग प्रिव्हेन्शनचं काम शतावरी करते.

खोकल्यापासून आराम मिळतो

एका संशोधनानुसार असे जाणवले की, शतावरी मुळाचा रस खोकल्यासाठी एक नैसर्गिक उपचार म्हणून कार्य करतो.

संशोधकांना असे आढळले की, शतावरीच्या मुळांचा अर्क घेतल्यास, खोकला बरा होण्यास मदत होते व तो परत येण्यापासून आळा बसतो.

पाचन तंत्र मजबूत करते

शतावरी चूर्ण हे एक उत्तम शरीर स्वच्छ ठेवण्याचे साधन आहे. शतावरी आपल्या शरीरातील आतड्यांना साफ करण्याचे काम करते. शतावरी आतड्यांचे डिटॉक्सिफिकेशन करून, शरीराच्या पाचक एंजाइम ची क्रिया वाढवण्यासाठी मदत करते.

तसेच शतावरी चूर्ण शरीरामधील चरबी व कार्बोहायड्रेटचे पचन सुलभ करण्यासाठी मदत करते. शतावरी चुर्णाचे दररोज सेवन केल्याने, आमांश, उलट्या, छातीत जळजळ, अतिसार, इत्यादींसारख्या जठराच्या संसर्गापासून आपणास आराम मिळतो.

तसेच अन्ननलिका पोटात उपस्थित असलेल्या अल्सर च्या उपचारांमध्ये, लहान आतडे, यांमध्ये देखील शतावरी अतिशय फायदेशीर ठरते.

अँटिऑक्सिडंट ने समृद्ध

शतावरी चूर्ण ही अँटि ऑक्सिडंटने समृद्ध असून, आपल्या शरीरातील पेशींना फ्री रॅडिकल्सच्या नुकसानी पासून वाचवण्यासाठी उत्तम मदत करते.

ऑक्सिडीटी तणावाशी लढण्यासाठी व शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी शतावरी मदत करते. शतावरी मध्ये सॅपोनिन्स असतात.

Shatavari Powder Benefits In Marathi

किडनीच्या समस्येपासून आराम मिळतो

किडनीमध्ये कोणताही कठीण पदार्थ साचल्यानंतर, किडनी स्टोन म्हणजे मुतखडा होतो. जेव्हा ते तुमच्या मूत्रमार्गात जातात, त्यावेळी तुम्हाला अतिशय वेदना होऊ लागतात. बहुतेक मुतखडा ऑक्सालेट पासून बनले असतात.

बीट, फ्रेंच फ्राईज, पालक, यांसारख्या विशिष्ट पदार्थांमध्ये ऑक्सिलेट्सचे प्रमाण मुबलक प्रमाणात आढळते. २००५ च्या अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की, शतावरी मुळांच्या अर्काने शरीरात असलेले ऑक्सलेट मुतखडा तयार होण्यास प्रतिबंध घालतात. त्यामुळे शतावरीचे सेवन केल्यास किडनी स्टोन पासून आपणास आराम मिळतो.

स्त्रियांसाठी शतावरी चे फायदे

शतावरी चूर्ण गर्भपोषक आहे

स्त्रियांसाठी शतावरी चूर्ण खास वरदान आहे असे म्हटले जाते. कारण, शतावरीला दुसरं नाव अतिरसा आहे. म्हणजे ती रस धातूच पोषण करते. याशिवाय ती शुक्राचही पोषण करते.

म्हणून जेव्हा बाळ पोटात असतं तर, साधारण चौथा महिना लागल्या पासून थोड्या प्रमाणात म्हणजे अर्धा ते एक चमचा सकाळी दुधासोबत जर शतावरी घेतली तर, ती बल्य या गुणाने गर्भाशयाच्या आवरणाचं आणि सोबत गर्भाचं देखील पोषण करते. म्हणून ती गर्भ पोषक आहे.

शतावरी चूर्ण गर्भस्त्राव कमी करते

शतावरी चूर्ण थंड गुणाने गर्भस्त्राव करणारी वनस्पती आहे. त्यामुळे ज्यांना अबॉर्शनची हिस्टरी असेल किंवा ज्यांच बाळ कमी वजनाचा असेल, त्यांनी शतावरी दैनंदिन सेवन करायला काहीच हरकत नाही आहे. विशेष करून प्रेग्नेंसी मध्ये.

डिलिव्हरी नंतर शतावरी फायदेशीर

शतावरी ही वनस्पती फक्त प्रेग्नेंसी पूर्ती नाही काम करत. तर जेव्हा डिलिव्हरी होऊन जाते, तेव्हा डिलिव्हरी नंतर स्त्रीच्या शरीरात वात, पित्त, खूप वाढत. याशिवाय ती खूप स्ट्रेस मध्ये असते. तर शतावरी डिलिव्हरी नंतर खूप छान काम करते.

स्ट्रेस कमी करते म्हणजे मेंटली शांत व्हायला मदत करते, वात कमी करते म्हणून देखील शतावरी एखाद्या टॉनिक प्रमाणे काम करते आणि स्तन्यपान म्हणजे दूध वाढवायला मदत करते.

Shatavari Powder

गर्भधारणेमध्ये मदत

अनेक महिलांना मनापासून इच्छा असून देखील गर्भधारणा होण्यास अडचणी येतात. त्यांनी प्रतिदिन शतावरीचे सेवन केल्याने, त्यांना गर्भधारणेमध्ये मदत होते. प्रत्येक महिलेच्या मेन्यूस्ट्रियल सायकलमध्ये ओविलेशनचा एक भाग असतो.

त्यावेळी महिला गर्भधारण करण्यासाठी जर प्रयत्न करत असतील तर, गर्भ शरीरात वाढण्याची शक्यताही जास्त असते. परंतु, अशा अनेक महिला असतात की ज्यांच्या दोन मासिक पाळी मध्ये, ओविलेशन पिरेडस येतच नाही. अशा महिलांना नियमित शतावरीचे सेवन केल्यास, गर्भधारणा करण्यास मदत मिळते.

मासिक पाळी मध्ये उपयुक्त

शतावरी चे सेवन केल्यास, मासिक पाळी मध्ये कोणत्याही समस्या येत नाहीत. अनेक महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान, विविध प्रकारच्या समस्या उद्भवतात.

जसे की, अवेळी रक्तस्त्राव होणे, जास्त रक्तस्त्राव होणे, दुखणे, पीसीओडी, पीसीओएस, आधी समस्यांचा सामना अनेक महिलांना करावा लागतो.

परंतु या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नियमित स्वरूपात जर तुम्ही शतावरीचे सेवन केल्यास, तुम्हाला या समस्यांपासून सुटका मिळू शकते.

शरीरातील तणाव कमी करण्यास मदत

शतावरीच्या दैनंदिन सेवनाने शरीरामधील ताणतणाव कमी करण्यास मदत होते. जर तुम्हाला भीती, डिप्रेशन, इत्यादीची समस्या भासत असेल तर, तुम्ही दररोज शतावरीचे सेवन करू शकता.

शरीरामध्ये अधिक प्रमाणामध्ये ताण-तणाव वाढत असेल किंवा शरीरातील हार्मोन बदलामुळे देखील शरीरामध्ये होणाऱ्या बदलांमुळे ताणतणाव येत असेल तर, शतावरीचे सेवन केल्यास तुमचा हा स्ट्रेस कमी होऊन हार्मोन बॅलन्स राहण्यास मदत होते.

शरीरात प्रतिकारशक्ती वाढवणे

शतावरी चे दररोज सेवन केल्याने, महिलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी व शरीर बळकट होण्यासाठी मदत होते.

शतावरी मध्ये मुबलक प्रमाणात अँटि ऑक्सिडंट चे प्रमाण असल्याकारणाने, शरीरातील रोगाप्रती लढण्याची शक्ती वाढवून, कोणत्याही आजारापासून आपली सुटका होते.

केसांसाठी शतावरी चे फायदे

शतावरी चे आपल्या केसांसाठी अनेक फायदे आहेत. शतावरी पावडर आपल्या केसांना लावल्याने केस मजबूत व मुलायम होण्यास मदत होतात.

तसेच आपल्या केसांची वाढ देखील, झपाट्याने होऊ लागते. केस घनदाट करण्यासाठी व झपाट्याने वाढवण्यासाठी, शतावरी व अश्वगंधा पावडर दुधात मिसळून त्याचे सेवन करावे. यामुळे केस चमकदार होऊन, केसातील कोंडा दूर होण्यास मदत होते.

चेहऱ्यासाठी शतावरीचे फायदे

शतावरी अँटी एजंजिंगचे काम करते

शतावरी मध्ये अँटि ऑक्सिडंट घटक मोठ्या प्रमाणात आढळून आल्यामुळे, शतावरी अँटी एजंजिंगचे काम करते. कमी वयामध्ये चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्यामुळे, चेहरा निस्तेज दिसतो व यामुळे आपल्या सौंदर्यतेमध्ये बाधा निर्माण होते.

परंतु शतावरी ही एक उत्तम वनस्पती असून, शतावरी मध्ये असलेल्या क्लिनजिंग मुळे चेहरा, हात, पाय, स्वच्छ करण्यासाठी आपल्या फायदा होतो.

मुरुम नाहीशी करते

चेहऱ्यावर अधिक प्रमाणात मुरूम येत असल्यास, त्या ठिकाणी शतावरी च्या मुळांची पेस्ट लावल्यास तुम्हाला आराम मिळेल.

मुरूम नाहीसे होऊन, चेहऱ्यावर ग्लो येईल. यासाठी शतावरी पावडर दुधात मिसळून, त्याचा लेप चेहऱ्यावर लावावा व थोड्या वेळाने कोमट पाण्याने धुवावा. यामुळे चेहरा ग्लोईंग व चमकदार बनेल.

त्वचावरील जखमा भरतात

शरीरावर फोड, घामोळ्या, पुरळ, झाल्या असल्यास किंवा काही जखमा, व्रण, असतील तर त्यावर तुम्ही शतावरीचा प्रयोग करू शकता. यामुळे जखम लवकर भरण्यास मदत होते.

शतावरी मध्ये विटामिन ई असल्याने, चेहऱ्यावरील काळे डाग दूर होऊन, चेहऱ्याला ग्लो येतो. त्वचेवर उन्हाचा विपरीत परिणाम झाल्याने, टॅनिंग झाल्या कारणाने चेहरा काळवंडतो. परंतु शतावरी पावडरची लेप चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळतो.

FAQ

१. शतावरी चा मराठीत उपयोग काय?

शतावरीला अतिरसा, बहुसुता, नारायणी, विष्णू प्रिया, अशी अनेक नावं संस्कृत मध्ये आहे. शतावरी म्हणजे काय तर जिला अनेक मुळांनी आवरण घातलेल आहे, अशी वनस्पती. अगदी ऋग्वेदात अथर्व वेदांत खूप पुरातन काळापासून उल्लेख असणारी आणि आपल्या भारतीय लोकांमध्ये अनेक वर्षांपासून वापरण्यात येणारी ही वनस्पती.

२. शतावरी चा उपयोग काय?

शतावरी पित्त शामक आहे. थंड गुणाची आहे. त्यामुळे ज्यांना पित्ताचा ताप असेल किंवा ज्यांना संडासला व्यवस्थित होत नसेल किंवा ज्यांना जुलाब खूप जास्त प्रमाणात होत असतील आणि जुलाबा मधून खूप उष्ण पित्त रक्त जात असेल तर अशा वेळेस बेल, कुठज अशा सारख्या वनस्पतींसोबत शतावरीचा वापर केला पाहिजे.
पण अर्थात वैद्यकीय सल्ल्याने. तुमच्या मनाने करू नका. कधी कधी या आजारांमध्ये खूप बारकाई असतात आणि जर मनाने वापर केला फायदा झाला तर चांगला आहे, पण जर सिरीयस काही कंडिशन झाली तर, ती घरी कव्हर नाही होत म्हणून कधी पण वैद्याचा किंवा जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन, औषधींचा वापर करायला काहीच हरकत नाही.

३. शतावरी उष्ण की थंड?

शतावरी ही गोड आणि कडवट रसाची वनस्पती आहे. पोटात गेल्यावर ही गोड रसाने पचते आणि ही गुणाने, वीर्याने थंड गुणाची असते. शतावरी ही पचायला जड आणि स्निग्ध असते. आयुर्वेदामध्ये या वनस्पतीला खूप सुंदर ग्रुप मध्ये वापरले जात. ते म्हणजे वयस्थापण.

४. शतावरीचा केसांसाठी काय फायदा आहे ?

शतावरी चे आपल्या केसांसाठी अनेक फायदे आहेत. शतावरी पावडर आपल्या केसांना लावल्याने केस मजबूत व मुलायम होण्यास मदत होतात. तसेच आपल्या केसांची वाढ देखील, झपाट्याने होऊ लागते.
केस घनदाट करण्यासाठी व झपाट्याने वाढवण्यासाठी, शतावरी व अश्वगंधा पावडर दुधात मिसळून त्याचे सेवन करावे. यामुळे केस चमकदार होऊन, केसातील कोंडा दूर होण्यास मदत होते.

५. शतावरी गर्भ पोषक आहे का ?

स्त्रियांसाठी शतावरी खास वरदान आहे असे म्हटले जाते. कारण, शतावरीला दुसरं नाव अतिरसा आहे. म्हणजे ती रस धातूच पोषण करते. याशिवाय ती शुक्राचही पोषण करते.
म्हणून जेव्हा बाळ पोटात असतं तर, साधारण चौथा महिना लागल्या पासून थोड्या प्रमाणात म्हणजे अर्धा ते एक चमचा सकाळी दुधासोबत जर शतावरी घेतली तर, ती बल्य या गुणाने गर्भाशयाच्या आवरणाचं आणि सोबत गर्भाचं देखील पोषण करते. म्हणून ती गर्भ पोषक आहे.

थायरॉईडसाठी शतावरी चांगली आहे का ?

शतावरी कल्प किंवा शतावरी चे कोणतेही स्वरूप थायरॉईडसाठी विशेष किंवा खूप फायदेशीर ठरेल असे कोणत्याही तज्ञांचे मत नाही. यावर तेवढे संशोधन देखील झालेले नसावे.

अश्वगंधा आणि शतावरी एकत्र कसे घेता येईल?

श्वगंधा आणि शतावरी एकत्र घेण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे डोस घ्या आणि तुमच्या आवडते पेय जसे दूध किंवा ज्यूस मध्ये मिक्स करून घ्या.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास शतावरी चे फायदे सांगितले आहेत. तुम्ही देखील शतावरीचा वापर करून विविध समस्यांपासून सुटका मिळवू शकता. तुम्हाला हा लेख आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेयर करा. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.

Leave a comment