समतोल आहार म्हणजे काय Balanced Diet In Marathi

समतोल आहार म्हणजे काय Balanced Diet In Marathi – अन्न ही मानवाची मूलभूत गरज आहे, प्राथमिक गरज आहे.

आपल्या शरीराच्या योग्य वाढ आणि विकासासाठी, तसेच शरीराच्या प्रत्येक कार्यासाठी जसे की चालणे, बोलणे, विचार करणे, चयापचे कार्य, मलमूत्र विसर्जन, या प्रत्येक कार्यासाठी आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते.

आणि ही ऊर्जा आपल्याला आपण जे काही अन्नपदार्थ खातो, त्याद्वारे मिळत असते. तसेच आपल्या शरीराला वेगवेगळ्या पोषण मूल्यांची देखील गरज असते आणि मग हे सगळे पोषक घटक किंवा हे सगळे उपयुक्त आवश्यक घटक, आपल्याला आपण जे काही अन्नपदार्थ खातो, त्यातून मिळत असते.

विशिष्ट अन्नपदार्थांमध्ये विशिष्ट प्रकारची किंवा एक पर्टिक्युलर पोषणमूल्य असतात. सगळ्यांना पदार्थांमध्ये सगळेच पोषणमूल्य असतात, असे नाही.

तर मग पोषक आहार घेण्यासाठी आणि निरोगी आरोग्य राखण्यासाठी, प्रत्येकाला समतोल आहार घेणे गरजेचे आहे. समतोल आहार म्हणजे नेमकं काय हे सर्वांना माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे.

आजच्या लेखाद्वारे आपण समतोल आहार म्हणजे काय ? ज्यालाच आपण इंग्लिश मध्ये बॅलन्स डाईट म्हणतो. त्यानंतर वेगवेगळी पोषणमूल्य कोणती ? अन्नपदार्थांचे वेगवेगळे गट कोणते ? त्या गटामध्ये कोणते अन्नपदार्थ मोडतात ? तसेच कोणत्या अन्नगटातून किंवा कोणत्या अन्नपदार्थातून तुम्हाला कोणते पोषणमूल्य मिळतात ? या सर्वांबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत.

निरोगी आरोग्य आणि पोषक आहाराचे महत्त्व सर्वांना बऱ्यापैकी समजलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर अन्न आणि पोषण याविषयी माहिती या लेखाद्वारे देण्याचा आम्ही प्रयत्न आम्ही केला आहे. खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

समतोल आहार म्हणजे काय Balanced Diet In Marathi

समतोल आहार म्हणजे काय ?

समतोल आहार म्हणजे काय

समतोल आहार म्हणजे काय Balanced Diet In Marathi – समतोल आहार म्हणजे असा आहार की, ज्या द्वारे तुम्हाला सर्व आवश्यक पोषणमूल्य योग्य त्या प्रमाणात मिळते. आपल्या जेवणात भात, वरण, भाजी, भाकरी, पोळी, मांस, मासे, असे अनेक अन्नपदार्थ असतात.

याशिवाय दिवसभरात आपण अधून मधून वेगवेगळे पदार्थ खातो आणि पितो. अशा दिवसभरातील खाल्ल्या जाणाऱ्या सर्व अन्नपदार्थांना एकत्रितपणे आहार म्हणतात. अन्नपदार्थ रंगाने, रूपाने, तसंच चवीने एकमेकांपासून भिन्न असतात.

वेगवेगळ्या अन्नामध्ये पिष्टमय, प्रथिनयुक्त आणि स्निग्ध पदार्थ तसंच क्षार आणि जीवनसत्व कमी अधिक प्रमाणात असतात. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, यामध्ये पिष्टमय पदार्थांचे प्रमाण अधिक असतं. डाळी, मांस, दूध यामध्ये प्रथिने अधिक प्रमाणात असतात.

बियांमध्ये स्निग्धाच प्रमाण अधिक असतं. पालेभाज्यांपासून आपल्याला क्षार आणि जीवनसत्व मिळतात. शरीराचे योग्य पोषण व्हावं, शरीर कार्यक्षम आणि निरोगी राहावं यासाठी कोणकोणते अन्नपदार्थ आहारात असावेत ?

शरीराला लागणारे सर्व अन्नघटक पुरेसे मिळतील, तसेच व्यक्तीच्या गरजेनुसार त्यांचे प्रमाण योग्य राहील असे, निरनिराळे अन्नपदार्थ आहारात असायला हवे अशा आहाराला संतुलित आहार किंवा चौरस आहार म्हणतात.

हे वाचा –

अन्नाचे तीन प्रमुख कार्य

समतोल आहार म्हणजे काय Balanced Diet In Marathi – अन्न ही माणसाची मूलभूत गरज आहे. मात्र व्यक्तिगत आरोग्य प्राप्त करण्यासाठी, सकस आणि पोषक आहार घेणे गरजेचे आहे.

शरीर संवर्धन आणि शरीरातील जैव रासायनिक क्रिया यांच्या दृष्टीने अन्नाचे तीन प्रमुख कार्य आहेत, ती खालील प्रमाणे ;

ऊर्जा देणे

शरीराच्या चलनवलनास आणि शरीरांतर्गत विविध कार्याकरिता आवश्यक ऊर्जा स्निग्ध पदार्थातून मिळते.

तांदूळ, गहू, ही तृणधान्य आणि बटाटे, साखर, पिष्टमय तर तूप, लोणी, चीज, वनस्पती तेल, शरीरास स्निग्ध पदार्थ पुरवत असतात व यातून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते.

रोजची ऊर्जेची गरज किती वेगवेगळी असते हे पुढील तक्त्यावरून कळेल –

लिंग बैठे काममध्यमअतिश्रमकाम
पुरुष24002800(55कि)3900
स्त्री19002200(45कि)3000

शरीर बांधणी करणे

शरीराची वाढ करणे आणि झीज भरून काढणे, हे कार्य प्रामुख्याने प्रथिनांचा समावेश असलेल्या अन्नाने होते.

कडधान्य व डाळी दूध, मांस, मासे, चीज, अंडी, इत्यादींपासून प्रथिने मिळतात.

संरक्षण करणे

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, विविध स्वरूपाच्या जीवनप्रक्रिया घडवणे, हे कार्य प्रामुख्याने खनिज, द्रव्य, जीवनसत्व आणि प्रथिने करतात.

दूध, लोणी, फळे, पालेभाज्या, इत्यादींपासून ही द्रव्य प्रथिने व खनिजे आपल्याला प्राप्त होतात.

पोषणमुल्ये म्हणजे काय ?

समतोल आहार

सर्व पोषणमूल्य म्हणजे नेमकी कोणती, पोषणमूल्य आपण जे काही अन्नपदार्थ खातो, त्यातून आपल्याला कोणकोणते पोषण मूल्य मिळतात, तर आपण जे काही अन्न खातो त्यातून आपल्याला प्रामुख्याने कार्बोहाइड्रेट्स, प्रथिने म्हणजेच प्रोटिन्स, स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅट्स, जीवनसत्व म्हणजेच विटामिन्स, आणि खनिजे म्हणजेच मिनरल्स, हे पोषणमूल्य मिळत असतात.

त्याचबरोबर पाणी हा देखील सर्व अन्नाचा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येक अन्नपदार्थांमध्ये कमी जास्त प्रमाणात पाणी हे उपलब्ध असते किंवा पाण्याचा साठा त्या अन्नपदार्थांमध्ये असतो, तर हे झाले विविध पोषणमूल्य.

पोषण मूल्यांची गरज

समतोल आहार म्हणजे असा आहार की, ज्यात तुम्हाला सर्व पोषणमूल्य योग्य त्या प्रमाणात मिळतील. आता योग्य त्या प्रमाणात म्हणजे किती, तर पोषण मूल्यांची गरज ही कशावरून डिसाईड होते किंवा ही कोण ठरवतं तर, प्रत्येक देशामध्ये पोषण आणि आहार किंवा अन्न आणि पोषण याविषयी कार्यरत असणाऱ्या सरकारी संस्था, वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे लोकांची किंवा जनतेची पोषण मूल्यांची गरज ही ठरवत असतात किंवा त्यांनी ती प्रामाणीत केलेली असते, ठरवलेली असते.

तर भारतीयांसाठी सुद्धा अन्न आणि पोषण संस्थाने पोषण मूल्यांची गरज, हा एक तक्ता प्रसिद्ध केलेला आहे. वेळोवेळी त्याच्यामध्ये सुधारणा केल्या जातात किंवा वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे त्याच्यामध्ये चेंजेस देखील केले जातात.

तर मग ही पोषण मूल्यांची गरज प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असते. प्रामुख्याने ही पोषण मूल्यांची गरज तुमचं वय, तुमचं लिंग, तुमची काम करण्याची पद्धत, आणि तुमच्या शरीराची अवस्था, शरीराची अवस्था म्हणजे तुम्ही बालक आहात, तुम्ही किशोरवयीन मुल आहात किंवा तुम्ही वृद्ध आहात किंवा तुम्ही स्तनदा माता आहात किंवा तुम्ही गरोदर स्त्री आहात.

या झाल्या शरीराच्या वेगवेगळ्या अवस्था. तर ही पोषण मूल्यांची गरज वय, लिंग, काम करण्याची पद्धत आणि शरीराच्या वेगवेगळ्या अवस्था याच्यावरून ठरत असते.

उदाहरणार्थ गर्भवती स्त्रीला अधिक प्रथिनांची गरज असते. स्तनदा मातेला अधिक प्रथिनांची गरज असते. किशोरवयीन मुलींना अधिक लोह युक्त आहाराची गरज असते.

वयोवृद्ध व्यक्तींना समतोल आहार म्हणजे जीवनसत्व आणि खनिजयुक्त आहाराची गरज असते. तर या पद्धतीने प्रत्येकाचं वय, लिंग, काम करण्याची पद्धत, शरीराची अवस्था यानुसार प्रत्येकाची पोषण मूल्यांची गरज ही वेगवेगळी असते.

कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे, या आवश्यक पोषण मूल्यांच्या बरोबरच अन्नपदार्थातून आपल्याला फायटकेमिकल्स, अँटी-ऑक्सीडेंट्स, न्यूट्रॉसिटीकल्स आणि फॅटी ऍसिड हे घटक देखील मिळत असतात आणि याचा देखील आपल्या आरोग्यावरती अत्यंत चांगला परिणाम असतो किंवा आपल्या आरोग्यासाठी हे घटक देखील तितकेच महत्त्वाचे असतात.

पोषण मूल्य कोणती ?

कर्बोदके

कर्बोदके हे अत्यंत महत्त्वाचे पोषण मूल्य आहे. तर १ ग्राम कर्बोदकांपासून तुम्हाला ४ किलो कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते.

कर्बोधकांचे जेव्हा आपण सेवन करतो किंवा आपण जेव्हा कर्बोधके युक्त आहार खातो, तेव्हा या कर्बोदकांचे रूपांतर साखरेमध्ये होतं आणि ही साखर आपल्या रक्तामध्ये शोषली जाते.

रक्ताद्वारे ही साखर आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीला पुरवली जाते आणि मग या पेशी त्या साखरेपासून ऊर्जा तयार करून, आपल्या शरीराच कार्य हे सुरळीतपणे पार पाडतात किंवा सुरळीतपणे चालू ठेवतात. तर कर्बोदके हे ऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचं असं पोषणमूल्य आहे.

फळे, भाज्या, कडधान्य, तृणधान्य, यातून प्रामुख्याने कर्बोदके मिळत असतात. फळे आणि भाज्यांमध्ये शरीराला उपयुक्त असणारी कर्बोदके म्हणजेच त्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असे म्हणतात किंवा तंतुमय पदार्थ हे जास्त प्रमाणात असतात.

प्रथिने

कर्बोदकांच्या पाठोपाठ प्रथिने हा देखील आपल्या शरीरासाठी ऊर्जेचा एक महत्त्वाचा स्त्रोत आहे. १ ग्राम प्रथिनांपासून, ४किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते.

आणि प्रथिनांच मुख्य कार्य म्हणजे, शरीराच्या नवीन पेशी तयार करणे, आणि शरीराचं कार्य म्हणजे रचना आणि विकास या कार्यामध्ये प्रथिनांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे.

ही प्रथिना आपल्याला कशातून मिळतात तर, सर्व प्रकारचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, अंडी, त्याचबरोबर कडधान्य आणि डाळी यातून आपल्याला प्रथिने मिळत असतात.

स्निग्ध पदार्थ

कर्बोदके आणि प्रथिनानंतर स्निग्ध पदार्थ हा देखील अत्यंत महत्त्वाचे पोषणमूल्य आहे. १ ग्राम स्निग्ध पदार्था पासून ९ किलो कॅलरी एवढी ऊर्जा आपल्याला मिळत असते. सर्वात जास्त ऊर्जा ही स्निग्ध पदार्थातून मिळते.

स्निग्ध पदार्थ आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात कारण काही जीवनसत्व ही स्निग्ध पदार्थांमध्येच विरघळतात. मग आपण जेव्हा अशा जीवनसत्व युक्त आहार खातो, तेव्हा ती जीवनसत्व आपल्या शरीराला मिळण्यासाठी आपल्या आहारामध्ये स्निग्ध पदार्थ असणं अत्यंत गरजेचे आहे.

तर हे स्निग्ध पदार्थ आपल्याला कोणत्या गटातून मिळतात किंवा कोणत्या अन्नपदार्थातून मिळतात तर, साधारणपणे दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांसल पदार्थ, मटण, अंडी, यातून आपल्याला फॅट्स जास्त प्रमाणात किंवा स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात मिळत असतात.

तसेच आपण जे काही कुकिंग साठी ऑइल वापरतो, स्वयंपाकासाठी जे तेल, तूप आपण वापरतो, त्यातून सुद्धा आपल्याला फॅट मिळत असतं आणि प्रत्येक अन्नपदार्थांमध्ये नैसर्गिक रित्या कमी अधिक प्रमाणात स्निग्ध हे उपलब्ध असतं तर हे आहे स्निग्ध पोषणमूल्य जीवनसत्वे हे अत्यंत महत्त्वाचे पोषण मूल्य आहे.

जीवनसत्व

शरीराची वाढ, विकास, चयापचय या महत्त्वाच्या कार्यांमध्ये जीवनसत्वांचा वाटा असतो. जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये साठवून ठेवता येत नाही, त्यामुळे आपल्याला वेळोवेळी जीवनसत्व युक्त आहार घेण्याची गरज असते.

जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे विविध आजार होऊ शकतात. जसे की विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे रक्ताक्षय होऊ शकतो, विटामिन डी च्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होणे, अशा पद्धतीचे वेगवेगळे विकार आपल्याला होऊ शकतात.

हे जीवनसत्व आपल्याला फळे आणि भाज्या यातून मुबलक प्रमाणात मिळतात.

खनिजे

प्रत्येक अन्नपदार्थांमध्ये कमी जास्त प्रमाणात खनिजे ही उपलब्ध असतात. खनिजांचा महत्त्वाचा वाटा शरीराच्या रचनेमध्ये जसे की केस, हाडे, दात, यांच्या रचनेमध्ये असतो.

तसेच चयापचयच्या काही महत्त्वाच्या क्रियांमध्ये खनिजे आवश्यक असतात आणि हि खनिजे आपल्याला फळे आणि भाज्यांमधून मुबलक प्रमाणात मिळतात.

अन्नपदार्थांचे वेगवेगळे गट कोणते ?

Balanced Diet In Marathi

आपण जे काही अन्नपदार्थ खातो, त्याचं वेगवेगळ्या गटांमध्ये वर्गीकरण केलेला आहे.

१)  कडधान्य, तृणधान्य, आणि मिलेट्स

यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, तसेच वेगवेगळे कडधान्य, वाटाणा, हरभरा, चवळी, मटकी, मूग त्यानंतर मिलेट्स जे की बाजरी, ज्वारी, राजगिरा, हराळ, या सगळ्या मिलेट्सचा समावेश होतो. या अन्नगटातून प्रामुख्याने कर्बोदके हे पोषण मूल्य मिळत असतं.

परंतु कर्बोधकांच्या बरोबरीनेस यामध्ये कमी-जास्त प्रमाणात प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व आणि खनिजे देखील उपलब्ध असतात. परंतु जास्तीत जास्त यामधून आपल्याला कोर्बोद्के मिळतं.

२)  फळे आणि भाज्या

आता या नावावरूनच सगळं समजतं की, फळे आणि भाज्या या अन्न गटांमध्ये सर्व प्रकारची फळ आणि सर्व प्रकारच्या भाज्यांचा समावेश होतो आणि या अन्नगटातून आपल्याला प्रामुख्याने तंतुमय पदार्थ, जीवनसत्वे हि पोषणमूल्य मिळत असतात.

३)  दूध, दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मासे, आणि मांस

या अन्न गटामध्ये नावाप्रमाणेच दूध त्यानंतर दुधापासून बनणारे सर्व पदार्थ जसे की तूप, लोणी, पनीर, चीज, बटर त्यानंतर अंडी, मटन, मासे, इतर सी फूड म्हणजे की समुद्रात आढळणारे जे प्राणी आपण खातो जसे की झिंगे, खेकडा, या सर्व अन्नपदार्थांचा दूध, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे, अंडी, यामध्ये समावेश होतो.

हा गट अत्यंत महत्त्वाचा आहे तो यासाठी की, यामधून तुम्हाला चांगल्या प्रतीचे प्रथिने मिळतात. तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थातून, तुम्हाला कॅल्शियम सुद्धा चांगल्या प्रमाणात मिळतं. तर हा देखील एक महत्त्वाचा अन्न गट आहे.

तेल बिया आणि बिया

आता यामध्ये शेंगदाणा, तीळ, खोबरं, त्यानंतर काजू, बदाम, जवस, या सगळ्या ज्यापासून आपण तेल निर्मिती करतो किंवा यामध्ये किंवा स्निग्ध अति प्रमाणात असतात, या सगळ्या तेलबियां यामध्ये समावेश होतो.

हा अन्नगट देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण यातून आपल्याला आवश्यक स्निग्धआम्ल मिळत असतात. ओमेगा थ्री फॅटी ऍसिड जे एक प्रकारचं चांगलं आरोग्यदायी असंच स्निग्धआम्ल आहे, ते आपल्याला या अन्नगटातून मिळत असतं आणि सर्वात जास्त ऊर्जा देखील आपल्याला याच अन्नगटातून मिळत असते.

शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी सकस आणि संतुलित आहाराचे महत्त्व

Balanced Diet

आपल्या दैनंदिन आहारात असलेल्या अन्नपदार्थाचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेऊन, योग्य सकस व पौष्टिक अन्नपदार्थाचे आपण सेवन करणे आवश्यक असते.

यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित व उत्तम राखण्यास मदत होते. सकस आणि पौष्टिक अन्नपदार्थ आपल्याला निरोगी ठेवतात आणि अनेक आजारांपासून आपले संरक्षणही करतात.

अन्नाशी मनुष्याचा खूप जवळचा संबंध आहे. आपल्या शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते, तेव्हा आपले शरीर आपल्याला भूक लागली आहे अशी सूचना करते. अनेकदा आपण भूक नसतानाही खातो आणि अनेक वेळा तीव्र भूक असतानाही खात नाही.

आपला आहार केवळ भूक भागवण्यासाठी नसून शरीराचे पोषण करण्यासाठी असतो. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, शरीराला अनेक जीवनसत्वांची आवश्यकता असते. शरीराच्या वाढीसाठी स्नायूंच्या बळकटीसाठी, निरोगी स्वास्थ्यासाठी, आहार सकस व परिपूर्ण असणे आवश्यक आहे.

प्रत्येक मनुष्याची खाण्याची इच्छा नेहमी एकसारखी नसते. खाण्याची इच्छा व भुकेची तीव्रता वयोमानानुसार बदलते. प्रत्येक व्यक्तीने सकाळी भरपूर नाष्टा केला पाहिजे. त्यामुळे दिवसभर मानसिक आणि शारीरिक मेहनतीसाठी ऊर्जा मिळते.

अन्नाची गरज

सर्व व्यक्तींची अन्न गरज एकसारखीच असते का ? तुम्ही घरात एकत्र जेवायला बसतात. तुम्ही तुमचा दादा आणि तुमच्या आजोबा यांच्या आहाराचे प्रमाण एकसारखं असतं का ?

तुमचा दादा तुमच्याहून वयाने मोठा आहे, त्याच्या शरीराची वाढ झपाट्याने होते, स्वाभाविकच त्याच्या आहाराचे प्रमाण अधिक आहे. तुमचे आजोबा तुमच्या दादाहून वयाने खूप मोठे आहेत, पण त्यांचा आहार तुमच्या दादाच्या आहारापेक्षा खूप कमी आहे.

वयस्कर माणसे कष्टाची काम फारशी करत नाहीत, त्यांच्या शरीराची वाढ सुद्धा थांबलेली असते. म्हणून त्यांचा आहार बेताचा असतो.

वाढत्या वयाच्या मुलांच्या आहारापेक्षा वाढत्या वयाच्या मुलींना कमी आहार पुरतो, असं काही जणांना वाटतं. परंतु मुलगा किंवा मुलगी यांची अन्न गरज साधारणपणे एकसारखीच असते. व्यक्तीच्या आहाराचे प्रमाण तिच्या कामाच्या स्वरूपावर अवलंबून असतं.

कष्टाची काम करणाऱ्यांची ऊर्जा गरज बैठे काम करणाऱ्यांच्या ऊर्जा गरजेपेक्षा अधिक असते, म्हणून कष्टाची कामे करणाऱ्यांची अन्न गरजही बैठे काम करणाऱ्यांच्या अन्न गरजेपेक्षा अधिक असते.

साजूक तूप, काजू, बदाम, यांसारखे महागडे पदार्थ खाल्ले तरच शरीराचे उत्तम पोषण होते, असे अनेकांना वाटते.

परंतु निव्वळ पौष्टिक पदार्थ खाण्याने शरीराच्या सर्व गरजा भागत नाहीत. त्यापेक्षा वेगवेगळी फळे, पालेभाज्या, शेंगदाणे, फुटाणे, डाळी, कडधान्यांच्या उसळी, यातून आपल्या शरीराला आवश्यक असणारे अन्नघटक मिळतात. शरीराच्या गरजा भागतात.

शरीराची चांगली वाढ होते. त्यांचा आहारात समावेश केल्यास शरीर पुष्ट व्हायला मदत होते.

कुपोषण

काही वेळा शरीराने अशक्त आणि हडकुळी मुलं आपण पाहतो. या मुलांचे पोट पुढे आलेलं असतं. या मुलांच्या चेहऱ्यावर तजेला नसतो.

अशा मुलांच्या आहारात पिष्टमय आणि प्रथिनियुक्त पदार्थांची कमतरता असते. त्यामुळे त्यांच्या शरीराची योग्य वाढ झालेली नसते. ही मुले रोगांची सामना करू शकत नाहीत.

अपुऱ्या आणि असंतुलित आहारामुळे, त्यांचे योग्य पोषण झालेले नसते. यालाच “कुपोषण” म्हणतात.

अभावजन्य विकार

काही अन्न घटकांच्या कमतरतेमुळे विकार जडतात. त्यांना अभावजन्य विकार किंवा त्रुटीजन्य विकार असे म्हणतात. अभाव म्हणजे त्रुटी किंवा कमतरता. जीवनसत्व हा आहाराचा घटक असल्याचं तुम्ही शिकलात.

जीवनसत्वे विविध प्रकारची आहेत. आहारातील त्यांच्या कमतरतेमुळे काही विकार जडतात काही जणांना दिवसा स्पष्ट दिसते, परंतु रात्री अंधुक प्रकाशात मात्र त्यांना समोरची वस्तू स्पष्ट दिसत नाही. याला रातांधळेपणा म्हणतात.

रातांधळेपणा ए जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो. आपल्या देशामध्ये रातांधळेपणा बालकांची संख्या मोठी आहे. योग्य वेळी उपाययोजना झाली नाही तर, अशा बालकांना कायमचं अंधत्व येतं.

रातांधळेपणावर उपचार म्हणून गाजर, पपई, हिरव्या पालेभाज्या, दूध, असे अन्नपदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या पदार्थांमध्ये ए जीवनसत्व अधिक प्रमाणात असतं.

हे पदार्थ नेहमीच आपल्या आहारात असतील तर रातांधळेपणाचा धोका कमी होतो. ए जीवनसत्वाप्रमाणेच बी, सी, डी, अशा इतर जीवनसत्वांच्यामुळे ही निरनिराळे विकार जडतात. त्यांची माहिती पुढील तक्त्यामध्ये दिली

जीवनसत्वांच्या अभावामुळे होणारे विकार व उपाय योजना

जीवनसत्वजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा विकारउपाययोजना
ए जीवनसत्वरातांधळेपणाआहारात पालेभाज्या, पिवळी पिकलेली फळे, गाजर, पपई, आणि दूध यांचा समावेश
बी जीवनसत्वजीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे,आहारात डाळी, पालेभाज्या, दूध यांचा समावेश
सी जीवनसत्वहिरड्यातून रक्त येणे,आहारात आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली कडधान्ये, यांचा समावेश.
डी जीवनसत्वपायांची हाडे वाकणे, पाठीला बाक येणे,कोवळ्या सूर्यप्रकाशात बसणे, दूध, शार्क लिव्हर ऑइल आणि कॉड लिव्हर ऑइल यांचा आहारात समावेश

आपल्या देशात वेगवेगळ्या भागात, वेगवेगळे अन्नपदार्थ खाल्ले जातात. अन्नपदार्थ तयार करण्याच्या आपल्याकडच्या पद्धती परंपरेने चालत आलेले आहेत.

त्यापैकी काही पद्धती मुळे अन्नपदार्थांची पौष्टिकता वाढते. हरभरा, मूग, मटकी, अशा कडधान्यांना मोड आणून केलेल्या उसळी आपण खातो. मोड येताना धान्यांमधील जीवनसत्वांचे प्रमाण वाढतं. तांदूळ आणि उडीद डाळीचा भरडा, आमुन इडली, डोसा आंबोळी असे पदार्थ तयार केले जातात.

आंबवल्यामुळे अन्नपदार्थांतील जीवनसत्वांमध्ये वाढ होते. त्यामुळे त्यांची पौष्टिकता वाढते. याउलट अन्नपदार्थ खूप वेळ शिजत ठेवणे, शिजलेल्या पदार्थातील पाणी काढून टाकणे, अशांमुळे पदार्थांची पौष्टिकता कमी होते.

शिजणाऱ्या पदार्थांतून पाणी काढले असता, या पाण्यात विरघळलेले उपयुक्त घटक पाण्याबरोबर निघून जातात. अन्नपदार्थ जास्त काळ शिजवल्यास त्यातील काही जीवनसत्वे नाश पावतात.

आहार सल्लागार

आपले वय, कामाचे स्वरूप, यानुसार आपण आहार घेतो. आहाराचा संबंध आरोग्याशी असतो. योग्य आहार घेतला नाही तर, आजार पण येतं.

आजारात घ्यायच्या आहाराबाबत डॉक्टर मार्गदर्शन करतात अति लठ्ठपणा सारख्या किंवा कुपोषणामुळे होणाऱ्या काही त्रासांचा आहाराशी संबंध असतो.

काही विशिष्ट आजारात कोणता आहार घ्यावा ? याचा सल्ला देण्यासाठी स्वतंत्र आहार तज्ञ तसंच तज्ञ डॉक्टर असतात. त्यांनी आहार विषयक दिलेल्या सल्ल्याला “आहार विषयक समुपदेशन” असं म्हणतात.

समतोल आहारामध्ये तुम्हाला ५० ते ६० टक्के ऊर्जा ही कर्बोधके या पोषण मूल्यातून मिळाली पाहिजे, १० ते २० टक्के ऊर्जा ही तुम्हाला प्रथिनांपासून मिळाली पाहिजे.

आणि २० ते ३० टक्के ऊर्जाही तुम्हाला स्निग्ध पदार्थातून मिळाली पाहिजे किंवा असा आहाराचे आयोजन करण्यासाठी, असा समतोल आहार घेण्यासाठी, तुम्हाला कर्बोदकेयुक्त आहार ज्याच्यामध्ये मग मोड कडधान्य, तृणधान्य आणि आपण जे काही भात, पोळी, भाकरी, त्यानंतर डाळ, उसळ, हे सगळं जे खातो ते आपलं कर्बोदकेयुक्त अन्न आहे.

FAQ

१. समतोल आहार वर्ग 3 म्हणजे काय?

अन्नपदार्थ रंगाने, रूपाने, तसंच चवीने एकमेकांपासून भिन्न असतात. वेगवेगळ्या अन्नामध्ये पिष्टमय, प्रथिनयुक्त आणि स्निग्ध पदार्थ तसंच क्षार आणि जीवनसत्व कमी अधिक प्रमाणात असतात. शरीराला लागणारे सर्व अन्नघटक पुरेसे मिळतील, तसेच व्यक्तीच्या गरजेनुसार त्यांचे प्रमाण योग्य राहील असे, निरनिराळे अन्नपदार्थ आहारात असायला हवे अशा आहाराला संतुलित आहार किंवा चौरस आहार म्हणतात.

२. समतोल आहार निबंध म्हणजे काय?

समतोल आहार म्हणजे असा आहार की, ज्या द्वारे तुम्हाला सर्व आवश्यक पोषणमूल्य योग्य त्या प्रमाणात मिळते. आपल्या जीवनात भात, वरण, भाजी, भाकरी, पोळी, मांस, मासे, असे अनेक अन्नपदार्थ असतात. याशिवाय दिवसभरात आपण अधून मधून वेगवेगळे पदार्थ खातो आणि पितो. अशा दिवसभरातील खाल्ल्या जाणाऱ्या सर्व अन्नपदार्थांना एकत्रितपणे आहार म्हणतात.
अन्नपदार्थ रंगाने, रूपाने, तसंच चवीने एकमेकांपासून भिन्न असतात. वेगवेगळ्या अन्नामध्ये पिष्टमय, प्रथिनयुक्त आणि स्निग्ध पदार्थ तसंच क्षार आणि जीवनसत्व कमी अधिक प्रमाणात असतात. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, यामध्ये पिष्टमय पदार्थांचे प्रमाण अधिक असतं. डाळी, मांस, दूध यामध्ये प्रथिने अधिक प्रमाणात असतात. बियांमध्ये स्निग्धाच प्रमाण अधिक असतं. पालेभाज्यांपासून आपल्याला क्षार आणि जीवनसत्व मिळतात.

३. संतुलित आहार घेणे का गरजेचे आहे ?

आपल्या दैनंदिन आहारात असलेल्या अन्नपदार्थाचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेऊन, योग्य सकस व पौष्टिक अन्नपदार्थाचे आपण सेवन करणे आवश्यक असते.
यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित व उत्तम राखण्यास मदत होते. सकस आणि पौष्टिक अन्नपदार्थ आपल्याला निरोगी ठेवतात आणि अनेक आजारांपासून आपले संरक्षणही करतात.

४. संतुलित आहारामध्ये कर्बोदके काय कार्य करतात ?

कर्बोदके हे अत्यंत महत्त्वाचे पोषण मूल्य आहे. तर १ ग्राम कर्बोदकांपासून तुम्हाला ४ किलो कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते. कर्बोधकांचे जेव्हा आपण सेवन करतो किंवा आपण जेव्हा कर्बोधके युक्त आहार खातो, तेव्हा या कर्बोदकांचे रूपांतर साखरेमध्ये होतं आणि ही साखर आपल्या रक्तामध्ये शोषली जाते.
रक्ताद्वारे ही साखर आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीला पुरवली जाते आणि मग या पेशी त्या  साखरेपासून ऊर्जा तयार करून, आपल्या शरीराच कार्य हे सुरळीतपणे पार पाडतात किंवा सुरळीतपणे चालू ठेवतात. तर कर्बोदके हे ऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचं असं पोषणमूल्य आहे.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस समतोल आहार म्हणजे काय ? याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की काळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment