लक्ष्मी पूजन संपूर्ण माहिती मराठी | Laxmi Pujan Information In Marathi

लक्ष्मी पूजन संपूर्ण माहिती मराठी | Laxmi Pujan Information In Marathi – दिवाळी सगळ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करणारा असा दिव्यांचा सण आहे. लक्ष्मी पूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा असते. ‘दिन दिन दिवाळी.. गाई म्हशी ओवाळी… गायी म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या’…. , ‘उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली’ अशी गाणी किंवा संवाद ऐकू येऊ लागले की, समजावे, दिवाळी आता जवळ आली आहे.

दसरा गेला की, दिवाळी सणाचे वेध लागतात. हा सण केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. दिवाळीला शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी माता लक्ष्मी आपल्या भक्तांच्या घरी जाते आणि त्यांना सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देते. 

हिंदू धर्मानुसार आणि पौराणिक कथेनुसार, दीपावली साजरी करण्यामागचे एक कारण असे आहे की, 14 वर्षांचा वनवास भोगल्यानंतर भगवान श्रीराम अयोध्येला राक्षस राजा रावणाचा वध करून परतले होते. तेव्हा लोकांनी दिवा लावून हा आनंद साजरा केला. तेव्हा पासून दीपोत्सव करून दिवाळी साजरी केली जाते.

दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता? लक्ष्मी पूजन कसे केले जाते? लक्ष्मीपूजेची पद्धत कोणती? लक्ष्मी पूजनाचा मंत्र कोणता आहे? लक्ष्मीपूजनाची आरती कशी करावी?दिवाळीत लक्ष्मी-गणेशाची पूजा कोणत्या शुभ मुहूर्तावर करावी? लक्ष्मी पूजन का करावे?या सगळ्याची माहिती आज आम्ही मराठी झटका. डॉट कॉम या वेबपेज द्वारे आम्ही आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत. चला सुरुवात करूया लक्ष्मी पूजन माहितीला.

Table of Contents

लक्ष्मी पूजन संपूर्ण माहिती मराठी | Laxmi Pujan Information In Marathi

सणाचे नाव लक्ष्मी पूजन
कोणत्या देवाशी संबंधित माता लक्ष्मी
कधी साजरे करतात आश्विन महिन्यातील अमावास्येला
यावर्षी 2023 मध्ये कधी आहे रविवार, नोव्हेंबर 12, 2023
मुहूर्त संध्याकाळी 05:39 ते 07:35 पर्यंत
कोण साजरे करतात संपूर्ण भारतातील हिंदू लोक

आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा संपूर्ण भारतात दरवर्षी केली जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला खूप महत्त्व दिले जाते. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक दिवाळी हा सण असून या दिवशी लक्ष्मीपूजन करून एक आनंदाचा क्षण साजरा केला जातो. दिवाळीची रोषणाई , दिव्यांचा प्रकाश , रांगोळ्यांचे रंग , आणि घरातील खमंग फराळाचा दरवळणारा सुवास , फटाक्यांचा आवाज आणि चिल्लर पार्टी म्हणजे मुलांचा कलकलाट त्याचा बरोबर घरात पाहुण्यांची कुटूंबियांची जमलेली गर्दी सगळं डोळ्यां समोरून जाते.

Laxmi Pujan Information In Marathi

दिवाळी म्हणजे सर्वत्र उत्साह अन् जल्लोषाचे वातावरण निर्माण होते. सर्वांच्या आनंदाला उधाण येते. अंधकाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या या दिपोत्सवात उत्तम आरोग्याच्या प्राप्ती साठी धनत्रयोदशी, धन-धान्य समृद्धी लाभण्यासाठी लक्ष्मी- कुबेरपुजन मोठ्या भक्ती भावाने केले जाते. अनेक घरांत लक्ष्मी पुजनाच्या दिवशी श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. 

लक्ष्मी पूजन इतिहास | Laxmi Pujan History

अश्विन महिन्यातले शेवटचे दोन दिवस तसेच कार्तिक महिन्यातले पहिले तीन दिवस अशीही पाच दिवसांची दिवाळी संपूर्ण भारतभर मोठ्या धुमधडाक्यात, आनंदात, उत्साहात साजरी केली जाते. अश्विन अमावास्येला संध्याकाळी घरोघरी तसेच दुकानातून, ऑफिस मधून, सोन्या चांदीच्या पेढ्यातून, आणि आपल्या व्यवसाय, उद्योगातून लक्ष्मीपूजन केले जाते.

आपल्या घरात आपण सोने, नाणे तसेच आपल्याकडील पैसे, नाणी यांची आपण पूजा करतो. व्यापारी वर्गासाठी देखील लक्ष्मीपूजन खूप महत्त्वाचे असते. या दिवशी सर्व हिशोबाच्या वह्यांचे त्यांच्याकडून पूजन केले जाते. तसेच त्या दिवसापासून नवीन हिशोबाची वही व्यवहारांमध्ये चालू करण्यात येते. या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्यादिवशी आरोग्य लक्ष्मी म्हणजेच केरसुणी याची देखील आपण हळद, कुंकू लावून हिंदू शास्त्राप्रमाणे पूजन करतो.

लक्ष्मी ही स्थिर राहत नाही असा देखील आपला समज असतो. यासाठी प्रत्येक घरामध्ये श्री सूक्त पठणही केले जाते. व्यापारी वर्गांची हिशोबाचे नवीन वर्ष या दिवसापासून सुरू होते. या दिवशी सगळे लोक अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यामध्ये सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, त्याचप्रमाणे पैशांच्या नोटा आणि नाणी यांची पूजा केली जाते. स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवीन केरसुणी विकत घेऊन तिलाच लक्ष्मी मानून तिला हळद, कुंकू वाहून घरात त्या दिवसापासून वापरण्यास सुरुवात केली जाते.

लक्ष्मीपूजन झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करून हा उत्सव मोठ्या धूमधडाकेबाज, आनंदात साजरा केला जातो. प्राचीन काळी या दिवशी रात्री कुबेर पूजन करण्याची पद्धत होती. कुबेर म्हणजे भगवान शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो.

दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पुजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्त काळात वैष्णव पंथाला ज्यावेळी राजाश्रय मिळाला, त्यावेळी पासून कुबेराबरोबरच लक्ष्मीची ही पूजा होऊ लागली. ठीक ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशान काळातील अनेक मूर्ती सापडले आहेत. त्यामध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शवलेली दिसून येतात.

काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की, प्राचीन काळी कुबेर आणि त्याची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने देवी लक्ष्मी ने ते स्थान घेतले, आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले. त्या दिवसापासून आपण लक्ष्मी आणि गणपती यांची एकाच वेळी पूजा करतो.

लक्ष्मी पूजनाचे महत्व

Laxmi Pujan Information In Marathi

लक्ष्मीपूजनाचे व्यापारी वर्गातही खूप महत्त्व आहे. तसेच सामान्य मनुष्य सुद्धा हिंदू धर्मातील देवी-देवतांची पूजा करत असतो. परंतु दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. याच दिवसापासून व्यापारी वर्गाचे हिशोबाचे नवीन वर्ष सुरू होते. तसेच दुकानाची सजावटही करून लक्ष्मी आणि कुबेराचे पूजन या दिवशी केली जाते. घरातील संपत्ती, लॉकर सर्व खुले केले जातात.

वर्षानुवर्षे दिवाळीतील इतर विक्रीते त्याप्रमाणेच झाडू, फळ विक्रीते देखील परराज्यातून दाखल होऊन विक्री करतात. आधीच्या काळात रात्री कुबेर पूजन करण्याची प्रथा होती. कुबेर हा खजिनदार आणि संपत्तीचा स्वामी मानला जातो. दीप प्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजन हा मूळ संस्कृतिक कार्यक्रम होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते. तिच्यावर पाणी, हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.

लक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे. तीच खरी या सणाची इष्टदेवता असल्याचेही म्हटले जाते. तिला जेष्ठा, षष्टी व सटवी, निऋत्ती या नावाने ओळखतात. निऋत्ती ही सिंधू संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून मान्य केले, तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे, असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशती मध्ये आहे. हेच महत्त्व आपल्याला दिसून येते.

Laxmi Pujan Information In Marathi

दिवाळीत का केलं जातं लक्ष्मीपूजन ?

सन्मार्गाने मिळविलेला आणि सन्मार्गाने खर्च होणाऱ्या संपत्तीला ‘ लक्ष्मी ‘ असे म्हणतात. भ्रष्टाचार, अनीतीने मिळविलेले पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे ! केवळ पैसा म्हणजे लक्ष्मी(Lakshmi) नव्हे.  आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधू लागते. जिथे स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रीयता , श्रम असतील तेथेच लक्ष्मी आकर्षित होते. तसेच ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसे राहतात तेथे राहणे लक्ष्मीला आवडते. दिवाळीमध्ये ज्या घरांमध्ये स्वच्छता असते, त्या घरांमध्ये लक्ष्मीचा प्रवेश होतो.

लक्ष्मी, भगवान विष्णूची पत्नी, तसेच संपत्ती आणि समृद्धीची देवी यांच्याशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीने विष्णूला आपला जोडीदार म्हणून निवडले आणि त्याच्याशी लग्न केले. त्याशिवाय देवी लक्ष्मीचा जन्म दिवाळीला वैश्विक महासागर मंथन (समुद्र मंथन) दरम्यान झाला असे म्हटले जाते.

देवी लक्ष्मी आपल्या उपासकांना प्रचंड संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद देण्यासाठी दिवाळीच्या रात्री प्रत्येक घरात जाते असे मानले जाते. आपल्या घरात देवीचे स्वागत करण्याचे चिन्ह म्हणून पूजाविधीच्या वेळी मुख्य दरवाजा उघडा ठेवला जातो. धार्मिक कथांनुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावास्येला समुद्रमंथनातून माँ लक्ष्मीचे आगमन झाले होते.

लक्ष्मी पूजा कशी साजरी केली जाते ?

लक्ष्मी पूजन हे मोठ्या आनंदात व उत्साहाने करतात. लक्ष्मी पूजन करण्यामागे की, घरामध्ये धनसंपत्ती, ऐश्वर्य व आरोग्य सतत नांदत राहो व अज्ञानाचा नाश होऊ दे . अशी देवीला प्रार्थना लक्ष्मीपूजन दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी करत असतात. यामध्ये लक्ष्मीची पूजा करून घरासमोर सुशोभीत रांगोळी काढून दारी झेंडूच्या फुलांचे तोरण लावून फराळाला लाह्या, बत्तासे यांचा नैवेद्य दाखवून अश्विन महिन्यातील अमावस्या लक्ष्मीपूजन साजरे केले जाते.

लक्ष्मी पूजन कसे केले जाते, ते आपण पाहूया. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गणपती, माता लक्ष्मी आणि सरस्वती यांची प्रतिमा असलेला फोटोची सुद्धा पूजा केली जाते. बाजारामध्ये मातीची लक्ष्मीची मूर्ती मिळते. ती विकत आणून तसेच पाच मडके सुद्धा पूजनासाठी आणत असतात. त्या छोट्या मडक्‍यांमध्ये लाह्या व बत्ताशेचा प्रसाद आणि वर एक रुपया ठेवतात. असे पाच मडके भरून देवीसमोर ठेवतात. पूजेसाठी श्रीयंत्र गजलक्ष्मी किंवा नारळ-सुपारी खोबरं यांचा विडा असतो. तसेच पैसे आणि पूजेसाठी हळदीकुंकू, अक्षदा, कापूर अगरबत्ती आणि दिवा महत्त्वाचा असतो.

आश्‍विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्याच्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. अश्विन अमावास्येला सूक्ष्म स्वरूपात गतिमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात. आणि पुन्हा सर्व वायूमंडलातील गतिमान होण्यास सुरुवात होतात.

घरातील केर, कचरा काढल्यामुळे त्रासदायक घटक घराच्या बाहेर फेकली जातात. त्यामुळे घराचे पवित्र टिकून राहते. म्हणून आश्‍विन अमावास्येच्या रात्री अलक्ष्मीचे निस्सारण म्हणजेच रात्री बारा वाजता घरातून केर काढतात. आणि लक्ष्मीचे स्वागत करतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. म्हणून व्यापारी वर्गामध्ये लक्ष्मीपूजन मोठ्या थाटामाटाने व उत्साहाने साजरे केले जाते.

लक्ष्मी पूजन 2023 मुहूर्त | laxmi pujan muhurat 2023

Laxmi Pujan Information In Marathi

रविवार, नोव्हेंबर 12, 2023 laxmi pujan time

  • वरलक्ष्मी पूजनाचा मुहूर्त – संध्याकाळी 05:39 ते 07:35 पर्यंत
  • कालावधी – 01 तास 56 मिनिटे
  • प्रदोष काळ – 05:29 pm ते 08:08 pm
  • वृषभ काळ – संध्याकाळी 05:39 ते 07:35 पर्यंत
  • अमावस्या तिथी प्रारंभ – 02:44 पी एम on नोव्हेंबर 12, 2023
  • अमावस्या तिथी समाप्त – 02:56 पी एम on नोव्हेंबर 13, 2023

लक्ष्मी पूजन साहित्य | laxmi pujan samagri

कलशपाणीआंब्याची पानेकापुर
शंखघंटागंधगुलाल
सिंदूरफुलांच्या माळाहिशेबाच्या वह्यातेलवात
 फळविविध प्रकारची फुले गंगाजलपंचामृत
पितळी दिवा किंवा मातीचा दिवा कुंकूहळदकापूस
ताम्हणनीरांजनपळीधूपारती
चंदनसुपारी दिव्यासाठी तूपअगरबत्ती
बत्तासेपेढेसमईअत्तर
गुलाबपाणीसाळीच्या लाह्यासाखरफुटाणेगूळ-खोबरे
लाकडी चौरंगचौरंगावर लाल किंवा पिवळे कापडदेवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती/चित्रेसंपूर्ण नारळ त्याच्या भुसासह
धनेदागिनेसुपार्‍याअष्टगंध
तांदूळ संपूर्ण गव्हाचे धान्यदूर्वा केळीचे पान
लाल वस्त्रेतराजू, वजनेमापेनारळविड्याची पाने
धूप, रांगोळीआरतीचे ताटझाडूदक्षिणा (नोटा आणि नाणी

लक्ष्मी पूजन मांडणी | laxmi pujan vidhi

‘लक्ष्मी’ म्हणून नाणी, सोन्याचांदीचे दागिने, भांडी, पैसे यांची व्यवस्था करावी. दुकान, पेढी, कार्यालय, व्यवसायाची जागा किंवा स्वतःच्या घरी- लक्ष्मी पूजन करावे. पूजास्थान स्वच्छ करावे, त्या तिथीस दुपारपासूनच पूजेच्या तयारीस लागणे सोयीचे असते. रंग लावून, पताका, पुष्पमाळा, तोरणे, विजेची आरास करून ते सुशोभित करावे.

लक्ष्मी पूजनासाठी घेतलेली नाणी वर्षभर तशीच जपून ठेवावीत, तसेच दरवर्षी यथाशक्ती त्यात भर घालून वाढ करावी. शाईच्या दौती, लेखणी/पेन, तराजू, वजने, मापे पूजेसाठी ठेवावीत. पूजनासाठी जमाखर्चाच्या वह्या घेऊन नववर्षासाठी त्या उपयोगात आणावयाच्या म्हणून त्यांची पूजा करण्यासाठी त्यांच्या पहिल्या पृष्ठावर कुंकुमिश्रित गंधाने स्वस्तिक रेखाटावे. संवत्सर, तिथी, महिना यांचा तेथे उल्लेख करावा.

॥शुभ॥ ॥लाभ॥ असे लाल गंधाने त्या पृष्ठावर लिहावे. पाटावर किंवा पानावर तांदूळ किंवा गहू टाकून त्यावर कलश स्थापन करावा. त्या कलशात हळद, कुंकू, गुलाल, अक्षता, फुल, रुपयाचे नाणे, सुपारी, एक नारळ असे ठेवावे. यासह पाटावर 5 पाने ठेवावी ज्यावर प्रत्येकी 1 सुपारी, खारीक, बदाम, हळकुंड ठेवावे. यावर गणपती सहित पंचायतन देवतांचे पुजन करायचे आहे.

शंखपूजा

शंख असल्यास शंखाला स्नान घालून जागेवर ठेवून त्याला गंधफूल वाहावे.

शंखात तीन पळ्या शुद्ध पाणी घालावे. पाण्यात तुलसीपत्र ठेवावे. तो देवाच्या उजव्या बाजूस ठेवावा.

घंटापूजा

घंटेला स्नान घालून पुसून ती जागेवर ठेवून, हळदकुंकू गंधाक्षता व फूल वाहावे. नंतर निरंजन व अगरबत्ती ओवाळताना ती थोडी वाजवावी.

दीपपूजा

समईला हळदकुंकू, गंधफूल व अक्षता वाहून नमस्कार करावा.

गणपती पूजन

  • एक ताटात थोडे तांदूळ ठेवून त्यावर नारळ ठेवावा.
  • आवाहन व आसन म्हणून दोन दूर्वा ठेवाव्यात व त्यावर सुपारी किंवा गणेशाची मुर्ती ठेवावी.
  • फूलाने पळीत पाणी घेऊन शिंपडावे.
  • पळीभर पाण्यात गंधाक्षता व फूल घेऊन गणेशावर वाहावे.
  • पळीत पाणी घेऊन फुलाने शिंपडावे.
  • जानवे किंवा अक्षता वाहाव्यात.
  • चंदनाचे कुंकुममिश्रित गंध फुलाने वाहावे.
  • गणेशाला अक्षता वाहाव्या.
  • पूजा करताना मुर्तीला हळदकुंकू सुपारीवर वाहावे.
  • गणेशाला फूले वाहावीत.
  • विड्याची दोन पाने त्यावर सुपारी व दक्षिणा ठेवून त्यावर पळीभर पाणी सोडावे.
  • अगरबत्ती लावून ती उजव्या हाताने देवाला ओवाळावी. डाव्या हातात घंटा घेऊन त्यावेळी घंटानाद करावा.
  • नीरांजन लावून उदबत्तीप्रमाणेच ओवाळावे. त्यावेळी घंटानाद करावा.
  • देवासमोर पाण्याने लहानसा चौकोन करून त्यावर दूध किंवा जो नैवेद्य असेल तो ठेवावा.
  • त्याभोवती पाणी परिसिंचन करावे व नैवेद्यावर दूर्वेने किंवा फुलाने पाणी शिंपडावे.
  • प्राणाय स्वाहा इत्यादि स्वाहाकार दोनदा म्हणावेत.
  • प्रत्येक वेळी देवाला घास भरवीत आहोत अशी क्रिया उजव्या हाताने करावी.
  • अशाप्रकारे गणेशाची पुजा पुर्ण करावी.

लक्ष्मी पूजन कसे करावे?

  • श्रीलक्ष्मीपूजनासाठी कलशाची स्थापना करावयाची असते.
  • भारतीय संस्कृतीत कलश हे मांगल्याचे प्रतीक आहे.
  • कलशाला गंध, अक्षता, फुल वाहावे.
  • कलशाजवळच जमाखर्चाच्या वह्या, लेखणी, दौत, तराजू, वजने इत्यादि ठेवावे.
  • वह्या त्यांचे पहिले पान उघडून ठेवाव्यात. (लक्ष्मी-कुबेर व सरस्वतीस्वरूप म्हणून)
  • चांदीचे लक्ष्मी छापाचे नाणे
  • सुवर्णादि धातूचे दागिने
  • लक्ष्मी व सरस्वती मूर्ती किंवा फोटो
  • लक्ष्मी व सरस्वती यांच्या तसबिरी ठेवाव्यात.
  • मूर्ती किंवा नाणे ताम्हनात तांदळावर ठेवावे.
  • दागिने पाटावर वस्त्र घालून त्यावर ठेवावेत.
  • तसबिरी पाटावर, चौरंगावर किंवा भिंतीला थोडे तांदूळ ठेवून त्यावर टेकून ठेवाव्यात.

आवाहन

देवीवर अक्षता वाहाव्यात.

आसन

देवीच्या मूर्तीखाली अक्षता ठेवाव्यात.

पाद्य

पळीभर पाणी फुलाने शिंपडावे.

अर्घ्य

पळीभर पाण्यात गंध, अक्षता घालून ते फुलाने शिंपडावे.

आचमन

फूलाने पाणी शिंपडावे.

पंचामृतस्नान

देवीची मूर्ती असेल तर ती ताम्हनात घेउन त्यावर पंचामृतातील दूध, दही, तूप, मध व साखर हे पदार्थ एकेक, पुढीलप्रमाणे वाहावेत.

प्रत्येक पदार्थानंतर शुद्धोदक अर्पण करावे. तसबीर असेल तर पंचामृताचे पदार्थ फुलाने किंचित् शिंपडावेत व शुद्धोदक उजव्या हाताने ताम्हनात सोडावे.

देवीला पंचामृताचा नैवेद्य दाखवावा – पाटावर पाण्याने लहानसा चौकोन करून त्यावर पंचामृताचे भांडे ठेवावे. त्याभोवती उजव्या हाताने पाणि परिसिंचन करावे व नैवेद्यावरही फुलाने किंचित्त् पाणी शिंपडावे. प्राणाय स्वाहा । इत्यादि प्राणाहुती दोनदा म्हणाव्यात, उजव्या हाताने देवीला नैवेद्य भरवीत आहोत अशी क्रिया करावी. निरांजन, घंटानाद करीत ओवाळावे. धूप किंवा उदबत्ती, घंटानाद करीत ओवाळावी.

लेखणी/ पेन सहित वही पूजा

या मंत्राचा उच्चार करुन गंधाक्षता, हळदकुंकू व लाल फूल वाहावे.

कुबेर पूजा

ताम्हणात किंवा केळीच्या पानावर ठेवलेल्या चांदीच्या नाण्यांची, दागिन्यांची, नोटांची धनपति कुबेर म्हणून पूजा करावी. संपत्तीवर गंधाक्षता व फूल वाहावे. नमस्कार करावा.

तुला पूजा

(तराजू व वजने-मापे यांची पूजा)

तराजू व वजने-मापे यांवर लाल गंध, अक्षता, हळदकुंकू व फुले वाहावीत.

दीप पूजा

दिव्यांच्या सजावटीला गंधपुष्प, अक्षता व हळदकुंकू वाहून नमस्कार करावा.

दिवाली लक्ष्मी पूजन मंत्र 

मां लक्ष्मी मंत्र- ऊं श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद, ऊं श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:॥

सौभाग्य प्राप्ति मंत्र- ऊं श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा।।

कुबेर मंत्र-ऊं यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्यसमृद्धिं में देहि दापय।

ॐ श्रीं ल्कीं महालक्ष्मी महालक्ष्मी एह्येहि सर्व सौभाग्यं देहि मे स्वाहा।।

ॐ श्रींह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मी नम:।।

ॐ ह्रीं श्री क्रीं क्लीं श्री लक्ष्मी मम गृहे धन पूरये, धन पूरये, चिंताएं दूरये-दूरये स्वाहा:।

लक्ष्मी पूजना दरम्यान विशेष काळजी घेण्यासारख्या गोष्टी

  • ऐन लक्ष्मी पूजनावेळी कोणासोबतही नगद पैशांच्या व्यवहार करु नये.
  • श्री सुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक पाठ करावे.
  • या रात्री अखंड ज्योत जळावी.
  • देवी लक्ष्मीला शिंगाडा, मकाणे, नारळ, बत्ताशे, लाह्या, पान, करंजी, तांदळाचे लाडू, मूगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर मिठाई अत्यंत प्रिय आहे. यामधून कोणतेही पदार्थचे नैवेद्य दाखवल्यास देवी प्रसाद ग्रहण करते.
  • या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सुरु ठेवावे.

लक्ष्मी पूजन करण्याचे नियम (laxmi puja rules in marathi)

  • दिवाळीतील लक्ष्मी पूजन करताना देवघरात कुंकू किंवा शेंदूराचा वापर करून स्वस्तिक काढावे. स्वस्तिक चिन्ह हे गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि सुख, समृद्धीत वृद्धी होते, अशी मान्यता आहे.
  • लक्ष्मी पूजनाच्या वेळी दारे, खिडक्या उघड्या ठेवाव्यात म्हणजे लक्ष्मीचे स्वागत तुम्ही करत आहात असा त्याचा अर्थ होतो.
  • देवीला सात्विक आणि तुम्ही हाताने बनवलेला म्हणजेच घरी बनवलेला अगदी कोणताही नैवैद्य दाखवला तरी चालतो.
  • लक्ष्मी पूजनावेळी लक्ष्मी देवीच्या दोन मूर्त्या ठेवू नये. तसेच लक्ष्मीपूजनावेळी फक्त लक्ष्मी देवीची मूर्ती स्थापन करू नये.
  • पूजन करताना लक्ष्मी देवी, गणपती आणि सरस्वती यांची मूर्ती उत्तर दिशेला स्थापन करावी.
  • दिवाळीत लक्ष्मी पूजनाची तयारी करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने, झेंडुची फुले असलेले तोरण आवर्जुन लावावे.
  • लक्ष्मी पूजनाच्या आधी देव्हारा आणि देवपुजेचे साहित्य स्वच्छ करुन घ्यावे.
  • लक्ष्मी देवीची मूर्ती हसमुख स्वरुपाची असावी.
  • पूजाविधी सुरु असताना गाणी किंवा नाच करु नये. त्यामुळे पूजा नीट होत नाही. 
  • खूप जण फारच घाईत आणि कसेतरी पूजा करतात तसे मुळीच करु नये. 
  • लक्ष्मी देवी सोबत नेहमी गणपती किंवा सरस्वती देवीची पूजा करावी.
  • लक्ष्मीसमोर अखंड ज्योत तेवत राहील याची योग्य ती काळजी घ्यावी. 
  • लक्ष्मी पूजन सुरु असताना कोणतेही आर्थिक व्यवहार करु नयेत. त्यामुळे लक्ष्मी तुमच्याकडून निघून जाते.
  • प्रवेशद्वारावर गंगाजल, हळद, कापूर एकत्र करून शिंपडावे असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते.

लक्ष्मी पूजनच्या दिवशी करावी या वस्तूंची खरेदी | Things To Buy On Laxmi Pujan Marathi

  • नवे वाहन खरेदी करण्यासाठी किंवा ते घरी आणण्यासाठी हा अत्यंत शुभ असा  दिवस मालता जातो. 
  • एखाद्या नव्या कामाची सुरुवात करायची असेल ती देखील तुम्ही या दिवशी करु शकता. 
  • लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अगदी आवर्जून सोन्याची खरेदी करायला हवी. सोने हा असा संचय आहे जो तुम्हाला अडचणीच्या काळात कधीही मिळू शकतो. खूप जण सोने घेऊन ठेवतात आणि त्याचा उपयोग ज्यावेळी गरज असेल त्यावेळी सोने मोडून किंवा गहाण ठेवून करता येतो. त्यामुळे या दिवशी अगदी हमखास सोने खरेदी करा. ते तुमच्या धन संचयात वाढ करते. 
  • घरी एखादी नवीन मशीन आणण्यासाठी किंवा एखादे इलेक्ट्रॉनिक्स वसतू घेण्यासाठी हा एक उत्तम दिवस आहे. 
  • लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही घरात नवीन पुस्तकांचीही खरेदी करु शकता. 
  • झाडूची खरेदी या दिवशी करायलाच हवी. ज्यांना घरात नवा झाडू हवा असेल त्यांनी या दिवशी खरेदी करावा. असे म्हणतात. केरसुणी ही घरातली अशी वस्तू आहे जी घर स्वच्छ ठेवते आणि घरात स्वच्छता ठेवण्याचे काम करते. ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मी वास करते.
  • नवे घर घेण्यासाठी आणि गृहप्रवेश करण्यासाठी हा एक उत्तम दिवस आहे. त्यामुळे नव्या घराचे बुकींग किवा नव्या घरात राहण्यासाठी तुम्ही जाऊ शकता. 
  • नवी कपड्यांची खरेदी करण्यासही या दिवशी काहीच हरकत नाही. नवीन कपडे घालून पूजा केल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण ही येते. 

लक्ष्मी देवीची आरती

जय देवी श्रीदेवी माते ।
वंदन भावे माझे तव पदकमलाते ॥ धृ. ॥

श्री लक्ष्मी देवी तूं श्री विष्णुपत्नी ।
पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी ॥
जननी विश्वाची तूं जीवनचित्श्क्ती ।
शरण तुला मॆ आलो नुरवी आपत्ती ॥ १ ॥

भृगवारी श्रद्धेने उपास तव करिती ।
आंबट कोणी काही अन्न न सेवीती ॥
गुळचण्याचा साधा प्रसाद भक्षीती ।
मंगल व्हावे म्हणुनी कथा श्रवण करिती ॥ २ ॥

जे कोणी नरनारी व्रत तव आचरिती ।
अनन्य भावे तुजला स्मरुनी प्रार्थीती ॥
त्यांच्या हाकेला तूं धांवुनिया येसी ।
संतती, वैभव किर्ती धनदौलत देसी ॥ ३ ॥

विश्वाधारे माते प्रसन्न तूं व्हावे ।भवभय हरुनी आम्हां सदैव रक्षावें ॥
मनिची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी ।
म्हणुनी मिलिंदमाधव आरती ओवाळी ॥ ४ ॥

दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन करण्यामागे सांगितली जाणारी कथा

दिवाळीपासून व्यापारी वर्ग आपले नवीन वर्ष सुरू करतात. नवीन हिशोबाच्या वह्या त्यांची पूजा करून त्यात नव्या वर्षाचे आर्थिक व्यवहार सुरू करतात. व्यापारी वर्ग देखील गणपतीचे ज्ञान आणि सुबुद्धी द्यावी आणि लक्ष्मीने नवीन वर्षात आणखी सुख समृद्धी धनसंपदा द्यावी यासाठी ती पूजा केली जाते. हीच पद्धत पुढे चालू ठेवण्यात आली.

विजयादशमीला रावणाचा वध करून भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला पोहोचले. श्रीरामांचा मोठ्या थाटामाटात त्यावेळी राज्याभिषेक करण्यात आला. सर्व नगर आणि शहर दिवे फुले आणि रांगोळी आणि सजवून उत्सव साजरा केला. तेव्हापासून वाईट वृत्तीवर चांगल्याचा विजय म्हणून दिवाळी साजरी करण्याची पद्धत सुरू झाली.

रामाने अयोध्येत गेल्यावर राज्याभिषेक झाल्यावर गणपती आणि लक्ष्मीची पूजा केली होती. अयोध्येच्या राज्यामध्ये राज्यकारभारामध्ये गणपतीच्या कृपेने सुबुद्धी द्यावी सुख, शांती, समाधान लाभावे आणि लक्ष्मीच्या कृपेने समृद्धी यावी यासाठी त्यांची पूजा केली गेली. भगवान रामांच्या या कृतीची सामान्य लोकांनी पुढे पद्धत चालू ठेवली.

कोणत्याही लहान मोठ्या पूजेची सुरुवात गणपतीच्या पूजनाने होते. त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजनात देखील गणेशाची पूजा प्रथम केली जाते. त्याबाबतीत एक कथा अशी आहे की, माणसाला जगात बरीचशी सुखे उपभोगण्यासाठी पैसा लागतो. त्यामुळे माणूस आयुष्यभर पैशाच्या मागे सतत पळत असतो. तो आणखी मिळावा यासाठी नेहमी धडपड सुरू असते.

लक्ष्मी ही संपत्ती, धन, समृद्धी यांची देवी आहे. प्रत्येक माणूस सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी लक्ष्मी देवीची आराधना पुजा अर्चा करत असतो. असे म्हणतात की, लक्ष्मी ही सदैव दाग दागिने घालून नटलेली दिसून येते आणि तिचे पती विष्णू नेहमी ऐश्वर्या संपन्न असतात. या उलट शंकर पार्वतीची जोडी मात्र पर्वतावर राहणारी, अतिशय साध्या पोशाखामध्ये असलेली, शंकराच्या गळ्यामध्ये दागिन्यांच्या ऐवजी रुद्राक्षांच्या माळा आणि नाग असतो.

यामुळेच एके दिवशी माता लक्ष्मीला थोडा गर्व झाला होता. भगवान विष्णूंशी गप्पा मारताना थोडी आत्मस्तुती करू लागली होती. माझीच कृपा भक्तांसाठी किती महत्त्वाची आहे. मी किती पूजनीय आहे, असे ती म्हणायला लागली होती. भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीच्या हा अहंकार ओळखला होता.

तिचे गर्वहरण करण्यासाठी म्हणून ते तिला म्हणाले, लक्ष्मी माणसाला सुखी व्हायला तुझी कृपा लागतेच, तुझ्या कृपे शिवाय आनंदी राहता येणे कठीणच आहे. पण तू पार्वती सारखे अजूनही मातृत्वाचा आनंद मात्र घेतला नाहीस. एखाद्या स्त्रीसाठी त्या आनंदाची तुलना दुसऱ्या कोणत्याही गोष्टीशी करता येत नाही. लक्ष्मीदेवीला स्वतःला मूल नव्हते.

पार्वतीला मात्र कार्तिकीय आणि गणपती हे दोन पुत्र होते. लक्ष्मी आणि पार्वती चांगल्या मैत्रिणी होत्या. म्हणून ती आपली मैत्रीण पार्वतीकडे गेली आणि पार्वतीला तिने विनंती केली की, तिच्या दोन पुत्रांपैकी एक पुत्र दत्तक देण्यासाठी पार्वतीने विचारले. मी माझ्या धाकट्या मुलाला तुला दत्तक दिली असते, पण तू मात्र एका ठिकाणी राहत नाहीस, मग तू माझ्या मुलाची काळजी कशी घेशील? त्यावर लक्ष्मीने तिला वचन दिले की, मी गणेशाची पूर्ण काळजी घेइन.

तू काळजी करू नकोस. माझे सगळे ऐश्वर्य, संपत्ती हे गणेशाचेच आहे असे समज. माझ्या भक्तांना माझी आणि गणेशाची सोबतच आराधना करावी लागेल. ज्या घरी गणेशाला पूजणार नाहीत, अशा ठिकाणी मी राहणार नाही. मला आणि गणेशाला सोबत पूजेल, अशाच भक्तांना मी प्रसन्न होईल. यामुळे पार्वतीचे समाधान झाले. आणि तिने गणेशाला लक्ष्मीला दत्तक दिले.

यामुळे लक्ष्मीला फार आनंद झाला. तिला पुत्र मिळाला. गणेशाला दुसरी आई मिळाली. तेव्हापासून लक्ष्मी आणि गणेशाची एकत्रित पूजा केली जाते. काही जण लक्ष्मी आणि गणपतीच्या वेगवेगळ्या मूर्तींची पूजा करतात, तर काहीजण लक्ष्मी गणपती आणि सरस्वती यांच्या एकत्रित प्रतिमेची पूजा करतात.

या मागचा अर्थ असा आहे की, लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे. गणपती ही बुद्धीची देवता आहे, आणि सरस्वती देवी ही ज्ञानाची देवता आहे. बुद्धीचा वापर करून ज्ञान मिळवता येते, तसेच ज्ञानाचा वापर करून संपत्ती मिळवता येते, आणि संपत्तीचा योग्य वापर करायला बुद्धी आणि ज्ञान दोन्ही लागते.

लक्ष्मी एका ठिकाणी राहत नाही याचा अर्थ

लग्न होऊन घरी आलेल्या स्त्रीलाही लक्ष्मीच्याच रूपात मानुन आदर दिला पाहिजे असे सांगतात तेही याच अर्थाने. जिथे स्त्रीला आदर असतो, तिला मान मिळतो, ती प्रसन्न असते, असे घर समृद्ध होत जाते. ती खुश नसेल तर घरात आनंद येऊ शकत नाही.

घरी पैसे समृद्धी असणे म्हणजे लक्ष्मीचा वास असल्याचे मानतात. लक्ष्मी हि चंचल स्वभावाची असते असे म्हणतात. म्हणुन तिला घरी प्रसन्न ठेवायला स्वच्छ आणि पवित्र वातावरण ठेवावे लागते. तिची पूजा करावी लागते. ती नाराज झाली तर दुसऱ्या ठिकाणी निघुन जाते. ती विष्णुवर एकदा नाराज होऊन गेली तेव्हा तेही अगदी गरीब झाले होते अशी कथा आहे.

थोडक्यात, लक्ष्मीला घरी आणणे आणि प्रसन्न राखणे यासाठी आपण मेहनत करत राहावी असा यामागचा संदेश आहे. 

तसे बघायला गेले तर कुठलीही पूजा केल्यामुळे लक्ष्मी किंवा कुठलीही देवी देवता प्रसन्न होते असे न समजता वर्षभर आपल्याला तसेच आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी आनंदासाठी सुखा समाधानासाठी प्रत्येकाला मेहनत करावी लागते आणि या कामात देवांची कृपा असल्याबद्दल आभार मानायला आणि अशीच कृपा आपल्यावर राहावी यासाठी देवीदेवतांची प्रार्थना करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन असे करावेत.

लक्ष्मी पूजनाचे सांस्कृतिक महत्त्व सांगणारी कथा

वसुबारस पासून दिवाळी या सणाची लगबग सुरू होते. दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशी म्हणजेच अभ्यंग स्नान असते. यानंतर लक्ष्मीपूजन येते. या दिवशी नवीन कपडे घालून संपूर्ण ठिकाणी पणत्या लावून कुटुंबासह मनोभावे लक्ष्मीपूजन केले जाते. याचे सांस्कृतिक महत्त्व नक्की काय आहे? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

अश्विन आमवासेला लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी केरसुणी आपण विकत घेतो. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून तिला हळद, कुंकू वाहून त्या दिवशी घरात वापरण्यास सुरुवात करतो. लक्ष्मीपूजनच्या दिवशी श्री भगवान विष्णूंनी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे.

सकाळी मंगल स्नान करून देवपूजा तसेच दुपारी ब्राह्मण भोजन आणि संध्याकाळी लता पल्लवीने सुशोभित केलेल्या मंडपामध्ये लक्ष्मी आणि श्री विष्णू तसेच कुबेर यांची पूजा असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा पूजा विधी असतो. या दिवशी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यावर लक्ष्मी देवीची स्थापना केली जाते.

त्यानंतर लक्ष्मी व इतर देवतांना वेलची, लवंग, साखर घालून तयार केलेल्या गाईच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवला जातो. साळेच्या लाह्या, बतासी, धने, गूळ यासारखे पदार्थ लक्ष्मीला वाहून त्यानंतर ते आपण प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटवे. या अमावास्येच्या रात्री लक्ष्मी देवी सगळीकडे असते आणि आपल्या निवासासाठी योग्य स्थान शोधते असे समजले जाते.

ज्या ठिकाणी चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, देवभक्त, क्षमाक्षील पुरुष, संयमी आणि गुणवती तसेच पतिव्रता स्त्री असतात, त्या घरात वास्तव्य करणे, लक्ष्मीदेवी पसंत करते. केर काढल्यामुळे घरात शिरलेले त्रासदायक घटक घराच्या बाहेर फेकली जातात आणि घराचे पावित्र्य टिकून राहते. म्हणून अश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी म्हणजेच रात्री बारा वाजता केर काढला जातो.

या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल आहे. असे आपण सगळेच समजतो. त्यामुळे हिंदू शास्त्र प्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर मुहूर्तावर करतो. अनेक घरांमध्ये श्री सूक्त पठणही केले जाते. या दिवशी व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष सुरू होते.

या दिवशी सर्व अभंग स्नान करतात पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात आणि सोन्याचे दागिने त्यावर तबक ठेवतात. सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने तसेच पैसे ठेवून त्याची पूजा केली जाते. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये साजरा करतात.

प्रश्न

लक्ष्मी पूजन च्या दिवशी काय करावे?

लक्ष्मीची मूर्ती स्थापित करावी. लक्ष्मी देवीसमोर सोने, चांदी किंवा साधी नाणी ठेवावी. यानंतर कलशाच्या उजव्या बाजूला गणपतीची स्थापना करावी. दिवाळीपासून व्यापारी वर्ग आपले नवीन वर्ष सुरू करतात. नवीन हिशोबाच्या वह्या त्यांची पूजा करून त्यात नव्या वर्षाचे आर्थिक व्यवहार सुरू करतात.

दिवाळीत लक्ष्मी पूजन का केले जाते?

विजयादशमीला रावणाचा वध करून भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला पोहोचले. वाईट वृत्तीवर चांगल्याचा विजय म्हणून दिवाळी साजरी करण्याची पद्धत सुरू झाली. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीने विष्णूला आपला जोडीदार म्हणून निवडले आणि त्याच्याशी लग्न केले. त्याशिवाय देवी लक्ष्मीचा जन्म दिवाळीला समुद्र मंथन दरम्यान झाला असे म्हटले जाते. म्हणून दिवाळीत लक्ष्मी पूजन केले जाते.

कोणत्या सणाला आपण लक्ष्मी देवीची पूजा करतो?

लक्ष्मी पूजन दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी येते आणि देवी लक्ष्मीच्या प्रार्थनेला समर्पित आहे. ती संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे.


लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त 2023 कधी आहे?

लक्ष्मी पूजन
रविवार, नोव्हेंबर 12, 2023 
लक्ष्मी पूजनाच मुहूर्त – संध्याकाळी 05:39 ते 07:35 पर्यंत
कालावधी – 01 तास 56 मिनिटे
प्रदोष काळ – 05:29 pm ते 08:08 pm
वृषभ काळ – संध्याकाळी 05:39 ते 07:35 पर्यंत
अमावस्या तिथी प्रारंभ – 02:44 पी एम on नोव्हेंबर 12, 2023
अमावस्या तिथी समाप्त – 02:56 पी एम on नोव्हेंबर 13, 2023

निष्कर्ष

मित्रांनो, मराठी झटका डॉट कॉम या वेब पेजद्वारे लक्ष्मी पूजन संपूर्ण माहिती,महत्व आणि पूजा विधि, याबाबतची सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही माहिती वाचून कशी वाटली? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटू असाच एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

Leave a comment