अक्षय तृतीया मराठी माहिती Akshaya Tritiya In Marathi – आपल्या प्राचीन संस्कृती, परंपरांमध्ये साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. त्यापैकी एक अक्षय्य तृतीया असल्यामुळे यालाही अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे.
सर्व हिंदू तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास अक्षय तृतीया म्हणजे काय? त्याचे महत्व, काय करावे ? काय करू नये? अक्षय तृतीयेला काय दान करावे ? या बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
अक्षय तृतीया मराठी माहिती Akshaya Tritiya In Marathi
अक्षय्य तृतीयेचा अर्थ
अक्षय तृतीया मराठी माहिती Akshaya Tritiya In Marathi – अक्षय म्हणजे “जे कधीही संपत नाही” आणि वैशाख शुद्ध तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही.
म्हणूनच या सणाला अक्षय तृतीया असे म्हटले जाते. या दिवशी एखादी व्यक्ती चांगले कर्म आणि दान करते, त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही.
अक्षय्य तृतीयेचा इतिहास
या दिवशी कुबेराने देवी लक्ष्मीची पूजा केली आणि अशा प्रकारे कुबेराला देवांचा कोषाध्यक्ष म्हणून काम देण्यात आले.
अन्नपूर्णा देवी म्हणजेच पार्वती देवी पार्वतीचे रूप आहे याच दिवशी अन्नपूर्णा देवीचा जन्म झाला होता म्हणूनच आजच्या दिवशी लोक या देवीची पूजा करून गोरगरिबांना अन्नदान करतात.
अक्षय तृतीयेच्या दिवशी आकाशगंगेत निवास करणारी पवित्र गंगा नदी राजा भगीरथांच्या तपामुळे भगवान शंकरांनी पृथ्वीवर पाठवली होती.
महाभारतानुसार, या दिवशी श्रीकृष्णाने वनवासात असताना पांडवांना ‘अक्षय पत्र’ सादर केले होते. त्याने हे भांडे पांडवांना देऊन आशिर्वाद दिला की, या भांड्यातून अमर्याद अन्न मिळत राहील. जेणेकरून पांडवांपैकी कोणीही उपाशी राहू नये.
बसवेश्वर यांचा जन्म बागेवाडी येथे विजापूर जिल्ह्यामध्ये एका शैव ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचा जन्म हा वैशाख महिन्यातील शुद्ध तृतीयेला झाल्याचे मानले जाते म्हणून या दिवशी बसव जयंती साजरी केली जाते.
या दिवशी भगवान गणेश आणि वेद व्यास यांनी महाभारत महाकाव्य लिहिण्यास सुरुवात केली.
जैन धर्मात हा दिवस त्यांचा पहिला देव भगवान आदिनाथ यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
या दिवशी, भगवान कृष्णाने आपल्याकडे आलेल्या गरीब मित्र सुदामाला भरपूर संपत्ती देऊन त्याच्यावर कृपादृष्टी केली.
हा दिवस भगवान विष्णूचा सहावा अवतार असलेल्या भगवान परशुराम यांची जयंती म्हणूनही साजरा केला जातो.
अक्षय तृतीयेचा मुहूर्त
हिंदू दिनदर्शिकेनुसार, अक्षय्य तृतीया दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येते. यावेळी अक्षय्य तृतीया 10 मे 2024 रोजी येते.
अक्षय तृतीया पूजा मुहूर्त –
सकाळी 05: 48 मिनिटे ते दुपारी 12: 23 मिनिटे
तृतीया तिथीची सुरुवात –
10 मे 2024 रोजी सकाळी 04:17 वाजता सुरू होईल.
तृतीया तिथीची समाप्ती –
11 मे 2024 रोजी पहाटे 02:50 वाजता संपेल.
कालावधी :
6 तास 44 मिनिटे
अक्षय तृतीयेचा पूजा विधि
- या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ पाण्याने अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे.
- त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे.
- ज्या ठिकाणी पूजा करणार आहोत त्या ठिकाणी गंगाजल शिंपडावे.
- चौरंगावर पिवळे कापड घालून त्यावर भगवान गणेश भगवान विष्णू आणि आणि देवी लक्ष्मीची मूर्ती ठेवावी.
- लक्ष्मी देवीची मूर्ती ही भगवान विष्णूंच्या डाव्या बाजूला ठेवावी.
- त्यानंतर उजव्या बाजूला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. एक कलश घेऊन त्याला हळद पिंजरीचे स्वस्तिक लावावे.
- त्यानंतर त्यामध्ये पाणी आणि हळदी, कुंकू घालावे तसेच कलशांमध्ये काही नाणी घालावी.
- आंब्याचा टाळ ठेवावा आणि त्यावर नारळ ठेवावा.
- हा कलश चौरंगावर ठेवावा.
- प्रथम भगवान गणपतीचे आवाहन करावे त्यानंतर त्यांना फुले अक्षता अर्पण कराव्या.
- नंतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची प्रार्थना करावी त्यांना हळदीकुंकू अक्षता आणि फुले अर्पण करावी. देवी लक्ष्मीला हळदी, कुंकू वहावे तसेच भगवान विष्णू यांना जानवे घालावे.
- त्यानंतर भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना प्रसन्न करून घेण्यासाठी मंत्रांचा जप करावा आणि नंतर नैवेद्य अर्पण करावा.
- दुसऱ्या दिवशी स्वच्छ आंघोळ करून, स्वच्छ कपडे परिधान करून पुन्हा संपूर्ण पूजा करावी आणि पूजेची सांगता करावी.
अक्षय तृतीयेची माहिती आणि महत्व
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ज्या दिवसाचे महत्त्व आहे तो म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय शब्दाचा अर्थ आहे कधीही नाश न होणारा. या दिवशी केलेला जप, दान, ज्ञान हे अक्षय फल प्राप्ती देणारे असते, म्हणूनच याला अक्षय तृतीया असे म्हणतात.
हिंदू धर्माप्रमाणेच जैन धर्मियांमध्येही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. अक्षय तृतीयेला आखातीज असेही म्हटले जाते. हा दिवस पृथ्वीचे रक्षक श्री भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार याच दिवशी भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता.
दुसऱ्या मान्यतेनुसार, त्रेतयुगाच्या प्रारंभी हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी भगीरथाने पृथ्वीवर आणली होती. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णेची ही पूजा केली जाते. अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाक घर पवित्र होते आणि अन्नाची ही चव वाढते.
महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केल. महाभारतातील युधिष्ठिर्याला अक्षय पात्र प्राप्त झाले होते, या अक्षयपात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नव्हते. या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब व भुकेलेल्या लोकांना अन्नदान करीत असे.
याच श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्य अक्षय मानले जाते. या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य वाढते.
अक्षय तृतीये मागे हिंदूंची आणखी एक श्रद्धा आहे, श्रीकृष्ण अवतारात त्याचा गरीब मित्र सुदामा त्याला भेटायला आला, कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे मूठभर पोहे होते.
तेच सुदामाने श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले, आपला मित्र व सर्वांचे रुदय जाणणाऱ्या श्रीकृष्णाने सर्व काही समजून घेऊन सुदाम्याचे दारिद्र्य दूर केले. त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले.
तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले. या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो, त्या अक्षय प्रमाणात म्हणजे विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात. या दिवशी केलेला उपवास, जप, ध्यान अक्षय फलदायी असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीच्या पाण्याचे भांडे, पादत्राणे, छत्री, गहू, जवस, तांदूळ, वस्त्र, आंबा, यांचे सतपात्री दान करणे पुण्यदायी असते.
महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात, चैत्र गौरीची स्थापना व पूजन करतात. सुवासिनींना हळदी कुंकवासाठी घरी निमंत्रित करतात. त्यांना मोगऱ्याचा गजरा, कैरीची डाळ, पन्हे देतात. भिजवलेल्या हरभऱ्यांनी त्यांची ओटी भरतात.
हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणूनही ओळखला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी, या दिवशी पितरांचे स्मरण करून, त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात.
अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने, या दिवशी नवीन वास्तुत गृहप्रवेश करणे, नवीन वस्तू खरेदी करणे व सुवर्ण खरेदी करणे, अशा महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या जातात. या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे श्रेष्ठ फळ मिळते. अशा प्रकारे अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत उत्साहाने साजरी केली जाते.
महत्व अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ज्या दिवसाचे महत्त्व आहे तो म्हणजे अक्षय तृतीया अक्षय शब्दाचा अर्थ आहे कधीही नाश न होणारा या दिवशी केलेला जप ज्ञान हे अक्षय फलप्राप्ती देणारे असते म्हणूनच याला अक्षय तृतीया असे म्हणतात.
हिंदू धर्माप्रमाणेच जैन धर्मियांमध्येही या दिवसाचे विशेष महत्त्व आहे अक्षय तृतीयेला आखातीच असेही म्हटले जाते हा दिवस पृथ्वीचे रक्षक श्री भगवान विष्णू यांना समर्पित आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार याच दिवशी भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता दुसऱ्या मान्यतेनुसार प्रेतायोगाच्या प्रारंभी हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी भगीरथाने पृथ्वीवर आणली होती.
या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते अक्षय तृतीयेच्या दिवशी माता अन्नपूर्णेची ही पूजा केली जाते अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाक घर पवित्र होते आणि अन्नाची ही चव वाढते महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली महाभारतातील युधिष्ठिर्याला अक्षय पात्र प्राप्त झाले होते.
या अक्षयपात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीच संपत नव्हते या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब व भुकेलेल्या लोकांना अन्नदान करीत असे याच श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेले दानाचे पुण्य अक्षय मानले जाते या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही.
त्यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे भाग्य वाढते अक्षय तृतीये मागे हिंदूंची आणखी एक श्रद्धा आहे श्रीकृष्ण अवतारात त्याचा गरीब मित्र सुदामा त्याला भेटायला आला कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे मूठभर पोहे होते तेच सुधामाने श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केले.
आपला मित्र व सर्वांचे रुदय जाणणाऱ्या श्रीकृष्णाने सर्व काही समजून घेऊन सुदाम्याचे दारिद्र्य दूर केले त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजे विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात.
या दिवशी केलेला उपवास जग ध्यान अक्षय फलदायी असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे पाण्याचे भांडे पादत्राणे छत्री गहू जवस तांदूळ वस्त्र आंबा यांचे सतपात्री दान करणे पुण्यदायी असते महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजन करतात.
सुवासिनींना हळदी कुंकवासाठी घरी निमंत्रित करतात त्यांना मोगऱ्याचा गजरा कैरीची डाळ पणे देतात भिजवलेल्या हरभऱ्यांनी त्यांची ओटी भरतात हा दिवस पूर्वजांचे रूम फेडण्याचा दिवस म्हणूनही ओळखला जातो पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात.
अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन वास्तुत गृहप्रवेश करणे नवीन वस्तू खरेदी करणे व सुवर्ण खरेदी करणे अशा महत्त्वपूर्ण गोष्टी केल्या जातात या दिवशी केलेल्या शुभकार्याचे श्रेष्ठ फळ मिळते अशा प्रकारे अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत उत्साहाने साजरी केली जाते.
अक्षय तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त का म्हटलं जातं ?
अक्षय तृतीया हा सण वैशाख शुक्ल तृतीय या तिथीला साजरा केला जातो. अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे, याचं कारण म्हणजे याच दिवशी त्रेता युगाला प्रारंभ झाला होता. या दिवसांनी एका कलाहाचा अंत आणि दुसऱ्या नव्या युगाची सुरुवात, अशी संधी साधलेला हा काळ आहे.
त्यामुळेच अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला महत्त्व आहे. कारण हा संपूर्ण दिवसच एक मुहूर्त असतो. मुहूर्त खर तर एका क्षणाने साधलेला असतो, तरी संधिकाला मुळे त्याचा परिणाम २४ तासांपर्यंत कार्यरत असल्याने, तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो.
हे वाचा –
- महाशिवरात्र संपूर्ण माहिती मराठी
- लक्ष्मी पूजन संपूर्ण माहिती मराठी
- नरक चतुर्दशी संपूर्ण माहिती
- संकटनाशन गणेश स्तोत्र
अक्षय तृतीये बद्दल भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजाला काय सांगितलं ?
भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे युष्टेदार या तिथीला केलेलं दान, हवन, क्षयाला जात नाही म्हणूनच या तिथीला ऋषीमुनींनी अक्षय तृतीया असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीला जे कर्म केलं जातं, ते सर्व अक्षय अर्थात अविनाशी.
अक्षय म्हणजे ज्याचा कधीही नाश होत नाही, असं. त्यामुळेच या दिवशी दान करायला सांगितलेला आहे. या दिवशी केलेल्या दानातून पुष्कळ पुण्य मिळत. पुष्कळ पुण्य मिळाल्यामुळे, जीवाणी पूर्वी केलेलं पाप न्यून होतं, कमी होतं आणि त्याचा पुण्य साठा वाढतो.
अक्षय तृतीयेला काय करावे ?
अक्षय तृतीया, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. मग या दिवशी काय करावं आणि काय करू नये बरं, हे माहीत असायला हवं. चला तर मग जाणून घेऊयात.
- एखाद्या जिवाचे पूर्वीचे कर्म चांगले असल्यास, त्याचा पुण्यसाठा वाढतो आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला दान करायलाच हवं. दानाचे सुद्धा अनेक प्रकार आहेत बर का, म्हणजेच पहिला प्रकार आहे धनाच दान करणे, धनाच दान करणे म्हणजे तुम्ही कोणाला आर्थिक मदत करू शकता.
- आता ही आर्थिक मदत वेगवेगळ्या प्रकारची असते आणि त्यामुळे त्याचे परिणाम सुद्धा वेगवेगळे असतात. तुम्ही एखाद्या गरिबाला दान करू शकता किंवा अशी एखादी संस्था जी राष्ट्रासाठी कार्यकर्ते आहेत, अशी एखादी संस्था जी धर्मासाठी कार्यकर्ते आहेत, अशा व्यक्तींना सुद्धा तुम्ही हे दान करू शकता.
- दुसरं दान आहे मनाच दान. अक्षतृतीयेच्या दिवशी कुलदेवतेचा जप करावा/ कुलदेवतेच्या उपासनेमध्ये स्वतःला मग्न ठेवावं. आपल्या सद्गुरूंच्या मंत्राचा जप करावा. दिवसभर उपासना, साधना आणि ध्यान करावं. त्यामुळे मनाचे दान होत. अर्थात मनाला दिवसभर ईश्वरचरणी लावावं.
- आणखीन एक प्रकारचं दान अक्षय तृतीयेला आवर्जून आवर्जून आवर्जून करावं, ते म्हणजे उदक कुंभाचे दान करणे. पण उदक कुंभाचे दान करणं म्हणजे काय ? तर, मातीचा एक छोटा माठ पाण्याने भरलेला माठ दान करा. त्यामध्ये एक सुपारी टाकायची आणि तो माठ ब्राह्मणाला दान करायचा.
- त्यामुळे काय होतं तर, त्यामुळे पितृ ऋणातून आपल्याला मुक्ती मिळते. पितृदोष असेल तर त्याच्यातून मुक्ती मिळते. इतरांसाठी या प्रकारचे दान केलं जातं. तुमचा जर या गोष्टीवर विश्वास नसेल तर कमीत कमी हे तर तुम्ही मान्य कराल की एप्रिलचा उन्हाळा आहे, कडक उन्हाळा आहे, उष्माघाताने लोक मरतात, मग अशावेळी एखाद्या ठिकाणी गरिबांसाठी पाणपोळीची सोय करा.
- त्यांना माठातलं थंड पाणी प्यायला मिळेल, अशी सोय करा. प्राण्यांसाठी आणि पक्षांसाठी पाणी ठेवा. या प्रकारच्या दानाचा सुद्धा पुण्य तुम्हाला अक्षय तृतीयाला मिळेल.
- याशिवाय तुम्ही गोरगरिबांना उन्हापासून रक्षण करणाऱ्या गोष्टी दान करू शकतात, जसे की छत्री, चपला, त्याच बरोबर एखादी उपाशी असणारी व्यक्ती तिच्यासाठी धन धान्यही दान करू शकता. अक्षय तृतीयेला तुम्हाला जमेल तसं दान मात्र तुम्ही करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यात निश्चितच बदल घडून येईल.
अक्षय तृतीयेला कुठल्या गोष्टी करू नयेत ?
- अक्षय तृतीयेला मांस आणि मधिरा यांचा सेवन करू नये.
- खोटं बोलू नये.
- कुणालाही फसवू नये, त्याचबरोबर घरामध्ये वाद-विवाद भांडण अक्षय तृतीयेला करू नये.
- अक्षय तृतीयाला लक्ष्मीपूजन अवश्य करावं किंवा माता लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप करावा, माता लक्ष्मीच्या एखाद्या स्तोत्राचा पठण करावं, त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्यावर होते.
- आपण इतरांचाही विचार करावा आणि त्यामुळे आपलाही भलं.
अक्षय तृतीयेला काय दान करावे
- अक्षय तृतीयेला दही भात दान करा. यामुळे घरातील बाधा निघून जाईल.
- अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांचे तर्पण केल्याने, घरातून गरिबी, दरिद्रता निघून जाते.
- अक्षय तृतीयेला धान्याचे दान केल्याने, अकाल मृत्यूपासून रक्षण होते.
- तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी दूध, ताक, दही, दान करावे. विद्यार्जन, करिअरमध्ये यश मिळते.
- अक्षय तृतीयेला वस्त्र म्हणजेच कपड्यांचे दान घरातील, आजारपण दूर करते. गोरगरिबांना या दिवशी वस्त्रदान करावे.
- अक्षय तृतीयेला कुंकू दान केल्याने, पतीला दीर्घायुष्य मिळते. मान सन्मान प्रतिष्ठा वाढते.
- विड्याची पाने दान केल्याने, राजकीय क्षेत्रात यश मिळते.
- अक्षय तृतीयेला गादी किंवा चटई दान केल्याने, सुख प्राप्ती होते.
- अक्षय तृतीयेला चप्पल दान केल्याने, पापमुक्ती होते.
- अक्षय तृतीयेच्या दिवशी नारळाचे दान पितरांना मुक्ती देण्यास सहाय्यक ठरते.
- त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी पान, सुपारी व जल विद्वानास दान केल्याने, वैभव, ऐश्वर्या प्राप्त होते.
- अक्षय तृतीयेला फळे दान केल्याने, विविध क्षेत्रांमध्ये उच्च पद प्राप्ती होते.
- अक्षय तृतीयेला मिठाई किंवा गोड दोड पदार्थ, गोड गरिबांना दान करावे.
- गुरुदक्षिणा दिल्याने अति उच्च ज्ञानप्राप्ती होते.
- अक्षय तृतीयेला मातीचे माठ किंवा रांजण गोरगरिबांना दान करावे. या दिवसापासून अनेक घरात माठातील थंड पाणी पिण्यास सुरुवात केली जाते. माठातील पाणी पिल्याने आरोग्य उत्तम राहते.
अक्षय तृतीया भारतात कुठे कुठे साजरी केली जाते ?
राजस्थान –
राजस्थानमध्ये हा दिवस शुभ मुहूर्ताचा समजला जातो. त्याठिकाणी या दिवसाला आखा तीज असे म्हणतात. राजस्थानातील शहरी आणि ग्रामीण भागांत या दिवशी विवाह करण्याची पद्धती आहे.
दक्षिण भारत –
भगवान विष्णू आणि लक्ष्मी तसेच कुबेर पूजन यांचे या दिवशी महत्त्व असते. मंदिरात दर्शनाला जाणे, अन्नदान करणे असे आचार या दिवशी केले जातात.
उत्तर भारत –
परशुराम जन्मोत्सव साजरा केला जातो. गंगा नदीमध्ये स्नान करणे, तीर्थयात्रा करणे, यज्ञ करणे तसेच अन्न आणि धनाचे दान करणे, ब्राह्मणाला सातू आणि समिधा देणे, असे धार्मिक आचार या दिवशी केले जातात. या प्रांतात या दिवशी पूजा आणि प्रार्थना केल्या जातात.
महाराष्ट्र –
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. यादिवशी सोने खरेदी तसेच नवीन वस्तु आणि नवीन उद्योगधंदा सुरू केला जातो. खान्देशात आखाजी हा सण दीपावली इतकाच महत्त्वाचा गणला जातो. महाराष्ट्रातील खान्देश मध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला “आखाजी” म्हणून संबोधले जाते , सालदार, बलुतेदार अक्षय तृतीया या दिवसापासून नवी सुरुवात करतात.
ओरिसा –
या प्रांतात शेतकरी वर्गात या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी लक्ष्मी देवतेची पूजा करून नवीन धान्याची पेरणी केली जाते. या सणाला मुठी चूहाणा म्हटले जाते. या दिवशी पालेभाज्या आणि मांसाहार यांचे सेवन केले जात नाही. रथयात्रा काढल्या जातात. प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो. नौका विहारासाठी देवाच्या पाच बोटी यानिमित्ताने सुशोभित केल्या जातात.
पश्चिम बंगाल –
या प्रदेशातील व्यापारी वर्गात अक्षय्यतृतीया हा दिवस महत्त्वाचा दिवस मानला जातो. हालकटा या नावाने या दिवशी गणपतीची आणि लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. व्यापारी लोक नव्या हिशोबाच्या वह्या या दिवशी वापरात आणतात.
अक्षय तृतीयेबद्दल पौराणिक कथा
अक्षय तृतीयेच्या एका पौराणिक कथेनुसार फार पूर्वी धर्मदास नावाचा एक वैश्य होता धर्मदास आपल्या कुटुंबा बरोबर एका गावात राहत होता तो अतिशय गरीब होता आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्याला नेहमीच काळजी असायची त्याचे कुटुंब मोठे होते धर्मदास अतिशय धार्मिक स्वभावाचा होता त्याचे चांगले आचरण आणि देव आणि ब्राह्मणांवर त्याची असलेली भक्ती खूप प्रसिद्ध होती.
अक्षय तृतीयेच्या व्रताची माहिती आणि महत्त्व ऐकून त्यांनी या सणाच्या सुरुवातीला पहाटे उठून गंगेमध्ये स्नान करून देवीदेवतांची विधिवत पूजा केली उपवासाच्या या दिवशी त्यांनी आपल्या क्षमतेनुसार गहू गुळ तूप दहिसर वस्त्रे इत्यादी वस्तू देवाच्या चरणी ठेवून ब्राह्मणांना अर्पण केल्या.
ही देणगी पाहून धर्मदासच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या पत्नीने त्याला अडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला धर्मदास यांनी एवढी देणगी दिली तर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार असे त्यांचे म्हणणे होते तरीही धर्मदास आपल्या दान आणि सत्कर्मा पासून विचलित झाला नाही आणि त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारचे दान केले.
यापुढे येणाऱ्या अक्षय तृतीयेचा सणादिवशी प्रत्येक वेळी धर्मदासाने विधीप्रमाणे पूजा अर्ज करून दान केले हळूहळू म्हातारे होऊ नये तसेच अनेक व्याधींनी ग्रासलेले असूनही त्यांनी हा उपवास आणि धार्मिक कार्य तसेच दानधर्म सुरू ठेवले त्यामुळे पुढच्या जन्मी हा धरमदास खुशावतीचा राजा झाला.
पौराणिक कथा नुसार असे मानले जाते की या दिवशी केलेले दान आणि उपासनेमुळे अक्षय पुण्य आणि कीर्ती प्राप्त होते.
अक्षय तृतीयेबद्दल दहा ओळी
- साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया हा दिवस हिंदू दिनादर्शकेनुसार वैशाख शुद्ध तृतीया म्हणून संबोधला जातो.
- जैन धर्मामध्ये या दिवशी व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवसाला आखातीज असेही म्हटले जाते.
- या दिवशी देवी अन्नपूर्णा जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती, साजरी केली जाते.
- अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका आहे.
- महाराष्ट्रात स्त्रियांनी चैत्र महिन्यात सुरु किंवा स्थापन केलेली दैवी चैत्य गौरीची सांगता, या दिवशी केली जाते.
- अक्षय तृतीयेला कृत्य युग संपून, त्रेतायुग सुरू झाली असे मानले जाते.
- याच दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून शेतकरी वर्गात बलरामाची पूजा केली जाते.
- कोकणात या दिवशी शेतात बियाणे, पेरण्याची प्रथा आहे. त्या दिवशी धान्य पेरल्यास विपुल धान्य पिकते आणि बियाणाला तोटा पडत नाही, अशी धार्मिक समजूत आहे.
- हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो.
- महाराष्ट्रातील खानदेशात या सणाला आखातीज म्हणून संबोधले जाते.
FAQ
१. अक्षय तृतीयेला काय दान करावे ?
अक्षय तृतीयेला वस्त्र म्हणजेच कपड्यांचे दान घरातील, आजारपण दूर करते. गोरगरिबांना या दिवशी वस्त्रदान करावे.
अक्षय तृतीयेला कुंकू दान केल्याने, पतीला दीर्घायुष्य मिळते. मान सन्मान प्रतिष्ठा वाढते.
विड्याची पाने दान केल्याने, राजकीय क्षेत्रात यश मिळते.
अक्षय तृतीयेला गादी किंवा चटई दान केल्याने, सुख प्राप्ती होते.
अक्षय तृतीयेला चप्पल दान केल्याने, पापमुक्ती होते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी नारळाचे दान पितरांना मुक्ती देण्यास सहाय्यक ठरते.
त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी पान, सुपारी व जल विद्वानास दान केल्याने, वैभव, ऐश्वर्या प्राप्त होते.
अक्षय तृतीयेला फळे दान केल्याने, विविध क्षेत्रांमध्ये उच्च पद प्राप्ती होते.
अक्षय तृतीयेला मिठाई किंवा गोड दोड पदार्थ, गोड गरिबांना दान करावे.
गुरुदक्षिणा दिल्याने अति उच्च ज्ञानप्राप्ती होते.
२. अक्षय तृतीयेबद्दल ५ ओळी लिहा.
साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया हा दिवस हिंदू दिनादर्शकेनुसार वैशाख शुद्ध तृतीया म्हणून संबोधला जातो.
जैन धर्मामध्ये या दिवशी व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवसाला आखातीज असेही म्हटले जाते.
या दिवशी देवी अन्नपूर्णा जयंती, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती, साजरी केली जाते.
अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ केला आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका आहे.
महाराष्ट्रात स्त्रियांनी चैत्र महिन्यात सुरु किंवा स्थापन केलेली दैवी चैत्य गौरीची सांगता, या दिवशी केली जाते.
अक्षय तृतीयेला कृत्य युग संपून, त्रेतायुग सुरू झाली असे मानले जाते.
३. अक्षय तृतीयेला कुठल्या गोष्टी करू नयेत ?
अक्षय तृतीयेला मांस आणि मधिरा यांचा सेवन करू नये.
खोटं बोलू नये.
कुणालाही फसवू नये, त्याचबरोबर घरामध्ये वाद-विवाद भांडण अक्षय तृतीयेला करू नये.
अक्षय तृतीयाला लक्ष्मीपूजन अवश्य करावं किंवा माता लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप करावा, माता लक्ष्मीच्या एखाद्या स्तोत्राचा पठण करावं, त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्यावर होते.
आपण इतरांचाही विचार करावा आणि त्यामुळे आपलाही भलं.
४. अक्षय तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त का म्हटलं जातं ?
अक्षय तृतीया हा सण वैशाख शुक्ल तृतीय या तिथीला साजरा केला जातो. अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे, याचं कारण म्हणजे याच दिवशी त्रेता युगाला प्रारंभ झाला होता. या दिवसांनी एका कलाहाचा अंत आणि दुसऱ्या नव्या युगाची सुरुवात ,अशी संधी साधलेला हा काळ आहे. त्यामुळेच अक्षय तृतीया या संपूर्ण दिवसाला महत्त्व आहे. कारण हा संपूर्ण दिवसच एक मुहूर्त असतो. मुहूर्त खर तर एका क्षणाने साधलेला असतो, तरी संधिकाला मुळे त्याचा परिणाम २४ तासांपर्यंत कार्यरत असल्याने, तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास अक्षय तृतीय या बद्दल माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमचे मित्र परिवार, नातेवाईक व इतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेयर करा. धन्यवाद.