संकटनाशन गणेश स्तोत्र | Sankat Nashan Ganesh Stotra

Sankat Nashan Ganesh Stotra – श्री संकटनाशन गणेश स्तोत्राचे वर्णन नारद पुराणात तसेच गणेश पुराणात केलेले आहे. नारद पुराणात गणेशाची स्तुती नारद ऋषींनी केली आहे, तर गणेश पुराणात गणेशाची स्तुती देवतांनी केली आहे.

आम्ही आमच्या सुजाण वाचकांच्या सोयीसाठी संस्कृत, मराठी आणि इंग्रजी स्तोत्र, अर्थासहित दिले आहे. आपणा सर्वांवर श्री गणेशाची कृपया सदैव राहो.

Table of Contents

संकटनाशन गणेश स्तोत्र | Sankat Nashan Ganesh Stotra

संकटनाशन गणेश स्तोत्र म्हणजे काय ? What Is shri Ganesh Stotra?

श्री. नारद मुनींनी, नारद पुराणात बुद्धीदेवता श्री गणेशाच्या बारा नावांसाहित वर्णन करणारे स्तोत्र लिहिले आहे. या स्तोत्राचे पठण केल्याने माणसाच्या जीवनातील संकटे दूर होतात. म्हणून या स्तोत्राला श्री संकटनाशन गणेश स्तोत्र किंवा संकटनाशन गणपती स्तोत्र असेही म्हटले जाते.

संकटनाशन गणेश स्तोत्र संस्कृत लीरीक्स | Sankat Nashan Ganesh Stotram Sanskrit Lyrics

॥ श्री गणेशाय नमः ॥

नारद उवाच –
प्रणम्यं शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम ।
भक्तावासं: स्मरैनित्यंमायु:कामार्थसिद्धये ॥1॥

प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम ।
तृतीयं कृष्णपिङा्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम ॥2॥

लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च ।
सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् ॥3॥

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम ।
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ॥4॥

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्य य: पठेन्नर: ।
न च विघ्नभयं तस्य सर्वासिद्धिकरं प्रभो ॥5॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ॥6॥

जपेद्वगणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत् ।
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ॥7॥

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वां य: समर्पयेत ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ॥8॥

॥ इति श्री नारदपुराणे संकष्टनाशनं गणेशस्तोत्रं सम्पूर्णम्‌ ॥

गणेश संकट नाशन स्तोत्र संस्कृत लीरीक्स फोटो | Ganpati Stotram Sanskrit Lyrics Photo

संकटनाशन गणेश स्तोत्र | Sankat Nashan Ganesh Stotra

संकटनाशन गणपती स्तोत्र संस्कृत लीरीक्स व्हिडिओ | Sankat Nashan ganpati stotra in marathi Lyrics Video

गणेश स्तोत्र मराठी लीरीक्स | Sankat Nashan Ganesh Stotra Marathi Lyrics

॥ श्री गणेशाय नमः ॥

नारद उवाच –

साष्टांग नमन हे माझे, गौरीपुत्र विनायका |
भक्तिने स्मरता नित्य, आयु:कामार्थ साधती ||१||

प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत तें |
तीसरे कृष्णपिंगाक्ष, चौथे गजवक्त्र तें ||२||

पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नाव तें |
सातवे विघ्नराजेंद्र, आठवे धुम्रवर्ण तें ||३||

नववे श्री भालाचंद्र, दहावे श्री विनायक |
अकरावे गणपति, बारावे श्री गजानन ||४||

देवनावे अशी बारा, तीन संध्या म्हणे नर |
विघ्न भिती नसे त्याला, प्रभो ! तू सर्वसिद्धि दे ||५||

विद्यार्थ्याला मिळे विद्या, धनार्थ्याला मिळे धन |
पुत्रर्थ्याला मिळे पुत्र, मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||

जपता गणपति स्तोत्र, सहा मासात हे फळ |
एकवर्ष पूर्ण होता, मिळे सिद्धि निःसंशय ||७||

नारदांनी रचिलेले, झाले संपूर्ण स्तोत्र हे |
श्रीधाराने मराठीत, पठण्या अनुवादिले ||८||

संकटनाशन गणपती स्तोत्र मराठी लीरीक्स फोटो | Sankat Nashan Ganpati Stotra Marathi Lyrics Photo

संकटनाशन गणेश स्तोत्र | Sankat Nashan Ganesh Stotra

गणेश स्तोत्र मराठी लीरीक्स व्हिडिओ | ganesh sankat nashan stotra Marathi Lyrics Video

गणेश संकटनाशन स्तोत्र इंग्रजी लीरीक्स | Ganesh Stotram English Lyrics Video

॥ Shri Ganeshay Nmah ॥

Naarada Uvaacha –

Pranamya Shirasaa Devam Gauree Putram Vinaayakam ।
Bhaktaa Vaasam Smarennitya Maayuh Kaamaartha Siddhaye ॥1॥

Prathamam Vakratundam Cha Ekadantam Dviteeyakam ।
Triteeyam Krishna Pingaaksham Gajavaktram Chaturthakam ॥2॥

Lambodaram Panchamam Cha Shashtham Vikatameva Cha ।
Saptamam Vighna Raajam Cha Dhumra Varnam Tathaashtamam ॥3॥

Navamam Bhaala Chandram Cha Dashamam Tu Vinaayakam ।
Ekaadasham Ganapatim Dvaadasham Tu Gajaananam ॥4॥

Dvaadashaitaani Naamaani Trisandhyam Yah Pathennarah ।
Na Cha Vighna Bhayam Tasya Sarva Siddhi Karam Prabho ॥5॥

Vidyaarthee Labhate Vidyaam Dhanaarthee Labhate Dhanam ।
Putraarthee Labhate Putraan Mokshaarthee Labhate Gatim ॥6॥

Japed Ganapati Stotram Shadbhir Maasaih Phalam Labhet ।
Samvatsarena Siddhim Cha Labhate Naatra Sanshayah ॥7॥

Ashtabhyo Braahmane Bhyashcha Likhitvaa Yah Samarpayet ।
Tasya Vidyaa Bhavet Sarvaa Ganeshasya Prasaadatah ॥8॥

गणेश संकट नाशन स्तोत्र इंग्रजी लीरीक्स फोटो | Shri Ganesh Stotra English Lyrics Photo

Sankat Nashan Ganesh Stotra

गणपती स्तोत्राचा अर्थ काय?

नारद मुनि म्हणतात –
पार्वतीपुत्र श्री गणपतीला मी साष्टांग नमस्कार करतो. श्री गणपतीचे भक्तिभावाने स्मरण केल्यास व्यक्तीला आयुष्य, संपत्ति प्राप्त होऊन इच्छापूर्ती होते. ॥१॥

स्तोत्रातील गणेशाच्या 12 नावांचा अर्थ खालीलप्रमाणे

पहिले नाव – वक्रतुंड वक्र सोंड असलेला
दुसरे नाव – एकदंत एक दात असलेला
तिसरे नाव – कृष्ण पिंगाक्ष काळे आणि तपकिरी डोळे असलेला
चौथे नाव – गजवक्त्र हत्तीसारखा चेहरा असलेला
पाचवे नाव – लंबोदर मोठे पोट असलेला
सहावे नाव – विकटभयंकर
सातवे नाव –  विघ्नराजेंद्रअडथळ्यांवर राज्य करणारा
आठवे नाव – धूम्रवर्णज्याचा रंग राखाडी आहे असा
नववे नाव – भालचंद्रत्याच्या कपाळावर चंद्र आहे असा
दहावे नाव – विनायकविघ्न नाहीसे करणारा नायक
अकरावे नाव –गणपतीगणांचा अधिपति असणारा
बारावे नाव –गजानन हत्तीसारखा चेहरा असलेला

जी व्यक्ती गणेशाच्या या बारा नामांचा दिवसातून तीन वेळा (सकाळी, मध्यान्ह आणि संध्याकाळ) जप करते, त्याला कोणत्याही अनिष्ट गोष्टींची भीती राहत नाही. आणि या प्रकारच्या स्मरणाने त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात

ज्ञानर्जन करणाऱ्याला याने ज्ञान प्राप्त होते, धनाच्या इच्छेला धनप्राप्ती होते, पुत्र इच्छिणाऱ्याला पुत्रप्राप्ती होते आणि मोक्ष इच्छिणाऱ्याला सद्गती प्राप्त होते.

गणपती स्तोत्राचा जप करणार्‍याला सहा महिन्यांत इच्छित फळ मिळते आणि एका वर्षात पूर्ण सिद्धी प्राप्त होते. यात शंका नाही.

जो मनुष्य हे लिहून आठ ब्राह्मणांना समर्पण करतो, त्याला गणेशाच्या कृपेने सर्व प्रकारची विद्या प्राप्त होते.

आमचे गणेश चतुर्थी 2023 स्पेशल लेख नक्की वाचा 👇

प्रश्नोत्तरे

गणपती स्तोत्राचा जप का केला जातो?

गणेश स्तोत्राचे रोज पठण केल्याने व्यक्तीला अनेक प्रकारच्या अडथळ्यांपासून आणि त्रासांपासून मुक्ती मिळते. या गणेश स्तुति मुळे श्री गणेशाची कृपादृष्टी होऊन आशीर्वाद प्राप्ती होते असे पुराणात सांगितले आहे

गणपती स्तोत्र कसे पाठ करावे?

श्री गणेशाचा वार म्हणजे मंगळवारी गणेश स्तोत्र पठण करणे चांगले.
सकाळी किंवा संध्याकाळी पूर्वेकडे तोंड करून बसावे.
श्री गणेशाची मूर्ती किंवा तसबीर अमोर ठेवून ध्यान एकाग्र करावे.
मनोभावे श्री गणेश स्तोत्र म्हणावे
भगवान गणेशाचे आभार मानावे आणि साष्टांग नमस्कार करावा

गणपती स्तोत्राचा जप करण्यासाठी उत्तम वेळ कोणती ?

गणपती स्तोत्राचे चांगले परिणाम हवे असल्यास, सकाळी आंघोळ केल्यावर पहाटेच या स्तोत्राचा जप करा. गणपतीच्या मूर्ती किंवा चित्रासमोर गणेश स्तोत्र जपणे आवश्यक आहे. आपण सायंकाळी सुद्धा आंघोळ करून जप करू शकतो.

गणपती स्तोत्राचा जप करण्याचे काय फायदे आहेत ?

गणपती स्तोत्राचे नियमित पठण केल्याने तुमचे मन शांत होते आणि आपल्या आयुष्यापासून वाईट गोष्टी दूर होतात. जी व्यक्ती गणेशाच्या या बारा नामांचा दिवसातून तीन वेळा (सकाळी, मध्यान्ह आणि संध्याकाळ) जप करते, त्याला कोणत्याही अनिष्ट गोष्टींची भीती राहत नाही. आणि या प्रकारच्या स्मरणाने त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात.
ज्ञानर्जन करणाऱ्याला याने ज्ञान प्राप्त होते, धनाच्या इच्छेला धनप्राप्ती होते, पुत्र इच्छिणाऱ्याला पुत्रप्राप्ती होते आणि मोक्ष इच्छिणाऱ्याला सद्गती प्राप्त होते.
गणपती स्तोत्राचा जप करणार्‍याला सहा महिन्यांत इच्छित फळ मिळते आणि एका वर्षात पूर्ण सिद्धी प्राप्त होते. यात शंका नाही.

निष्कर्ष

मित्रहो, आम्ही या लेखाद्वारे संकटनाशन गणेश स्तोत्राबद्दल आणि त्याचे महत्व काय आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपणास ही माहिती आवडली असल्यास हा लेख नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment