बाबा आमटे माहिती मराठी : Baba Amte Information In Marathi

बाबा आमटे माहिती मराठी : Baba Amte Information In Marathi – भारताचे आधुनिक गांधी म्हणून ओळखले जाणारे,  रॅमन मॅगसेसे पुरस्कार, टेम्पलटन पुरस्कारांनी सन्मानित केलेले मुरलीधर देविदास आमटे म्हणजेच पद्मविभूषण बाबा आमटे यांनी कुष्ठरोगग्रस्तांच्या पुनर्वसन व सशक्तीकरणासाठी अनेक प्रयत्न केले. समाजसेवेचा आदर्श ठेवून त्यांनी रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधी यांच्या शिकवणीचे पालन केले. 

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास या महान समाजसेवक बाबा आमटे यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही सविस्तर वाचा.

Table of Contents

बाबा आमटे माहिती मराठी : Baba Amte Information In Marathi

मूळ नाव मुरलीधर देविदास आमटे
टोपणनाव बाबा आमटे
जन्म २६ डिसेंबर १९१४
जन्मस्थळ हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र
आई लक्ष्मीबाई
वडिली देविदास आमटे
पत्नी साधनाताई आमटे
अपत्य डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. विकास आमटे
चळवळभारतीय स्वातंत्र्य चळवळ,भारत जोडो, नर्मदा बचाव आंदोलन
संस्था आनंदवन, लोकबिरादरी प्रकल्प.
पुरस्कार पद्मविभूषण, डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, गांधी शांतता पुरस्कार, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, टेम्पलटन पुरस्कार आणि जमनालाल बजाज पुरस्कार 
मृत्यू०९ फेब्रुवारी २००८
मृत्यूचे ठिकाणआनंदवन

बाबा आमटे यांचा जन्म आणि बालपण

बाबा आमटे या नावाने प्रसिद्ध असलेले मुरलीधर देविदास आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. ते देविदास आणि लक्ष्मीबाई आमटे यांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांचे वडील देवीदास हे स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिश प्रशासनातील एक शक्तिशाली नोकरशहा आणि वर्धा जिल्ह्यातील एक श्रीमंत जमीनदार होते. 

बाबांचे कुटुंब त्या भागातील जमिनीदार कुटुंब होते. श्रीमंती परंपरागतरित्या चालत आलेली होती. सहाजिकच बाबांचे लहानपण अतिशय ऐश्वर्यात गेले. आई-वडील प्रेमाने ‘बाबा’ म्हणायचे आणि नाव त्याच्याशीच चिकटले.

बाबांकडे वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांची स्वतःची बंदूक होती आणि ते हरणांच्या शिकारीला जंगलात जायचे. बाबांना लहानपणी चित्रपट फार आवडायचे.

 Baba Amte Information In Marathi

बाबा आमटे यांचे प्रारंभिक जीवन – Early Life Of Baba Amte In Marathi

लहान वयात बाबा आमटे यांच्याकडे बंदूक होती आणि ते रानडुक्कर आणि हरणांची शिकार करायचे. नंतर, त्याने एक महागडी स्पोर्ट्स कार घेतली, ज्यावर पँथरची कातडी होती. 

इंग्रजी चित्रपट त्यांच्या विशेष आवडीचे. अनेक नियतकालीनांसाठी ते त्याकाळी चित्रपटांचे परीक्षण लिहीत असत. ग्रेटा गार्बो आणि नोर्मा शेअरर यासारख्या कलावंतांशी त्यांचा पत्रव्यवहार होता.

बालपण ऐश्वर्यात गेले असले तरी, त्या वयातही त्यांना एक सामाजिक जाण मनात होती. त्यामुळे खेळण्यात त्यांचे अनेक मित्र खालच्या जातीचे होते. त्यांच्याशी न खेळण्यावर त्यांना बंधने घालण्यात येई. पण ती न मानता बाबा त्यांच्यात मिसळत असत. पुढे बाबांनी कुष्ठरोगांसाठी काम सुरू केले. बाबा लहानपणापासूनच, स्वातंत्र्य विचाराचे होते.

नक्की वाचा👉 छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण माहिती मराठी

बाबा आमटे यांचे शिक्षण – Education Of Baba Amte In Marathi

बाबा आमटे हे अतिशय हुशार विद्यार्थी होते. नागपूर मधून त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यांनी नागपूर विद्यापीठातून इ.स. १९३४ साली बी.ए. व इ.स. १९३६ साली एल्‌एल.बी. ह्या पदव्या संपादन केल्या. आपण स्वतः डॉक्टर बनावे असे बाबांचे विचार होते. परंतु वडिलांच्या आग्रहाखातर ते वकील झाले.

त्यांनी काही काळ वकिलीही केली. इ.स. १९४९-५० या कालावधीत त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसीमुळे फक्त डॉक्टरांना करता येणारा कुष्ठरोग निदानावरील आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला.

बाबा आमटे यांच्यावरील प्रभाव – Influence On Baba Amte

कॉलेजच्या दिवसात बाबांनी अख्या भारताची परिक्रमा केली. रवींद्रनाथ टागोर यांच्या संगीत आणि कवितांनी प्रभावीत झालेल्या बाबांनी, त्यांच्या शांतीनिकेतनलाही भेट दिली. टागोरांचा बाबांवर बराच प्रभाव होता. तितकाच प्रभाव वर्धाजवळच सेवाग्राम येथे आश्रम असलेल्या, महात्मा गांधींचाही होता.

मार्क्स व माओ यांच्या विचारांनी बाबांना आकर्षित होते. पण त्यांच्या विचारांच्या अंमलबजावणीसाठी रशिया व चीन या दोन्ही देशातील क्रांती मात्र त्यांना आवडली नाही. साने गुरुजींचाही बाबांवर बराच भाव पडला होता. अशा वातावरणातूनच, मोठे झालेल्या बाबांनी वरोरा येथे वकिली सुरू केली.

बाबा आमटे समाजकार्याकडे ओढ – Way To Social Work Of Baba Amte In Marathi

बाबांचा घराणं श्रीमंत जे मागू ते देणार. आई-वडील, भावंड, नातेवाईक, मित्र, अशांच्या उबेत बाबा सुखात होते. कॉलेजात नाव मिळवत होते. उंची कपडे, उंची वस्तू, उंची मोटर गाडी, त्यांच्या किमतीला असे डॉक्टर व्हायचा ध्येय मनाशी बाळगलं तरी वडिलांचा ऐकण्याचे दिवस. त्यामुळे वडिलांच्या मनाप्रमाणे ते वकील झाले. वकिली करू लागले, पण तत्वांशी तडजोड किती काळ करता येईल. वकिलीत मन रमेना. बाबांची समाज कार्याकडे ओढ वाढली मैलाच्या पाट्या डोक्यावरून वाहने, संडास साफ करणे, अशीही कामे ते करत.

 Baba Amte Information In Marathi

बाबा आमटे वरोड्यात उपनगराध्यक्षक म्हणून निवड – Baba Amte In Politics

त्याचवेळी आठवड्यात ते आपली शेती बघायचे. शेती तरी किती, तब्बल साडेचारशे एकर. वरोरा जवळ गोराजा येथेही शेती होती. त्यांनी मग शेती करता करता शेतकऱ्यांना संघटित करायला सुरुवात केली. सहकाराचा मूलमंत्र शेतकऱ्यामध्ये रुजवायला सुरुवात केली. याची परिमिती अशी झाली की, बाबा वरोड्यात उपनगराध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. एकीकडे असे सार्वजनिक आयुष्य सुरू असताना बाबांचे क्लब मध्ये जाणे, शिकारीला जाणे, टेनिस आणि हेही सुरू होते.

बाबा आमटे हरिजनांनांसाठी सार्वजनिक विहिरी खुल्या केल्या

पैसा प्रचंड मिळत होते पण एवढे सगळे असूनही बाबा आत मधून तितके सुखी नव्हते. आयुष्याला काही हेतू असावा, असे त्यांना वाटत असे. म्हणून त्यांनी हरिजनांसाठी काम करायला सुरुवात केली. हरिजनांना बऱ्याच लांबून पाणी आणावे लागत असे, बाबांनी उच्चनीच याला विरोध केला व त्यांच्यासाठी सार्वजनिक विहीर खुली केली.

त्यानंतर १९४२ चे भारत छोडो आंदोलन सुरू झाले. आणि बाबा त्यात उतरले. त्यांनी वकिलांना संघटित करून, अटक केल्याने त्यांना सोडविण्यासाठी आंदोलन सुरू केले. त्यापैकी तुरुंगातही गेले, पुढे वकिलीतील उत्साह संपला आणि त्यांना उदास वाटू लागेल. याच काळात त्यांनी केस वाढविले, एखाद्या साधू सारखे दिसू लागले.

बाबा आमटे यांचा विवाह – Baba Amte Marriage

एकदा एका लग्नाला नागपूरला गेले असताना, त्यांनी इंदूला पाहिले. आणि त्यांचे मनोमन प्रेम बसले. पण त्यांच्या साधू सारख्या अवताराकडे बघून साधनाताईंच्या घरच्यांनी, त्यांची खिल्ली उडविली. पण विशेष म्हणजे साधनाताई यांना सुद्धा बाबा आवडले. कालांतराने त्यांचे लग्न झाले.

लग्नानंतरही बाबांना आयुष्याचे ध्येय सापडत नव्हते. त्यांनी एके दिवशी एक कुष्ठरोगी माणूस पाहिला. हात पाय झडलेले होते. भर पावसात भिजत असलेला तो माणूस पाहिला आणि ते भयंकर घाबरले.

पण तोच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. पुन्हा परतून त्यांनी त्या माणसाची सेवा केली. पण तो जगला नाही. बाबांनी अखेर कुष्ठरोगावर उपचार करण्याचे ठरविले. त्यानंतर मग त्यांनी आनंदवन उभारले. तेथे त्यांनी कुष्ठरोग्यांच्या राहण्याची सोय केली. त्यांनी सेवा करण्याचे व्रत आरंभले. त्यासाठी ते कुष्ठ रोगांवरील उपचारही शिकून आले.

आनंदवनात कोणत्याही सोय नव्हत्या. त्यांनी या उजाड परिसराचे नंदनवन केले. आनंदवन स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी तेथे शेती सुरू केली. आनंदवन हे जगभरातील लोकांसाठी, कुष्ठरोगासाठी, एक उदाहरण ठरले.

 Baba Amte Information In Marathi

बाबा आमटे अभय साधक – निर्भय योद्धा

१९४२ ची गोष्ट आहे. यावेळी बाबा आमटे एकदा रेल्वेने वरोराला जात होते. त्यावेळी रेल्वेमध्ये काही इंग्रज अधिकारी एका नवविवाहितेची छेड काढत होते. तिचा नवरा या वर्तनाला घाबरून शौचालयामध्ये लपून बसला. त्यावेळी बाबा आमटे स्वतः पुढे जाऊन, त्यांनी त्या इंग्रज शिपायाला थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बाबा आमटेंना त्या इंग्रज अधिकाऱ्याने हाताबुक्की केली. व नंतर ते बाबांना मारू लागले. ज्यावेळी गाडी वर्धा स्टेशनला थांबली.

तेव्हा बाबांनी तेथेच अडवून ठेवली. त्या ठिकाणी भरपूर लोक जमा झाले. इंग्रज सैनिकांच्या तुकडीचा कमांडिंग ऑफिसर त्या ठिकाणी आला. व या बदल्यात त्यांनी चौकशी करण्याचे वचन दिले. ही गोष्ट ज्यावेळी गांधीजींना समजली, त्यावेळी गांधीजींनी बाबा आमटे यांना “अभय साधक” थोडक्यात “निर्भय योद्धा” असे नाव दिले. कारण बाबा आमटे यांनी त्यावेळी न्यायासाठी आवाज उठवला होता.

बाबा आमटे – माणुसकीचा झरा – Baba Aamte Information In Marathi

माणूसपण हरवत चाललेल्या या काळात माणूस म्हणून माणसाची निस्वार्थीपणे सेवा करणारा, माणुसकीचा अखंड खळाळत वाहणारा झरा म्हणजे मुरलीधर देवीदास आमटे, उर्फ बाबा आमटे. आपल्यासारख्या सामान्य माणसांना दहा जन्मांतही करता येणार नाही एवढे मोठे महान कार्य त्यांनी केले आहे.

समाजाने नाकारलेल्या, शारीरिक आणि मानासिक वेदनेने तळमळणाऱ्या, समाज्याच्या द्वेषाला नेहमी सामोरे जाणाऱ्या  कुष्ठरोग्यांना आश्रय देऊन, त्यांच्यावर उपचार करून, त्यांच्यातील नाहीसा झालेला आत्मविश्वास जागवण्याचे कार्य केले ते बाबा आमटेंनी.

आंधळे, मूकबधिर आणि रोगाने पिडीत असहाय्य लोकांना समाजात कोणीही जगा देत नसे त्यांना कोणाचाही आधार नव्हता. कुष्ठरोगाने पीडित लोकांचे वाईट हाल होत असे, लोक अशा व्यक्तींना जवळ सुद्धा येऊन देत नव्हते. अशा सर्व कुष्ठरोग पीडित लोकांचा आधार बाबा आमटे बनले, या सर्व लोकांना बाबा आमटे यांनी आपलेसे केले आणि त्यांच्या बरोबर आनंदवना मधे राहू लागले.

एक दिवस रस्त्याच्या कडेला असह्य वेदनांनी तळमळत असलेला नासलेल्या शरीराचा तुळशीराम त्यांना दिसला आणि लक्ष्मीच नातं त्यांनी सहज तोडलं. वेळेवर योग्य ते उपचार न झाल्याने तुळशीरामाचा मृत्यू झालेला पाहून, दुःख झालेल्या बाबांनी ताई जवळ आपल्या अस्वस्थतेची दुःखाची कबुली दिली. आणि या दुःखाची तीव्रता कमी कशी करता येईल? वेदनेचा आनंदात कसं रूपांतर होईल ? हा ध्यास या पती-पत्नीला लागला.

पतीने स्वीकारलेल्या व्रतासाठी समर्पण करणारी “साधना आमटे”, सर्वांची ताई झाली. यानंतर बाबांनी तरुणांना मार्ग दाखवला. अंधांसाठी ‘मुक्तांगण’ निर्माण केले, वृद्धांसाठी ‘उत्तरायण’ सुरू केले. अशा रीतीने बाबा सदैव दुसऱ्यांसाठी जगले. जगाला बाबांच्या कार्याचे महत्त्व कळले. मदतीचा ओघ सगळीकडून सतत येत राहिला. स्वकीयांनी आणि परकीयांनी अनेक गौरवपदे बाबांना दिली.

ध्यासाचा श्वास झाला. आणि अशा समर्थ व्यक्तिमत्त्वामुळे निर्माण झालं आनंदवन. आनंद वनाच्या निर्मिती आधी बाबांनी वरोऱ्याला श्रमाश्रमाचा प्रयोग केला. सर्व जाती-धर्मांच्या अशा लोकांनी एकत्र राहायचं, प्रत्येकाने दिवसभर आपापलं काम करायचं, सायंकाळी जमलेल्या मजुरीतून भाजी भाकरी बनवायची, बाबांची ही छोटी वसाहत अनेक वर्ष गुण्यागोविंदाने नांदत होती.

मानवी हक्कांसाठी वकिली – An Advocate For Common People

१९३४ मध्ये ते बी.ए. झाले आणि १९३६ साली त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली. प्रारंभी त्यांनी दुर्ग, मध्य प्रदेश येथे वकिली सुरू केली. नंतर १९४० मध्ये ते वरोरा येथे आले आणि तेथे वकिली सुरू केली.त्याच वेळी कायद्याची प्रॅक्टिस म्हणजे खोटेपणा असेही एक समीकरण होते. खोटेपणा करून पैसे मिळवणे, बाबांना मान्य नव्हते.

बाबांनी गरीब व दीनदुबळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य केले. त्यांच्या मनावर महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या मतांचा फार प्रभाव होता. त्यांनी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता

महात्मा गांधींचा प्रभाव – Influence Of Gandhiji On Baba Amte

गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात राहत असताना गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबांनी स्वातंत्रप्राप्तीच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. इ.स. १९४३ मध्ये वंदेमातरम्‌ची घोषणा दिल्याबद्दल त्यांना २१ दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही कुष्ठरोग निर्मूलनाच्या कार्यासह त्यांनी इतरही राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रश्नांवर विविध मार्गांनी आंदोलने केली

बाबा आमटे यांचे सामाजिक कार्य – Baba Amte Work

बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी चंद्रपूर , महाराष्ट्र येथे आनंदवन नावाचा आश्रम सुरू केला आणि कुष्ठरोग्यांसाठी तसेच समाजातील इतर उपेक्षितांसाठी त्यांनी संपुर्ण आयुष्य खर्ची घातले. याशिवाय वन्य जीवन संरक्षण,नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते.

वन्यजीव संवर्धन  

बाबा आमटे यांनाही वन्यजीव संवर्धनाची आवड होती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी कार्य केले.

कुष्ठरोग्यांसाठी संस्था

इ.स. १९४९ सालामध्ये त्यांनी महारोगी सेवा समितीची स्थापना केली. याशिवाय आमटेंनी कुष्ठरोग्यांसाठी खालील संस्था स्थापन केल्या.

  • आनंदवन – वरोरा (चंद्रपूर)
  • सोमनाथ प्रकल्प – मूल (चंद्रपूर)
  • अशोकवन – नागपूर
  • लोकबिरादरी प्रकल्प – हेमलकसा

मद्यपान विरोधी मोहीम 

मद्यपानाचे कुटुंब आणि समाजावर होणारे घातक परिणाम ओळखून बाबा आमटे यांनी मद्यपानाच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि व्यसनमुक्तीसाठी समाजातील लोकांना मदत तसेच जनजागृती करण्यासाठी दारूविरोधी मोहीम सुरू केली.

बाबा आमटे आनंदवनची निर्मिती – Anandvan Baba Amte

कुष्ठरोगावर उपाय करण्याचे काम ठरवल्यावर, बाबा या रोगाचा अभ्यास करण्यासाठी कलकत्त्याला गेले. कुष्ठरोग कोणत्याही प्राण्याला होत नाही, त्यामुळे यावर संशोधन करणं मोठाच कठीण काम. बाबांनी या प्रयोगासाठी स्वतःच शरीर देऊ केलं. कुष्ठरोगाचे जंतू स्वतःच्या शरीरात टोचून घेण्यासाठी, ते तयार झाले.पुढे १५ ऑगस्ट १९४९ ला बाबांचा दवाखाना आनंदवणी झाडाखाली सुरू झाला. बाबा शिकले होते. वकिली झाले.

मात्र डॉक्टर बरोबर चार-पाच महारोगी ज्यांना समाजाने झेडकारलेलं, ज्यांचे हातापायाची बोटं झडून गेलेली, पण मन जगायची उभारी असलेली, अश्यांसाठी कट्ट्याच्या झोपडीत बाबा आणि ताईंनी स्वप्नांचे महाल बांधले. सुखी समृद्ध जीवनाची सुरुवात केली. आठ-दहा फूट लांबीच्या आकाराची झोपडी, आणि मैल पसरलेला अंगण असा त्यांच वसती स्थान होतं. अंगणात या घरात एके दिवशी सूर्यानं आपल्या किरणांनी प्रवेश केला. बाबांनी आपल्या रानाला वसती स्थानाला नाव तर दिलं होतं. “आनंदवन”.

बाबांनी एवढं उभारल्यानंतर शांत बसले नाही. ऐंशीच्या दशकात संपूर्ण भारत अतिरिकेच्या, कारवायाच्या  धमक्या अश्याला बाबांनी ग्रस्त असताना, बाबांनी भारत जोडण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर, गुजरात पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत, भारत जोडून काढण्याची यात्रा काढली. शांतता निर्माण करणे व पर्यावरण बद्दल जागृतीचे मुख्य हेतू होते. १९९० मध्ये बाबांनी आनंदवन सोडले. आणि ते नर्मदेच्या किनारी येऊन राहायला लागले.

भारत जोडो आंदोलन

आमटे यांनी समाजातील विशेषाधिकारित आणि वंचित घटकांमधील दरी कमी करण्यासाठी ही चळवळ सुरू केली. विविध समुदाय आणि वर्गांमध्ये समजूतदारपणा, सहानुभूती आणि सहकार्य वाढवणे हा या चळवळीचा उद्देश होता.

बाबा आमटे लोक बिरादरी प्रकल्प

भामराईगड तालुक्यातील १९७३ मध्ये आदिवासींच्या विकासासाठी हेमलकसा या ठिकाणी बाबा आमटे यांनी लोक बिरादरी प्रकल्प सुरू केला. गेल्या ३५ वर्षापासून या प्रकल्पाची जबाबदारी बाबांचे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे व सुष्णा डॉक्टर मंदाकिनी आमटे सांभाळत आहेत.

नर्मदा बचाव आंदोलन

आमटे यांनी या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला, ज्याने स्थानिक समुदायांवर मोठ्या धरणांचा पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम हाताळण्याचा प्रयत्न केला. ते विस्थापित लोकांच्या हक्कांसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी एक मुखर वकील होते.

बाबा आमटे आनंदवन माहिती – Baba Amte Anandvan Details In Marathi

इ.स. १९५२ साली वरोड्याजवळ त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. इ.स. २००८ सालापर्यंत १७६ हेक्टर क्षेत्रात पसरलेले आनंदवन ३५०० कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे.

कुष्टरोगाविषयी जी काही माहिती मिळवता येईल ती मिळवून बाबांनी ती आत्मसात केली. या विषयावर जेव्हढी पुस्तकं मिळवून वाचता येईल तेव्हडी वाचली. वरोऱ्याच्या सरकारी रुग्णालयातं कुष्ठरोग्यांसाठी बाबांनी स्वेच्छेनं काम करण्यासं सुरवात केली. दत्तपूर येथे कुष्टरोग्यांसाठी रुग्णालय होत, बाबांना आठवड्यातून दोन दिवस तिथे जाता यावं, अशी विनोबा भावे यांनी व्यवस्था केली.

दत्तपूर मध्ये काही काळ काम केल्यानंतर बाबांनी अत्यंत खडतर परिस्थितीला तोंड देत वरोरा येथे कुष्टरोग्यांसाठी एक दवाखाना सुरुही केला होता. कुष्टरोगपीडित रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी आपण त्याचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे याची बाबांना कल्पना होती. ‘कलकत्ता स्कुल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन’ येथे अभ्यासवर्गात त्यांनी प्रवेश घेतला. लवकरच कुष्ठरोगाच निदान करून रुग्णांवर उपचार कसे करावे, हे बाबांनी शिकून घेतले.

डॉ. धर्मेद्र हे एक विद्वान, नामांकित संशोधक होते. प्राण्यांवर प्रयोगशाळेत चालू असलेले प्रयोग अयशस्वी झाल्याचे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितले. ते जाता जाता सहज म्हणाले या प्रयोगासाठी कोणी माणूस पुढे आला तर बरे होईल, औषधाची चाचणी स्वतः वर करून घेण्यासाठी बाबा तयार झाले. बाबांना मुद्दाम कुष्ठरोगाच्या जिवंत आणि मृत जंतूची लागण करण्यातं आली, पण तरीही बाबांना कुष्टरोग झाला नाही.

१९५० साली बाबा कलकत्ता हून परत आले. याचं सुमारास एका औषधाचा शोध लागला. वरोऱ्याच्या भोवतीच्या पन्नास किलोमीटरच्या भागातील साठ गावांमध्ये दर आठवड्याला जाऊन बाबांनी सुरवातीच्या काळात किमान चार हजार रुग्णांवर उपचार केले. पण रुग्णांवर केवळ उपचार करणे पुरेसे नव्हते, ही गोष्ट बाबांनी जाणली होती. आनंदवन उभे करण्यामागची हीच प्रेरणा होती.

राज्य सरकारनं महारोगी सेवा समितीला वरोडा गावापासून तीन किलोमीटरवर असलेली पन्नास एकर खडकाळ जमीन मंजूर केली. याचं ठिकाणाचं त्यांनी आनंदवन असं नामकरण केलं. ती जागा सुरवातीला झाडाझुडपांनी भरलेली, साप, विंचूचा सुळसुळाट असलेली होती. तिथून सर्वात जवळची विहीर सुद्धा दोन किलोमीटरवर होती.

आपल्या दोन मुलांना घेऊन बाबा आमटे आणि साधनाताई राहायला आले त्यावेळीची संपत्ती म्हणजे एक लंगडी गाय, एक कुत्रा, १४ रुपये रोख आणि सरकार कडून मिळालेली ५० एकर नापीक जमीन. एव्हढया मालमत्तेच्या आधारे आनंदवन उभा करणारा महामानव म्हणजेचं बाबा आमटे. सुरवातीला तिथे सहा कुष्टरोगी होते. आनंदवनातील सुरवातीचे दिवस फारच भयानक होते. आजूबाजूला हिंस्र प्राण्यांचा संचार होता. अनेक वेळा अन्नधान्याचा तुडवडा भासत असें तेव्हा सर्वजण मिळून दिवसातून एकदाच जेवणाचा निर्णय घेत.

आनंदवनातं राहायचं असेल तर विहिरीला पर्याय नाही, पाण्याची कायमस्वरूपी सोय झाली कि अन्नधान्य पिकवता आलं असतं म्हणून बाबा आणि सहा कुष्टरोगी यांनी कुदळ, फावडी, पिकाव यांच्या साहाय्याने विहीर खोदायला सुरवात केली. सहा आठवड्यानंतर, सुमारे चौतीस फूट खोल खोदल्यानंतर तेथे पाणी लागलं.

१९५१ सालच्या जून महिन्यात आचार्य विनोबा भावे यांनी स्वहस्ते आनंदवनाचं औपचारिक उदघाटन केलं. १९५३ साली म्हणजेच अवघ्या दोन वर्षांत आनंदवनातील रुग्णांची संख्या सहावरून साठांवर जाऊन पोहचली होती. सर्वांनी मिळून पिकांची लागवड करण्यासाठी जमीन साफ केली, शारीरिक आव्हानं असून देखील सहा विहिरी खणल्या. पिकांची लागवड केली.

तयार झालेला भाजीपाला बाजारात विक्री साठी जातं होता पण कुष्टरोग्यांनी पिकवलेल्या भाज्यांना स्पर्श केल्यावर आपल्याला ही कुष्टरोग होईल अशी भीती असल्यामुळे भाजीपाला कोणी घेत नसे. पुढे SCI या संस्थेतून पन्नास स्वयंसेवक आनंदवनात येऊन तीन महिने राहिले. ते कुष्टरोग्यांशी मनमोकळे पणाने राहत त्यांच्याशी वागत हे पाहून वरोड्याचे स्थानिक रहिवाशी पण आनंदवानाच्या भेटीला येऊ लागले. तेथील सुंदर आणि स्वच्छ वसाहत पाहून त्यांच्या मनातील भीती व पूर्वग्रह दूर झाले व बाजारात गेलेल्या भाज्याही संपू लागल्या.

आनंदवन ही नव्या माणसाला निर्माण करण्याची प्रयोगशाळा आहे. बाबांच्या मते आनंदवन हे केवळ कुष्टरोगांवर उपचार करणार केंद्र नव्हतं तर माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणार केंद्र होत.

समाजातील कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधिर, आदिवासी अशा विविध वंचित आणि दुर्लक्षित घटकांना माणूसपणाचं सन्मान्य जगणं जगता यावं यासाठी बाबा आमटे यांनी आपलं उभं आयुष्य झिजवलं. या घटकांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं बळ दिलं, दृष्टी दिली आणि संधीही दिली. या अचाट आणि अभूतपूर्व प्रयोगाचं जिवंत आणि चैतन्यमय प्रतीक म्हणजे ‘आनंदवन’

बाबा आमटे परिवार – Baba Amte Family

कुष्ठरुग्णांना सन्मानं जगता यावं यासाठी बाबा आमटेंनी आनंदवनची स्थापना केली. बाबा आमटे यांना साधनाताईनी सुद्धा त्यांच्या सामाजिक कार्यात मनापासून मदत केली. त्यांना विकास आमटे आणि प्रकाश आमटे हे दोन मुलगे असून ते डॉक्टर आहेत, तसेच त्यांची सून डॉक्टर आहेत. गडचिरोलीमधल्या हेमलकसामध्ये बाबांच्याच मार्गदर्शनाने डॉ. प्रकाश आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पही सुरु केला.

तिथल्या आदिवासींचा विकास हे लोकबिरादरीचं प्रमुख वैशिष्ट्य होतं. आमटे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीनेही या कामात स्वतःला तितक्याच तन्मयतेनं झोकून दिलं आहे.

बाबांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची मुलं अनिकेत-दिगंत लोकबिरादरी प्रकल्पाची जबाबदारी सांभाळतात.

बाबा आमटे निधन – Baba Amte Death

अतिशय प्रखर बुद्धिमत्ता, प्रचंड धाडस, कष्ट, संवेदनशीलता, शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवलेले साध्य पूर्ण करण्याचा दृढ निश्चय, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य, प्रेरणा सातत्य, इत्यादी सर्व गुणांनी परिपूर्ण असणारे बाबा आमटे यांनी सर्व प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले. बाबांनी समाजकार्यामध्ये अतिशय मोठे व अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यांनी कुष्ठरोगांसाठी बांधलेले आनंदवन अजूनही त्यांच्या कार्याची स्मृती उमटवते.

अशा महान समाज सुधारकाचे रक्ताच्या कर्करोगामुळे ९ फेब्रुवारी २००८ रोजी त्यांच्या निवासस्थानी अर्थात वरोडा या ठिकाणी निधन झाले.

बाबा आमटे यांचा वारसा – Baba Amte’s legacy in Marathi

बाबा आमटे यांचा वारसा त्यांच्या हयातीत, सीमा आणि पिढ्यांच्या पलीकडे आहे. त्यांचे जीवन, कार्य आणि तत्त्वे जगभरातील लाखो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून काम करत आहेत.

बाबा आमटे यांच्या वारशाचा सर्वात मूर्त पैलू म्हणजे आनंदवन. आज, आनंदवन एक स्वावलंबी समुदाय म्हणून भरभराट करत आहे, जो उपेक्षितांना सामावून घेतो, बाबा आमटे यांच्या दृष्टीला खरा असतो. शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यावरण संवर्धन आणि बरेच काही यावर लक्ष केंद्रित करणार्‍या विविध उपक्रमांचा समावेश करून संस्था विस्तारत आहे.

‘आनंदवन म्हणजे कुष्ठ सेवाकार्य’ एवढीच बहुतेकांची धारणा आहे. मात्र तसे नाही. सुमारे ६५ वर्षात आनंदवनात विविध कामे झालीत. शेती, जलसंधारण, लघुउद्योग,पर्यावरण संवर्धन आदीवरही येथे काम सुरू असते. आनंदवन, सोमनाथ, हेमलकसा येथे हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. बाबा आमटे, साधनाताई आमटे यांच्यानंतर डॉ. विकास, डॉ. भारती, डॉ. प्रकाश, डॉ. मंदा आदींनी त्यांचे कार्य आजही अव्याहतपणे सुरू ठेवले आहे.

भौतिक संस्थांच्या पलीकडे, बाबा आमटे यांचे सहानुभूती, सन्मान आणि स्वावलंबनाचे तत्त्वज्ञान जगभरातील सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांना मार्गदर्शन करत आहे. उपेक्षितांसाठी स्वावलंबी समुदायाचे त्यांचे यशस्वी मॉडेल जगाच्या विविध भागांमध्ये प्रतिरूपित केले गेले आहे.

शेवटी, बाबा आमटे यांच्या जीवनाचा आणि तत्त्वांचा चित्रपट, पुस्तके आणि गाण्यांसह लोकप्रिय संस्कृतीवर खोलवर परिणाम झाला आहे, ज्यामुळे त्यांचा संदेश व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल आणि भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल.

बाबा आमटे

बाबा आमटे यांचे अमूल्य प्रेरणादायी विचार – Baba Amte Thoughts In Marathi

  • मी माझा आत्मा शोधला, पण माझा आत्मा मी पाहू शकलो नाही. मी माझ्या देवाचा शोध घेतला, पण माझ्या देवाने मला दूर केले. आणि मग मी माझ्या बहिणी आणि माझ्या भावांना शोधले, आणि त्यांच्यामध्ये मला तिघेही सापडले.
  • आनंद ही एक सतत सर्जनशील क्रियाकलाप आहे. जी आपल्या अनुभवाची कल्पनाशक्तीने तुलना करणाऱ्या गोष्टींची करते आणि त्याद्वारे आनंदी आणि कृतज्ञता वाटते.
  • मी कुष्ठरोगांचे काम कोणाला मदत करण्यासाठी नाही, तर माझ्या आयुष्यातील त्या भीतीवर मात करण्यासाठी हाती घेतले.ते इतरांसाठी चांगले कार्य होते हे एक उपउत्पादन होते. पण खरं म्हणजे भीतीवर मात करण्यासाठी मी हे केल.
  • जर तुमची स्वप्न पूर्ण होत असतील तर प्रगती थांबते.
  • आनंद हा एक सतत सर्जनशील क्रियाकलाप आहे.
  • एकदा तुम्ही तुमच्या नशिबाचा कक्षेत आलात की वजनहिंता हा एकमेव परिणाम आहे.
  • आनंद हा कुष्ठरोगापेक्षा संसर्गजन्य आहे.
  • आनंद वाटला नाही तर तो मरतो.
  • मला महान नेता व्हायचे नाही, मला एक असा माणूस व्हायचे आहे. जो थोडेसे तेलाचा डब्बा घेऊन फिरतो. आणि जेव्हा तो बिघाड पाहतो, तेव्हा त्याला मदत करतो. माझ्या दृष्टीने असे करणारा मनुष्य भगव्या रंगाच्या वस्त्रातील कोणत्याही पवित्र पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहे. तेल असलेला मेकॅनिक करू शकतो. हा माझा जीवनातील आदर्श आहे.
  • भविष्य हे असामान्य दृढनिश्चयासह सामान्य माणसाचे आहे.

बाबा आमटे साहित्य – Baba Amte Sahitya

बाबा आमटे यांनी खालील पुस्तके लिहिली आहेत

  • ‘ज्वाला आणि फुले’ – कवितासंग्रह
  • ‘उज्ज्वल उद्यासाठी’ (काव्य)
  • ‘माती जागवील त्याला मत’

बाबा आमटे यांच्यावरील पुस्तके – Baba Amte Books

  • मला (न) कळलेले बाबा आमटे (लेखक : विलास मनोहर)
  • आनंदवन प्रयोगवन लेखक डॉ. विकास आमटे
  • बाबा आमटे (चरित्र, मूळ लेखिका तारा धर्माधिकारी; हिंदी अनुवाद डॉ. हेमा जावडेकर)
  • बाबा आमटे (चरित्र, लेखक भ.ग. बापट)
  • बाबा आमटे यांची गीते : आकलन आणि आस्वाद (बाळू दुगडूमवार). या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे (२०१७)
  • बाबा आमटे यांच्या जीवनावर वसंत कानेटकरांनी ‘वादळ माणसाळतंय’ नावाचे नाटक लिहिले आहे.
  • बाबा आमटे – व्यक्तित्व, कवित्व आणि कर्तृत्व (लेखक : बाळू दुगडूमवार)

बाबा आमटे यांच्या कविता – Baba Amte Poems

बाबा एक असामान्य अवलिया व्यक्ती ,तशाच त्यांच्या कविता वेगळ्याच ,व्यक्ति वेल्हाळ , मुक्त शैलीतल्या, वेदना प्यायलेल्या अनुभूतीतून सर्जित झालेल्या आहेत. ज्वाला आणि फुले या पुस्तकात महान सामाजिक कार्यकर्ते ,आनंदवनचे निर्माते बाबा आमटे यांच्या अनुभूतीतून उतरलेल्या अतिशय हृदयस्पर्शी कविता आहेत.

बाबा आमटे पुरस्कार व गौरव – Awards Of Baba Amte

बाबांना त्यांच्या समाजसेवेसाठी भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ते खालील प्रमाणे –

बाबा आमटे आंतरराष्ट्रीय पुरस्कार व गौरव – International Awards Of Baba Amte

  • सामाजिक सुधारणांसाठीचा डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार- १९९९
  • रॅमन मॅगसेसे पुरस्कार
  • डेमियन डट्टन पुरस्कार, अमेरिका – १९८३
  • संयुक्त राष्ट्रे यांचा मानवी हक्क पुरस्कार – १९९८
  • आंतरराष्ट्रीय जिराफे पुरस्कार, अमेरिका – १९८९
  • टेंपल्टन बहुमान, अमेरिका, – १९९०
  • पर्यावरण विषयक कामासाठी संयुक्त राष्ट्रे यांचा रोल ऑफ ऑनर,- १९९१
  • पर्यावरणासंबंधीचा ग्लोबल ५०० पुरस्कार – १९९१
  • पावलोस मार ग्रेगोरियस पुरस्कार (४ डिसेंबर २००४)
  • राईट लाइव्हलीहुड ॲवॉर्ड, स्वीडन – १९९१.
  • गूगल ने २६ डिसेंबर २०१८ रोजी बाबा आमटे यांच्यावरचे डूडल दाखवून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

बाबा आमटे भारतीय पुरस्कार व गौरव – National Awards Of Baba Amte

  • पद्मश्री – १९७१
  • पद्मविभूषण – १९८६
  • अपंग कल्याण पुरस्कार – १९८६
  • महाराष्ट्र सरकारचा सावित्रीबाई फुलॆ पुरस्कार – १९९८
  • गांधी शांतता पुरस्कार – १९९९
  • महाराष्ट्र भूषण पुरस्कार – २००४
  • मध्य प्रदेश सरकारचा इंदिरा गांधी पुरस्कार – १९८५
  • पहिला जी. डी. बिर्ला पुरस्कार – १९८६
  • महाराष्ट्र सरकारचा दलित मित्र पुरस्कार – १९७४
  • राष्ट्रीय भूषण पुरस्कार – १९७८
  • जमनालाल बजाज पुरस्कार – १९७९
  • एन डी दिवाण पुरस्कार – १९८०
  • राजा राम मोहनराय पुरस्कार – १९८७
  • भरतवास पुरस्कार – २००८
  • जी डी बिर्ला अंतरराष्ट्रीय पुरस्कार – १९८८
  • महाराष्ट्र सरकारचा आदिवासी सेवक पुरस्कार – १९९१
  • कुमार गंधर्व पुरस्कार – १९९८
  • जस्टिस के एस हेगडे पुरस्कार, कर्नाटक – १९९८
  • डी.लिट – नागपूर विद्यापीठ – १९८०, पुणे विद्यापीठ, – १९८५-८६
  • देशिकोत्तम (सन्मानीय डॉक्टरेट) – १९८८ -विश्वभारती, शांतिनिकेतन , पश्चिम बंगाल

बाबा आमटे यांच्या बद्दल १० ओळी – 10 Lines On Baba Amte

  • बाबा आमटे हे एक समाजसेवक होते.
  • बाबा आमटे यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ साली  हिंगणघाट वर्धा जिल्ह्यात झाला.
  • बाबा आमटे यांचे  मूळ नाव मुरलीधर देविदास आमटे असे होते.
  • बाबांनी प्रथम वकिलीचे शिक्षण घेतले नंतर नेहरूंच्या सांगण्यावरून कुष्ठरोग निदानावरील अभ्यासक्रम पूर्ण केला.
  • कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्प चंद्रपूर येथे अशोक वन नागपूर येथे तसेच बिशदरी प्रकल्प हेमलकसा येथे सुरू केले.
  • वन्यजीवन संरक्षण नर्मदा बचाव आंदोलन अशा सामाजिक चळवळीमध्ये बाबा आमटे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
  • बाबा आमटे यांनी “ज्वाला” आणि “फुले उज्वल उदयासाठी”, “माती जागवली त्याला मत” ही पुस्तके लिहिली आहे.
  • बाबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार, रॅमन मॅगसेस पुरस्कार, पद्मश्री, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण असे पुरस्कार प्राप्त आहेत.
  • बाबा आमटे यांना आधुनिक भारताचे संत या नावाने गौरवले जाते.
  • ९ फेब्रुवारी २००८ साली बाबा आमटे यांचा मृत्यू झाला.

बाबा आमटे व्हिडिओ – बाबा आमटे यांची माहिती मराठी

FAQ

बाबा आमटे यांच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे?

बाबांचे मूळ नाव मुरलीधर देविदास आमटे. यांचा जन्म २६ डिसेंबर १९१४ रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. बाबांचे कुटुंब त्या भागातील जमिनीदार कुटुंब होते. श्रीमंती परंपरागत रित्या चालत असलेली होती. सहाजिकच बाबांचे लहानपण ही अतिशय ऐश्वर्यात गेले. बाबांना लहानपणी चित्रपट फार आवडायचे. पुढे बाबांनी कुष्ठरोगांसाठी काम सुरू केले.

बाबा आमटे यांचा मृत्यू कधी झाला?

बाबांनी समाजकार्यामध्ये अतिशय मोठे व अमूल्य असे योगदान दिले आहे. त्यांनी कुष्ठरोगांसाठी बांधलेले आनंदवन अजूनही त्यांच्या कार्याची स्मृती उमटवते. अशा महान समाज सुधारकाचे रक्ताच्या कर्करोगामुळे ९ फेब्रुवारी २००८ रोजी त्यांच्या निवासस्थानी अर्थात वरोडा या ठिकाणी निधन झाले.

बाबा आमटे यांचे भारतीय समाजासाठी काय योगदान आहे?

अतिशय प्रखर बुद्धिमत्ता, प्रचंड धाडस, कष्ट, संवेदनशीलता, शारीरिक व मानसिक तयारी, कामाचा झपाटा, ठरवलेले साध्य पूर्ण करण्याचा दृढ निश्चय, संघटन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य, प्रेरणा सातत्य, इत्यादी. सर्व गुणांनी परिपूर्ण असणारे बाबा आमटे. यांनी सर्व प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केलेत.


बाबा आमटे यांचा जन्म कधी झाला?

मुरलीधर देवीदास ऊर्फ बाबा आमटेंचा जन्म महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट येथील जमीनदार कुटुंबात डिसेंबर २६, इ. स. १९१४ रोजी झाला.


बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय?

बाबा आमटे यांचे पूर्ण नाव मुरलीधर देविदास आमटे असे होते

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास थोर समाजसुधारक बाबा आमटे यांच्या बद्दल Baba Amte Information In Marathi या लेखातून माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा .

Leave a comment