सहकार म्हणजे काय Sahakar Mhanje Kay

प्राचीन काळापासून, सहकार हा मानवी संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मानवाच्या शिकारी अवस्थेपासून आजच्या प्रगत अवस्थेपर्यंतचा विचार केला तर, असे आढळते की, एकत्रितपणे विचार करणे व काम करणे ही मानवाची सहज आणि नैसर्गिक प्रवृत्ती आहे.

त्यातून त्याला सुखी आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते. त्यातूनच त्याच्या आर्थिक आणि सामाजिक आयुष्यात थोडे क्रांतिकारक बदल घडून आले. Sahakar ही मानवी सहजीवनाच्या कल्पनेची एक प्रगत अवस्था आहे.

यामध्ये मानवास आर्थिक व सामाजिक विकासासाठी आणि अन्याय निवारण्यासाठी एकत्र येण्याची प्रकार इच्छा निर्माण होते. मानवाच्या जीवन प्रणालीचा इतिहास हा सहकाराचा इतिहास आहे, त्यामुळे आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये सहकारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणे, कौटुंबिक व सामाजिक जीवनात एकत्रित राहणे व काम करणे. सहकार आणि मानवी सहजीवन यांचा जवळचा संबंध आहे.

सहकारांमध्ये व्यक्तींनी एकत्रित राहण्याबरोबर, एकमेकांना मदत करण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचाही समावेश होतो. सर्वांनी मिळून एकमेकांच्या मदतीने सर्वांच्या हितासाठी एकत्रित काम करणे, याला सहकार विशेष महत्त्व आहे.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास सहकार म्हणजे काय याबद्दल माहिती दिलेली आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

सहकार म्हणजे काय Sahakar Mhanje Kay

सहकार आणि सहकारी संस्थेचा अर्थ व व्याख्या

अर्थ

Sahakar – सहकारला इंग्रजी मध्ये कोऑपरेशन असे म्हणतात. कोऑपरेशन हा मूळ शब्द लॅटिन भाषेतील कोऑपरेरी या शब्दापासून आला आहे.

हे वाचा-

या शब्दातील को म्हणजे “सह” किंवा “एकत्र” व ऑपरेरी म्हणजे “कार्य करणे” असा या शब्दाचा अर्थ आहे. त्यामुळे कोऑपरेशन म्हणजे एकत्रितपणे काम करणे होय.

सहकार म्हणजे काय

कोणतेही काम एकत्रितपणे करावयाचे असल्यास, त्यासाठी इतर व्यक्तींची मदत घेणे आवश्यक असते. लोकांना स्वतःच्या ज्या गरजा वैयक्तिकरित्या पूर्ण करता येत नाहीत, अशा गरजा एकमेकांच्या सहाय्याने सहकारात पूर्ण केल्या जातात.

Sahakar म्हणजे समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तीने, एकत्रित येऊन एकमेकांच्या मदतीने आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्थापन केलेली संस्था.

सहकाराची व्याख्या

अनेक विचारवंतांनी Sahakar च्य किंवा सहकारी संस्थेच्या केलेल्या व्याख्या पुढीलप्रमाणे ;

एच कॅल्व्हर्ट

“मानवी भूमिकेतून व्यक्तीने स्वयेच्छेने एकत्रित येऊन, आपल्या आर्थिक हिताच्या वृद्धीसाठी समानतेच्या तत्त्वावर स्थापन केलेली संघटना म्हणजे सहकारी संस्था होय”.

श्री वैकुंठ लाल मेहता भारतीय सहकारी चळवळीचे प्रणेते

“समान गरजा असलेल्या व्यक्तींनी एकत्रित येऊन, आपल्या समान आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्वैच्छणे स्थापन केलेला संघटन प्रकार म्हणजे सहकारी संस्था होय”.

भारतीय सहकार कायदा १९१२

“सहकारी तत्त्वांना अनुसरून आपल्या सभासदांचे आर्थिक हितसंबंध वृद्धिंगत करण्याचे ज्या संस्थेचे उद्दिष्ट असते तिला सहकारी संस्था असे म्हणतात”.

सहकार नियोजन समिती १९४६

“सहकार हा व्यवसाय संघटनेचा एक प्रकार असून, व्यक्ती आपल्या हितरक्षणासाठी समानतेच्या तत्त्वावर स्वतःच्या इच्छेने एकत्र येतात.”

“स्वतःच्या उपयोगासाठी व्यक्तींच्या समूहाने निर्माण केलेली आणि दिग्दर्शित केलेली, लोकशाही नियमानुसार चालवलेली सभासद व एकूण समाज यांच्या सेवेसाठी स्थापन झालेली, व्यवहार संस्था म्हणजे सहकारी संस्था होय”.

सहकाराचा इतिहास

जागतिक सहकारी चळवळ

Sahakar चळवळीचा उगम सर्वप्रथम युरोप खंडातील इंग्लंडमध्ये झाला. इसवी सन १७६० मध्ये युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली.

औद्योगिक क्रांतीच्या प्रभावामुळे, भांडवलशाही प्रवृत्ती वाढीस लागली. परिणामी अधिकाधिक नफा मिळवण्याच्या भांडवलदारांच्या प्रवृत्तीमुळे ग्राहकांचे व कामगारांचे शोषण होऊ लागले. कामगारांना फारच कमी वेतन देण्यात येऊ लागले, शिवाय त्यांचे कामाचे तास वाढविण्यात आल्याने कामगारांच्या दारिद्र्यात भर पडली.

ग्राहकांना नकली माल, कमी वजन मापाचा भेसळयुक्त माल, महागड्या किमतीत कंपन्या विकू लागल्या. त्यामुळे त्याचेही आर्थिक शोषण होऊन, असा वर्ग अधिक अधिक गरीब होत गेला. भांडवलदारांच्या नफ्यात वाढ होऊन, ते अधिकाधिक श्रीमंत झाले.

गरीब व श्रीमंत यांच्यामधील दरी वाढत जाऊन, आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढली. त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले.

भांडवलशाही समाजव्यवस्था व नफेखोरीच्या प्रवृत्तीमुळे, सहकार्य संकल्पनेचा उदय झाला. तर “रॉबर्ट ओवेन” यांनी कामगारांच्या सहकारी संस्था स्थापन केल्या. तसेच त्यांनी सहकारी तत्त्वाचा प्रत्यक्ष व्यवहारात यशस्वीपणे वापर करून, सहकाराचा पाया रचला.

म्हणून यांना आधुनिक सहकार चळवळीचे जनक मानले जाते. इंग्लंडमधील रोश्डेल येथे २८ विणकारणी एकत्रित येऊन, सहकारी तत्त्वावर १८४४ मध्ये “रोश्डेल इक्विटेबल पायोनियर सोसायटी लिमिटेड” या संस्थेची स्थापना करून, सहकारी ग्राहक भांडार सुरू केले व सहकारी चळवळीचा पाया घातला गेला.

याच कालखंडात जर्मनीमध्ये पतपुरवठा सहकारी चळवळ सुरू झाली. कॅनडा चीन रशियामध्ये शेती सहकारी संस्थांच्या माध्यमातून सहकारी चळवळ सुरू झाली. डेन्मार्क या देशात दूध उत्पादन सहकारी संस्थांच्या स्थापनेतून सहकारी चळवळ सुरू झाली.

स्वीडनमध्ये ग्राहक सहकारी संस्था सुरू झाल्या. यानंतरच्या काळात हळूहळू जगातील इतर देशांमध्ये सहकारी चळवळीच्या माध्यमातून सहकारी संस्था सुरू झाल्या. इसवी सन १८९५ मध्ये लंडन येथे आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थेची इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह एलियन्स स्थापन झाली.

ही संघटना सहकारी तत्त्वांचे पालन करणारे, सहकारी संस्थांचे जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करते. जागतिक सहकारी चळवळीच्या विकासात या संस्थेचे योगदान फार महत्त्वाचे आहे.

सहकार म्हणजे काय

भारतीय सहकारी चळवळ

अठराव्या शतकात इंग्लंडमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे, वस्तूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊ लागले. पक्क्या मालाची हक्काची बाजारपेठ व कच्च्या मालासाठी भारताच्या भूप्रदेशाचा वापर ब्रिटिशांनी केला.

औद्योगिक क्रांतीचा दुष्परिणाम ब्रिटिशांच्यामुळे भारतातील लघु व कुटुरे उद्योग बंद पडले. कारगिल व कामगार बेकार झाले. रोजगारासाठी ते शेतीकडे वळले. परिणामी शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या वाढली.

शेतीवरील अतिरिक्त भार दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दुर्बल झाली. शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढला. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढवून, ते सावकारी पाषात अडकले.

शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी, सरकारने शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्याच्या दृष्टीने कायदेशीर उपाय योजले. मुंबई प्रांतातील बडोदा येथे भारतातील पहिली सहकारी पतपुरवठा संस्था दि. ५ फेब्रुवारी १८८९ रोजी स्थापन झाली.

प्राध्यापक विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी “अन्योन सहकारी मंडळी” या नावाने पहिली पतपुरवठा संस्था स्थापन केली. ब्रिटिश सरकारने भारतातील Sahakar चळवळीस मूर्त स्वरूप देणारा पहिला सहकार कायदा १९०४ मध्ये संपन्न केला.

भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक सामाजिक जीवन असणारे हा कायदा होता. हा कायदा फक्त पतसंस्था स्थापन करण्यापुरताच मर्यादित होता. सन १९०४ च्या कायद्यातील त्रुटी व उनिवा दूर करण्यासाठी सन १९१२ मध्ये दुसरा Sahakar कायदा संमत केला.

या Sahakar कायद्यामुळे सहकारी संस्थांची स्थापना सर्व क्षेत्रात होऊ लागली. भारतातील सहकारी चळवळीशी प्रगती व त्रुटी अभ्यासण्यासाठी १९१४ साली ब्रिटिश सरकारने एडवर्ड मॅकलेगण यांच्या अध्यक्षतेखाली, एक समिती नेमली. या समितीने सहकार चळवळीच्या भविष्यातील वाटचालीबाबत मौलिक सूचना केल्या.

पहिल्या महायुद्धानंतर सन १९१९ मध्ये ब्रिटिश सरकारने मॉन्टो फोर्ट सुधारणा कायदा मंजूर केला. या कायद्यामुळे सहकार हा विषय केंद्र सरकारकडून प्रांतिक सरकारच्या अख्यारीत आला. त्यानुसार सर्वप्रथम मुंबई प्रांताने १९२५ मध्ये सहकार कायदा संमत केला.

Sahakar चळवळीची पुनर्रचना करण्यासाठी ज्या विविध समित्या नियुक्त केल्या होत्या, त्या शिफारशीवरून भारतात रिझर्व बँकेची स्थापना दिनांक ०१ एप्रिल १९३५ रोजी करण्यात आली. या बँकेने शेतीपुरवठा विभाग सुरू केला.

यानंतरच्या काळात केंद्र सरकारने सरकारच्या विकासासाठी प्राध्यापक धनंजय राव गाडगे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी अर्थ पुरवठा समिती १९४४ व श्री आर.जी.सैयेराय यांच्या अध्यक्षतेखाली, सहकार नियोजन समिती १९४५ नियुक्त केली.

बँकिंग सोयी व सुधारण्यासाठी सरकारने श्री पुरुषोत्तमदास ठाकूरदास यांच्या अध्यक्षतेखाली, ग्रामीण व बँकिंग चौकशी समिती १९४९ नेमली. इसवी सन १९५१ मध्ये ग्रामीण कर्ज पुरवठ्याचा अभ्यास करून, शिफारस करण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीचे डॉक्टर ए.डी.गोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती केली गेली.

१९५४ मध्ये समितीने आपला अहवाल सरकारकडे सादर केला. त्या समितीने आपल्या अहवालामध्ये असे मत नोंदविले की, सहकारी अयशस्वी ठरला आहे. तथापि, तो यशस्वी झालाच पाहिजे.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत सरकारने १९५१ पासून पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्याचे धोरण स्वीकारले. पंचवार्षिक योजना दरम्यान सहकारी चळवळीला विकास सहकारी चळवळीत लोकांचा सहभाग वाढविणे यावर भर देण्यात आला.

Sahakar Mhanje Kay

महाराष्ट्रातील सहकारी चळवळ

महाराष्ट्र हे Sahakar क्षेत्रातील पुढारलेले राज्य असून, राज्यभरा सहकारी संस्थांचे मोठे जाळे पसरले आहे. सहकारी पतपुरवठा संस्था, बिगर कृषी पतपुरवठा संस्था, ग्राहक सहकारी संस्था, प्रक्रिया सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, मजूर सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था, अशा विविध प्रकारच्या सहकारी संस्थांची स्थापना झाली.

त्या यशस्वीपणे कार्यरत असल्यामुळे, महाराष्ट्रातील सामान्य नागरिक शेतकरी या नात्यांना कारणामुळे सहकारी संस्थेच्या संपर्कात आला. महाराष्ट्रातील सहकारी चळवळील सुमारे १००वर्ष अधिक काळाचा इतिहास आहे.

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी संस्थेची स्थापना सन १९२३ मध्ये झाली. या बँकेचे पुढचे राज्य शिखर बँकेत रुपांतर होऊन, ती सध्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड म्हणून कार्यरत आहे.

महाराष्ट्रामध्ये सहकारी पुरवठा बाबत त्रिस्तरीय रचना स्वीकारलेली आहे. प्राथमिक स्तरावर प्राथमिक सहकारी पुस्तक पतपुरवठा संस्था, जिल्हास्तरावर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राज्यस्तरावर राज्य सहकारी बँक कार्य करते.

स्वातंत्र्यानंतर इसवी सन १९५१ मध्ये प्राध्यापक धनंजय राव गाडगिळ व पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखेपाटील यांच्या मार्गदर्शनामुळे “प्रवरा सहकारी साखर कारखाना लिमिटेड” व प्रवरानगर ,जिल्हा अहमदनगर येथे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन झाला.

महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यानी सहकारी चळवळीचे नवे पर्व सुरू केले. ०१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० या कायद्यानुसार सहकारी संस्थांचे नियम व नियंत्रण केले जाते.

सन १९६१ मध्ये महाराष्ट्रात विविध प्रकारच्या ३१५६५ सहकारी संस्था होत्या. मार्च २०१८ मध्ये ही संस्था १९८२५२ पर्यंत पोहोचली. सहकारी संस्थांच्या संख्येत जशी जशी वाढ झाली, तशी तशी सहकारी संस्थांच्या सभासद संकेत भाग भांडवल, कर्ज, ठेवी, यामध्ये वाढ झाली.

देशातील सहकारी संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी केंद्र शासनाने ९७ वी घटनादुरुस्ती अधिनियम २०११ अन्वेय सहकार कायद्यात काही सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने १४ एप्रिल २०१३ रोजीच्या अध्यादेशाद्वारे महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० मध्ये सुधारणा केल्या आहेत.

Sahakar Mhanje Kay

सहकाराची वैशिष्ट्ये

Sahakarची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत

व्यक्तीचे संघटन

समाजातील अनेक व्यक्तींचे उत्पन्न हे मर्यादित असते. अशा आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्ती आपल्या समान गरजा सामूहिक रित्या भाग घेण्यासाठी एकत्र येऊन, सहकारी संस्थेची स्थापना करतात.

प्रत्येक जण सर्वांसाठी व सर्वजण प्रत्येकासाठी काम करतात. सर्व सभासद संस्थेचे मालक असतात. सहकारी संस्थेत भांडवला पेक्षा व्यक्ती हा घटक महत्त्वाचा असतो.

महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० नुसार सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या कुटुंबातील किमान दहा व्यक्ती आवश्यक असतात.

ऐच्छिक संघटन

Sahakar सभासत्व सर्वांना ऐच्छिक असते. म्हणजे जात, धर्म, पंथ, लिंग, आर्थिक परिस्थिती, यांचा विचार केला जात नाही.

सहकारी संस्थेत सभासद होण्यासाठी किंवा सभासत्व रद्द करण्यासाठी, कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची सक्ती केली जात नाही.

सभासद होणे अगर न होणे, हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार संबंधित व्यक्तीस असतो. म्हणून सहकारी संस्था ही ऐच्छिक संघटना आहे.

समान उद्दिष्ट

Sahakar मध्ये एकत्र येणाऱ्या, व्यक्तींचे उद्दिष्ट एक समान असते. समान गरजा असणाऱ्या व्यक्ती आपल्या उद्दिष्ट कृतीसाठी एकत्र येऊन, सहकारी संस्थेची स्थापना करतात.

उदाहरणार्थ. घराची गरज असणाऱ्या व्यक्ती एकत्रित येऊन सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करतात.

लोकशाही संघटन

सहकारी संस्था ही एक लोकशाही संघटना आहे. सहकारात भांडवला पेक्षा व्यक्तीला अधिक महत्त्व दिले जाते. कोणत्याही सभासदांचे भांडवल कमी किंवा जास्त असेल, तरी एक व्यक्ती एक मत या तत्त्वाचा अवलंब केला जातो.

सहकारी संस्थेचा कारभार सभासदांनी निवडून दिलेले, प्रतिनिधी म्हणजे संचालक मंडळाकडून लोकशाही पद्धतीने चालविला जातो लोकशाही कारभार सहकाराचा गाभा आहे.

समानता

सहकारी संस्थेचे सभासद व देताना त्या व्यक्तीची जात, धर्म, वर्ण, लिंग, आर्थिक परिस्थिती सामाजिक प्रतिष्ठान इत्यादी बाबी विचारात घेतल्या जात नाही.

सहकारी संस्थेत कोणतेही श्रेष्ठ, कनिष्ठ नसतो. सर्व सभासदांना समान दर्जा, समान हक्क व अधिकार असतात. म्हणूनच समानता हा सहकाराचा पाया मांडला जातो.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे एकत्रीकरण

आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्ती स्वबळावर स्वतःची आर्थिक प्रगती करू शकत नाही. अशा आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्ती सहकारी संस्थेच्या माध्यमातून, एकत्रित येऊन आपले शक्ती वाढवू शकतात. कारण त्यांच्या संघशक्ती निर्माण झालेली असते.

सहकारी संस्थेमुळे आर्थिक दुर्बल घटक हे भांडवलदार, व्यापारी, दलाल, यांच्याकडून होणाऱ्या आर्थिक शोषण सामूहिकपणे प्रतिकार करू शकतात. म्हणूनच सहकारी संस्थांमध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींचे संघटन होय.

सेवा उद्देश

सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश आपल्या सभासदांना सेवा देणे हा असतो. नफा मिळवणे हा त्यांचा गौण उद्देश असतो. परंतु व्यवस्थापन खर्च भागेल, इतका नफा सहकारी संस्थांना मिळवावा लागतो.

किमान खर्चात चांगली सेवा उपलब्ध व्हावी. अपेक्षेने संस्थेचे कार्य चालते. संस्थेला आर्थिक व्यवहारातून झालेला नफा देखील चांगला सेवा देण्याकरता उपयोगात आणला जातो.

परस्परसाहाय्य यातून स्व सहाय्य

सहकारी संस्थेत सभासदांच्या परस्पर सहकार्याला अधिक महत्त्व आहे. “एकमेकांना सहकार्य करू अवघे धरूस सुपंथ” यानुसार सभासद संस्थांचे आर्थिक हित आणि विकास एकमेकांच्या मदतीने करून घेतात.

उदाहरणार्थ.. कर्मचाऱ्यांना पतसंस्था प्रत्येक सभासदांकडून दरमहा ठराविक वर्गणी गोळा करतात त्यातून गरजू सभासदाला कमी व्याज दराने कर्ज दिले जाते.

सुलभत्याने परतफेड आणि तारणाशिवाय कर्ज मिळाल्याने, सभासदांचा फायदा होतो. असं कर्ज म्हणजे अन्य सभासदाने एका सभासदाला केलेली आर्थिक मदत असते.

मध्यस्तांचे उच्चाटन

अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये, आपल्याला मध्यस्थ आढळतात. असे मध्यस सहकारी संस्थांमध्ये नसतात. कारण मध्यस्तांकडून व्यवहारांमध्ये नफा घेतला जातो.

त्यामुळे वस्तूंच्या किमती वाढतात. तसेच मध्यस्थ मालात भेसळ कमी, वजन, मापे, फसवणूक, आधी अनिष्ट व्यापारी प्रथांचा अवलंब करतात. घाऊक व्यापारी व दलाल यांसारख्या मध्यस्तांच्या साखळीतून, सभासदांचे व ग्राहकांचे आर्थिक शोषण व पिवळणूक केली जाते.

सहकारी संस्था मात्र थेट उत्पादनाकांकडून वस्तू खरेदी करून, सभासदांना व ग्राहकांना पुरवतात. त्यामुळे मध्यस्तांचे उच्चाटन होऊन, सभासदांना कमी किमती चांगल्या दर्जाच्या वस्तू उपलब्ध होतात. म्हणून मध्यस्तांचे उच्चाटन हे सहकाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानले जाते.

आर्थिक व सामाजिक चळवळ

समाजातील आर्थिक दुर्बल घटक आपल्या दुर्बलतेवर मात करून, स्वतःचा विकास साधण्याकरिता एकत्र येऊन सहकारी संस्थेची स्थापना करतात. सहकारी संस्थांची जितकी वाढ आणि प्रगती होईल, तितक्या प्रमाणात भांडवलदार, कारखानाधारक आणि व्यापारी वर्गांकडून होणारी समाजाची पिळवणूक, आर्थिक शोषण, थांबेल.

त्यातून श्रीमंत, गरीब यातील दरी कमी होऊन, समाजात आर्थिक संबंध निर्माण होण्यास मदत होते. सहकारी संस्थांमध्ये समाजातील दुर्बल घटक, भांडवलादाराविरुद्ध यशस्वीपणे लढा देतात.

त्याप्रमाणे सहकारी संस्थांची वाढ आणि प्रगती होईल, तितक्या प्रमाणात समाजा समतेवर आधारित अशी समाज रचना तयार होईल.

जलद गतीने, सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी सहकारी चळवळीमध्ये स्वावलंब, नैतिक विकास, प्रामाणिकपणा इत्यादींना महत्त्व दिले जाते, म्हणून Sahakar हे एक आर्थिक सामाजिक परिवर्तनाचे साधन मानले जाते.

सहकाराचे महत्व

सहकारी संस्थांचा देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. आधुनिक समाज रचनेत सहकाराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.

सहकाराने देशाच्या ग्रामीण तसेच शहरी जीवनाला एक आकार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यादृष्टीने सहकाराचे महत्त्व पुढील मुद्द्यांवरून अधिक स्पष्ट करता येईल ;

एकसंघ समाजाची निर्मिती

Sahakar व्यक्तिगत हितापेक्षा, व्यक्तिसमूहाच्या हिताला प्राधान्य दिले जाते. सहकारामुळे धर्म, जात,पंत, लिंग, वर्ण, इत्यादी भेद कमी होऊन, सर्वांना समान मानले जाते.

परिणामी समाजामध्ये समता, एकता, बंधुता,. सलोखा व सामान जनसेवा एक संघ समाजाची निर्मिती होण्यास मदत होते.

शेती क्षेत्राचा विकास

भारतात प्रामुख्याने शेती क्षेत्राला पतपुरवठा करणारी सहकारी सर्व सुरू झाली. सहकारी पतसंस्था शेतकऱ्यांना सुधारित बी बियाणे, खते, कीटकनाशके, विद्युत पंप, पाईपलाईन, अवजार, इत्यादीसाठी अल्प दराने कर्ज पुरवठा करतात.

त्यामुळे शेती उत्पादन वाढते, परिणामी शेती क्षेत्राचा विकास होण्यास मदत होते.

औद्योगिक विकास

कारागीर, लघु, कुटीरउद्योजक, एकत्र येऊन औद्योगिक सहकारी संस्था स्थापन करतात. या संस्थेमार्फत सभासदांसाठी कच्चा मालाची खरेदी व पक्क्या मालाची विक्री केली जाते. या संस्था लघुउद्योग, कुटीर उद्योगांना चालना देतात.

असे सहकारी क्षेत्रामुळे शेतीपूरक व शेतीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचा देखील विकास होतो. सहकारी साखर कारखाने, सहकारी सूत गिरण्या, सहकारी तेल गिरण्या, इत्यादी प्रक्रिया संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे.

रोजगार निर्मिती

सहकारी क्षेत्रामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यास मदत होते. सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, तेल गिरणा, इत्यादींमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होते.

याशिवाय शेतमजूर, ऊस तोडणी कामगार, वाहतूकदार, अन्नसेवा पुरवणारे, व्यावसायिक यांना प्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होतो.

कोणत्याही सहकारी संस्थेस दैनंदिन कामकाज चालवण्यासाठी, काही कर्मचाऱ्यांची गरज असते. अशा विविध प्रकारचे सहकारी संस्थांच्या स्थापनेमुळे रोजगारांच्या संधीत वाढ होते.

मक्तेदारीवर नियंत्रण

ग्रामीण भागात सावकार शेतकऱ्यांना भरमसाठ व्याज दराने, कर्ज पुरवठा करता. सहकारी पतसंस्थांच्या स्थापनेमुळे सावकारांची कर्ज पुरवठ्यावरील मक्तेदारी कमी होण्यास मदत झाली आहे.

सहकारी ग्राहक संस्थांमुळे वस्तू वितरणातील मध्यस्थ व व्यापाऱ्यांची मक्तेदारी कमी झाली आहे. मक्तेदारीच्या दुष्परिणांपासून ग्राहकांचे संरक्षण रीतीने सहकारी संस्था मक्तेदारी व नियंत्रण ठेवतात.

स्व सामर्थ्याची जाणीव

सहकारामुळे समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व्यक्ती परस्पर सहाय्याने, एकत्र येऊन स्वतःचे संरक्षण करू शकतात. त्यांच्यात स्व सामर्थ्याची जाणीव निर्माण होते.

ते आपले शोषण करण्याऱ्या विरुद्ध लढा देऊ शकता. त्यामुळे आत्मविश्वास वाढून, संघटन, व्यवस्थापन, कौशल्य, इत्यादी गुणांचा विकास होतो. यातून सभासदांमध्ये स्व सामर्थ्याची जाणीव निर्माण होते.

नफ्याचे न्याय वाटप

सहकारी संस्थेला मिळालेले अधिक्य नफा सर्व सभासदांमध्ये वाटून दिला जातो. नफ्याचे वाटप हे भाग भांडवलाच्या प्रमाणात सभासदांनी संस्थेची केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या प्रमाणात केले जाते.

नफ्याच्या न्याय वाटपामुळे, वाढीव नफ्यात प्रत्येक सभासद वाटा मिळतो. परिणामी नफ्याचे न्याय वाटप होऊन सभासदांची आर्थिक प्रगती होते.

खरेदी शक्तीत वाढ

सहकारी संस्था सभासदांना ग्राहकांना चांगल्या दर्जाच्या वस्तूंचा पुरवठा वाजवी किमतीत करतात. वाजवी किमतीत वस्तू मिळाल्यामुळे, पैशाची बचत होते. त्यामुळे सभासदांची खरेदी शक्ती वाढते.

FAQ

१. सहकार्यावर एक छोटी टीप काय आहे?

सहकार म्हणजे एकमेकांना मदत करणे, कौटुंबिक व सामाजिक जीवनात एकत्रित राहणे व काम करणे. सहकार आणि मानवी सहजीवन यांचा जवळचा संबंध आहे. सहकारांमध्ये व्यक्तींनी एकत्रित राहण्याबरोबर, एकमेकांना मदत करण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचाही समावेश होतो. सर्वांनी मिळून एकमेकांच्या मदतीने सर्वांच्या हितासाठी एकत्रित काम करणे, याला सहकार विशेष महत्त्व आहे.

२. सहकाराचे महत्व काय आहे ?

सहकारी संस्थांचा देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वाचा सहभाग आहे. आधुनिक समाज रचनेत सहकाराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. सहकाराने देशाच्या ग्रामीण तसेच शहरी जीवनाला एक आकार देण्याचा प्रयत्न केला आहे.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास सहकार म्हणजे काय ? या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment