मिनी काश्मीर तापोळा महाबळेश्वर | Mini Kashmir Tapola Mahabaleshwar information : – तापोळा महाराष्ट्रातील मिनी कश्मीर म्हणून प्रसिद्ध आहे. पश्चिम भारतात महाराष्ट्र हे असे राज्य आहे, ज्या ठिकाणी सर्वात जास्त पर्यटक हे सहलीसाठी येत असतात. संपूर्ण महाराष्ट्रात निसर्ग पर्यटनासाठी अनेक हिल स्टेशन आणि ऐतिहासिक किल्ले आहेत.
महाबळेश्वरमधील तापोळा हे हिल स्टेशन निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने खरोखरच अप्रतीम आहे. “मिनी काश्मीर” म्हणून ओळखले जाणारे, तापोला गाव हे एक सुंदर ठिकाण पर्यटकांना आराम, आराम आणि मनःशांती मिळवण्यासाठी नयनरम्य वातावरण देते. आपण जर शहरातील त्रासदायक आवाज आणि शहरी जीवनापासून काही काळ स्वत:ला डिस्कनेक्ट करू इच्छित असाल तर मन:शांतिसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी हे निःसंशयपणे सर्वोत्तम ठिकाण आहे. चल तर पाहू तापोळा माहिती मराठी.
मिनी काश्मीर तापोळा महाबळेश्वर (Mini Kashmir Tapola Mahabaleshwar information)
स्थान | तापोळा |
---|---|
जवळील प्रेक्षणीय शहर | महाबळेश्वर |
जवळील रेल्वे स्थानक | सातारा |
जिल्हा | सातारा |
पुणे ते तापोळा अंतर | १४६ किलोमीटर |
मुंबई ते तापोळा अंतर | २५९ किलोमीटर |
तापोळाची हिरवळ आणि सौंदर्य हे तुमच्या मनाला एक वेगळाच आनंद देते. हे गाव त्याच्या अस्पर्शित नैसर्गिक सौंदर्याने आणि शांत वातावरणाने मंत्रमुग्ध करते. येथील कमालीची शांतता, हिवाळ्यात हिरवाईने वेढलेला शिवसागर सरोवराचा विस्तीर्ण विस्तार आणि नयनरम्य वातावरण खरोखरच डोळ्यांसाठी एक मेजवानी आहे. या ठिकाणचे अलौकिक सौंदर्य हे गजबजलेल्या पर्यटन स्थळांपेक्षा कैक पटीने सरस आहे.
महाबळेश्वर पर्यटन स्थळे माहिती मराठी
तापोळा महाबळेश्वर नकाशा (Map Of Tapola mini kashmir)
तापोळा महाबळेश्वर येथे करण्यासारख्या गोष्टी (Things To Do In Tapola)
तापोळा तलाव
शिवसागर तलाव हा अतिशय सुंदर असून त्याच्या आजूबाजूला गर्द हिरवीगार वनराई आहे. पर्यटक थंडीच्या दिवसात इथे छान धुक्याचा आहुभाव घेऊ शकतात. सूर्यास्ताच्या विहंगम दृश्याचा आनंद अप्रतिमच. या ठिकाणी भेट देऊन तुम्ही कॅम्पिंग करून, कुटुंबासमवेत वेळ घालवू शकता.
फॅमिली पिकनिक
फॅमिली पिकनिक किंवा वीक एंड आउटिंगच्या दृष्टीने तापोळा मनमोहक आहेच त्याच बरोबर एक दिवसाच्या टूर साठी इथे करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. कुटुंबासमवेत व मित्रपरिवारांसोबत वेळ घालवण्यासाठी तापोळा एक लोकप्रिय पिकनिक पॉईंट म्हणून ओळखले जाते
निसर्गपर्यटन
हे गाव अतिशय सुंदर असून निसर्ग संपन्न आहे. तीन बाजूने असणाऱ्या नद्यांचा संगम, त्याचबरोबर नदीच्या कुशीत कोपऱ्या कोपऱ्याने असलेली गावे, हिवाळ्यातील हिरवळ आणि आल्हाददायक वातावरण या सर्वांचा याची देही याची डोळा अनुभव घ्यायचा असेल, तर निसर्गप्रेमींनी इथे नक्की भेट द्यावी. पावसाळ्यात नंतर उगवलेल्या गवतामध्ये बागडणारी फुलपाखरे. रंगीबेरंगी पक्षी त्याच बरोबर ससे, साळींदर यासारखे पाणीसुद्धा पाहायला मिळतात
ट्रेकिंग
तापोळ्याला वस्तीला राहून वासोटा किल्ला, जयगड किल्ला येथे ट्रेकिंगला जाता येते. त्याचबरोबर तापोळा गावाच्या आजूबाजूला असलेली गावे फिरण्याची मजा सुद्धा काही औरच
कृषीपर्यटन
निसर्गाच्या कुशीत असलेल्या तपोळा गावात बऱ्याच पर्यटन व्यवसायिकांनी कृषी पर्यटन सुरू केले आहे. यात स्ट्रॉबेरी, कलिंगड आणि शेतीची प्रात्यक्षिके, फुलझाडे, फळझाडे पाहता येतात
वॉटर स्पोर्ट्स
साहसी पर्यटनाची आवड असलेल्यांसाठी इथे तलावात किंवा नदीत स्विमिंग, कायाकिंग हे उपक्रम आहेत. त्यासोबतच पॅराग्लीडिंग, बोटिंग इत्यादींसारख्या वॉटरस्पोर्ट ऍक्टिव्हिटीज देखील तापोळा या ठिकाणी तुम्ही करू शकता.
गड किल्ले पर्यटन
ऐतिहासिक प्रेमींसाठी तापोळा गाव हे नंदनवन ठरले आहे. जवळच असलेला वासोटा किल्ला त्याचबरोबर जयगड किल्ला या ठिकाणी तुम्ही भेट देऊन ऐतिहासिक संदर्भ अनुभवू शकता.
धार्मिक पर्यटन
इथे असलेले श्री दत्त मंदिर, येडीयनाथ मंदीर त्याचबरोबर नागेश्वर गुफा ही ठिकाणे धार्मिक पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र आहेत. इथल्या निसर्ग पर्यटना बरोबर निवांत संध्याकाळी या ठिकाणांना नक्की भेट द्यावी.
कॅम्पिंग
बरेच पर्यटक या ठिकाणी मुद्दाम कॅम्पिंगसाठी येतात. निसर्गम्य वातावरणात, थंडीच्या दिवसात, शेकोटी करून राहणे अतिशय विलक्षण असते.
तापोळा या ठिकाणी तुम्ही कॅम्पिंगचा तसेच, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ इत्यादींसारख्या अनेक बैठ्या खेळांचा आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेल्या गावाची सैर करून तुमच्या सुट्टीचा मनसोक्त आनंद घेऊ शकता.
तापोळा महाबळेश्वर जवळील प्रेक्षणीय स्थळे (Places To Visit In Tapola)
शिवसागर तलाव (Tapola Lake Mahabaleshwar)
तापोळाचे महत्त्वाचे आकर्षण हे शिवसागर तलाव आहे. हे तलाव कोयना धरणावर बांधलेले असून, या धरणामध्ये कोयनाचे पाणी आहे. हे तलाव साधारणतः ५० किलोमीटर लांब व ८० मीटर खोल आहे.
शिवसागर पॉईंट (Shivsagar Point)
महाबळेश्वर ते तापोळा या ठिकाणी जाण्यासाठी जो रस्ता आहे, तो मुख्यतः शिवसागर पॉईंट म्हणून ओळखला जातो. या पॉईंटवरून तुम्ही शिवसागर तलाव, शिवसागरच्या टेकड्या, जंगल त्याचप्रमाणे कोयना वन्यजीव अभयारण्य सुद्धा पाहू शकता. या तलावामध्ये कोयना धरणाचे असणारे निळे पाणी आहे. या ठिकाणचे विहंगम दृश्य कोणत्याही वेळ व कालावधीमध्ये एक अद्भुत सौंदर्य प्रदान करते.
वसोटा किल्ला (Vasota Fort)
वासोटा हा किल्ला महाराष्ट्राच्या सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. वासोटा हा किल्ला वनदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. या किल्ल्याला व्याघ्रगड या नावाने देखील ओळखले जाते. ४२६७ फूट इतकी याची उंची आहे. तर समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची १११ मीटर इतकी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, या किल्ल्याचा वापर हा गुन्हेगारांना कैद करून ठेवण्यासाठी केला जात होता. जंगलामध्ये हा किल्ला असल्याने, या ठिकाणी प्राणी देखील पाहायला मिळतील. त्याचबरोबर या ठिकाणी एक मोठे सदरेचे क्षेत्र देखील पाहायला मिळेल. किल्ल्याचा वरचा भाग हा सपाट आणि अंडाकृती असल्याचे पाहायला मिळते. वासोटा किल्ल्याचे संस्थापक शिलाहार वंशातील दुसरे भोजराज होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस जावळी भाग जिंकला, त्यावेळेस अनेक किल्ले महाराजांनी आपल्या ताब्यात घेतले होते, ६ जून १६६० मध्ये हा किल्ला महाराजांनी सैन्याच्या हातून ताब्यात घेतला.
नागेश्वर गुफा (Nageshwar Caves)
वासोटा किल्ल्या जवळ नागेश्वर गुफा हे तापोळा गावातील एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. नागेश्वर टेकड्यांवर सर्वात उंच ठिकाणी वसलेली नागेश्वर गुफा ही अतिशय सुंदर आहे. या गुफेच्या आतमध्ये शिवलिंग आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी नागेश्वर गुफेमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक शंकराच्या शिवलिंगेची पूजा करण्यासाठी येत असतात.
दत्त मंदिर
दत्त मंदिर हे अतिशय सुंदर मंदिर असून, हे मंदिर दत्त यांना समर्पित आहे. या मंदिराचा भाग हा स्वच्छ तसाच सुंदर आहे.
त्रिवेणी संगम (Triveni Sangam)
त्रिवेणी संगम म्हणजेच तीन नद्यांपासून बनलेला संगम. कोयना, सोळशी, कांदाटी या नद्यानपासून हा संगम बनलेला आहे.
बेट
नद्यांच्या संगमांपासून बाजूला एक सुंदर बेट बनलेले आहे. या बेटावर तुम्ही थोडा वेळ बोट थांबवून, संपूर्ण बेट एक्सप्लोर करू शकता.
बोटिंग ट्रिप्स
बोटिंग ट्रिप्स मध्ये तापोळामधील विविध प्रेक्षणीय स्थळे एक्सप्लोर केली जातात.
तापोळा मिनी काश्मीर व्हिडिओ (Tapola information in Marathi)
तापोळा महाबळेश्वर पर्यटन प्रवेश शुल्क
तापोळा गाव व त्या भोवतालची प्रेक्षणीय स्थळे, एक्सप्लोर करण्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जात नाही. परंतु जर तुम्ही बोटिंग किंवा विविध प्रकारचे वॉटरस्पोर्ट ऍक्टिव्हिटीज करू इच्छिता, तर त्यासाठी तुम्हाला त्यांच्या पॉलिसीनुसार योग्य ते चार्ज द्यावे लागतात.
तापोळाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम महिना (Best Time To Visit Tapola Satara)
तापोळा या मिनी काश्मीर म्हणून समजल्या जाणाऱ्या गावाला भेट देण्यासाठी असा ठराविक कोणता महिना नाही. तुम्ही कोणत्याही काळात तापोळ्याला भेट देऊ शकता. परंतु तपोळ्याचे सौंदर्य अधिक जवळून पहायचे असल्यास, पावसाळा ते हिवाळ्याच्या दरम्याने तुम्ही तापोळ्याला भेट द्यावी.
तसेच पावसाळ्यात छोट्या-छोट्या धबधब्यांचा देखील आनंद आपण येथे घेऊ शकतो. जर पावसाळ्यात तुम्ही या ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत असाल, तर याच ठिकाणच्या जवळ कास पठार देखील आहे. पावसाळ्यात कास पठाराच्या १५० प्रकारच्या फुलाच्या प्रजाती, आपण या ठिकाणी बघू शकतो. तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल, तर तुमचा हा छंद या ठिकाणी उत्तम प्रकारे पूर्ण होऊ शकतो.
तापोळा महाबळेश्वर येथील हवामान
तापोळा हे समुद्रसपाटीपासून साधारणतः १३०० मीटर उंचीवर वसलेले असून, हे एक उष्णकटबंधीय तापमान असलेले ठिकाण आहे. या ठिकाणी पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पर्जन्य होते. या ठिकाणी वार्षिक पर्जन्यमान साधारणतः २२०० मिलिमीटर आहे. हिवाळ्यामध्ये या ठिकाणी थंड व कोरडे हवामान असते. थोडक्यात तापोळा या ठिकाणी वार्षिक तापमान हे सरासरी २१ अंश सेल्सियस असते.
तापोळाजवळ वॉटरस्पोर्ट ऍक्टिव्हिटीज (Tapola Water Sports)
तुम्ही तापोळा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वॉटरस्पोर्ट ऍक्टिव्हिटीज एन्जॉय करू शकता. यामध्ये स्पीड बोट, कायाकिंग, लॉन्च ट्रिप इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटरस्पोर्ट ऍक्टिव्हिटीज आहे.
वॉटरस्पोर्ट ऍक्टिव्हिटीज करते वेळी घ्यावयाची दक्षता
- वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज करताना नेहमी लाईफ जॅकेट घालावे.
- या ठिकाणी लाईफ गार्ड उपलब्ध नसल्यामुळे, जास्त प्रमाणात खोलवर पाण्यात आतमध्ये जाऊ नये.
मुख्य शहर ते तापोळा हिल स्टेशन अंतर
मुंबई ते तापोळा अंतर व त्यासाठी लागणारा कालावधी – मुंबई ते तापोळा हे अंतर साधारणतः २५९ किलोमीटर असून, यासाठी तुम्हाला सहा तास एवढा कालावधी लागू शकतो.
पुणे ते तापोळा अंतर व त्यासाठी लागणारा कालावधी – पुणे ते तापोळा अंतर १४६ किलोमीटर असून, प्रवासासाठी अंदाजे तीन तास लागू शकतात.
कालावधी/ दिवस – तापोळा एक्सप्लोर करण्यासाठी तुम्हाला साधारणतः दोन ते तीन दिवस लागू शकतात.
तापोळा कुठे आहे आणि कसे जाल?(How To Reach Tapola Hill Station)
तापोळा हे अतिशय सुंदर व निसर्गरम्य ठिकाण असून, या ठिकाणाला भेट देण्यासाठी तुम्ही तीन पर्यायांचा वापर करू शकता. रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग, हवाई मार्ग ते खालील प्रमाणे –
रस्ते मार्ग – मुंबई ते पुणे, पुणे ते पंचगणी, पंचगणी ते महाबळेश्वर, महाबळेश्वर ते तापोळा हे अंतर तुम्ही बसने किंवा तुमच्या वैयक्तिक गाडीने पार करू शकता. यासाठी रस्ते मार्ग हा तुमच्यासाठी सोयीचा ठरेल.
रेल्वे मार्ग – तापोळा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे रेल्वे स्थानक नाही. यासाठी तुम्हाला सातारा हे सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक आहे. सातारा रेल्वे स्थानकावर उतरून, तुम्ही ऑटो बुक करून किंवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने तापोळा पर्यंत जाऊ शकता.
हवाई मार्ग – पुण्यावरून जर तुम्ही तापोळा या शहराला भेट देत असाल, तर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ असून, मुंबईवरून जर तुम्ही तापोळ्याला भेट देत असाल, तर छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जवळचे विमानतळ आहे.
महाबळेश्वरवरून तापोळाला कसे जाल?
- तापोळा हे गाव महाबळेश्वर पासून अंदाजे २५ किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. तापोळ्याला पोहोचण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम महाबळेश्वरला पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही हवाई मार्ग, रेल्वे मार्ग किंवा रस्ते मार्गाचा अवलंब करू शकता.
- महाबळेश्वरला पोहोचल्यानंतर स्थानिक वाहतुकीने अर्थात टॅक्सी किंवा कॅब बुक करून, ऑटोने तुम्ही तापोळा गावाला भेट देऊ शकता.
तापोळाजवळ खाण्याची व राहण्याची सुविधा (Hotel In Tapola)
तापोळामध्ये तुम्हाला खाण्याची व जेवणाची सुविधा उत्तमरित्या उपलब्ध करून देणारे बरेच हॉटेल्स तुमच्या बजेटनुसार उपलब्ध आहेत. या ठिकाणी असणारे बरेच हॉटेल, ऍग्रो टुरिझम रिसॉर्ट असून, ते तुम्हाला उत्तम प्रकारे राहण्याची व खाण्याची सुविधा पुरवतात. त्यापैकीच काही रिसॉर्ट खालील प्रमाणे
- १.निसर्ग ऍग्रो टुरिझम, तापोळा
- २.किनारा ऍग्रो टुरिझम आणि रिवर कॅम्प
- ३.मांगल्य कॉटेज आणि ऍग्रो टुरिझम
- ४.शिवसृष्टी ऍग्रो टुरिझम आणि रिव्हर कॅम्प, तापोळा
FAQ
मुंबई ते तापोळा हे अंतर किती? त्यासाठी लागणारा कालावधी किती?
मुंबई ते तापोळा हे अंतर साधारणतः २५९ किलोमीटर असून, यासाठी तुम्हाला सहा तास एवढा कालावधी लागू शकतो.
तापोळा ठिकाणी जेवणाची व खाण्याची सुविधा आहे का?
तापोळामध्ये तुम्हाला खाण्याची व जेवणाची सुविधा उत्तमरित्या उपलब्ध करून देणारे, बरेच हॉटेल्स तुमच्या बजेटनुसार उपलब्ध आहेत. या ठिकाणी असणारे बरेच हॉटेल, ऍग्रो टुरिझम रिसॉर्ट असून, ते तुम्हाला उत्तम प्रकारे राहण्याची व खाण्याची सुविधा पुरवतात.
तापोळा एक्सप्लोर करण्यासाठी साधारणतः किती दिवस लागू शकतात?
तापोळा एक्सप्लोर करण्यासाठी तुम्हाला साधारणतः दोन ते तीन दिवस लागू शकतात.
तापोळ्याला मिनी काश्मीर का म्हणतात ?
महाबळेश्वरपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या तापोळा गावाला कोयना, सोळशी, कांदाटी या नद्यानपासून हा संगम बनलेला असून इथे असणाऱ्या अप्रतीम निसर्ग सौंदर्यामुळे या ठिकाणाला ‘मिनी काश्मीर’ असे म्हणतात. हे ठिकाण फक्त सुंदरच नसून ट्रेकिंग, कॅम्पिंग, आणि राहण्यासाठी सुद्धा उत्कृष्ट आहे.
तापोळा का प्रसिद्ध आहे ?
महाबळेश्वरमधील तापोळा हे हिल स्टेशन निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने खरोखरच अप्रतीम आहे. “मिनी काश्मीर” म्हणून ओळखले जाणारे, तापोळा गाव हे एक सुंदर ठिकाण पर्यटकांना आराम, आराम आणि मनःशांती मिळवण्यासाठी नयनरम्य वातावरण देते तसेच इथे स्ट्रॉबेरी, कलिंगड आणि शेतीची प्रात्यक्षिके, फुलझाडे, फळझाडे पाहता येतातआणि हे ठिकाण ट्रेकिंग, कॅम्पिंग, आणि राहण्यासाठी सुद्धा उत्कृष्ट आहे.
तापोळा जवळ कोणते किल्ले आहेत ?
“वासोटा” आणि “जयगड” सारखे तापोळा तलावाच्या जवळील घनदाट जंगलामध्ये अज्ञात किल्ले देखील आहेत. त्यांनाही बरेच पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात. खरोखरच येथील हवामान आणि शांत वातावरण आपल्या आत्म्याला शांत करते.
तापोळा भेट देण्यासारखे आहे का ?
होय, कारण महाबळेश्वरमधील तापोळा हे हिल स्टेशन निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने खरोखरच अप्रतीम आहे. “मिनी काश्मीर” म्हणून ओळखले जाणारे, तापोळा गाव हे एक सुंदर ठिकाण पर्यटकांना आराम, आराम आणि मनःशांती मिळवण्यासाठी नयनरम्य वातावरण देते तसेच इथे स्ट्रॉबेरी, कलिंगड आणि शेतीची प्रात्यक्षिके, फुलझाडे, फळझाडे पाहता येतातआणि हे ठिकाण ट्रेकिंग, कॅम्पिंग, आणि राहण्यासाठी सुद्धा उत्कृष्ट आहे.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या Tapola Mahabaleshwar information in Marathi या लेखातून आम्ही taआपणास तापोळाची माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही नक्की वाचा, व कमेंट करून आम्हास नक्की कळवा. लेख आवडल्यास शेयर देखील नक्की करा.
धन्यवाद.