तुकडोजी महाराज माहिती मराठी : Tukdoji Maharaj Information In Marathi

तुकडोजी महाराज माहिती मराठी : Rashtrasant Tukdoji Maharaj Information In Marathi – एक आधुनिक संत, भक्त, कवी व समाज सुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जातीभेद आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात आणि जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.

तुकडोजी महाराजांची क्रियाशीलता आणि वैचारिकता एवढी प्रभावशाली होती की, त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत या उपाधीने संबंधित केले होते. भारत खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्राम विकास झाला की राष्ट्रविकास होईल, अशी त्यांची श्रद्धा व विचारसरणी होती. केवळ चौथी शिकलेल्या राष्ट्रसंतांनी सुमारे ५० ग्रंथांची निर्मिती केली. ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांनी समाजाची व राष्ट्राची सेवा केली.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल महिती दिली आहे. हा लेख तुम्ही सविस्तर वाचा.

Table of Contents

तुकडोजी महाराज माहिती मराठी : Tukdoji Maharaj Information In Marathi

पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे
ओळख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
जन्मतारीख ३० एप्रिल १९०९
जन्मस्थळ अमरावती
आईचे नाव मंजुळाबाई
वडिलांचे नाव बंडोपंत
गुरूआडकोजी महाराज
कार्यअंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन
साहित्य ग्रामगीता, गीता प्रसाद, अभंग, 50 ग्रंथ
आश्रम सन १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली
मृत्यू ११ ऑक्टोबर १९६८

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज परिचय व जीवन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे. महाराजांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी यावली, जिल्हा अमरावती येथे झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वडिलांचे नाव बंडोपंत व यांच्या आईचे नाव मंजुळाबाई होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे ब्रह्मभट वंशातले होते. इसवी सन १९२५ च्या दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आनंद अमृत ग्रंथाची रचना केली.

Rashtrasant tukdoji maharaj

तुकडोजी महाराजांना राष्ट्रासंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदांच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनाच्या आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मआणि मनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषामध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ मध्ये गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.

तुकडोजी महाराज व त्यांचे गुरु आडकोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आईने मंजुळाबाईंनी, तुकडोजी महाराज लहान असतानाच त्यांच्या आजोळी वरखेडला नेले व तिकडे आडकोजी महाराजांच्या सानिध्यात त्यांना ठेवले. आडकोजी महाराजांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपले गुरु मानले व अकडोजी महाराजांनी माणिकचे नाव तुकड्या असे ठेवले. तुकडोजी महाराज आधुनिक काळातील महासंत होते. तुकडोजी महाराज यांचा विदर्भात विशेष संचार असला तरी महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर हिंदू, अध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे, जपानसारख्या देशात जाऊन, त्यांनी सर्वांना बंधुत्वाचा संदेश दिला.

तुकडोजी महाराज यांना देवबाबा म्हणून मिळाली प्रसिद्धी

तुकडोजी महाराज चौदा वर्षाचे असतानाच त्यांनी घर सोडले व ते रामटेकच्या जंगलात भटकू लागले. तेथे कंदमूळावर त्यांनी उपजीविका केली. त्यांनी हठयोगाचा अभ्यास केला. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासींचे पाडे व भटक्यांची पाले धुंडाळत ते फिरले व तेथील गरीब माणसांमध्ये रमले.

खेळ, शर्यतीमध्ये, पोहणे, धावणे, घोड्यावर, बैलगाड्यावर नियंत्रण साधने, गाणे रचणे, वाद्य वाजवणे, मोठ्या ढोलाच्या तालावर नाचणे अशी विविध कौशल्ये त्यानी आत्मसात केली. हिंदू, उर्दू व मराठीतील स्वतःचीच काव्ये ते खंजिरीच्या तालावर बेभान होऊन गात असत. ऐकणारे तल्लीन होऊन तासनतास डोलत असत त्यांच्या या आगळ्या गुणसंपदेमुळे लोक त्यांना “देवबाबा” म्हणू लागले.

संत तुकडोजी महाराज कार्य

मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना 

नागपूरपासून १२० किमी अंतरावर असलेल्या मोझरी नावाच्या गावात त्यांनी गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली, जिथे त्यांच्या अनुयायांच्या सक्रिय सहभागाने संरचनात्मक कार्यक्रम राबवले जात होते. आश्रमाच्या प्रवेशद्वारावर त्यांची तत्त्वे खालीलप्रमाणे कोरलेली आहेत – “या मंदिराचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत”, “येथे प्रत्येक धर्म आणि पंथाचे स्वागत आहे”, “देश-विदेशातील प्रत्येक व्यक्तीचे येथे स्वागत आहे”.

भारतातील खेड्याच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात याविषयी उपाययोजनानेना सुचवली. या उपायोजना त्यांच्या काळाला तर खूप कारक ठरल्या.

भारत छोड आंदोलनात सहभाग

सन १९४२ च्या भारत छोड आंदोलनादरम्यान, काही काळ त्यांना अटक झाली होती. “आते है नाथ हमारे” त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्मृतिदान ठरले होते. भारत खेड्याचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की, राष्ट्राचा विकास होईल. अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल ? याविषयी त्यांनी चिंता केली. ग्रामउन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता.

​परदेशवारी आणि राष्ट्रकार्य

विश्वधर्म व विश्वशांती परिषदेसाठी सन १९५५ मध्ये तुकडोजी महाराज जपानला गेले. त्यांच्या भजनाने अनेक पाश्चात्य व पौर्वात्य विद्वान अत्यंत मोहीत झाले. सर्व धर्म, पंथ, जाती यांच्या पलीकडे असलेल्या ईश्वराचे स्वरूप ते आपल्या भजनांतून प्रकट करत असत. तुकडोजी महाराज विश्व हिंदु परिषदेचे संस्थापक उपाध्यक्ष होते.

स्वातंत्र्यानंतरही राष्ट्रहितासाठी त्यांनी अनेक स्तरावर कार्य केले. बंगाल येथील दुष्काळ, चीन युद्ध, पाकिस्तान युद्ध, कोयना भूकंपामुळे उडालेला हाहाःकार या घटनांमध्ये प्रभावित ठिकाणी रचनात्मक मदत कार्याकरिता या सगळ्या मोहिमांवर महाराज स्वतः गेले होते.

हरिजनांसाठी मंदिरे खुली केली

गावागावासी जागवा | भेदभाव समूळ मितवा | उजळा ग्रामोन्नतीचा दिवा | तुकड्या म्हणे |

गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजीच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांचे जीवन कार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता हे जणु तुकडोजी महाराजांच्या वांग्मय सेवेची कृतीच होय. स्वतःला ते तुकड्यादास म्हणत. कारण भजन म्हणताना, ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणीच जीवन काढले, याची त्यांना जाणीव होती.

स्वयंपूर्ण खेडेगाव साठी प्रयत्न

खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचवली होती. ती अतिशय प्रमाणकारक ठरली, ग्रामीण सुरक्षित व्हावे. सुसंस्कृत व्हावे. ग्राम उद्योग संपन्न व्हावेत. गावाने देशाच्या गरजा भागव्यात. ग्राम उद्योगांना प्रोत्साहन मिळावे. प्रचारांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे. असे त्यांचा प्रयत्न होता. त्यांचे प्रतिबिंब ग्रामगीतेच उमटले आहे.

स्वातंत्र्य लढ्यात सक्रीय सहभाग

१९३० साली महाराजांनी व्यक्तिगत सत्याग्रह केला. ‘भारत छोडो’ आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला. तुकडोजी महाराजांच्या कार्याचा काळ हा स्वातंत्र्य लढ्याचा होता. ब्रिटिशांच्या अमानवीय मुस्कटदाबीचा त्यांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे तुकडोजी महाराजांना अटक करून नागपूर व रायपूर येथील कारागृहात कैदी म्हणून ठेवण्यात आले होते.

काळाची पावले ओळखून केवळ समाजाला प्रबोधन न करता आपले जीवन राष्ट्रकार्यात समर्पित केले. १९३६ साली महात्मा गांधीजींच्या सहवासात राजेंद्र बाबू, पं. जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद आदी राष्ट्रनेत्यांशी त्यांचा परिचय झाला. भारत सेवक समाजात त्यांनी गुलझारीलाल नंदाजींबरोबर काम केले.

तुकडोजी महाराज हे विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक उपाध्यक्ष

तुकडोजी महाराज हे विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक उपाध्यक्ष होते. बंगालचा दुष्काळ (1945), चीन युद्ध (1962), आणि पाकिस्तानचे आक्रमण (1965), कोयना भूकंप (1962) ची नासधूस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा प्रभाव अशा राष्ट्रीय कारणांसाठी त्यांनी अनेक आघाड्यांवर काम केले. आणि पद्धतशीर विधायक मदत कार्य. मदत करण्यासाठी या मिशनवर गेले.

आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही ते सहभागी झाले होते. आणि 1955 मध्ये जपानमध्ये धर्म आणि जागतिक शांततेच्या जागतिक परिषदेतही भाग घेतला. या प्रवासात त्यांनी मारियन जपान प्रवासाचे पुस्तक लिहिले.

तुकडोजी महाराजांची कथा – Tukadoji Maharaj Story

सुमारे ९० वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. जयपुरकडचा एक राजा चंद्रपूर जवळचा ताडोबा अरण्यात शिकारीसाठी आला होता. तेथील एका गुहेच्या तोंडाशी एक मुलगा ध्यान लावून बसला होता, राजा त्या मुलाला जंगलातील प्राण्यांविषयी विचारू लागला, तो चुणचुणीत मुलगा राजाला म्हणाला, “हे सुखी जीव आनंदाने जंगलात नांदत आहे, तुम्ही त्यांना का हो ठार करता ?

त्यावर राजा गप्प झाला. तो विचार करू लागला. त्याला स्वतःची चूक कळू लागली. त्याने शपथ घेतली, यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही. आपण शिकार करतो, याचा अभिमान बाळगणाऱ्या राजाला ज्या मुलाने अहिंसाची शपथ घ्यायला लावली, त्या मुलाचे नाव होते माणिक. पुढे तो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या नावाने प्रसिद्ध झाला.

तुकडोजी महाराज tukadoji Maharaj Information In Marathi

संत तुकडोजी महाराज यांनी जनजागृती कशी केली ?

देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा याविषयी त्यांनी प्रयत्न केले. सर्वधर्मसभा हे या राष्ट्रसंतांच्या विचार विश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक सर्वधर्मीय प्रार्थनेचा पुरस्कार केला. तुकडोजी महाराज विवेकनिष्ठ जीवन दृष्टीतून, एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धार्मिक अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून, अध्यात्मिक सामाजिक राष्ट्रीय प्रबोधन केले.

स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून, त्यांना कारावास भोगावा लागला. त्यांनी गुरुकुंज आश्रमाच्या शाखा स्थापन करून शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्याची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंज संबंधीत असलेले सर्व निष्ठावंत कार्यकर्ते, आजही त्यांचे हे कार्य अखंड चालवित आहेत.

संत तुकडोजी महाराज – एक थोर समाजसुधारक

भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की, राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले. 

आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली.

संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत का म्हणतात ?

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संत तुकडोजींनी ग्रामीण पुनर्रचनेवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी ‘अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ’ ची स्थापना केली आणि एकात्मिक ग्रामीण विकासासाठी अनेक कार्यक्रम विकसित केले. त्यांचा हा उपक्रम इतका प्रभावी होता की, त्यावेळी भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना ‘राष्ट्रसंत’ ही पदवी देऊन गौरवले.

संत तुकडोजी महाराज यांची साहित्यरचना – Tukadoji Maharaj Sahitya

  • संत तुकडोजी महाराजांनी विविध साहित्यरचना केली आहे. त्यांनी “ग्रामगीता” हा त्यांच्या ग्रामविकासावरील ४१  अध्याय व ४६७५ ओव्या असलेला काव्यसंग्रह अतिशय लोकप्रसिद्ध आहे. हा ग्रंथ मराठी संस्कृतीला तुकडोजींनी दिलेला एक अमूल्य ठेवा आहे.
  • तसेच लहरीकी बरखा ही त्यांची हिंदीमधील प्रसिद्ध पुस्तके, तसे खंजिरी भजन या भजनांचा वापर करून तुकडोजी महाराजांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले. व त्यामुळेच देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना “राष्ट्रसंत” ही पदवी बहाल केली.
  • तुकडोजींनी “आदेश रचना” हा ग्रंथ लिहिला. त्याचबरोबर त्यांनी तुरुंगाच्या काळात तुरुंगामध्ये “सुविचार स्मरणी” हा ग्रंथ लिहिला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अभंग

या झोपडीत माझ्या

किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या ॥धृ॥
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ॥१॥
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥३॥
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भिती नं यावयाला, या झोपडीत माझ्या ॥४॥
महाली मऊ बिछाने, कंदील शामियाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥५॥
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या ॥६॥
पाहून सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ॥७॥

हर देश में तू …

हर देश में तू, हर भेष में तू तेरे नाम अनेक, तू एकही है ।
तेरी रंगभुमि यह विश्वंभरा, सब खेलमें, मेलमें तु ही तो है ॥धृ॥
सागर से उठा बादल बनके, बादल से फ़टा जल हो कर के।
फ़िर नहर बनी नदियॉं गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एकही है ॥१॥
चींटी से भी अणु-परमाणुबना, सब जीव जगत् का रूप लिया।
कहिं पर्वत वृक्ष विशाल बना, सौंदर्य तेरा,तू एकही है २॥
यह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेवकी पूर्ण दया ।
तुकड्या कहे कोई न और दिखा, बस! मै और तू सब एकही है ॥३॥

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा मृत्यू

शेवटच्या दिवसात तुकडोजी महाराजांना कॅन्सर या असाध्य आजाराने ग्रासले होते, खूप प्रयत्न करूनही त्यांची त्या आजारापासून सुटका होऊ शकली नाही आणि तुकडोजी महाराजांनी 11 ऑक्टोबर 1968 रोजी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रेरणादायी विचार

  • सृष्टीतील प्रत्येक वस्तू, प्रत्येक कणात, सतत कार्य प्रवृत्ती खेळत आहे. जो निष्क्रिय होऊन फिरेल, तो देवाचा आणि समाजाचा गुन्हेगार ठरला जाईल. असा सृष्टीचा कायदा आहे.
  • एकांत हा माणसाचे विचाराला पुष्टी देणारा, भावी परिस्थितीचे स्वप्न दाखविणारा, असतो. माणूस जन्माला येणे आणि माणूस बनणे, या दोन गोष्टी अत्यंत भिन्न आहेत.
  • काळ बदलला की शिक्षणाच्या पद्धती ही बदलतात. आणि आजच्या काळाची मागणी जरा वेगळी आहे. आणि ती म्हणजे प्रत्येकाने आपले काम इमानदारीने करावे, सर्वांनी आपल्या मर्यादांचे भान ठेवावे, आपल्यापुढे जे कर्तव्य असेल त्याच्या सर्व बाजू व्यवस्थितपणे समजून घेणे, याचा अर्थ ब्रह्मज्ञान.
  • काम करत आहे, ते अधिक सुंदर करणे, अधिक व्यवस्थित करणे, हाच माझा धर्म आहे. तीच माझी पूजा आहे. तीच माझी साधना आहे. जगात कोणतेच काम कनिष्ठ प्रतीचे नाही. सर्व कामे समान दर्जाचे आहेत. श्रेष्ठ आहेत.
  • कोणताही कामगार असो, जोपर्यंत तो स्वतःला देशाचे यंत्रणेतला एक भाग मानणार नाही, तोपर्यंत तो काही काम करू शकणार नाही. असा माझा स्पष्ट समज आहे.
  • माझी पाप आणि पुण्याची अत्यंत साधी सोपी व्याख्या आहे, परोपकार म्हणजे पुण्य, आणि परपीडा म्हणजे पाप जाणून बुजून, दुसऱ्याला त्रास देणे, त्याचे नाव पाप. आणि दुसऱ्याचे भले करणे, लोकांच्या भल्यासाठी झटणे त्याचे नाव पुण्य. याचा अर्थ अकारण आपल्याला छळणारे जे कोणी असतील, ते पापी आहेत. आणि अशा पापी मनुष्यांचा समाचार घेणे हे प्रत्येक सज्जन माणसाचे कर्तव्य आहे. अशा माणसांशी व्यवहार सावधगिरीचा असला पाहिजे.
  • स्वतंत्र देश प्रत्येकाच्या विकासाचे रस्ते मोकळे करत असतो, आपण सुद्धा स्वतंत्र देशाचे नागरिक आहात. देशाच्या उत्कर्षात आपला भाग आहे. म्हणून आपली ही जबाबदारी आपण अधिक सावधगिरीने पार पाडली पाहिजे.
  • देशाच्या भवितव्यावर ज्याची श्रद्धा असेल, ते फार मोठे काम करू शकतील. आपण अशा श्रद्धावानांपैकी एक बनावे, अशी माझी इच्छा आहे. येथील प्रत्येक नागरिक स्वतःला भारतीय मानतो, आपले पहिले कर्तव्य हेच आहे.
  • भारतीय स्वातंत्र्याला थोडासुद्धा आघात पोहोचू शकणार नाही. हे आपली धारणा असावी, जो कोणी या देशाची बेईमानी करेल, त्याची येथे केव्हाही गय केली जाणार नाही. अशा लोकांच्या विरोधात सर्व शक्तीनिशी आपण उभे राहिले पाहिजे. देश आधी. मग धर्म. देश जगला तर, धर्म जगतो. आणि धर्म जगला, तर देवता जगत असते.
  • माणसाला सृष्टीतला सर्वात श्रेष्ठ म्हणून देवाने निर्माण केला आहे. त्यांनी समाजासाठी, देशासाठी, धर्मासाठी, जगावे. ही त्याच्यामागे देवाची इच्छा आहे. ते तसे जीवन जगत नसेल, केवळ स्वतःचा स्वार्थ पाहत असेल, तर तो किडा मुंगींचे जीवन जगत आहे, असे मानले पाहिजे.
  • जेव्हा माणूस देशाचे, धर्माचे, समाजाचे, भान ठेवून जगेल. तेव्हाच तो महान होईल. मी देवतांना केवळ पूजेची स्थाने मानत नाही, त्यांच्यापासून माणसाला अन्याय विरुद्ध लढण्याचे सामर्थ्य मिळाले, म्हणून त्यांचे मला महत्त्व आहे.
  • आपल्या नेहमीचा धंदा इमानदारीने करत राहणे, ही सुद्धा अन्याय विरुद्ध लढाईचा आहे. आज प्रत्येक क्षेत्रातला प्रामाणिकपणा कमी झाला आहे. देश ताट उभा राहत असतो, माणसाच्या प्रामाणिकपणावर, विविधतेवर, म्हणून आपण प्रामाणिकपणाची वेळची आराधना केली पाहिजे.
  • सैनिक रणांगणावर प्रामाणिकपणाने लढतील, शेतकरी प्रामाणिकपणाने शेतातून पीक काढतील, कामगार कारखाने चालवतील, साधू पंडित लोकांच्या जागृती निर्माण करतील, सर्वांच्या प्रयत्नांची देशाला गरज आहे. ती वृत्ती म्हणजेच देशभक्ती.
  • सावता माळी हा शेती द्वारे देवाची पूजा करत होता, गोरा कुंभार मडकी घडवून विठ्ठलाला प्रसन्न करत होता, याचा अर्थ आपले काम इमानदारीने करणे, हीच खरी देवपूजा होय.
  • जीवनातले प्रत्येक क्षेत्र हे रणांगण आहे. या क्षेत्रात विजय मिळवण्यासाठी, जे धडपडतात ते वीर आहेत. आणि ज्या विजयाच्या आड येतात, ते आपले शत्रू आहेत. आक्रमणाचा प्रतिकार हिंसात्मक मार्गाने केला तर, ती हिंसा होऊ शकत नाही.
  • आमचा प्रत्येक जवान हा अर्जुनासारखा शस्त्रविद्या पारंगत आणि विवेकशील वीर असेल, आणि देशाचे, धर्माचे, नीतीचे, रक्षण करणे ही त्याची जबाबदारी असेल, जोपर्यंत माणसाच्या मनात प्रेमाबरोबर द्वेष आहे, तोपर्यंत युद्ध अपरिहार्य आहे. असा माझा समज आहे. शूरवीरांची शूरता ही उत्तम शस्त्रास्त्रावर अवलंबून असते.
  • तुम्ही तोफ आणि रंगारी घेऊन आमच्यावर आक्रमण करावे, आणि आम्ही हातात खलबत्ते घेऊन, त्यांचा प्रतिकार करावा, असे कोणी म्हणेल तर, ते हास्यास्पद आणि अतिरेकीपणाचे होईल. आक्रमणात कृरता असते, परंतु प्रतिकारात शुरता असते. धर्मयुद्ध म्हणजे धर्माचे, धर्माशी युद्ध नसून, धर्माचे अधर्माशी युद्ध आहे.
  • भारतीयता आपला पहिला धर्म आहे. भारतावर जर कोणते संकट आले, तर आम्ही सर्व मिळून त्याचा प्रतिकार करू, हा आपला पहिला धर्म आहे. धर्म म्हणजे समाजाला सुसंगती ठेवणारी, विचारधारा. ज्या विचारामुळे समाजाची धारणा होते. त्या विचारांना धर्म असे नाव आहे.
  • मिळालेल्या धनावर मनसोक्त चैन बघून दुसऱ्याकडे लक्ष न देणे, इतका नीचपणा पशुपक्षी व कीटकांमध्ये नाही. स्वतःच्या पायावर उभा राहून, आपल्या बुद्धी शक्तीने, समाजात पुढे पाऊल टाकणारा पुरुष विद्वत्तेच्या दृष्टीने कमी वाटत असला तरी, त्याचे ध्यान अनुभवी असल्यामुळे बहुमोल आहे.
  • जो स्वतःच्या पायावर उभा राहू शकत नाही, त्याची ती विद्यापीठ बिनकामाची समजावी. आपल्या अंतकरण सर्वांकरिता मोकळे ठेवणे, इतका मोठेपणा फारच थोड्या लोकांना मिळत असतो.
  • मीच विचाराने जगण्यापेक्षा, सुशीलतेने मरणे, हे अधिक मौल्यवान असते. लोकांचे काम न करता फुकट खाणाऱ्या इचलदार पेक्षा, मालकाचा दरवाजा इमानदारीने राखणारा कुत्रा, अधिक प्रिय वाटतो.
  • डोंगर उठवत बसण्यापेक्षा आलेल्या प्रसंगाचा विचार करून पुढे चालणारे लोकच खंबीर असतात.
  • देशा नागरिकांच्या संख्येवर मोठा गणला जात नसून, त्यातील थोर व नितीन लोकांवर मूल्यवान ठरला जात असतो. ज्याप्रमाणे तरुणावर त्याच्या माते पित्याची सत्ता असते, त्यापेक्षाही लाखो पटीने अधिक त्याचे देशाची सत्ता त्याच्यावर असते.
  • भीतीने काळे तोंड घेऊन, अंधारात लपून बसणाऱ्यापेक्षा, उजेडात लोकहिता करीता मरणारा खरा अमर असतो.
  • जगाचे सुख, दुखात्मक, आघात, ज्ञानी पुरुषांवरील संवत असतात. पण तुझ्यात अस होत नाही, तो आपल्या जाणीवने सर्वांचे निरसन करून,. लवकरच मोकळा होत असतो तो मनुष्य तत्वहीन आहे.
  • जो स्वतः भोजन करून आणि शेजारच्या मनुष्याला उपाशी पाहूनही काही देत नाही, दुसऱ्याच्या अडलेल्या कामाकरिता घरात वस्तू असूनही नाकारू नका. म्हणजे तुमच्या करीत आहे लोक धावून येऊन, तुमच्या अडचणी दूर करतील.
  • जी गोष्ट तुम्ही तुमच्याकरिता उत्तम समजतात, तीच गोष्ट दुसऱ्या करीत आहे. तेवढीच उत्तम समजून मदत करा. काहीतरी उद्योगाला शिकल्याशिवाय जिवंत राहणे, म्हणजे भूमीला भार होणे.
  • आपले दोष दुसऱ्याला सांगण्या एवढी जरी हिंमत नसली, तरी ते दोष आहेत. असा भाव मनात जागृत असू द्या म्हणजे दुरुस्त व्हालच, लोकांकडून नेहमी सन्मान घेऊ इच्छिणारी माणसे, आपला उगीच मान व्हावा असे चिंतू नका, आणि सर्वांची समान भावनेने वागा.
  • तेच लोक सज्जन असतात, ज्यांना उत्तम कामाविषयी आनंद आणि वाईट कामाचे दुःख होते. जे लोक आपत्तीला तोंड देण्याची हिंमत ठेवत नाहीत, ते भक्ती करूनही मरणाला जिंकू शकत नाहीत. जे मरणाला जिंकू शकत नाहीत, ते पुरुष ईश्वराचे भक्त होऊ शकत नाहीत.
  • मनुष्याने आपल्या विवेक बुद्धीला आणि ईश्वराला नेहमी घाबरले पाहिजे. परंतु अन्याय, आणि दृष्टीतेला कधीही न घाबरता हाकलून दिले पाहिजे.
  • आपली सत्यनिष्ठा व धैर्य न सोडणे, याला मार देणाऱ्या पेक्षाही जास्त धाडस ठेवावे लागते. म्हणून अहिंसेची किंमत अधिक मानली जाते.
  • मरणास घेऊन रडत बसण्यापेक्षा, मरणे अमर कसे होई,ल याची चिंता करणे बरे असते. गाव म्हणजे देवाचे मंदिर आहे. मानव हा सुंदर देव मूर्ती आहे. सर्वांची समान सेवा करणे, हीच आमची पूजा आहे.
  • पक्षांच्या भरारीपेक्षा, मनुष्याच्या मानसिक भरारीत अधिक सामर्थ्य असते. जो पुरुष उद्योगाला केवळ पोट भरण्याचे स्वरूप देतो, तो बंधनात पडतो. आणि जो आपल्या उद्योगाला रस्त्याच्या संपत्तीचे स्वरूप देतो, तो उद्योगानेही मोक्ष कामे होत असतो. ईश्वर भक्तांना मोक्ष जसा हाताचा मळ वाटतो, तसाच उद्योगशील पुरुषांना संसार हा केवळ चेंडूप्रमाणे वाटतो.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावरील पुस्तके

  • अनुभव सागर भजनावली (कवी – तुकडोजी महाराज)
  • आठवणी (सचित्र) : राष्ट्रसंत जन्मशताब्दीच्या (गंगाधर श्रीखंडे)
  • ग्रामगीता (कवी – तुकडोजी महाराज)
  • डंका तुकडोजींचा (राजाराम कानतोडे)
  • राष्ट्रसंत तुकडोजी (बालसाहित्य, लेखक – प्रा. राजेंद्र मुंढे)
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (चरित्र, लेखक – डॉ. भास्कर गिरधारी)
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मौलिक विचार (संकलन – लेखक – प्रा. राजेंद्र मुंढे). (लोकवाङ्मय प्रकाशन)
  • राष्ट्रसंताची अमृतधारा : भाग १, २, ३ (तुकडोजी महाराज)
  • राष्ट्रीय भजनावली (कवी – तुकडोजी महाराज)
  • लहरकी बरखा (हिंदी, कवी – तुकडोजी महाराज)
  • सेवास्वधर्म (कवी – तुकडोजी महाराज)

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माहिती व्हिडिओ

FAQ

१. संत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे.महाराजांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी यावली, जिल्हा अमरावती येथे झाला.

२. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे बालपणीचे नाव काय होते?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे.महाराजांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी यावली, जिल्हा अमरावती येथे झाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वडिलांचे नाव बंडोपंत व यांच्या आईचे नाव मंजुळाबाई होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे ब्रह्मभट वंशातले होते.

३. ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला?

ग्रामगीतेचे लेखन हा तुकडोजी महाराजांच्या जीवन कार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ग्रामगीता हे जणु तुकडोजी महाराजांच्या वाङ्मय सेवेची कृतीच होय. स्वतःला ते तुकड्यादास म्हणत. कारण भजन म्हणताना, ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणीच जीवन काढले, याची त्यांना जाणीव होती.
खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचवली होती. ती अतिशय प्रमाणकारक ठरली, ग्रामीण सुरक्षित व्हावे. सुसंस्कृत व्हावे. ग्राम उद्योग संपन्न व्हावेत. गावाने देशाच्या गरजा भागव्यात. ग्राम उद्योगांना प्रोत्साहन मिळावे. प्रचारांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे. असे त्यांचा प्रयत्न होता. त्यांचे प्रतिबिंब ग्रामगीतेच उमटले आहे.

निष्कर्ष

मित्रहो आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवा रांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment